Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवाजी पूल...रस्ता...

$
0
0

पान ५ मेन

......................

पर्यायी पुलाबाबत मुंबईत सकारात्मक चर्चा

राज्य सरकारच्या हालचाली, पालकमंत्र्यांची विधी व न्याय विभागासोबत बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील रखडलेल्या पर्यायी पुलाच्या बांधकामाला मंजुरी कशा पध्दतीने मिळवता येईल या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत चर्चा केली. पुलाच्या बांधकामासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

जून २०१५ पासून पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. पर्यायी पुलाचे बांधकाम शंभर टक्के पूर्ण न होऊ शकल्याने जुन्या शिवाजी पुलावर वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. जुन्या पुलाचे आयुष्यमान संपल्यामुळे त्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. 'आपत्कालीन बाब'म्हणून पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु करता येईल यासंदर्भात जिल्हाधिकारी सुभेदार यांनी यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. व्यवस्थापन विभागाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थानचा अभिप्राय महत्वाचा ठरणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी मंगळवारी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत कायदेशीर बाबींबाबत चर्चा केली.

पावसाळ्याच्या अगोदर पर्यायी पुलाचे बांधकाम पूर्ण करावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समिती आक्रमक झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अत्यावश्यक बाब म्हणून पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु करावे यासाठी समितीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. ११ मे पर्यंत बांधकामाला सुरुवात न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला ठाळे ठोकण्याचा तसेच शिवाजी पूल व राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे.

पर्यायी पुलाची जागाही पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. शंभर मीटर क्षेत्रात बांधकाम करता येत नसल्यामुळे पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली आहे. गेली तीन वर्षे पूल अर्धवट स्थितीत आहे. जुन्या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. पावसाळ्यात पुन्हा गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील जागेत बांधकामाला मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्र्यासह, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. लोकसभा व मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र राज्यसभेचे कामकाज होऊ न शकल्याने मंजुरी मिळाली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अत्यावश्यक बाब म्हणून पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळावी, राष्ट्रपतींनी खास वटहुकूम काढावा असे विविध पर्याय सुचविले जात आहेत. मुंबईतील बैठकीत वेगवेगळ्या मतप्रवाहांचा विचार, कायदेशीर बाबींबाबत चर्चा झाली.

...............

जुन्या पुलाची किरकोळ दुरुस्ती दहा दिवसात

'जुन्या शिवाजी पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल बांधकाम विभागाला उपलब्ध झाला आहे. जुन्या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, जुन्या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करावी असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. त्यानुसार सध्या जुन्या पुलावरुन अवजड वाहनांना मनाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम कार्यालय कोल्हापूर विभागातर्फे पुलाच्या किरकोळ दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात दुरुस्तीच्या किरकोळ कामाला सुरुवात होईल,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना

$
0
0

भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय सेवा योजनाही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत नियमित कार्यक्रम आणि विशेष शिबिर या दोन उपक्रमांसाठी विद्यापीठांना दरवर्षी केंद्र सरकारतर्फे विद्यार्थी संख्या मंजूर करण्यात येते. केंद्राने राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठनिहाय प्रवर्ग संख्या निश्चित केली आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ११.८ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ९.४ तर इतर गटासाठी ७८.८ अशी विभागणी केली आहे.

राज्यात नियमित कार्यक्रमासाठी ३,२७,०००

यामध्ये अनुसूचित जातीसाठी ३८,६७०

अनुसूचित जमातीसाठी ३०,८००

इतरांसाठी मिळून ३,२७,७००

.........

विशेष शिबिरासाठी स्वयंसेवक संख्या १,६३,८५० संख्या

............

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

एकूण २४,६००

अनुसूचित जाती २,९०४

अनुसूजित जमाती १,२५४

इतर प्रवर्ग २०,४४२

....................

विशेष शिबिर स्वयंसेवक संख्या १२,३००

..........

सोलापूर विद्यापीठ एकूण ९,२००

अनुसूचित जाती १,०८६

अनुसूचित जमाती ४८६

इतर ७,६२८

विशेष शिबिर स्वयंसेवक संख्या ४,६००

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसिमियादिन...

$
0
0

लोगो : थॅलेसेमिया दिन

००००

थॅलेसेमियामुक्तीसाठी धडपडतोय 'बरकत'

'संवेदना फाउंडेशन'च्या माध्यमातून जाणीवजागृती, उपचारासाठी विनामोबदला मार्गदर्शन

Sachin.patil1@timesgroup.com

कोल्हापूर : मुलगी झाल्याचा आनंद त्यांच्या घरात होता. बाप आणि मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध अगदी जवळचे समजले जातात. सातव्या महिन्यांत त्यांच्या मुलीचे शरीर पांढरे पडले, रक्ताच्या तपासण्या झाल्यावर त्या लहानगीला थॅलेसेमिया हा रक्तासंबंधी दुर्धर आजार असल्याचे निदान झाले आणि वडिलांसह पन्हाळकर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. कोल्हापुरातील वर्षानगरातील बरकत पन्हाळकर यांनी थॅलेसेमियाशी दोन हात करत आपल्या लाडक्या अलिजाला या आजारातून बाहेर काढले. आता ती साडेतीन वर्षांची आहे.

थॅलेसेमिया आजारामध्ये शरीरात रक्त तयार होणे बंद होते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाणात जास्त आढळते. थॅलेसेमिया असलेल्या मुलाला दर तीन-चार आठवड्याला रक्त दिल्याशिवाय ते जगू शकत नाही अशी स्थिती असते. कोल्हापूर जिल्ह्यात थॅलेसेमिया रुग्णांची नोंद असलेली संख्या १९० आहे. बरकत कुटुंबीयांची कन्या अलिजा पन्हाळकर सात महिन्यांची असताना २०१४ ला तिला थॅलेसेमियाचे निदान झाले. तिचे वडील बरकत यांना तिच्या उपचारासाठी झगडावे लागले. कारण या आजाराबद्दल अजूनही समाजात तितकीशी जाणीव जागृती नव्हती. थॅलेसेमियावरील उपचारासाठी रक्तपेढ्यांनी मोफत रक्तपुरवठा करावा असा नियम असूनही त्यांना रक्त मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या प्रसंगातून धडा घेत त्यांनी थॅलेसेमियावर काम करण्यासाठी 'संवेदना फाउंडेशन' सुरू केले. आज या फाउंडेशनच्या माध्यमातून जाणीव जागृती आणि उपचारासाठी विनामोबदला योग्य मार्गदर्शन केले जाते. सध्या सीपीआर रुग्णालयात डेकेअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.

काय आहे थॅलेसेमिया?

थॅलेसेमिया एक अनुवंशिक रक्‍त विकार आहे. ज्याच्यामुळे रुग्नांना नियमित रक्‍त संचरण करावे लागते. कारण रुग्णाचे शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही. रक्तातील तांबड्या पेशी नाहीशा झाल्याने रक्तातील हिमोग्लोबीन कमी होते. अल्फा आणि बीटा हे थॅलेसेमियातील दोन प्रकार आढळतात. आजाराच्या तीव्रतेनुसार थॅलेसेमिया मेजर, इंटरमीडिया आणि मायनर अशी त्याची वर्गवारी केली जाते.

थॅलेसेमियाची लक्षणे

बीटा थॅलेसेमिया 'मेजरची' लक्षणे लहान बाळांत वयाच्या ३ ते ६ महिन्यांदरम्यान दिसू लागतात. यात बाळाचे वजन घटू लागते. त्यांच्या पोटात अन्न, दूध राहत नाही. उलट्या, जुलाब सुरू होतात. त्यातून सहज जंतुसंसर्ग होतो. बाळाची वाढ खुंटते व ते सतत आजारी असल्यासारखे दिसतात. त्यांना ठराविक कालांतराने रक्त‌ दिले गेले नाही किंवा रक्त देण्यास वेळ लागला तर तीव्र स्वरूपाचा पंडुरोग (अॅनेमिया) दिसून येतो. अशावेळी ते नि:स्तेज, पिंगट होतात. त्यांना कमालीचा थकवा जाणवतो, त्यामुळे ते सुस्त होतात व त्यांना सतत गळून गेल्यासारखे वाटते. त्यांना प्रचंड धाप लागते. तसेच त्यांचा वाढीचा वेग मंदावतो.

या कराव्यात चाचण्या...

पती किंवा पत्नी किंवा कुटुंबात थॅलेसेमिया रुग्ण असल्यास होणाऱ्या अपत्याची गर्भावस्थेत असताना दुसऱ्या महिन्यात एचपीएलसी (इलेक्ट्रोफोर्सीस-एचबीए २) ही रक्ताची तपासणी करून घ्यावी. लग्नाअगोदर तरुण-तरुणींनी ही तपासणी करणे गरजेचे ठरते.

०००००

'थॅलेसेमिया मेजर' या प्रकारात समावेश होणाऱ्या व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. दर ४ ते ६ आठवड्यांनी त्यांना रक्त द्यावे लागते. अशाप्रकारे नियमित रक्त न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. तसेच या रुग्णांना जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांना नियमित रक्तपुरवठा झाल्यास ते चांगल्या पद्धतीने जगू शकतात. बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट ही एकमेव उपचार पद्धती उपलब्ध आहे. वेळेत रक्त तपासणी केल्यास या आजारावर आपण मात करू शकतो.

डॉ. वरुण बाफना, रक्तविकार तज्ज्ञ

थॅलेसेमियावरील उपचार मोफत असले तरी त्याची माहिती अनेकांना नसल्याने लोक कुठेही पैसे खर्च करून उपचार घेतात त्यामुळे सामन्यांचे आर्थिक नुकसान होते. अशा रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणे असा नियम असतानाही काही ब्लड बँका पैसे घेऊन लूट चालवतात. अशा ब्लड बँकांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. जाणीवजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर चालू आहे. तरुणांनी याकामी पुढे येण्याची गरज आहे.

बरकत पन्हाळकर, संवेदना मेडिकल फाउंडेशन

०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा शिबिर ११ मे पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील उमेद फाउंडेशनतर्फे ११ ते १३ मे या कालावधीत राज्यस्तरीय युवा उमेद शिबिराचे आयोजन केले आहे. पन्हाळा तालुक्यातील जाधववाडी येथे शिबिर होणार आहे. ११ मे रोजी व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे, अनुवादिका सोनाली नवांगुळे मार्गदर्शन करणार आहेत. १२ मे रोजी शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे दीपक नागरगोजे आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख परिषदेला मार्गदर्शन करतील. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत प्रकाश आमटे मार्गदर्शन करणार आहेत. मान्यवरांशी संवाद, योगा, श्रमसंस्कार, गटचर्चा, परिसंवाद आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे प्रकाश गाताडे, दिगंबर पाटील, प्रकाश म्हेत्तर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांची होतेय कुचंबणा

$
0
0

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग मुलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या फिजिओथेरपी कक्षाला आठ महिन्यांपासून फिजीओथेरपीस्ट नाही. त्यामुळे पालक व सेवकच मुलांकडून व्यायाम करवून घेत आहेत. कक्षामध्ये व्यायामाचे अद्ययावत साहित्य असूनही त्याचा दिव्यांगांना योग्य लाभ होत नाही. अर्धवेळ फिजीओथेरपीस्ट नेमण्यासाठी महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला अजूनही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कक्षाचे कामकाज पर्यायी फिजीओथेरपीस्टवर चालवले जात आहे.

प्राथमिक शिक्षण मंडळाच्या उत्तरेश्वर पेठ येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात दिव्यांग मुलांसाठी फिजीओथेरपी कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांचे व्यायामाचे अद्ययावत साहित्यही घेण्यात आले. या साहित्याच्या माध्यमातून मुलांना व्यायाम प्रकार शिकवून त्यांचे स्नायू बळकट करण्यात येतात. गेल्या वर्षभरात या कक्षाचा मुलांना चांगला लाभ होत असल्याचे दिसून आल्यानंतर दिव्यांग मुलांची संख्या वाढत गेली. सध्या १५० मुले या कक्षामध्ये येत असतात. एका दिवशी सर्व मुलांसाठी व्यायामाची सुविधा देता येत नसल्याने प्रत्येक दिवशी मुलांची बॅच देण्यात आली आहे. दररोज किमान २० ते २५ मुले या कक्षात व्यायामाचा लाभ घेतात. या कक्षासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर पूर्णवेळ फिजीओथेरपीस्ट नेमण्यात आले होते. त्यांची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. या जागी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दुसरा फिजीओथेरपीस्ट नेमलेला नाही. परिणामी या मुलांच्या नियमित व्यायामावर मर्यादा आली आहे.

ज्या दिव्यांग मुलांकडून चालणे व काही वस्तू उचलण्याच्या क्रिया शक्य आहेत, त्या मुलांच्या स्नायूंना या कक्षामधील व्यायामामुळे ताकद मिळून त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी सातत्याने व्यायाम आवश्यक असल्याचे पालकांचे मत आहे. बदली झालेल्या फिजीओथेरपीस्टच्या जागी नवीन नेमणूक झालेली नाही. त्याबाबत प्रस्ताव पाठवला असला तरी त्यावर काहीच हालचाल झालेली नाही. यामुळे आयुक्तांनी प्रयत्न करून पर्याय म्हणून महापालिका व जिल्हा परिषदेतील फिजीओथेरपीस्टना या कक्षात येऊन मुलांना प्रशिक्षण देण्यास सांगितले आहे. त्यानुसार एक दिवस जिल्हा परिषदेचे तर दोन दिवस महापालिकेचे फिजीओथेरपीस्ट काम पाहतात. दोघेही आपापल्या मूळ जबाबदारी सांभाळत या कक्षामध्ये अर्धवेळ सेवा देत आहेत. यातून आठवड्यातील तीन दिवस फिजीओथेरपीस्ट उपलब्ध असल्याचे प्रशासनाला समाधान आहे. पण या कक्षाला आठवडाभर फिजीओथेरपीस्टची गरज आहे.

अर्धवेळसाठी प्रस्ताव

जिथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पूर्णवेळ फिजीओथेरपीस्ट दिला नसेल, त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानांतर्गत अर्धवेळ नेमणूक करता येते. त्यासाठी चाळीस हजार रुपयांची स्वतंत्र तरतूद केली जाते. त्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण समितीकडून पाठवला आहे. तो मंजूर झाल्यास तातडीने तिथे अर्धवेळ तरी फिजीओथेरपीस्ट नेमता येणार आहे. त्यामुळे हा कक्ष आठवडाभर योग्य मार्गदर्शनाखाली चालेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलरंग निसर्गचित्र’ कार्यशाळा १८ मेअखेर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

चित्रकार संजय शेलार यांनी नवोदित चित्रकार व चित्रकलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व हौशी चित्रकारांसाठी ९ ते १८ मे या कालावधीत 'जलरंग निसर्गचित्र' कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत शेलार प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनही करणार आहेत. रंकाळा बसस्थानकनजीक, रंकाळवेश तालीम साई मंदिर, तिसरा मजला येथे कार्यशाळा होणार आहे. जलरंगातील बारकावे व हाताळण्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. सहभागी चित्रकारांकडून प्रत्यक्ष सरावावर भर असणार आहे. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन केलेले निसर्गचित्र व स्टुडिओत केलेले निसर्गचित्र यासंबंधी मार्गदर्शन केले जाईल. नवोदित चित्रकारांना जलरंगातील नवीन तंत्रे अवगत व्हावीत, त्यांची कलेतील समज समृद्ध व्हावी, हा मुख्य उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांची आर्थिक लूट सुरूच

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दीडपटापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे. मात्र खासगी आरामबस ट्रॅव्हल्सकडून प्रतिप्रवासी मनमानी पद्धतीने आर्थिक लूटमार सुरू आहे. भाडेदर निश्चितीसाठी प्रादेशिक परिवहन समितीची (आरटीए) बैठकीची अद्याप प्रतीक्षा आहे. कोल्हापूरहून जाणाऱ्या प्रमुख मार्गावर रेल्वे, एसटीच्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतुकीचे दर तिप्पट, चौपट आहेत. ऑनलाइन बुकिंगचे प्रति प्रवासी भाडेदरही तिप्पट आहे.

विविध मार्गावरील एसटी तिकीट दरापेक्षा कमाल दीडपट भाडे आकारण्याची सवलत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिली आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांची तिकीट दराची होणारी लूट थांबविण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कमाल भाडेदर निश्चित करण्याचे जाहीर केले. मात्र खासगी आराम बस ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी पद्धतीने प्रति प्रवासी भाडेदर आकारणी सुरू आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत एसटी, रेल्वे हे दोन महत्वाचे घटक आहे. कोल्हापूर ते मिरज, सांगली, पुणे, मुंबईसह लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वांधिक स्वस्त रेल्वेचा प्रवास आहे. एसटीचा शिवशाही, निमआराम, साधी एसटीतून प्रवास परवडणारा आहे. मात्र या दोन्ही प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतुकीचे दर दुप्पट, तिप्पट आहे. शिवशाहीचा कोल्हापूर मुंबई मार्गावरील दर ६३० रुपये आहे. दीडपट आकारणी केल्यास हा दर ९४५ रुपये प्रतिप्रवासी आकारण्याची मुभा असू शकते. मात्र, प्रतिप्रवासी एक हजारपासून ३९०० रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. कोल्हापुरात सुमारे ३५० खासगी ट्रॅव्हल्सधारक आहेत. मिनी ट्रॅव्हल्सची संख्याही दोनशे आहे. एसी, नॉन एसी, स्लीपर, सेमी स्लीपरची सुविधा आहे. मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज ४० हजार प्रवाशांचे भारमान आहे. कोल्हापूर ते पुणे, मुंबई मार्गावरील रेल्वेतून दररोज ७० हजारांहून अधिक जण प्रवास करतात. एसटी आणि रेल्वेला पर्याय म्हणून खासगी वाहनांतून दररोज दहा ते पंधरा हजार प्रवास करतात. रेल्वे आणि एसटीकडे न गेलेला आयता प्रवासी वर्ग मिळत असल्याने मनमानी पद्दतीने विविध मार्गावरील भाडे आकारणी केली जात आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. मुंबई ते कोल्हापूर मल्टी अॅक्सल सेमी स्लिपरचा दर प्रतिप्रवासी ३००० ते ३९०० रुपये तिकीट दर आहे. कोल्हापूर ते मुंबई प्रवासाठी १५०० रुपये प्रतिप्रवासी तिकीट दर आहे. गर्दीच्या काळात राज्यातील बस, ट्रॅव्हल्ससह खासगी प्रवासी वाहनांकडून भाडेदरात दुप्पट, तिप्पट वाढ केली आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांची गरज पाहून विविध मार्गांवरील तिकीटांचे दर मनमानी पध्दतीने आकारले जात आहेत. कोल्हापूर जाणाऱ्या मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे दर चौपट झाले आहेत. एसटी दराच्या तुलनेत दीडपटापेक्षा अधिक दर ऑनलाइन असूनही आरटीओ कडून कारवाई केली नाही. केवळ मोटार वाहन निरीक्षकांकडून ट्रॅव्हल्स कंपन्यांना सूचना दिल्या जात आहेत.

०००

शिवशाहीचे प्रमुख मार्गांवरील दर

कोल्हापूर-मुंबई ६३०

कोल्हापूर-बोरिवली ६५८

कोल्हापूर-हैदराबाद ९१७

कोल्हापूर-नाशिक ७१४

कोल्हापूर-पणजी (सेमी लक्झरी) ३०१

कोल्हापूर-रत्नागिरी २२७

००

खासगी ट्र्रॅव्हल्सचे दर

कोल्हापूर-मुंबई १४००

कोल्हापूर-बोरिवली १५००

कोल्हापूर-हैदराबाद २५००

कोल्हापूर-नाशिक २२००

कोल्हापूर-पणजी १०००

कोल्हापूर-रत्नागिरी ५००

०००००००००००००

रेल्वे (जनरल)

मिरज ३० रुपये

सांगली ३५ रूपये

पुणे ११०

मुंबई १५५

००

वातानुकूलित (मुंबई)

एसी टू टायर ११५०

एसी थ्री टायर ८५०

००

वातानुकूलित पुणे

एसी टू टायर ८५०

एसी थ्री टायर ५५०

००

एसी, नॉन एसी, स्लीपर, आसन व्यवस्थेसह असलेली सेमी स्लीपर या वाहनांच्या प्रकारानुसार दर निश्चित करावे. गर्दी नसलेल्या काळात दोनशे रूपयांतही ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांना नेतात. मात्र गर्दीच्या काळात हाच दर अडीज ते तीन हजार रुपये आकारला जातो. गर्दीचा मे महिना संपल्यानंतर भाडेदर निश्चित केल्यास प्रवाशांना काहीही फायदा होणार नाही.

हेमंत आराध्ये, प्रवासी

००

खासगी ट्रॅव्हल्स वाहतूक करणाऱ्या चालक मालकांची मागणी आणि विविध मार्गावर सुरु असलेले दर याची माहिती मागिवली आहे. आटीएची बैठक येत्या काही दिवसांत होत आहे. या बैठकीत त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.

डॉ. डी. टी. पवार, आरटीओ

००

प्रवासी आणि आरटीओ या दोन्ही यंत्रणाकडून ट्रॅव्हल्स चालकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे विविध मार्गावरील दर फलक तत्काळ निश्चित करावेत.

सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष, जिल्हा आराम बस वाहतूक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी देवीचा उत्सव सोहळा आजपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कळंब्याचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या उत्सवाला बुधवारपासून (ता. ९) सुरुवात होत आहे. आठवडाभर सुरू राहणाऱ्या सोहळ्यात व्याख्यान, कीर्तन, सोंगीभजन, सांस्कृतिक कार्यक्रमसह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात्रेसाठी लहान मुलांची खेळणी गावात दाखल असून यात्रेचे स्वरूप आले आहे.

आठवडाभराच्या कालावधीत देवीची नित्य आकर्षक पूजा, होमवहन, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम होतील. बुधवारी सकाळी देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर सायंकाळी ह. भ. प. कृष्णात कुंभार महाराज (सरुड) यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी सद्गुरु संगीत सोंगी भजन मंडळ कंदलगाव व शुक्रवारी साके येथील शिवशंभो संगीत सोंगी भजनी मंडळ यांचा कार्यक्रम होईल. शनिवारी (ता. १२) सोलापूर येथील अॅड. अर्पणा रामतीर्थकर यांचे 'महिला' विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी (ता. १३) सकाळी महालक्ष्मी देवीची पालखी कात्यायनी देवीच्या भेटीसाठी प्रस्थान करेल. सायंकाळी पुणे येथील सौरभ करडे यांचे 'धर्मवीर छत्रपती संभाजीराजे' यांच्या जीवनावर व्याख्यान होईल. सोमवारी (ता. १४) सकाळी धार्मिक विधी होतील. रात्री मुख्य पालखी सोहळ्यानंतर दत्तसेवा संगीत सोंगी भजन मंडळ कार्यक्रम सादर करणार आहे. मंगळवारी (ता. १५) 'लेणं महाराष्ट्राच' हा शाहीर आझाद नायकवडी यांचा मराठमोळा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दबावतंत्रामुळे वारणाकाठी खदखद

$
0
0

पान ६ मेन

दुकॉलमी फोटो

ऑन दि स्पॉट ... लोगो

...........................

दबावतंत्रामुळे वारणाकाठी खदखद

जशास तसे उत्तर देण्याचा ग्रामस्थांचा इशारा, आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली

अजय जाधव, जयसिंगपूर

इचलकरंजी शहराची अमृत योजना कार्यान्वित झाल्यास भविष्यात वारणाकाठच्या गावांना पाणीटंचाई भेडसावेल या शक्यतेमुळे नदीकाठच्या गावांचा विरोध कायम आहे. शिरोळ तालुक्यातील दानोळी हे गाव या आंदोलनाचे केंद्र बनले आहे. गेल्या बुधवारी येथे वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यानंतर १४९० जणांवर गुन्हे दाखल झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृष्णा नदीतून पाणी योजना असताना इचलकरंजीकरांचा वारणेच्या पाण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वारणेच्या पाण्याचा थेंबही देणार नाही, प्रसंगी जशास तसे उत्तर देवू अशी ग्रामस्थांची भूमिका असून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.

इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी ७० कोटीची योजना मंजूर झाली. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अमृत योजनेच्या कामाचा ऑनलाइन प्रारंभही झाला. मात्र अद्याप या योजनेचे काम सुरू नाही. या योजनेचे जलउपसा केंद्र दानोळी येथे होणार आहे. दोन मे रोजी या योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार असल्याने दानोळीसह वारणा काठचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. दगड टाकून तसेच टायर्स पेटवून रस्ते अडविल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर प्रश्‍न निर्माण झाला अन् अधिकाऱ्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. दरम्यान यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा योजनेस विरोध केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तब्बल १४९० जणांवर गुन्हा दाखल केला.

वारणा काठच्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्याने दानोळीसह वारणा काठी खदखद आहे. मुळातच चांदोली धरणाची क्षमता तीन टीएमसीने कमी आहे. वारणा काठच्या गावांना उन्हाळ्यात पाणीप्रश्‍न भेडसावतो. इचलकरंजी शहरास पाणी दिले तर आणखी भिषण स्थिती निर्माण होईल, नदीकाठच्या ७० गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी ग्रामस्थांना भीती आहे. यामुळेच आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांवरून पाणी योजना असताना वारणेच्या पाण्याचा अट्टाहास कशासाठी असा वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा प्रश्‍न आहे. कृष्णा योजनेला गळती लागल्याने पाणी प्रश्‍न निर्माण होतो. यामुळे ही योजनाच सक्षम करावी असेही त्यांचे मत आहे.

अमृत योजनेचा प्रश्‍न चर्चेने सोडविण्यासाठी यापूर्वी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या. मात्र यानंतरही योजनेस विरोध कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्णत्वास जावू न देण्याचा निर्धार वारणा बचाव कृती समितीने केला आहे. दोन मे रोजी दानोळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून अमृत योजनेच्या कामास प्रारंभ करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे सरकार व प्रशासनाविरूध्द दानोळी तसेच परिसरातील गावामध्ये संताप व्यक्त होत आहे. इचलकरंजी येथील लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला हाताशी धरून दबातंत्राचा वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. यामुळेच आंदोलन तीव्र करण्याबरोबरच त्याची व्यापकता वाढविण्यासाठी वारणाकाठचे ग्रामस्थ एकवटले आहेत. अमृत योजनेसाठी दानोळी येथे वारणा नदीकाठी जलउपसा केंद्राची जागा अद्याप निश्‍चित नाही. यामुळे दंडुकशाही खपवून घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. इचलकरंजी शहरासाठी एक टीएमसी आरक्षित पाणी उचलले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र भविष्यात हा पाणी उपसा तीन टीएमसीपर्यंत होईल अशी ग्रामस्थांत भीती आहे.

आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी वारणाकाठच्या ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या आंदोलनात आता ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील ग्रामस्थांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. तर शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी या आंदोलनास उघडपणे पाठिंबा दिल्याने आंदोलनास बळ मिळाले आहे. शिरोळ तालुक्यातील गावांनीही कडकडीत बंद पाळून वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. वारणेचे पाणी दबावतंत्राने नेण्यात येणार असेल तर पाण्यासाठी प्रसंगी छातीवर गोळया झेलण्याची तयारी ग्रामस्थांनी ठेवली आहे. अमृत योजनेच्या विरोधातील आंदोलनाचे दानोळी हे केंद्र बनले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असली तरी पाण्यासाठी अबालवृध्दांची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

...............

चौकट

..तर शिरोळ तालुक्याला फटका

दानोळी बंधाऱ्यातून पुढे जाणारे वारणेचे पाणी हरिपूरजवळ कृष्णा नदीत मिसळते. वारणेच्या या पाण्याचा लाभ जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड या शहरांसह शिरोळ तालुक्यातील अन्य गावांना होतो. इचलकरंजी शहराची अमृत योजना कार्यान्वित झाल्यास वारणेचे पाणी कृष्णा पात्रात मिसळणार नाही. परिणामी शिरोळ तालुक्यातील गावांना सांगली शहरातील शेरी नाल्यामुळे दुषित झालेले कृष्णा नदीचे पाणी प्यावे लागेल, अशीही नागरिकांना भीती आहे.

............................................

आंदोलनास मिळतेय बळ

कोल्हापूर व इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी दुषित होते. शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रक्रियेशिवाय हे पाणी प्यावे लागते. वारंवार आंदोलने करूनही पंचगंगा प्रदुषणाबाबात प्रशासन गांधारीची भूमिका घेते. प्रदुषण करणाऱ्या घटकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आता इचलकरंजी शहरासाठी थेट वारणा नदीतून अमृत योजना झाल्यास पंचगंगा नदीच्या प्रदुषणात आणखी वाढ होईल, या शक्यतेमुळे वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनाला शिरोळ तालुक्याचे बळ मिळत आहे.

............................

कोट

पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा

'इचलकरंजी शहराचा वारणेच्या पाण्यावर हक्क नाही. बळाचा वापर करून अमृत पाणी योजना राबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असला तरी त्यांना वारणेचे थेंबही पाणी देणार नाही. इचलकरंजीच्या नागरिकांना शुध्द पाणी मिळू नये हा आमचा उद्देश नाही. सध्या कृष्णा नदीत मिसळलेले वारणेचे पाणी त्यांना मिळते. पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना मदत करू.

- महादेव धनवडे, अध्यक्ष वारणा बचाव कृती समिती

...............

आंदोलनाची व्याप्ती वाढविणार

इचलकरंजी पालिकेस वारणा नदीच्या उगमापासून हरिपूरच्या संगमापर्यंत पाणी उपसा करू देणार नाही. त्यांनी पंचगंगा शुध्दीकरणासाठी प्रयत्न केल्यास अन्य गावांनाही शुध्द पाणी मिळेल. हक्काच्या पाण्यासाठी आम्ही भूमिका मांडत असताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आता कोणत्याही परिस्थितीत वारणेचे पाणी देणार नाही. सांगली जिल्ह्यातील सांगाव येथे ११ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.

- मानाजीराव भोसले, सचिव वारणा बचाव कृती समिती

..............

आता जशास तसे उत्तर

इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेतून करण्यात येणारा पाणी उपसा कागदावर एक टीएमसी असून प्रत्यक्षात तीन टीएमसी होणार आहे. वारणाकाठचा शेतकरी या षडयंत्रास फसणार नाही. अमृत योजना कार्यान्वित झाल्यास वारणाकाठच्या गावांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होईल. पाणी योजना राबविली जावू नये यासाठी हात जोडून विनंती केली, मात्र प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले. आता जशास तसे उत्तर दिले जाईल.

-रावसाहेब भिलवडे, माजी उपसरपंच, दानोळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून मोफत शिबिर

$
0
0

कोल्हापूर : येथील स्वप्नदीप फाउंडेशनतर्फे १० मेपासून सात दिवसांचे मोफत इंग्रजी 'बोला सोप्या पद्धतीने' या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने कशी शिकावी, त्यासाठीच्या क्लृप्त्या शिकविण्यात येणार आहेत. उमा टॉकीजजवळील सुशीला बिल्डिंगमधील फिक्स आय कार्यालयात शिबिर होईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंद्रेनगरात घरफोडी

$
0
0

बोंद्रेनगरात घरफोडी

कोल्हापूर टाइम्स टीम

बोंद्रेनगरातील बाळासाहेब इंगवलेनगर येथे चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. उमेश भागोजी आडुळकर (वय २८, रा. बाळासाहेब इंगवलेनगर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.

आडुळकर यांच्या घरी कोणी नसल्याने चोरट्याने रविवारी मध्यरात्री घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, एक सोन्याची अंगठी, रोख २२०० रुपये असा माल लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले शिष्यवृत्ती रकमेत घोटाळा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील व्यंकटराव हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, दहावी परीक्षा फी परत देतेवेळी संबंधित विद्यार्थ्यांची सही घेतली नाही. तालुक्यासाठी आलेल्या रकमेच्या वाटपाचा ताळमेळ लागलेला नाही, असे प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट झाले. त्याप्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापक सी. आर. देसाई, लिपिक एस. बी. पोवार यांच्यावर ठपका ठेवला आहे. हे देाघेही अद्याप कारवाईविना मोकाट आहेत. त्यांच्यावरील कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप तक्रारदार अजयकुमार देशमुख यांचा आहे.

समाजकल्याण विभागातर्फे हायस्कूलमधील मागासवर्गीय विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय परीक्षा फीसुद्धा परत मिळते. उपस्थित भत्ता दिला जातो. व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. आर. देसाई यांनी या रकमेत भ्रष्टाचार केला आहे. विद्यार्थ्यांच्या बनावट सह्या करून पैसे हडप केले. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी अमृता भालेकर, ज्योती कांबळे, सुरेश कांबळे यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. त्याची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सेक्युलर मूव्हमेंट संघटनेचे जिल्हा संघटक अजयकुमार देशमुख यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे गेल्या वर्षी केली. त्याची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश पुणे विभागाचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.

समाजकल्याण निरीक्षक एस. ए. गायकवाड, उपशिक्षणाधिकारी एस. बी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एम. मानकर यांच्या चौकशी समितीने शाळेला भेट देऊन तक्रार अर्जातील विद्यार्थिनींना भेटून जबाब नोंदवून घेतला. चौकशी अहवाल तयार केला. त्यात शिष्यवृत्तीची रक्कम समारंभपूर्वक वाटप केलेली नाही, पैसे दिल्यानंतर विद्यार्थ्यांची सही त्यावेळचे मुख्याध्यापक देसाई, लिपिक पोवार यांनी घेतलेली नाही असे म्हटले आहे. शिष्यवृत्तीचे एक लाख ७८ हजार ४८० रुपये गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले होते. लेखापरीक्षणात त्या रकमेच्या वाटपाचा ताळमेळ लागलेला नाही. यामुळेच मुख्याध्यापक देसाई, लिपिक पोवार यांनी कर्तव्यात हयगय केल्याचे दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे घोटाळा झाल्याचा संशय बळावला आहे. त्यातील देसाई ३१ जून २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्यावर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही.

----------------

दिरंगाई शिक्षणाधिकाऱ्यांची अन्...

प्राथमिक चौकशी अहवालात स्वयंस्पष्टता, नेमका निष्कर्ष नसल्याने फेरचौकशी करून अहवाल पाठवला जाईल, असे तत्कालीन समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी पुणे उपायुक्तांना पत्राद्वारे कळवले होते. दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी फेरचौकशी करून अहवाल देण्यास स्मरणपत्र देऊनही दिरंगाई केली. परिणामी विभागीय आयुक्तांनी विद्यमान प्रभारी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना नुकतीच नोटीस काढली आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे समाजकल्याण, माध्यमिक शिक्षण प्रशासनात खळबळ माजली आहे.

००००

व्यंकटराव हायस्कूलमधील शिष्यवृत्ती, परीक्षा फी गैरव्यवहारासंबंधी तक्रारीच्या पहिल्या चौकशी अहवालात तत्कालीन मुख्याध्यापक देसाई, लिपिक दोषी आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. फेरचौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. त्यांना त्वरित अहवाल देण्याचा आदेश दिले आहेत.

किरण लोहार, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

०००००

शिष्यवृत्ती, परीक्षा फी वाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी झाली आहे. फेरचौकशीसाठी वेळोवेळी माध्यमिक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून विलंब झाल्याने नोटीस आली आहे. आता पुन्हा फेरचौकशीचा अहवाल द्यावा, असे पत्र दिले आहे.

चंद्रकांत सूर्यवंशी, प्रभारी, समाज कल्याण अधिकारी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् पवार सभागृहात अडकतात तेव्हा...!

$
0
0

सातारा: केंद्र आणि राज्याच्या राजकारणातील अनेक अभेद्य किल्ले भेदणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मात्र साताऱ्यात एका सभागृहात अडकून पडण्याची वेळ आली. सभागृहाचा दरवाजा अचानक लॉक झाल्याने पवार यांना बाहेर पडणे कठीण झाले. शेवटी दहा मिनिटांच्या खटपटीनंतर कार्यकर्त्यांनी दरवाजाचा लॉक तोडला आणि पवार यांची सुखरूप सुटका केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेण्यासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीतील एका सभागृहात त्यांनी पत्रकारांशी अर्धा तास दिलखुलास गप्पा मारल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्यासाठी दाखविलेली उत्सुकता ते देशात भाजपविरोधात निर्माण होत असलेल्या वातावरणापर्यंतच्या विषयावर पवार यांनी मतं मांडली.

64091097

यावेळी पत्रकारांनी सभागृह खचाखच भरून गेल्याने सभागृहाबाहेर काही आमदार थांबले होते. पत्रकार परिषद संपता संपता काही पत्रकारही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आत जाण्यासाठी सभागृहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा काही उघडला गेला नाही. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही बरीच खटपट करत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही दरवाजा उघडणे जमले नाही. स्वत: शरद पवार यांनीही दरवाजा उघडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. या सर्व खटपटीत दहा मिनिटे उलटून गेली. शेवटी कार्यकर्त्यांनी या दरवाजाचा लॉक तोडून टाकला आणि पवारांची सुखरूप सुटका केली. हा सर्व प्रकार घडत असताना पवार यांच्या चेहऱ्यावर मात्र मिश्कील भाव होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

attack: वाळू माफियांचा तहसीलदार, तलाठ्यावर हल्ला

$
0
0

पंढरपूर

सीना नदीवर सुरु असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेले माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे आणि तलाठी ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर आज पहाटे वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात तहसीलदार पडदुणे यांच्यासह तलाठी बोराडे जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शी येथे उपचार सुरु आहेत.

आज पहाटे अडीचच्या सुमारास मुंगशी गावाजवळ सीना नदीपात्रात अवैध वाळू उपशावर तहसीलदारांच्या पथकाने धड टाकली. तेथे वाळू घेऊन चाललेल्या एका ट्रॅक्टरने थेट तहसीलदारांच्या गाडीला पाहून ट्रॅक्टर शेजारील उसाच्या शेतात घुसवला. तरीही तहसीलदारांच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरु करताच चालकाने थेट तहसीलदारांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक मारली. यावेळी पथकातील ६ तलाठी आणि चालकाने प्रसंग सावधान ओळखून गाडीतून उडी मारली. या हल्ल्यात तहसीलदार पडदुणे आणि एका तलाठ्याला जोरदार मार लागला असून तहसीलदारांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

अशाही जखमी अवस्थेत या चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने मारपीट करून तेथून पलायन केले. या घटनेची खबर कुर्डुवाडी पोलिसांना देण्यात आली. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात वाळू माफियांच्याविरोधात प्राणघातक हल्ला करणे, तसेत वाळूची चोरी करणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

या हल्ल्यात तहसील पथकातील गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. वाळू माफियांवर प्रशासनाने सुरु केलेल्या कडक कारवाईनंतर आता उद्दाम माफियांनी थेट तहसीलदार आणि सरकारी यंत्रणेला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आता यावर कडक उपाययोजना न केल्यास या वाळू माफियाना आवरणे अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये उमटू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता- राजलक्ष्मी पाटील

$
0
0

राजलक्ष्मी पाटील

कोल्हापूर

आयसोलेशन हॉस्पिटल जवळील गणपतराव पाटीलनगर येथील राजलक्ष्मी भालचंद्र पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १०) सकाळी ९ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी चोरटे अटकेत, सव्वादोन लाखांच्या ८ दुचाकी जप्त

$
0
0

(फोटो आहेत)

दोघा दुचाकी चोरट्यांना अटक

सव्वादोन लाखांच्या आठ दुचाकी जप्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी पकडले. दोन्ही चोरट्यांकडून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. मंगेश नंदकिशोर अग्रवाल (वय ३२, रा. कसबेकर हॉलशेजारी, लक्षतीर्थ वसाहत) आणि संतोष सिद्धू पुजारी (३३, रा. संघर्ष चौक, वडणगे, ता. करवीर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.

शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधीक्षक संजय मोहिते यांनी गस्त वाढवण्याच्या सूचना सर्वच पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. यानुसार मंगळवारी (ता. ८) सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजित तिप्पे यांच्या पथकाकडून शिंगणापूर नाका परिसरात गस्त सुरू होती. यावेळी मंगेश अग्रवाल हा तरुण संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वत:कडील दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने चार दुचाकी आणि इक मोपेड चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील चार, तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत चोरटा संतोष पुजारी हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांना मिळाली होती. यानुसार निकम यांच्यासह गुन्हे शोध पथकातील हेडकॉन्स्टेबल अशोक पाटील, पोलिस नाईक निवास पाटील, अमोल अवघडे, गौरव चौगुले यांच्या पथकाने मंगळवारी रात्री सुभाषनगरमध्ये जाऊन संशयिताची माहिती काढली. संशयित पुजारी हा दुचाकी घेऊन जवाहरनगर चौकातून शेंडा पार्ककडे गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून पुजारी याला शेंडा पार्क परिसरात पकडले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे लक्षात येताच त्याला अटक करून अधिक चौकशी केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा तीन दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली असून, पोलिसांनी चोरीच्या तिन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.

अटकेतील दोन्ही चोरट्यांना कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी मिळाली आहे. दोन्ही चोरट्यांकडून सव्वादोन लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कनेक्नश तोडणी मोहीम

$
0
0

दुर्लक्षामुळे उघडपणे पाणीचोरी

दिवसभरात ३५ कनेक्शन तोडली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात मुख्य कनेक्शनला फाटा देऊन तसेच व्हॉल्वमधून पाणी चोरण्याचे प्रकार चोरटी नळ कनेक्शन शोध मोहिमेतून उघड होत आहेत. अनेक ठिकाणी फरशी, काँक्रीट करुन पाइपलाइन लपवल्या जात आहेत. या प्रकारातून उघडपणे पाणीचोरी करण्यासही नागरिकांना भीती वाटत नाही असेच दिसून येत आहे. बुधवारी महापालिकेने शिवाजी पेठ, दौलतनगर, शाहूनगर, कनाननगर परिसरातील ३५ कनेक्शन तोडली. अनेक भागात मीटर नसलेली कनेक्शन असून त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे.

सोमवारपासून पाणीपुरवठा विभागाने पाच पथकांच्या माध्यमातून सुरु केलेल्या मोहिमेमध्ये आतापर्यंत १७१ चोरटी कनेक्शन तोडण्यात आली आहेत. यामध्ये काही नागरिक बेमालूमपणे पाणीचोरी करत असल्याचे आढळून आले. तर अनेक ठिकाणी उघडपणे पाइप लावून पाणी चोरत असल्याचे दिसून येत आहे. बिलाच्या थकबाकीपोटी यापूर्वी काही पाणी कनेक्शन तोडली आहेत. घरापासून काही अंतरावर तोडलेली पाइप दिसते. पण त्याच पाइपला रबरी पाइप जोडून थेट घरामध्ये पाणी घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकार टाळण्यासाठी खड्डे काढून मुख्य पाइपलाइनजवळ कनेक्शन तोडले जात आहे. त्याला बराच वेळ लागतो. तसेच रिकाम्या जागेमध्ये कनेक्शन असल्यास पाइपच्या मुळापर्यंत खोदाई करण्यास अडचण येत नाही. पण डांबरी रस्त्यांखालून असलेली कनेक्शन तोडण्यास अडथळा येत आहे. बुधवारी तीन पथकांना एकत्र करुन राजारामपुरी परिसरातील शाहूनगर, दत्त गल्ली, पंत बाळेकुंदी मंदिर, पाथरवट गल्ली येथे मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २२ चोरटी कनेक्शन तोडली. कनाननगर परिसरातील सहा तर शिवाजी पेठ परिसरातील गांधी मैदान, ब्रह्मेश्वर बाग, आयरेकर गल्ली येथील सात कनेक्शन तोडली.

.....

फौजदारी गुन्ह्यांशिवाय चोरी थांबणार नाही

पाणी चोरी सापडल्यानंतर कनेक्शन तोडले तरी मुख्य पाइपलाइनपासूनची पाइप शिल्लक राहते. त्या पाइपला रबरी पाइप लावून बिनधास्तपणे पाणी घ्यायचे असा प्रकार सर्रास सुरु आहे. पाणी चोरण्याबाबत नागरिकांना भीती वाटत नाही असेच दिसून येत आहे. त्यामुळे पाणी चोरी करताना कुणी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय चोरी थांबणार नाही असेच पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. यासाठी प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. काही राजकीय पातळीवरुन पथकांवर दबाव येत आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्तही देण्याची गरज आहे.

......

अधिकृत कनेक्शनधारक

घरगुती

९४,३१६

व्यावसायिक

१७४१

औद्योगिक

११८८

....

कनेक्शनधारकांची वॉर्डनिहाय संख्या

ए वॉर्ड २९,०९१

बी वॉर्ड १९,५०७

सी वॉर्ड ४७०८

डी वॉर्ड ५८२६

ई वॉर्ड ३५,८६८

....

सरकारी कार्यालयांची कनेक्शन

३२४

ग्रामीण भागातील कनेक्शन

४२२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तनवाणींचा दावा नामंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी वाईन्सला महापालिकेच्या परवाना विभागाने लावलेले सील काढून मिळावे म्हणून दिवाणी न्यायालयात दाखल केलेली याचिका नामंजूर केली, अशी माहिती महापालिकेचे वकील प्रफुल्ल राऊत यांनी दिली. महापालिकेकडून सील लावण्यात येऊ नये म्हणूनही यापूर्वी दाखल केलेली तनवाणींची याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळली होती.

हायकोर्टाच्या निर्णयानुसार महापालिकेच्या हद्दीत असलेल्या जागेवर तनवाणी वाईन्स आहे. त्यांनी महापालिकेचा व्यवसाय परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे दुकान सील का करण्यात येऊ नये याची नोटीस महापालिकेने दिली होती. त्या नोटीसच्या विरोधात तनवाणी यांच्यावतीने दिवाणी न्यायालयात धाव घेऊन सील करण्यास मनाई व्हावी म्हणून मागणी केली होती. पण न्यायालयाने तो दावा फेटाळला. त्यानंतर सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर सर्व जागेवरील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. त्यानंतर तनवाणी यांच्यावतीने २७ एप्रिल रोजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर वंदना जोशी यांच्याकडे याचिका सादर केली होती. याबाबतची माहिती देताना महापालिकेचे वकील राऊत म्हणाले, ' महापालिकेने अनाधिकाराने तनवाणी वाईन्सला सील केले आहे. आमचा व्यवसाय शहराच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे महापालिकेने लावलेले सील काढून मिळावे अशी मागणी तनवाणी यांनी केली होती. त्याबाबत ४ व ५ मे रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायाधीश वंदना जोशी यांनी बुधवारी तनवाणी यांची मागणी नामंजूर केली. महापालिकेच्या हद्दीबाबतच्या वादातून तनवाणी वाईन्सच्यावतीने व्यवसायाला संरक्षण मिळावे यासाठी दोन याचिका दाखल केल्या होत्या. पण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलेल्या या प्रकरणात दोन्ही वेळा तनवाणी यांची मागणी मान्य झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरूण पुरोहित निधन

$
0
0

डॉ. अरूण पुरोहित

कोल्हापूर

बेलबाग येथील डॉ. अरूण पुरोहित वय ७५ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. अंत्यसंस्कार गुरूवारी १० मे होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पशिक्षितांचा पैसेवाल्यांना गंडा

$
0
0

(आरोपींचे फोटो डेस्कला आहेत)

चार सिंगल फोटो

.............

अल्पशिक्षितांचा पैसेवाल्यांना गंडा

झीप कॉइनच्या आमिषातून कोट्यवधींची फसवणूक

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर;

झीप कॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भामट्यांनी गुंतवणूकदारांसह कर्मचाऱ्यांना लॅपटॉप गिफ्ट दिले आहेत. याशिवाय मुंबईत अलिशान हॉटेलमध्ये पार्टी देऊन देश-विदेशात सहल घडवण्याचे आमिषही दाखवले होते. आठवी ते दहावी पास असलेल्या अल्पशिक्षितांनी उच्चशिक्षित आणि पैसेवाल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. गुंतवणूकदारांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्या भामट्यांनी चैनीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचेही तपासात समोर येत आले.

गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला तब्बल १५ टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयाचा गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळीला कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अटकेतील संजय तमन्ना कुंभार (वय ४० रा. शिरढोण ता. शिरोळ), राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४५ रा. हुपरी ता. हातकणंगले), अनिल भीमराव नेर्लेकर (वय ४५ रा. हुपरी) आणि बालाजी गणगे (३२, रा. पुणे) या चौघांचेही शिक्षण जेमतेम आठवी ते दहावीपर्यंत झाले आहे. ऑनलाइन गुंतवणुकीची मोजकी माहिती घेऊन त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये बिट कॉईनच्या धर्तीवर झीप कॉईन ही वेबसाइट सुरू केली. गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. यासाठी पुण्यातील बालाजी गणगे याची मदत घेतली.

कर्मचाऱ्यांनी मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करावे यासाठी झीप कॉइनचे प्रमुख संजय कुंभार आणि राजेंद्र नेर्लेकर या दोघांनी कर्मचाऱ्यांना मोठ्या भेटवस्तूंचे आमिष दाखवले. झीप कॉईनमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांना घेऊन आलेल्या आठ ते दहा कर्मचाऱ्यांना बक्षीसरुपात लॅपटॉप दिले आहेत. याशिवाय गुंतवणूकदारांनाही किमती बक्षीसांसह देश-विदेशातील सहलींचेही आमिष दाखवले. यासाठी सुरुवातीला कोल्हापुरातील नामांकित हॉटेल्समध्ये सेमिनार घेतले. गुंतवणूकदारांना खूष करण्यात कोणतीही कसर यांनी सोडली नाही. पन्नासहून अधिक गुंतवणूकदारांना झीप कॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुंभार आणि नेर्लेकर या दोघांची मेहेरनजर होती. झीप कॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळतो असा भास निर्माण करण्यासाठी कुंभार आणि नेर्लेकर यांनी कर्मचाऱ्यांसह गुंतवणूकदारांना मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. गुंतवणूकदारांची राहण्याची सोय करून त्यांना मुंबईची सफर घडवली. यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. याच पार्टीत काही गुंतवणूकदारांसह कर्मचाऱ्यांना लॅपटॉप गिफ्ट देण्यात आले.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग झाला असून, उपअधीक्षक राजेंद्र शेडे हे अटकेतील चौघांची कसून चौकशी करीत आहेत. दोन कोटींची फसवणूक झाल्याच्या आठ तक्रारी सध्या पोलिसांकडे आल्या आहेत. झीप कॉइनच्या माध्यमातून किमान २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अद्यापही काही गुंतवणूकदार भीतीपोटी तक्रार देण्यास समोर आलेले नाहीत, त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

.......................

चौकट

अटकेतील चौघेही अल्पशिक्षित

झीप कॉइन वेबसाईटची निर्मिती करणारे सर्वच संशयित आरोपी अल्पशिक्षित आहेत. अटकेतील चौघांचे शिक्षण केवळ आठवी ते दहावी पास असे आहे. त्यांच्याकडे वेबसाईटचे तांत्रिक ज्ञानही पुरेसे नाही. केवळ दिखाऊपणा आणि जाहिरातबाजीच्या जोरावर त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. पुणे आणि मुंबईतील काही तंत्रज्ञांची मदत घेऊन त्यांनी मार्केटिंगचे फंडे वापरत गुंतवणुकदारांना आकर्षित केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. गुंतवणूकदार मात्र उच्चशिक्षित असूनही ते अल्पशिक्षितांच्या भूलभुलैय्याला बळी पडले.

चौकट

चैनीसाठी लाखोंची उधळपट्टी

झीप कॉइनचे मुख्य सूत्रधार संजय कुंभार, राजेंद्र नेर्लेकर आणि अनिल नेर्लेकर या तिघांनी गुंतवणूकदारांच्या पैशांची उधळपट्टी केली. बहुतांश पैसे अलिशान हॉटेलमधील पार्ट्यांवर खर्च केले आहेत. यातील दोघांनी किंमती कारची खरेदी केली आहे. पोलिसांनी या दोन्ही कार जप्त केल्या आहेत. गुंतवणूकदारांचा पैसा हातात येताच संशयितांचे राज्यासह परराज्यातही अनेक ठिकाणी दौरे वाढले होते. याशिवाय सोन्याचे दागिने आणि स्थावर मालमत्तेतही गुंतवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

................

पूर्वार्ध

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images