Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अट्टल चोरटा अटकेत, २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

(फोटो आहे)

अट्टल घरफोड्याकडून ३८ चोऱ्यांची कबुली

७० तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून किंवा खिडकीचे गज वाकवून रोख रकमेसह किंमती ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी अटक केली. प्रशांत काशीनाथ करोशी (वय ३२, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) असे चोरट्याचे नाव असून, त्याने ३८ चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील ७० तोळे सोन्याचे दागिने, २ किलो चांदीचे दागिने, लॅपटॉप, कॅमेरे, मोबाइल असा २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

शहरातील वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील चोरट्यांवर नजर ठेवली होती. गेल्या आठवड्यात जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा तपास करताना पोलिसांना चोरट्याची काही अवजारे मिळाली होती. यातील हायड्रोलिक जॅकवरून पोलिसांनी चोरट्याचा माग काढला. चोरट्याने अमेझॉनवरून हायड्रोलिक जॅकची खरेदी केली होती. या खरेदीची माहिती काढली असता प्रशांत करोशी असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी बोंद्रेनगरातील लक्ष्मीनारायण कॉलनीतून करोशी याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत संशयास्पद वस्तू मिळाल्याने अधिक चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली.

करोशी हा मूळचा इस्पुर्ली येथील असून, बोंद्रेनगरात तो भाड्याने खोली घेऊन राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीतील ७० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाचे चांदीचे दागिने, चांदीची भांडी, २१ हजार ५०० रुपयांची रोकड, ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे एलसीडी, कॅमेरे, डीव्हीआर मशिन, मोबाइल हॅन्डसेट असा सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आणखी १० तोळ्यांचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्याचे काम सुरू आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १८ आणि करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२ असे एकूण ३० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात शंभरहून अधिक चोरीचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. यानुसार त्याची अधिक चौकशी सुरू आहे. उघडकीस आलेल्या ३० चोऱ्यांपैकी १८ चोऱ्या त्याने २०१७ मध्ये केल्या आहेत, तर २०१८ मध्ये १२ चोऱ्या केल्या आहेत. एटीएम आणि डेबीट कार्ड चोरूनही त्याने त्यावरून रक्कम काढली आहे.

अट्टल चोरट्यास पकडल्याबद्दल पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास विशेष बक्षीस जाहीर केले. निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप, सचिन पंडित, युवराज आठरे आदींच्या पथकाने चोरट्यास पकडले. करोशी याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

....................

चौकट

बंद घरांची रेकी करून चोरी

प्रशांत करोशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत असून, त्याने यापूर्वी फसवणुकीचे चार, तर मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे केले आहेत. त्याचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. दोन वर्षांपासून त्याने नोकरी सोडून चोऱ्या करणे सुरू केले. दुपारपासून रात्रीपर्यंत तो बंद घरांची रेकी करीत होता. यानंतर रात्री दहाच्या सुमारास पुन्हा ते घर बंद असल्याची खात्री केल्यानंतर मध्यरात्री एक ते पहाटे चारच्या दरम्यान तो दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून किंवा खिडकीचे गज वाकवून आत जात होता. दुकानांचे शटर उचकटण्यासह लोखंडी कपाटांचे लॉक तोडण्यासाठी त्याच्याकडे अत्याधुनिक सामग्री आहे. विविध प्रकारच्या कटावण्या, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, दोऱ्या, ड्रील मशिन, पक्कड, एक्सापान आणि हायड्रोलिक जॅक पोलिसांनी जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन खरेदीमुळे सापडला चोरटा

$
0
0

(फोटो आहे)

ऑनलाइन खरेदीमुळे सापडला चोरटा

चोरट्याने ओएलएक्सवरून घेतले भाड्याने घर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्याधुनिक साधनांचा वापर करून घरफोड्या करणारा चलाख चोरटा प्रशांत काशीनाथ करोशी (वय ३२, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) हा अखेर त्याच्या चलाखपणामुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चोरीसाठी अमेझॉनवरून केलेल्या हायड्रोलिक जॅकच्या खरेदीने त्याला पोलिसांच्या कोठडीपर्यंत पोहोचवले. चोरीतील मुद्देमाल ठेवण्यासाठी त्याने ओएलएक्सवरून बोंद्रेनगर परिसरातील घर भाड्याने घेतले होते. चोरलेल्या एटीएमवरून काढलेली लाखो रुपयांची रक्कम त्याने पुणे आणि मुंबईत चैनीसाठी उडवली.

प्रशांत करोशी याचे मूळ गाव करवीर तालुक्यातील इस्पुर्ली. त्याचे बीएपर्यंत शिक्षण झाले आहे. यानंतर एका खासगी कंपनीत तो नोकरी करीत होता. नोकरीत त्याचे मन रमले नाही. नोकरी सोडून त्याने चोरीचे काम सुरू केले. फसवणूक आणि मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होताच वडिलांनी त्याला घरातून हाकलले. यानंतर त्याने घरफोड्यांचे सत्र सुरू केले. दुपारपासून संध्याकाळपर्यंत तो बंद घरांची रेकी करीत फिरत असे. यासाठीही त्याने चोरीच्याच मोटारसायकलचा वापर केला. दुपारी हेरलेल्या घराची पुन्हा रात्री दहा ते अकराच्या सुमारास रेकी करायची. घरातील लाईट बंद असेल तर त्याच घरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून तो लाखोंचा ऐवज लंपास करीत होता. गेल्या दोन वर्षात त्याने इतक्या चोऱ्या केल्या की, त्याला नेमकी संख्याही सांगता येत नाही. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतही त्याने चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

चोरीसाठी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी या साधनांची गरज होती. शहरात कुठे खरेदी केल्यास पोलिसांच्या नजरेत येणार या धास्तीने त्याने ऑनलाइन खरेदीचा फंडा वापरला. चोरीसाठी लागणारे बहुतांश साहित्य त्याने अमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी केले. आठवड्यापूर्वी त्याने जुना राजवाडा परिसरात एका बंद घरात चोरी केली. घाईत बाहेर पडताना त्याच्याकडील हायड्रोलिक जॅक आणि काही वस्तू तिथेच राहिल्या. चोरीचा पंचनामा करताना या वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी हायड्रोलिक जॅकची अधिक माहिती घेतली. शहरात एकाही दुकानात असा जॅक मिळत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आसपासच्या जिल्ह्यातही त्यांनी चौकशी केली, तेव्हा असे जॅक ऑनलाइन खरेदीतून मिळत असल्याचे लक्षात आहे.

अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा कंपन्यांकडे केलेल्या खरेदीच्या वस्तूंचे वितरण करणाऱ्या कुरिअर कंपन्यांना पोलिसांनी गाठले. दोन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने अमेझॉनवरून हायड्रोलिक जॅकची ऑनलाइन खरेदी केल्याची माहिती मिळाली. यावरून त्याचे नाव, पत्ता आणि मोबाइल नंबरही मिळाला. बोंद्रेनगरातील लक्ष्मीनारायण कॉलनीत जाऊन संशयास्पद प्रशांत करोशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील दोन वर्षात चोरट्याने शंभराहून अधिक चोऱ्या केल्या. पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी त्याने चोरीतील मुद्देमाल बाहेरच्या सोनारांकडे विकला. पुरावे मागे राहू नयेत, अशा चातुर्याने चोऱ्या केल्या. अखेर त्याची हुशारीच त्याला गजाआड घेऊन गेली. ऑनलाइन खरेदी आणि चोरीच्या ठिकाणी विसरलेला हायड्रोलिक जॅकवरून तो पोलिसांच्या हाती लागला.

............

चौकट

ओएलएक्सवरून घेतले भाड्याने घर

चोरटा करोशी याने एक वर्षापूर्वी ओएलएक्सवरून बोंद्रेनगरात घर भाड्याने घेतले होते. या घरात तो चोरीतील मुद्देमाल ठेवत होता. पोलिसांच्या झडतीतही किमती ऐवज सापडू नये, अशी व्यवस्था त्याने केली होती. याशिवाय इस्पुर्ली येथील घरात त्याने चार लॅपटॉप ठेवले होते. पोलिसांनी २८ लाख रुपयांचा किंमती ऐवज ताब्यात घेतला. भाड्याने घर देणारा घरमालक आणि चोरीतील सोने खरेदी करणाऱ्या सोनारांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

चौकट

फिर्यादी घेण्यास टाळाटाळ

चोरट्याच्या चौकशीदरम्यान जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १८ गुन्ह्यांची उकल झाली. यातील अनेक गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात नाही. यावरून फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. मध्ये तब्बल ५४ कर्मचारी लेटकर्मस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी बुधवारी अचानक हजेरी पत्रकांची तपासणी केली. त्यामध्ये ११ विभागातील तब्बल ५४ जण लेटकमर्स सापडले. त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. लेटकमर्समध्ये सर्वाधिक प्राथमिक शिक्षण विभागाचे कर्मचारी आहेत. महिला व बालकल्याण, प्राथमिक शिक्षण विभागातील एक कक्ष अधिकारीही उशिरा आल्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त कशी लागणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकृतपणे लेटकमर्स मिळाल्याने जि. प. मध्ये कधीही या, कधीही जा अशी प्रवृत्ती उघड झाली.

दोन वर्षापूर्वी तत्कालीन उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी स्वत: दहा वाजता प्रवेशव्दाराजवळ थांबून १०० हून अधिक लेटकर्मसना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आता नव्याने रूजू झालेल्या अडसूळ यांनी हजेरी पत्रक घेत लेटकर्मसना पकडले. यामुळे विविध कारणे सांगत उशिरा येणे, कामचुकारपणा करण्याची वृत्ती समोर आली. सकाळी १० वाजून १० मिनिटाच्या आत कामावर हजर होणे बंधनकारक आहे. मात्र काही कर्मचारी वारंवार उशिरा येत असल्याच्या तक्रारी होत्या. म्हणून अडसूळ यांनी आरोग्य विभागाचे हजेरी पुस्तक मागून घेतले. त्यात चार कर्मचारी वेळेत न आल्याचे दिसले. त्यानंतर सर्वच विभागातील हजेरी पुस्तक मागून घेतले. त्यामध्ये ११ विभागातील कर्मचारी उशिरा आल्याचे स्पष्ट झाले. बायोमेट्रीक हजेरी असताना कर्मचारी उशिरा येतात, त्याकडे प्रत्येक खातेप्रमुख सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, असेही उघड झाले. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

-------------

चौकट

'प्राथमिक' मध्ये जास्त लेटकमर्स

महत्वाचे विभागनिहाय लेटकमर्स असे : प्राथमिक शिक्षण : ११, महिला व बालकल्याण : ३, माध्यमिक शिक्षण : ५, वित्त विभाग : ६ , ग्रामपंचायत : ५, बांधकाम : १०, पाणी पुरवठा :३, ग्रामीण प्रकल्प संचालक व समाज कल्याण प्रत्येकी २, सामान्य प्रशासन १.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर झाला. ९१ टक्के निकालासह कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकावर कोकण तर तिसऱ्या स्थानावर पुणे विभाग आहे. दरम्यान यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल किंचित घटला असून गतवर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.४० टक्के लागला होता. तसेच यंदा कोल्हापूर विभागात परीक्षाकेंद्रावर झालेल्या गैरप्रकारातही दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याने कॉपीमुक्त परीक्षा या मोहिमेचा बोऱ्या वाजला.

सांगली, सातारासह कोल्हापूर केंद्रांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाचा निकाल ९१ टक्के लागला.

दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा प्रथम, सातारा जिल्हा दुसऱ्या तर सांगली जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. कोल्हापूर विभागातर्गत समाविष्ट होणाऱ्या सांगली सातारा जिल्ह्यातील विज्ञान, वाणिज्य व कला व किमान कौशल्य या शाखानिहाय निकालही चांगला लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७.८० टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९४.५३ टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर ७९.७० टक्केवारीसह कला शाखेचा निकाल आहे. यंदा विज्ञान शाखेतून ५४ हजार ३१८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५३ हजार, १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून २६ हजार, २३२ विद्यार्थ्यांपैकी २४ हजार, ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ३९ हजार, ५९३ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार, ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक कौशल्य शाखेचा निकाल ८८.३७ टक्के लागला असून, ५ हजार, ५०५ विद्यार्थांपैकी ४८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कोट

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९१ टक्के लागला असून, राज्यात कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर आहे याचे समाधान आहे. यंदा ५९ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात भरारी पथकाला यश आले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै व ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून, गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.

पुष्पलता पवार, विभागीय सचिव, कोल्हापूर विभाग

०००००००००००००००००००

कोल्हापूर विभाग

१५४

केंद्रांवर परीक्षा

१ लाख, २५ हजार, ६४८

प्रवेशित विद्यार्थी

१ लाख, १४ हजार, ३४२

उत्तीर्ण विद्यार्थी

१०.७३ टक्के

मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरच्या स्फोटात दहा जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

पुलाची शिरोली येथे झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात दहाजण जखमी झाले. जखमींमध्ये तीन वर्षाच्या बालिकेसह दोन मुलींचा समावेश आहे. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी व सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिरोली हौसिंग सोसायटीत ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये महेंद्र कृष्णात पाटील, (वय १८), मारुती सुतार (३८), नीलेश सुखदेव पाटील (२९), नीलेश आढाव (२७), सागर पाटील (२८ ), सुधाराणी काडगोंड (२२), निल्लवा काडगोंड (५०), दिनकर जाधव (४२), श्रावणी काडगोंड (३) व कृष्णात पाटील(४८) यांचा समावेश आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आवाजाने दोन किलोमीटरचा परिसर हादरून गेला. पोलिस व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, काडगोंड कुटुंबीय कृष्णात पाटील यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहतात. निल्लवा काडगोंड सकाळी स्वयंपाकासाठी गॅस सुरू करत होत्या. सिलिंडर संपल्याने त्यांनी घरमालकीण पाटील यांना बोलावून सिलिंडर जोडून घेतले. दरम्यान, गॅसचा वास येऊ लागल्याने वरच्या मजल्यावर राहणारे सर्वजण धावत खाली आले. त्यांनी गॅस कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेगडीशी जोडलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की, परिसरातील अनेक तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्फोटाने लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र तोपर्यंत घरातील सर्वच साहित्याने पेट घेतला होता. तरुणांनी शेतातील माती आणि वाळू टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आगीच्या लोटामुळे मदतकार्य करणारे तरुणही जखमी झाले.

घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. घराचे सर्व इलेक्ट्रिक वायरिंग जळून गेले. काडगोंड हे एमआयडीसीतील कारखान्यात कामगार आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते व अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक सुरज गुरव, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे, सरपंच शशिकांत खवरे यांनी भेट देऊन माहिती घेतली.

००००००००००००००

फोटो : राहुल मगदूम, कसबा बावडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका बंदचा फटका सर्वसामान्यांना

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपाची बुधवारपासून सुरूवात झाली. या संपामुळे जिल्ह्यातील सरकारी बँकाचे कामकाज थांबले. शहरातील सरकारी आणि खासगी अशा ३५ बँका बंद राहिल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसला. काही एटीएममधील पैसे दुपारनंतर संपल्याने अनेकांची तारांबळ उडाली. बँकेच्या संघटनांनी बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर निदर्शने केली.

सरकारी बँकांच्या बाहेर संपाची माहिती देणारे फलक झळकले होते. दैनंदिन कामासाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली. गुरूवारी संप सुरू राहणार असल्याने ग्राहकांसह नागरी सहकारी बँकांना फटका बसणार आहे. दोन दिवसाच्या संपाचा फटका म्हणून बँकेतून केले जाणारे सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन उशीर होण्याची शक्यता आहे. कर्मचारी युनियननची सहकारी बँकाचे व्यवस्थापन करणाऱ्या इंडियन बँक्स असोसिएशन सोबतची चर्चा फिसकटल्याने निष्फळ ठरली. आयबीएफकडून केवळ दोन टक्के पगारवाढीच्या प्रस्तावाला विरोध करून संपाची सुरूवात झाली. या संपात जिल्ह्यातील नऊ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आदी सेवा सुरू राहिल्या. मात्र प्रत्यक्ष बँकातील कामकाज बंद राहिले. काही बँकांनी ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम मशीनमध्ये मंगळवारी पैसे भरले. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली. त्यामुळे दुपारपर्यंत काही एमटीएममध्ये खडखडाट राहिला. राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाची झळ क्लिअरिंगला बसला, चेकचे व्यवहार थांबले असून त्याचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत राहणार आहे. नागरी बँकांच्या क्लिअरिंगलाही फटका बसला. पेन्शनधारकांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ६ जून पर्यंत पेन्शन देण्याच्या सूचना आहेत. मात्र महिनाअखेरीस होत असलेल्या संपामुळे दोन ते तीन दिवस उशीरा पेन्शन मिळणार आहे. आजही काही बँकांकडून पैसे भरण्याचे काम सुरू होते. संपामुळे दोन दिवसात सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे व्यवहार थंडावणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोली स्फोट . निष्काळजीपणा

$
0
0

डुप्लिकेट रेग्युलेटर वापरल्याने

स्फोट झाल्याचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

पुलाची शिरोली येथील शिरोली हाऊसिंग सोसायटीमध्ये गॅस टाकी लिकेज होऊन झालेल्या स्फोटात आगीने होरपळून लहान मुलीसह दोन महिला व ही आग विझवण्याचा प्रयत्न करणारे सातजण असे दहाजण जखमी झाले. यापैकी चारजणांची प्रकृती चिंताजनक आहे. डुप्लिकेट रेग्युलेटर वापरल्याने स्फोट झाला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

शिरोली माळवाडी भागातील या सोसायटीत कृष्णा केदारी पाटील यांचा दोन मजली बंगला आहे. यापैकी पहिला मजला एमआयडीसीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या दर्याप्पा कांडगोड यांच्या कुटुंबाला दोन वर्षांपासून भाड्याने राहण्यासाठी दिला आहे. कृष्णात पाटील यांना सकाळी सातच्या सुमारास तळमजल्यावरून गॅस टाकी लिकेज होऊन त्याचा वास सर्वत्र पसरल्याचे लक्षात येताच, ते व त्यांचा मुलगा महेंद्र पाटील त्वरित खाली आले. त्यांनी खोलीत राहणारे निलवा कांडगोड ,श्रावणी कांडगोड , सुधाराणी कांडगोड, दऱ्याप्पा कांडगोड यांना घरातून बाहेर काढले. दरम्यान, घराशेजारील सागर पाटील,निलेश पाटील, मारुती सुतार व निलेश आढाव यांनी तात्काळ धाव घेत स्वयंपाकघराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या.

जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते, अतिरिक्त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे, पोलिस उपाधिक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे त्वरित घटनास्थळी आले. अनधिकृत गॅस कनेक्शन तसेच डुप्लिकेट रेग्युलेटर वापरल्याने स्फोट झाला असल्याचा निष्कर्ष एमआयडीसी पोलिसांनी काढला असून गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवानीने कुस्तीसह जिंकली परीक्षा

$
0
0

(फोटो आहे)

कॉमर्स शाखेतून मिळवले ८४ टक्के गुण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुस्ती आणि शिक्षण या दोन्हीतही तरबेज असलेल्या यळगूडच्या शिवानी सुनील पाटील या विद्यार्थिनीने कुस्तीसह बारावीच्या परीक्षेतही बाजी मारली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिस्पर्धी पैलवानांना धूळ चारणाऱ्या शिवानीने बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले. भवानी मंडपातील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेतून तिने पहिला क्रमांक पटकावला. पैलवान आणि बुद्धीचे फारसे जमत नाही असे विनोदाने म्हणणाऱ्यांना शिवानीने धोबीपछाड दिला आहे.

शिवानी पाटील ही यळगूडची. वडील शेतकरी, तर आई गृहिणी. अभ्यासात चुणचुणीत असलेल्या शिवानीला आठवीच्या वर्गात असताना कुस्तीची आवड लागली. खेळातील प्रगती बघून तिच्या वडिलांसह शिक्षकांनीही तिला तालमीत घातले. गावातील जय हनुमान तालमीत तिने कुस्तीचे धडे घेतले. यादरम्यान तिची अभ्यासाची गोडीही कायम राहिली. पैलवान आणि अभ्यास यांचे फारसे जमत नाही असा लोकांचा समज असतो. मात्र, शिवानीने तो समज खोडून काढत दरवर्षी उत्तम गुण मिळवले.

बारावीचे संपूर्ण वर्ष तिच्यासाठी दुहेरी संघर्षाचे होते. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांची तयारी आणि बारावीचा अभ्यास या दोन्ही पातळ्यांवर तिची कसरत सुरू होती. पहाटे साडेचार चे सातपर्यंत गावातील तालमीत सराव करायचा. यानंतर कॉलेज, अभ्यास आणि विश्रांती संपवून दुपारी तीन ते रात्री सातपर्यंत कुस्तीचा सराव करायचा. कुस्ती आणि अभ्यास याचे नेटके वेळापत्रक तयार करून शिवानीने वर्षभर परिश्रम घेतले. यळगूड ते कोल्हापूर असा रोज बसचा प्रवास करून तिने बारावीचा अभ्यास केला. अनेकदा स्पर्धांमुळे अभ्यासाचा तणाव वाढत होता. मात्र स्पर्धा संपताच पुन्हा अभ्यासासाठी जादा वेळ देऊन ती गेलेला वेळ भरून काढत होती. अभ्यास आणि कुस्तीची सांगड घालून शिवानीने कुस्तीसह परीक्षाही जिंकली. कॉमर्स शाखेत ८४ टक्के गुण मिळवून तिने मेन राजाराम कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशात आईसह वडील सुनील पाटील, मेन राजाराम कॉलेजमधील सर्व प्राध्यापक आणि तालमीतील मार्गदर्शकांचा वाटा मोलाचा असल्याचे ती सांगते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे तिचे उद्दिष्ट असून, कुस्तीमध्ये यश मिळवतच पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.

राष्ट्रीय कुस्तीतही यश

दहावीपर्यंत हुपरीच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी मेन राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षात तिच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा सुरू होत्या. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक अशा अनेक राज्यात स्पर्धा गाजवल्या. राज्यातही अनेक ठिकाणी तिने कुस्तीत बाजी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लष्करी परंपरेला चार चाँद...

$
0
0

माजी सैनिकाच्या लेफ्टनंट मुलांचे जल्लोषी स्वागत

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

वडील सैन्यातून निवृत्त...घरची परिस्थिती जेमतेम... पण वडिलांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं ते म्हणजे आपली दोन्ही मुलं सैन्यात अधिकारी झाली पाहिजेत. त्यासाठी आई वडिलांनी अहोरात्र कष्ट उपसले आणि दोन्ही मुलं एनडीएमध्ये गेली. अखेर एक मुलगा एनडीएतील खडतर प्रशिक्षण घेऊन लेफ्टनंट झाला आणि उचगावातील घरात आनंदोत्सव साजरा झाला. ही सक्सेस स्टोरी आहे मुळच्या कागल पण सध्या उचगाव मणेर मळा येथील संभाजी पाटील यांच्या मुलांची. त्यांचा लहान मुलगा दादासाहेब नुकताच प्रशिक्षण पूर्ण करून घरी आला आणि अख्ख्या उचगावला आनंद झाला. त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

माजी सैनिक असणाऱ्या संभाजी पाटील यांच्या दादासाहेब आणि बाबासाहेब या दोन्ही मुलांची एनडीएतील प्रशिक्षणासाठी निवड झाली. यातील दादासाहेब लहान असला तरी त्याने मोठ्या भावाच्या आधीच प्रशिक्षण पूर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आता पाटील कुटुंबाला प्रतीक्षा आहे ती बाबासाहेब यांच्या प्रशिक्षण पूर्ण होण्याची. खांद्यावर स्टार लावलेला मुलगा पाहतांना पाटील दाम्पत्याचे डोळे आनंदाने भरून आले. उचगाव, मणेरमळा या कर्मभूमी व जन्मूभीत परतलेल्या लेफ्टनंट दादासाहेब पाटील यांचे उचगावकरांनी जंगी स्वागत केले. पाटील यांच्या स्वागतासाठी महिलांनी गल्लीत रांगोळी काढली होती. तर गल्लीत सर्वत्र पताका लावल्या होत्या. महिलांनी दादासाहेब यांचे औक्षण करून आनंद साजरा केला.

दादासाहेब यांचे वडील संभाजी आणि आई उज्ज्वला यांनी मुलांनी सैन्यात अधिकारी व्हावे असे एक स्वप्न पाहिले. यासाठी कागलमधील घर सोडून ते मणेरमळा येथे राहण्यासाठी आले. सेकंड मराठा बटालियन मधून निवृत्त झालेल्या संभाजी पाटील यांना जेमतेम १२०० रुपये पेन्शन मिळत होती. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली. मुलांचा धावण्याचा सराव घेण्यासाठी आई उज्वला सायकल शिकल्या. त्या मुलांबरोबर बरोबर दररोज २० किलोमीटर सायकलवर जात होत्या. मुलांना इंग्रजी चांगले शिक्षण मिळावे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. मुलांना योग्य खुराक मिळावा यासाठी घरीच दोन म्हशी व २० कोंबड्या पाळल्या. खेळात तरबेज झालेली दोन्ही मुलांनी अनेक बक्षिस मिळविली. या जोरावरच त्यांचा एनडीएचा प्रवास सोयीचा झाला.

सोमवारी दादासाहेब यांच्या स्वागतासाठी मणेर मळ्यातील विठ्ठलाई कॉलनीतील सर्वजण सज्ज झाले. माजी ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय तोरस्कर, माजी सैनिक मारुती पाटील, हिंदुराव जाधव, शिवाजी यादव, जनार्दन पाटील, आनंदा पाटील, मारुती पाटील, अमर यादव, संगीता पाटील आदींनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राचे अनावरण

$
0
0

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चित्रकार धीरज सुतार यांनी रेखाटलेल्या तैलचित्राचे प्रकाशन डॉ. भारत कोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रात राज्याभिषेक सोहळा, शिवरायांची कीर्ती, राज्याभिषेक मिरवणूक अशा प्रसंगांचा समावेश आहे. यावेळी वसंतराव मुळीक, आनंदराव ठोंबरे, सुनील पाटील, राजू चाळके, अमृत पाटील, प्रा. टी. के. सरगर, कृष्णाजी हरगुडे, सुरेंद्र घोरपडे, मिलिंद सावंत उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधानमंत्री आवास योजना

$
0
0

महापालिका लोगो वापरावा...

पान ३ मेन

..............

अनुदानास पात्र, आता प्रतीक्षा निधीची

२५२ लाभार्थ्यांना मिळणार घरकुलासाठी सहा कोटींवर रक्कम, केंद्राची मान्यता

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोल्हापूर शहरातील २५२ प्रस्तावांना केंद्रीयस्तरावरील कमिटी व संनियंत्रण समितीची मान्यता मिळाली. एका लाभार्थ्याला अडीच लाख रुपये याप्रमाणे तब्बल सहा कोटी तीस लाख रुपयांचे अनुदान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार चार टप्प्यात अनुदान वितरीत होते. केंद्रीय कमिटीने प्रस्ताव मंजूर केल्यामुळे नजीकच्या काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून म्हाडाकडे निधी वर्ग केला जाईल. यामुळे हक्काचे घरकुल साकारण्यासाठी धडपडणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 'म्हाडा'नोडल एजन्सी आहे. म्हाडामार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल. तत्पूर्वी चार टप्प्यात महापालिकेतील यंत्रणा लाभार्थ्यांच्या घराच्या बांधकामाचा अहवाल सादर करेल. जिओ टॅगव्दारे बांधकाम अहवाल जोडण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर असले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली. 'सर्वांसाठी घर'संकल्पना असून चार गटात लाभार्थ्यांची निवड केली जाते. कोल्हापूर महापालिका हद्दीत चार गटांसाठी मिळून १९,००० नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात समाविष्ठ लाभार्थ्याला अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळते. यामध्ये केंद्र सरकार दीड लाख तर राज्य सरकारचा वाटा एक लाख रुपये इतका आहे. केंद्राकडून राज्य सरकारकडे निधी सुर्पदू झाल्यानंतर अनुदानाची रक्कम म्हाडाकडे दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील योजनेसाठी ९३० जणांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी २५२ जण नवीन घर अथवा वाढीव बांधकामाच्या अनुदानासाठी लाभार्थी ठरले आहेत.

....................

मार्चमध्ये मूल्यांकन, आता लाभार्थ्यांना पत्रे

महापालिकेने २३ मार्च २०१८ मध्ये राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारच्या पातळीवर दोन मूल्यांकन समितीकडून समितीने प्रस्तावाची तपासणी करुन मान्यता दिली. त्यानंतर राज्य सरकारकडून २६ मार्च रोजी केंद्रस्तरीय कमिटी व संनियंत्रण समितीची मान्यता मिळाली. महापालिकेतील प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयाला लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून संबंधितांना १५ दिवसात बांधकाम परवानासाठी प्रॉपर्टी कार्ड, मोजणी नकाशासह आवश्यक कागदपत्रांची फाइल सादर करण्याविषयी पत्रे पाठविली आहेत. कालांतराने नगररचना विभागामार्फत बांधकाम परवाना संदर्भात कॅम्प होणार आहे. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरला असेल त्यांनी अर्जाच्या प्रिंटसह शिवाजी मार्केट येथील प्रधानमंत्री आवास कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन योजनेचे समाजविकास विशेषतज्ज्ञ युवराज जबडे यांनी केले आहे.

..................

तीन झोपडपट्टवासियांच्या प्रस्तावाची छाननी

'सर्वांसाठी घर'योजनेच्या पहिल्या गटात झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा समावेश आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत (पीपीपी) झोपडपट्टीवासियांना पक्की घरे देण्याची योजना आहे. महापालिकेकडून शहरातील कदमवाडी येथील कपूर वसाहत व बोंद्रेनगर येथील झोपडपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. १४२ घरकुलांचा हा प्रस्ताव आहे. तसेच संभाजीनगर कामगार चाळ येथेही पीपीपी तत्वावर घरकुलांची निर्मिती प्रस्तावित आहे. महापालिकेने तीनही ठिकाणचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला असून 'म्हाडा'कडून प्रस्तावाची छाननी सुरु आहे.

..........

अनुदान वाटपाचे टप्पे ...

पायाचे बांधकाम ७० हजार

चौकटपर्यंत बांधकाम ७० हजार

स्लॅब पूर्ण ७० हजार

बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यानंतर उर्वरित रक्कम

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मार्गदर्शन

$
0
0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने विद्याप्रबोधिनीतर्फे केंद्रीय लोकसेवा परीक्षेत राज्यात पहिले आलेले गिरीष बदोले तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम गुरुवारी (ता.३१) सकाळी ११ वाजता विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शहाजी लॉ कॉलेजसमोर होणार असल्याची माहिती राहुल चिकोडे यांनी दिली. यावेळी बदोले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेला एक जुलैपासून सुरुवात होणार आहे. मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील राज्य सरकारच्या विविध विभागांना २५ लाख, ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून वृक्षारोपण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दिलेल्या उद्दिष्टानुसार वृक्षारोपण करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी २२ लाख खड्ड्यांची खोदाई करण्यात आली असून ४५ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. अद्याप मोहिमेला सुरुवात होण्यास एक महिन्याचा कालावधी असला, तरी प्रशासनाच्यावतीने मोहीम फत्ते करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

गेल्या वर्षी मिळालेल्या यशामुळे यावर्षी एक ते ३१ जुलै अखेर राबवण्यात येणार असलेल्या वृक्ष लागवडीची तयार जोरात सुरू झाली आहे. वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाने ४५ लाख रोप तयार केली असून या दोन विभागाच्यावतीने रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत विभागाला सामाजिक वनीकरणाच्यावतीने रोपे देण्यात येणार असून इतर सरकारी विभागाना सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. वनविभागाने प्रामुख्याने स्थानिक जंगली प्रजातीना प्राधान्य देत आवळा, हिरडा, भेडा, जांभूळ रोपांची लागवड केली आहे. तर सामाजिक वनीकरण विभागाने वड, पिंपळ, कडूलिंब याचबरोबर शोभिवंत रोपे तयार केली आहेत.

वृक्ष लागवड दृष्टिक्षेप

२५ लाख ६० हजार

जिल्ह्याचे उद्दिष्ट

४७

विभागांचा सहभाग

२२ लाख

आजअखेर खड्डे तयार

४५ लाख

रोपे तयार

विविध प्रमुख विभागांना दिलेले उद्दिष्ट

वनविभाग ११ लाख ५० हजार

वनविकास महामंडळ तीन लाख १५ हजार

ग्रामपंचायत चार लाख ५२ हजार

सामाजिक वनीकरण दोन लाख

कृषी एक लाख २१ हजार

पीडब्ल्यूडी ५७ हजार

शिक्षण विभाग ३७ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फीट येऊन पडल्याने मृत्यू

$
0
0

फीट येऊन पडल्याने मृत्यू

कोल्हापूर

फीट येऊन रस्त्याकडेच्या चरीत पडल्याने विठ्ठल बमू बोडके (वय ५०) यांचा मृत्यू झाला. त्यांना फिट येण्याचा त्रास होता. बुधवारी (ता. ३०) सकाळी ते घरातून बाहेर पडले. संध्याकाळी फुलेवाडी फायर ब्रिगेडच्याजवळ गटर्ससाठी खोदलेल्या चरीत त्यांचा मृतदेह आढळला. सायंकाळी पाच वाजता तेथून जाणाऱ्या एका महिलेस चरीत पडलेला मृतदेह दिसला. तिने परिसरातील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. बोडके यांना फीट येण्याचा त्रास होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. लक्ष्मीपुरी पोलिसात याची नोंद झाली आहे. विठ्ठल हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांवरील चित्रपट पाहून कैदी गहिवरले

$
0
0

कैद्यांवरील चित्रपट

पाहून कैदी गहिवरले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मद्यधुंद अवस्थेत मारहाण करणाऱ्या पतीला प्रतिकार करताना जमिनीवर कोसळलेल्या पतीचा मृत्यू होता. या गुन्ह्यात पत्नीला सात वर्षांची शिक्षा भोगावी लागते. या घटनेवरील 'अष्टवक्र' हा चित्रपट बुधवारी कळंबा कारागृहातील कैद्यांना दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहून कारागृहातील कैदी गहिवरले.

अरुंधती (मयुरी मंडलिक) ही निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असते. शिक्षण संपल्यावर बालमजुरांसाठी ती काम करू लागते. यावेळी अजयसोबत (मंगेश गिरी) तिची ओळख होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात व त्यातून दोघांचे लग्न होते. अजय व्यसनी बनल्यावर एकदा दारू पिऊन घरी येतो, अरुंधतीला मारहाण करताना दोघांमध्ये झटापट होते. तिने ढकलून दिल्याने अजय जमिनीवर कोसळतो. यातच त्याचा मृत्यू होतो. या गुन्ह्यात अरुंधतीला शिक्षा भोगावी लागते. गर्भवती अरुंधतीची कारागृहातील विदारक स्थिती 'अष्टवक्र' या चित्रपटात साकारली आहे. कारागृहातील स्थितीत मुलास जन्म देण्यापेक्षा गर्भपात करण्याची परवानगी मिळावी यासाठी ती न्यायालयाचा दरवाजा ठोठावते. हा चित्रपट पाहून कारागृहातील कैद्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

अरुंधतीच्या आयुष्यातील वेडीवाकडी वळणे, तिच्या वाट्याला आलेले कैद्याचे जगणे चित्रपटातून मांडले आहे. राज्याच्या कारागृह प्रशासनाच्या परवानगीने कळंबा कारागृहात चित्रपटाचे ८० टक्के शुटिंग झाले आहे. प्रदर्शनापूर्वी कळंबा कारागृहातील कैद्यांना हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके, चंद्रकांत आवळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाप्रश्नी आज बैठक

$
0
0

केएमटी थकीत

वेतनप्रश्नी आज बैठक

कोल्हापूर

केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रश्नी महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची गुरुवारी (ता.३१) बैठक होणार आहे. महापौर शोभा बोंद्रे यांनी आयुक्त अभिजित चौधरी यांना या संदर्भात पत्र दिले आहे. केएमटीच्या अनेक कर्मचाऱ्यांचे पगार दोन ते अडीच महिने झालेले नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचा ओव्हर टाइमचा भत्ता मिळाला नाही. नियमित वेतन होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत. दर महिन्याच्या ठराविक तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. थकीत वेतनासह कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रश्नासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत तरुण जखमी

$
0
0

मारहाणीत तरुण जखमी

कोल्हापूर

कनाननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी तरुणाला मारहाण झाली. मॅकवेल नेपोलियन फ्रॅसिस (वय १७) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी मॅकवेल यास नातेवाइकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

................

अपघातात तरुण गंभीर

कोल्हापूर

उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (ता. २९) रात्री झालेल्या अपघातात विजय प्रकाश लोहार (वय २६, रा. उजळाईवाडी) हा तरुण जखमी झाला. हात, पाय व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने लोहार याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

..................

दुचाकी घसरूनजखमी

कोल्हापूर

भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गणेश श्रीपती पाटील (वय २५) आणि शिवनाथ नवनाथ सकटे (२७, रा. राजेंद्रनगर) हे दोघे जखमी झाले. साळोखे पार्क येथे मंगळवारी (ता. २९) रात्री हा अपघात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध घोटाळाप्रकरणीचौघांना नोटीस

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केलेल्या औषध खरेदीमधील घोटाळ्याप्रकरणी बुधवारी चौघांना नोटीस बजावण्यात आली. कनिष्ठ लेखा अधिकारी आर. सी. बर्डे, सांखिकी लेखा अधिकारी व्ही. एस. व्हटकर, कक्ष अधिकारी उदय गोडवे, कक्ष अधिकारी एम. बी. चौगले अशी नोटीस दिलेल्यांची नावे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी नोटीस दिली.------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी सुविधा द्या, मग कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून पावती फाडणाऱ्या वाहतूक पोलिसांसह महानगरपालिका प्रशासनाने आधी सुविधा द्याव्यात. पर्यटक आणि भाविकांकडून पैसे उकळले जातात, मात्र रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्याचेही काम महापालिकेला जमत नसेल, तर वाहतूक कारवाया रोखण्याचे काम शिवसैनिक करतील,' असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. वाहतूक सुविधांच्या मागणीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी (ता. २९) वाहतूक नियंत्रण कार्यालयावर मोर्चा काढला.

महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरात वाहतूक सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, 'शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे. अनेक ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही. स्थानिकांची वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सर्वसामान्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाते. धनदांडगे आणि राजकीय लागेबांधे असणाऱ्या लोकांची वाहने मात्र वाहतूक पोलिसांना दिसत नाहीत. पोलिसांकडून अशा लोकांवर मेहेरबानी केली जाते. धैर्यप्रसाद हॉल चौक ते पितळी गणपती मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. अनेक ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण आहे. याकडे पोलिसांचे आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का होते? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

'अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने वाहतूक पोलिस अडवतात. अर्थपूर्ण व्यवहार करून पर्यटकांना त्रास दिला जातो. किरकोळ कारणांवरून नागरिकांना वेठीस धरले जाते. वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे. याबाबत दुमत नाही, मात्र यासाठी वाहतूक सुविधाही मिळाल्या पाहिजेत. पार्किंगचे नियोजन नाही. सम-विषम तारखांनुसार फलक लावलेले नाहीत. शहरातील अनेक ट्रॅफिक सिग्नल बंद असतात. रस्त्यांवरील पांढरे पट्टे मारण्याचेही काम महापालिकेला होत नाही. अशास्त्रीय गतिरोधक तयार करून वाहनधारकांच्या जिवाशी खेळ केला जातो. नियम मोडल्याचे कारण सांगून नागरिकांच्या खिशातून लाखो रुपयांचा दंड वसूल केला जातो. सुविधा देण्याची जबाबदारीही महापालिका आणि पोलिसांचीच आहे. आधी सुविधा द्या, मग कारवाई करा. अन्यथा या कारवाया आम्ही रोखू,' असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे. वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी महापालिकेचे अधिकारी आर. आर. वेल्हाळ यांनाही त्यांनी धारेवर धरले. जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण यांच्यासह शुभांगी पोवार, दत्ताजी टिपुगडे, राजू यादव, शशिकांत बिडकर, अवधूत साळोखे, राजेंद्र पाटील, मेघना पेडणेकर, सुजाता सोहनी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टीहीन फतिमाचे लखलखती यश

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धडधाकट माणसे अपयशाने खचून जाताना आपण पाहतो. पण अशा माणसांना महावीर कॉलेजच्या बी. एन. रोटे ज्युनिअर कॉलेजमधील फतिमा नौशाद मुल्लाणी हिने आदर्श घालून दिला आहे. दृष्टीहीन असलेल्या फतिमाने बारावी परीक्षेत कला शाखेत ७७ टक्के गुण मिळवून लखलखीत यश संपादन केले आहे. तिच्या यशानंतर कुटुबीयांनी आणि कॉलेजच्या स्टाफने आनंदोत्सव साजरा केला.

सर्वसामान्य कुटुंबातील फातिमाला जन्मत: अंधत्व आले. आई आणि वडिलांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरत त्यांनी मुलीला जिद्दीने मोठी करण्याचे ठरविले. वडिलांनी दिलेली माया, शिस्त आणि प्रेरणतून फातिमाने यश मिळविले. कसबा बावड्यातील गोळीबार मैदान परिसरातील दत्त कॉलनीत फतिमा कुटुंबीांसह राहते. वडिलांचे किराणा मालाचे दुकान आहे. रोजचा उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करून शिल्लक राहिलेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च केली. वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करून बारावीचा अभ्यास सुरू केला. अंध असली तरी तिची वर्गात नेहमी उपस्थिती असे. इतर मुलांसोबत शिकताना तिला थोडा त्रास जाणवत होता. मात्र, शिकविलेले रेकॉर्डिंग करून ते पुन्हा ऐकत तिने अभ्यासाची उजळणी केली. काही विषयांच्या सीडी ऐकून अभ्यास सुरू केला. आकलन न झालेल्या घटकांचे निरसन दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांकडून करून घेतले. बारावीच्या वर्षात तिने दररोज पाच तास अभ्यास केला. परीक्षेच्या कालावधीतही त्यात खंड पडला नाही. श्रीपाद ताटे या रायटरच्या सहाय्याने तिने परीक्षा दिली. आता फातिमा एफवायबीएला महावीर कॉलेजमध्येच प्रवेश घेणार आहे. यापुढे स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा संकल्प आहे. जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीवर मात केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करणे सहज शक्य असल्याचे फातिमा सांगते. तिला प्राचार्य राजेंद्र लोखंडे, प्रा. राजेंद्र हिरकुडे यांच्यासह ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images