Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फौंड्री

$
0
0

फाउंड्री ... फाइल फोटो

.........

फाउंड्री उद्योगाला अच्छे दिन

निर्यातीत वीस टक्के वाढ, दरमहा सहाशे कोटींची उलाढाल

Gurubalmali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाला दोन महिन्यात अचानक 'अच्छे दिन' आले आहेत. या उद्योगातील निर्यात वीस टक्के वाढली आहे. दरमहा साडेपाचशे ते सहाशे कोटींची उलाढाल होत आहे. सत्तर हजार टन कास्टिंगची निर्यात देश आणि परदेशात होत असल्याने या उद्योगाला एकदम झळाळी आली आहे.

काही वर्षे कोल्हापुरातील फाउंड्री उद्योगात मंदी होती. त्यामुळे हा उद्योग अडचणीत आला होता. पण फेब्रुवारीपासून अचानक यामध्ये तेजी वाढली आहे. चीनमधील फाउंड्री उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील आयात व विविध देशातील निर्यात कमी झाली आहे. यामुळे कोल्हापुरातील कास्टिंगला प्रचंड मागणी वाढली आहे. पूर्वी दरमहा ५० ते ५५ हजार टन कास्टिंगची देश व परदेशात निर्यात होत होती, ती आता सत्तर हजार टनापर्यंत पोहचली आहे. यामुळे या उद्योगात दरमहा साडेपाचशे ते सहाशे कोटींची उलाढाल होत आहे.

कोल्हापुरात दुचाकी, चारचाकीसह सर्व अवजड वाहनांचे सुटे भाग तयार होतात. मारूती, महिंद्रा, टेल्को, फोर्ड, जॉन डिअर,फोक्स वेगन यासह सर्वच कंपन्या कोल्हापुरातून हे भाग मागवतात. देशात वाहनांचे उत्पादन प्रचंड वाढल्याने सुटे भाग देखील जादा लागत आहेत. चीनमधील उत्पादन थंडावल्याने जगाचे लक्ष आता कोल्हापूरवर आहे. या भागातील उत्पादनांचा दर्जा देखील अतिशय चांगला असल्याने त्याला मागणी जादा आहे. शिवाय येथील उत्पादन खर्च कमी असल्याने कंपन्यांना येथे वाहनांचे सुटे भाग इतर देशांच्या तुलनेत कमी किंमतीत मिळतात. यामुळे कोल्हापूर विभागातील सर्व साडेतीनशेवर फाउंड्री कंपन्यांना प्रचंड काम आहे. मागणी वाढलेली असताना आता पुरवठा करण्याचे मोठे आव्हान या उद्योजकांसमोर उभे राहिले आहे. विशेष म्हणजे देशपरदेशातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी वाहनांचे सुटे भाग लवकर मिळावेत म्हणून कोल्हापुरात ठाण मांडून आहेत.

चौकट

वाहनांच्या सुट्या भागांना मागणी

देशात सध्या जलसिंचनाच्या कामासह रस्त्यांची कामे प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. यासाठी ट्रॅक्टर, ट्रकसह इतर अवजड वाहनांचा वापर वाढल्याने या वाहनांची निर्मिती देखील वाढली आहे. या वाहनांना लागणारे सर्व सुटे भाग कोल्हापुरात तयार होतात. याला देश आणि परदेशातून मोठी मागणी आहे.

................

कोट

'गेल्या तीन महिन्यात फाउंड्री उद्योगात मोठी तेजी आहे. देशपरदेशातून कास्टिंगची प्रचंड मागणी वाढल्याने कोल्हापूरच्या उद्योगांना अच्छे दिन आले आहेत. सोलर, पवनचक्की, शेती अवजारे, अर्थमुव्हर्स यासह विविध क्षेत्रातील सुटे भाग कोल्हापुरात प्रचंड प्रमाणात निर्यात होत आहेत.

चंद्रकांत जाधव, उद्योजक

..........

कोट

'देश परदेशातील विविध कंपन्यांनी कोल्हापुरातील फाउंड्री कारखान्यांना सुटे भाग निर्मितीसाठी एवढ्या ऑर्डर दिल्या आहेत की ते तयार करून देणे अवघड जात आहे. मागणी वाढल्याने त्यानुसार पुरवठा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

सुरेश चौगले, अध्यक्ष, इंडियन फाउंड्रीमेन

चौकट

कामगारांची कमतरता

या उद्योगात तेजी आल्याने काम वाढले आहे. पण हे काम करण्यासाठी या उद्योगात सध्या कुशल कामगारांची कमतरता भासत आहे. कोल्हापूर विभागातही बिहारी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. पण एप्रिल व मे महिन्यात ते विविध कामांसाठी आपआपल्या गावी जातात. यामुळे देखील कामगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

..................

जिल्ह्यातील स्थिती

शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, इचलकरंजी, सांगली परिसरातील फाउंड्री : ४५०

ऑटोमोबाईल, ऑईल इंजिनशी निगडित : ४२ टक्के

पंप आणि व्हॉल्व्हशी निगडित : १७ टक्के

साखर कारखान्यांशी निगडित : ६ टक्के

ट्रॅक्‍टर आणि शेती औजारांशी निगडित : ४ टक्के

इतर प्रकारच्या कास्टिंगशी निगडित : ३१ टक्के

कामगारांची संख्या : ५० हजार

उत्पादन : ६० हजार टन ते ७५ हजार टनापर्यंत

..........................................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हेत्रेंच्या कारखान्यावर थकबाकीमुळे जप्ती

$
0
0

सोलापूर : उत्पादन शुल्काची पाच कोटी ४६ लाख रुपयांचे देणे थकल्यामुळे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या मालकीचा मातोश्री लक्ष्मी साखर कारखान्याची मालमत्ता उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. हा कारखाना अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे आहे.

या कारखान्याने मे  २०१६ पासून ते जून २०१७ या काळात साखर विक्री करून त्यावरील उत्पादन शुल्क सुमारे ३ कोटी १४ लाख रुपये ग्राहक आणि व्यापाऱ्यायांकडून वसूल केले. मात्र हे शुल्क सरकारकडे भरले नाही. याबाबत उत्पादनशुल्क विभागाने कारखाना प्रमुखांशी वारंवार पत्रव्यवहार केला, तसेच समन्सही बजावले. मातोश्री शुगरला थकबाकीदार  घोषित करण्यात आले होते. तरीसुद्धा थकबाकी भरण्याला   कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने अखेर व्याज व दंडासहित सुमारे ४ कोटी ६५ लाख येणे बाकी आणि या व्यतिरिक्त सुमारे ८१ लाख रुपये व्याज व दंड अशी सुमारे ५ कोटी ४६ लाखांच्या थकबाकीपोटी अखेर केंद्रीय उत्पादनशुल्क खात्याकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, यापूर्वी प्राप्तिकर विभागाने कारखान्याच्या बँक खात्यांचा तपशील मागविला होता. त्यानंतर रेल्वे लाइन येथील फेडरल बँकेच्या शाखेतील कारखान्याचे खातेही गोठविण्यात आले होते. परंतु या खात्यामध्ये फक्त ९५१७ रुपये इतकीच रक्कम शिल्लक होती. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांसोबत गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

मुंबई येथे मित्रांसोबत फिरायला गेलेल्या मोरगिरी विभागातील (धावडे, ता. पाटण) येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राजेंद्र विष्णू रोकडे (वय ३०, रा. धावडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, धावडे येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्याची फिर्याद यशवंत कृष्णा रोकडे (वय ६९) यांनी पाटण पोलिसांत दिली आहे.

मोरगिरी विभागातील धावडे गावातील राजेंद्र विष्णू रोकडे (वय ३०) हा आपल्या गावातील इतर तीन मित्रांसोबत मोरगिरी येथील मोहम्मद मुकादम यांची खासगी गाडी घेऊन बुधवारी सकाळी मुंबईला फिरायला गेले होते. त्याठिकाणी मौजमजा केल्यानंतर बुधवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर ते एका हॉटेलमधून बाहेर येत असताना हॉटेलच्या पायऱ्यांवरून राजेंद्र रोकडे हा युवक कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला होता. जखमी अवस्थेतच त्याला मोटारीत घालून सर्व मित्र परतीच्या प्रवासाला लागले असता, राजेंद्रचा मोटारीतच मृत्यू झाल्याचे इतर मित्रांच्या लक्षात आल्याने ते चांगलेच घाबरले होते. घाबरलेल्या अवस्थेत या मित्रांनी राजेंद्रचा मृतदेह मोरगिरी विभागातील धावडे येथील संदीप कोळेकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून ते पसार झाले.

दरम्यान, संदीप कोळेकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी राजेंद्रचा मृतदेह आढळून आला. याची माहिती गावातील लोकांना समजल्यानंतर राजेंद्रचे वडील यशवंत रोकडे यांनी या घटनेची फिर्याद पाटण पोलिसांत दिली. त्यानुसार पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानुसार पाटण पोलिसांत आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र रोकडे याच्या मृतदेहाचे पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याचा अधिक तपास पाटण पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ तालुक्यातील पाणी घातक

$
0
0

शिरोळ तालुक्यातील

पाण्यात विषारी घटक

रायचूर कृषी संशोधन विद्यापीठ तज्ज्ञांचा निष्कर्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोळ तालुक्यातील शेती आणि पिण्यासाठी पुरवठा होणारा पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वारणा या नद्यांतील पाण्यात घातक, विषारी घटक आहेत. अति रासायनिक खतांचा वापर, औषधांच्या फवारणीमुळे कोबी, फ्लॉवर, वांगी, पालक या भाजीपाल्यांमध्येही आरोग्यास हानीकारक घटक मिळाले आहेत, अशी माहिती कर्नाटकातील रायचूर कृषी संशोधन विद्यापीठाचे संशोधक संचालक शंकरगौंडा यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिरोळ तालुक्यातील भाजीपाल्यामुळे कॅन्सरचा फैलाव होत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रायचूर कृषी विद्यापीठच्या संशोधकांच्या पथकास निमंत्रण देत कॅन्सर वाढीस कोणते घटक आहेत, त्याचे संशोधन करण्यास सांगितले. त्यानुसार महिन्यापूर्वी संशोधक शंकरगौंडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिरोळ तालुक्यात येऊन प्राथमिक सर्व्हे केला. सर्व्हेतील निष्कर्षाची माहिती शंकरगौंडा यांनी दिली.

ते म्हणाले, 'शिरोळ तालुक्यातील चार नद्यांचे पाण्याचे नमुने घेतले. पाण्यात साठपटीने अधिक विषारी घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतीही उदध्वस्त होईल. पाणी पिणाऱ्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमी होईल. भाजीपाल्यांच्या नमुन्यातही विषारी घटक मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत औषध फवारणीसंबंधी जागृती करण्याची गरज आहे. जागृतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील प्रत्येकाने पिण्याचे पाणी फिल्टर करून प्यावे.'

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आशुतोष पाटील म्हणाले, 'कॅन्सर झाल्यानंतर बरा होण्यासाठी हॉस्पिटल उभारण्याऐवजी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे.'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे म्हणाले, 'केवळ शिरोळमधील भाजीपाल्यामुळे कॅन्सरच्या रूग्णात वाढ होत आहे, असा प्रचार जाणीपूर्वक सुरू आहे. त्यामुळे संघटनेने संशोधकांना बोलवून नेमकी कारणे शोधण्यास सांगितले. पंचगंगेसह सर्वच नद्यांचे प्रदूषित पाणी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत असल्य़ाचे पुढे आले आहे. संशोधकांचा निष्कर्ष सरकारकडे देणार आहे.' यावेळी सावकर मादनाईक, रमेश भोजकर, अजित पाटील आदी उपस्थित होते.

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक शिक्षणचाआजपासून संचमान्यता कॅम्प

$
0
0

कोल्हापूर

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेला एक जूनपासून सुरवात होत आहे. चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांतील शाळांसाठी कॅम्पचे आयोजन केले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे. संच मान्यतेसाठीच्या कॅम्पचे दिवस पुढीलप्रमाणे आहेत. शुक्रवारी : चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी. शनिवारी: आजरा, करवीर, गडहिंग्लज, कागल. सोमवारी: हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, भुदरगड. मंगळवारी: कोल्हापूर शहर.

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथी काउन्सिल बरखास्त

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : सेंटर काउन्सिल ऑफ होमिओपॅथी या समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मनाई केली. त्यामुळे सरकारने ही समितीच अचानक बरखास्त केली. आपल्या सोयीने निर्णय घेता यावेत, म्हणून प्रशासक मंडळ नियुक्त करत सरकारने तसा कारभारही सुरू केल्याने होमिओपॅथी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

देशातील २२० होमिओपॅथी कॉलेजमधील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेंटर काउन्सिल ऑफ होमिओपॅथीची स्थापना केली होती. यामध्ये ५२ सदस्य होते. कॉलेजमधील अभ्यासक्रम, परीक्षा नियंत्रण, नवीन कॉलेज मान्यता, जागा वाढ यांसह विविध निर्णय या समितीकडून घेतल्या जात होत्या. समिती स्वायत्त असतानाही गेल्या चार वर्षांत काउन्सिलच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप वाढला होता. यामुळे समितीचे सदस्य नाराज होते. कामकाजातील सरकारचा हस्तक्षेप थांबावा, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत सरकारला हस्तक्षेप थांबवण्याचा आदेश दिला.

समितीचे नाव पुढे करत सरकारमधील काही घटक आपल्याला हवा तो निर्णय घेत होते. पण, न्यायालयाच्या दणक्याने त्यांच्यावर मर्यादा येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची नोटीस न देता केंद्र सरकारने समितीच बरखास्त केली. त्यासाठी त्यांनी समितीचे अध्यक्ष डॉ. रामजी शिंदे यांच्यावरच भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. त्यांच्यावर वैयक्तिक कारवाई करण्याऐवजी समितीच बरखास्त करत वेगळ्या पद्धतीने राग काढल्याची सदस्यांची भावना आहे. बरखास्ती नंतर तातडीने सहा सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करत कारभारही सुरू केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात समितीने आता सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

चौकट १

नवीन प्रशासक मंडळ

निलजन सन्याल, प्रमोदकुमार पाठक, संजय गुप्ता, अनिल मल्होत्रा, अनिल खुराणा, नित्यानंद तिवारी

...

चौकट २

देशातील होमिओपॅथी कॉलेज... २२०

महाराष्ट्रातील कॉलेज... ५०

विद्यार्थी संख्या... दीड लाख

प्राध्यापक...बारा हजार

प्रशासकीय वर्ग... पंचवीस हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६८ प्राध्यापक नियुक्तीला ब्रेक

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : bhimgondaMT

कोल्हापूर : येथील शिक्षण उपसंचालक प्रशासनातील 'साहेब' आणि काही वरिष्ठ व कर्मचारी संगनमताने ७० प्राध्यापकांना नियमबाह्य नियुक्तीचा आदेश देण्याचा डाव उधळला असून, ६८ प्राध्यापकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.

नियुक्तीसाठी कार्यालयातील 'साहेबां'चा लाखोंवर डल्ला मारत सेवानिवृत्तीच्या दिवशीच मान्यता देण्याचा आदेश देण्याचा विचार होता. त्यासंबंधीचे वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये बुधवारी प्रसिध्द झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. उपसंचालकपदाचा अतिरक्त कार्यभार घेतलेले किरण लोहार यांनी स्थगितीचा आदेश गुरूवारी दिला.

यामुळे मान्यतेच्या आशेपोटी लाखो रुपये दिलेल्या प्राध्यापकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सरकारने प्राध्यापक बंदी उठवली नसतानाही डल्ला मारण्यासाठी कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली जिल्ह्यातील ७० प्राध्यापकांना नियमबाह्य मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी २ कोटींवर डल्ला मारला. हे प्रकरण 'मटा'ने उघड केले. त्याची चौकशी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी बुधवारी केली. गुरुवारी सेवानिवृत्त झालेले उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी राबवलेल्या प्राध्यापक नियुक्तीची प्रक्रियाच वादग्रस्त झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाईची भूमिका वरिष्ठांनी घेतल्यास दोषींवर कारवाई होणार आहे.

-------------------

आदेश नसल्याने नाराज

पैसे दिलेले अनेक प्राध्यापक गुरूवारी दिवसभर उपसंचालक कार्यालयात थांबून होते. नियुक्तीचे आदेश मिळतील, अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. नियुक्ती आदेशासंबंधी माहिती घेण्यासाठी गोंधळी यांच्याशी 'मटा'च्यावतीने संपर्क साधण्यात आला. पण त्यांनी मोबाइल रिसिव्ह केला नाही.

-------------------

कोट

सरकारने अजून प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवलेली नाही. त्यामुळे वादग्रस्त ७० पैकी ६८ प्राध्यापकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात येईल. या प्राध्यापकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी केली जाईल. नियमात बसत नसतील तर त्यांना मान्यता दिली जाणार नाही.

किरण लोहार, प्रभारी उपसंचालक

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावच्या तरूणाचा नृसिंहवाडीत कृष्णा नदीत बुडून मृत्यू

$
0
0

फोटो

...................

बेळगावच्या तरूणाचा

नृसिंहवाडीत बुडून मृत्यू

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

नृसिंहवाडी येथे कुटुंबियांसमवेत श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या बेळगाव येथील तरूणाचा कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. श्रीनंदन श्रीहरीराव पुट्टा (१८) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, श्रीहरीराव पुट्टा हे पत्नी, मुलगा तसेच त्याच्या मित्रांसमवेत नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी श्रीनंदन हा आपल्या मित्रांसमवेत कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमाजवळ घाटावर स्नानासाठी गेला होता. यावेळी श्रीनंदन हा कृष्णा नदीपात्रात अचानक बुडू लागला. श्रीनंदन तसेच त्याच्या मित्रांना पोहोण्यास येत नव्हते. श्रीनंदन बुडाल्याचे पाहून घाबरलेल्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. ही आरडाओरड ऐकून नावाडी संजय गावडे, काशीनाथ लोणार, अक्षय चव्हाण, शिवा सोनार, मजीद कणगी यांनी धाव घेऊन शोधाशोध सुरू केली. कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांना ही घटना समजताच त्यांनीही घटनास्थळी शोधकार्य सुरू केले. अखेर सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर श्रीनंदन याचा मृतदेह पाण्यात सापडला.

दरम्यान, आपला मुलगा नदीपात्रात बुडाल्याचे समजताच त्याच्या आईवडिलांना धक्का बसला. नदीकाठी श्रीनंदनच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. काही क्षणातच आपला मित्र आपल्यातून निघून गेल्याने श्रीनंदनचे मित्र भांबावलेले होते.

बेळगाव येथील श्रीनंदन हा बेंगळूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता. चारच दिवसांपूर्वी शेवटचा पेपर देऊन तो गुरूवारी आई-वडील तसेच मित्रांसमवेत नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी आला होता. आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून श्रीनंदनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. श्रीनंदन याला एक मोठा भाऊ आहे, तसेच त्याचे वडील श्रीहरीराव पुट्टा हे बेळगाव येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयात कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदल्यांच्या कारणावरुन जिल्हाधिकारी कार्यालयात शिवीगाळ, वादावादी

$
0
0

बदल्यांवरुन वाद उफाळला

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचऱ्याला शिवीगाळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयात १८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांप्रश्नी कर्मचाऱ्यांच्यातील राग उफाळून आला. आस्थापना विभागातील कर्मचाऱ्याच्या अंगावर एका विभागातील कर्मचाऱ्यांनी शिविगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने गुरुवारी कार्यालयात तणाव निर्माण झाला. महसूल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने चुकीची बदली प्रक्रिया राबविल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.

मे महिन्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. जे कर्मचारी तीन वर्षे एकाच तालुक्यात व सहा वर्षे एकाच आस्थापनेत काम करतात त्यांच्या बदल्या केल्या जातात. बदल्यांची प्रक्रिया आस्थापना विभागाकडे असते. गेले महिनाभर सेवाज्येष्ठता यादीनुसार गुरुवारी सायंकाळी लिपिक, अव्वल कारकून आणि मंडल अधिकारी अशा १८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले. बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी सायंकाळी कार्यमुक्तही करण्यात आले. विनंती, सोयीच्या व तक्रारी याची दखल घेऊन बदल्या करण्यात आल्या. पण बदलीत दुजाभाव झाल्याचा आरोप करत महसूल उपजिल्हाधिकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी आस्थापनेतील कर्मचाऱ्याला शिविगाळ केली. तसेच काही कर्मचारी त्यांच्या अंगावर धाऊन गेले. या घटनेनंतर ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. पण अनेक कर्मचाऱ्यांनी सोयीच्या तालुक्यात बदली झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. साहेबांच्या जवळच्या व्यक्तींना सोयीची ठिकाणे मिळाली आहेत, अशी कुजबुज सुरु होती.

बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन तोंडी तक्रार दिली. काही कर्मचाऱ्यांवर बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याचा पाढाही वाचण्यात आला.

बदली प्रक्रियेत काही कर्मचाऱ्यांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोपही यापूर्वी झाला आहे. काही कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रिया राबवणाऱ्या कर्मचाऱ्याच्याविरोधात थेट विभागीय आयुक्तांकडे लेखी अर्ज केले होते. त्यामुळे बदली प्रक्रियेतील कर्मचाऱ्याची बदलीही करण्यात आली होती. तरीही बदली प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचे समाधान न झाल्याने बदली प्रक्रिया कशी राबवायची असा प्रश्न अधिकाऱ्यासमोर उभा राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवतापविरोधी मोहीम आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात एक जूनपासून राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिम राबविण्यात येत आहे. एक महिन्याच्या या मोहिमेत हिवताप प्रतिबंधक उपाययोजना, जनजागृती, प्रबोधनपर कार्यक्रम राबवले जातील,' अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी बुधवारी दिली.

महाडिक म्हणाल्या, 'प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तरावर पंचायत राज सदस्यांच्या सभा, गावोगावी जागृतीपर रॅली, ग्रामसभा, प्रदर्शने, हस्तपत्रिकांचे वाटप, आशा सेविकांची कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम, डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, बचतगटांच्या सभा, रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा असे विविध जागृतीपर कार्यक्रम राबवले जातील.

जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, हत्तीरोग आजारांबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्यास आरोग्य प्रशासन प्राधान्य देईल. हिवताप रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंगीचा प्रभाव अधिक आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी एकात्मिक डेंग्यू निमूर्लन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतर्गंत गावागावात दैनंदिन स्वच्छता, गटारी वाहत्या ठेवणे, डास उत्पत्ती स्थान नष्ट करणे, रुग्ण सर्वेक्षण करणे, रक्त नमुने संकलित करणे, डेंगी रुग्ण आढळल्यास त्या गावात विशेष प्रतिबंधक उपाय योजना हाती घेतले जाणार आहे.

आरोग्य सभापती सर्जेराव पाटील म्हणाले, पाण्याची डबकी बुजवणे, नष्ट करणे, डबक्यात जळके तेल टाकणे, तुंबलेली गटारे वाहती ठेवणे, गप्पी मासे सोडणे, घरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा पुर्ण रिकामी करणे म्हणजे कोरडा दिवस पाळणे, घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, निरुपयोगी टायर्स, नारळाच्या करवंट्या, मोकळे डबे, फुटक्या बादल्यांची विल्हेवाट लावणे, किटकनाशक भारीत मच्छरदाण्यांचा वापर करणे, खिडक्यांना दारे बसविणे अशा प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करण्यात प्रत्येकांनी योगदान द्यावे. यावेळी प्रभारी जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात गोवा बनावटीची तीन लाखाचे विदेशी मद्य जप्त

$
0
0

फोटो आहे..........

...................

आजऱ्यात तीन लाखांचे

विदेशी मद्य जप्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करुन आजरा येथे दोन लाख ९७ हजार १२० रुपये किंमतीचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त केले. बुधवारी (३०) रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विदेशी मद्याच्या बाटल्यांचे ५४ बॉक्स, चारचाकी वाहन असा सहा लाख ५० हजार ८७० रुपयांचा माल हस्तगत केला. पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

राज्य उत्पादक शुल्क विभागाने या कारवाईची माहिती दिली. विभागाचे भरारी पथक बुधवारी सायंकाळी आंबोली (जि. सावंतवाडी) येथील तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना महिंद्रा पिकअप कारला थांबण्यास सांगितले असता कार वेगाने निघून गेली. पथकाने कारचा पाठलाग करत आजरा परिसरात कार अडवली. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता मागील बाजूस भाजीपाल्याचे रिकामे प्लॅस्टिक क्रेट दिसून आले. पोलिसांनी प्लास्टिक क्रेट बाजूला केल्यानंतर लपवलेले विदेश मद्याचे ७५० मिली लिटर बाटल्या असलेले ५४ बॉक्स मिळून आले. पोलिसांनी वाहनचालक शरद बाळू कसलकर (वय ३१), अजित अण्णाप्पा तिप्पे (२७), सुनील मोहन चौगुले (वय ३६, तिघे रा. चौगुले गल्ली, तमनाकवाडा, ता. कागल) यांना अटक केली. गोव्यातून बेकायदेशीर खरेदी केलेले मद्य संशयित अजित तिप्पे हा कागल व गडहिंग्लज येथे वितरित करत होता. चार महिन्यांपूर्वी तिप्पे याला पोलिसांनी अटक केली होती. अधिक्षक गणेश पाटील, उपअधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक के.बी. नडे, जे.एन. पाटील, जवान एस.डी. जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, रवी माळगे, वैभव मोरे कारवाईत सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मनिरपेक्ष घटकांनी एकत्र येण्याची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जातीयवादी आणि धर्मांध सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष घटकांनी एकत्रित येऊन परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन शाहीर संभाजी भगत यांनी येथे केले. धर्मनिरपेक्ष, विचारवंत, साहित्यिक, लोककलावंत आणि कार्यकर्त्यांच्या चिंतन परिषदेत ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. यावेळी २५ नोव्हेंबरला दुसरी चिंतन परिषद आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त, २८ नोव्हेंबरला गांधी मैदानात १ लाखाच्या उपस्थितीत 'संविधान वाचवा' मोहीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र विकास आघाडी, धर्मनिरपेक्ष जनजागृती अभियान, निर्मिती विचारमंच, युवा आंबेडकरवादी क्रांतीदल, सम्यक प्रतिष्ठान आणि सन्मान महिला फाउंडेशनतर्फे परिषद आयोजित केली होती.

शाहीर भगत म्हणाले, 'भाजप-शि‌वसेनेची राजकीय खेळी नीटपणे समजून घेतली पाहिजे. मतदान मिळेपर्यंत पक्षाकडून अनेक आमिषे दाखविली जातात. मात्र निवडणूक संपली की, त्यांचे खरे रूप उघड होते. त्याचा परिपूर्ण अभ्यास करूनच सर्व धर्मनिरपेक्षवाद्यांनी संघटित झाले पाहिजे.'

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, 'राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. त्या विरोधात डाव्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे.'

यावेळी डॉ. गेल ऑम्वेट, प्रा. करूणा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात अॅड. जयदेव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. कवी विठ्ठल शिंदे यांच्यासह अनेकांनी विद्रोही कविता सादर केल्या. प्रा. सुरेश केसरकर यांनी स्वागत केले. विश्वजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. चिंतामणी कांबळे यांनी आभार मानले. डॉ. ज. रा. दाभोळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. किसनराव कुराडे, प्रा. टी. एल. पाटील, अमित मेधावी, मोहन मिणचेकर, शंकर पुजारी, प्रशांत पुजारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाचे काम

$
0
0

फाइल फोटो

..................

मुंबईत आज पुलाच्या

कामासाठी मान्यतेची मोहर

पर्यायी पुलाच्या बांधकामासंदर्भात दोन स्वतंत्र बैठका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाला मंजुरीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत शुक्रवारी (ता.१) दोन वेगवेगळ्या बैठका होत आहेत. राज्य सरकारच्या स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत पुलाच्या बांधकामाला मान्यता देण्यासाठी हालचाली असून अॅडव्होकेट जनरल यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा होणार आहे. तर पुरातत्व विभागाच्या मुंबई कार्यालयातही, ब्रह्मपुरी टेकडी आणि पूल परिसरातील संयुक्त सर्व्हेबाबत बैठक आहे. यामुळे पर्यायी पुलाच्या बांधकामाला परवानगीची प्रक्रिया गतिमान झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून पुलाच्या बांधकामाला मान्यता मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील होते. प्रशासनाकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली होती. जुन्या पुलाचे आयुष्यमान संपल्याने हा पूल वाहतुकीला धोकादायक बनला आहे. यामुळे पर्यायी पुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे असल्याने त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. अत्यावश्यक सेवा म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत परवाना देण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. राज्याचे अॅडव्होकेट जनरल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पुलाच्या बांधकामाला मान्यता मिळावी यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

...................

'पुरातत्व'ची बैठक

केंद्रीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग, राज्य सरकारचा महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागातर्फे संयुक्तरित्या ब्रह्मपुरी टेकडी आणि पर्यायी पूल परिसराचा संयुक्त सर्व्हे झाला. सर्व्हेअंती ब्रह्मपुरी टेकडीची जागा आणि सीमारेषा निश्चित झाली. पुरातत्व वास्तूत समावेश असलेल्या ब्रह्मपुरी टेकडीपासून पर्यायी पूल शंभर मीटरपेक्षा लांब अंतरावर आहे. पुरातत्व विभागाच्या मालकीच्या अखत्याऱ्यातील जागेत पूल नसल्याने बांधकामास ना हरकत दाखला मिळावा अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने केली आहे. पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे पश्चिम विभागाचे संचालक एम. नंबीराजन यांनीही कोल्हापूरला भेट देऊन पाहणी केली होती. मुंबईतील बैठकीत या अहवालावर चर्चा होईल. या बैठकीत मान्यतेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नंबीराजन यांच्या शिफारसींसह पुलाचा संयुक्त अहवाल केंद्रीय पुरातत्व विभाग दिल्लीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले जाण्याची शक्यता आहे. चार जून रोजी दिल्लीत राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणची बैठक होणार आहे.

..........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण खनिज व्यावसायिकांचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

$
0
0

गौण खनिज व्यावसायिकांचा

सोमवारी मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गौण खनिज व्यावसायिकांच्या पोटावर पाय आणणारा सरकारी आदेश रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा गौण खनिज व माशिनरी व्यवसाय बचाव कृती समितीचे अध्यक्ष मुकुंद पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोवार म्हणाले, 'गौण खनिज उत्खननासाठी महसूल विभागाकडे परवानगी मागितली जाते. आठ दिवसांत परवाना देणे बंधनकारक असताना तहसीलदार एक ते दोन महिने परवाना देण्यास विलंब करतात. परवाना देण्यास विलंब होत असल्याने गौण खनिज उत्खननावर अवलंबून असणाऱ्यांचा चारितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या व्यावसायिकाने परवान्याशिवाय उत्खनन केल्यास महसूल खात्याकडून २०१८ पूर्वी जप्त केलेल्या गौण खनिजाच्या किंमतीच्या पाचपट दंड केला जात असे. पण राज्य सरकारने १२ जानेवारी २०१८ रोजी एक सरकारी आदेश काढून २५ हजार रुपयांपासून साडेसात लाख रुपयेपर्यंत दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. हा दंड मालावर न आकारात मशिनरीवर केला जात आहे. एकीकडे कर्ज काढून मशिनरी खरेदी करायची आणि या मशिनरीवर महसूल खात्याकडून दंड आकारला जात असल्याने गौण खनिज व्यावसायिकांवर संक्रात आली आहे. गौण खनिज करणारी मंडळी रस्ते, इमारतीसह बांधकाम व्यवसायास माल पुरवत असताना त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. दंडात्मक कारवाईचा सरकारी अध्यादेश रद्द करावा, गौण खनिज उत्खननाचे परवाने तात्काळ मिळावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहेत. मोर्चात गौण खनिज व मशिनरी व्यवसायातील कामगार व व्यावसायिक सहभागी होणार आहेत.' पत्रकार परिषदेला पंचायत समितीचे सदस्य डॉ. प्रदीप पाटील, लक्ष्मण धोत्रे, नागेश गाडीवडर, संजय कुऱ्हाडे, राजू डोंगळे, निलेश नलवडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५०० रुपयांची लाच घेताना उप वन संरक्षक कार्यालयातील लेखापाल जाळ्यात

$
0
0

फोटो

..............

लाच घेताना वन खात्यातील

लेखापाल जाळ्यात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इको सेन्सेटिव्ह झोनमधील जमिनीचा दाखला देण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव सातपुते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अनिल पांडुरंग गवळी (रा. बांदिवडे, ता. पन्हाळा) यांनी याबाबत तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईची माहिती दिली.

अनिल गवळी हे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. श्रीमती सीताबाई बाबाजी पानकर (रा. शेंबवणे, ता. शाहूवाडी) यांची शाहूवाडी तालुक्यातील मौजे गावडी येथील ११८ एकर जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार होणार आहे. व्यवहार होण्यापूर्वी पानकर यांची जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ठ आहे की नाही याचा दाखला देण्यासाठी ताराबाई पार्क येथील उप वन सरंक्षक कार्यालयात गवळी यांनी अर्ज दिला होता. दाखला देण्यासाठी कार्यालयातील लेखापाल सदाशिव सातपुते यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर अनिल गवळी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचला. पंचांसमक्ष १५०० रुपयांची लाच स्वीकारताना लेखापाल सातपुते याला रंगेहाथ अटक केली. पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती पाटील, हवालदार श्रीधर सावंत, पोलिस नाईक शरद पोरे, कर्मचारी रुपेश माने, नवनाथ कदम, चालक विष्णू गुरव यांनी कारवाईत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँका बंद

$
0
0

फोटो आहे

............

दीड हजार कोटींचे

व्यवहार थंडावले

बँक कर्मचारी संपाचा ग्राहकांना फटका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या संपाचा फटका ग्राहकांना बसला. या संपामुळे जिल्ह्यातील सरकारी बँकाचे कामकाज थांबले. शहरातील सरकारी आणि खासगी अशा ३५ बँका बंद राहिल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसला. काही एटीएममधील पैसे दुपारनंतर संपल्याने अनेकांची तारांबळ उडाली. बँकेच्या संघटनांनी दोन दिवसांत बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी, दसरा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर निदर्शने केली. शुक्रवार (ता. १) पासून बँका सुरू राहणार आहेत. संपामुळे दोन दिवसात सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे व्यवहार थंडावले.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली देशपातळीवरील नऊ संघटना सहभागी झाल्या आहेत. यामध्ये चार अधिकारी संघटना आणि पाच कर्मचारी संघटना सहभागी झाल्या. एसबीआयच्या दसरा चौक शाखेसमोर आयबीएफच्या धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एसबीआय स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी रवींद्र गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने झाली. भास्कर जोशी, प्रदीप हत्ती, सुनील शिंदे, राजेंद्र धुमे, सुहास शिंदे, विकास देसाई, मकरंद करंदीकर, एस. ए. कर्णिक, परेश हटकर, रमेश कांबळे, निखिल कुलकर्णी आदी सहभागी झाले. दरम्यान, सरकारी बँकांच्या बाहेर संपाची माहिती देणारे फलक झळकले होते. दैनंदिन कामासाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली. दोन दिवसांच्या संपामुळे ग्राहकांसह नागरी सहकारी बँकांना फटका बसला. बँकेतून केले जाणारे सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन उशीर होण्याची शक्यता आहे. कर्मचारी युनियननची सहकारी बँकाचे व्यवस्थापन करणाऱ्या इंडियन बँक्स असोसिएशन सोबतची चर्चा फिसकटल्याने निष्फळ ठरली. आयबीएफकडून केवळ दोन टक्के पगारवाढीच्या प्रस्तावाला विरोध करून संपाची सुरूवात झाली. या संपात जिल्ह्यातील नऊ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आदी सेवा सुरू राहिल्या. मात्र प्रत्यक्ष बँकातील कामकाज बंद राहिले. काही बँकांनी ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम मशीनमध्ये मंगळवारी भरलेले पैसे संपल्याने एमटीएममध्ये खडखडाट राहिला. राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाची झळ क्लिअरिंगला बसली, चेकचे व्यवहार थांबले असून त्याचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत राहणार आहे. नागरी बँकांच्या क्लिअरिंगलाही फटका बसला. पेन्शनधारकांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ६ जून पर्यंत पेन्शन देण्याच्या सूचना आहेत. मात्र महिनाअखेरीस होत असलेल्या संपामुळे दोन ते तीन दिवस उशीरा पेन्शन मिळणार आहे. आजही काही बँकांकडून पैसे भरण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी समितीवर अविनाश चव्हाण

$
0
0

कोल्हापूर: केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाच्या सार्वजनिक तक्रार समितीवर अविनाश चव्हाण यांची निवड झाली. ते दि तासगाव येथील आयकर आणि जीएसटी सल्लागार आहेत. केंद्रीय जीएसटी अंमलबजावणीत उद्योजक, व्यापारी आणि पुरवठादारांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि म्हणणे मांडण्यासाठी ही समिती नियुक्त केली आहे. प्रशासन आणि उद्योजक, व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून ही समिती कार्यरत राहणार आहे. या समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कार्यक्षेत्र आहे. केंद्रीय जीएसटीचे आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. अतिरिक्त आयुक्त सचिव आणि उद्योजक, व्यापारी, करसल्लागार असे सहा सदस्य या समितीत नियुक्त केले आहेत. चव्हाण हे तासगाव आणि पलूस येथे १९९५ पासून कर सल्लागार म्हणून २३ वर्षे कार्यरत आहेत. निवडीसाठी त्यांना अधीक्षक प्रदीप पाटील, भरत घार्गे, निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी निवडीचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. तील १०० कर्मचारी सेवानिवृत्त

$
0
0

कोल्हापूर

येथील जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील १०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना सन्मानपूर्वक संबंधित कार्यालयातील प्रमुखांनी निरोप दिला. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार समकक्ष कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तालुके क्षयमुक्तकरण्याचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. यंदा पन्हाळा, गगनबावडा दोन तालुके क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी केली. क्षयरुग्ण शोध विशेष मोहीम उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कागलकर हाऊस सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. खेमनार म्हणाले, 'क्षयरोग शोध विशेष मोहिमेतर्गंत १ लाख ४७ हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये झोपडपट्टी, स्थलांतरित, दुर्गम परिसरात सर्व्हे केले जाईल. सर्व्हेसाठी आरोग्य प्रशासनाने १३८ पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यात २०१३ ते २०१६ पर्यंत १३ हजार ६०३ क्षयरोग रूग्ण आढळून आले. २०१७ मध्ये त्यामध्ये २ हजार ८९३ नवीन रुग्णांची भर पडली. ३०४ रुग्ण गंभीर आहेत. जिल्हयातील क्षयरोग रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पहिल्या टप्यात सर्व्हे होईल. सप्टेंबर, डिसेंबर महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात रुग्णांची नोंदणी केली जाईल.

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी प्रास्ताविक केले. मागील वर्षी क्षयरोग रूग्ण शोध मोहिमेत उल्लेखनिय कामगिरी केलेले अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांना पत्र

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या नगर सचिव कार्यालयाकडून कार्यालयीन बैठका, निमंत्रणे, परिपत्रके नगरसेवकांना मुदतीत मिळावेत, असे पत्र नगरसेवक अशोक जाधव यांनी आयुक्त अभिजित चौधरी यांना दिले. काही वेळेला कार्यक्रम संपल्यानंतर नोटीस मिळत असून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. प्रभाग समितीच्या बैठकांचे निमंत्रण सदस्यांना वेळेत मिळत नसल्यामुळे सदस्य गैरहजर राहतात. कोरम अभावी बैठका तहकूब होत असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images