Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाहीर राजू राऊत यांना डीलिट

$
0
0

फोटो

..............

शाहीर राजू राऊत यांना डीलिट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सामाजिक, पर्यावरणीय चळवळींना बळ देण्यासाठी लेखणी व डफ हाती घेऊन जागर मांडणाऱ्या शाहीर पुरुषोत्तम तथा राजू कृष्णाजी राऊत यांना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाने डीलिट देऊन सन्मानित केले. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवारी वरळी सी फेस येथील सिल्व्हर ओक वास्तू येथे डीलिट प्रदानाचा कार्यक्रम झाला. माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांच्या हस्ते आणि कुलगुरु डॉ. शिरीष पाटील, मॉरिशसचे उच्चायुक्त जगदीश्वर गोस्क यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहीर राऊत यांचा गौरव झाला.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ कोल्हापूरच्या ऐतिहासिक, कला व संस्कृतीचा वैभवी वारसा जतन करण्यासाठी धडपडणाऱ्या राऊत यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला, अशा शब्दांत मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्या पुढाकारातून १९९७ मध्ये कानपूरमध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी झाली होती. त्यावेळी शाहीर राऊत यांनी 'शिव शाहू पोवाडा पथक' सुरु केले. त्यानंतर गेल्या २१ वर्षात जवळपास २००० पानांचे लिखाण, देशातील नऊ राज्यांमध्ये व देशाबाहेरील मॉरिशसमध्ये महाराष्ट्राची लोककला व पोवाड्यांच्या माध्यमातून जागर मांडला. १५०० हून अधिक शाहिरीचे कार्यक्रम सादर केले आहेत. शाहिरी,चित्रकला,शिल्पकला,छायाचित्रण,तसेच इतिहास व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डीलिट पदवीने सन्मानित केले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सुनिता, कन्या चैत्रा व सहकारी अजित आयरेकर, बाळासाहेब पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

.......................

कोट

'चित्रकार व वडील कृ. दा. राऊत यांच्या प्रेरणेने लहानपणापासूनच शाहिरीचे धडे घेतले. लोककला व शाहिरीच्या माध्यमातून शिव-शाहू विचारांचा जागर केला. डॉ. डी.वाय. पाटील यांनी माझ्या कलेचा गौरव केला. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी डीलिटने सन्मानित केले, ही माझ्यासाठी सर्वाधिक भाग्याची गोष्ट आहे.

शाहीर राजू राऊत

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅट्रॉसिटी दाखल करा

$
0
0

कोल्हापूर : मध्यप्रदेशात पोलिस भरतीसाठी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी झाली. याप्रसंगी एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांच्या छातीवर जातीचा उल्लेख केला. हा प्रकार निंदनीय असून, संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागातर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. अनुसूचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष दुर्वास कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. यामध्ये ओंकार नारकर, प्रमोद बेडेकर, किरण बेडेकर, संतोष गवंडी, शिवाजी आवळे, अजय व्हलार, आशुतोष गुदगे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागातर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वरिष्ठश्रेणी, निवडश्रेणी, बढती मान्यता व पेन्शन याकामी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दिरंगाई केली जाते. त्याचा नाहक शिक्षकांना त्रास होत असल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे आंदोलन झाले. आंदोलनात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, प्रा. व्ही. पी. पांचाळ, प्रा. एस. जी. कदम, प्रा. एस. एस. पाटील, पृथ्वीराज कदम, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. व्ही. डी. काळे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षात घुसून मोबाईल तिघा चोरट्याकडुन मोबाईल, रोख रक्कम लंपास

$
0
0

तिघा चोरट्यांनी

मोबाइल, पैसे लुटले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यू शाहूपुरी येथे सासने मैदान रस्त्यावर गोव्याहून आलेल्या एकाचा मोबाइल व रोख रक्कम तिघा चोरट्यांनी लुटली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अनिल मनोहर शेलार (वय ५४, रा. बळवंत अपार्टमेंट, ताराबाई पार्क) हे गोव्यात नोकरीस आहेत. शनिवारी रात्री गोव्याहून ते साडेअकरा वाजता कोल्हापुरात आले. मध्यवर्ती बसस्थानकातून रिक्षाने ते ताराबाई पार्क येथील घरी आले. रिक्षाचालकाला भाडे देऊन घरी गेल्यावर त्यांना मोबाइल हॅन्डसेट रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. मोबाइल घेण्यासाठी शेलार परत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. तेथील अन्य रिक्षा चालकांनी जुनेद आदम शेख (वय २५, रा. शिवाजी चौक, सोमवार पेठ) याच्याशी संपर्क साधला. रिक्षाचालक शेख याने शेलार यांना सासने मैदानाजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार शेलार हे सासने मैदान परिसरात आले. रिक्षात विसरलेला मोबाइल शेलार ताब्यात घेत असताना पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरुन आलेल्या तिघाजणांनी रिक्षात घुसून शेलार व शेख यांना धमकी देत मोबाइल व रोख रक्कम लुटली. त्यानंतर तिघेही संशयित अॅक्टिव्हावरुन पळून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा परिषद - अन्यथा रस्त्यावरील लढाईसाठी समाज सक्षम

$
0
0

दोन फोटो आहेत.

...........

रस्त्यावरील लढाईसाठी समाज सक्षम

मराठा समाज प्रतिनिधी परिषदेत राज्य सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढण्यात आले. मोर्चानंतर सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला, पण अद्याप आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली नाही. मोर्चानंतर दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारने आढावा घेवून तत्पर अंमलबजावणी करावी, अन्यथा मराठा समाज रस्त्यावरील लढाईसाठी सक्षम असल्याचा इशारा मराठा समाज प्रतिनिधींच्या परिषदेत देण्यात आला. २१ मे रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाची समिती कोल्हापुरात येणार असून समितीला लाखो स्वाक्षऱ्यांची निवेदने आणि आरक्षणासाठी लागणारे आवश्यक पुरावे सादर करण्याचा निर्णयही परिषदेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे होते.

अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवन येथे मराठा प्रतिनिधी परिषद व मराठा-कुणबी दाखला मार्गदर्शन शिबिर पार पडले. अध्यक्षीय भाषणात बोलताना कोंढरे म्हणाले, 'दरवर्षी १२ लाख विद्यार्थीं उत्तीर्ण होतात. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळत नसल्याने सर्व समाजात आर्थिक आणि रोगजारा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे जातीच्या चौकटीतून पाहत असल्याने जातीय तेढ निर्माण होत आहे. याला सोशल मीडिया कारणीभूत असून यातून प्रसारीत होणारे संदेश अवैचारीक व मतभेद निर्माण करणारे आहेत. लोकशाहीमध्ये आरक्षणाची योग्यरितीने अंमलबजावणी होत नसल्याने ७२ टक्क्यांपर्यंत आरक्षण पोहोचले असून यामध्ये दोष असल्याने द्वेष निर्माण होत आहेत. यासाठी मराठा समाजाची प्रशासकीय बाबींमधील असाक्षरता कारणीभूत आहे. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मागण्या मांडल्या पाहिजेत. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेतील आयुधांचा वापर केला पाहिजे. भविष्यात मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि शेतकरी सक्षम करण्यासाठी लढा सुरुच ठेवला जाईल.'

महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून स्वयंरोजगारासाठी दहा ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळत असल्याचे सांगितले जात आहे, पण प्रत्यक्षात अद्याप कोणालाही कर्ज मिळालेले नाही. '

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले, 'शेतीचे तुकडीकरण, नोकरी नाही, उद्योगाचा वारसा नसल्याने समाजाची स्थिती ढासळत आहे. अशी परिस्थिती भविष्यात उद्भवून नये, यासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. समाजाच्या काही मागण्या मान्य झालेल्या असल्या, तरी अद्याप आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे.'

परिषदेमध्ये मोडी अभ्यासक वसंत सिंघन, अमित आडसुळे, राजेंद्र मोरे तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील, सुनील पाटील, रणजीत जाधव, अवधूत पाटील, स्वप्नील जाधव यांच्यासह सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. स्वागत एकनाथ जगदाळे यांनी केले. शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन शरद साळुंखे यांनी केले. ठराव वाचन शिरीष जाधव यांनी केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.

...........

चौकट

कार्यक्रमस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

परिषदेपूर्वी पोलिस उपधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कार्यक्रमस्थळी मोठी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत परिषद संपेपर्यंत उपस्थित होते. याचा संदर्भ देत कोंढेरे म्हणाले, 'एवढ्या पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता नव्हती. चांगले काम करताना त्रास होतोच.अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला होता, त्याप्रमाणे आम्हालाही धमक्या येत आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. '

....................

चौकट

परिषदेमध्ये झालेले ठराव

मराठा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती फंड निर्माण करावा.

कोल्हापुरात सारथीचे उपमुख्य कार्यालय हवे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत सुलभता आणावी.

समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्याचा पुरस्कार करावा.

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा.

समाजाने कालानुरुप बदल स्विकारावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरीच ठरवतो कृषीमालाचा दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कृषिमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर सरकार किंवा कृषिमूल्य आयोग ठरवत नाहीतर तो शेतकरीच ठरवतो. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कृषिमूल्य आयोगाने ठरवलेल्या केंद्रातील कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या उत्पादन खर्चाच्या नोंदी प्रामाणिकपणे ठेवाव्यात,' असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे राज्य अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी केले. पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील आयोगाच्या केंद्राला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पटेल म्हणाले, 'कृषिमूल्य आयोगाची राज्यात १५० हून अधिक केंद्रे आहेत. यामध्ये पाडळी खुर्द गावाचा समावेश आहे. येथील दहा शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन आणि खर्चाच्या ताळेबंद ठेवला जातो. राज्यात अनेक केंद्रांमध्ये चुकीच्या नोंदी ठेवल्या जात असल्याने कृषिमालाला उत्पादन खर्चानुसार दर देण्यास अडचण येत आहे. कृषिमालाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांनी केंद्रांतर्गत येणाऱ्या नोंदी योग्यप्रकारे ठेवाव्यात. नोंदीमध्ये शेताची मशागत किंवा नांगरणी कधी केली, त्यासाठी किती खर्च झाला, मशागतीनंतर बियाणे कोणते लावले, त्यासाठी किती खर्च आला, मजूर किती घेतले, वीज किती वापरली, फवारणी, कीटकनाशक तसेच खतांची मात्रा याबाबतची सर्व माहिती अधिकाऱ्यांच्या आयोगाच्या नोंदवहित नोंद करावी लागते. राज्यातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती दिलीच जात नाही. अधिकारीही या योजनांबाबत माहिती देत नाहीत. मात्र, नोंदवही त्याने स्वत:च्या अंदाजानेच भरलेली असते. याचा थेट परिणाम कृषिदर निश्चित करण्यावर होतो. यातून शेतकऱ्यांचे नूकसान होते.'

शेतमालाला आधारभूत किंमत ठरवताना शेतकऱ्यांचा सहभागाच केंद्रस्थानी मानला जात असताना शेतकऱ्यांनीही सजगपणे विचार केला पाहिजे. शेतकरी दुसऱ्यासाठी राबतो, पण स्वत:चे हक्क जाणून घेत नाही, यातच त्याची मोठी चूक आहे. ही चूक भविष्यात करू नका. कृषिमूल्य आयोगाचे काम यापूर्वी आलबेलच सुरू होते. आता तसेच होणार नसून शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येची दखल घेतली जाणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, कृषी सहायक सीताराम पाटील व त्यांनी शेतकऱ्यांच्या ठेवलेल्या नोंदीची चौकशी केली. तसेच, शेतकऱ्यांसमोरच हे कृषी अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतात का?, गावात वेळेत येतात का?, शेतकऱ्यांशी संवाद साधता का? अशी विचारणा पटेल यांनी शेतकऱ्यांना केली. आर. के. पाटील, नारायण जाधव, आर. डी. पाटील, कृष्णात पाटील, हिम्मत तानुगडे, विजय पाटील यांनी चर्चेत सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

यावेळी सरपंच मंगल तानुगडे, करवीर पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील, जी. डी. पाटील, पाडुरंग पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरी पोलिसांची तरुणाला बेदम मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल

$
0
0

शाहूपुरी पाोलिसांची

दुकानदाराला बेदम मारहाण

परस्परविरोधी गुन्हे दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल अनुग्रह ते दाभोळकर कॉर्नर या परिसरात शाहुपुरी पोलिसांनी मार्शल उर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. दुसरी गल्ली, राजारामपुरी) या किराणा दुकानदाराला बेदम मारहाण केली. तर मार्शल गर्दे व त्यांच्या वीस पंचवीस साथीदारांनी पोलिसांना मारहाण केल्याची परस्परविरोधी फिर्याद पोलिसांनी दिली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

हॉटेल अनुग्रह येथे मार्शल गर्दे व त्याचा मित्र उमेश साळुंखे हे जेवायला आले होते. मार्शल लघुशंकेसाठी हॉटेलच्या बाहेर आला. याचवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे गुंडाविरोधी पथकातील संदीप जाधव हे त्यांचे मित्र दया पाटील यांच्यासमवेत आले. मार्शल याला रस्त्यावर मोबाइल पडलेला दिसला. त्याने संदीप जाधव यांना तुमचा मोबाइल आहे का? अशी विचारणा केली असता, संदीप जाधव यांनी 'मी पोलिस आहे. तू मला का विचारतोस?', असे म्हणत वाद घातला व जाधव यांनी मार्शलला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, मार्शल याचे हॉटेलमधील मित्रही मारहाणीच्या ठिकाणी आले व संदीप जाधव व त्यांच्या मित्राच्या अंगावर धावून गेले. संदीप जाधव यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याला घटनेची माहिती देवून पोलिस बोलावून घेतले. तीन ते चार पोलिस हॉटेल अनुग्रहजवळ आले. जाधव व अन्य पोलिसांनी मार्शलला अनुग्रह हॉटेलपासून दाभोळकर कॉर्नरपर्यंत फायबर काठीने चोप देत रस्त्यांवरुन फिरवले. मार्शलच्या मित्रांनी त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी संदीप जाधवसह दोन पोलिस व इतर तीन अनोळखी व्यक्तींच्याविरोधात मार्शल गर्दे याने फिर्याद दिली .

दरम्यान, संदीप जाधव यांनीही मार्शल गर्दे व अन्य २० ते २५ व्यक्तींच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,जाधव हे मध्यवर्ती परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यांचे मित्र माजी हॉकी खेळाडू दया पाटील हे हॉकी पंचांसह अनुग्रह हॉटेलमध्ये भोजनासाठी आले होते. हॉटेलच्या बाहेर जाधव मित्रासह अन्य मित्रांची वाट पहात असताना हॉटेलच्या बाहेरील रस्त्यावर काही लोक हातात काठ्या व दगड घेऊन भांडण करत होते. भांडण थांबवण्यासाठी जाधव गेले असता मुकुंद गर्दे याने जाधव यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळी केली. तसेच काठीने जाधव यांना हातावर मारले. जाधव यांचा मित्र दया पाटील यांच्या डोक्यात काठी मारली. गर्दे याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे घेऊन जात असताना गर्दे याचे २० ते २५ मित्र आले. त्यांनी पोलिसांची हुज्जत घातली व मार्शलला घेऊन गेले.

०००००

चौकट

सीपीआरमध्ये दोन तास तणाव

जखमी मार्शल याला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. मारहाण करणाऱ्या पोलिसांना अटक करावी, अशी मागणी करत पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नातेवाईक संतप्त झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शहर पोलिस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिल्यानंतर तब्बल दोन तासानंतर तणाव निवळला. मार्शलच्या डोक्यास दुखापत झाल्याने त्याला सीपीआरमधून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.

.................

कोट

'रविवारी रात्री घडलेल्या घटनेत जर पोलिस दोषी आढळले तर त्यांची गय केली जाणार नाही. पोलिस या घटनेची सखोल चौकशी करतील. या घटनेत पोलिस कर्मचारी प्रविण काळे सहभागी नसल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे हे रविवारी रात्री घडलेल्या घटनेची चौकशी करतील. चौकशीनंतर दोषींच्यावर कारवाई केली जाईल.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवविवाहितेची आत्महत्या

$
0
0

फोटो

...........

लग्नानंतर बाराव्या दिवशी

नवविवाहितेची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विवाहास अवघे १२ दिवस पूर्ण झाले असताना हळद सुकण्यापूर्वीच शिवानी महेश सूर्यवंशी (वय १९, रा. वसगडे, ता. करवीर) या नवविवाहितेने कळंबा येथील माहेरी गळफास लावून आत्महत्या केली.

कळंबा येथील त्रिमुर्ती कॉलनीतील सतीश चौगुले यांची मुलगी शिवानी हिचा २६ एप्रिल रोजी वसगडे येथील महेश सूर्यवंशी यांच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर सर्व धार्मिक कार्यक्रम पूर्ण झाल्यावर आठ दिवसांपूर्वी शिवानी माहेरी कळंबा येथे रहावयास आली होती. रविवारी सासरच्या नातेवाईकांसमवेत जोतिबा दर्शन घेतले होते. सोमवारी दुपारी माहेरच्या घरी पहिल्या मजल्यावर फॅनच्या हुकाला साडीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. गळफास लावलेल्या अवस्थेतील शिवानीला पाहून लहान दोघी बहिणींनी आरडाओरड केला. नातेवाईकांनी शिवानीला खाली उतरुन सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच शिवानीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शिवानीच्या मृत्यूचे वृत्त कळताच नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झीपकॉइनचा मास्टर माइंड गणगेला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

झीपकॉइनच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मास्टर माइंड बाळासाहेब ऊर्फ बालाजी भरत गणगे (वय ३८, रा. पुणे) याला कोर्टाने आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सोमवारी (ता.७) स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत गणगेला मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अटक केली.

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक आर. बी. शेडे यांनी गणगेकडे चौकशी केली. चौकशीत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सेमिनार व विमान प्रवासावर मोठा खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. बेंगळुरू, मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सेमिनारवर ७० लाख रुपये खर्च केला आहे, तर गुंतवणूकदारांना सेमिनारला हजर राहण्यासाठी विमान प्रवासाची सोय केली होती. भपकेबाज सेमिनार आणि विमानप्रवासाचा अभास करून गुंतवणूकादरांना लाखो रुपये झीपकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. ईडी व प्राप्तिकर विभागाचा चौकशीचा ससेमीरा लागेल या भीतीपोटी गुंतवणूकदार पुढे येत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल, संजय तमन्ना कुंभार या तीन संशयितांना अटक केली आहे. राजेंद्र नेर्लेकरच्या पत्नीवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी सोमवारी बंद

$
0
0

फोटो

....................

वारणेच्या पाण्यासाठी सोमवारी इचलकरंजी बंद

प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा

म.टा. वृत्तसेवा , इचलकरंजी -

वारणा योजनेतील हक्काचे पाणी पदरात पाडून घेण्यासाठी आता सामंजस्याची नव्हे तर आरपारची लढाई लढावी लागणार आहे. एकजुटीने रस्त्यावरच्या आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. योजनेला विरोध करणाऱ्यांना इचलकरंजीकरांची ताकद दाखवण्यासाठी सोमवारी ( ता.१४) इचलकरंजी कडकडीत बंद ठेवून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय सभेत ही घोषणा करण्यात आली.

राज्य सरकारने मंजूर केलेल्या वारणा नळ पाणी योजनेला दानोळी ग्रामस्थांसह वारणाकाठच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी मंगलधाम येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये शहरातील सर्व राजकीय पक्ष, आजी , माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक संघटना आदी सहभागी झाले होते.

सर्वपक्षीय कृती समितीच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या, 'इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना सरकारने मंजूर केली आहे. याला दानोळीकरांनी विरोध करण्याचा प्रश्‍नच येत नाही. आजपर्यंत प्रशासनाने सामंजस्याचा मार्ग स्वीकारून बैठकीच्या माध्यमातून योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न पणाला लावले. मात्र दानोळीकरांचा विरोध आजही कायम आहे. प्रशासनाने अखेरचा पर्याय म्हणून बळाचा वापर करून योजनेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्येही यश आले नाही. आता इचलकरंजीकरांना ही योजना पूर्ण करण्यासाठी लोकचळवळीतून आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. यासाठी सोमवारच्या बंदमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे.'

वारणा योजनेला विरोध करणाऱ्या दानोळीतील मूठभर पुढाऱ्यांच्या टोळीचा योग्य बंदोबस्त केला जाईल असे सांगून आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या पुढाऱ्यांकडून केला जात आहे. या घाणेरड्या राजकारणामुळे दानोळीकरांना ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीकर या तथाकथित पुढाऱ्यांचे प्रयत्न उधळून लावतील. मूठभर पुढाऱ्यांकडून दानोळी गावकऱ्यांना भडकवले जात आहे. केवळ आठ - दहा लोकांमुळे वारणा काठ वेठीस धरला जात आहे. कडकडीत बंद करून इचलकरंजीकरांची ताकद संपूर्ण राज्याला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. पाण्यासाठी रक्कम उकळणाऱ्या टग्यांचा भविष्यात जनताच बंदोबस्त करेल. महाडच्या चवदार तळ्यातील पाण्यासाठी झालेल्या आंदोलनाप्रमाणे वारणेसाठी इचलकरंजीकर जनआंदोलन करतील. त्याचबरोबर सरकारस्तरावरूनही प्रयत्न सुरूच राहतील.'

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वारणेच्या पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष योग्य नसल्याचे सांगितले. संघर्षामुळे कटूता निर्माण होऊन दुरावा वाढतो, म्हणून शांततेने हा प्रश्‍न सुटावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हाळवणकर यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा असे सुचित केले.भविष्यात वारणा योजनेच्या पूर्णत्वाबरोबरच पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठीही पावले उचलणे गरजेचे आहे.

यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, हिंदुराव शेळके, प्रकाश मोरे, विनय महाजन, मेघा चाळके, सुप्रिया गोंदकर , शामराव कुलकर्णी, विजय भोसले, धनाजी मोरे, बजरंग लोणारी, बाळासाहेब कलागते, भाऊसो आवळे, गुरूनाथ म्हातुकडे, संगिता आलासे, सदा मलाबादे आदींनी मनोगत व्यक्त केले.

..................

तोडपाणीचा प्रस्ताव

आमदार हाळवणकर म्हणाले,' वारणा बचाव कृती समितीच्या आठ -दहा पुढाऱ्यांनी आमच्यापुढे तोडपाणीचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्याला आम्ही दाद दिली नाही. रक्कम उकळणाऱ्या टग्यांच्या पाठीशी शिरोळ तालुक्यातील काही नेते आहेत, त्यांची भूमिका योग्य नाही. पुढाऱ्यांच्या टोळीने पोलिसांवर चटणी टाकून दगडफेक करण्याचा कुटील डाव आखला होता, याबाबत पोलिसांकडे गोपनीय माहीती आहे. सरकारने तीन महिन्यांचा पोलिस बंदोबस्त दिला आहे. त्यामुळे ही योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इशाऱ्यानंतर यंत्रणा हलली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी सर्वपक्षीय नागरी कृती समिती आक्रमक बनल्यानंतर सरकारी पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. राज्य सरकारने पर्यायी पुलाच्या बांधकाम सुरु करण्यासाठी तातडीने निर्णय न घेतल्यास नजीकच्या काळात संघर्ष आणखी चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अत्यावश्यक बाब म्हणून पर्यायी पुलाच्या बांधकामाला सुरुवात करता येईल का? या संदर्भात मार्गदर्शन मागविले आहे. येत्या दोन दिवसांत त्या विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बांधकामाला पुरातत्त्व विभागाने हरकत घेतल्याने गेल्या तीन वर्षापासून पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. पर्यायी पुलावरुन नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. कोकणला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावरील पुलाचे काम रखडल्यामुळे त्याचा कोल्हापूरच्या व्यापार, व्यवसाय क्षेत्राला फटका बसत असल्याच्या भावना आहेत.

पर्यायी पुलावरुन कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हा प्रशासनाला चार दिवसाची मुदत दिली आहे. ११ मेपर्यंत पर्यायी पुलाच्या बांधकामाचा निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला ठाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. तसेच शिवाजी पूल व राजाराम बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात येईल. प्रसंगी पालकमंत्र्याच्या निवासस्थानी मोर्चा काढला जाईल, असा आक्रमक पवित्राही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्यायी पुलासाठी 'टोल आंदोलनाचा पॅटर्न' वापरण्याचा इशारा दिल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. त्याची दखल घेऊन सरकारी पातळीवरुन पर्याय काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी तातडीने मुंबईत बैठक झाली. पालकमंत्र्यांनी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

०००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीच्या दोघांचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर चौक परिसरातील किराणा दुकानदार मार्शल उर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. राजारामपुरी) याला बेदम मारहाण करुन गुंडागर्दी करणाऱ्या शाहूपुरी पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार संदीप जाधव आणि कर्मचारी प्रविण काळे या दोघांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. परवा रात्री घडलेल्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले होते. हॉटेल अनुग्रह आणि दाभोळकर कॉर्नर येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काळे व जाधव यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर पोलिस अधीक्षक डॉ. अमृतकर यांनी या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पाोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. चौकशीत हे दोघे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

रविवारी रात्री मार्शल गर्दे याला पोलिसांनी मारहाण केल्याने सीपीआर रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनेची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. जखमी गर्दे याने संदीप जाधव व अन्य पोलिसांविरोधात तर संदीप जाधव यांनी मार्शल गर्दे व ३१ जणांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी शहर पोलिस अपअधीक्षक डॉ. अमृतकर व शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी पोलिस अधीक्षक मोहिते यांना अहवाल दिला.

दाभोळकर कॉर्नर येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता प्रविण काळे याने मार्शलला सर्वप्रथम मारहाण केली. त्यानंतर संदीप जाधव घटनास्थळी आला. दोघांनी मार्शलला मारहाण केली. मार्शलनेही दोघांवर वीट उगारली. जाधव यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून जादा कुमक मागवून घेतली. त्यानंतर गर्देला पोलिसांनी वाहनातून नेत असताना गर्दे यांच्या मित्र व नातेवाईकांनी पोलिसांशी वाद घालून त्याची सोडवणूक केली. त्यानंतर त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

शहर पोलिस अधीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जाधव व काळे या दोघांच्या चौकशीचे आदेश पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिले होते. चौकशी अहवालानंतर जाधव व काळेंवर निलंबनाची कारवाई आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल संदर्भात आवाज...

$
0
0

लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या

नाकर्तेपणामुळे काम रखडले

लालफितीचा कारभार व प्रशासन लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. पंचगंगा नदीवरील जुना पूल हा वाहतुकीस धोकादायक बला आहे. पावसाळ्यात पुलावरील वाहतूक जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज या पुलावरुन हजारो लोक ये जा करतात. मात्र त्यांच्या जीविताची काळजी सरकारला नसल्यासारखे कामकाज सुरु असल्याची मते नागरिकांनी व्यक्त केली.

...................

लोकप्रतिनिधींकडून जाणूनबुजून दुर्लक्ष

पर्यायी पुलाच्या उभारणीकडे लोकप्रतिनिधींकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पुलाच्या उभारणी अगोदरच साखर वाटप करुन नागरिकांची दिशाभूल सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील,खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जबाबदारी स्वीकारुन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करायला हवी. नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गात या रस्त्याचा समावेश आहे. मात्र राज्यकर्त्यांना पर्यायी पुलाविषयी गांभीर्य नाही.

रमेश मोरे, मंगळवार पेठ

..........

कोल्हापुरातील पुलासाठी दुजाभाव का ?

पर्यायी पुलासाठी सरकारने धोरण ठरवून बांधकाम सुरु करायला हवे. तीन वर्षे पुलाचे काम रखडले आहे. जिल्ह्याचे तीन खासदार दिल्ली दरबारी काय करत आहेत,हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. नागरिकांनी किती दिवस आंदोलने करायची. सावित्री पुलाची बांधणी चार ते सहा महिन्यात होते, मग कोल्हापुरातील पुलासाठी दुजाभाव कशासाठी ? पालकमंत्र्यांनी गांभीर्याने हा प्रश्न हाताळायला हवा.

संभाजीराव जगदाळे, शाहू बँक परिसर

.................

कायदा व नियमावलींचा बागुलबुवा नको

शिवाजी पूल हा कोकण विभागाला जोडणारा प्रमुख पूल आहे. त्या पुलाचे आयुष्यमान संपले आहे. सरकार व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वेळेत पर्यायी पूल उभारु शकला नाही. पंचगंगा नदीवर अन्य ठिकाणी नवा पूल उभारणीला जागा नाही. सरकारने, कायदा व नियमावलींचा बागुलबुवा न करता सध्याच्या पर्यायी पुलाचे तातडीने बांधकामे सुरु करावे. नागरिकांच्या हितासाठी कायदे व नियम आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तत्काळ पूल उभारावा.

अजित सासने, संभाजीनगर

.............................

शहर, ग्रामीणमधून संयुक्त प्रयत्न हवेत

सरकारने तत्काळ पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु करावे. शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करणे संयुक्तिक ठरणार नाही. नागरिकांनी ये जा करण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. जुना पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यास कोल्हापूरच्या पश्चिम भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. जुना पूल वाहतुकीला बंद करण्यापेक्षा पर्यायी पुलाचे काम तत्काळ सुरु होण्यासाठी शहर व ग्रामीण भागांनी संयुक्त प्रयत्न करु या.

सचिन चौगुले, सरपंच वडणगे

................

३० चौरस मीटर क्षेत्रात उत्खनन करणे शक्य

पुरातत्व विभागाच्या कार्यपध्दतीनुसार पुलाच्या फाऊंडेशनसाठी लागणाऱ्या ३० चौरस मीटर क्षेत्रात उत्खनन करणे शक्य आहे. त्यानुसार पुरातत्व विभागाने तीन ते चार फूट उत्खनन करुन पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमीन हस्तांतरण करणे शक्य आहे. कारण तीन, चार फुटाच्या खालील खडकात पुरातत्वीय अवशेष आढळत नाहीत. या पर्यायाचा अवलंब करुन नवीन पुलाचे बांधकाम करणे शक्य आहे.

महेश जाधव, कोष्टी गल्ली

........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०३ चोरटी नळ कनेक्शन ‘कट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या विविध भागांत पाणीचोरी करणारी १०३ अनधिकृत नळकनेक्शन महापालिकेने मंगळवारी तोडली. केवळ भोसलेवाडी परिसरातच ५० चोरटी कनेक्शन तोडली. फुलेवाडी व बोंद्रेनगर परिसरात ३२ कनेक्शन सापडली आहेत. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या परिसरातीलही १४ चोरटी कनेक्शन तोडण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून पाणीचोरीचे अनेक नवीन प्रकार समोर येत आहेत. मोहिमेतील पथकांवर राजकीय दबाव वाढत असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने उपसा करण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ५० एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने चोरी रोखण्यासाठी तातडीने पथकांची स्थापना केली. प्रत्येक पथकाकडे ठराविक भाग सोपवण्यात आला असून पहिल्या टप्प्यात किमान महिनाभर तरी ही मोहीम सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. पथकाच्या प्रमुखाबरोबर एक मीटर रीडर व कर्मचारी देण्यात आले आहेत. पथकाच्या वतीने नेमून दिलेल्या भागात तक्रारींच्या आधारे कनेक्शनची प्रथम पाहणी केली जाते. कनेक्शनला मीटर नसेल किंवा मीटरच्या अलीकडून स्वतंत्र पाइप जोडून पाणी चोरले जात असेल तर ते कनेक्शन तोडण्यात येत आहे. सध्या घरगुती कनेक्शनवर लक्ष केंद्रित केले आहे. सोमवारी ३३ कनेक्शन तोडण्यात आली. मंगळवारी ही संख्या १०३ वर पोहोचली आहे.

भोसलेवाडी परिसरातील मोहिमेत अनधिकृत ५० नळ कनेक्शन तोडली आहेत. हा सारा परिसर ई वॉर्डमध्ये आहे. येथे पाणीपुरवठा नीट होत नसल्याच्या वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. ई वॉर्डला कमी पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर या चोरट्या कनेक्शनमुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असण्याची शक्यता आहे. त्याबरोबर फुलेवाडी परिसर, बोंद्रेनगर मातंग वसाहत परिसर येथेही मोठ्या प्रमाणात चोरटी नळ कनेक्शन आढळून आली. तेथील ३२ कनेक्शन तोडली आहेत.

उपनगरांच्या परिसराबरोबर मध्यवस्तीतही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. घिसाड गल्ली, सोन्या मारुती चौक, लोणार गल्ली, जोशी गल्ली, कोरवी गल्ली, मणेर मसजिद या महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या परिसरात राबविलेल्या मोहिमेत १४ कनेक्शन तोडली. यामुळे महापालिका, पाणीपुरवठा कार्यालय जवळ असतानाही पाण्याची चोरी बिनदिक्कतपणे होत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय महाडिक कॉलनी, रुईकर कॉलनी परिसरातील सात कनेक्शन तोडली.

.....

पाणी चोरीचे प्रकार

पीव्हीसी पाइप उपसून चोरी

शोधमोहिमेतून चोरीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. पीव्हीसी पाइपला मीटर जोडले जाते. हा भाग लोखंडी पाइपमधून उपसून बाजूला काढता येतो. ज्यावेळी पाणी येईल, त्यावेळी हा भाग उपसायचा व थेट पाणी घ्यायचे. ज्यावेळी तपासणीला मीटर रीडर जाईल, त्यावेळी जैसे थे मीटरचा भाग लावायचा. त्यामुळे पाणी कितीही उपसा केला तरी मीटरमध्ये नोंद होत नसल्याने किमान बिल भरले जाते.

.....

मीटरच्या अलीकडे एअर व्हॉल्व्ह किंवा पट्टी व्हॉल्व्ह लावण्यात येतात. त्या पट्टी व्हॉल्व्हलाच प्लंबिंग केले जाते. ज्यावेळी पाणी येते त्यावेळी पट्टी व्हॉल्व्ह बंद केला जातो व मीटरमधून पाणी पुढे जाण्याऐवजी तिथे लावलेल्या व्हॉल्व्हमधून पाणी घेण्यात येते. मीटरमध्ये पाण्याची नोंदच होत नाही.

......

अनेक नागरिकांनी गटारीखालून पाइप जोडलेल्या आहेत. त्याचे पाणी थेट टाकीत सोडण्यात येते. मुख्य कनेक्शन बंद ठेवायचे. त्यामुळे किमान बिलच येते.

.....

अनेकजण मीटरच्या अलीकडे लावलेल्या व्हॉल्व्हला मोटर लावतात व तिथूनच पाणी उपसा करतात. त्यामुळे आजूबाजूच्या कनेक्शनचे पाणी ओढले जाऊन इतरांना कमी पाणी मिळते.

............................

अनधिकृत नळ कनेक्शन शोध पथके

प्रत्येक पथकातील कर्मचारी

पथकातील कर्मचारी

३५

मीटर रीडर

४४

००००००००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा ओढणाऱ्या सात जणांना अटक

$
0
0

म. टा. इम्पॅक्ट

गांजा ओढणाऱ्या

सातजणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांजा ओढणाऱ्या सातजणांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यापैकी तिघांची रवानगी बिंदू चौक सबजेलमध्ये करण्यात आली आहे. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या आदेशाने पोलिसांनी गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी कनानगर, न्यू शाहूपुरी, गंगावेश, पाडळकर मार्केट, पंचगंगा नदी परिसर, दौलतनगर, टाकाळा या परिसरात गांजा ओढणाऱ्यांना अटक केली. अटक झालेल्यांमध्ये विद्यार्थी, मजूर, इलेक्ट्रिशिअन यांचा समावेश आहे. संशयितांची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करुन एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सात आरोपीपैकी चौघांना जामीन मंजूर झाला, तर तिघांना जामीन मंजूर न झाल्याने त्यांची रवानगी बिंदू चौक सबजेलमध्ये करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी, रामकुमार हरिलाल पासवान (वय २३, रा. मुणगाव समस्तीपूर, बिहार, सध्या रा. कनाननगर), सुशिलकुमार गनौर साह (२६, मुळ गाव बरुआरी, बिहार, सध्या रा. कनाननगर), शिरीष सुधाकर गायकवाड ( २०, रा. जुना नाईकिनीचा सज्जा, मुख्य रस्ता, पन्हाळा), सोनू समीर मुजावर (१९, रा. ताराराणी मार्केट, मुसलमान गल्ली, पन्हाळा), आकाश राजू वाघेला (२४, रा. अंबाबाई गल्ली, पन्हाळा), शुभम राजू पाटील (२२, रा. आठवी गल्ली राजारामपुरी), गणेश नामदेव देवकुळे (२७, रा. माळी कॉलनी, टाकाळा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूक-कर्णबधिर असो.चा वर्धापनदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मूक-कर्णबधिर असोसिएशनचा २४ वा वर्धापनदिन अक्कमहादेवी सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडला. यानिमित्ताने मूक व कर्णबधिर सभासदांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमात १६० सभासदांनी सहभाग घेतला. यावेळी तज्ज्ञ समितीची स्थापना करत सरकारी सेवेतील पदे अपंगांसाठी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीत राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पटवारी व सचिव अनिकेत सेलगावकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास उद्धव पन्हाळकर, अतुल फणसाळकर, अमेय गवळी, संजय चव्हाण, गौरव शेलार, तेजस मुरगडे, धीरज कांबळे, अमोल कवाळे, संतोष मिठारी, प्रियांका महामुनी, जयश्री गवळी आदी सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याचे भासवून वृध्दाचे दागिने लुटले

$
0
0

पोलिस असल्याचे भासवून

वृद्धाचे दागिने लुटले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस असल्याचे भासवून निर्माण चौक परिसरात परशुराम बाळा सोनुले (वय ६७, रा. टिंबर मार्केट) या निवृत्त महानगरपालिका कर्मचाऱ्याला दोघा चोरट्यांनी लुटले. हातचलाखी करुन चोरट्यांनी तीन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याची सोन्याची चेन असे साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास केले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सोनुले पती पत्नी नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह आटपून ते घरी जाण्यासाठी निघाले. नातवाच्या मोटारसायकलवरुन पत्नीला जाण्यास सांगून ते पायी चालत घरी निघाले. निर्माण चौक परिसरात चालत जात असताना मागून मोटारसायकलवरुन आलेल्या एका व्यक्तीने त्यांना हाक मारली. पोलिस असल्याचे सांगून त्या व्यक्तीने त्यांना ओळखपत्र दाखवले. सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, दागिने सांभाळा अशी सूचना केली. याचवेळी एक व्यक्ती मोटारसायकलवरुन त्यांच्याजवळ आली. पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने मोटारसायकलवरुन आलेल्या व्यक्तीला गळ्यात व हातात सोन्याचे दागिने घालून कशाला हिंडतोस म्हणून त्याला दागिने काढण्यास सांगितले. त्या व्यक्तीने गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठ्या काढून रुमालात बांधून खिशात ठेवल्या. त्यामुळे परशुराम सोनुले यांनीही आपल्या हातातील अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन काढून रुमालात ठेवली. चोरट्याने दागिने रुमालात बांधत असतानाच दागिने हातचलाखीने लंपास केले. त्यानंतर ते मोटारसायकलवरुन निघून गेले. दागिने बांधलेला रुमाल सोनुले यांच्या खिशात ठेवला. त्यानंतर सोनुले यांनी घरी आल्यावर रुमाल उघडून पाहिला असता दागिने नसल्याचे लक्षात आले. दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश आंबेडकर पीसी

$
0
0

सिंगल फोटो

...................

राणे समितीकडून

मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोणाचाही पाठिंबा न घेता स्वबळावर सत्ता मिळवायची आहे. सत्तेतूनच सर्व प्रश्न तत्काळ मार्गी लागणार आहेत. त्यासाठी २० मे रोजी पंढपुरात सत्ता संपादन निर्धार मेळाव्यातून लढाईचे रणशिंग फुंकले जाणार आहे', अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली. दरम्यान, माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप त्यांनी केला.

अॅड. आंबेडकर म्हणाले, ' सरकारला धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे. धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजपकडे आरक्षणाची मागणी केली, मात्र कोणीही लक्ष दिलेले नाही. शाहू, फुले आणि आंबेडकर यांनी सुरू केलेल्या लोकचळवळीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. सत्ता मिळाल्यास सर्वंच प्रश्न तत्काळ मार्गी लागतील. त्यासाठी सत्ता संपादन निर्धार मेळाव्यातून लढाईची सुरूवात होईल. टिळक स्मारक मैदान येथे हा मेळावा होणार असून अध्यक्षस्थान आमदार गणपतराव देशमुख भूषणविणार आहेत. कर्नाटक विधानसभेचा निकाल काहीही लागला तरी भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्याबोळ केला

अॅड. आंबेडकर म्हणाले, ' माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. त्याच पद्धतीने धनगर समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा करू नका. काँग्रेस आणि भाजपने आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले. त्यामुळे भाजप सरकार गेले तरीही आरक्षण मिळेल, याची खात्री नाही. धनगर समाजासाठी दिल्या जाणाऱ्या आरक्षणासाठी नियुक्त असणाऱ्या समितीने किंवा संस्थेने अहवाल देवू नये. ज्या संस्थेकडे अहवालाची जबाबदारी दिली आहे, त्या समितीलाही फूस लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सरकार गेले तरीही हा अहवाल पूर्ण होईल का नाही,अशी शंका आहे.

........

तावडेंनी माफी मागावी

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतारचा वाद निर्माण झाला नसतानाही तो वाद जाणीवपूर्क निर्माण केला जात आहे. या वादात तेल ओतण्याचे काम शिक्षणमंत्री विनोद तावडे करीत आहेत. ५ नोव्हेंबर २०१७ ला नागपूरच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एका समितीने सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. धनगर आणि लिंगायत समाजात वादाची ठिणगी टाकण्याचे काम आता सुरू आहे. अहिल्याबाईंचे होळकरांचे नाव दिल्यास दंगल होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य तावडे यांनी करून पुन्हा वाद निर्माण केला आहे. त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध पावडरला तुटपुंजे अनुदान

$
0
0

दूध पावडर फाइल फोटो

..........................

दूध पावडरला तुटपुंजे अनुदान

केवळ एक महिन्यासाठी योजना, उत्पादकांना दर देणे अद्यापही अशक्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने मंगळवारी दूध पावडर तयार करण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एक लिटर दुधापासून पावडर तयार करताना दहा रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने संघांना दिलेले अनुदान तुटपुंजे आहे. जाहीर केलेली योजना केवळ एक महिन्यासाठी असल्याने एकप्रकारे संघांची फसवणूकच केली आहे. बाजारपेठेत पावडरचा दर १२० रुपये किलो असताना प्रक्रिया खर्च २२० ते २४० रुपये येत असल्याने राज्य सरकारच्या निर्णयाच्या फायदा होणार नसल्याचे दूध व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो पावडरचा दर १०५ रुपये असून देशात हाच दर १२० रुपये आहे. गायीच्या दुधापासून एक किलो पावडर तयार करण्यासाठी २२० रुपये तर म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करण्यासाठी २४० रुपये खर्च येत आहे. प्रक्रिया खर्च आणि मिळणारा दर यामध्ये शंभर ते ११५ रुपयांचा फरक पडत आहे. तर एक लिटर दुधापासून पावडर तयार करताना दहा रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे जाहीर केलेले अनुदान अगदीच तुटपुंजे आहे. अनुदान जाहीर करताना मार्च महिन्यातील एकूण दूध संकलनातील २० टक्के दुधाची पावडर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जाहीर केलेले अनुदान केवळ एक महिन्यासाठी असल्याने याचा फायदा दूध संघांना होणार नसल्याचे स्पष्ट होते. दूध पावडरला मागणी नसल्याने सरकारने पावडर खरेदी करण्याची मागणी केली होती. पण असा निर्णय न घेता अनुदान देवून बोळवण केली आहे. दूध पावडर खरेदी केली असती, तर पावडरवर काढलेला विमा, भांडवल व त्यावरील व्याज, गोडावून भाडे यातून संघाची सुटका झाली असती. पण पुन्हा झालेल्या शेतकरी मोर्चानंतर दूध उद्योगातील वस्तुस्थितीचा अभ्यास न करता निर्णय घेतला असल्याच्या प्रतिक्रिया दूध व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

चौकट

सरकारकडून सर्वांचीच फसवणूक

राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष अरुण नरके म्हणाले,' अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर बाजारपेठेत दर हमखास कोसळतात. त्याचा फटका उत्पादकांना बसतो. अतिरिक्त होणारे उत्पादन सहकारी संस्थांशी संबंधित असल्याने उत्पादक आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होता. असाच संघर्ष यापूर्वी झाला होता. त्यावेळी तत्कालीन युपीए सरकारने दुधापासून पावडर तयार करण्यासाठी प्रथम दहा व नंतर वीस रुपयांचे अनुदान दिले होते. त्यामुळे सहकारी संस्थांचे अस्तित्व टिकून राहण्याबरोबर उत्पादकांनाही चांगला दर देण्यास मदत झाली होती. पण सध्याच्या सरकारला सहकारी संस्थाच मोडीत काढायच्या असल्याने अशा तकलादू स्वरुपाच्या उपाययोजना करत आहेत. केवळ तीन रुपयांचे अनुदान देवून सरकारने सर्वांचीच फसवणूक केली आहे.'

चौकट

दृष्टीक्षेप

राज्यातील शिल्लक दूध पावडर - २६ मेट्रिक टन

गोकुळकडील शिल्लक पावडर - पाच हजार टन

दूध पावडर दर - १२० रु. कि.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर - १०५ रु. कि.

प्रक्रिया खर्च - २२० रु. (एक लिटर)

...............

कोट

'तीन रुपयांचे अनुदान देवून सरकारने क्रूर चेष्टा केली आहे. उत्पादकांना जाहीर केलेला दर देवू शकत नसल्याची हिंमत नसल्याने अभ्यासाशिवाय आततायीपणे निर्णय घेतले जात आहेत. प्रक्रिया खर्च आणि बाजारातील पावडरच्या दरामध्ये १२० रुपयांचा फरक असताना तीन रुपयांचे अनुदान देवून कोणाला फायदा होणार आहे? अशा निर्णयांमुळे संपूर्ण सहकारी दूध संस्थाच अडचणीत आणल्या जात आहेत.

अरुण नरके, अध्यक्ष, एनडीडीबी

..........

कोट

'जून महिन्यापासून दूध संघाकडे पावडर पडून आहे. मागणी नसल्याने तोटा सहन करुन तयार केलेल्या पावडरीवर मोठ्याप्रमाणात खर्च होत आहे. यासाठी सरकारने पावडर खरेदी करण्याबरोबरच थेट उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली होती. त्याचा विचार न करता अनुदानाचा निर्णय घेतला आहे, पण त्याचा फायदा उत्पादकांना होणार नाही.

डी. व्ही. घाणेकर, कार्यकारी संचालक, गोकुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पावनखिंडी मार्गावर सेवासुविधा पुरविणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी पन्हाळा-पावनखिंड मार्गावर निवाऱ्यासह इतर सेवासुविधा निर्माण करून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. या मार्गावरील निवाऱ्यासाठी प्रशस्त हॉल आणि १४ गावांत मूलभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येईल,' असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले.

येथील सीईओंच्या कक्षात अनेक वर्षांपासून पन्हाळा-पावनखिंड मार्गावर पदभ्रमंती करणाऱ्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक वर्षी १२, १३ जुलैला गडकोटप्रेमी, पर्यावरणस्नेही पर्यटक मोठ्या संख्येने पन्हाळ्यापासून पावनखिंडीपर्यंत चालत जातात. या मार्गावर पदभ्रमंती करणाऱ्यांना मुक्कामासाठी आंबेवाडीतील हॉलसाठी २९ लाख, करपेवाडी येथील हॉलसाठी २० लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालयांची सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. याशिवाय या मार्गावरील १४ गावांत मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

बैठकीस बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके, हिल रायर्डसचे अध्यक्ष प्रमोद पाटील, पंडित पोवार आदी उपस्थित होते.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images