Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घरातून दीड लाखांचा ऐवज लंपास

0
0

घरातून दीड लाखांचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील सुर्वेनगरजवळ असलेल्या दत्तोबा शिंदे नगरातील घरातून दीड लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाले. ९ मार्च ते ११ एप्रिल या दरम्यान चोरीचा प्रकार घडला. याबाबत पूनम राजू घोडके (वय ३२, रा. प्लॉट नं. ८, दत्तोबा शिंदे नगर) यांनी बुधवारी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरात प्रवेश करून घोडके यांची नजर चुकवून चोरी केली. यात सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज लंपास झाल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. घरातील किंवा आसपासच्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडीत दहा हजारांची रोकड लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी रोडवर साई कॉलनीत चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी केली. मंगळवारीसकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सोमवार ते मंगळवारच्या दरम्यान चोरी केली असून, घरातील रोख १० हजार रुपये लंपास केले. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी रोडवर साईकॉलनी येथे आदित्य रमेश दर्प (वय ३५) यांचे घर आहे. तेथे आदित्य यांचे वडील रमेश दर्प राहतात. रमेश दर्प सोमवारी सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मंगळवारी घरी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता, ब्रिफकेस आणि कपाटातील रोख १० हजार रुपये लंपास झाले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची कल्पना जुना राजवाडा पोलिसांना दिली. दर्प यांनी बुधवारी चोरीची फिर्याद दाखल केली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना तटस्थ

0
0

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदमांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. या कारणास्तव कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार असल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे उपरोधिक पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुकटच्या प्रसिद्धीसाठी हापापलेल्या आणि कोल्हापूरच्या विकासकामात अडथळा आणणाऱ्या अनेक अपप्रवृत्तींना हिंदू युवा प्रतिष्ठानच्यावतीने 'आडवे पडू पुरस्कार देऊन निषेध केला. शिवाजी चौकात या प्रतिकात्मक बक्षिसाची ढाल ठेवून नागरिकांचे लक्ष वेधले.

यावेळी विविध वक्त्यांनी भाषणांतून टीका केली, 'कोल्हापुरातील कोणताही विषय येताच काही मंडळी सगळ्याच विषयातले आपल्याला समजते, अशा अविर्भावात असतात. हीच मंडळी पुढे जाऊन शहराच्या विकासकामांत खोडा घालत असतात. शहरात आम्हीच तेवढे शहाणे, बाकी सगळे अज्ञानी असा त्यांचा समज असतो. त्यातून आडवे पडणे हा छंद तयार होतो. त्यामुळे शहरात चांगली योजना, प्रकल्प विकासात्मक संधीस अडथळे निर्माण होतात. माहिती अधिकार, स्थगिती या अस्त्रांचा वापर करत ते विकासाला खो घालण्याचा प्रयत्न करतात.' या प्रवृत्तींचा निषेध म्हणून हा प्रतिकात्मक पुरस्कार दिला आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महादेव कुकडे, संपतराव पोवार, संजय ढाले, महेश इंगवले, राजन सूर्यवंशी, बाबा पार्टे, सुरेश जरग, विजय अग्रवाल, ज्ञानदेव पुंगावकर, आर. आर. पोवार, संभाजी आळवेकर, गणेश देसाई, राजू मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैलवान रेश्मा मानेची वापसी

0
0

रेश्मा माने

शिबिरात दाखल

कोल्हापूर: दिल्ली येथील भारतीय कुस्ती महासंघाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सुरू असलेल्या शिबिरास अनुपस्थित राहिल्याबद्दल कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा मानेला नोटीस बजावली होती. मात्र, बुधवारी रेश्मा आणि तिचे वडील अनिल माने यांनी आपली बाजू महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यासमोर मांडली त्यानुसार तिला शिबिरात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय झाला. लखनौ येथील साई सेंटरमध्ये १० मेपासून सुरू असलेल्या शिबिरात ६२ किलोगटात वरिष्ठ गट महिला रेश्माची निवड झाली होती. मात्र ती शिबीरात सहभागी न झाल्याने तिला नोटीस बजावली होती. बुधवारी रेश्मा आणि तिच्या वडिलांनी बृजभूषण शरण सिंह आणि कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्यासमोर आपली बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलाला मर्चंट नेवीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी महिलेला दोन लाखांचा गंडा घातला. याबाबत फरिदा फाजल शेख (वय ४३, रा. जुना बुधवारपेठ, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी रवींद्र पोळ (रा. जवाहरनगर, हाउसिंग सोसायटी) आणि दिलीप कदम या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदा शेख ही महिला तिच्या मुलाला नोकरी लावण्याचा प्रयत्न करीत होती. अडीच वर्षांपूर्वी तिची जवाहरनगरातील रवींद्र पोळ आणि दिलीप कदम या दोघांशी ओळख झाली. या दोघांनी मुलाला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांनी शेख यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले. १ फेब्रुवारी, २०१६ ते १८ मार्च, २०१६ या दरम्यान पोळ याने ५० हजार रुपये घेतले, तर कदम याने दीड लाख रुपये घेतले. पैसे घेऊन सहा महिने उलटले तरीही मुलाला नोकरी लागली नही. याबाबत विचारणा केली असता, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दिलेले पैसे परत मिळतील या आशेपोटी गेली दोन वर्षे शेख पाठपुरावा करीत होत्या. मात्र, पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी बुधवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोळ आणि कदम यांच्यावर फस‌वणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान ईदला सामाजिक किनार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रमजानच्या पवित्र महिन्यात दानधर्माला अधिक महत्त्व दिले जाते. या महिन्यात दान (जकात) केल्यास पुण्य मिळते, अशी मुस्लिम धर्मीयांची भावना आहे. त्यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायद्यात केली आहे. मुस्लिम बांधव एकत्र येऊन समाजातील बांधवांसाठी मदत करतात. रमजान महिन्यात दरवर्षी सुमारे २९ लाख ७० हजार रुपयांची जकात जमा होते. त्यातून हिंदू आणि मुस्लिम धर्मांतील लोकांना मदत केली जात आहे.

मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता येण्यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायद्यात केली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. गरिबाला मदत केल्याशिवाय ईद पूर्ण होत नसल्याची श्रद्धा मुस्लिम बांधवांमध्ये असते. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी रमजानच्या महिन्यात ईदची नमाज होण्यापूर्वी गोरगरिबांना काही कडधान्ये किंवा त्याची किंमत देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार समाजातील विविध ग्रुपतर्फे आणि वैयक्तिकपणे मदत केली जात आहे. वर्षभर मि‌ळविलेल्या उत्पन्नातील अडीच टक्के हिस्सा जकात म्हणून दिली जाते. कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीतर्फे गरिबांना मदत करण्याचे काम वर्षभर सुरू असते. १८ मेपासून रोजाची सुरुवात झाली आहे. १६ जूनला रमजान ईद आहे. या महिनाभराच्या कालावधीत मुस्लिम समाजबांधवांकडून जकात दिली जाते. त्यासाठी प्रत्येक कुटुंबात सदका (डबा) दिला आहे. यामध्ये दररोज एक रुपयापासून जमेल तेवढी मदत केली जाते. शहरातील ८५० मुस्लिम कुटुंबीयांत हा सदका दिला आहे. गेल्यावर्षी या सदकामधून ६ लाख ८० हजार रुपयांची मदत जमा झाली आहे.

बैतुलमाल कमिटीकडून वर्षभर गरीब लोकांना मदत केली जाते. रुग्णांची शस्त्रक्रिया, शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जात असल्याचे कमिटीचे अर्षद अत्तार यांनी सांगितले. एमएमबी ग्रुपतर्फे शैक्षणिक आणि आर्थिक मदत केली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, दवाखाना, खासगी शिकवणीवर्गाचे शुल्क, मतिमंद मुलांना मदत केली जात आहे. त्यासाठी रजमान महिन्यात या ग्रुपला जकात देणाऱ्या दानशूरांची संख्याही अधिक आहे. फिरोज बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रुप कार्यरत आहे. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या दोस्ताना ग्रुपतर्फेही मदत केली जात आहे. १९८० ते २००५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. मोहमीन बिरादरी खैरून अंजुमन ग्रुपतर्फे मुस्लिम बांधवांना धान्यवाटप केले जाते. साखर, गुळासह खीर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य दिले जाते. दस्तगीर मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रुप कार्यरत आहे. गेली चौदा वर्षे या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

०००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी


कणेरीत महाआरोग्यशिबिर

0
0

कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमार्फत आयोजित महाआरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांनी लाभ घेतला. सेंटरच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले. शिबिरात मेंदू विकार, फिटस्, पाठदुखी आणि मणक्यांचे विकारांनी त्रस्त रुग्णांची तपासणी झाली. तसेच थॅलेसिमिया, हिमोफिलीया, लहान मुलांचे कॅन्सर, मनोविकार तज्ज्ञ, मधुमेह, उच्च रक्तदाबबाबत तपासणी झाली. डॉ . शिवशंकर मरज्जके, अभिजित गणपुले, प्रिती नाईक, व्ही. व्ही. जोशी, सौरभ भिरुड यांनी तपासणी व उपचार केले. स्वामी आत्मानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी मृगराज स्वामी, देवव्रत स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नाईक, जितेंद्रसिंग रजपूत, रणजित मिरजे, पी. एस. राजे, आर. डी. शिंदे, प्रल्हाद जाधव, बी. जी. मांगले आदी उपस्थित होते. डॉ. प्रमोद घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा शिंदे यांनी आभार मानले. हॉस्पिटलच्या परिचारिकावर्गाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस तरुणाचा मृतदेह आढळला

0
0

अनोळखी तरुणाचा

मृतदेह आढळला

कोल्हापूर : आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या आवारातून अनोळखी तरुणाचा मृतदेह शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ताब्यात घेतला. ३५ ते ४० वर्षे वयाच्या तरुणाच्या अंगात मळकट पाढऱ्या रंगाचा शर्ट, काळी पँट आहे. मृत तरुणाचा या परिसरात नेहमी वावर होता. दारूच्या नशेत तो झाडाखाली झोपत होता. गुरुवारी सकाळपासून तो हायस्कूलच्या आवारात पडला होता. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे सायंकाळी लक्षात आले. शाहूपुरी पोलिसांनी पंचनामा करून महापालिकेच्या शववाहिकेतून मृतदेह सीपीआरमध्ये पाठवला. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी करण्याचे काम सुरू होते. मृत तरुणाच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवामुद्रा- सौरभ शिंदे, क्रिकेट

0
0

शिंपेचा सौरभ खेळतोय

श्रीलंकेत क्रिकेट

लोगो : युवामुद्रा

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : स्वप्ने पाहत असताना पंखात बळ भरणारे कुटुंबीय पाठीशी असले की आसमंतात झेप घेता येते हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता त्याने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. सौरभ श्रीकांत शिंदे या क्रिकेटवेड्या युवा खेळाडूचे नाव असून त्याची श्रीलंका येथे गाले इंटरनॅशनल क्लबकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड झाली असून त्यासाठी तो श्रीलंकेला रवाना झाला आहे. दुर्गम भाग म्हणून परिचित असलेल्या शाहुवाडी तालुक्यातील शिंपे गावातून सुरु झालेला त्याचा हा क्रिकेटमय प्रवास श्रीलंकेपर्यंत पोहचला आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या सौरभला लहानपणापासून क्रिकेटचे वेड. त्याची ही क्रिकेटमधील वाटचाल 'शिक्षणाच्या आयचा घो' या क्रिकेटवर आधारित चित्रपटासारखीच आहे. सौरभचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर शिंपे व विश्वास विद्यानिकेतन चिखली येथे झाले तर माध्यमिक शिक्षण समाज विकास मंदिर सागाव येथे झाले. सध्या तो वारणा कॉलेज येथे पुढील शिक्षण घेत आहे. त्याचे क्रिकेटवेड लक्षात घेऊन त्याला पालकांनी वडगाव क्रिकेट अकॅडमीत क्रिकेट खेळाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथे माजी रणजीपटू इमरान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा प्रवास सुरू झाला.

श्रीलंकन क्रिकेटपटू वर्णवीरा यांनी हेरली क्षमता

सौरभ कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखान्याचा खेळाडू असून शाहूपुरी जिमखाना व चाटे शिक्षण समुहाच्यावतीने उन्हाळी क्रिकेट कोचिंग कँप घेतला जातो. एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या कँपमधून त्याची निवड झाली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये शाहूपुरी जिमखान्याचा संघ श्रीलंका येथील पाणदुराव क्रिकेट अॅकॅडमी जी.आय.सी.एस. क्रिकेट क्लब, शिल्यास मॅरिनीस क्लब या संघाबरोबर आठ सामने खेळला होता. या सामन्यात सौरभने आठपैकी सहा सामन्यांत 'मॅन ऑफ द मॅच' किताब पटकावत सर्वोत्तम खेळ केला होता. त्याचबरोबर कोल्हापूरचा दुसरा खेळाडू मयूर पाटीलनेही या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. यातूनच जीआयसीएस क्लबकडून खेळण्यास त्याला करारबद्ध करण्यात आले. गतवर्षी ऑक्टोबर २०१७ मध्ये श्रीलंकेचे माजी कसोटीपटू जयानंद वर्णवीरा यांनी कोल्हापूरला येऊन सौरभची माहिती घेत त्याची निवड पक्की केली होती.

कुटंबाची भक्कम साथ

सौरभला त्याच्या कुटुंबियांनी नेहमीच साथ दिली आहे. त्याच्या या वाटचालीत शिंदे परिवाराचा मोठा वाटा असल्याचे तो आवर्जून नमूद करतो. त्याचे वडील श्रीकांत शिंदे कोल्हापूर पोलिस दलात हवालदार तर आई गृहिणी आहे. सौरभचे आजोबा शिंपे गावातील पहिले प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या घरात पूर्वीपासून शैक्षणिक आणि खेळाबाबत पूरक वातावरण असल्याचा त्याला फायदा झाला.

तरुणाईने मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पाहायला हवीत. प्रत्येकात क्षमता ठासून भरलेली असते फक्त ती योग्य वयात ओळखून वाटचाल केल्यास यश हमखास मिळते. नेहमी सकारात्मक विचार केल्यास शर्यतीत येणाऱ्या अडथळ्यावर मात करता येते. येणाऱ्या काळात भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

सौरभ शिंदे, क्रिकेटपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्यांना घेराओ

0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

ठिबक सिंचनाचे सहा कोटींचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी उपसंचालकांना घेराव घातला. यावेळी अधिकारी भाग्यश्री पवार यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी ३१ मे पर्यंत खात्यावर अनुदान जमा करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्ह्यातील दोन हजाराव शेतकऱ्यांना सरकारने सहा कोटी ३१ लाखाचे अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान मार्च अखेर मिळणार होते. पण अजूनही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. यामुळे संघटनेचे कार्यकर्ते दुपारी कृषी कार्यालयात गेले. मात्र विभागाचे प्रमुख बसवराज मास्तोळी रजेवर होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पवार यांना घेराव घातला. त्यांना जाब विचारत अनुदान न दिल्यास कार्यालयास कुलूप घालण्याचा इशारा दिला. ३१ मे पर्यंत अनुदान देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष भगवान काटे, रमेश भोजकर, सागर शंभूशेटे, अभिजीत पाटील व बाबासो गोंधळी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची निदर्शने

0
0

फोटो आहे

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप सरकार विविध प्रकारचे कर लादून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करीत आहे. दरवाढीने जनता होरपळून निघाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा व शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी निदर्शने केली. शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी निवेदन दिले. तत्पूर्वी स्टेशन रोडवर सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रदेश चिटणीस तौफिक मुल्लाणी म्हणाले, 'पेट्रोल आणि डिझेल ही अत्यावश्यक गोष्ट आहे. दरवाढीने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. जागतिक बाजारपेठेचा दर पाहता हा दर निम्म्यावर आणता येणे सहज शक्य आहे. मात्र भाजप सरकार विविध प्रकारचे कर लादून इंधनाच्या किंमती भडकवित आहे. प्रतिलिटर ८५ रूपयांवर पोहोचलेले पेट्रोलचा दर येत्या काही दिवसांत १०० रूपये होणार आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.' अॅड. सुरेश कुराडे म्हणाले, 'राज्यात व देशात साखर साठा उपलब्ध असतानाही पाकिस्तानमधून साखर आयात केली जात आहे. सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारे आहे.' काँग्रेस कमिटीत सरकारी धोरणाच्या विरोधात विविध वक्त्यांची भाषणे झाली. विविध वक्त्यांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उडविली. आंदोलनात सुशील पाटील, संध्या घोटणे, संपतराव चव्हाण, राजू आवळे, किशोर खानविलकर, महमंद शरीफ शेख, गोकुळचे संचालक बाबासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, हिंदुराव चौगुले, किरण मेथे, चंदा बेलेकर, माजी नगरसेविका लीला धुमाळ, बाजीराव खाडे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीही पेट्रोल मिळायला हवे

0
0

शहरातील बहुतांश पेट्रोलपंप रात्री दहानंतर बंद; वाहनधारकांची कुचंबना

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा म्हणून ग्राहकांना दिवसरात्र सेवा द्यावी, अशा सूचना पेट्रोलियम कंपन्याकडून पंप व्यवस्थापनाला आहेत. मात्र शहरातील पेट्रोल आणि डिझेल पंप व्यावसायिक दहानंतरच इंधनाची विक्री बंद करतात. या गैरसोयीचा त्रास शहरातील ग्राहकांना होत आहे. त्यांच्या सोयीसाठी रात्री बारा ते सहा या वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. काही पंप व्यवस्थापनाने तीन शिफ्टमध्ये काम सुरू केल्यास ही सुविधा सहजपणे उपलब्ध होणे शक्य आहे. जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या संयुक्त चर्चेतून हा मार्ग काढायला हवा.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्याचे शहरात १२ पेट्रोल आणि डिझेल पंप आहेत. शहरात दोन शिफ्टमध्ये पंप चालकांकडून सेवा दिली जाते. सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून काही पंप दहा वाजेपर्यंत सुरू असतात. बागल चौक परिसरातील पेट्रोल पंप रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असतो. रात्री बारानंतर मात्र शहरात एकही पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रत्येक पंपावर व्यवस्थापकांसह चार ते पाच कर्मचारी आहेत. दररोज पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत असल्याचा अंदाज घेऊन कर्मचाऱ्यांची संख्येत वाढ केली जात आहे. रात्री दहा वाजता दुसरी शिफ्ट बंद होत असल्याने शहरातील १० ते ११ पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे पंप बंद केले जातात. त्यानंतर मात्र बागल चौक परिसरातील एकमेव पंप रात्री बारा वाजेपर्यत सुरू असतो. त्यानंतर मात्र शहरात कुठेही वाहनधारकांना इंधन मिळत नाही. यापूर्वीही काही ग्राहकांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे रात्रीच्या वेळी इंधन उपलब्ध करून देण्यासाठी पंप सुरू ठेवाव्यात, अशा तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. त्या वेळी काही ग्राहकांनी जिल्हा पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनकडे तक्रारी केल्या. त्या वेळी असोसिएशनने आपत्कालीन व्यवस्था म्हणून रुग्णवाहिका आणि वाहनधारकांनी विनंती केल्यास इंधन देण्याचे सूचना केल्या. मात्र बहुतांशी पंपावर ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. रात्रीच्या वेळी वाहनांतील इंधन संपल्यास वाहन जागेवर लावण्याशिवाय पर्याय नाही. परगावच्या वाहनधारकांचे मोठे हाल होतात. पहाटे सहा वाजता पेट्रोल पंप सुरू होईपर्यंत वाहनांतच विश्रांती घ्यावी लागते. पेट्रोलियम कंपन्याकडून ग्राहकांना दिवस रात्र सेवा देण्याच्या सूचना असूनही पंप व्यवस्थापनाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ग्राहकांच्या सोयीसाठी रात्रीच्या वेळी शहरात पेट्रोल आणि डिझेल विक्रीची सुविधा असलेले मध्यवर्ती भागातील किमान दोन पंप सुरू ठेवण्याची गरज आहे.

पेट्रोलियम कंपन्या

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

हिदुंस्थान पेट्रोलियम

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

००

२५४

पेट्रोल पंप संख्या

१२

शहरातील पंप

१० हजार (अंदाजे)

कर्मचारी संख्या

३० हजार लिटर

प्रत्येक पंपाचा दररोजची विक्री

१२ हजार लिटर

टँकरमध्ये इंधनाची क्षमता

१० लाख रुपये

१२ हजार लिटरचा खर्च

हजारवाडीतून हिंदुस्थान पेट्रोलियमची वाहतूक

मिरज येथील डेपोतून बीपीसी, आयओसी

००

रात्रीच्या काळात इंधनाची विक्री होत नाही. पोलिसांकडून रात्रीची गस्त आणि पंपाना सुरक्षा व्यवस्था देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र इंधन विक्रीची सुविधा आहे. शहरातही ही सुविधा सुरू करण्यासाठी विचार केला जाईल.

गजकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन

रात्री बारानंतर एकही पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू नाही. त्याचा मोठा तोटा ग्राहकांना होत आहे. परगावच्या ग्राहकांचे रात्रीच्या वेळी पेट्रोल संपल्यास शहरात कोठेही सुविधा नाही. जिल्हा पुरवठा विभागालाही ग्राहकांची काळजी नाही.

विशाल सूर्यंवंशी, ग्राहक

००

विविध औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात रात्री शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांच्या सोयीसाठी शहरातील किमान दोन पेट्रोल पंप रात्री बारानंतर सुरू ठेवण्याची गरज आहे. पंप हे ग्राहकांच्या सुविधांसाठी आहेत.

अक्षय पाटील, वाशी

००

पेट्रोल पंपावर वाहनांत हवा भरण्याची सुविधा आहे. ग्राहकांना टायर्समध्ये किती प्रमाणात हवा भरायची याची माहिती नाही. त्यासाठी पंपावरील कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत केली जात नाही. पिण्याचे शुद्द पाणी नाही. स्वच्छतागृह असून अस्वच्छ आहे. त्यामुळे पंपावरील सुविधा या केवळ कागदावरच आहेत.

सुवर्णा चव्हाण, ग्राहक

००

'घरपोच डिझेल उपक्रम'

पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यावरील कोरगावकर पेट्रोल पंप व्यवस्थापनाने हा उपक्रम कोल्हापुरात सुरू केला आहे. त्यांच्याकडील तीन हजार लिटरचा टँकर थेट तुमच्या दारात येऊन तुम्हाला डिझेल देण्याची व्यवस्था आहे. काही उद्योजकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. अडीचशे लिटरच्या पुढे घरपोच डिलिव्हरी दिली जाते. पंपापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर ही सुविधा उपलब्ध आहे. टँकरवर 'डिलिव्हरी ॲट युवर डोअरस्टेप' आणि संपर्क क्रमांक लिहिला आहे. स्कूल बस, ट्रान्स्पोर्टस, फॅक्‍टरीमधील जनरेटरसाठी ही सेवा उपयोगी असल्याने ही सेवा सुरू केल्याचे पंपाचे मालक राज व अनिकेत कोरगावकर यांनी सांगितले.

००

पाणी, स्वच्छतागृह नाही

काही पेट्रोल पंपावर पिण्यासाठी पाणी नाही. हवा भरण्याची सुविधा आहे, मात्र कर्मचारी हवा भरण्यासाठी मदत करीत नाही. वाहनांत किती प्रमाणात हवा भरावी, या माहितीचा फलक नाही. काही पंपावर स्वच्छतागृह आहेत. मात्र स्वच्छता नाही. डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अन्य पेट्रोलियम कंपन्याचे कार्ड स्वीकारले जात असल्याचे फलक नाही. तक्रार नोंदवही नाही. ग्राहकांची पंपावर गर्दी झाल्यास रांगा केल्या जात नाहीत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत थांबावे लागते. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण समितीची आज बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण समितीची बैठक शुक्रवारी (ता.२५) होणार आहे. या बैठकीत रिंगरोडसह नवीन विकास प्रकल्पाविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्राधिकरणाची स्थापना होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला, पण अद्याप एकाही विकास प्रकल्पाची घोषणा, निधीला मान्यता मिळाली नसल्यामुळे सदस्यांत नाराजीचा सूर आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरण समितीची बैठक होणार आहे. समितीत खासदार, आमदार,करवीर व हातकणंगले पंचायत समिती सभापती यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १६ ऑगस्ट २०१७ रोजी प्राधिकरणची स्थापना झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवराज पाटील यांची निवड झाली.

प्राधिकरणात समाविष्ठ ४२ गावांसाठी बांधकाम परवाने देण्याचा अधिकार प्राधिकरणकडे आहे. याशिवाय विकासकामांची अंमलबजावणी होणार आहे. प्राधिकरण कार्यालयाकडे ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सादर केला असून, अजून नियुक्त्या झाल्या नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग, निधीची वानवा यामुळे प्राधिकरणच्या कामकाजाला गती लाभली नाही अशा समिती सदस्यांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या प्राधिकरण समितीच्या बैठकीत रिंगरोडबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

.........

४२ गावांतील बांधकाम परवान्याचा अधिकार प्राधिकरणकडे आहे. मात्र, कार्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना मुदतीत बांधकाम परवाने मिळत नाहीत. बांधकाम परवान्यांना विलंब होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय प्राधिकरणात समाविष्ठ गावांसाठी अद्याप एकाही विकास प्रकल्पाची घोषणा झाली नाही.

प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूर खरेदी केंद्र बंद करणार नाही

0
0

पणनमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षित असून, शेतकऱ्यांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे,' असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी सुभाष देशमुख यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील तूर खरेदीच्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. या वेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. 'केंद्रीय कृषिमंत्र्यांशी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करण्यात येणार नाही, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय सचिव पटनायक, 'नाफेड'चे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा व इतर अधिकारी उपस्थित होते.

'राज्यात यावर्षी १ फेब्रुवारीपासुन हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहित कालावधी संपल्यानंतर १५ मे पर्यंत केंद्र सरकारने मुदतवाढ दिली होती. मात्र, आणखी तूर शिल्लक असल्यामुळे केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता, यावर्षी १५ मे पर्यंत १९३ खरेदी केंद्रावर ३३ लाख १५ हजार १३२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, केंद्र सरकारने मुदतवाढ देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश काढण्यात येतील. तरी शेतकरी बांधवांनी आपल्याकडील तूर कमी भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकू नये,' असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिहे कठापूरप्रश्नी सर्वपक्षीय आवाज

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना, शेतमालाला हमीभाव व वाढती महागाई यांसह विविध प्रश्नांविरोधात खटाव तालुका शिवसेनेच्यावतीने मोळ ते वर्धनगड अशी पदयात्रा व वर्धनगड बोगदा येथे ठिय्या आंदोलनाला गुरुवारी सुरुवात झाली. शिवसेनेच्या या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याने आगामी काळात जिहे कठापूरप्रश्नी सर्व पक्षीय आवाज उठवून जिहे कठापूरचा प्रश्न निकालात काढण्याची रणनीती पाहायला मिळणार आहे. गुरुवारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी पुसेगाव येथे आगामी संघर्षाचे रणशिंग फुंकले. याला दोन्हीही काँग्रेसची साथ मिळाल्याने शिवसैनिकांचा उत्साह वाढला.

'जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होऊन २२ वर्षे लोटली आहेत, तरीदेखील हे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. अनेक नेतेमंडळींनी जिहे-कठापूर योजना पूर्णत्वाकडे नेण्याबाबत आश्वासने दिली. परंतु, कोणत्याही नेत्यांनी त्या आश्वासनांचा शब्द पाळला नाही. उरमोडी व धोम-बलकवडी उपसा सिंचन योजना मागून पूर्ण झाल्या आहेत. जिहे-कठापूर योजना पूर्ण करण्याबाबत राजकीय नेत्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे. ही योजना पूर्णत्वाकडे जात नाही, तोपर्यंत खटाव तालुक्यातील शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत,' असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला.

तर, राष्ट्रवादी खटाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणाले, 'आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विचारात मतभेद असले, तरी जिहे कठापूर प्रश्नी राजकारण बाजूला सारून शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समुपदेशन केंद्र बंद

0
0

पान ५ मेन

......................

समुपदेशन केंद्रांना अचानक कुलूप

निधीचे कारण देत जि.प.चा निर्णय, केंद्रे सुरू करण्याचे महिला आयोगाचे आदेश

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMt

कोल्हापूर

निधी नसल्याचे कारण पुढे करत कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी समुपदेशन केंद्राना कुलूप लावले आहे. ग्रामीण भागातील महिलांना अशा केंद्रांची गरज असताना घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांच्याच समुपदेशनाची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाने सर्व जिल्हा परिषदांनी ही केंद्रे सुरू करावीत असे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्यावतीने ३०० समुपदेशन केंद्रे चालवली जातात. त्यामध्ये कोल्हापूर आठ, सातारा व सिंधूदुर्ग येथे प्रत्येकी एक तर सांगलीत चार केंद्रे आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी ही केंद्रे अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडतात. प्रत्येक केंद्रावर एक विधी सल्लागार व एक समुपदेशक काम करत असतात.

कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या आठ केंद्रांना जिल्हा परिषदेने अचानक कुलूप लावले. या केंद्रांना वर्षाला अठरा लाखांचा निधी खर्च होत होता. पण निधी नसल्याचे कारण पुढे करत ही केंद्रे बंद करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातील महिलांची मोठी अडचण झाली आहे. कारण किरकोळ वादानंतर दाद मागण्यासाठी पोलिस स्टेशन, न्यायालयात जाणे अशक्य आहे. स्थानिक पातळीवर तडजोड करत सुखाचा संसार करण्यासाठी या महिलांना समुपदेशन केंद्रांचा आधार मिळतो. हीच केंद्रे बंद झाल्याने महिलांनी न्याय मागायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ही केंद्रे सुरू करण्यासाठी काहींनी राज्य महिला आयोगाकडे मागणी केली. त्याची आयोगाने गंभीर दखल घेतली आणि मुंबईत संबंधितांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही केंद्रे सुरू करा, असे आदेश जिल्हा परिषदांना दिले आहेत. राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या आहेत.

चौकट

अशा असतात तक्रारी

कौटुंबिक समस्या, चारित्र्याचा संशय, शारिरीक त्रास, मानसिक छळ, आर्थिक त्रास, व्यसनाधिनता, नोकरी व व्यवसाय, मुलगी झाली म्हणून छळ, मूल होत नाही म्हणून छळ

......

तीन वर्षांतील तक्रारी

सन २०१५ व १६ .. एकूण तक्रारी ८१६ निर्गत ७२६

सन २०१६ व १७ ..एकूण तक्रारी ७२४ निर्गत ६७५

सन २०१७ व १८ ..एकूण तक्रारी ७३६ निर्गत ६८९

................

केंद्रनिहाय तक्रारी व निर्गतीचे प्रमाण

जिल्हा परिषद ४१ ३९

राधानगरी १२० ११४

हातकणंगले ४१ ३९

कागल ७८ ६५

पन्हाळा ९१ ८८

भुदरगड ७९ ७७

शिरोळ १३१ १२३

गडहिंग्लज ११२ १०३

.....................

कोट

'ग्रामीण भागातील महिलांना ही समुपदेशन केंद्रे आधार होती. पण ती अचानक बंद झाल्याने ती सुरू करावीत म्हणून राज्य महिला आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

आनंदा शिंदे, जिल्हा समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराकडील बाजूला ‘अबुटमेंट’उभारणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी कंत्राटदाराने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे शहराकडील बाजूने उभारण्यात येणाऱ्या 'अबुटमेंट'चे डिझाइन मागितले आहे. डिझाइन उपलब्ध झाल्यानंतर पाया काढून कामाला सुरुवात करण्याचे कंत्राटदाराचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक मशिनरीसह जेसीबी, पोकलँड तैनात केले आहे. शुक्रवारी प्रत्यक्ष कामासाठी लाइन आउट निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी किरकोळ कामे वगळता पर्यायी पुलाचे काम बंद होते.

येत्या दोन दिवसांत त्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पर्यायी पुलाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूरकडील बाजूचे काम अर्धवट स्थितीत आहे. नदीपात्रात सध्या उभारलेल्या पिलरपासून पाडण्यात आलेल्या पाण्याचा हौदापर्यंत पुलाचे बांधकाम शिल्लक आहे. पाण्याचा हौदला लागून सपाटीकरण केलेल्या जागेत अबुटमेंट उभारणी प्रस्तावित आहे. ज्या ठिकाणी पुलाची शेवटची बाजू स्थिरावते त्या बांधकामाला अबुटमेंट म्हणतात. पाण्याच्या हौदालगत सपाटीकरण झालेल्या जागेत अबुटमेंट उभारणी होणार आहे. त्यासाठी पूर्वीच्या डिझाइनमध्ये बदल होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे नव्याने डिझाइनची मागणी केल्याचे आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी सांगितले.

दोन दिवसांत डिझाइन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अबुटमेंटचे डिझाइन पूर्वी ४० मीटर होते. नव्या डिझाइननुसार त्यामध्ये साडेचार ते पाच मीटरची वाढ होऊ शकते. भूगर्भस्तराचा विचार करून डिझाइन बनविले जाते. त्यानुसार अबुटमेंटची उभारणी झाल्यास पावसाळ्यातही पुलाच्या बांधकामात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीचे बाबा पार्टे, रमेश मोरे, जयकुमार शिंदे यांनी कामाची पाहणी केली. दरम्यान, पर्यायी पुलासाठी आवश्यक भूसंपादनही झाले नसल्याची माहिती बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यांनी समोर आणली आहे.

........

बी वॉर्ड समितीचे

राष्ट्रपतींना निवेदन

बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने नवीन पर्यायी पुलाच्या उभारणीस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विशेषाधिकार वापरून पर्यायी पुलाच्या बांधकामासंदर्भात वटहुकूम काढावा अशी विनंतीही कृती समितीने केली आहे. पर्यायी पुलाच्या मागणीसंदर्भातील निवेदन राष्ट्रपती कार्यालयाला पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अटकेत

0
0

सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील उच्च माध्यमिकचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार यांना गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांच्याच कार्यालयात अडीच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदाराची कोंडी येथे शिक्षण संस्था असून, त्याच्या संस्थेचे एचएससी सांकेतिक क्रमांक नूतनीकरणाची फाईल छाननी करून एचएससी बोर्डाकडे पाठविण्यासाठी सूर्यकांत सुतार (वय ५३, रा. आदित्य नगर विजापूर रोड) यांनी तक्रारदाराकडे अडीच हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी १ वाजता सुतार यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. त्याचे व्हिडिओचित्रण आणि छायाचित्रणही करण्यात आले आहे. उपअधीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कविता मुसळे आणि फौजदार वैभव मारकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images