Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘प्रगत संशोधनामुळेभूल देणे सोपे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अलिकडच्या काळात भूल देण्यासाठी लागणारी औषधे आणि उपकरणे यामध्ये प्रगत संशोधन झाले आहे. त्यामुळे भूल देणे आता जास्त सुरक्षित झाले आहे. या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती आणि देवाण-घेवाण व्हावी, यासाठी परस्परात संवाद महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. आय जे. नमाजी यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व अनेस्थेशिया विभाग आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.कल्पना कुलकर्णी होत्या.

या कार्यशाळेत भूलतज्ज्ञानी भूल देताना घ्यावयाची काळजी, नवनवीन उपकरणे, ऑक्सिजनचे महत्व, स्वरयंत्र पाहण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रमाणाबाहेर वाढलेले वजन, भाजलेले रुग्ण, घशाचा, तोंडाचा कॅन्सर, अपघातामुळे जबड्याला झालेली इजा, प्रमाणाबाहेर वाढलेली थायरॉइडची गाठ अशा शस्त्रक्रियेवेळी पूर्ण भूल देणे अनेकदा गुंतागुंतीचं आणि रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो यावेळी नेमकी काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेत डॉ. अपेक्षा पटवा, डॉ. अमित शहा, डॉ. राकेश गर्ग, डॉ. सईद अहमद अशा आंतरराष्ट्रीय डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडकरींना निवेदन

0
0

कोल्हापूर : रस्ता सहापदरीकरणात कामात गोकुळ शिरगांव (ता. करवीर) येथील महामार्गावर उड्डाण पूलाचा समावेश करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अमल महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली. त्यांनी मुंबई येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन निवेदन दिले. पुणे बेंगळुरू महामार्ग क्रमांक चारवरील मौजे गोकुळ शिरगाव येथे महामार्गामुळे गावचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. या गावची लोकसंख्येत वाढ होत असून गावचा विस्तार झपाट्याने होत आहे. या परिसरातील नागरिकांची सातत्याने उड्डाणपूल करण्याची मागणी आहे. भविष्यात रस्ता सहापदरीकरणाच्या कामात येथील उड्डाण पुलाचा समावेश करून कामाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार महाडिक यांनी निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात तिघांकडून युवतीवर गोळीबार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका युवतीवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. संबंधित युवतीच्या पोटात गोळी लागली असून, तिच्यावर जिल्हा  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अश्विनी कांबळे (वय २०, रा. बुधवार नाका, सातारा) असे जखमी युवतीचे नाव आहे.  बुधवार नाक्यावरील समाज मंदिराजवळ अरिहंत जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान आहे. तिचा विवाह नुकताच ठरला आहे. भावाच्या लहान  मुलाला घेऊन ती दुकानाकडे निघाली असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिच्यावर गोळीबार केला.  यावेळी रिक्षातून आलेल्या  एका युवकाने दुकानाजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या युवकाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, त्याचा गोळी चुकून अश्‍विनीच्या पोटामध्ये लागली.  त्यामुळे ती मुलासह रस्त्यावर कोसळली. गोळीबाराच्या आवाजामुळे  नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत गोळीबार करणारा पसार झाला.

अश्विनी गंभीर जखमी झाली. तिच्या पोटामध्ये उजव्या बाजूला गोळी लागली आहे. काही नागरिकांनी संबंधित युवतीला तत्काळ रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली, त्यातील पुंगळी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे. दरम्यान, अश्विनीवर कोणी व का गोळी झाडली, हे अद्याप समोर आले नाही. अश्विनीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्यांचे तसेच कोणावर  गोळीबार करायचा होता त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही.  शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हेत्रेंच्या कारखान्यावर थकबाकीमुळे जप्ती

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उत्पादन शुल्काची पाच कोटी ४६ लाख रुपयांचे देणे थकल्यामुळे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या मालकीचा मातोश्री लक्ष्मी साखर कारखान्याची मालमत्ता उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. हा कारखाना अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे आहे.

या कारखान्याने मे  २०१६ पासून ते जून २०१७ या काळात साखर विक्री करून त्यावरील उत्पादन शुल्क सुमारे ३ कोटी १४ लाख रुपये ग्राहक आणि व्यापाऱ्यायांकडून वसूल केले. मात्र हे शुल्क सरकारकडे भरले नाही. याबाबत उत्पादनशुल्क विभागाने कारखाना प्रमुखांशी वारंवार पत्रव्यवहार केला, तसेच समन्सही बजावले. मातोश्री शुगरला थकबाकीदार  घोषित करण्यात आले होते. तरीसुद्धा थकबाकी भरण्याला   कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने अखेर व्याज व दंडासहित सुमारे ४ कोटी ६५ लाख येणे बाकी आणि या व्यतिरिक्त सुमारे ८१ लाख रुपये व्याज व दंड अशी सुमारे ५ कोटी ४६ लाखांच्या थकबाकीपोटी अखेर केंद्रीय उत्पादनशुल्क खात्याकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, यापूर्वी प्राप्तिकर विभागाने कारखान्याच्या बँक खात्यांचा तपशील मागविला होता. त्यानंतर रेल्वे लाइन येथील फेडरल बँकेच्या शाखेतील कारखान्याचे खातेही गोठविण्यात आले होते. परंतु या खात्यामध्ये फक्त ९५१७ रुपये इतकीच रक्कम शिल्लक होती. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रासरूट स्पर्धा उद्या

0
0

कोल्हापूर: राजर्षी शाहू स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे दिवंगत बाळ जाधव यांच्या स्मरणार्थ ग्रासरुट स्पर्धेचे आयोजन शनिवार (ता.२) जरगनगर कमानीसमोर करण्यात आले आहे. स्पर्धा ६ साईड १४ वर्षाखालील मुलांसाठी असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास चषक व रोख रक्कम देण्यात येईल. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी इतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर गार्डन असुविधांच्या गर्तेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात अनेक उद्याने कडक उन्हापासून नागरिकांना सावली, मोकळा श्वास आणि सहवास देतात. मात्र, या उद्यानांची म्हणावी तशी निगा प्रशासनाने ठेववलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यान असे असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. या उद्यानात रोज शेकडोलोक येत असतात. उद्यानाजवळ जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून असंख्य लोक येथे येत असतात. त्यांच्यासाठी महावीर उद्यान ही हक्काची जागा आहे. तसेच संध्याकाळी लहान मुलांसाठी येथे 'किडझोन' तयार होतो. कॉलेजवयीन तरुण ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या महावीर उद्यानातील समस्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

विद्युत वायरी उघड्यावर

बागेच्या प्रवेशद्वाराजवळच विद्युत वायरी धोकादायक स्थितीत उघड्यावर पडल्याचे आढळतात. अनेक विद्युत खांबांच्या वायरीची टोके उघडी पडली आहेत. यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना गंभीर इजा होण्याची शक्यता अधिक आहे. विद्युत पेटीचा दरवाजा खुला असून त्यात वायरींचे अस्ताव्यस्त जाळे बाहेर पडले आहे.

कचऱ्याचे साम्राज्य

बागेतील प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कचरा आढळतो. तसेच उद्यानात आतील भागात कागदाचे बोळे, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची आवरणे असा कचरा आढळतो. उद्यानाच्या समोरील मुख्य भागात अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा आढळतो. यात सिगारेटी व गुटखा आदीची पाकिटे आढळतात. तसेच इतर प्लास्टिक कचरा फेकला जातो. बागेत महाविद्यालयीन तरुण वाढदिवस साजरा केल्यानंतर झालेला कचरा अस्ताव्यस्त फेकत असल्याने घाणीचे साम्राज्य तयार होत असते.

खेळाच्या साहित्याची मोडतोड

लहान मुलांसाठी असलेल्या किडझोनमधील खेळाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. या ठिकाणी असलेल्या भिंतीचे सिमेंट आवरण निघून गेले आहे. मुलांसाठी असलेल्या प्लास्टिकच्या साधनांना छिद्र पडली आहेत. तसेच किडझोनजवळील विद्युत खांब नादुरुस्त असून वायरी उघड्यावर आहेत. लहानग्यांसाठी असणाऱ्या झोपाळ्याचे खांब उभे असून झोपाळा गायब आहे. येथे मुलांसाठी पुरेशी खेळाची साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बैठकीसाठी असलेले बाकड्याची मोडतोड देखील झाली आहे.

पाणीपुरवठा नियोजन गरजेचे

बागेसाठी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अनेकदा झाडांना अतिप्रमाणात दिले जाणारे पाणी साठून राहिल्याने त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय आहे पण सध्या फिल्टर मशीन नादुरुस्त असून लोकांना मोठ्या टाकीतील अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. फिल्टर मशीनची तत्काळ दुरुस्ती झाल्यास नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल.

बागेतील वातावरण आल्हाददायक असून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामध्ये प्रसाधनगृहांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय व्हायला हवी. परिसर स्वच्छतेकडे प्रशासनाबरोबर नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. स्वयंशिस्त पाळल्यास बागेतील वातारवण चांगले राहण्यास मदत होईल.

यशवंत पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा दूध संकलन बंद

0
0

फोटो आहे

..........

... अन्यथा दूध संकलन बंद करू

दूध संघ प्रतिनिधींचा इशारा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंदीविरोधात दूध संस्थांची एकी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांद्वारे दुधाचे संकलन केल्यास वैधमापनशास्त्र विभागाकडून वजनकाटे जप्तीची कारवाई केली जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक क्षेत्रात प्रगती सुरू असताना दूध व्यवसायात उलटी गंगा वाहत आहे. याचा त्रास कर्मचाऱ्यांसह दूध संघांना होत आहे. वैधमापनशास्त्र विभागाकडून सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबावी अन्यथा दूध संकलन बंद करण्याचा इशारा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दूध संघ व प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेच्यावतीने दिला. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले. प्रमाणित वजनकाट्याची सक्ती केल्यास दूध उत्पादक हिसका दाखवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार धनंजय महाडिक व 'गोकुळ'चे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. 'संभाजी ब्रिगेडच्यावतीने दूध संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यातून दूध संकलन करुन लूट करत असल्याची तक्रार केली होती. तसेच प्रमाणित मापांचा (लिटर) वापर करण्याची मागणी करत आंदोलनही केले. याची दखल घेत वैधमापनशास्त्र विभागाने इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त करुन दूध संकलन बंद पाडले आहे. याचा गंभीर परिणाम दुग्ध व्यवसायावर होणार असल्याने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या पुढाकारांने जिल्हाधिकारी सुभेदार यांना निवेदन दिले.

यावेळी बोलतााना खासदार महाडिक म्हणाले, ' दूध संकलनासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केल्यास गावागावात असंतोष निर्माण होऊन दूध उत्पादक कायदा हातात घेतील. विज्ञानयुगात ब्रिटीशकालीन जुनी लिटर माप पद्धती वापरणे म्हणजे प्रगती सोडून अधोगतीकडे जाण्यााचा प्रकार आहे. दोन्ही जिल्ह्यात दैनंदिन सुमारे ३५ लाख लिटर दूध संकलन केले जाते. जर प्रमाणित पद्धतीचा वापर करायचा झाल्यास वेळेचा अपव्यव होईल, तसेच संकलनासाठी जास्त काळ लागले. दूध खराब होऊन मोठा आर्थिक फटका बसेल. वजन काट्यांमधील त्रुटींसंबंधी आपण लोकसभेत पाठपुरावा करु.'

'गोकुळ'चे चेअरमन पाटील म्हणाले, 'सरकारकडून डिजीटल इंडियाची साद दिली जात असताना दूध संकलनात मात्र जुन्या लिटर पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश देवून २५ वर्षे मागे जाण्याचाच प्रकार आहे़ जिल्ह्यात दैनंदिन १५ ते २० लाख लिटर दूध संकलन होत आहे. संकलनासाठी जुन्या पद्धतीचा अवलंब केल्यास कर्मचाऱ्यांची संख्या अधिक लागेल. तसेच दुग्ध उत्पादकांना माप होऊ पर्यंत बराचवेळ प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे उत्पादकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वैधमापनशास्त्र विभागाची कारवाइ त्वरीत थांबवावी अन्यथा जिल्ह्यातील दूध संकलन बंद करु.'

शिष्टमंडळात एनडीडीबीचे अध्यक्ष अरुण नरके, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजीत पाटील, दीपक पाटील, राजेश पाटील, दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील, सांगली दूध संघाचे चेअरमन विनायक पाटील, किरीटभाई मेहता, श्रीपाद चितळे, शीतल थोटे यांच्यासह प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुभेदार यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह उपस्थित होते.

चौकट-

आंदोलकात दूध उत्पादक किती ?

'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, 'शेतीला जोड व्यवसाय म्हणून सर्वसामान्य दूध उत्पादक व्यवसाय करतात. इलेक्ट्रॉनिक वजन काट्याबाबत दूध उत्पादकांची कोणतीही तक्रार नसताना केवळ संभाजी ब्रिगेड आंदोलन करते, म्हणून कारवाई होणार का, संघटनेने केलेल्या आंदोलनात दूध उत्पादक किती आहेत?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणातील महिलेची प्रकृती अत्यवस्थ

0
0

कोल्हापूर : राष्ट्रीय बँकेकडून महिला बचत गटांना २५ हजार रुपये कर्ज मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेले पाच दिवस उपोषण करणाऱ्या गीता कांबळे यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला . महिला बचत गटांना राष्ट्रीय बँकाकडून २५ हजार रुपये कर्ज मिळावे, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या दामदुप्पट व्याज दराची सरकारने चौकशी करावी, या मागणीसाठी गेले पाच दिवस मनसे प्रणित महालक्ष्मी महिला बचत गटाच्यावतीने आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारी दुपारी बचत गटाच्या अध्यक्षा गीता कांबळे बेशुद्ध पडल्या. त्यांना १०८ रुग्णवाहिकेने सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राजू जाधव, उषा जाधव, मेघा साठे, सुनीता कणगांवकर, रचना पोवार आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीवरून पडून वृद्धाचा मृत्यू

0
0

पोलिस डायरी ....

..................

दुचाकीवरून पडून

वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर

दुचाकीवरून जाताना चक्कर आल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. बाळू यशवंत अंकुशे (वय ६५, रा. साखरवाडी, ता. निपाणी) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (ता. ३१) भादोले (ता. हातकणंगले) येथे झाला होता. परिसरातील नागरिकांनी जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान, शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

..............

दुचाकी घसरून

तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर बिद्री येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. तुषार श्रीप्रकाश पाटील (वय २२. रा. वाळवे खुर्द, ता. कागल) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (ता. ३१) रात्री हा अपघात झाला होता. नागरिकांनी तुषारला गंभीर जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. १) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

..............

गळफास घेतलेल्या

तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील तरुण सागर बळवंत लाड (वय ३३) याने राहत्या घरी रविवारी (ता. २७) पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. १) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

.............

मारहाणीत दोघे जखमी

कोल्हापूर

किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर वनिता गोरडे (वय ५०) व संभाजी माने (४०) यांना आंबेवाडी (ता. चंदगड) येथे मारहाण झाली. गुरुवारी (ता. ३१) हा प्रकार घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापड दुकानात चोरी

0
0

कापड दुकानात चोरी

कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत येथे कापड दुकानाच्या शटरचे लॉक तोडून चोरट्याने रोख रकमेसह विविध प्रकारचे कपडे असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी स्वप्निल रंगराव कदम (वय २८, रा. जनाई दत्तनगर, कळंबा) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रोख रक्कम बारा हजार, ६० शर्ट, ४० फूलपँट असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवार पेठेकडून ‘प्रॅक्टिस’ला धक्का

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरु असलेल्या फुटबॉल महासंग्राम स्पर्धेत मंगळवार फुटबॉल क्लबने धक्कादायक विजयाची नोंद केली होती. त्यांनी बलाढ्य प्रॅक्टिस फुटबॉल क्लब 'अ' संघावर टायब्रेकरमध्ये ४-१ अशी मात करत त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. अत्यंत चुरशीच्या लढतीत बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लबवर ४-३ असा पराभव केला. बालगोपाल व मंगळवार पेठ संघांनी साखळी फेरीत प्रवेश केला.

मंगळवार पेठ फुटबॉल क्लबने प्रॅक्टिस क्लबला पूर्णवेळेत शून्य गोलबरोबरीत रोखले. टायब्रेकरमध्ये मंगळवार पेठेने बाजी मारली. त्यांच्या भरत पाटील, सोमनाथ निकम, विकी जाधव, नितेश खापरे यांनी अचूक फटके मारत गोल नोंदवले. प्रॅक्टिसकडून प्रतिक बदामेने एकमेव गोल केला. राहुल पाटील, माणिक पाटील यांचे फटके बाहेर गेले.

बालगोपाल व संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील पूर्णवेळ सामन्यात गोलची नोंद झाली नाही. त्यामुळे मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये बालगोपालकडून सुमीत घाटगे, रोहित कुरणे, आशीष कुरणे, अतिश घोलप यांनी तर बुधवार पेठकडून हरिष पाटील, प्रसाद पाटील, विश्वदीप साळोखे यांनी गोल नोंदवले. बालगोपालकडून बबलू नाईक तर बुधवार पेठेकडून किरण कावणेकर, निखिल कुलकर्णी गोल नोंदवण्यात अपयशी ठरले. बालगोपालने ४-३ असा विजय मिळवला.

शनिवारी दिलबहार तालीम मंडळ अ व खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यात दुपारी चार वाजता सामना होणार आहे.

०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजनांना लढविण्याचे षडयंत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खोटा इतिहास बदलण्याचे काम करण्याऐवजी बहुजनांविरोधात बहुजन लढविण्याचे षडयंत्र सनातनी व्यवस्थेकडून रचले जात आहे. त्यातून युवकांची माथी भडकवून जातीय दंगलीचे घडविल्या जात आहेत. दोन धर्म, समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळविण्याचा राजकीय डाव रचले जातात. त्यातून बहुजन समाजाने शहाणे होण्याची वेळ आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी केले. मराठा स्वराज्य भवन, अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेतराजर्षी शाहू स्मारक भवनात पहिले पुष्प गुंफताना 'मराठा : कालचा आणि आजचा ' या विषयावर आसबे यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव हिलगे होते.

या विषयावर ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे म्हणाले, 'सध्याच्या कालखंडातही बहुजन समाजाला चातुर्वण्य व्यवस्थेत अडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्या षडयंत्राला आजचा मराठा समाज बळी पडत आहे. बहुजन समाजाला बहुजन समाजाच्या विरोधात लढण्यासाठी हत्यार बनविले जात आहे. त्यातूनच ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. मात्र त्याचे 'शिवाजी कोण होता' या पुस्तक तरूण पिढीला मार्गदर्शक आहे. काही मराठे सत्ताकारणात मग्न असून समतेचा विचार बाजूला केला आहे. काही भक्तिमार्गाकडे वळले आहेत. काहीजण जातीय दंगलीच्या राजकारणात सक्रियपणे सहभागी आहेत. साखर कारखानेही राजकारणाचे अड्डे बनले आहेत. या स्थितीचा फायदा घेऊनच बहुजन समाजाला खिळखिळी करण्याचे काम सुरू आहे.'

आसबे पुढे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज,महात्मा जोतिबा फुले यांची बदनामी अजूनही सुरूच आहे. तत्कालिन काळापासून सनातनी मंडळींनी सुरू केलेले राजकारणाचे डाव या काळातही खेळले जात आहेत. हिंदुत्वाचे राजकारण म्हणून चातुर्वण्य व्यवस्था पद्धतशीरपणे लागू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हजारो वर्षांच्या चातुर्वण्य व्यवस्थेला विरोध केल्यानेच महापुरुषांची बदनामी करण्यात आली. इतिहासात जाणीवपूर्वक चरित्रहनन करण्यात आले. १९६० नंतरच्या समाजाने इतिहास, सामाजिक समतेचा विचार सोडून दिला. त्यामुळेच खोटा इतिहास रचण्याचे षडयंत्र रचले गेले.'

यावेळी अशोक माळी, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मुस्लिम बोर्डिगचे चेअरमन गणी आजरेकर, क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव आदी उपस्थित होते. शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. माणिक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते : यशवंतराव थोरात, माजी अध्यक्ष, नाबार्ड

विषय : वर्तमानाच्या शोधात: छत्रपती शिवाजी

वेळ : सायंकाळी ५ : ३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूलप्रश्नी दिल्लीत सोमवारी बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील जागेत पूल नसल्याने पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामास परवानगी मिळण्यासाठी दिलेला हा प्रस्ताव योग्यच आहे. त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला राज्याचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी दिला. मुंबईत त्यासंबंधी बैठक झाली. दिल्लीत सोमवारी (ता. ४) होणाऱ्या राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाच्या बैठकीत पुलाच्या बांधकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीला पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक दिलीप देसाई, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे उपस्थित होते.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून पुलाच्या बांधकामास परवानगी मिळावी, या संदर्भात ही बैठक झाली. पुलाची सद्यस्थिती आणि स्ट्रक्चरल ऑडिटबाबतच्या अहवालबाबतची माहिती कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी बैठकीत दिली. शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे पर्यायी पुलाचे काम पूर्ण होण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीला बांधकामास परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पुलाच्या बांधकामास परवानगी देण्याबाबत येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग, महसूल आणी राज्य महामार्ग विभागाने संयुक्तरित्या ब्रह्मपुरी टेकडी व पर्यायी पूल परिसराचा संयुक्त सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे ऑनलाइन पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिली. पुरातत्त्वच्या अखत्यारित असलेल्या ब्रह्मपुरी टेकडीपासून पुलाचे बांधकाम लांब असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी सांगितले. यावेळी पुरातत्त्वचे पश्चिम विभाग संचालक एम. नंबीराजन यांनी कोल्हापूरला भेट देऊन ब्रह्मपुरी टेकडीपासून पर्यायी पुलाचे ठिकाण शंभर मीटरवर असल्याबाबतचा अहवाल केंद्रीय पुरातत्त्वकडे पाठवल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल कुंभकोनी यांना देण्यात आली. त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळण्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पुलाच्या बांधकामाबाबत परवानगी मागणी योग्य ठरेल, असा सल्ला कुंभकोनी यांनी दिली. सोमवारी दिल्लीत राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाची बैठक होणार आहे.

अडचणीतून मार्ग निघणार

दरम्यान, पुलासंदर्भातील परवानग्या सोमवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत देण्यात येतील, असा विश्वास खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला. दिल्लीत पुलासंदर्भात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणच्या अध्यक्षा प्रो. सुष्मिता पांडे व सदस्य सचिव नवनीत सोनी उपस्थित होते. राज्यसभेत हे विधेयक मंजूर न झाल्याने खा.संभाजीराजे यांनी 'भारतीय पुरातत्त्व'च्या महासंचालक उषा शर्मा आणि राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण अध्यक्षा प्रो. पांडे यांची भेट घेतली. पुलाचे काम सुरु करण्यासाठी मार्ग काढावा, अशी विनंती याआधीही केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि महसूल विभाग यांचे संयुक्त सर्वेक्षण १९५६ पासून झालेले नव्हते. या अनुषंगाने संयुक्त समितीने केलेल्या पाहणीत ब्रह्मपुरी टेकडी (सरंक्षितस्थळ) ते पुलादरम्यानचे अंतर जास्त आहे. त्यामुळे मूळ कायद्याच्या कचाट्यातूनच पूल बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा झाला, या संदर्भात सर्वांनीच समाधान व्यक्त केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ प्राध्यापकांना वसुलीची चिंता

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील उपसंचालक कार्यालयातील 'साहेब' आणि काही ठराविक कर्मचारी संगनमताने प्रती प्राध्यापक ४ लाख, २० हजार रुपये घेऊन नियमबाह्य नियुक्तीचे आदेश देण्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र टाइम्सने प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर बेकायदेशीर कामगिरीचा भांडाफोड झाला. परिणामी डल्ला मारूनही साहेबांना नियुक्तीचा आदेश न देताच सेवानिवृत्त व्हावे लागले. नियुक्ती आदेशानंतर पगार सुरू होईल, या अपेक्षेने पैसे दिलेल्या त्या प्राध्यापकांत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शुक्रवारी दिवसभर ते पैसे दिलेल्या मध्यस्ताच्या संपर्कात राहून आमचे काय होणार, अशी विचारणा करीत होते. मध्यस्थाने सावधपणे ठोस उत्तर न देता बघूया, असे मोघम सांगून वेळ मारून नेली.

सरकारने प्राध्यापक बंदी उठवली नसताना कोल्हापूर शहर, जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली या जिल्ह्यातील ७० प्राध्यापकांना नियमबाह्य सरकारी मान्यता देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी दोन कोटींवर डल्ला मारला. त्या पैशात वरिष्ठांचाही वाटा असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे गुपचूपपणे साहेब सेवानिवृत्त होण्याच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी मान्यता देणार होते. ते डल्ल्याच्या आमिषाने आदेश दिले असते तरी आयुक्तपातळीवर ते पात्र ठरले नसते. साहेब पायउतार होणार असल्याने त्यांना याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते.

अतिरिक्त प्राध्यापकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण नाही, रोस्टर अद्ययावत नाही, वस्तुस्थितीजन्य पटपडताळणी नाही, भरती बंदी उठवलेली नाही इतक्या प्रमुख अडचणी आहेत. तरीही केवळ पैसे मिळतात म्हणून नियुक्तीचे आदेश देण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात यापूर्वीच अनेकजणांनी शिक्षण आयुक्त, मंत्र्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र काही वरिष्ठांना वाटा मिळाल्याने पुढे काहीही होऊ दे, दाबून आदेश देण्याचा डाव साहेबांनी आखला होता. ७० पैकी ६८ जणांच्या नियुक्त्यांना ब्रेक लागला. पैसे दिलेले प्राध्यापक हवालदिल बनले. कर्ज काढून मलिद्यासाठी रक्कम दिल्याने ते आर्थिक दृष्टचक्रात सापडले आहेत. आदेश नसल्याने पगाराविना कर्जावरील व्याज कसे भरायचे, असा प्रश्न संबंधित प्राध्यापकांसमोर उभा राहिला आहे.

बातमीचा धसका

उपसंचालक कार्यालयात पैसे गोळा करून देणारे रॅकेट कार्यरत आहे. प्रशासनातील काहीजणांचा त्यामध्ये सहभाग आहे. 'मटा'ने पैशासाठी नियमबाह्य प्राध्यापक नियुक्तीचे आदेश देण्याच्या प्ररकणाची चिरफाड केली. त्यामुळे कार्यालयातील रॅकेटने जबर धसका घेतला आहे. पैसे दिलेले काही प्राध्यापक शुक्रवारी दिवसभरही कार्यालय परिसरात घुटमळताना दिसत होते. मध्यस्थांना कार्यालयाबाहेर बोलवून भेट घेत आमचे काय होणार अशी विचारणा करीत होते.

बंदी असताना प्रक्रिया कशी?

प्राध्यापक बंदी उठवण्याचा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. तो निर्णय झालेला नसल्याचे १५ दिवसांपुर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तरीही उपसंचालक कार्यालयातील साहेब जाता-जाता ७० प्राध्यापकांना नियुक्तीचे आदेश देण्याची प्रक्रिया कशी राबवली, कोणत्या सरकारच्या नियमानुसार ते आदेश देणार होते, दिलेले आदेश किती दिवस पात्र ठरणार होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी शिक्षकांचा थाळीनाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षण विभाग व कोषागार कार्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे एक कोटी १२ लाख, ३४ हजार, ५२० रुपयांचे वेतन थकले आहे. थकीत वेतन रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून वेतन लवकर द्यावे, या मागणीसाठी राज्य मान्य खासगी प्राथमिक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळेतील नियमित व प्लॅनमधील काही शाळांतील शिक्षकांचे मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ चे वेतन द्यावेत असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. ३१ मार्च, २०१८ पूर्वी वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्याचा नियम होता. पण प्राथमिक विभाग वेतन पथक व जिल्हा कोषागार कार्यालय यांच्यातील समन्वय नसल्याने एक कोटी १२ लाख, ३४ हजार, ५२० रुपयांचे वेतन जमा झालेले नाही. दोन्ही कार्यालयाकडे राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने खुलासा मागितला असता दोन्ही कार्यालयाकडून वेतन रोखण्यास आपण जबाबदार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. शिक्षकांचे थकीत वेतन लवकर मिळावे, यासाठी राज्य शिक्षण संचालक विभागाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, मुकुंद चव्हाण, नरसिंह महाजन, कलावती देवकाते, अमृता कुंभोजे, चंदाराणी मंत्री, सुप्रिया पोवार, राजीव कदम, संतोष चव्हाण, सुदर्शन सुतार, सुरेंद्र तिके, स्नेहल रेळेकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरा केळकर कार्यक्रम

0
0

उत्तरा केळकर

यांची आज मैफल

कोल्हापूर : प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांची उद्या (ता. २) 'उत्तररंग' मैफल रंगणार आहे. हिंदी आणि मराठी गीतांचा अनमोल खजीना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उलगडणार आहे. शिवाय त्यांची मुलाखतही होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री आठ वाजता मैफल होईल. महेश हिरेमठ आणि शुभांगी जोशी यांचाही स्वरसाज असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावात ओढ्यात बांधकाम

0
0

(फोटो आहेत)

पाचगावात ओढ्यात बांधकाम

ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही अडवला ओढा; रात्रीत केले संरक्षक भिंतीचे काम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडून ओढा अडवून अवैध बांधकाम सुरू आहे. ओढ्यापासून दहा फूट अंतराबाहेर बांधकाम करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने बांधकाम सुरूच आहे. ओढा अडवल्यास याचा फटका परिसरातील नागरिकांना बसणार आहे, त्यामुळे काम थांबवण्याची विनंती नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

शहराला लागून असलेल्या पाचगावची झपाट्याने वाढ सुरू आहे. ग्रामपंचातीच्या हद्दीत अनेक बांधकामे सुरू आहेत. अनियंत्रित बांधकामांमुळे मूलभूत सुविधांवर ताण येऊ नये, आणि नैसर्गिक ओढे,नाले, टेकड्या यांचा ऱ्हास होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पाचगावमध्ये प्रदीप भुयेकर-पाटील या बांधकाम व्यावसायिकाने भैरवनाथ कॉलनी परिसरात थेट ओढा अडवण्याचे काम केले आहे. आरकेनगरकडून स्मशानभूमीकडे जाणारा ओढा वर्षभरातील बहुतांश काळ खळखळून वाहतो. ओढ्याच्या दोन्ही काठांवर मोठी झाडे आहेत. झाडांमुळे परिसरात हिरवाई आहे. पक्ष्यांसाठी हा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकाने ओढ्यातील दोन्ही बाजुच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर घाला घातला. गेल्या आठवड्याभरापासून जेसीबीच्या साहायाने जमिनीचे सपाटीकरण सुरू होते. दोन दिवसांपासून थेट ओढ्यात बांधकाम सुरू केले आहे.

पाचगाव ग्रामपंचायतचे सरपंच संग्राम पाटील आणि सदस्यांनी ओढ्याबाहेर १० फूट अंतरावर बांधकाम करण्याच्या सूचना बांधकाम व्यावसायिकाला दिल्या होत्या. प्रत्यक्ष जागेवर जाऊन ओढ्याकडेची जागा रिकामी सोडण्यास सांगितले होते. बांधकाम व्यावसायिकाने याकडे दुर्लक्ष करून ओढ्यातील झाडे तोडली. परप्रांतीय मजुरांना आणून दोन रात्रीत संरक्षक भिंतीचे काम केले. थेट ओढ्यात कॉंक्रीट टाकून भिंत घातली आहे. ओढ्याची रुंदी १५ ते २० फूट इतकी आहे. बांधकाम व्यावसायिकाने ओढ्यात बांधकाम करून ओढ्याची अवस्था गटरसारखी केली आहे. ओढ्याची दिशा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याने परिसरातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. गेल्या वर्षी मुसळधार पावसात अतिक्रमण झालेल्या ओढ्यांची दुरवस्था स्पष्ट झाली आहे. पाचगावमध्ये पुन्हा असाच धोका उद्भवू शकतो. ओढ्यातील जागा बळकावून ओढ्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकाकडून सुरू असून, ग्रामपंचायतीने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सांगूनही बांधकाम व्यावसायिक अतिक्रमण करण्याची आगळीक करीत असेल तर हा गंभीर प्रकार वेळीच हाणून पाडण्याचे कर्तव्य ग्रामपंचाय प्रशासनाला करावे लागेल.

रात्रीत केले बांधकाम

ओढ्यातील झाडे तोडल्यानंतर या परिसरात अतिक्रमण होत असल्याची चाहूल परिसरातील नागरिकांना लागली होती. ग्रामपंचायतीनेही ओढ्यात बांधकाम करू नये, अशी नोटीस बजावली होती. नागरिकांचा विरोध वाढू नये, यासाठी बांधकाम व्यावसायिकाने रात्रीचे काम सुरू ठेवले. परप्रांतीय मजुरांना आणून सलग दोन रात्रीत ओढ्यातील संरक्षक भिंतीचे काम करून घेतले. घाईत काम करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत.

भैरवनाथ कॉलनी परिसरात ओढ्यात बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला ओढ्यापासून दहा फूट अंतराबाहेर बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली जाईल. चुकीचे बांधकाम होत असेल तर बांधकाम व्यावसायिकावर कारवाई होणार.

संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरके फाउंडेशनचे यश

0
0

दोन फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सेवा मुख्य परीक्षेत अरूण नरके फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सुधीर पाटीलने राज्यात दुसरा क्रमांक मिळवित उपजिल्हाधिकारीपदापर्यंत बाजी मारली. राजश्री देसाईचा राज्यात ११ वा क्रमांक आला. तिची मुख्याधिकारीपदी निवड झाली. दररोज दहा ते बारा तास अभ्यासाचे नियोजन केले. तज्ज्ञ शिक्षक, मुलाखत समितीने केलेल्या मार्गदर्शनाने यश मिळाल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले. फाउंडेशनतर्फे गेली २५ वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या शिवाजी पेठ, नागाळा पार्क, सांगली व गडहिंग्लज येथील शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ तहसीलवर घागर मोर्चा

0
0

फोटो

................

शिरोळ तहसीलवर घागर मोर्चा

पंचगंगाकाठच्या ग्रामस्थांचे आंदोलन, नदी प्रदुषणमुक्त करण्याची मागणी

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करावी, प्रदुषण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी तसेच पिण्यासाठी शुध्द पाणी द्यावे, या मागणीसाठी हरोली, नांदणी, धरणगुत्ती येथील ग्रामस्थांनी शिरोळ तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढला. या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पंचगंगा नदी प्रदुषणाचा सामना या नदीकाठच्या गावांना करावा लागतो. धरणगुत्ती, नांदणी, हरोलीसह शिरोळ तालुक्यातील अन्य गावांना पंचगंगा नदीचेच दुषित पाणी प्यावे लागते. वारंवार मागणी करूनही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तीन गावातील ग्रामस्थांनी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने डोक्यावर घागर घेऊन सहभागी झाल्या होत्या. सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प राबवा पंचगंगेला वाचवा, स्वच्छ पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. शुध्द पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त झालीच पाहिजे अशा घोषणा देत ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आले.

नायब तहसिलदार जे.वाय.दिवे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार उल्हास पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी जि.प.सदस्य अमरसिंह पाटील, सावकर मादनाईक, पंचायत समिती सभापती मिनाक्षी कुरडे, दरगू गावडे, राजू कुरडे, शेखर पाटील, प्रसाद धर्माधिकारी, सर्जेराव शिंदे, संजय बोरगावे, सागर संभूशेटे, प्रकाश लठ्ठे, नगरसेवक संभाजी मोरे, राहुल बंडगर यासह तीनही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोल्हापूर, इचलकरंजी शहराबरोबरच नदीकाठच्या औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा नदीवरून पाणी योजना होती. मात्र नदी दुषित झाल्याने १५ वर्षांपूर्वी कृष्णा नदीतून नवी पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेस गळती लागल्याने आता वारणा नदीतून अमृत योजना मंजूर करण्यात आली आहे. पंचगंगाकाठच्या अनेक गावांना आजही या नदीचे पाणी प्यावे लागत असून ग्रामस्थ काविळ तसेच अन्य आजारांना बळी पडत आहेत. नांदणी, हरोली, धरणगुत्ती या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर होण्याची गरज आहे. मात्र इचलकरंजी शहरास एक व पंचगंगाकाठच्या अन्य गावांना दुसरा न्याय अशी सरकारची दुटप्पी भुमिका आहे ,असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर शितल कवठेकर, भालचंद्र लंगरे, मनोहर माळी, अशोक लंगरे, अजित नरदे, रामचंद्र कांबळे, विलास साळुंखे, विजय कोरवी यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

..........

चौकट येईल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात ५०६ कोटीची एफआरपी थकीत

0
0

लीड ... आहे

साखर पोती फोटो

...........

लोगो

.............

गोड साखरेची कडू कहाणी - १

...........

विभागात ५०६ कोटींची एफआरपी थकीत

खरीप हंगामावर परिणाम, व्याज सवलतीपासून अनेक शेतकरी वंचित

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

ऊसदरावरुन सुरुवातीस पेटलेल्या संघर्षानंतर यावर्षीच्या गळीत हंगामाची अखेर सांगता झाली. विभागातील ३७ कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला. कारखाने सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत ऊस उत्पादकांना वेळत एफआरपी रक्कम देण्यात आली. पण त्यानंतर साखर उद्योगावर निर्माण झालेल्या संकाटामुळे एफआरपी थकीत जाण्यास सुरुवात झाली. हंगाम संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्याप उत्पादकांना संपूर्ण एफआरपी मिळालेली नसून १५ मे अखेर कोल्हापूर विभागात ५०६ कोटी १२ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. कारखान्यांकडे रक्कम थकीत असल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामावर होऊ लागला आहे.

बाजारपेठेत साखरेला असलेला चांगला दर आणि केंद्र सरकारने एफआरपीमध्ये केलेल्या वाढीमुळे यावर्षीचा गळीत हंगाम ऊस उत्पादकांना चांगला फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. तरीही हंगामापूर्वीच ऊसदरावरुन संघर्षाची ठिणगी पेटली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर एफआरपी अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पहिल्या पंधरवड्यामध्ये उत्पादकांना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांकडून एफआरपी मिळाली. पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण होत गेल्यानंतर उत्पादकांना एफआरपी वेळेत मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या, त्या हंगाम संपला तरी कायम आहेत.

ठरल्याप्रमाणे एफआरपी देण्यास साखर कारखाने बांधिल असल्याचे कारखानदारांकडून हंगामाच्या मध्यावर स्पष्ट केले, तरी हंगामाच्या मध्यावरच तोडग्यातील एफआरपीमध्ये ५०० रुपये कमी केले. कारखानदारांच्या एकतर्फी निर्णयाविरोधात उत्पादक व शेतकरी संघटनांनी प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. तक्रारींची दखल घेत कारखान्यांवर कारवाईही करण्यात आली. पण तरीही हंगाम संपून दोन महिने झाले असताना अद्याप उत्पादकांना संपूर्ण एफआरपी मिळालेली नाही.

विभागातील ३९ कारखान्यापैकी ३७ कारखान्यांनी गळीतास सुरुवात केली होती. त्यामध्ये २७ सहकारी व दहा खासगी कारखान्यांचा समावेश होता. या सर्व कारखान्यांनी एप्रिलअखेर १२.४५ सरासरी उताऱ्यांसह दोन कोटी १४ लाख मेट्रिक टनाचे गाळप केले. गाळप झालेल्या उसापोटी उत्पादकांना विभागातील कारखान्यांनी पाच हजार ३८० कोटीची एफआरपी दिली असून अद्याप साखर कारखान्यांकडे ५०६ कोटी १२ लाखांची एफआरपी थकीत आहे.

हंगाम संपून दोन महिन्याचा कालावधी होऊनही पूर्ण एफआरपी मिळालेली नसल्याने उत्पादक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामातील मशागत, बी-बियाणे, खते खरेदी व पेरणीला सुरुवात झाली असताना बिले मिळालेली नसल्याने उत्पादकांना हात उसणवारीवर आपल्या गरजा भागवाव्या लागत आहे. कारखाने अडचणीत असल्याने उत्पादक शांत असला, तरी यावर त्वरीत उपाययोजना न केल्यास, याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.

............................

चौकट

आरआरसीतंर्गत कारवाई झालेले कारखाने

शुगर कंट्रोल अॅक्टनुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी न दिलेल्या पाच कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीतंर्गत करवाई केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, वारणा, पंचगंगा (रेणुका शुगर्स) तर सांगली जिल्ह्यातील माणगंगा व महाकाली साखर कारखान्यांचा समावेश होता.

..............

चौकट

१५ मेपर्यंत दिलेली एफआरपी

५,३८० कोटी ४६ लाख

विभागाने दिलेली एफआरपी

५०६ कोटी १२ लाख

विभागातील थकीत एफआरपी

..................

कोल्हापूर जिल्हा

३,४५२ कोटी २८ लाख

जिल्ह्यातील उत्पादकांना मिळालेली एफआरपी

२४८ कोटी ८९ लाख

थकीत एफआरपी

................

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने : १२

५० ते ९९ टक्के एफआरपी : २४

५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी : १

.............

कोट

'थकीत एफआरपीसाठी कारखान्यांच्या दारात जावून बसल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लवकरच साखर आयुक्तांची भेट घेणार आहोत. तसेच एकाचवेळी बाजारात येणारी साखर रोखण्यासाठी रिलीज ऑर्डरची अंमलबजावणी केली पाहिजे.

धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images