Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बेकायदेशीर प्लॉट हस्तांतर, २१० जणांना नोटिसा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शासकीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट व सदनिका जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय अनधिकृतपणे हस्तांतरण केल्याप्रकरणी बापट कँप येथील कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या ७० भूखंडांसाठी २१० मिळकतधारकांना कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मिळकत देणार-घेणार आणि सोसायटीला नोटिसा दिल्या असून, नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत कागदपत्रांसह म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सोसायटीसह दोन्ही मिळकतधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सरकार मालकीची रि.स. नं. २२४,२२८/१ व ७३ मधील सुमारे २६ एकर जागा रहिवासासाठी दिली होती. जमीन देताना तेरा अटी व शर्तींचा समावेश होता. जागा मिळाल्यानंतर सोसायटीने ले-आउट, रस्ते, पाणी स्वखर्चाने करावयाचे होते. तसेच जिल्हाधिका-यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरण, विक्री अथवा भाडेकरारावर देण्यास प्रतिबंध अशा कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केल्यास आहे त्या स्थितीत विनामोबदला जमीन काढून घेणार असल्याचा अटीमध्ये समावेश होता. याच अटींचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जागेची विक्री व हस्तांतरण परस्पर करून सोसायटीने चार एकर जागा नऊ ठिकाणी ले-आउटमध्ये राखीव ठेवलेली आहे. राखीव ठेवलेल्या जागेवर संचालकांनी अतिक्रमण करण्यास परवानगी दिल्याची तक्रार तानाजी वास्कर यांच्यासह नऊजणांनी केली होती. तक्रारीची दखल घेऊन करवीरचे तहसीलदार, मंडल अधिकारी करवीर, भूमापन अधिकारी यांनी चौकशी करून शर्तभंग झाल्याचा अहवाल दिला होता. प्लॉट व सदनिका हस्तांतरण करताना संचालक मंडळाने ठराव केला आहे, पण यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचेही नमूद केले आहे. या अहवालानुसार सदरची जागा सरकारी हक्कात का जमा करू नये अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी २१० सभासद मिळकतधारकांना बजावली आहे. यामुळे मालमत्ता देणारे आणि घेणारे सर्वच मिळकतधारक अडचणीत आले आहेत.

...............

सोसायटीला मिळालेली जमीन - सन १९६४

एकूण सभासद - २,३००

एकूण जागा - २६ एकर

प्लॉट - २२०

...........

सोसायटीवर यापूर्वीही कारवाई

कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीने बेकायदेशीररीत्या प्लॉट हस्तांतरण केल्याप्रकरणी चार वर्षांपूर्वी शहर निबंधकांनी प्रशासक नियुक्तीची कारवाई केली होती. त्यानंतर अशाच पद्धतीने प्लॉटचे हस्तातंरण केल्यानंतर याविरोधात करवीर तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. तहसीलदारांचा तपासणी अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

०००

सोसायटीने बिगर सभासदांना प्लॉट हस्तांतर केलेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नोटिसा मिळाल्या असून, म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत व सरकारच्या अध्यादेशाची मागणी केली आहे. अध्यादेश मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडले जाईल.

संजय निगवेकर, सभासद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेत रोकड टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवसांपूर्वी एटीएममध्ये निर्माण झालेली चलन टंचाई पूर्ववत होत असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रोकड टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बँकेला दररोज १५ कोटींची रोकड आवश्यक असताना केवळ तीन कोटी रुपये मिळत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने बँकेच्या अनेक शाखांमध्ये रोकड टंचाई जाणवत असल्याचे प्रसिद्धीपत्रक बँकेचे सीईओ डॉ. ए. बी. माने यांनी दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, 'गेले आठ दिवस जिल्हा बँकेला रोकड टंचाई जाणवत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि रत्नाकर बँक या करन्सी चेस्ट बँकांकडून रोकडची मागणी केली होती. यापैकी फक्त आयसीआयसीआय बँकेकडून केवळ १० ते १५ टक्के रोकड उपलब्ध होते. मिळालेली सर्व रोकड बँकेच्या सर्व शाखांमध्ये दैनंदिन व्यवहारांसाठी पुरवली जाते. बँकेचे खातेदार, ऊस व दूध उत्पादक, पतसंस्था, नोकरदारांचे पगार, संजय गांधी निराधार योजनांचे पैसे जिल्हा बँकेत जमा होत असल्याने हे सर्व खातेदार रोख स्वरूपात व्यवहार करतात. त्यामुळे या सर्व घटकांकडून रोकडची मागणी वाढू लागली आहे. तसेच खरीप हंगामाचे कर्जवाटप सुरू असल्यामुळे विकास सेवा संस्थांकडून सभासदांसाठी रोख रकमेची मागणी होऊ लागली आहे.'

अपुरी रोकड मिळत असल्याने रोकड पुरवठ्यासाठी बँकेने करन्सी चेस्ट बँकांना विनंती केली आहे. तसेच जिल्हा बँकेकडून मुंबई, ठाणे येथून स्वखर्चाने रोकड आणली जात आहे. तरीही रोकड तुटवडा जाणवत असून, रोकड उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे खातेदारांनी बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन सीईओ माने यांनी केले असून, निर्माण झालेली रोकड टंचाई तात्पुरती असून, यामध्ये लवकर सुधारणा होईल, असा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटक पक्षांचे राजीनामे तयार

$
0
0

खासदार शेट्टींची भूमिका, अध्यक्षपदी महाडिक कायम राहण्याचे संकेत

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत सहभागी सर्व घटकपक्ष एकसंध असून, आम्ही ठरलेल्या वेळेत राजीनामे देण्यास तयार असल्याचे घटक पक्षांच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसा निरोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत आमदार अमल महाडिक यांनी पोहोचविला. घटक पक्षांनी पाच वर्षे सत्तेत सहभागी होण्याचा सूर आळवल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक कायम राहणार असून, केवळ पदाधिकारी बदलाचे संकेत बैठकीतून मिळाले.

गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषद वर्तुळात पदाधिकारी निवडीवरून वातावरण तापले आहे. प्रथम अध्यक्षांचा राजीनामा घ्या, नंतरच आम्ही राजीनामे देतो. अशा विचारांपर्यंत आलेल्या घटकपक्षांतील सदस्यांच्या भूमिकेमुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी घटक पक्षांची शासकीय विश्रामगृह येथे खासदार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राहुल आवाडे, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

शनिवारच्या बैठकीला भाजपच्या वतीने आमदार महाडिक प्रमुख उपस्थित होते. महाडिक यांच्यासमोर खासदार शेट्टी यांनी आपण पदाधिकारी बदलावर ठाम असून स्वाभिमानी व जिल्हा ताराराणी आघाडी केव्हाही राजीनामे देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. महाडिक यांनीही पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार अध्यक्षा महाडिक कधीही राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर घटक पक्षांनी घेतलेली भूमिका पालकमंत्री पाटील यांना दूरध्वनीवरून दिली. सुमारे तीन तासांनंतर बैठक संपत आली असता, आमदार चंद्रदीप नरके यांचे आगमन झाले. आपला गट सत्ताधारी आघाडीसोबत असून, आघाडी जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे नरके यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री विनय कोरे व माजी आमदार संजय घाटगे यांनी आपण आघाडीसोबत असल्याचा निरोप दिला असल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.

००००

पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा

अध्यक्षांव्यतिरिक्त इतर सभापती बदलांसाठी भाजपचे सर्व सदस्य देणार असल्याची भूमिका मांडली जात आहे. अशी भूमिका न घेता, पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेऊन घटक पक्षांना न्याय दिला पाहिजे. घटकपक्ष पाच वर्षे सोबत असल्याचे जाहीरपणे सांगत असताना अशी भूमिका योग्य नसल्याच्या भावना बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार घडविणार 'त्यांचे' मनोमीलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही महिन्यांत खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील दुरावा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रविवारी (ता.२२) दोघांमध्ये मनोमीलन घडविणार आहेत. लोकसभेची जागा कायम ठेवण्यासाठीच त्यांनी या मनोमीलनात पुढाकार घेतला आहे. दरम्यान, दिवसभर जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच महाडिक व मुश्रीफ या दोन नेत्यांत दुरावा निर्माण झाला. विधानसभा, विधानपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद यांसह अन्य काही निवडणुकांच्या निमित्ताने हा वाद अधिक वाढला. दोन महिन्यांपूर्वी तर मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर करत वादाची ठिणगी पेटवली. मंडलिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवारांनी उपस्थित राहावे यासाठी मुश्रीफांनी पुढाकार तर घेतलाच, शिवाय कार्यक्रमाच्या नियोजनातही सहभाग घेतला. प्रा. मंडलिक शिवसेनेचे उमेदवार असतीत, असे पवारांच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. तरीही त्यानंतर दोन-तीनवेळा मुश्रीफांनी 'माझा उमेदवार मी जाहीर केला आहे,' असे म्हणत मंडलिकांच्या पारड्यात वजन टाकण्याचा प्रयत्न केला. यातून दोन्ही नेत्यांतील दुरावा वाढला.

हा दुरावा कमी करण्यासाठी खासदार महाडिक यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात आपण मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, दोन-तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमधील दुरावा कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. याची दखल पवारांनी घेतली असून, दोघांमध्ये मनोमीलन घडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पवार रविवारी कोल्हापुरात येणार आहेत. दिवसभर ते अनेक नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

रात्री महाडिक यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व खास बैठकीचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनास मुश्रीफांना निमंत्रित करण्यात आले आहे. पवारांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्याचे समजते. दोन्ही नेत्यांशी ते चर्चा करून मनोमीलन घडविणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व आहे. सोमवारी पवारांचा आजरा तालुक्यात कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मुश्रीफांच्या पुढाकाराने होत आहे. पवारांचा हा दौरा कार्यक्रमाच्या निमित्ताने असला तरी या दौऱ्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

पवार आज कोल्हापुरात

पवार रविवारी (ता.२२) दुपारी दीडच्या सुमारास हेलिकॉप्टरने कोल्हापुरात येणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे हेलिकॉप्टर उतरणार आहे. तेथून ते हॉटेल पंचशील येथे येणार आहेत. तेथे दिवसभर पक्षाच्या विविध नेते व कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. रात्री महाडिक यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन होणार आहे. रात्री त्यांचा मुक्काम असून, दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२३) आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाइर्क यांच्या स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाच वाजता निपाणी येथे माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांचा अमृतमहोत्सवी गौरव त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट पंच तारळेकर यांचे निधन

$
0
0

अनिरुद्ध तारळेकर

कोल्हापूर: सम्राटनगर तोरणानगर येथील कोल्हापूर जिल्हा क्रिकेट पंच क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध अनिल तारळेकर (वय ४८) यांचे निधन झाले. तारळेकर हे पॅकर्स क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू असलेल्या तारळेकर यांनी गेली वीस वर्षे पंच म्हणून काम केले. ते राज्य क्रिकेट पंच संघटनेचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन- शांताबाई भादुलकर

$
0
0

शांताबाई भादुलकर

कोल्हापूर : कळंबा येथील शांताबाई भादुलकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २२) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिबिर सुरू

$
0
0

कोल्हापूर: प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्रातर्फे शनिवार (ता. २१) पासून स्वानुभव योगधाम शिबिर सुरू झाले आहे. शिबिराचा कालावधी १५ दिवसांचा आहे. सायबर चौकातील काटकर पार्क, कमर्शियल बिल्डिंग, पहिला मजला, योगा हॉल येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत शिबिर होईल. शिबिरात आचार्य नारायण गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी नवीन साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइन दुरुस्तीसाठी एस्टीमेटच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणी प्रश्नावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर प्रशासनाने उपाययोजनेसाठी पावले उचलली आहेत. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन २५ एप्रिलपर्यंत पाइपलाइन गळती, दुरुस्तीसंदर्भात सर्वंकष आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच विविध ठिकाणची पाइपलाइन गळती काढण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांनी अपुरा पाणीपुरवठा व पाइपलाइन दुरुस्तीला विलंब होत असल्याच्या कारणावरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

पाणीपुरवठा विभागाकडील निधीच्या माध्यमातून प्रमुख ठिकाणची कामे हाती घेतली जाणार आहेत. साधारणपणे एक कोटी सात लाख रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. खराब पाइपलाइनची दुरुस्ती व गळती काढण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी व शाखा अभियंता उपस्थित होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अपुऱ्या पाणी प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत खराब पाइपलाइन, पाणीगळती, प्राधान्याने करावयाची कामे यासंदर्भातील माहिती घेतली.

.............................

पाणी गळतीची पाहणी

गजानन महाराजनगर येथे पाइपलाइन गळतीमुळे रोज अडीच लाख लिटर पाणी वाया जाते. नगरसेवक किरण नकाते यांनी सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्त चौधरी यांनी शनिवारी या भागातील पाइपलाइन गळतीची पाहणी केली. या भागातील पाइपलाइन खराब झाल्या आहेत. पाइपलाइन फुटून आजूबाजूच्या घरांत पाणी शिरते हे नकाते यांनी निदर्शनास आणले. आयुक्तांनी तत्काळ पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाचे आदेश दिले. तसेच गजानन महाराजनगर, दत्त कॉलनी व सिंधुनगरी येथील खुल्या जागेची पाहणी केली. क्रीडा संकुल ते हॉकी स्टेडियम रोड ते आयटी पार्क व भक्तिपूजानगर रस्त्याची पाहणी करून एस्टीमेट बनविण्याच्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शनिवारी मुंबईत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे ११ दिवसांनंतरही संप सुरू ठेवण्याचा निर्धार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने केला.

जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी कर्मचारी दररोज धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाची दखल घेऊन राज्यस्तरावर चर्चेसाठी दोनवेळा बैठकीचे नियोजन केले होते. पण बैठकच होऊ न शकल्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दुपारी आरोग्य मंत्री दीपक सावंत, आयुक्त संजीव कुमार, महासंघाचे अध्यक्ष नंदू दातार, उपाध्यक्ष विजय सोनवणे आदी सहभागी झाले होते. बैठकीला कोल्हापुरातून पाच प्रतिनिधी गेले होते. सायंकाळी सात वाजता मागण्या मान्य केल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट केले, पण लेखी आश्वासन देण्यास नकार दिला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बंद मागे न घेण्यावर ठाम राहिले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत महासंघाचे पदाधिकारी लेखी आश्वासनाच्या प्रतीक्षेत होते. शेवटी लेखी आश्वासन न मिळाल्याने, बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

आंदोलनात इम्रान जमादार, संदीप पाटील, इंद्रजित पाटील, हेमंत इंगवले, सुनील खपटे, एस. पी. कुकडे, सलमा पठाण, लता मटकर, पूनम चौगुले, सीमा कदम, उमा पाटील आदी कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याची इंधन दरवाढीने होरपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याचा थेट परिणाम होऊन देशात पेट्रोल व डिझेल या इंधनांचे दर उच्चांकी पोहोचले आहेत. गेल्या ५५ महिन्यांतील हा उच्चांक नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहरांतही दरवाढीची झळ बसू लागली असून, ही वाढ महागाईस चालना देणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याचा भार देशभरात जाणवत आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा लिटरचा दर ८२ रूपये २८ पैसे आणि डिझेलरचा दर ६८ रूपये ९४ पैसे लिटर झाले. शुक्रवारच्या दराच्या तुलनेत पेट्रोल १८ पैसे आणि डिझेलमध्ये १९ पैशांची वाढ झाली. सरासरी सहा महिन्याच्या कालावधीत १० ते वीस पैसे वाढ झाली आहे.

मुंबईत शनिवारी पेट्रोल प्रति लिटर ८२.०६ रु. आणि डिझेल ६९.७० रु. असे दर होते. शुक्रवारच्या तुलनेत ही वाढ अनुक्रमे १३ आणि १६ पैसे होती. दरवाढीमुळे अवजड वाहतूकदारांप्रमाणे एसटी महामंडळाच्या आर्थिक गणितावर परिणाम होत आहे. पेट्रोल, डिझेलची सुरू असणारी दरवाढ महागाईचा पारा आणखी वाढवत असल्याचे मत इंधनदराचे अभ्यासक डॉ. केदार चांडक यांनी व्यक्त केले आहे.

कोल्हापूरप्रमाणेच मुंबई, पुणे, नाशिक, नगर, नागपूरमध्येही इंधनाचे दर दररोज उसळी घेत आहेत. पुण्यातील इंधनवाढ अद्यापही कायम असून, पेट्रोल ८२ रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. जानेवारीत ८० रु.चा टप्पा गाठलेले पेट्रोल आता ८१ रुपये ८० पैसे दराने उपलब्ध आहे. डिझेलचे दरही गेल्या सहा महिन्यांत १० रुपयांनी वाढले आहेत. नाशिकमध्ये शनिवारी पेट्रोलचा दर ८२ रुपये ३० पैसे होते. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे दर सुमारे पाच ते सात रु.नी वाढले आहेत. औरंगाबादमध्येही हीच परिस्थिती आहे. शनिवारी पेट्रोलचा दर ८३.०५ रु. तर डिझेलचा दर ७०.७० रु. होता. चार महिन्यांपूर्वी म्हणजेच २१ डिसेंबर, २०१७ रोजी हेच दर अनुक्रमे ७८.३४ रु. व ६३.१९ रु. होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीने दराने महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. कोल्हापुरात गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत इंधनदरात सरासरी १० ते वीस पैशाची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. कोल्हापुरात शुक्रवारी पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८२ रूपये १० पैसे होता. डिझेलचा लिटरचा दर ६८ रूपये ७५ पैसा होता. २२ एप्रिलला पेट्रोलचा प्रतिलिटर ८२ रूपये २८ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर ६८ रूपये ९४ पैसे झाला आहे. शनिवारी पेट्रोलमध्ये १३ पैसे आणि डिझेलमध्ये १६ पैसे वाढ झाली. रविवारी पेट्रोलच्या दरात १८ पैसे आणि डिझेल दरात १९ पैसे वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल ७६ रूपये ५५ पैसे आणि डिझेल ५९ रूपये ७६ पैसे दर होता. इंधनाचे एप्रिल महिन्यात १५ आणि १७ एप्रिल वगळता रोज दरवाढ झाली आहे.

इंधनदरवाढीने जनतेमध्ये संताप असून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. पेट्रोल दर वाढल्याने कुटुंबाचे बजेट कोलमडले. नोकरी आणि व्यवसायानिमित्त महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहन वापरतात. नोकरदार महिलांना या दरवाढीचा फटका बसणार आहे, अशी प्रतिक्रीया स्वाती पाटील यांनी दिली. तर

'काही व्यावसायिकांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या मापात पाप केले जात आहे. या महागाईच्या आगीत इंधनाची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांची ससेहोलपट होणार आहे, अशा शब्दांत प्रथमेश गणबावले यांनी संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरोलवरील पाच फरार कैद्यांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर मिळालेल्या सुट्टीदरम्यान पळून गेलेल्या पाच कैद्यांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला. सवलतीची सुट्टी संपताच कैद्यांनी पुन्हा कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. मात्र अटींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

गौतमलाल भुवानजी मीना (वय ३६, रा. केरवास, जि. प्रतापगढ, राजस्थान) याला २२ मार्च २०१३ रोजी एक महिन्याची सुट्टी मंजूर झाली होती, पण तो अद्याप दाखल झालेला नाही. चैनसिंह पैपसिंह राठोड (वय ३९, रा. सिकारपूर, जि. जोधपूर, राजस्थान) २२ ऑक्टोबर २०१० पासून कारागृहाबाहेर आहे. बलवीरसिंग इंद्रसिंग महाल (वय ५०, रा. दिनापूर, पंजाब) ६ मे २०१२ पासून एक महिन्याच्या सुट्टीसाठी गेला. मात्र तो परत आलेला नाही. मानजितसिंग जोगिंदरसिंग सैनी (वय ३५, रा. होशियारपूर, पंजाब) १४ मार्च २००८ पासून कारागृहाबाहेर आहे. तसेच रवींद्र मिश्री चौहाण (वय ३४, रा. हुसेनगंज, बिहार) २७ ऑगस्ट २०१६ पासून सुट्टीसाठी गेला. तो अद्याप परत आलेला नाही. या सर्वांविरोधात कारागृहातील अधिकारी उत्तम मारुती पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानपान कोट डॉ. सूरज पवार : मेडिकल टुरिझम वाढणार

$
0
0

कोल्हापुरात कॅन्सर, न्यूरॉलॉजी, कीडनी, पोटविकार, वंध्यत्व, कार्डियाकसह सर्व प्रकारच्या उपचारांसाठी सुपर स्पेशालिटीची सोय उपलब्ध आहे. पुणे, मुंबईसह देशभरातून रुग्ण कोल्हापुरात उपचारासाठी येतात. मात्र, दळणवळणाची सुविधा नसल्याने ते येऊ शकत नव्हते. विमानसेवा सुरू झाल्याने देशभरातून रुग्ण येऊ शकतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदा यापूर्वी मुंबईत घेतल्या जात होत्या. विमानसेवेमुळे अशा परिषदा कोल्हापुरात घेणे शक्य होणार आहे. विमानातून अत्याधुनिक सामग्री सहजपणे उपलब्ध होऊ शकते. रेडिओ अॅक्टिव्ह घटक उपलब्ध झाल्यामुळे न्यूक्लिअर मेडिसीन आणि पेटसिटी स्कॅनची सुविधा मिळणार आहे.

डॉ. सूरज पवार, मुख्य सर्जन आणि कार्यकारी संचालक कोल्हापूर कॅन्सर सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरच्या रुग्ण वॉर्डमध्ये चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर रुग्णालयाच्या दूधगंगा इमारतीत रुग्णांच्या वॉर्डमध्ये चोरीचा प्रकार घडला. चोरट्याने रुग्णाची दहा हजारांची रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली पर्स लंपास केली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. रुग्ण चंद्रकांत राजाराम कदम यांनी पोलिस चौकीत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वॉर्डमधील अन्य रुग्णांची झडती घेतली. मात्र, पर्स सापडली नाही.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील आलोरा येथील चंद्रकांत कदम कावीळ झाल्याने शनिवारी दुपारी उपचारासाठी सीपीआरमध्ये आले होते. दूधगंगा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्डमध्ये त्यांना अॅडमिट केले. सायंकाळी पाचच्या सुमारास चंद्रकांत कदम यांना घेऊन त्यांच्या पत्नी बाथरूमकडे गेल्या. काही मिनिटांनंतर त्या पुन्हा आल्यानंतर त्यांच्या कॉटवरील पर्स अज्ञाताने लंपास केल्याचे लक्षात आले. पर्समध्ये दहा हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यांनी आसपास शोध घेतला. मात्र, पर्स मिळाली नाही. अखेर सीपीआर पोलिस चौकीत जाऊन त्यांनी चोरीची तक्रार दिली. हावलदार पी. के. जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने वार्डमध्ये जाऊन संशयित रुग्णांची चौकशी केली. मात्र, पर्स सापडली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर प्लॉट हस्तांतर, २१० जणांना नोटिसा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शासकीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट व सदनिका जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय अनधिकृतपणे हस्तांतरण केल्याप्रकरणी बापट कँप येथील कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या ७० भूखंडांसाठी २१० मिळकतधारकांना कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मिळकत देणार-घेणार आणि सोसायटीला नोटिसा दिल्या असून, नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत कागदपत्रांसह म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सोसायटीसह दोन्ही मिळकतधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सरकार मालकीची रि.स. नं. २२४,२२८/१ व ७३ मधील सुमारे २६ एकर जागा रहिवासासाठी दिली होती. जमीन देताना तेरा अटी व शर्तींचा समावेश होता. जागा मिळाल्यानंतर सोसायटीने ले-आउट, रस्ते, पाणी स्वखर्चाने करावयाचे होते. तसेच जिल्हाधिका-यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरण, विक्री अथवा भाडेकरारावर देण्यास प्रतिबंध अशा कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केल्यास आहे त्या स्थितीत विनामोबदला जमीन काढून घेणार असल्याचा अटीमध्ये समावेश होता. याच अटींचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जागेची विक्री व हस्तांतरण परस्पर करून सोसायटीने चार एकर जागा नऊ ठिकाणी ले-आउटमध्ये राखीव ठेवलेली आहे. राखीव ठेवलेल्या जागेवर संचालकांनी अतिक्रमण करण्यास परवानगी दिल्याची तक्रार तानाजी वास्कर यांच्यासह नऊजणांनी केली होती. तक्रारीची दखल घेऊन करवीरचे तहसीलदार, मंडल अधिकारी करवीर, भूमापन अधिकारी यांनी चौकशी करून शर्तभंग झाल्याचा अहवाल दिला होता. प्लॉट व सदनिका हस्तांतरण करताना संचालक मंडळाने ठराव केला आहे, पण यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचेही नमूद केले आहे. या अहवालानुसार सदरची जागा सरकारी हक्कात का जमा करू नये अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी २१० सभासद मिळकतधारकांना बजावली आहे. यामुळे मालमत्ता देणारे आणि घेणारे सर्वच मिळकतधारक अडचणीत आले आहेत.

...............

सोसायटीला मिळालेली जमीन - सन १९६४

एकूण सभासद - २,३००

एकूण जागा - २६ एकर

प्लॉट - २२०

...........

सोसायटीवर यापूर्वीही कारवाई

कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीने बेकायदेशीररीत्या प्लॉट हस्तांतरण केल्याप्रकरणी चार वर्षांपूर्वी शहर निबंधकांनी प्रशासक नियुक्तीची कारवाई केली होती. त्यानंतर अशाच पद्धतीने प्लॉटचे हस्तातंरण केल्यानंतर याविरोधात करवीर तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. तहसीलदारांचा तपासणी अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

०००

सोसायटीने बिगर सभासदांना प्लॉट हस्तांतर केलेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नोटिसा मिळाल्या असून, म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत व सरकारच्या अध्यादेशाची मागणी केली आहे. अध्यादेश मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडले जाईल.

संजय निगवेकर, सभासद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा वेचक....आंदोलन

$
0
0

फोटो आहे...

कचरा वेचक महिलांचे ठिय्या आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भीक नको, दान नको, हक्क हवा, हक्क हवा'अशा घोषणा देत कचरावेचक महिलांनी शनिवारी आंदोलन केले. कचरा वेचक महिलांना महापालिकेने कचरा विलगीकरणाच्या कामात सामावून घ्यावे, यासाठी भर उन्हात महापालिकेसमोर ठिय्या मारला. न्याय हक्क मिळण्याबाबतचे फलक आणि घोषणेबाजीने दिवसभराचे आंदोलन लक्षवेधी ठरले.

कोल्हापूर शहरातील ९४० कचरावेचक महिलांचे संघटन आहे. महिलांच्या अधिकार व हक्कासाठी 'वसुधा कचरा वेचक संघटने'ची स्थापना केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आठ एप्रिल २०१६ रोजी घनकचरा व्यवस्थापन कायदा देशभर लागू केला आहे. या कायद्यानुसार कचरा विलगीकरण, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण व पुनर्वापर यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कचरावेचकांना वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्याबाबत स्पष्ट उल्लेख केला आहे.

त्या मागणीसह घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, शहरातील कचरावेचकांचा सर्व्हे करावा, कचरावेचकांना ओळखपत्रे मिळावीत, त्यांना कचरा विलगीकरण व खत निर्मितीचे प्रशिक्षण द्यावे, प्रत्येक वॉर्डमध्ये कचरा वर्गीकरण केंद्राची स्थापना करावी, प्रत्येक कचरावेचकांना हॅण्डग्लोज, मास्क, बूट द्यावेत यासाठी महिलांनी दिवसभर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा आक्काताई गोसावी, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरीना बेपारी, शुभांगी मिसाळ, मंगल गोसावी, सुवर्णा शिंदे, सुनीता गोसावी आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९५ एमएलडी पाण्याचा लागेना हिशोब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासाठी रोज उपसा करण्यात येणाऱ्या १५४.०८ एमएलडीपैकी (दशलक्ष लिटर) तब्बल ९५.६२ एमएलडी पाण्याचा हिशेबच लागत नाही. केवळ ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग होते. गळती आणि पाणी चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वर्षाला १७ ते २७ कोटींपर्यंतचा महसूल बुडत आहे. शहरात चाळीस ठिकाणी पाइपलाइनला मोठी गळती आहे. याची गंभीर दखल घेत येत्या दोन वर्षांत सर्व गळती काढण्याचे नियोजन आहे. यासाठीचा आराखडा येत्या १५ दिवसांत स्थायी समितीला सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना केल्याची माहिती सभापती आशीष ढवळे यांनी दिली.

शहरातील बहुतांश भागात अपुरा व विस्कळीत पाणी पुरवठ्याची समस्या आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरुन गदारोळ झाला. आता नियोजनाच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. सभापती ढवळे यांनी प्रशासनाकडे रोजच्या पाणी पुरवठ्याचा हिशेब मागितला होता. मिळालेल्या माहितीनुसार एकूण पाणी उपशापैकी ६२ टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही. रस्ते विकास प्रकल्पांतील कामावेळी मोठ्या प्रमाणात खोदाई झाली होती. त्यामुळे ठिकठिकाणी गळती सुरु झाली. त्यामुळे रोज साधारण ५० एमएलडी पाणी वाया जाते. पाणी चोरी आणि इतर कारणामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण ४५ एमएलडी आहे. या दोन्हीचा फटका म्हणून वर्षाला २७ कोटीपर्यंतचा महसूल बुडत आहे.

ई वॉर्डासाठी केवळ २७ टक्के उपसा

ए, बी, सी आणि डी वॉर्डातील नळ कनेक्शनधारकांची संख्या ५८,००० आहे. तर ई वॉर्डमध्ये ३४,५०० कनेक्शनधारक आहेत. एकूण उपशापैकी ई वॉर्डासाठी ३८ टक्के पाणी पुरवठा आवश्यक आहे. प्रत्यक्षात २७ टक्केच पुरवठा होतो.

गळतीमुळे रोज वाया जाणारे पाणी

गजानन महाराज नगर : दोन लाख पन्नास लिटर पाणी

सिद्धळ गार्डन प्रभाग- मंगळवार पेठ : एक लाख २५ हजार लिटर

सुभाषनगर पंपिंग स्टेशन : दीड लाख लिटर

तपोवन परिसर : दोन लाख लिटर

कळंबा रिंग रोड : सात लाख लिटरहून अधिक

३७ कोटीची पाणीपट्टी थकीत

पाणी पुरवठा विभागाची थकबाकी मोठी आहे. ए, बी, सी, डी आणि ई भागातील ५९२८ झोपडपट्टीवासियांकडून गेल्या अनेक वर्षापासून पाणीपट्टी भरली नाही. ३९ कोटी ६७ लाखांची पाणीपट्टी थकीत आहे. या वसुलीचे मोठे आव्हान आहे.

शहरात सुमारे चाळीस ठिकाणी पाणी गळतीची समस्या आहे. येत्या दोन वर्षांत गळती काढण्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात १५ दिवसांत आराखडा सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी कोणती कामे करायचे याचा अहवाल मागविला आहे. महापालिका निधीतून गळती काढण्याचे काम करु. जादा निधी लागल्यास सरकारकडून निधी उपलब्ध करु.

आशीष ढवळे, सभापती, स्थायी समिती

०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबतर्फे २६ पासून पेटिंग कार्यशाळा

$
0
0

कल्चर क्लब लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सचा कल्चर क्लब आणि कलर १४ आर्टतर्फे २६ ते ३० एप्रिल या कालावधीत 'पेटिंग कार्यशाळा' आयोजित केली आहे. राजारामपुरी दुसरी गल्ली येथील कलर १४ आर्ट गॅलरी येथे सकाळी दहा ते एक या वेळेत कार्यशाळा होईल. सहभागी होण्यासाठी सहा ते चौदा वर्षे वयोगट आहे. पेटिंगमधील कॅनव्हॉस, फॅब्रिक आणि वुडन प्रकारातील आइस्क्रीम स्टिक, पेटिंग, कॅनव्हॉस पेटिंग, थ्री डी ड्राईंग, अल्फाबेट ड्राईंग, वुड पेटिंग, ग्ल्यू गन पेटिंग शिकविले जाणार आहे. सहभागी होणाऱ्यांना सर्व साहित्य संयोजकांतर्फ दिले जाणार आहे. सहभागासाठी नावनोंदणी अत्यावश्यक आहे. त्यासाठी राजारामपुरी येथील कलर आर्टमध्ये संपर्क साधावा. कल्चर क्लब सदस्यांसाठी एक हजार रुपये आणि इतरांसाठी तेराशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा कारखानदार, शेतकरी सरकारला धडा शिकवतील - राजू शेट्टी

$
0
0

कारखानदार, शेतकरी धडा शिकवतील

खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी याकडे केंद्र व राज्य सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. अशीच पद्धत शेतकऱ्यांच्या एफआरपीबाबत अवलंबली जात असून कारखानदार व शेतकरी यांच्यामध्ये वाद निर्माण करून भाजप सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. या भूमिकेमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात कारखानदार व शेतकरी भाजप सरकारला धडा शिकवतील,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या बैठकीदरम्यान प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, 'एफआरपी अधिक २०० रुपयांवर आजही स्वाभिमानी संघटना ठाम आहे. देशात साखरेचे २९० लाख टन उत्पादन झाले आहे. अतिरिक्त साखरेचे उत्पादन होणार याचा अंदाज केंद्र सरकारला असतानाही निर्यातीबाबत निर्णय घेतला नाही. त्याचा फटका कारखानदारांना व शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या साखर निर्यातीचा निर्णय घेतला असून उत्पादित साखरेतील दहा टक्के साखर निर्यात केली तरी, देशातंर्गत साखरेचे भाव वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कमी दरात साखर निर्यात केली, तरी उर्वरित ९० टक्के साखरेला चांगला दर मिळणार आहे. मात्र अशा शेतकरी हिताच्या निर्णयाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. याचा परिणाम कारखानदार व शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत असून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने ही भूमिका न बदल्यास भविष्यात कारखानदार व शेतकरी सरकारला धडा शिकवतील असा इशारा दिला.'

'दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रपती यांच्याकडे जून महिन्यात सात दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. विशेष अधिवेशन मागणीला देशातील ३२ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. देशाप्रमाणे राज्यातून पाठिंबा मिळण्यासाठी एक मे महाराष्ट्रदिनी होणाऱ्या राज्यातील सर्व ग्रामसभेमध्ये विशेष अधिवेशनाचा ठराव करण्यात येणार आहे. ग्रामसभेतील सर्व ठराव राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. विशेष अधिवेशनासाठी २७ एप्रिल रोजी राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवर देशातील १९२ शेतकरी संघटना एकत्र आल्या असून अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. संसदेमधील वेळ व पैसा वाया गेल्याबद्दल भाजपने संपूर्ण देशात एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. सरकारला शेतकऱ्यांच्याबद्दल चाड असल्याने विशेष अधिवेशन घेऊन कृतज्ञता दाखवावी, असा टोलाही खासदार शेट्टी यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजीसीए पाहणी ते विशेष विमान

$
0
0

२५ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापूर विमानतळाला प्राधिकरण आणि हवाई वाहतूक संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पथकाने तीनवेळा पाहणी केली. पहिल्या पाहणीत जिल्हा प्रशासनाला सुमारे वीस अटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. अटींची पू्र्तता केल्यानंतर टूबी लायसन्स देण्यात आले. विमानसेवेचा आनंद घेण्यासाठी विमानतळावरून १७ एप्रिलला मुंबईकडे विशेष विमान झेपावले. या विमानातून अंध, अपंग, शेतकरी दाम्पत्य, कचरा वेचक महिलांनी प्रवास केला. केवळ चित्रात आणि चित्रपटात विमान पाहिलेल्यांना प्रत्यक्ष विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएस परिसरात दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा

$
0
0

दोघा भामट्यांकडून

वृद्धाची चेन लंपास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीबीएस परिसरात स्टेशन रोडवर दोघा भामट्यांनी वृद्धाला गंडा घालून त्यांच्याकडील आठ ग्रॅमची सोन्याची चेन लंपास केली. हा प्रकार गुरुवारी (ता. १९) रात्री साडेसातच्या सुमारास घडला. याबाबत भाऊ तातोबा चव्हाण (वय ६०, रा. उदगाव धरणग्रस्त वसाहत, शिरोळ) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस भामट्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ चव्हाण गुरुवारी कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. काम संपल्यानंतर गावी जाण्यासाठी ते स्टेशन रोडवरून सीबीएसकडे निघाले होते. रात्री साडेसातच्या सुमारास ते दाभोलकर कॉर्नर चौकात पोहोचले. यावेळी अंदाजे २० वर्षे वयाच्या तरुणाने त्यांना अडवून 'तुम्हाला पाठीमागे कोणीतरी बोलवत आहे,' असे सांगितले. तेव्हा मागे थांबलेल्या अंदाजे ३० वर्षीय तरुणाने 'मला ओळखले का? मुलंबाळं कशी आहेत?' अशी विचारपूस करत चव्हाण यांच्याकडे असलेल्या पिशवीत काय आहे याची चाचपणी केली. त्याने चव्हाण यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून त्यांच्या खिशातील शंभर रुपयांच्या नोटेत ठेवून पुडी बांधली. नोटेत चेन ठेवल्याचे सांगून त्याने चव्हाण यांना घरी जा, असे सांगून दोन्ही भामटे निघून गेले.

काहीवेळाने चव्हाण यांनी खिशातील पुडी पाहिली असता त्यात सोन्याची चेन नव्हती. त्यांनी मागे जाऊन संशयितांचा शोध घेतला. मात्र ते निघून गेले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी दोघा अज्ञातांनी १५ हजार रुपयांची चेन लंपास केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images