Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एक कप चहासाठी

$
0
0
चहाच्या नावावर तासन् तास घालवणे आणि कामासाठी आलेल्या लोकांना तिष्ठत ठेवण्याची विकृत मनोवृत्ती कर्मचाऱ्यांत बळावलेली आहे. ‌टपऱ्यांवर वेळ घालविणाऱ्या काही कर्मचा ऱ्यांवर कारवाईचा बडगा परवाच जिल्हा परिषदेची सीईओ डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उगारला.

बारा गावचं पाणी

$
0
0
‘बारा गावचं पाणी पिऊन आलेला आहे तो !’ असं एखाद्याबद्दल बोलत असताना आपण बऱ्याचदा ऐकतो ‌किंवा प्रसंगानं आपणही बोलतो. म्हणजे एखाद्या गावाच्या पाण्याचा खास असा गुण असला पाहिजे.

धगधगणारा फड

$
0
0
साखर कारखाने आणि राज्य सरकारला उसाचा दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेली डेडलाइन उलटून गेली आहे. कारखानदारांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे ढकललेल्या चेंडूमुळे नोव्हेंबर महिना संपत आला तरीही दराचा तिढा सुटलेला नाही.

ताम्रपर्णी नदीत कोवाडजवळ मगरीचे दर्शन

$
0
0
कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीच्या काठावर मगरीचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मगर पाहण्यासाठी नदीकाठावर लोकांनी मोठी गर्दी केली होती.

इचलकरंजीत कामगारांचा मोर्चा

$
0
0
२५ किलो गहू व तीन रुपये किलो दराने २० किलो तांदूळ दरमहा मिळावेत. तसेच रेशनकार्डावर साखर, रॉकेल, डाळी, पामतेल आदी जीवनाश्यक वस्तू मिळाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

बचत गटांना आठवडी बाजारात जागा

$
0
0
बचत गटांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने त्यांच्या उत्पादनांना गावातील आठवडे बाजारातही विक्रीची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजित कृती आराखडा निश्चित करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले.

नेसरी येथे वंचितांची मतदार नोंदणी

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक शाखेच्यावतीने देवदासी, तृतीयपंथी, भटक्या जमातीतील लोकांची मतदार नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पिस्तूल विक्रीप्रकरणी नागौरी‌ला पुन्हा अटक

$
0
0
युवतीच्या मदतीने खंडणी उकळणाऱ्या टोळीतील रॉबर्ट आवळे याला पिस्तुल विकल्याप्रकरणी तपास करण्यासाठी पिस्तुल तस्कर मनीष नागौरी याला आज गावभाग पोलिसांनी अटक केली.

अश्लील चित्रफित : २८ पर्यंत पोलिस कोठडी

$
0
0
परस्त्रीशी असलेल्या अनैतिक संबंधाची अश्लील चित्रफित तयार करणाऱ्या यळगूड येथील विनायक बापू लोहार याच्या पोलिस कोठडीत आज वाढ करण्यात आली. तर या प्रकरणातील एका महिलेसह आणखीन तिघेजण अद्याप फरार आहेत.

पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

$
0
0
येथील वसंत कॉलनीमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र रात्री उशीरापर्यंत याची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

अप्पा पाटीलला १ दिवस पोलिस कोठडी

$
0
0
चोरीच्या गुन्ह्यात मास्टर माईंड प्रकाश उर्फ अप्पा रामचंद्र पाटील याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गुन्हे अन्वेषण पथकाने दरोडेखोरी, चोरी प्रकरणातील मास्टर माईंड आप्पा पाटील याला अटक केली होती.

दराच्या तिढ्यात कारखाना तयारीत

$
0
0
यावर्षीच्या आजरा साखर कारखना हंगामाला इतरांप्रमाणेच ऊसदराच्या तिढ्याने वेढले असल्याने शेतातील ऊस अद्यापही उभाच आहे. कारखानदार आणि सरकारबरोबर शेतकरी संघटनेने बसून हा तिढा तातडीने सोडवावा आणि शेतातील ऊस तोडण्यास प्रारंभ करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करीत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाई तात्पुरती स्थगित

$
0
0
महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेसाठी त्या परिसरातील हटवण्यात येणाऱ्या फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यासाठी आता महापालिकेचे अधिकारी व पोलिस ​अधिकाऱ्यांसह फेरीवाले शुक्रवारी (ता.२९) प्रत्यक्ष रस्त्यांवर एक​त्रित पाहणी करुन नियोजन केले जाणार आहे.

‘विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्सचा ‘आधार’

$
0
0
एमसीए थेट व्दितीय वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत यासाठी विद्यापीठाने ब्रीज कोर्स बनविण्याचा निर्णय झाला. याकरिता विद्यापीठाने परिनियमावलीत बदल करून अधिकार मंडळाची मान्यता घ्यावयाची आहे.

कारखाने सुरू करण्याच्या हालचाली

$
0
0
ऊसदरासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत साखर कारखानदारांनी हंगाम सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मंगळवारी श्री शाहू सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत २९ नोव्हेंबरपासून कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दीनदयाळची ७५ लाखांची फसवणूक

$
0
0
येथील तामिळनाडू मर्कंटाईल या बॅँकेतील दिनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी, इस्लामपूर या सुतगिरणीच्या खात्यातील विविध तारखेला सुमारे ७५ लाख रुपये ई बॅँकिंग प्र्रणालीद्वारे फसवणूक करुन उचलण्यात आल्याचे उघडकीस आले.

शहरात अवकाळी पावसाची हजेरी

$
0
0
घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या साथीने शहराच्या अनेक भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सहानंतर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणातील थंडी गायब झाली.

भाताला हमीभाव हवा

$
0
0
तालुक्यामध्ये सद्यस्थितीला सुगीचा हंगाम सुरु आहे. तालुका भात उत्पादनामध्ये जिल्हयामध्ये अग्रेसर आहे. तालुक्यात भात खरेदी करणारे लहान मोठे ७० ते ८० व्यापारी असून ते सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विटल दराने भाताची खरेदी सुरु आहे.

१० वीचा १७.६२ तर १२ वीचा १८.५५ टक्के निकाल

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी दहावी आणि बारावीचा सप्टेंबर-ऑक्टोबरचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. दहावीचा कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल १७.६२ टक्के आणि बारावीचा १८.५५ टक्के निकाल लागला. या निकालातही मुलींनी बाजी मारली.

स्वाभिमानी आक्रमक

$
0
0
ऊस दराची चर्चा फिस्कटल्यानंतर बुवाचे वाठार, भेंडवडे, सावर्डे, किणी, घुणकी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिणचे, भेंडवडे, भादोले, किणी परिसरातील ऊसतोडी बंद पाडल्या.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images