Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिलेचे मंगळसूत्र लंपास

$
0
0

मंगळसूत्र लंपास

कोल्हापूर

सम्राटनगर येथील आनंदी कृष्णा अपार्टमेंटसमोर मोटारसायकलवरील चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. गुरुवारी रात्री पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली. पद्मजा सुरेश भोसले (वय ४०, रा. साई प्लाझा, सम्राटनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. भोसले या गुरुवारी सायंकाळी भाजी खरेदीस गेल्या होत्या. भाजी खरेदी करुन त्या घरी परतत असताना आनंदी कृष्णा अपार्टमेंटजवळ समोरून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरुन दोन तरुण आले. मोटारसायकलवर मागे बसलेल्या तरूणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळवून नेले. भोसले यांनी आरडाओरड केली, पण चोरटे मोटारसायकलवरुन पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्यय नाट्यमहोत्सवाचा पडदा उघडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत प्रत्यय नाट्यमहोत्सवाचा पडदा अभिनेते किशोर कदम, महापौर स्वाती यवलुजे यांच्याहस्ते शुक्रवारी उघडला. केशवराव भोसले नाट्यगृहात ६ मेअखेर महोत्सव चालणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना कदम म्हणाले, 'प्रत्ययने नाट्यमहोत्सव आयोजित केल्याने कोल्हापूरकरांना दर्जेदार नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे. येथे सादर होणाऱ्या सर्वच नाटकांचे वेगळेपण आहे. कोल्हापूरने मला नेहमीच भुरळ घातली. इथले जेवण, लोक, हवामान चांगले आहे.'

प्रत्ययचे शरद भुथाडिया म्हणाले, 'समाजात बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी नाटकांतील कथानक महत्त्वाचे आहे. नाटकासह विविध कला माणसांच्या मनाची मशागत करतात. कलेमुळे माणूसही समृद्ध होतो. त्यासाठीच प्रत्ययने नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले.' यावेळी डॉ. आशुतोष चव्हाण, भुथाडिया यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

उद्घाटनानंतर कल्याणमधील 'दोजख' नाटक सादर करण्यात आले. दहशतवादाने पोखरलेल्या इराकमध्ये जगण्यासाठी दहशतवाद्यांना मुली पुरविणारा हाफीज सर्व बाजूंनी कोंडीत सापडलेला असतो. जगण्यासाठी तो तडजोडी करतो. योग्य वेळी धर्मचिकित्सा होणे गरजेचे आहे. न झाल्यास धर्म समाजावर जखम बनते, असा नाटकाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी चांगला प्रयत्न केला. नादिया मुराद ही यझिदी मुलगी, तिला मूलतत्त्ववादी गुलाम बनवतात. सुटका झाल्यानंतर तीन वर्षांनंतर ती घरी परतण्यापर्यंतचा प्रवास कलाकार उलगडत नेतात. युद्ध, दहशतवाद, यादवी अशा काळात समाजात कुठेतरी माणूसपण, मानवी मूल्यांवर नाटकातून प्रकाशझोत टाकण्यात आला.

----------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेप्युटी सीईओ आडसूळयांनी पदभार स्वीकारला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी (डेप्युटी सीईओ) रविकांत आडसूळ यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्याकडून पदभार स्वीकारला. आडसूळ यांची बदली सांगली जिल्हा परिषदेमधील ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून येथे झाली.

गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदाचा कार्यभार आडसूळ यांनी स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. आडसूळ यांचे मूळ गाव करवीर तालुक्यातील निगवे दुमाला आहे. सुरुवातीला त्यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन गटविकास अधिकारी झाले. सन २०१० ते २०१४ या कालावधीत सांगली जिल्ह्यातील पलूस येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. २०१४ पासून ते सांगली जि. प. मध्ये कार्यरत होते. येथील सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी पदावर येण्यासाठी राज्यातील सुमारे २५ ते ३० जण इच्छुक होते. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर आडसूळ यांची बदली झाली.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा लूट तपास अधिकाऱ्यांची चौकशी

$
0
0

वारणा लूट तपास अधिकाऱ्यांची

सीआयडीकडून चौकशी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा येथील नऊ कोटी १८ लाख रुपयांच्या लूट प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सीआयडीने शुक्रवारी सुमारे चार तास चौकशी केली. त्यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांचा समावेश आहे. आणखी तीन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे संकेत सीआयडीने दिले आहेत. अचानक सीआयडीने तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरु केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

वारणा येथील शिक्षण संकुलातून नऊ कोटी १८ लाख रुपयांची लूट झाली होती. या गुन्ह्याचा तपास तीन टप्प्यात झाला होता. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सव्वा तीन कोटींची लूट केल्याप्रकरणी मोईद्दीन मुल्लाला अटक केली होती. तपास करणाऱ्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात कोटींहून अधिक रक्कमेची लूट केल्याचे तपासात पुढे आल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विश्वास घनवट यांच्यासह सात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली असून सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक संजयकुमार यांनी लुटीच्या तपासाची पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सीआयडी अतिरिक्त अधीक्षकांनी शुक्रवारी एका पोलिस उपअधीक्षकांसह चौघांची चौकशी केली. एका पोलिस उपअधीक्षकाने या गुन्ह्याचा एक दिवस तपास केला होता. या अधिकाऱ्याने तपासाचे व्हिडिओ चित्रण केले आहे. तसेच कोडोली व कोल्हापुरातील निरीक्षक व उपनिरीक्षकांची चौकशी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आयुक्त रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील विविध आयएएस अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आठवडाभराच्या रजेवर गेले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात तावडे हॉटेल परिसरातील जागेचा निकाल लागल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांच्यावर दबाव वाढला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून त्या बांधकामांना अभय देण्याची भूमिका घेतल्यानंतर त्यांची कोंडी झाली होती. एकीकडे महापालिकेचे आयुक्त म्हणून ते अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असे ठामपणे सांगत होते. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी लागणार अशीही भूमिका त्यांना घ्यावी लागली होती. त्यांचा फक्त एक वर्षाचा कालावधी झाला असला तरी या साऱ्या प्रकारामुळे आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा जोरात सुरु होती.

एप्रिल व मे महिन्यात बदल्या होत असतात. त्यानुसार आयएएस अधिकाऱ्यांच्या टप्प्याटप्प्याने बदल्या केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आयुक्त शनिवारपासून १३ मे पर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत विचारणा केली असता आयुक्तांनी घरगुती कारणास्तव रजा घेतल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांचा हल्यात २५ मुले, महिला जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंबलाईवाडी परिसरातील हनुमाननगर, लक्ष्मी कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २५जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुले, महिलांचाही समावेश आहे. शुक्रवारी दुपारी घटना घडली. परिसरात सुमारे अडीच तास कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू होता. जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले आहे.

जखमींमध्ये स्वरा प्रशांत हावळ (वय १ वर्ष), इंद्रनिल संभाजी काबंळे (वय ४), करण संतोष देसाई (वय १०), विनायक नाना काटे (वय १९), लक्ष्मी ब्रह्मदेव यादव (वय ४५), सुरेखा सोनाजी वासुदेव (वय ३६), प्रवीण दिगंबर केसरकर (दीड वर्ष), वैष्णवी सतीश पाटील (वय ५), गुंजन गजानन माने (वय १०), ईश्वर रवींद्र वाघमारे (वय ११), अमित विजय मुगळीकर (वय १९) सौरभ सतीश पिंपळे (वय १४, रा. सर्व टेंबलाईवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास चार भटक्या कुत्र्यांनी टेंबलाईवाडी परिसरातील हनुमाननगर, लक्ष्मी कॉलनीत दिसेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात घबराट उडाली. अनेक वाहनधारक रस्त्यावर घसरून पडले. विशेषत: कुत्र्यांनी लहान मुलांनाही लक्ष्य केले होते. भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी घरांची दारे बंद केली. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट उडाली. सायंकाळपर्यंत दोन कुत्र्यांचा शोध घेऊन परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना जायबंदी केल्याची चर्चा सुरू होती. महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जखमींच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६५ जोडप्यांचा उद्या विवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा ६ मे रोजी पेटाळा मैदान येथे होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण व सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी दिली. सोहळ्यासाठी सुमारे ६५ जोडप्यांची नोंदणी झाली आहे. सोहळ्यासाठी महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे उपस्थित राहणार आहेत. सोहळा समितीचे अध्यक्ष चिक्कोडे यावेळी म्हणाले, 'हा विवाह सोहळा संबंधित जोडप्यांच्या धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे करण्यात येणार आहे. यासाठी ११.५४ मिनिटांचा मुहूर्त निश्चित केला आहे. विवाह सोहळा आनंददायी व उत्साहाच्या वातावरणात संपन्न होण्यासाठी दोनशे बाय दीडशे फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर विवाह सोहळ्याला 'जागो हिंदुस्थानी'च्या वाद्यवृंदाबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाचा बँड व सनई चौघडा असणार आहे. उपस्थितांना हा विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मंडपामध्ये ६ मोठे स्क्रिन लावण्यात येणार आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सुमारे ५ हजार व्यक्तींच्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वर-वधू पक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मुख्य प्रवेशव्दार पद्याराजे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्य प्रवेशव्दातून ठेवण्यात आले आहे तर सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची सोय गांधी मैदान व महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानवर करण्यात आली.'

यावेळी विजयसिंह डोंगळे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवस्थान समितीतर्फे दहा लाख

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे या सोहळ्यासाठी दहा लाख रूपये देण्यात आले. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते विवाह समितीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी जाधव म्हणाले की, समितीने सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत केली आहे. गरीब आणि शेतकऱ्यांच्या पाल्यासाठी दहा लाख रूपये देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विवाह समिती अध्यक्ष चिकोडे यांनी देवस्थानने उपक्रमासाठी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. समितीचे सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, उपअभियंता सुदेश देशपांडे, सामुदायिक विवाह समितीचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, सचिव अॅड, समृद्धी माने, सदस्या सी. ए. सुप्रिया ताडे उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही क्षणी साखर जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विभागातील थकीत एफआरपी वसुलीसाठी पुणे साखर आयुक्त कार्यालयाने काढलेले जप्तीचे आदेश दोन आठवड्यानंतर शुक्रवारी तहसीलदारांना प्राप्त झाले. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी पन्हाळा, हातकणंगले करवीर तालुका तहसीलदारांना जप्तीचे आदेश पाठवण्यात आले. आदेश प्राप्त झाल्यानंतर थकीत एफआरपीप्रश्नी वारणा, भोगवती आणि पंचगंगा कारखान्यांवर कोणत्याही क्षणी जप्तीची कारवाई होऊ शकते.

शुगर कंट्रोल अॅक्ट नुसार १४ दिवसांत एफआरपी न दिलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी यांनी नोटिसा पाठवल्या. कोल्हापूर विभागातील पाच कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना साखर जप्तीचे आदेश दिले होते. १६ एप्रिल रोजी आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी काढलेल्या जप्ती आदेशामध्ये वारणा, भोगावती आणि पंचगंगा (रेणुका शुगर्स) कारखान्यांचा समावेश होता. आयुक्तांनी आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना आदेश प्राप्त मिळाले नव्हते. त्यामुळे साखर जप्तीची कारवाई थांबली होती. त्यामुळे या तीन कारखान्यांकडे असलेल्या २२९ कोटी ८७ लाख थकीत एफआरपीपासून उत्पादक वंचित राहिला होता. तसेच साखर जप्तीच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. १५ दिवसांनतरही तहसीलदारांना जप्तीचे आदेश प्राप्त न झाल्याने शिरोळ येथील आंदोलन अंकुश संघटनेने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता.

यानंतर मात्र अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी तीनही तालुक्यांच्या तहसीलदारांना साखर जप्तीचे आदेश पाठवले. शनिवारी तहसीलदारांना आदेश प्राप्त होताच कोणत्याही क्षणी साखर जप्तीची कारवाई होण्याची शक्यतात आहे. जप्ती आदेश निघालेल्या वारणा कारखान्याकडे ११५ कोटी ९२ लाख, पंचगंगा ६२ कोटी ३२ लाख तर भोगावती कारखान्याकडे ५१ कोटी ६३ लाखांची थकीत एफआरपी आहे. याचबरोबर ज्या कारखान्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त एफआरपी दिली आहे, अशा कारखान्यांनाही साखर आयुक्तांनी नोटिसा पाठवल्या होत्या. यातील पाच कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे जप्तीचे आदेश निघालेले कारखाने कोणती भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळी कॉलनीत महिलेचे गंठण लंपास

$
0
0

माळी कॉलनीत

महिलेचे गंठण लंपास

कोल्हापूर

मोपेडवरील मागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसका मारुन लंपास केले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास टाकाळा येथील माळी कॉलनी परिसरात घडली. सीमा दिलीप केंबळकर (वय ४०, रा. माझी शाळेजवळ, भोसलेवाडी) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.

केंबळकर यांच्या भावाच्या मेव्हुण्याचा विवाह सोहळा कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात होता. विवाह समारंभ झाल्यानंतर मुलगी करिश्माच्या दुचाकीवरुन मागे बसून सीमा केंबळकर घरी निघाल्या होत्या. कळंबा, राजारामपुरी मार्गे टाकाळा येथून जात असताना माळी कॉलनी येथे स्पीड ब्रेकरवर करिश्माने दुचाकीचा वेग कमी केला . दरम्यान, मागून गोल्डन कलरच्या अॅक्टिव्हावरुन लाल टी शर्ट व थ्री फोर्थ घातलेल्या चोरट्याने सीमा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून लंपास केले. करिश्मा व सीमा यांनी चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण चोरटा टाकाळ्याच्या दिशेने पळून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाउंड्री उद्योजक वार्षिक सभा

$
0
0

चार सिंगल फोटो

फाउंड्री उद्योगाला अच्छे दिन

विजय मेनन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'फाउंड्री उद्योगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे काम सुरू आहे. या उद्योगाला सध्या चांगले दिवस आले असून २०२१ नंतर फाउंड्री उद्योग अधिक तेजीने वाढेल', असे प्रतिपादन मेनन अॅण्ड मेनन लि. कंपनीचे कार्यकारी संचालक, ज्येष्ठ उद्योजक विजय मेनन यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमनच्या (आयआयएफ) शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रेसिडन्सी क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. आयआयएफच्या नूतन अध्यक्षपदी चौगुले इंडस्ट्रिजचे सुरेश चौगुले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोकुळ शिरगांवच्या चौगुले स्टील्सचे सुमीत चौगुले, मानद सचिवपदी मेटल सॉफ्ट टेक्नॉलॉजीचे रवींद्र पाटील आणि खजिनदारपदी समीर कास्टींगचे समीर पाटील यांची एकमताने निवड झाली. मावळते अध्यक्ष दीपांकर बिश्वास यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे सोपविली.

विजय मेनन म्हणाले, 'मंदीचा काळ गेल्यानंतर सध्या फाउंड्री उद्योगाला चांगली संधी मिळत आहे. बाजारपेठेत कास्टिंगला मागणी वाढली आहे. निर्यातीचा टक्काही वाढला आहे. सर्वच फाउंड्री उद्योगाला काम आहे, मात्र मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. फाउंड्री उद्योजकांनी सर्वप्रथम फाउंड्रीमधील उत्पादनातील रिजेक्शन कमी केले पाहिजे. आजअखेर ग्राहकांचा विचार केल्याने कास्टिंगचा दर कमी होत आहे. भविष्यात ग्राहकांचा विचार बाजूला ठेवण्याची गरज आहे. संबधित कंपनीकडून चांगल्या दर्जाचे कास्टिंग देऊन त्यांच्याकडून जादा दर मागून घेतला पाहिजे. उत्पादनाचा खर्च केला तरच हा उद्योग फायद्यात येऊ शकेल. सन २०२० मध्ये मालवाहतुकीसह अवजड वाहने स्क्रॅपमध्ये टाकण्याचा निर्णय विचाराधीन आहे. जुनी वाहने स्क्रॅप करावी लागून नवीन वाहने घ्यावी लागतील. त्याचा मोठा फायदा फाउंड्री उद्योगाला होणार आहे.' यावेळी आयआयएफचे मावळते अध्यक्ष दीपांकर बिश्वास यांनी संस्थेचा आढावा घेतला. उपाध्यक्ष सुरेश चौगुले यांनी वर्षभरातील विविध कार्यक्रमाची माहिती दिली. सुमीत चौगुले यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर , सचिन शिरगांवकर, एम बी शेख , नरेंद्र झंवर , शामसुंदर तोतला ,डी डी पाटील, जे सी पारीख , आनंद देशपांडे , संजय पाटील, भरत जाधव ,समीर काळे ,चंद्रकांत जाधव , मिलिंद भावे , महेंद्र राठोड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिव्हाळा कॉलनीत घरफोडी, एक लाख रुपयांचा माल लंपास

$
0
0

लाख रुपयांचा ऐवज लंपास

कोल्हापूर

उत्तरेश्वर पेठ शिंगणापूर रोडवरील जिव्हाळा कॉलनीत चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत शंभू चंद्रकांत मेरवाडे (वय ३० ) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करुन रोख १० हजार ६०० रुपये, १५ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅम सोन्याची बोरमाळ, पाच ग्रॅम सोन्याचे टॉप, चार ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची वेल असा ऐवज चोरुन नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा येथे विवाह समारंभारात मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वधूला खांद्यावरुन नेण्याचा मामांचा हट्ट तर विवाह समारंभास वेळ होत असल्याचा टोमणा वर पक्षातील एका महिलने मारल्याने वधू व वर पक्षातील मंडळी एकमेकांच्या विरोधात भिडली. शुक्रवारी दुपारी कळंबा येथील एका कार्यालयात ही घटना घडली.

कळंबा येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विवाहाच्या मुहुर्ताला पाच मिनिटे शिल्लक असताना वधूचे मंडपात आगमन झाले. यावेळी वधूला नेण्यासाठी तिचे मामा आले. वधूला खांद्यावरुन नेण्याचा हट्ट मामाने धरला. मुहूर्त जवळ आला आहे, वेळ कमी असल्याने खांद्यावर नेण्याचा हट्ट कशाला करता आहात, असे एका महिलेने सुनावल्याने मामाला राग आला. मुहुर्ताचे जसे महत्व आहे तसे मुलीला खांद्यावरुन मामाने नेण्याचीही प्रथा आहे असा जोरदार युक्तीवाद मामाने केला. त्यातून वधू व वर हे दोन्ही पक्ष हमरीतुमरीवर आले. दोन्ही गटातील महिलांमध्ये झोंबाझोबी व मारामारी झाल्याने पाच ते सहा महिला किरकोळ जखमी झाल्या. या वादावादीत ज्येष्ठ नागरिकांनी हस्तक्षेत करत वधूला स्टेजवर नेले व विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, मारामारीतील जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीक’ नगरसेवक टार्गेटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपद मिळवण्यासाठी भाजप आघाडीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडूनही कारभाऱ्यांना चाचपणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या 'वीक' नगरसेवक टार्गेटवर असून, त्यांच्यात असंतोषाची पेरणी करण्याचे काम पद्धतशीरपणे चालवले आहे. विरोधी आघाडीतील नाराजांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न होतील. त्याआधी आपल्याच आघाडीतील ज्यांच्यावर संशय आहे, अशांच्या 'अपेक्षा' पूर्ण करून त्यांना पुढील आठवड्यापासून सुरक्षितस्थळी हलवण्याची शक्यता आहे.

महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी असल्याने या टप्प्यावरच महापौरपदावर कब्जा मिळवायचा यासाठी भाजपच्या पातळीवर जोरदार तयारी केली जात आहे. कोणत्याही पद्धतीने मॅजिक फिगर गाठायची यासाठी हात सैल सोडले जातील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांपासून 'हाताला' फारसे न लागलेले नगरसेवक अस्वस्थ होऊ लागले आहेत. त्यासाठी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत फुटलेल्या मतांचा आकडा बिंबवला जात आहे. राष्ट्रवादीतील अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी पक्षाविरोधात मतदान केले. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना शुक्रवारी झालेल्या प्रभाग समितीच्या सभापती निवडणुकीत त्या दोघांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. यापूर्वी त्या दोघांमुळे भाजप आघाडीचे संख्याबळ ३५ झाल्याचे सांगण्यात येत होते. पण शुक्रवारच्या निवडीनंतर ते दोघे पुन्हा काँग्रेस आघाडीसोबत राहतील, अशी शक्यता दिसत आहे. काँग्रेसमधील रिना कांबळे यांनीही यापुढे काँग्रेस आघाडीसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकारामुळे भाजपला किमान नऊ नगरसेवकांना सोबत घ्यावे लागणार आहे.

राष्ट्रवादीतील संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या नगरसेवकांची चाचपणी सुरू आहे. तशीच काँग्रेसमध्येही पेरणी केली जात आहे. तिथे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या इच्छुकांमधील नाराजांवर भाजपचा डोळा असेल. तसेच 'अर्थ'कारणाने डळमळीत होणाऱ्यांनाही आमिष दाखविले जाणार आहे. भाजपकडून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे समजल्यानंतर काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनीही लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी विरोधी आघाडीतील कोण 'टॅप' होऊ शकते याची चाचपणी करण्यास कारभाऱ्यांना सांगितले आहे. एक-दोन नगरसेवकांना जमा करून भाजपला टप्पा गाठता येणार नाही. त्यासाठी नगरसेवकांकडूनही तयारी दाखविली जात नाही. गटाची जोडणी होत असल्यास आणखी काही नगरसेवक सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराजांचा गट तयार करण्याची चाचपणी केली जात आहे.

काँग्रेस आघाडीकडून भाजप आघाडीतील असंतोषी नगरसेवकांच्या मनात तेथील कारभाराबाबतचा असंतोष आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर आपल्या आघाडीतील जे अस्वस्थ आहेत, त्यांची अस्वस्थता संपवण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात त्या नगरसेवकांना पुढील आठवड्यात सुरक्षितस्थळी पाठविण्याचे नियोजन केले जात आहे. दुसऱ्या आघाडीतील नगरसेवकांना फोडण्यापेक्षा आपल्याच नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याचीही मानसिकता तयार आहे. यातून भाजपच्या हाताला कुणी लागू नये याची दक्षता घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बचत गटाना आवाहन

$
0
0

'बचत गटांच्या

माध्यमातून आत्मनिर्भर व्हा'

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

'महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यात बचत गट चळवळींचे मोठे योगदान असून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून नवनव्या उद्योग व्यवसायांव्दारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे', असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि करवीर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात ग्रामस्वराज्य, आजिविका व

कौशल्य विकास दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार महाडिक म्हणाले, 'बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन आणि महिला सबलीकरणाचे काम प्रभावीपणे होत आहे. महिलांनी यापुढील काळात सरकारच्या विविध योजना आत्मसात करून त्यानुसार विविध व्यवसाय उद्योगाव्दारे आर्थिक परिवर्तनाचा मार्ग स्विकारावा. कौशल्य विकास प्रशिक्षण घेवून जिल्ह्यातील तरूणांनी नोकरी, व्यवसायाच्या नव्या संधी शोधणे आवश्यक आहे. जिल्ह्यात तसेच राज्यात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत मात्र त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे.'

आमदार अमल महाडिक म्हणाले, 'जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात बचतगटांची मोठी चळवळ निर्माण झाली असून बचतगटातील महिलांनी विविध व्यवसाय, उद्योगाव्दारे स्वावलंबी होण्याचा मार्ग यशस्वी करून दाखविला आहे.'

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप यांनी स्वागत केले.. यावेळी प्रशिक्षणार्थी मारूती कांबळे, घरकुल लाभार्थी अर्चना वाघमारे, आशा गुरव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, सोमनाथ रसाळ, अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार, गटविकास अधिकारी शरद भोसले, देवराज बारदेसकर आदी उपस्थित होते.

0000

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत

आज सामुदायिक विवाह सोहळा

कोल्हापूर

धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने सर्व जाती-धर्माच्या जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी ६ मे रोजी सकाळी अकरा वाजून ५४ मि. या मुहूर्तावर होत आहे. न्यू महाव्दार रोडवरील पेटाळा मैदानावर होणाऱ्या या सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी सुमारे ६५ जोडप्यांची नोंद झाली आहे. या सोहळ्यातील जोडप्यांना शुभ आशिर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा सामुदायीक विवाह सोहळा संबंधित जोडप्यांच्या धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे आणि पर्यावरणपूरक करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभोज, हिंगणगावातही बंद ठेवून निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

वारणाकाठच्या पाण्याच्या हक्काच्या लढ्यासाठी शनिवारी कुंभोज व हिंगणगाव गावे पूर्णपणे बंद ठेवून निषेध फेरी काढत वारणा बचाव कृती समितीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. वारणा बचाव कृती समिती कुंभोजच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली होती. त्याला कुंभोज ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

कुंभोज येथे झालेल्या गावसभेत वारणा बचाव कृती समितीच्या समर्थनात व दानोळीत झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी कुंभोज व हिंगणगाव बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत केले होते. यावेळी कुंभोजचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी वारणा बचाव कृती समितीच्या ध्येयधोरणांचा आलेख कुंभोज ग्रामस्थांसमोर वाचून वारणा बचाव कृती समितीचे आंदोलन योग्य असल्याचे सांगितले.

अमृत योजनेस आजपर्यंत वारणा काठावरील पस्तीस गावांनी निषेध, गावबंद, उपोषणे करून विरोध दर्शविला आहे तसेच गावसभेत विरोधाचे ठराव दिलेले आहेत. यावेळी विक्रमसिंह सेवा सोसायटीचे चेअरमन श्रीकांत माळी,पांडुरंग शेंडगे, माजी उपसरपंच कलगोंडा पाटील, विनायक पोतदार, किरण माळी, विनोद शिंगे, सुभाष देवमोरे, सरपंच संमती मासुर्ले, आदींनी मनोगत व्यक्त केले.

----------------------------

फोटो...

कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामस्थांनी गाव पूर्णपणे बंद ठेवून निषेध फेरी काढत वारणा बचाव कृती समितीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिंदे अॅकॅडमी बाल नाट्य शिबीर

$
0
0

बालनाट्य शिबिर

राजारामपुरीतील खरे मंगल कार्यालयाजवळील नेहरू विद्यामंदिर येथे शिंदे अॅकॅडमी आणि बालनाट्य संस्थेच्या वतीने बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दोन मेपासून शिबिर सुरू असून १७ मेपर्यंत चालणार आहे. सकाळी दहा ते पाच या वेळेत शिबिर सुरू असून, ललिता शिंदे (९७६३५३००३२) व नीता शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साप्ताहिक बाजारभाव - लग्न समारंभामुळे नारळाच्या मागणीत वाढ

$
0
0

साप्ताहिक बाजारभाव ... लोगो

..........................

फोटो आहे

..............

पान २ अॅंकर

......................

लग्न समारंभामुळे नारळाच्या मागणीत वाढ

किरकोळ बाजारात २५ रुपयाला एक नारळ , साखर दरात घसरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्या विवाह समारंभांची धामधूम सुरू असल्याने नारळाच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी होत असल्याने किरकोळ बाजारात नारळाचा दर २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. घाऊक बाजारात शेकडा नारळाचा दर सरासरी १,४०० ते १,७०० पर्यंत वाढला आहे. खास हॉटेल्सला लागणाऱ्या नारळाचा दर मात्र २,५०० ते ३,२०० रुपये शेकडा झाला आहे. किराण मालामध्ये साखर व हरभरा डाळीच्या दरात किलोमागे अनुक्रमे तीन व पाच रुपयांची घसरण झाली आहे.

कोल्हापुरात प्रामुख्याने कर्नाटक व तामिळनाडू राज्यातून नारळाची आवक होते. दररोज साधारणत: चार ट्रकमधून सुमारे एक लाख नारळाची आवक व विक्री होते. नारळ उत्पादित क्षेत्रात कमी पावसाचा फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम झाला असतानाच विवाह समारंभ व अन्य समारंभांसाठी नारळाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. मागणी अन् पुरवठ्यामध्ये व्यस्त प्रमाण निर्माण झाल्याने दरात मात्र वाढ झाली आहे. घाऊक बाजारात शेकडा नारळाचा दर १,४०० ते १,७०० रुपये असून किरकोळ बाजारात किरकोळ दर २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर हॉटेल्सला लागणाऱ्या मोठ्या नारळाचा शेकडा दर २,५०० ते ३,२०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

साखर दरात घसरण

गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात साखरेच्या क्विंटलच्या दरात प्रचंड घसरण होऊनही किरकोळ बाजारात मात्र साखरेचे दर स्थिर राहिले होते. साखर दर कमी झाल्याने साखर कारखानदार ओरड करत असताना ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच साखर खरेदी करावी लागत होती. घाऊक बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल तीन हजार पेक्षा कमी झाला असताना ग्राहकांना ३५ रुपयांनी साखर खरेदी करावी लागत होती. या आठवड्यात मात्र साखरेचा दर किलोमागे तीन रुपयांनी कमी झाले असल्याने सरासरी ३२ रुपये किलोने साखर विक्री सुरू आहे. तर अनेक दिवसांनंतर हरभरा डाळीचे दरही कमी झाले आहेत. सध्या किरकोळ बाजारात ५४ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.

............................

किराणा दर (किलोमध्ये)

पोहे : ४२ रु.

साखर : ३२ रु.

शेंगदाणा : ७५ रु.

मैदा : २८ रु.

रवा : २८ रु.

आटा : ३० रु.

गूळ : ४५ रू.

शाबू : ५५ रु.

तीळ : १४० रु.

..................

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ : ७० रु.

मूगडाळ : ७५ रु.

उडीदडाळ : ६५ रु.

हरभराडाळ : ५४ रु.

मसूरडाळ : ६० रु.

मूग : ७६ रु.

मसूर : ८० रु.

चवळी : ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा : ४० ते ६० रु.

काळा वाटाणा : ७२ ते ८० रु.

मटकी : ६० रु.

छोले : १४० रु.

पावटा : १२० रु.

.................

तेलाचे दर (किलोमध्ये)

शेंगतेल : १२४ रु.

सरकी तेल : ९० रु.

खोबरेल तेल : ३०० रु.

वनस्पती तूप : ९० रु.

.....................

बार्शी शाळू: ३६ ते ४० रु.

ज्वारी नं. १ : ३२ ते ३४ रु.

ज्वारी नं. २ : २८ ते ३० रु.

बाजरी : १७ ते २४ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ तालुक्यात कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

इचलकरंजी शहराच्या अमृत योजनेला विरोध दर्शविण्याबरोबरच वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शनिवारी शिरोळ तालुक्यात बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापा-यांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवले.

इचलकरंजी शहरासाठी थेट वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजना मंजूर झाली आहे. दानोळीसह वारणाकाठच्या गावांचा या योजनेस विरोध आहे. बुधवारी या योजनेचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू होणार असल्याची कुणकुण लागताच दानोळी येथे वारणाकाठच्या गावांतील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी या योजनेस विरोध दर्शविला होता. त्यानंतर फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल १४९० जणांवर गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी पोलिसांनी दानोळी येथील ५२ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती.

दरम्यान, वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुका बंदची हाक दिली होती. या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामस्थांनी बंद पाळला. दानोळी ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करून कारवाईचा निषेध करण्यात आला. अनेक गावांत कडकडीत बंदमुळे प्रमुख मार्गावर शुकशुकाट होता. उदगाव, यड्रावसह अन्य ठिकाणी व्यापा-यांनी सकाळपासूनच आपले व्यवहार बंद ठेवले होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांनी यड्राव ग्रामस्थांच्या वतीने वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. चिंचवाड, कोथळी, उमळवाड, चिपरी, जैनापूर, निमशिरगावसह अन्य गावांत बंदमुळे सकाळपासूनच व्यवहार ठप्प होते. उदगाव येथे रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. शिरटीतही बंदच्या आवाहनास प्रतिसाद मिळाला.

फोटो-

इचलकरंजी शहराच्या अमृत योजनेला विरोध दर्शविण्याबरोबरच वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शनिवारी उदगाव येथे व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगिनी महोत्सव

$
0
0

फोटो

...........

भगिनी महोत्सवात भाऊ कदम आणि सुप्रिया पठारे यांची जुगलबंदी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खचाखच भरलेले मैदान, महिला आणि लहान मुलांच्या तुफान गर्दीत भगिनी महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला. दिलखेचक नृत्य, 'चला हवा येऊ द्या' फेम कॉमेडी किंग भाऊ कदम आणि 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' फेम अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची कॉमेडीची जुगलबंदी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनय, सुरेल गायकी असा मनोरंजनाचा आस्वाद कोल्हापूरकरांना यानिमित्ताने अनुभवायला मिळाला. आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमात अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेत्री व नृत्यांगना तेजा देवकर, अभिनेत्री सिया पाटील, गायक राहुल सक्सेना, गायिका शुभांगी केदार या कलाकारांनी केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांसह उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी लहान मुलींच्या ग्रुपने मुजरा नृत्य सादर केले. सिया पाटीलच्या 'लैला ओ लैला' या गाण्याला प्रेक्षकांनी उभा राहून नृत्य करत दाद दिली. राधिका पाटीलच्या 'शांताबाई' ने देखील प्रेक्षकां दाद मिळविली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, चंद्रकांत बराले, उदय पवार, किशोर घाडगे, संगीताताई खाडे आदी यावेळी उपस्थित होते.

महिलांची प्रचंड गर्दी

महोत्सवात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची कॉमेडीची जुगलबंदी अनुभवायला मिळणार असल्याने महिलांनी लक्षणीय गर्दी केली होती. राधिका पाटीलने 'शांताबाई' गाण्यावर महिलांच्यात जाऊन नृत्य केले तेव्हा महिलांनी त्यात सहभागी होत नृत्याचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकाला मारहाण

$
0
0

वाढदिवसाच्या कार्यक्रमात

युवकाला मारहाण

कोल्हापूर

मुस्कान लॉन येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात सात ते आठ युवकांनी केलेल्या बेदम मारहाणीत विद्यानंद शंकरराव जिरगे (वय २९, रा. रंजना रेसिडन्सी, मुक्त सैनिक वसाहत) हा युवक जखमी झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात युवकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुस्कॉन लॉन येथे आजम जमादार यांचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यानंद व त्याचा भाऊ गेला होता. वाढदिवसानिमित भोजनाची सोय करण्यात आली होती. जेवणाच्या पंगतीत वाद झाल्याने बी.टी. कॉलेज परिसरातील सात ते आठ युवकांनी विद्यानंद याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका युवकाने त्याच्या डोक्यात स्वयंपाकाचा झारा मारला. विद्यानंद याच्या डोक्याला जखम झाल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. मारहाण प्रकरणी विद्यानंद जिरगे याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images