Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एफआरपीसाठी कारखान्यांना५०० रुपयांचे कर्ज

$
0
0

कोल्हापूर: साखर कारखान्यांवरील आर्थिक अडचणीमुळे एफआरपी देणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामातील एफआरपीसाठी जिल्ह्यातील १४ कारखान्यांना पाचशे रुपये कर्जरुपाने देण्यात येणार आहेत, अशी माहिती केडीसीसीचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

साखरेचे दर कोसळत असल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणे अशक्य झाले आहे. सरकार एफआरपीची रक्कम न दिलेल्या साखर कारखान्यांची साखर जप्तीची कारवाईची नोटीस दिली आहे. उत्पादकांना पैसे देणे गरजेचे आहे. त्यामुळे बँकेने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. साखर दर कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. शॉर्ट मार्जिनमुळे साखर उद्योग धोक्यात आला आहे. यावर्षाच्या साखर मूल्यांकनावरील कर्जाची मर्यादा संपली आहे. दुसऱ्या बाजूला साखर कारखाने वाचवणे गरजेचे आहे. उत्पादकांना पेसे दिले पाहिजे. यामुळे पुढील हंगामातील ५०० रुपये एफआरपीसाठी कर्जरुपाने १४ कारखान्यांना देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुटबॉल- सतेज चषक

$
0
0

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा ... लोगो

...........

साईनाथ स्पोर्ट्स, बालगोपाल विजयी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वादळी पाऊस, घोंगावणारे वारे, बरसणाऱ्या पाऊसधारेत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने साईनाथ स्पोर्ट्सवर टायब्रेकरच्या आधारे ४-२ असा विजय मिळवला. पहिल्या सत्रातील लढतीत बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार 'ब'चा ४-० असा धुव्वा उडवला. शाहू स्टेडीयमवर ही स्पर्धा सुरु आहे.

दुपारी साईनाथ स्पोर्ट्स व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील लढत चुरशीची झाली. संध्यामठच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला संध्यामठच्या आशिष पाटीलने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. साईनाथ स्पोर्ट्सने आक्रमक पवित्रा घेत चाली रचल्या. साईनाथकडून सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला आशितोष मंडलिकने गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली.

उत्तरार्धात आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न चालू ठेवले. साईनाथच्या सतीश खोतने सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. आघाडी कायम राहील असे चित्र असताना संध्यामठच्या स्वराज्य सरनाईकने ६४ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. पाऊस चालू असतानाच मैदानावर दोन्ही संघ विजयासाठी भिडले. टायब्रेकरमध्ये संध्यामठकडून आशिष पाटील, मोहित मंडलिक यांना गोल करण्यात यश मिळाले तर सागर भालकर व रोहित पौंडकर यांना गोल करण्यात यश आले नाही. साईनाथकडून ओंकार लायकर, सतीश खोत, आशितोष मंडलिक, वीरेंद्र जाधव यांनी गोल करत सामना जिंकला.

पहिल्या सत्रातील लढतीत बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार 'ब' ला सहज नमवले. बालगोपालकडून रोहित कुरणेने सामन्याच्या ११ व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून रोहित जाधव, साईप्रसाद वडणगेकर, मसूद मुल्ला यांनी आक्रमक खेळ केला पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. बालगोपालच्या रोहित कुरणेने २६ व्या मिनिटाला सामन्यातील व वैयक्तिक दुसरा गोल करत पूर्वार्धात आघाडी भक्कम केली. दिलबहारला मात्र बरोबरी करणे शक्य झाले नाही.

उत्तरार्धात रोहित कुरणेचा खेळ अधिक आक्रमक झाला. ४७ व्या मिनिटाला त्याने वैयक्तिक व तिसरा गोल डागत संघाला आश्वासक आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून सागर साळवी, शुभम माळवी, मंगेश ढवंग यांचा प्रतिकार तोकडा पडला. दिलबहारचा खेळाडू शशांक माने याने नियमबाह्य वर्तन केल्याने पंचाकडून त्याला रेड कार्ड देण्यात आले. सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला बालगोपालच्या अभिषेक आगळेने चौथा गोल करत शानदार विजय साकारला.

सामन्यातील सर्वोत्कृष्ट

सामनावीर- रोहित कुरणे (बालगोपाल तालीम मंडळ), जय कामत (साईनाथ स्पोर्ट्स)

लढवय्या खेळाडू- शुभम माळी (दिलबहार 'ब'), स्वराज्य सरनाईक (संध्यामठ तरुण मंडळ)

आजचे सामने

पिटीएम 'अ' विरुद्ध साईनाथ स्पोर्ट्स

वेळ- दुपारी २ वाजता

प्रॅक्टीस 'अ' विरुद्ध मंगळवार पेठ तरुण मंडळ

वेळ- दुपारी ४ वाजता

फोटो- अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे सल्लागारपदी शिवनाथ बियाणी

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर

रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागारपदी शिवनाथ बियाणी यांची झाली. ही निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. बियाणी यापूर्वी महाराष्ट्र रेल्वे रोड पॅसेजर असोसिएशनकडून सल्लागार समितीवर कार्यरत होते. त्यांनी केलेल्या कामकाजाची दखल घेऊन निवड करण्यात आली. त्यांना निवडीसाठी खासदार धनंजय महाडिक, समीर शेठ, मोहन शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा छळ, गुन्हे दाखल

$
0
0

पती, सासूवर गुन्हा

कोल्हापूर : फ्लॅट आणि कारसाठी माहेरहून पैसे आणले नाहीत याच्या रागातून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शगुप्ता वहीद गडकरी (वय २८) यांच्या फिर्यादीनुसार पती वहीद यासीन गडकरी (वय ३२) आणि सासू रशिदा गडकरी (६०, दोघेही रा. सरदार कॉलनी, ताराबाई पार्क) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताराबाई पार्कातील वहीद गडकरी याच्याशी शगुप्ता हिचे १६ सप्टेबर, २०१४ रोजी लग्न झाले. गडकरी दाम्पत्य उच्चशिक्षित असून, बेंगळुरू येथील खासगी कंपनीत नोकरी करतात. लग्न झाल्यापासून पती आणि सासूकडून वारंवार फ्लॅट, कार आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी सुरू होती. शगुप्ताने माहेरहून पैसे न आणल्याच्या रागातून पती आणि सासूने तिला मारहाण केली. तिच्याकडील साडेपाच तोळे दागिनेही काढून घेतले. याबाबत शगुप्ता गडकरी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, सहायक पोलिस निरीक्षक बी. डी. सूर्यवंशी आणि कॉन्स्टेबल सतीश भांबरे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असंतुष्टांना महापौरपदाचे आमिष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कराव्या लागणाऱ्या फोडाफोडीसाठी भाजप आघाडीकडून नगरसेवकांना आमिषे दाखवली जात असल्याची मोठी चर्चा आहे. सत्ता मिळवण्यासाठी आघाडीकडे येणाऱ्यांना महापौरपद देण्याचीही भाजपची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपकडून येन केन प्रकारे सत्ता काबीज करण्याचा फंडा अवलंबला जात आहे. भाजपच्या या हालचाली सुरू असताना काँग्रेस आघाडीकडूनही भाजपमधील नगरसेवकांना गळाला लावण्याचे नियोजन केले जात आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन करताना भाजपने सोबत येणाऱ्या पक्षांसाठी पहिल्या वर्षी महापौरपद देण्याची तयारी केली होती. तीच रणनीती यावेळीही अवलंबली जात आहे. नगरसेवकांना ओढण्यासाठी गेल्या महिन्यापासून प्रयत्न सुरु आहेत. पण स्थायी सभापतीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने फुटीर नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेच्या चालवलेल्या प्रक्रियेमुळे नगरसेवक थोडे बॅकफूटवर गेले होते. गेल्या आठवड्यापासून पुन्हा आकडेमोडीला वेग आल्यानंतर नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बीड जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती देणाऱ्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने धक्का दिला. त्याची बातमी महापालिकेच्या वर्तुळात व्हॉटस अॅपवरुन गुरुवारी दिवसभर फिरत होती. यातून सरकारने काही निर्णय घेतला तरी कोर्टात ते टिकत नाही हे तावडे हॉटेल प्रकरण व बीड जिल्हा परिषद प्रकरणातून दाखवून नगरसेवकांवर एकप्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गेल्या महिन्यापासून प्रयत्न करुनही अपेक्षित नगरसेवक गळाला लागत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थेट महापौरपदाची ऑफर देण्यात येऊ लागली आहे. या माध्यमातून संबंधित नगरसेवकाला स्वतंत्र गट तयार करण्यास जोर येईल, असे वाटत आहे. नेत्यालाच ही ऑफर देण्यात आली असून त्याच्या माध्यमातून त्यांच्या आघाडीतील काही नगरसेवक गोळा करण्याचा मनसुबा आहे. भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याने काँग्रेस आघाडीनेही तयारी केली आहे. ज्यावेळी भाजपकडून वार केला जाईल, त्यावेळी काँग्रेस आघाडीकडून पलटवार केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनामुळे प्रशासन नमले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मान्यतेअभावी गेली तीन वर्षे रखडलेल्या पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला दखल घ्यावी लागली. लोक आंदोलनाचा रेटा वाढवत जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन व जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या इशाऱ्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान बनली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीतही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 'आम्हाला आंदोलन करण्यात स्वारस्य नाही, पण नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच जिल्हाधिकारी कार्यालयाला ठाळे ठोकू' असा आक्रमक पवित्रा कायम ठेवला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गांभीर्यपूर्वक हा विषय हाताळत पर्यायी पुलाच्या बांधकामावरुन निर्माण झालेला पेच सोडविण्यात काही अंशी यश मिळवल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले.

या बैठकीत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जुन्या शिवाजी पुलावरुन अवजड वाहनांची बिनधिक्कतपणे वाहतूक सुरू आहे. सोळाचाकी, वीसचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला नसतात हे निदर्शनास आणून देत प्रशासनाला जाब विचारला. पुलावरील अवजड वाहतुकीची छायाचित्रेही त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे सादर केली. पोलिस अधीक्षक मोहिते यांनी पोलिस अधिकाऱ्यांना या संदर्भात तत्काळ सूचना करून उपाययोजनेचे आदेश दिले. समितीचे शुक्रवारचे आंदोलन आणि पर्यायी पुलासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेले प्रयत्न या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी बैठकीच्या प्रारंभी प्रशासकीय प्रयत्नांची माहिती दिली. त्याला निमंत्रक पोवार यांनी आक्षेप घेत 'प्रत्येक वेळी गोड गोड बोलून आमची दिशाभूल करू नका. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी करणार ते स्पष्टपणे सांगा' असे सुनावले. त्यावर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी विधी व न्याय विभागाचा अहवाल, मुंबईतील बैठकीचा वृत्तान्त कथन केला. प्रशासनाची भूमिका ही पर्यायी पुलाचे काम तत्काळ सुरू झाले पाहिजे, अशीच असल्याचे स्पष्ट केले. मात्र कृती समितीतीचे कार्यकर्ते राजू लाटकर,बाबा पार्टे, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, अशोक पोवार, पंडितराव सडोलीकर, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे यांच्यासह सर्वच कार्यकर्ते प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामावर ठाम राहिले. तेव्हा अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधून सोमवारी वर्क ऑर्डर काढू असे सांगितले. चर्चेत एस. के. माळी, संपत चव्हाण, सुभाष देसाई, चारुशीला चव्हाण, अजित सासने, दिलीप माने, पंडितराव सडोलीकर, सुरेश जरग, एस. के. माळी, तानाजी पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. दरम्यान प्रशासनाच्या वर्क ऑर्डर काढण्याच्या आश्वासनावर कृती समितीतील काही सदस्य समाधानी नव्हते. निर्णायक आंदोलन पुकारून, विषय मार्गी लावू, अशी भूमिका रमेश मोरे यांनी घेतल्याने समिती सदस्यात मतभेद निर्माण झाले. काही वेळेला वादावादी झाली. बैठकीला शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, विधी सल्लागार वैभव इनामदार, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

कल्याणकरांनी साधला कांडगावेंशी संपर्क

रजेवर असलेल्या कार्यकारी अभियंता कांडगावे यांचा मोबाइलवरुन संपर्क होत नव्हता. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही संपर्क झाला नाही. वर्कऑर्डर काढण्याचा विषय त्यांच्या अखत्यारित होता. यामुळे चर्चा पुढे सरकत नव्हती. बैठक सुरू असताना किसन कल्याणकर यांनी कांडगावेंशी मोबाइलवरुन संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी सुभेदार, पोलिस अधीक्षक मोहिते व समितीचे निमंत्रक पोवार यांनी वर्कऑर्डर काढण्यासंदर्भात चर्चा केली. पोलिस अधीक्षक मोहितेंनी, 'तुमचा फोन कसा काय घेतला'अशी विचारणा कल्याणकर यांना केला. त्यावर कल्याणकरांनी, 'कांडगावे हे आमचे पाहुणे आहेत' असे मिश्किलपणे सांगताच बैठकीत हास्याचे फवारे उडाले.

आडकाठी आणणाऱ्यांना कोल्हापुरी हिसका

पुरातत्व विभागाच्या कायद्याचा आधार घेत काही जणांनी पुलाच्या बांधकामात अडथळा निर्माण केला. अशा उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करावा. पुन्हा त्यांनी आगळीक केल्यास संबंधितांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा किशोर घाटगे व बाबा पार्टे यांनी दिला.

......

पुरातत्वकडे एनओसी मागितली

पुरातत्व विभागाला पुलाबाबत वस्तुस्थिती अहवाल पाठविला आहे. येत्या १५ दिवसांत त्यांनी पुलाच्या बांधकामासाठी ना हरकत दाखला दिला नाही तर त्या विभागाचे काही तक्रार नाही, असे समजून बांधकामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. १९४५ नंतर ब्रह्मपुरी परिसरात कोणतेही उत्खनन झाले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही आदेशावरील सह्या दिघेंच्याच

$
0
0

लोगो : मटा पाठपुरावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंबेवाडी येथील जमिनीबाबत करवीर तहसीलदारांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशावरील सह्या एकाच व्यक्तीच्या असल्याचे प्रथमदर्शनी अहवालात स्पष्ट झाले आहे. यामुळे तहसीलदार उत्तम दिघे यांनी काढलेल्या आदेशांची सत्यता पडताळण्यासाठी आवक व जावक वहीतील नोंदीची माहिती तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याने यातील गांभीर्य वाढले आहे.

करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील दगडू रामचंद्र चव्हाण व शिवाजी चव्हाण तीस गुंठे जमीन कसत होते. कुळ कायद्यानुसार ही जमीन खरेदी करण्यास तहसीलदार उत्तम दिघे यांनी परवानगी दिली. तसा आदेश त्यांनी दिला. पण काही दिवसांत आपलाच हा निर्णय त्यांनी मागे घेतला. मुळ निकालाबाबत घुमजाव करत जमीन खरेदीच्या अर्ज फेटाळला. हे दोन्ही आदेश दिघे यांनीच दिल्याने या प्रकरणात गौडबंगाल असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिले. त्यानुसार उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दोन वेगवेगळे आदेश दिल्यानंतर दिघे यांनी जमीन खरेदीबाबतचा आदेश आपण दिलाच नसल्याची भूमिका घेतली आहे. या आदेशावरील सही आपली नसल्याचे ते सांगत आहेत. पण प्रथमदर्शनी अहवालात दोन्ही आदेशावरील सह्या एकाच व्यक्तीच्या म्हणजे दिघे यांच्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आदेश काढताना आवक जावक नोंद वहीत त्याची नोंद आहे का याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन तीन दिवसांत ही तपासणी करण्यात येणार आहे.

कलेक्टरांनी या प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेत उपजिल्हाधिकारी लाटकर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या अहवालानंतर या प्रकरणाची पुन्हा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशी सुरू झाल्याने तहसीलदार दिघे यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर समाजाचे २२ रोजी मुंबईत आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी ढोलगर्जनेसह २२ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पारंपारिक ढोल, कैताळासह आझाद मैदानापासून ते मंत्रालयावर होत असलेल्या अभिनव आंदोलनात सुमारे पाच लाखांहून अधिक धनगर समाजातील नागरिक सहभागी होणार आहेत' अशी माहिती माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य धनगर समाजन्नोती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेंडगे म्हणाले, 'सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेही यांनी आरक्षण देण्याचा शब्द समाजाला दिला होता. त्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आजअखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणावर कधीही भाष्य केलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला 'अच्छे दिन' येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही समाजाची अवस्था दयनीय आहे. राज्य सरकारने आरक्षण देण्याची फसवी घोषणा केली. 'धनगड' आणि 'धनगर' या शब्दामुळे चार वर्षे घोळ सुरू आहे. आरक्षण देण्यासाठी एका अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली. या गटाने अभ्यास करून डिसेंबर अखेर अहवाल सादर केला. त्यानुसार अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. त्या विरोधात राज्यभरातील धनगर समाज मुंबईत दाखल होणार आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे केले जाणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातून सुमारे दीड हजार समाजबांधव सहभागी होणार आहेत. पुणे विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या कारणावरून शिक्षणमंत्री विनोद तावडे वाद निर्माण करीत आहेत. सरकारला समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी मोर्चा काढला जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी पुलाचे काम मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाची सोमवारी वर्कऑर्डर काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांनी बांधकाम विभागाला दिले. वर्कऑर्डर मिळताच कंत्राटदाराकडून पुलाच्या उर्वरित कामाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत पर्यायी पुलाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला. यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीतर्फे शुक्रवारी करण्यात येणारे टाळे ठोक आंदोलन स्थगित करण्यात आले. सोमवारपासून पुलाच्या पश्चिम बाजूचे काम करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या पातळीवर पुलाच्या बांधकामासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. विधी व न्याय विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुलाच्या बांधकामाच्या परवानगीबाबतचा अभिप्राय पंधरा दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुलाच्या उर्वरित कामाला सुरुवातही होईल, असे जिल्हाधिकारी सुभेदार व जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बैठकीत स्पष्ट केले. पंधरा दिवसांत पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, राजू लाटकर व पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला.

पुलाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेअभावी गेली तीन वर्षे रखडले आहे. ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने पुलाचे काम तत्काळ सुरु करावे. जुन्या पुलाचे आयुर्मान संपले आहे. पावसाळ्यात जुन्या पुलावरील वाहतूक धोकादायक बनू शकते. ११ मेपर्यंत पर्यायी पुलाच्या कामासंदर्भात निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा समितीने मंगळवारी दिला होता. त्यानंतर लगेचच प्रशासकीय हालचाली झाल्या. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक झाली.

पालकमंत्र्यांच्या पॉझिटिव्ह अहवालाच्या सूचना

जिल्हाधिकारी सुभेदार यांनी पुलाच्या कामासंदर्भात प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून काम सुरु करता येईल का? या संदर्भात विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबई या दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुलाबाबत सकारात्मक अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. पंधरा दिवसांत किंवा त्या आधीही याबाबतचे पत्र उपलब्ध होईल. तेव्हा आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलिस अधीक्षक मोहिते यांनी पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु होणे महत्त्वाचे आहे. वर्कऑर्डर देऊन कामाला सुरुवात करण्याबाबत बांधकाम विभागाशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानंतर कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांच्याशी चर्चा केली. कांडगावेंनी कंत्राटदार काम करायला तयार आहे. सोमवारी वर्कऑर्डर काढू, असे सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांना आदेश

पुलाबाबतच्या महत्त्वाच्या बैठकीला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे गैरहजर होते. ते रजेवर असल्याचे समजले. त्यांच्या अनुपस्थितीला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई व अन्यत्र बदलीची मागणी केली. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी कांडगावेंशी मोबाईलवरुन संपर्क साधला. पुलाच्या बांधकामाचा महत्त्वाचा विषय प्रलंबित असताना तुम्ही रजेवर कसे काय जाऊ शकता? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांना सोमवारी उपस्थित राहून वर्कऑर्डर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लहानेंकडून सीपीआरची पाहणी

$
0
0

सुविधा,मनुष्यबळासाठी प्रयत्नशील

सीपीआरच्या पाहणीनंतर डॉ. लहानेंनी दिली माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापुरातील सीपीआरमध्ये नव्याने ट्रामा केअर युनिट सुरू केले आहे. यासाठी ४८ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जागा भरण्याचा प्रस्ताव तयार केला असून, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह सीपीआरमध्ये अद्ययावत साधनसामग्रींची उपलब्धता केली जाईल,' अशी माहिती वैद्यकीय शिक्षण सल्लागार सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी दिली. सीपीआर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाहणीनंतर गुरुवारी (ता. १०) ते पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. लहाने म्हणाले, 'सरकारी रुग्णालयात चांगली वैद्यकीय सेवा, स्वच्छता देऊन मध्यमवर्गीयांनाही सुविधा देणारे हॉस्पिटल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी नव्याने ट्रामाकेअर युनिट सुरू केल्याने येथे पुरेसे मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी ४८ जागा भरण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेतला जाईल. सीपीआरमध्ये एमआरआय, आयसीयू, सीटी स्कॅन मशीनच्या अवस्थेची पाहणी केली. आवश्यक तेथे नवीन यंत्रणा बसविण्यात येईल, तर काही मशीनची दुरुस्ती करून त्यांचा वापर केला जाईल. रुग्णांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक जुलैपासून कायमस्वरुपी अधिष्ठाता नियुक्ती केली जाईल.'

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल आणि शेंडा पार्क येथील प्रशिक्षण केंद्राची त्यांनी पाहणी केली. वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, रुग्णालयातील उपचाराच्या यंत्रसामग्रीबाबत प्रत्येक विभागातील माहिती घेतली. सर्व विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांनी उपलब्ध सुविधा आणि आवश्यक सुविधांची माहिती घेतली. जिल्ह्यात सध्या केवळ सीपीआरमध्ये मोतीबिंदू ऑपरेशनची सोय आहे. याशिवाय अन्य एका ठिकाणी मोतीबिंदू ऑपरेशनची सोय करण्याचा विचार डॉ, लहाने यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता राघोजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, आदी उपस्थित होते.

रेबीजसाठी स्वतंत्र नियोजन

श्वानदंशाचे रुग्ण वाढत असल्याने सीपीआरमध्ये रेबीज लसीची गरज वाढली आहे. लस उपलब्ध करण्याची जबाबदारी हाफकिन इन्स्टिट्युटकडे दिल्याने लवकरच पूर्ण क्षमतेने लस उपलब्ध होईल. तत्पुर्वी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून निधी उपलब्ध करून त्यातून या लसींची खरेदी केली जाईल, अशी माहिती डॉ. लहाने यांनी दिली.

स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या वाढणार

ग्रामीण परिसरातील गर्भवती महिलांची प्रसूती सुलभ व्हावी, तसेच त्यांना सीपीआरमध्ये धाव घ्यावी लागू नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा तत्सम दर्जाचे डॉक्टर्स उपलब्ध केले जातील. शक्य असेल तेथे हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाला केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास डॉ. लहाने यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई गर्व्हनन्स सोमवारपासून महापालिकेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एचसीएल कंपनीची दहा वर्षांची मुदत संपल्याने सोमवारपासून महापालिका ई गर्व्हनन्स यंत्रणा चालवणार आहे. यामुळे महापालिकेला दर महिन्याला १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या यंत्रणेसाठी महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे.

महापालिकेच्यावतीने राबवण्यात आलेला ई गर्व्हनन्स प्रकल्प तसेच विविध सुविधा देण्यासाठी एचसीएल कंपनीला कंत्राट देण्यात आले. दहा वर्षांसाठी जबाबदारी देण्यात आली होती. कंपनीला यंत्रणा उभी करण्याची तसेच त्याची देखभाल करण्याचे काम होते. याबद्दल विविध व्यवहारांसाठी कंपनीला शुल्क देण्यात येत होते. दहा वर्षानंतर या कंपनीचे कंत्राट बंद करायचे की पुढे सुरू ठेवायचे याचा निर्णय घ्यायचा होता. त्यानुसार सभागृहाने कंपनीचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १३ मे च्या मध्यरात्रीपर्यंत कंपनीला काम करता येणार आहे. त्यानंतर नवीन कंत्राट देण्याचे किंवा महापालिकेने स्वत: यंत्रणा राबवायची हे दोन पर्याय होते. महापालिकेने ही सुविधा स्वत: देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी प्रथम महापालिकेने डाटा एन्ट्री ऑपरेटर, हार्डवेअर इंजीनिअर, सॉफ्टवेअर इंजीनिअर यांची नेमणूक केली आहे. त्यांना नागरी सुविधा केंद्रावर तसेच सर्व्हरच्या ठिकाणी नेमले जाणार आहे. सध्या त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या विविध विभागातील यंत्रणा व डेटा हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू आहे. १४ मे नंतरही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

.....

विभाग सक्षम करावा लागणार

आतापर्यंत महापालिका एचसीएल कंपनीवर अवलंबून होती. त्यांच्या मदतीवर ई गर्व्हनन्स, ई ऑफिस यंत्रणा राबवली जात होती. त्यामुळे महापालिकेला संगणक विभागाची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता सर्व जबाबदारी महापालिकेवरच आली असल्याने संगणक विभाग सक्षम करावा लागणार आहे. कोणतीही अडचण आल्यास महापालिकेलाच आता मार्ग काढावा लागणार आहे.

.....

१८ लाख रुपयांचे उत्पन्न

दर महिन्याला विविध प्रकारचे सरासरी १८ हजार व्यवहार होत होते. त्यातील काही व्यवहारांसाठी एचसीएलला शुल्क देण्यात येत नव्हते. विविध दाखले देण्याच्या व बिलांचा भरणा करण्याच्या व्यवहारांसाठी शुल्क द्यावे लागत होते. या शुल्कापोटी एचसीएलला दर महिन्याला १३ ते १८ लाख रुपये द्यावे लागत होते. आता महापालिकेला हे उत्पन्न मिळणार आहे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर

२०

हार्डवेअर इंजीनिअर

सॉफ्टवेअर इंजीनिअर

ई गर्व्हनन्समधील सरासरी व्यवहार

१८ हजार

त्यासाठी द्यावे लागणारे शुल्क

१३ ते १८ लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यूट्रियंटससोबतचा करार रद्द प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकातील गोकाक येथील न्यूट्रियंटस अॅग्रो कंपनीने चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना चालण्यासंबंधी जिल्हा बँकेशी करार केला आहे. मात्र कंपनीने करारातील अटी पाळल्या नाहीत. बँकेने कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कंपनीचे प्रमुख अप्पी पाटील बँकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ५० ते ६० कोटी खर्च करून कारखाना चालवण्यासाठी घेतला़ दुदैवाने त्यांना यश आले नाही. त्यामुळे करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी दिली. यावेळी शिष्टमंडळातर्फे बँकेने न्यूट्रियंटससोबतचा करार रद्द करावा, दौलत कारखाना चालवण्यासाठी नव्याने निविदा काढावी, कंपनीच्या अनामत रकमेतून ऊस उत्पादकांची देय रक्कम, कामगारांचे थकीत वेतन द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन मुश्रीफ यांना देण्यात आले.

चर्चेवेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, 'करारानुसार कंपनी बँकेला प्रतीवर्षी आठ कोटी ६१ लाख याप्रमाणे सलग पाच वर्षे देणे आवश्यक आहे. मात्र कंपनीने पहिलाच हप्ता थकवला. कंपनीचे प्रमुख अप्पी पाटील यांनी हप्ता भरण्यासाठी बँकेकडे मुदत मागितली होती. मुदतीत पैसे न भरल्याने कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदे तज्ज्ञाच्या सल्यानंतर कंपनीला नोटीस पाठवण्यात येईल. करार रद्द झाल्यानंतर सभासदांच्या मागणीप्रमाणे कारखाना विक्री न करता पुन्हा चालवण्यास देण्याची निविदा प्रसिद्ध केली जाईल. यावेळी विजय देवणे, संजय पवार, प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, अॅड. संतोष मळवीकर, महादेव फाटक, राजेंद्र पावसकर, अनिल तेडगे, प्रदीप पवार, आप्पाजी पवार, संज्योती मळवीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्याला जीवदान

$
0
0

फोटो

..................

कारीवडेत विहिरीत

पडलेल्या गव्यास जीवदान

म.टा.वृत्तसेवा, गारगोटी

भुदरगड तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या कारीवडे येथील विहिरीत चितळ पडल्याची घटना ताजी असताना याच भागातील मठगावपैकी 'बशाचा मोळा ' येथे खासगी विहिरीत गवा पडल्याची घटना घडली. कुंडलिक गोविंद भूतल यांच्या विहिरीत पडलेल्या गव्यास वाचविण्यात वनविभाग व स्थानिक नागरिकांना यश आले आहे. मानवी वस्ती जवळील विहिरीत वनप्राणी पडण्याच्या सत्रामुळे चिंता व्यक्त होत आहे.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास भूतल यांच्या 'मळवंद' या शेतातील चाळीस फूट खोल व वीस बाय वीस लांबी रुंदी असलेल्या विहिरीत गवा पडल्याचे रात्रीच्या वेळीस शेतात रखवालीकरिता जात असलेल्या बाजीराव पाटील व दिलीप झाटे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वनविभाग व स्थानिकांना याची कल्पना दिली. तत्काळ वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गव्यास विहिरी बाहेर काढण्यासाठी दोराच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले. अंधार असल्याने सुरवातीस गवा किती मोठा आहे याचा अंदाज येत नव्हता. काहीवेळाने गवा मध्यम वाढ झालेला असल्याचे लक्षात आल्याने विहिरीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या परिसरात शेतीपंपाची वीज रात्रीच्या वेळी नसल्याने अडचण निर्माण झाली. रात्री अकराच्या सुमारास वनविभागाच्या वतीने वीजवितरण अधिकाऱ्यांना विनंती करून वीजपुरवठा चालू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

विहिरीपासून शंभर मीटर अंतरावरून पाट व पाइपच्या सहाय्याने वेदगंगेचे पाणी विहिरीत सोडण्यात आले. विहीर मोठी असल्याने लवकर भरणार नाही या शक्यतेने पहाटे जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूस चर मारण्यात आला. सकाळी आठच्या सुमारास चरापर्यंत पाणी आल्यानंतर गव्याने त्या चरातून बाहेर पडून मठगावच्या जंगलात धूम ठोकली. गव्यास विहिरी बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक जॉन्सन डिसोझा, किरण पाटील, रणजित पाटील वनमजूर मारुती गुरव, पांडुरंग मांडे, गोपाळ चव्हाण, तुकाराम लाड, चालक विजय शिंदे व स्थानिक नागरिक मारुती संकपाळ, तानाजी डेळेकर, तानाजी भूतल, यशवंत पाटील, सुनील पोवार आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीकाठावर वृक्षारोपण

$
0
0

पान ४ मेन

वृक्षारोपणाचा फाइल फोटो

............

नदीकाठांवर साकारणार वृक्षराजी

'रॅली फॉर रिव्हर' उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांत होणार वृक्षारोपण

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:@satisgMT

कोल्हापूर

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत यंदा 'रॅली फॉर रिव्हर' या उपक्रमाअंतर्गत नदीकाठावरील दोन्ही बाजूच्या एक किलोमीटर अंतरावरील जमिनीवर यंदा वृक्ष लागवड केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या ६९९ गावांत वृक्षलागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासकडून करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या वन विभागाकडून राज्यात २०१६ मध्ये दोन कोटी तर २०१७ मध्ये चार कोटी वृक्षलागवड करण्यात आली. वन विभाग, सामाजिक वनीकरणासह सर्व सरकारी कार्यालये, सामाजिक संघटनांना या योजनेत सहभागी करुन घेतले जात आहे. २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला २५ लाख ६० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वृक्षलागडीसाठी चांगली आवश्यक असणारी जमिन आणि रोपांची जोपासणा करण्यासंदर्भात यंदा 'रॅली फॉर रिव्हर' हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नदीकाठावरील एक किलोमीटरच्या बफर झोन क्षेत्रात वृक्षलागवडीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये सरकारी, वनखात्याची, ग्रामपंचायत आणि खासगी जमिनीवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. खासगी जमीन मालकांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा, भोगावती, वारणा, दूधगंगा, कडवी, हिरण्यकेशी, ताम्रपणी, वेदगंगा या नद्यांच्या काठी ६९९ गावे येतात. नदीकाठच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर अंतरावरील १६४६ स्क्वेअर किलोमीटर जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये वनखात्याची ७३.५९ स्क्वेअर मीटर जमीन असून गावठाण व नाला रोडची ११९ स्क्वेअर किलोमीटर जमिन आहे. वन खाते वगळून १४५४.५९ स्क्वेअर किलो मीटर जमीन आहे. वृक्षलागवडीत लोकसहभाग वाढला असला तरी रोपांची जोपासना करण्यााठी व नदीकाठच्या जमिनीची धूप रोखण्यासाठी 'रॅली फॉर रिव्हर' हा उपक्रम उपयोगी होणार आहे. नदीकाठच्या एक किलोमीटर परिसरात वृक्ष लागवड केल्याने चांगली जमीन मिळणार आहे. तसेच पाणी व खते योग्य वेळी देण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने या योजनेचा पाठपुरावा केला जाणार आहे.

रॅली फॉर रिव्हर उपक्रम राबवण्यासाठी समिती नियुक्ती केली असून जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष तर सचिव निवासी उपजिल्हाधिकारी राहणार आहेत. जिल्हा परिषद, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे, कृषि विभागाचे सहकार्य घेऊन या उपक्रम राबवण्यात येणार असून नियोजन करण्यात येत आहे.

०००००

नदीकाठची गावे ६९९

वन विभागाची जमिन ७३.५९ स्क्वेअर किलोमीटर

गावठाण, रस्ते, नाला परिसर जमिन, ११९ स्क्वेअर किलोमीटर

वन खाते वगळून जमीन १४५४.५९ स्क्वेअर किलोमीटर

एकूण जमीन, १६४६ स्क्वेअर मीटर

०००००

कोट

'रॅली फॉर रिव्हर या योजनेचे नियोजन सुरु असून गावातील तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देऊन आराखडा करण्यास सांगितले आहे. या उपक्रमाअंतर्गत ६९९ गावे असून जिल्हा परिषद व अन्य सरकारी विभागांचे सहकार्य घेतले जाईल.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

०००००

या योजनेतील अडचणी

जिल्ह्यातील बहुतांशी नदीकाठी ऊस पिकाची लागवड

गावठाणातील जमिनीत यापूर्वीच वृक्षलागवड

जुलै महिन्यात पूर परिस्थितीची शक्यता

०००००

या योजनेचे फायदे

जमिनीची धूप कमी होण्यास मदत

नदीकाठ वाहून जाण्यास अटकाव

वृक्ष लागवडीनंतर वृक्ष जोपासण्यास मदत

........................

कोल्हापूर जिल्हा वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

वन विभाग ११.५० लाख

सामाजिक वनीकरण २.०० लाख

एफडीसीएम ३.१५ लाख

ग्रामपंचायत विभाग ४.५० लाख

इतर विभाग ४. ४५ लाग

एकूण २५.६० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ मूल्यांकनासाठी नव्या संस्था

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : देशातील आठशेवर विद्यापीठे आणि पन्नास हजारावर कॉलेजचे मूल्यांकन करण्यात सध्या 'नॅक'ला मर्यादा येत आहेत. त्यामुळे सहाशेवर विद्यापीठ आणि चाळीस हजारावर कॉलेज मूल्यांकनाच्या प्रतिक्षेत राहिले. त्यामुळे त्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी 'नॅक'च्या धर्तीवर मूल्यांकनाची नवी जबाबदारी अन्य संस्थांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडे असा प्रस्ताव असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र या संस्थांवर यूजीसीचे नियंत्रण कायम राहणार आहे.

देशातील सर्व विद्यापीठ व कॉलेजना नॅक मूल्यांकन करून घेणे सक्तीचे आहे. सात वर्षांपूर्वी सरकारने हा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या काही वर्षांत दोनशे विद्यापीठे आणि सात हजारावर कॉलेजची तपासणी करण्यात आली. पण देशभरातील शैक्षणिक संस्था आणि तपासणीची गती पाहता सर्व संस्थांची तपासणी करणे 'नॅक'ला शक्य नाही. त्यामुळे या संस्थांना अनुदान मिळणे अवघड झाले आहे. कारण 'नॅक'च्या मूल्यांकनाशिवाय केंद्राचे अनुदान मिळणार नाही, असा निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने घेतला आहे. यामुळे अनेक विद्यापीठे आणि कॉलेजची मोठी अडचण झाली आहे.

'नॅक'ला सर्व कॉलेज आणि विद्यापीठांचे मूल्यांकन करणे अशक्य असल्याने आता यातून नवीन प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. त्यानुसार 'नॅक'च्या धर्तीवर नवीन संस्थांनाच ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी 'नॅक'ने विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतली आहे. कारण केवळ 'नॅक'कडून या सर्व संस्थाचे मूल्यांकन करणे शक्य नाही. त्यामुळे 'नॅक'ने फक्त विद्यापीठ व नव्या संस्थांनी कॉलेजचे मूल्यांकन करावे, असा प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. यासाठी नीती आयोगाकडून पाठपुरावा सुरू आहे. अनेक कॉलेजचे अनुदान रखडल्याने मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्याकडून सतत मागणी होत आहे. यामुळे नव्या संस्थांकडून तपासणी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत सरकारने हा निर्णय घेतल्यास मूल्यांकनाला गती येणार आहे.

देवानंद शिंदे 'नॅक'वर?

'नॅक'चे संचालक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. शंभरावर व्यक्तींनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील पंधरा व्यक्तींशी येत्या आठ दिवसांत संवाद साधण्यात येणार आहे. यातून तीन संचालक नियुक्त करण्यात येणार आहेत. डॉ. शिंदे यांच्यासह प्रभारी संचालक लता पिल्लई, डॉ. एस. एस. पांडे, जे. लेखा यांच्यासह पंधरा व्यक्तींमधून हे संचालक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यात डॉ. शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

'नॅक'चे दिल्लीत नवे कार्यालय

'नॅक'चे मुख्यालय सध्या बंगळुरू येथे आहे. एकच कार्यालय असल्याने कामकाजावर मर्यादा येत आहेत. यामुळे पुढील आठवड्यात दिल्लीत 'नॅक'चे नवीन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उत्तर भागातील कॉलेज व विद्यापीठात 'नॅक'च्या मूल्यांकनाबाबत उदासीनता आहे. त्यामुळे या भागात मूल्यांकन झालेल्या कॉलेजची संख्या फारच कमी आहे. ते वाढवण्यासाठी या कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत.

....................

८०००

देशातील विद्यापीठे

५००००

कॉलेज

२००

मूल्यांकन झालेली विद्यापीठे

७०००

मूल्यांकन झालेली कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉलेज प्रवेश म्हटले की विद्यार्थ्यांच्या लांबच्या लांब रांगा, प्रवेश अर्जाची तीनवेळा तपासणी, पैसे भरण्यासाठी पुन्हा काउंटरवर गर्दी ठरलेली. या साऱ्या किचकट प्रक्रियेला फाटा देत गोपाळ कृष्ण गोखले कॉलजने यंदापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीला प्रारंभ केला. सध्या बारावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब केला आहे. नव्या पद्धतीनुसार कॉलेजचे कामकाज पेपरलेस झाले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध झाली.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणारे गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज हे पहिले असल्याचा दावा कॉलेज व्यवस्थापनने केला आहे. ऑनलाइनसंदर्भात कॉलेज व्यवस्थापनने पहिल्यांदा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतली. तत्पूर्वी नागपूर येथील मास्टर सॉफ्टवेअर स्वीकारले. मास्टर सॉफ्टवेअरची प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भातील लिंक कॉलेजच्या 'www.gkgcollege.com'संकेतस्थळावर ठेवली. कॉलेजने अकरावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पासवर्ड व यूजर आयडी तयार केला आहे.

विद्यार्थी कॉलेजच्या संकेतस्थळावरील प्रवेश लिंकवर यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून फॉर्म भरल्यानंतर प्रत काढून कॉलेज व्यवस्थापनकडे सादर करावयाची आहे. गेल्या चार दिवसांपासून बारावीसाठी प्रवेश प्रक्रिया या पद्धतीने सुरु आहे. तीन दिवसांच्या कालावधीत १७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली. जून महिन्यात सीनिअर कॉलेजमधील दुसऱ्या व तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन केले आहे. कॉलेजकडे प्रत्येक विद्यार्थ्याची ऑनलाइन नोंदणी होणार आहे. नोंदणीत विद्यार्थ्यांच्या मोबाइल नंबरचा समावेश केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्याना मोबाइलवर प्रवेश अर्ज, शुल्क भरण्यासंदर्भातील माहिती समजते. अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइनचा अवलंब करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

..............

'डिजिटल इंडिया'संकल्पनेनुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अवलंब केला. ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची सोय झाली. कॉलेजचे कामकाज पेपरलेस बनले. कॉलेजने प्रत्येक विद्यार्थ्याचा पासवर्ड व यूजर आयडी बनविला आहे. मोबाइलव्दारे प्रवेश शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध केली. विद्यार्थी घरबसल्या पैसे भरू शकतो. पारंपरिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कॉलेजमध्ये ऑनलाइन प्रवेश राबविणारे गोखले कॉलेज बहुतेक पहिले आहे. विद्यार्थी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रा. डॉ. मंजिरी मोरे, प्रशासनाधिकारी, शिक्षण प्रसारक मंडळ

.........................

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे फायदे

गोखले कॉलेजमधील विद्यार्थी संख्या ५०००

विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जलदगतीने

पेपरलेस कामकाज

प्रवेश अर्जासह ऑनलाइन पेमेंटची सुविधा

रांगा, अर्ज तपासणीपासून सुटका

कला, वाणिज्य, विज्ञानसह एमसीव्ही अभ्यासक्रम

बीएस्सी कम्प्युटर, एमएस्सी जिऑलॉजीची सुविधा

............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल क्राइम - १०

$
0
0

दुचाकीच्या धडकेत वृद्धा जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भरधाव दुचाकीस्वाराने पाचदारी वृद्धेस जोराची धडक दिल्याने वृद्धा जखमी झाली. चिंचवाड-गांधीनगर मार्गावर शनिवार (ता. ५) दुपारी हा अपघात झाला होता. यात ताराबाई बाळू लोहार (वय ६५, रा. चिंचवाड) या जखमी झाल्या होत्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असता प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी (ता. ९) रात्री सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.

टोपजवळ अपघातात तरुण जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे दुचाकी अपघातात लक्ष्मण महादेव पाटील (वय ४०, रा. भोसले खडी, टोप) हे जखमी झाले. गुरुवारी (ता. १०) सकाळी हा अपघात झाला. जखमी लक्ष्मण यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

बस झाडाला धडकून दोघे जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर एसटी बस झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात दोघे प्रवासी जखमी झाले. भारती भिकू जंगम (वय ४०, रा. राशिवडे) आणि अनंतराव बाबूराव शेळके (वय ६०, रा. हुपरी, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. बुधवारी (ता. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

कार अपघातात चौघे जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोगनोळी टोलनाका येथे बुधवारी (ता. ९) पहाटे तीनच्या सुमारास कार अपघात होऊन यात चौघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अनंत काशीनाथ कुलकर्णी (वय ७२), गौरी गजानन कुलकर्णी (४२), बाळकृष्ण काशीनाथ कुलकर्णी (७९), गजानन बाळकृष्ण कुलकर्णी (४८, सर्व रा. कांता रेसिडेन्सी, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेच्या पतीला सभापतींनी सुनावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला व बालकल्याण समितीच्या सभेत उपस्थित राहून प्रत्येक विषयावर हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेविकेच्या पतीला सभापती सुरेखा शहा यांनी खडे बोल सुनावले. सभेमधील चर्चेत सदस्यांनी सहभागी व्हावे, इतरांनी हस्तक्षेप करु नये, असे सांगितले. दरम्यान, ज्या ठिकाणी भाड्याच्या इमारतीमध्ये वा अयोग्य सार्वजनिक इमारतीमध्ये अंगणवाडी भरत आहेत. त्यांचे महापालिकेच्या बंद शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

महिला व बालकल्याण समितीची गुरुवारी ताराराणी सभागृहात सभा झाली. अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा होत्या. यावेळी समितीचे सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती अपेक्षित असताना सदस्या ललिता बारामते यांचे पती सभेस उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर ते विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होऊ लागले. हा प्रकार पाहून अखेर सभापती शहा यांनी सभेतील चर्चेत केवळ सदस्यांना सहभागी होता येईल. इतरांनी हस्तक्षेप करु नये, असा इशारा दिला. त्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली.

या सभेमध्ये विविध विषयांचे ठराव करण्यात आले. त्यामध्ये मिशन शक्ती, पास्को कायद्याची जागरुकता मोहीम महापालिकेच्या ५९ शाळांमध्ये राबवण्याबरोबरच कापडी पिशवी तयार करण्याचे मशिन अथवा अत्याधुनिक शिवणयंत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुलींकरिता अभ्यासिका सुरू करणे, महिलांकरिता ओपन जीम सुरू करणे, समुपदेशन केंद्र सुरू करणे, गरजू महिलांना, बचत गटांना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी अथवा ओला मसाला तयार करण्याचे मशीन देण्याचेही ठरवण्यात आले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानामधून वंचित मुलांना गणवेश देणे, दहावी व बारावीत ७५ टक्केपेक्षा जादा गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थीनींचा सत्कार करणे, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना परिवहन मंडळाकडून मोफत देण्यात आलेल्या पासची रक्कम केएमटीकडे सुपूर्द करणे, मुलींसाठी शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालयाकडे प्रसुती झालेल्या मातांना पोषक आहार, मुलींना स्व:रक्षणासाठी कराटे प्रशिक्षण, शाळांना वॉटर प्युरिफायर मशीन उपलब्ध करुन देणे असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेला नगरसेविका शमा मुल्ला, अॅड. सुरमंजिरी लाटकर, मेहजबीन सुभेदार, माधुरी लाड, मनीषा कुंभार, ललिता बारामते, अर्चना पागर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, निकिता निंबाळकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाचा धिंगाना

$
0
0

(फोटो आहे)

मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाचा

वाहतूक शाखेत गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाने सीपीआर चौकातील ट्रॅफिक सिग्नल तोडून गर्दीत ट्रॅक्टर घातल्याने तारांबळ उडाली. पोलिसांनी अडवल्यानंतर ट्रॅक्टरचालकाने पोलिसांनाच दमदाटी करीत वाहतूक शाखेत गोंधळ घातला. गुरुवारी (ता. १०) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. सुनील बंडोपंत पाटील (वय २५, रा. पिंपळे तर्फ वागवे, ता. पन्हाळा) असे मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे तर्फ वागवे येथील प्रदीप बनके यांची शिरोली एमआयडीसीत फाउंड्री असून कच्चा माल पुरवठा करणाऱ्या त्यांच्या ट्रॅक्टरवर सुनील हा चालक आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास तो ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन पिंपळे तर्फ वागवे येथून कोल्हापूरच्या दिशेने निघाला. दुपारी एकच्या सुमारास तो सीपीआर चौकात पोहोचला. गर्दीतच तो धोकादायक पद्धतीने बावड्याच्या दिशेने निघाला. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर घुसल्याने वाहनधारकांसह वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी जबरदस्तीने ट्रॅक्टर अडवल्याने चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली. सुमारे दहा मिनिटे तो ट्रॅक्टर घेऊन रस्त्यातच थांबल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिस त्याला ट्रॅक्टरसहीत वाहतूक शाखेत घेऊन गेले. तो मद्यधुंद स्थितीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याची ब्रेथ अॅनालायझर चाचणी घेण्याचा प्रयत्न केला. त्याने याला विरोध करून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसांनाच शिवीगाळ करीत असल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

चालकाने मद्याच्या नशेत वाहन चालवल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ट्रॅक्टरचे मालक प्रदीप बनके यांना बोलवून घेतले. चालकावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून दिले. या घटनेने सीपीआर चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली, तर वाहतूक नियंत्रण शाखेत सुमारे तासभर गोंधळ सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी उलटून १३ जखमी

$
0
0

फोटो

............

एसटी उलटून १३ प्रवासी जखमी

चोकाकजवळ अपघात

म. टा. वृत्तसेवा , हातकणंगले

सांगलीहून कोल्हापूरकडे येणारी एसटी बस चोकाकजवळ (ता. हातकणंगले) खड्डा चुकवताना शेतात जाऊन उलटली. गुरुवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारात वादळी पावसात हा अपघात घडला. यात बसमधील १३ प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमींना एसटी महामंडळाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.

या अपघातात यासीन शकील अत्तार (वय २४, रा. रुकडी, ता. हातकणंगले), श्रीरंग निवृत्ती चिकुर्डे (४२, रा. गणेश नगर, सांगली), अंजली राजेंद्र उपाध्ये (३४, रा. गव्हर्मेंट कॉलनी, सांगली), दीपक बापू घाटगे (३२, रा. कनाननगर), अनिल शंकर लाखे (२१, रा. कसबा बावडा), इंदूबाई बाबूराव पाटील (७०, रा. राजेंद्रनगर), सारिका किरण शिंदे (२५, जत, सांगली), जयवंती अशोक चौगले (७०), अशोक यशवंत चौगले (७५, रा. दोघे सांगली), शीतल किरण शिंदे (२०, रा. जत, सांगली) यांच्यासह १३ प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

सांगलीहून कोल्हापूरकडे येणारी विनावाहक एसटी बस गुरुवारी सायंकाळी पााच वाजता सांगली बसस्थानकातून बाहेर पडली. हातकणंगलेजवळ आल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरुवात झाली. चोकाकजवळ एका लहान पुलाजवळ आल्यानंतर रस्त्यातील खड्डा व समोरील रिक्षा चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस शेतात पलटी होऊन पुन्हा सरळ झाली. यावेळी बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर २० मिनिटांनी १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एस.टी. महामंडळाचे डी. एम. पाटील हे कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींना तातडीची एक हजार रुपये रोखीने मदत केली. जखमींवरील उपचाराचा खर्च महामंडळाकडून केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सीपीआरमध्ये येऊन जखमींची विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images