Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सीइटी परीक्षा

$
0
0

एमएचटी-सीईटी

प्रवेश परीक्षा आज

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

महाराष्ट्र सरकारमार्फत सामायिक प्रवेश परीक्षा गुरुवारी १० मे रोजी कोल्हापूर शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा शहरातील ५३ केंद्रावर होत असून या परीक्षेसाठी सतरा हजारांवर उमेदवार बसणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

राज्य सरकारने अधिसूचित केल्यानुसार महाराष्ट्र राज्यात यावर्षी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), डी. फार्म., कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०१८ ही सामायिक प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे वरील सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश केंद्रीभूत प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) व स्वत:च्या ओळखीसाठी प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मूळप्रतीसह सोबत आणणे आवश्यक आहे.

तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी फक्त काळया शाईचे बॉल पेन, पाण्याची बाटली, लिखाणाचा पुठ्ठा (रायटींग पॅड) इतकेच साहित्य परीक्षाकेंद्रावर आणण्यास परवानगी आहे. या व्यतिरिक्त मोबाइल, कॅलक्यूलेटर, लॉगटेबल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट इत्यादी साहित्य परीक्षाकेंद्रामध्ये आणण्यास परवानगी नाही. प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेमध्ये गैरव्यवहार व गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कार्यवाईस पात्र ठरेल. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारमार्फत विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या पालकांसाठी बैठकीची व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसस्थानक परिसरातकारने चिरडल्याने महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस भरधाव कारने ठोकरुन चिरडले. त्यात अलका रामदास गवळी (वय ४२ रा. सुभाषनगर) या ठार झाल्या. त्यांच्यासोबत असलेल्या भारती आनंदराव कोईंगडे (वय ६०, रा. बटुकेश्वर कॉलनी, शिंगणापूर) या जखमी झाल्या. बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील कार एका बड्या उद्योगपतीच्या मुलाची असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका खासगी रुग्णालयात अलका गवळी, भारती कोईंगडे, अनुसया चौगुले या काम करतात. तिघी रात्री आठ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या केएमटी बसस्टॉपकडे चालत जात होत्या. तेथील वटेश्वर मंदिरापासून काही अंतरावर आल्यानंतर ताराराणी पुतळ्याकडून दाभोळकर कॉर्नरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या त्या महिलांना उडवले. यामध्ये अलका या चिरडल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या. सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अलका यांच्या मुलीचे नुकतेच लग्न ठरले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंब हादरून गेले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या निर्णयाने मराठीला अच्छे दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन व्हावे यादृष्टीने सरकारने राज्य सरकारच्या कार्यालयांतील मराठीचा वापर वाढावा यासाठी कडक पावले उचलली आहेत. सर्व पत्रव्यवहार मराठीतून व्हावेत अशी सक्त ताकीद सर्व विभागांना दिली आहे. मराठीचा वापर होतो की नाही हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्यात येणार असल्याने मराठीचा वापर आता अनिवार्य ठरला आहे. कोल्हापुरातील शासकीय कार्यालयांत मराठीचा वावर आणि वापर चांगला असून, येणाऱ्या काळात सरकारच्या या निर्णयामुळे त्याला अधिक बळकटी मिळणार आहे.

सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय. जलसंपदा, सिंचन विभाग, महावितरण कार्यालय आदी ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत आहे. बहुतांश पत्रव्यवहार, पत्रके, सरकारी निर्णय, निमंत्रणपत्रिका, परवाने, नोंदवह्या, नियम पुस्तिका, सर्व प्रकारच्या टिपण्या, धोरणे, अधिसूचना, प्रारूप, बैठकांची कार्यवृत्ते, रजेचे अर्ज, सरकारी आकडेवारी मराठीत देण्याचा प्रयत्न कार्यालयात होत आहे.

मराठी युनिकोडचा वापर

बहुतांश सरकारी कार्यालयांत मराठी टायपिंगसाठी युनिकोड प्रणालीचा वापर केला जातो. तसेच संगणकासाठी आता गुगल इनपूट टुल्स वापरणे सहज सोपे झाले आहे. मराठीचा संगणकावरील वापर सुलभ झाल्याने भाषेच्या वापरात वाढ होण्यास मदत होणार आहे.

आंतरराज्य पत्रव्यवहारासाठी मात्र 'इंग्रजी'

काही विभागांच्या माध्यमातून परराज्यात पत्रव्यवहार करताना मात्र इंग्रजीचा वापर केला जातो. पण जिथे शक्य असेल तिथे मराठीला प्राधान्य देत असल्याचे सांगितले आहे. मोटर वाहन कायद्यासंबंधी अनेक बाबी इंग्रजीतून असल्याने त्याचा वापर करणे गरजेचे ठरते.

तांत्रिक बाबीत मराठीचा वापर अडचणीचा

तंत्रज्ञानात मराठी भाषेचा वापर अजूनही तितकासा नाही. काही वैज्ञानिक संज्ञा तसेच तांत्रिकदृष्ट्या मराठीतील पर्यायी शब्द देणे अडचणीचे ठरत आहे. तरीही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्यास तांत्रिक वापरातही मराठीचा वापर सुलभ होईल, पण त्यासाठी अधिकाधिक तांत्रिक आणि विज्ञानातील विषयांना पर्यायी शब्द देत ते रुजविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आता संकेतस्थळेही मराठीतच

सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर मराठीचा वापर वाढला असून, ते वापरासाठी अधिक सोयीचे आणि सुलभ केले जात आहे. सरकारच्या 'आपले सरकार' या वेब पोर्टलवर सर्व माहिती मराठीतून दिली आहे. सर्वच विभागातील माहिती मराठीतून देण्यास आता अधिकरीत्या प्राधान्य दिले जाईल.

००००

जलसंपदा विभागातील सर्वच व्यवहार पूर्वीपासून मराठीत होत आहेत. मराठी अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सरकारी व्यवहारात मराठी रुजण्यास मदत होईल. सरकारी नोकरीत नवीन असणाऱ्यांना सुरुवातीला थोडे अडचणीचे ठरते, पण वापर वाढल्यास सोपे आणि सोयीचे ठरते.

संजय होनाळे, उपकार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग

प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व सूचना मराठीतून लावल्या आहेत. सरकारी व्यवहार मराठीतूनच करतो. मोटर वाहन कायद्यात केंद्राच्या संबंधित कामात फक्त इंग्रजीचा वापर केला जातो. अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्याला यापुढेही अग्रक्रम दिला जाईल. आस्थापानासह अनेक विभागांत मराठी भाषा रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

डॉ. डी. टी. पवार प्रादेशिक परिवहन अधिकारी

सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर अनिवार्य करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य असून, यामुळे भाषा रुजण्यास मदत होणार आहे. केवळ निर्णय घेऊन हे काम तडीस जाणार नाही तर त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सरकारने लक्ष द्यायला हवे.

रणजित कांबळे, सामाजिक कार्यकर्ता

०००००

फोटो आहेत....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ठप्प

$
0
0

पान ५ मेन

दुकॉलमी फाइल फोटो

..........................................

जमीन, निधीअभावी रखडले प्रकल्प

किंवा

सिंचन प्रकल्पांचे काम ठप्प

जिल्ह्यातील स्थिती, जमिनींचा अभाव आणि निधी उपलब्ध नसल्याने काम बंद

Satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMt

कोल्हापूर

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाची चालढकल यामुळे जिल्ह्यातील धामणी, सर्पनाला, आंबेहोळ, उचंगी आणि नागनवाडी या सिंचन प्रकल्पाचे काम गेली चार वर्षे ठप्प आहे. लाभक्षेत्रात पुनर्वसनासाठी जमिनीचा अभाव आणि प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नसल्याने ५० ते ७० टक्के बांधकाम पूर्ण होऊनही काम बंद आहे.

जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, दूधगंगा आणि वारणा हे मोठे प्रकल्प असून ८१ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. कडवी, कासारी, कुंभी, धामणी हे मध्यम प्रकल्प असून कोदे, वेसरफ, ओळवण, उपवडे, पडसाळी, पोंबरे, कुंभवडे, केसकरवाडी, नांदारी, पालेश्वर, मानोली, कांडवण, कासार्डे हे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. मोठे, मध्यम, लघु क्षेत्रातील प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ९९ हजार ९३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याने कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे.

सिंचन प्रकल्प झाले असले तरी पुनर्वसनाच्या कामात ढिसाळपणा झाला आहे. पूर्ण झालेल्या अनेक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. प्रकल्पग्रस्त आजही पुनर्वसनासाठी सरकारी दरबारी उंबरे झिजवत आहेत. डावे पक्ष व संघटना सनदशीर मार्गाने अनेकवर्षे आंदोलन करुन प्रशासनाकडे न्याय मागत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील धामणी, आजरा तालुक्यातील आंबेहोळ, सर्पनाला, उचंगी, भुदरगड तालुक्यातील नागनवाडी हे प्रकल्प रखडले आहेत. मोठ्या प्रकल्पात गणना होत असलेल्या धामणी प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा होऊनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी लाभ क्षेत्रात जमीन उपलब्ध नसल्याने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. तसेच गेली वीस वर्षे प्रकल्पासाठी निधीची घोषणा केली जात असली अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. या प्रकल्पाचा खर्च आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजरा तालुक्यातील आंबेहोळ प्रकल्पाचे काम ७० टक्के, सर्पनाला प्रकल्पाचे ६५ ते ७० टक्के तर उचंगी धरणाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. भुदरगड तालुक्यातील नागनवाडी धरणाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडल्याने आणि निधी उपलब्ध होत नसल्याने चारही प्रकल्प रखडले आहे.

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत घळभरणी करुन दिली जाणार नाही, असा कायदा राज्य सरकारने २००६ मध्ये केला आहे. लाभ क्षेत्रात पुनर्वसनासाठी जमीन नसेल तर जमीन दराच्या तिप्पट किंवा चौपट रक्कम प्रकल्पग्रस्तांना देण्याच्या घोषणा मंत्री महोदयाकडून केल्या जातात. पण प्रत्यक्षात निधीची तरतूद होत नसल्याने प्रकलग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच निधीअभावी सिंचन प्रकल्पांची कामे ठप्प आहेत.

कोल्हापुरातील अपूर्ण चारही प्रकल्पांना गती देण्यासाठी गेल्या चार युद्धपातळीवर प्रयत्न झालेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पासंदर्भात बैठकांचे आयोजन केले जात पण निर्णय होत नाहीत. गेली दीड वर्षे जिल्हा पुनर्वसन अधिकारी पद हे रिक्त असल्याने राधानगरी प्रातांधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबरोबर मदत व पुनर्वसन हे खाते आहे. पालकमंत्री पाटील यांनी पाठपुरावा केल्यास सिंचन प्रकल्प मार्गी लागू शकतील.

०००००

कोट

'जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या पाच प्रकल्पांची कामे ठप्प झाली आहेत. पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्त संघटनांना विश्वासात घेतले जात नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, विरोधी लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याबाबत होणारा चालढकलपणा आणि प्रशासनाचा लाल फितीचा कारभार यामुळे प्रकल्प रखडले आहेत.

संपत देसाई, श्रमिक मुक्ती दल

००००

कोट

'धामणी प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३४ आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांना चार एप्रिल रोजी जमीन वाटपाचे प्रमाणपत्र दिले आहे. आंबेहोळ, सर्पनाला, नागनवाडी प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याने विशेष आर्थिक सहाय्य द्यावे, यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उचंगी प्रकल्पग्रस्तांना लाभ क्षेत्रातील जागा देण्यास उपलब्ध नाही.

नंदकुमार काटकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी

...................

प्रकल्पांची सद्यस्थिती

आंबेहोळ प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण

सर्पनाला प्रकल्पाचे काम ६५ ते ७० टक्के

उचंगी धरणाचे काम ७५ टक्के पूर्ण

नागनवाडी धरणाचे काम ५० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाचा अहवाल दोन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबतचा अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थान विभागाकडून हा अहवाल अपेक्षित आहे. या दोन्ही विभागाच्या अहवालानंतर पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत निर्णय होणार आहे. मंगळवारी मुंबईत या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत अहवाल देण्याच्या सूचना केल्याने पर्यायी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

जुन्या शिवाजी पुलाचे आयुर्मान संपल्याने त्यावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. तर पर्यायी पुलाचे बांधकाम पुरातत्त्व विभागाची नसल्याने रखडले आहे. तीन वर्षापासून पुलाचे काम बंद आहे. पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेशिवाय पुलाचे बांधकाम करता येणार नाही. यामुळे पुलाचे बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करावे, या मागणीने जोर धरला आहे. कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पुलाचे काम करता येते का? यासाठी विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे.

दुसरीकडे कृती समितीने ११ मेपर्यंत बांधकामाबाबत निर्णय झाला नाही तर शिवाजी पूल व राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापुरात पर्यायी पूलप्रश्नी टोलच्या धर्तीवर आंदोलन उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याप्रश्नी चर्चा झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कायदेशीर बाबी, आपत्ती व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने चर्चा झाली. या दोन्ही विभागाकडून आता अहवालाची प्रतिक्षा आहे.

.....

' पुरातत्त्व'ची मान्यता आवश्यकच

पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाची मान्यता गरजेची आहे. पुरातत्त्वच्या मान्यतेशिवाय बांधकाम झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार कायमस्वरुपी पुलाचे बांधकाम करता येत नाही, अशी तरतूद आहे. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील जागेवरील बांधकाम मंजुरीबाबत पुरातत्त्व कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसभेत विधेयक मंजूर केले. मात्र विधेयकाला राज्यसभेची मान्यता मिळाली नाही. यामुळे पुलाचे काम लटकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची आवक घटली

$
0
0

कांद्याची आवक घटली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात कांद्याच्या दरात घसरण होत असताना कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसांपासून कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे. मंगळवार व बुधवारी सुमारे सात हजार पिशव्यांची (तीन क्विंटल) आवक कमी झाली आहे. शनिवारी (ता.५) बाजार समितीमध्ये १९ हजार पिशव्यांची आवक होऊन दहा किलोला ४० ते ७५ रुपयांचा दर मिळाला होता. राज्याच्या तुलनेत कोल्हाप]रात दर जास्त असल्याने आवक वाढेल अशी शक्यता असताना कांद्याची आवक गेल्या चार दिवसांत कमी-कमी होऊ लागली आहे. दोन दिवसांतर १९ हजार पिशव्यावरुन सध्या ही आवक १२ हजार पिशव्यांपर्यंत कमी झाली असून दोन दिवसात तब्बल सात हजार कांदा पिशव्या कमी झाल्या आहेत. राज्याच्या दराचाही येथील सौद्यावर परिणाम दिसून येत असून दहा किलोला ३० ते ६० रुपये दर मिळत आहे. रविवारी आठवडा बाजारात किलोला १२ ते १५ रुपये दर होता. यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता व्यापारी वर्गाककडून व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या दरात घसरण झाली असताना बटाटा दरात चांगलीच वाढ होऊ लागली असून सध्या ३० रुपये किलोने किरकोळ बाजारात विक्री सुरू आहे.

.................

इचलकरंजीत लवकरच

अत्याधुनिक जलशुध्दीकरण केंद्र

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी -

शहराला भासणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारच्या युआयडीएसएसएमटी योजनेतून उभारण्यात येत असलेल्या सव्वासात कोटी रुपये खर्चाच्या नुतन व अत्याधुनिक जलशुध्दीकरण केंद्र लवकरच पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली. दरम्यान, जलशुध्दीकरण कार्यान्वित करण्याबाबत झालेल्या बैठकीत नगराध्यक्षांनी ठेकेदाराला धारेवर धरत काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

सध्या इचलकरंजी शहराला पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याचा उपसा केला जातो. या पाण्यावर मध्यवर्ती बसस्थानक चौकातील ५४ एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्रात आवश्यक ती प्रक्रिया करुन पुरवठा केला जातो. मागील काही वर्षापासून शहराला पाणीटंचाई जाणवू लागल्याने भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नगरपालिकेच्या माध्यमातून सव्वासात कोटी रुपये खर्चाचा नवीन ५४ दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जात आहे. परंतु, तीन वर्षांपासून हे काम प्रलंबित राहिले आहे. त्या अनुषंगाने बुधवारी नगराध्यक्षा स्वामी यांनी पाणी पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविली होती. बैठकीत उपनगराध्यक्षा सरीता आवळे, माजी आमदार अशोक जांभळे, पाणी पुरवठा सभापती नितीन जांभळे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता अजय साळुंखे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘स्वाभिमानी’ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

$
0
0

'स्वाभिमानी' आज

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १०) दुपारी १२ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, एफआरपीची रक्कम त्वरीत द्यावी, दूध दरवाढ लागू करावी आदी मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल मादनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवाध्यक्ष सागर संभुशेटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल साताबारासाठी प्राधान्य द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असणारा सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पुणे विभागात हा उपक्रम विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यानेही हा उपक्रम प्राधान्याने पूर्ण करावा, त्यासाठी काटेकोर नियोजन करावे,' अशी सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महसूलस अधिकाऱ्यांना दिली. पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांची ही पहिलीच कोल्हापूर भेट होती.

डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपायुक्त प्रताप जाधव, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, भूसंपादन अधिकारी अविनाश हादगल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'कामांची डेडलाइन ठरवून नियोजन करा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करा. डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा हा उपक्रम प्राधान्यक्रमाचा आहे. यात कोल्हापूर जिल्हा व पुणे विभाग यांची कामगिरी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना गतिमान प्रशासन देण्यासाठी नेटके नियोजन करा व त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. खरीप पीक कर्ज आराखडा यशस्वीपणे राबवावा. आराखड्यानुसार कर्जवाटप होईल यासाठी दक्ष रहा. बी-बियाणांची शेतकऱ्यांना अडचण येणार नाही असे नियोजन करा. पीक कर्जमाफीबाबत उद्दिष्ट व साध्य याचा सातत्याने आढावा घेणे गरजेचे आहे.'

डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत आदी सर्व निवडणुकांमध्ये निवडणूक खर्चाची कागदपत्रे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विहीत मुदतीत, विहित कागदपत्रांसह व विशिष्ट नमुन्यातच स्वीकारण्यासह निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपायुक्त प्रताप जाधव यांनी महसूलविषयक विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कोल्हापूर जिल्ह्याने महसुली उद्दिष्ट १२१ टक्क्यांनी पूर्ण केल्याचे सांगून मेअखेरपर्यंत ऑनलाईन सातबाराचे काम पूर्ण होईल असे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा सर्वसाधारण योजनेतून ९७ टक्के, तर अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९९ टक्के खर्च करून जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर असल्याचे सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सांगितली.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राध्यापकाच्या मारहाणीत विद्यार्थी जखमी

$
0
0

(जखमीचा फोटो आहे)

प्राध्यापकाच्या मारहाणीत विद्यार्थी जखमी

आयटीआय कॉलेजमधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वर्गात मोबाइलवर गाणी ऐकणाऱ्या विद्यार्थ्याला हटकल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकाची झटापट झाली. या घटनेत अथर्व विजय गायकवाड (वय १८, रा. सानेगुरुजी वसाहत) हा विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या डोक्याला इजा झाली आहे. प्राध्यापक राज घोडके यांनी वीट फेकून मारल्याचा आरोप अथर्वने केला. या घटनेनंतर कॉलेजच्या आ‌वारात तणाव निर्माण झाला होता. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम बुधवारी (ता. ९) रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सीपीआरमधून जखमी विद्यार्थी आणि त्याच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व गायकवाड हा आयटीआय कॉलेजमध्ये प्लंबर ट्रेडचे शिक्षण घेतो. त्याचे वडील विजय गायकवाड हे रिक्षाचालक आहेत. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अथर्व कॉलेजमध्ये गेला. वर्गात शिक्षक येण्यापूर्वी अथर्व मोबाइलवर गाणी ऐकत बसला होता. यावेळी वर्गापासून जाणारे प्राध्यापक राज घोडके यांना अथर्व मोबाइलवर गाणी ऐकत असल्याचे लक्षात आले. त्यांनी अथर्वला मोबाइल बंद करण्यास सांगितले. अथर्वने थोडा वेळ मोबाइल बंद केला. मात्र, शिक्षक गेल्यानंतर त्याने पुन्हा मोबाइल सुरू केला. प्रा. घोडके यांनी माघारी येऊन अथर्वकडील मोबाइल काढून घेतला. यानंतर मोबाइल परत घेण्यासाठी अथर्व वर्गाबाहेरील व्हरांड्यात आला. यावेळी शिक्षक व अथर्व यांच्यात वाद झाला. झटापटीत अथर्व खाली पडला. प्रा. घोडके यांनी जवळच पडलेली वीट फेकून मारली, त्यामुळे कानाच्यावर डोक्याला गंभीर इजा झाल्याचा आरोप अथर्वने केला.

या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेतील अथर्वला विद्यार्थी आणि काही शिक्षकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर शिक्षकांनी अथर्वच्या पालकांना बोलवून घटनेची माहिती दिली. पालकांनी जुना राजवाडा पोलिसांना कळवले असून, रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. किरकोळ कारणावरून प्रा. घोडके यांनी वीट फेकून मारल्याचा आरोप जखमी अथर्वने केला आहे, तर याबाबत प्रा. घोडके यांना मोबाइलवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, 'अथर्व हा वर्गात मोबाइलवर गाणी ऐकत होता. सूचना देऊनही त्याने मोबाइल बंद केला नाही. कॉलेजमध्ये मोबाइल घेऊन येण्यास परवानगी नाही, तरीही त्याने गैरकृत्य केले. मोबाइल काढून घेतल्यानंतर तो माझ्या अंगावर धावून आला. यावेळी झालेल्या झटापटीत खाली पडल्याने तो जखमी झाला आहे. मी मारहाण केलेली नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार महिला गंभीर

$
0
0

ट्रकच्या धडकेत

मोपेडस्वार महिला गंभीर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भरधाव ट्रक व मोपेडच्या धडकेत मोपेडवरील महिला गंभीर जखमी झाली. मध्यवर्ती बसस्थानक ते तावडे हॉटेल मार्गावर लिशां हॉटेल चौकात बुधवारी (ता. ९) सांयकाळी हा अपघात झाला. सुरेखा संजयकुमार स्वामी (वय ४६, रा. मोरे-माने नगर, कळंबा) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सुरेखा स्वामी या मार्केट यार्ड परिसरात खासगी कंपनीत नोकरी करतात. कामावरून घरी जाताना लिशां हॉटेल चौकात ट्रकने त्यांच्या मोपेडला धडक दिली. या अपघातात त्या बाजूला फेकल्या गेल्या, तर मोपेड ट्रकखाली चिरडली. सुरेखा यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मोपेडवरून बाजूला फेकल्या गेल्याने मोठा अनर्थ टळला. मोपेडचा ट्रकखाली चिरडून चक्काचूर झाला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी १०७कर्मचाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी बदली प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी समुपदेशनाद्वारे १०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. गेल्या वर्षाप्रमाणे यावेळीही जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास बदलीतून वगळण्यात आले नाहीत. पदाधिकारी असल्याने बदलीतून वगळावे अशी विनंती दोघांनी केली होती. मात्र विनंती धुडकावत बदली प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

जि. प. मध्ये अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सभापती सर्जेराव पाटील, अंबरिश घाटगे, शुभांगी शिंदे यांच्यासह खातेप्रमुखांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता बदलीची प्रक्रिया सुरू झाली. सामान्य प्रशासन विभाग ६२, ग्रामपंचायत विभाग २६, वित्त विभाग ७, कृषी विभाग ५, बांधकाम विभाग तीन, प्राथमिक शिक्षण विभागातील चारजणांची बदली झाली. सायंकाळी साडेसहापर्यंत बदलीची प्रक्रिया चालली. गुरुवारी आरोग्य, एकात्मिक बालविकास सेवा, बांधकाम, पशुसंवर्धन विभागातील पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया होणार आहे.

-------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावसह १३ गावांची तहान भागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरालगतच्या गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइनला गळती असल्याने दररोज १९ ते २० लाख लिटर पाण्याची गळती होत आहे. पाचगावसह १३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. योजनेची जुनी पाइपलाइन बदलण्यासह जॅकवेल आणि शुद्धिकरण केंद्राची दुरुस्ती, नवीन विद्युत पंप खरेदी करण्याचा सामावेश असलेल्या १० कोटी ५२ लाख ५२ हजारांचा दुरुस्ती प्रस्ताव येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. प्रस्तावाला बुधवारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. योजना दुरुस्ती व विरतण व्यवस्था बळकट झाल्यास पाचगावसह १३ गावांची तहान भागणार आहे.

कागलजवळील दूधगंगा नदीवर २० कोटींची गांधीनगर पाणीयोजना १९९८ साली मंजूर झाली. २००३ पासून ती कार्यान्वित आहे. २००५ पासून जीवन प्राधिकरणचे प्रशासन योजनेची देखभाल दुरुस्ती करते. मूळ योजनेत गांधीनगर, नेर्ली, तामगाव, हलसवडे, सांगवडे, सांगवडेवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, वसगडे, चिंचवाड, वळीवडे या गावांचा सामावेश आहे. त्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, वसगडे, चिंचवाड ही गावे या योजनेतून पाणी न घेता सार्वजिक, खासगी विहीर, पंचगंगा नदीवरील उद्भवचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करतात. हालसवडे गावाला गोकुळ शिरगाव औद्योगिक योजनेतून पाणी पुरवठा होतो.

दरम्यान, टंचाई निर्माण झाल्याने पाचगावला गांधीनगर पाणी योजनेतून २०१६ पासून दररोज १२ लाख लिटर आणि मोरेवाडी गावात माणसी प्रतिदिनी ४० लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाचगावसाठी महापालिकेच्या शिंगणापूर पाणी योजनेतूनही १३ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाचगाव, मोरेवाडीसह १३ गावांसाठी रोज ९० ते एक कोटी लाख लिटर पाणी दोन विद्युत पंपांद्वारे दूधगंगा नदीतून उपसले जाते. ते कणेरीतील दत्तनगर शुद्धिकरण केंद्रात साठवले जाते. शुद्धिकरणानंतर वितरण केले जाते. नदी ते गावातील वितरणापर्यंत एकूण ३२ किलोमीटरची पाइपलाइन आहे. आयुर्मान संपत आल्याने पाइपलाइनला अनेक ठिकाणी मोठी गळती आहे. रोज १९ ते २० लाख लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. यामुळे पाचगाव, मोरवाडीसह योजनेवरील उर्वरित सर्वच गावांत कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गळतीची पाइप बदलून वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी ११ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.

------------------------------

चौकट

राजकीयदृष्या संवेदन असल्याने

शहरालगतीची टंचाई निर्माण होणारी गावे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आहेत. हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी टंचाई निर्माण होणाऱ्या गावांची मते महत्त्वाची आहेत. यामुळे या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन गांधीनगर प्रादेशिक पाणीयोजना दुरुस्तीचा ११ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने जोरदार पाठपुरावा केला.

------------------------------

११ कोटींतून होणारी कामे

- २३ किलोमीटर पाइपलाइन बदलणे

- जॅकवेलमधील विद्येत पंप बदलणे

- शुद्धिकरण केंद्राची दुरुस्ती

- पाणी विरतण व्यवस्था बळकटीकरणासाठी आवश्यक कामे

----------------------------

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवर आधारित गावे

१३

दूधगंगा नदीतून रोज पाणी उपसा

९० लाख ते १ कोटी लिटर

पाइपलाइन गळतीने वाया जाणारे पाणी

१९ लाख लिटर

प्रतिदिन प्रती माणसी

४० लिटर पाणी

----------------

कोट

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ११ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून काम पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागणार आहेत. त्यातील मुख्य काम गळतीची पाइपलाइन बदण्याचे आहे. ते पावसाळ्यातही करता येते. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर गळती कमी होईल.

एन. बी. भोई, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

-------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआर सुविधांच्या मृत्यूशय्येवरच

$
0
0

सीपीआर फाइल फोटो

.....................

असुविधांच्या विळख्यात सीपीआर

रुग्णांची संख्या अधिक, सुविधा तोकड्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरची अस्मिता आणि गरीब रूग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाला सुविधांचा डोस देण्याची गरज आहे. सीपीआरमधील असुविधा आणि एजटांच्या विळख्यात बहुतांशी रुग्ण अडकले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आणि सुविधा तोकड्या असे चित्र आहे. हायटेक यंत्रणा असूनही प्रशिक्षित कर्मचारी, देखभाल आणि दुरूस्तीची यंत्रणा नसल्याने सीपीआर सुविधांच्या मृत्यूशय्येवर आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने गुरूवारी (ता. १०) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी सीपीआरच्या विविध सुविधांसाठी निधी आणि ठोस कार्यवाही केल्यास कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला बूस्ट मिळणार आहे. सीपीआरमध्ये प्रवेश करतानाच वाहतुकीची मोठी कोंडी जाणवते. खेडोपाड्यातून रूग्णाला घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सची कोंडी सीपीआरच्या आवारात होते. अतिदक्षता, नवजात शिशु विभाग, अपघात विभाग, हदयशस्त्रक्रिया विभाग हाऊसफुल्ल असल्याने रुग्णांची कोंडी होत आहे. प्रत्येक विभागात खाटांची संख्या कमी असल्याने येथील कर्मचारीच खासगी रूग्णालयात दाखल करण्याचा अजब सल्ला रूग्णांच्या नातेवाईकांना देतात. सीपीआरच्या इमारतीतील लिफ्ट बंद आहे. अतिगंभीर असलेल्या रूग्णांना दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. नवीन ट्रामाकेअर युनिटची सुरूवात झाली, मात्र या ठिकाणी १५८ कर्मचाऱ्यांची गरज असताना रोजंदारीवर कर्मचारी नेमले आहेत. दररोज विविध विभागात ९०० रुग्ण दाखल होतात. पैकी प्रसूति विभागात ग्रामीण भागातून शंभराहून अधिक रूग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यासाठी बेडची सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना जमिनीवरच झोपावे लागते. नवजात शिशु विभागातही व्हेंटिलेटर नाहीत. हदयशस्त्रक्रिया विभागातही मोजकेच रुग्ण घेतले जातात. रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्वंच प्रकारच्या औषधांचा तुटवडा आहे. डिजिटल एक्सरेची यंत्रणा अद्याप सुरू केलेली नाही. अतिदक्षता विभागात दहा बेडची व्यवस्था आहे. त्यानंतर दाखल होणाऱ्या रुग्णांना जनरल वॉर्डात ठेवले जाते. मात्र त्यांच्यावर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा नाही. डायलेसिस मशिनचे देखभाल करणारे तंत्रज्ञ अपुरे आहेत. दवाखान्याच्या आवारात ठिकठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. रुग्णांचे बिल कमी करून देण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातच एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. काही दिवसांपूर्वी परिसरातील हटविलेल्या टपऱ्या पुन्हा त्याच ठिकाणी सुरू झाल्या आहेत.

००

कोट

'गोरगरिबांचा दवाखाना म्हणून गेली कित्येक वर्षे सीपीआरमध्ये उपचार केले जातात. मात्र वाढत्या रूग्ण संख्येच्या तुलनेत अपुऱ्या सुविधा आहेत. गर्दी असलेल्या विभागांसाठी जादा कर्मचारी आणि वाढीव इमारतीची गरज आहे.

अनिल कदम, अशासकीय सदस्य, सीपीआर

००

दृष्टीक्षेपात ...

दररोज ९०० रूग्ण दाखल

लिफ्टची सोय नाही

औषधांचा तुटवडा

अपुरे कर्मचारी

एजंटाचा सुळसुळाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर पाणी योजना

$
0
0

फोटो

..............

गळती काढण्याचे काम युध्दपातळीवर

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाच्या वतीने कणेरीवाडीजवळून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी गुरुत्ववाहिनी बदलण्याचे हे काम गुरुवार सायंकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. रात्री पंप सुरू करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे. ही गळती काढल्याने दिवसाला दहा लाख लिटर पाण्याची बचत होऊन तेरा गावांना अधिक पाणी मिळणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी गुरुत्ववाहिनी बदलण्याचे काम मंगळवारी सकाळी सुरू झाले आहे. त्यामुळे तेरा गावांत दोन ते तीन दिवस पाण्याची टंचाई जाणवणार आहे. या दुरुस्तीच्या कामाची कल्पना ग्रामपंचायतींना आधीच देण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र. ६ कडून वळीवडे, गांधीनगर,मुडशिंगी, उचगाव, उचगावपैकी मणेरमळा, शांतीनगर, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव,नेर्ली - तामगाव, कणेरी दत्तनगर, मोरेवाडी,पाचगाव या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. नव्याने टाकण्यात येत असलेल्या गुरुत्ववाहिनीला मूळच्या पाईपला दोन्ही बाजू जोड देण्यात येणार असून गळती थांबल्याने दिवसाला दहा लाख लिटर पाणी वाचणार आहे. त्यामुळे तेरा गावांना जादा पाणी मिळणार असून पाण्यासाठीची वणवण थांबण्यास मदत होणार आहे. ही गळती काढल्याने मोठी लोकसंख्या असणाऱ्या गावांनी जादा मागणी केली तर मागणीनुसार अतिरिक्त पाणी देणेही शक्य होणार आहे.

कोट

'युद्धपातळीवर काम सुरू असून काही ठिकाणी जमीन कडक लागल्याने थोडा उशीर होत आहे. गुरुवारी सायंकाळी काम पूर्ण होऊन रात्री पंप चालू करण्यात येतील, त्यामुळे शुक्रवारपासून नियमित व सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल.

एन बी भोई ,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

.................

फोटो : राहुल मगदूम

फोटो ओळ :

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाकडून कणेरीवाडीजवळून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी गुरुत्ववाहिनी बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानोळीत शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

$
0
0

दुकॉलमी फोटो

...........

दानोळीत शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

आमदार हाळवणकर यांना दानोळीकरांचे आव्हान

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

दानोळी (ता.शिरोळ) येथील वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह १४९० जणांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांनी धर्मगोंडा पाटील या प्रतीकात्मक शेतकऱ्याची अंत्ययात्रा काढली. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारही करण्यात आले. योजना अडवून तोडपाणी करण्याचा उद्योग वारणाकाठच्या दहा पुढााऱ्यांनी केला आहे, असा आरोप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी केला होता. हाळवणकर यांनी त्यांची नावे जाहीर करावीत अन्यथा माफी मागावी, अशी मागणी माजी उपसरपंच रावसाहेब भिलवडे यांनी यावेळी केली.

इचलकरंजी शहराच्या अमृत योजनेचा शुभारंभ दोन मे रोजी करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच दानोळीतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. अमृत योजनेच्या उदघाटनाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेचे कर्मचारी,सरकारी अधिकारी व पोलिस फौज फाटा दाखल झाला होता. यानंतर १४९० जणांवर जयसिंगपूर पोलिसात सरकारी कामात अडथळा व अधिकाऱ्यांशी झोंबाझोंबी केली असा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ धर्मगोंडा पाटील या प्रतिकात्मक शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्याच्या अंत्ययात्रेस उपस्थित रहा, असे आवाहन वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी केले होते.

धनवडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामस्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रेत सहभागी झाले. गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अनेकांनी अक्षरश: हंबरडा फोड़ला. प्रतीकात्मक धर्मगोंडा पाटील यांच्यावर वारणा नदीकाठी जैन समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महादेव धनवडे यांनी हंबरडा फोडला. छत्रपती शिवाजी चौकात शोकसभा झाली.

यावेळी बोलताना माजी उपसरपंच रावसाहेब भिलवडे म्हणाले, 'इचलकरंजी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत वारणा बचाव कृती समितीच्या नेतृत्वास आमदार सुरेश हाळवणकर यांनी 'टगे' असे संबोधत टीका केली आहे. योजना आडवायची त्यात तोडपाणी करायचे असा उद्योग वारणाकाठच्या दहा जणांच्या टोळीने सुरू केला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. आमदार हाळवणकर यांनी त्या दहा जणांची नावे जाहीर करावीत अन्यथा माफी मागावी अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करू.'

महादेव धनवडे म्हणाले, 'आम्ही स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात याबद्दल ग्रामीण भागातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवराज पाटील यांच्या संचालकपद अपात्रतेची मंगळवारी सुनावणी

$
0
0

अपात्रतेबाबत सुनावणी

कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या संचालकपद अपात्रतेची सुनावणी मंगळवारी (ता. १५) होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये पाटील यांच्यावतीने अॅड. लुईस शहा यांनी वकीलपत्र दाखल केले. प्रभारी जिल्हा उपनिबंधक तथा हातकणंगलेचे तालुका निबंधक मनोहर माळी यांच्यासमोर सुनावणी झाली. भूविकास बँकेच्या थकीत कर्जाला सहजामिनदार असल्याने पाटील यांचे संचालकपद अपात्र ठरवण्याची मागणी तक्रारदार सुरेश देसाई यांनी केली होती. तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक, विभागीय निबंधक यांच्याकडे संचालकपद अपात्र ठरल्यानंतर पाटील यांनी अपात्रतेला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहपात्रा उद्या कोल्हापुरात

$
0
0

फोटो जोडला आहे

कोल्हापूर : बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीनबंधू मोहपात्रा शुक्रवारी (ता. ११) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी मोहपात्रा यांच्या हस्ते हॉटेल वृषाली येथे बँकेच्या विविध कर्ज योजनांतर्गत कर्जदारांना मंजुरीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यांच्या सोबत बँकेचे कार्यकारी संचालक नीलम दामोदरन, महाप्रबंधक अमित रॉय तसेच मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे सात महाप्रबंधक उपस्थित राहणार आहेत. कर्जप्रमाणपत्र वाटपानंतर चर्चासत्र होणार असून यामध्ये नागपूर, विदर्भ, पुणे, सोलापूर व रत्नागिरी विभागाचे विभागीय व्यवस्थापक व उपविभागीय व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. यावेळी बँकेच्या शाहूपुरी शाखेत सोने तारण कर्ज योजनेच्या विशेष दालनाचे उद्घाटन मोहपात्रा यांच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी पेटकर

$
0
0

कोल्हापूर : सागरमाळ परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी दिलीप पेटकर व उपाध्यक्षपदी डॉ. सूर्यभान पवार यांची निवड झाली. सेवा संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब झाले. सचिवपदी दिलीप जाधव, खजानिसपदी विलास तवार, सदस्यपदी उमा पानसरे सर्जेराव भांदिगरे, सूर्यकांत आबिटकर, संजीव पवार, महादेव मोरे, वसंत पाटील, मंगला पाटील यांचा समावेश आहे.

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारी’ पाणी थकबाकी १६ कोटींची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी कार्यालयाच्या पाणीपट्टीचा बोजा हाताबाहेर चालला आहे. त्याचा फटका महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला बसला आहे. ९७ सरकारी कार्यालयाकडे वर्षानुवर्षाची सोळा कोटी ९४ लाखांची पाणीपट्टी थकीत आहे. महापालिकेकडून वारंवार नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र या नोटिसांना अनेक कार्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. बिल लाखात आणि त्यावरील दंड व्याजासह थकबाकी कोटीत, अशी स्थिती आहे. आता ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरवर्षी मार्चच्या अखेरीस वसुली मोहिमेला वेग येतो. उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग गतिमान होतो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे रहिवासी, औद्योगिक, व्यापारी व सरकारी कार्यालयाची मिळून तब्बल २७ कोटी ५१ लाखांची पाणीपट्टी थकीत आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने नव्या वर्षापासून थकीत वसुलीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन आणि थकीत पाणीपट्टीधारकांवर कारवाई सुरु केली आहे. विशेषत: सरकारी कार्यालयाकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ९७ कार्यालयात मिळून ३२४ नळ कनेक्शन आहेत. ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत २९५ नळ कनेक्शनची पाणीपट्टी थकीत असल्याचा अहवाल आहे.

थकबाकीधारकांमध्ये पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, सीपीआर, बीटी कॉलेज, टेलिफोन ऑफिस, रेल्वे, तार ऑफिस, कळंबा कारागृह, अशा कार्यालयांबरोबर शहराजवळच्या बारा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींकडे ६ कोटी ८२ लाख थकबाकी आहे. यामध्ये चिंचवाड, गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी, हणमंतवाडी, कळंब्याचा समावेश आहे.

पोलिस व जिल्हा प्रशासनही थकबाकीदार

पोलिस प्रशासनाकडे शहरात विविध ठिकाणी ४३ नळकनेक्शन आहेत. मूळ पाणी बिल ८९ लाख आहे. मात्र प्रशासनाकडून त्या बिलाची पूर्तता न झाल्यामुळे विलंब आकार, सांडपाणी अधिभार, त्यावरील दंड मिळून एक कोटी दहा लाखांची आकारणी होऊन जवळपास दोन कोटींची थकबाकी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित बारा नळकनेक्शन आहेत. थकबाकी आणि व्याजाची आकारणी मिळून १४ लाखापर्यंत आकडा पोहचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३४ नळ कनेक्शन, जिल्हा परिषदेकडे १८ नळकनेक्शनची नोंद आहे.

....................

महापालिका दरवर्षी पाणीपट्टी भरण्याविषयी कळविते. यापूर्वी काही कार्यालयाच्या नळ कनेक्शन खंडीत केली होती. प्रशासनाकडून डिसेंबरमध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही कार्यालयाकडे वर्षानुवर्षे थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. पाणी बिलात सवलत, विलंब आकार माफीबाबत सरकारची कोणतीही योजना नाही.

प्रशांत पंडत, अधीक्षक पाणीपट्टी वसुली विभाग

..........

सरकारी कार्यालयाकडील नळ कनेक्शन ३२४

थकीत बिल असलेल्या नळ कनेक्शन २९५

सरकारी कार्यालयाकडील थकबाकी १६ कोटी ९४ लाख रुपये

प्रमुख कार्यालये आणि थकबाकी

सीपीआर तीन कोटी

पोलिस प्रशासन दोन कोटी

रेल्वे एक कोटी १६ लाख

सार्वजनिक बांधकाम ३२ लाख ५९ हजार

जिल्हाधिकारी कार्यालय १४ लाख रुपये

जिल्हा परिषद ७ लाख नव्वद हजार रुपये

बारा ग्रामपंचायती सहा कोटी ८२ लाख

.......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या दिवशी ७५ जणांच्या बदल्या

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी बदलीच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी ७५ बदल्या झाल्या. दोन दिवसात एकूण १८२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. जि. प. मध्ये अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, सभापती सर्जेराव पाटील, अंबरिश घाटगे, शुभांगी शिंदे यांच्यासह खातेप्रमुखांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. आरोग्य विभागाच्या ५१, एकात्मिक बालविकास सेवा विभाग ३, बांधकाम विभाग १४, पशुसंवर्धन विभागातील १४ जणांच्या बदल्या झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images