Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मतदार यादी २६ रोजी प्रसिद्ध होणार

$
0
0

मतदार यादी

२६ ला प्रसिद्ध होणार

कोल्हापूर

राज्य निवडणूक आयोगाकडून जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २६ एप्रिल रोजी प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस व अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यापूर्वी १८ एप्रिल रोजी प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस व अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार होती. पण काही तांत्रिक कारणामुळे संबंधीत मतदार याद्या प्रसिध्द करण्यात अडचणी आल्याने आता २६ रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी बिल भरा दारातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन पाणी बिल भरण्यापेक्षा आता घराच्या दारातच बिल भरता येणार आहे. मीटर रीडरने बिल दिल्यानंतर त्याच्याकडेच पैसे भरण्याची सुविधा एक मेपासून शहरातील सर्व प्रभागांत देण्यात येणार आहे. रोख तसेच कार्ड पेमेंटही करता येणार आहे. सध्या पाच प्रभागांत प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा राबविली जात आहे. याबरोबरच कचऱ्याचे कंटेनर उचलण्यासाठीही संगणकीकृत नव्या सिस्टिमचा वापर केला जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत विविध विभागांच्या असलेल्या तक्रारी आयव्हीआरएस यंत्रणेद्वारा नोंदविण्याची सुविधा दिली आहे. या यंत्रणेद्वारा नोंदविली जाणारी तक्रार सोडविण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कालावधी दिला आहे. त्यामुळे तक्रारींचा निपटारा होऊ लागला आहे. दररोज किमान दहा तक्रारी नोंद होत आहे. पैकी दोन ते चार तक्रारींचा निपटारा केला जातो. यानंतर महापालिकेने पाणीपुरवठा विभागामध्ये स्पॉट बिलिंगची सुविधा राबविण्याचे ठरवले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पाच प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा दिली. या माध्यमातून गेल्या आठवडाभरात जवळपास सव्वा लाख रुपयांची पाणीपट्टी जमा झाली आहे.

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'पाच प्रभागांतील अनुभव पाहता एक मेपासून सर्व प्रभागांत मीटर रीडरकडे पाण्याचे बिल भरण्याची सुविधा दिली जाणार आहे. रीडरने स्पॉट बिल दिल्यानंतर त्याच्याकडे बिलाचे पैसे भरता येणार आहेत. नागरिकांनी बिलाप्रमाणेच पैसे भरल्याची पावती आवर्जून घ्यावी. रोख पैसे देण्याबरोबरच कार्ड पेमेंटचीही सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी बँकेबरोबर चर्चा केली असून, लवकरच पॉस मशिन येतील. याशिवाय ज्यांना शक्य नसेल, त्यांना नेहमीप्रमाणे नागरी सुविधा केंद्रात जाऊन वा ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा वापरता येईल.'

कचरा उठावाबाबतही प्रशासनाने शिस्त लावण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला असल्याचे सांगत डॉ. चौधरी म्हणाले, 'कचरा कंटेनर ट्रॅकिंग सिस्टिमचा अवलंब करण्यात येणार आहे. कचरा उठाव करणाऱ्या गाडीवरील कर्मचारी व आरोग्य निरीक्षक यांना वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार त्या वेळेपूर्वीचा व त्या वेळेनंतरचा फोटो यंत्रणेवर अपलोड करावा लागणार आहे. शहरात ७५० कंटेनर आहेत. नव्या सिस्टिममुळे त्या कंटेनरमधील कचरा उठाव होत नाही, अशा तक्रारी करण्यास वाव राहणार नाही.

......

'रोकेम'च्या प्रकल्पासाठी आयआयटी

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राट दिलेल्या रोकेम कंपनीकडून १५ मेपासून प्रक्रियेचे काम सुरू केले जाणार आहे. कंपनीकडून भविष्यात कचऱ्यावरील प्रक्रियेत काही अडचण येऊ नये यासाठी तांत्रिक मुद्द्यांच्या तपासणीसाठी आयआयटीसारख्या प्रसिद्ध संस्थेची नेमणूक केली आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी आयआयटीकडून रोकेमच्या आराखड्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प सुरू झाल्यानंतर दर तीन महिन्यांनी प्रकल्पाची पाहणी केली जाणार आहे. यासाठी आयआयटीबरोबर पत्रव्यवहार झाल्याची माहिती आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७३ डॉलरवर पोहोचल्याचे परिणाम राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी दिसून आले. दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर ७४.०८ रुपयांची पातळी गाठली. दिल्लीत गेल्या पाच वर्षांतील हा उच्चांकी पेट्रोलदर ठरला. यापूर्वी सप्टेंबर २०१३मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७४.१० रुपयांवर पोहोचला होता. मुंबई, कोलकाता व चेन्नई या अन्य महानगरांतही पेट्रोलचे दर शुक्रवारी चढेच राहिले. या तीन शहरात पेट्रोलचे दर अनुक्रमे ८१.०३, ७६.७८ व ७६.८५ रुपयांवर पोहोचले. कच्च्या तेलाची मागणी कमालीची वाढल्याने इंधन पुरवठादार देशांनी कच्च्या तेलाची निर्यात आखडती घेतली आहे. याचा थेट परिमाण कच्च्या तेलाच्या दरवाढीवर झाला असून पर्यायाने पेट्रोल व डिझेलचे दरही चढे राहिले आहेत.

दरम्यान, कोल्हापुरात पेट्रोलचा दर ८२ रुपये १० पैसे झाला असून डिझेलचा ६८ रूपये ७५पर्यंत गेले आहे. गेल्या सहा महिन्यात पेट्रोलचा प्रतिलिटर सरासरी सहा ते सात तर डिझेलचा दर लिटरला ११ रूपयांनी वाढला आहे. किमती आणखी वाढल्यास पेट्रोल शंभर रुपये लिटरपर्यंत जाऊन महागाईचा भडका उडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे इंधन दरही वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यात सरासरी १० पैशापासून ४५ पैशापर्यंत ही वाढ झाली आहे. १ नोव्हेंबरला पेट्रोलचा लिटरचा दर ७६ रूपये ५५ पैसे होता. तोच दर आता ८२ रूपये १० पैसे झाला आहे. डिझेल लिटरचा ५९ रूपये ७६ चा दर ६८ रूपये ७५ पैसे झाला आहे. सध्या आंतराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर प्रति बॅरल ७१. ८५ अमेरिकन डॉलर आहे. तो ८० डॉलरवर गेल्यास पेट्रोलचा दर ९० रुपये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कच्च्या तेलाचे दर आणि इंधनच्या किमतीत मोठी तफावत दिसते. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारला जात आहे. शिवाय दोन रूपये दुष्काळी करासह विशेष करही आकारला जातो. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल आठ आणि डिझेल अडीच रूपये स्वस्त आहे.

कोल्हापुरातील सहा महिन्यातील

महिना पेट्रोल डिझेल

नोव्हेंबर ७६. ५५ ५९.७६

डिसेंबर ७६. ६४ ६०. ३९

जानेवारी ७७.९७ ६२. ६७

फेब्रुवारी ८०. ९५ ६७. २९

मार्च ७९. ७० ६५. ६७

१ एप्रिल ८१. ७१ ६७.९४

२१ एप्रिल ८२. १० ६८. ७५

००

जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आहे. सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. इंधनाचा 'एक देश, एक दर' असल्यास वाहनधारकांना फायदा होईल. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळते. परिणामी सीमाभागातील ग्राहक तिकडे जातात.

जयकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन

००

वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. प्रतिलिटर पन्नास पैसे किंमत वाढ झाली तरी शेवटी त्याचा फटका वाहनधारकांना बसतो. जीवनावश्यक बाब म्हणून इंधनाच्या किमती आटोक्यात ठेवण्याची गरज आहे.

विनायक देसाई, वाहनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विराट सम्यक ऐक्य मिरवणूक उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (ता.२२) विराट सम्यक ऐक्य मिरवणूक आणि परिवर्तन ऐक्य सभेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. करवीर नगरीतील सर्वच जाती-धर्मातील बांधवांना एकत्र घेऊन जयंती साजरी केली जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

दसरा चौक येथून रविवारी दुपारी तीन वाजता महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते व पोलिस अधीक्षक संजय मोहिते, समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचे उद्घाटन होणार आहे. डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर केला जाणार आहे. मिरवणुकीत राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांची भेट, माणगाव परिषद, महाड चवदार तळे सत्याग्रह या विषयांवरील चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, संविधान निर्मिती, मनुस्मृती दहन, पुणे करार, धम्म दिक्षा समारंभ, भीमा कोरेगाव विजय स्तंभ, धम्म रथ, सर्वधर्मसमभाव मानणारे आम्ही कोल्हापूरकर या विषयांवरील फलक मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआर परत दसरा चौक असा मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे.

मिरवणुकीनंतर परवर्तन ऐक्य सभा होणार आहे. पत्रकार संजय आवटे यांचे 'लोकशाहीपुढील आव्हाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर व्याख्यान होणार आहे. १९२० मध्ये माणगाव येथे अस्पृश्यता परिषद भरविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आप्पासाहेब पाटील आणि नागोजी कांबळे यांच्या घराण्यातील वारसदार अॅड. विनित विक्रमसिंह पाटील, राहुल शंकर कांबळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वासराव देशमुख, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, मंगलराव माळगे आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजू मुलींच्या दातांचे होणार क्लिनिंग

$
0
0

फोटो आहे

गरजू मुलींच्या दातांचे

मोफत क्लिनिंग उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील गरजू मुलींच्या दातातील वाकडेपणा दूर करण्याबरोबरच दर सहा महिन्यांनी दातांचे मोफत क्लिनिंग करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी दहा डेंटीस्टची टीम तयार केली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली.

गणेशोत्सव काळात पालकमंत्री पाटील यांनी झोपडपट्टीतील मुलींच्या दातांचा वाकडेपणा दूर करण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ३१ मुलींची वैद्यकीय कक्षाकडे नोंद झाली असून त्यातील १८ मुलींच्या वाकड्या दातांवर शस्त्रक्रिया करुन क्लिप बसविण्यात आल्या आहेत. पालकमंत्री पाटील यांनी शस्त्रक्रिया झालेल्या मुली व त्यांच्या पालकांसमवेत अयोध्या हॉटेल येथे संवाद साधला.

'आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील गरजू मुलींच्या दातातील वाकडेपणा दूर करण्यासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व करुन या मुलींचे दात नीटनेटके केले जातील', अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. सिध्दगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने मानवतेच्या आणि सामाजिक भावनेतून उपक्रमा पार पाडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अंजली पाटील, सिध्दगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण नाईक, डेंटीस्ट डॉ. दिप्ती भिर्डी, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, प्रसाद वळंजू, नितीन पाटील, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिळवणी गावाचा गौरव

$
0
0

ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत तिळवणीची निवड

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

' ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमांतर्गत समाविष्ट सात योजनांचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्याचा बहुमान तिळवणी गावाने पटकावला आहे. या गावाच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी सरकार कटिबध्द राहील', अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्यातून हातकणंगले तालुक्यातील तिळवणी गावाची निवड करण्यात आली असून या गावास पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थींना गॅस कनेक्शनचे वाटप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिळवणी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पंचायत समितीच्या सभापती रेशमा सनदी, उपसभापती सविता कदम, जि. प. सदस्या विजया पाटील, सरपंच शकुंतला चव्हाण आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'या अभियानांतर्गत देशातील २० हजार गावांची निवड झाली असून महाराष्ट्रातील १९२ गावे तर कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ तिळवणी गावाची निवड झाली आहे. हे अभियान १४ एप्रिल पासून सुरु झाले असून पाच मे पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना गॅस कनेक्शन, सहज बिजली घर योजना, उज्वला योजना, जनधन योजना, जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.' या योजनांची कामे तिळवणी गावात १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, 'जिल्ह्यात १४ एप्रिल ते पाच मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात असून या अभियानातील समाविष्ट योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले आहे. तिळवणी गावात ८१४ घरांना या सर्व सुविधा १०० टक्के उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या गावाच्या विकासासाठी प्रशासन अधिक सज्ज आणि सतर्क राहील. तिळवणी गावासाठ स्वच्छ भारत अभियानांतर्गत १८ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर केली असून ती लवकरच मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.' निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

भारत पेट्रोलियमचे प्रशांत सुर्यवंशी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने, गटविकास अधिकारी शरद माळी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी राहुल माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात १ ठार

$
0
0

फोटो

.................

अपघातात एक ठार

पन्हाळा

कोडोली (ता.पन्हाळा)येथे सर्वोदय चौक ते पोखले फाटा या रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या प्रकाश पांडुरंग ढेरे (वय ५०,रा. आनंदनगर, कोडोली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ढेरे हे गुरुवारी सायंकाळी आठवडा बाजार आणण्याकरीता बाजारात गेले होते. सायंकाळी आठच्या सुमारास बाजार घेऊन येत असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला जोराचा मार बसला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ढेरे हे गवंडी काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर अवतरले लाल वादळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचे सुरू असलेले खासगीकरण, हमीभाव आणि विचारवंताच्या खुन्यांना पकडण्यात अकार्यक्षम ठरलेल्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे हजारो कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. 'कष्टकरी कामगारांचा विजय असो', 'तक्त बदलो, राज बदलो' अशा घोषणा देत पक्षाचे झेंडे आणि विचारवंतांची पोस्टर हातातून घेऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. भाकपच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोर्चाद्वारे असंतोष व्यक्त केला. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिल्यानंतर झालेल्या सभेत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली.

शिक्षणाचे खासगीकरण आणि धार्मिकीकरण, असंघटित कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे निर्णय आणि पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ अशा सर्वच घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या भाकपच्या वतीने पाच जिल्ह्यांच्या विभागीय मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली टाउन हॉल येथून सुरुवात झाली. मोर्चाची वेळ दुपारी १२ वाजता असताना पक्षाचे कार्यकर्ते सकाळी साडेदहापासून मोर्चास्थळी दाखल झाले होते. 'आमदार-खासदारांना पेन्शन, मग आम्हाला का नाही?', 'कष्टकरी कामगारांचा विजय असो', 'गोविंद पानसरे अमर रहे', 'मोदी, फडणवीस, पालकमंत्री चले जाव' असा नारा देत मोर्चाला सुरुवात झाली.

मोर्चा टाउन हॉल, माळकर तिकटी, शिवाजी रोड, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. हातात पक्षाचे झेंडे, छत्रपती शाहू, भगतसिंग, पानसरे यांची पोस्टर घेऊन हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिला, युवक व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे दोन तासांच्या मोर्चानंतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह कायम होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर सभा सुरू झाली.

सभा सुरू झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, दिनकर सूर्यवंशी, अनिल चव्हाण यांचा समावेश होता. निवासी जिल्हाधिकारी शिंदे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आल्यानंतर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सांगलीचे रमेश सहस्रबुद्धे म्हणाले, 'डॉ. दाभोलकर, पानसरे यांचे खुनी कोण आहेत हे माहीत असूनही सरकार त्यांना पकडत नाही. तपास यंत्रणांनीही तपास करण्यास सक्षम नसल्याचे कोर्टापुढे सांगितले आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम सरकारला लाल वादळ उलथवून टाकेल. यासाठी कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे.'

सोलापूरचे प्रवीण मस्तूद म्हणाले, 'जाती-धर्माचा आधार घेऊन सर्वसामान्यांवर दोन्ही सरकारकडून हल्ला केला जात आहे. सरकारविरोधातील आवाज 'मेस्मा'च्या माध्यमातून दाबला जात आहे. १,३०० शाळा आणि २५ अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्ती बंद करून विविध समाजांना आरक्षणाचे गाजर दाखविले जात आहे. आश्वासनाच्या माध्यमातून जनतेची फसवणूक करताना अण्णा हजारेंसारखे बुजगावणे उभे केले जात असून महिला, मुलींवर अत्याचार होत असून याविरोधात आवाज उठवणाऱ्या बापाला धमकी दिली जात आहे. ज्या देशात बापच सुरक्षित नाही, तेथे महिला कशा सुरक्षित राहणार आणि 'बेटी बचाव' मोहीम कशी यशस्वी होणार?'

'गोरगरिबांसाठी लढणारे पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या डॉ. दाभोलकरांचे खुनी सापडत नाहीत. दोन्ही खून सरकार पुरस्कृत असून, सरकारला देशाचे संविधान संपवायचे आहे. आपले अपयश लपविण्यासाठी सरकार जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सतीशचंद्र कांबळे यांनी केला.

यावेळी पुण्याच्या लता भिसे, शाम चिंचणे, अरविंद जक्का यांची भाषणे झाली. मोर्चात दत्ता मोरे, सुमन पाटील, सुमन पुजारी, स्वाती क्षीरसागर, हणमंता लोहार, रघुनाथ कांबळे, नामदेव पाटील, सुनंदा खाडे, गिरीश फोंडे, मारुती निकम यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

.........................

मोर्चातील मागण्या...

विचारवंतांच्या खुन्यासह सूत्रधारांना कडक शिक्षा द्या

दीडपट हमीभाव व विनाअट कर्जमफी, पेन्शन द्यावी

असंघटित कामगारांना किमान वेतन द्या

शिक्षणाचे खासगीकरण व धार्मिकीकरण बंद करा

महिलांवरील अत्याचार थांबवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफीचे होणार लेखापरीक्षण

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दिलेल्या कर्जमाफी खात्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी कोल्हापूर विभागातील २५१ लेखापरिक्षकांसह, जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधक यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी (ता. २३) सातारा जिल्हा बँकेत सकाळी साडेदहा वाजता प्रशिक्षण सत्र होणार आहे. लेखापरिक्षणात कर्जखाते अपात्र ठरल्यास दिलेली कर्जमाफी परत घेतली जाणार आहे.

सलग दोन वर्षाचा दुष्काळ आणि गारपीटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला होता. शेतकऱ्यांनी हमीभावासह पूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या संपानंतर सरकारने जून २०१७ मध्ये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. कर्जमाफी जाहीर करताना अनेक निकष लावण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. याविरोधात विरोधी पक्षांसह शेतकऱ्यांनी असंतोष व्यक्त केल्यानंतर निकषांमध्ये बदलही करण्यात आले. पुन्हा दिलेल्या कर्जमाफीच्या खात्याचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिल्याने या निर्णयावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने सुरूवातीला ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात आतापर्यंत १४ हजार कोटीचीच माफी मिळाली आहे. कर्जमाफीची रक्कम वाढवण्यासाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवली असताना दिलेल्या कर्जमाफीच्या खात्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाली आहे. अद्यापही काही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या खात्यांची तपासणी सुरू असतानाच दिलेल्या कर्जमाफीच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. प्रशिक्षण सत्रात दीड लाखांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी मिळालेल्या व प्रोत्साहनपर अनुदान मिळालेल्या खात्यांच्या तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रत्येक लेखापरिक्षकांना एक हजार खाती तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. कर्जखात्यात त्रुटी आढळल्यास आणि कर्जमाफीचा लाभ घेतलेला असल्यास मिळालेली कर्जमाफी परत जाणार असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

०००००००००००००

कर्जमाफी दृष्टिक्षेप

थकबाकीदार : १८, ३३६

प्राप्त रक्कम : ६३ कोटी तीन लाख

प्रोत्साहनपर अनुदान शेतकरी : १,७२,८५७

रक्कम : २६९ कोटी ७३ लाख

एकूण लाभार्थी : १,९१,१९३

रक्कम : ३३३ कोटी ३३ लाख

विभागातील कर्जमाफी : ९५१ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्र जामदार यांचे निधन

$
0
0

राजेंद्र जामदार

कोल्हापूर

मंगळवार पेठ, नंगीवली तालीम, पोवार गल्ली येथील राजेंद्र रामचंद्र पोवार जामदार (वय ५५) यांचे निधन झाले. हॉटेल सुनीलराज ते मालक होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघे ठार

$
0
0

दोन सिंगल फोटो

...................

देवरवाडी येथे डंपरच्या

धडकेत दोघेजण ठार

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

वधूवरांना आहेर देण्यासाठी लखोटा आणायला गेलेल्या दोघांचा लग्न मंडपानजीकच उतारावरुन येणाऱ्या डंपरने मागून धडक दिल्याने मृत्यू झाला. जोतिबा भरमू पवार (वय ४२) व चाळोबा लक्ष्मण रेबुळकर (वय ३९, दोघेही रा. ढेकोळी, ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. देवरवाडी (ता. चंदगड) येथे शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ही दुर्घटना घडली. धाकलू मेलगे यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला.

याबाबत अधिक माहीती अशी, जोतिबा पवार व चाळोबा रेबुळकर हे दोघे जंगमहट्टी येथील नातेवाईकांच्या लग्नाला ढेकोळीहून देवरवाडी येथे आले होते. लग्नाच्या अक्षता पडल्यानंतर या दोघांनी वऱ्हाडी मंडळींसमवेत भोजन केले. लग्न लागल्यानंतर आहेर देण्यासाठी काही अंतरावर असलेल्या दुकानातून आहेर देण्यासाठी लखोटा आणण्यासाठी आपल्या मोटरसायकलने (एम एच-०९, इडी, ८१६५) जात होते. महिपाळगड ते शिनोळी रोडवर देवरवाडी येथे मलगोंडा रुद्राप्पा पाटील यांच्या घरासमोरुन दोघेजण मोटरसायकलवरून जात होते. यावेळी उतारावरून वेगाने येणाऱ्या पेव्हरब्लॉकने भरलेल्या अवजड डंपरने (केए-०५, एबी, २२५३) पाठीमागून मोटरसायकलस्वारांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, यामध्ये दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना ही माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी एकच गोंधळ उडाला. मृत जोतिबा यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असून चाळोबा यांना पत्नी एक मुलगा व मुलगी आहे. चंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात मृतदेहांचे शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

चौकट

अन्यथा आणखी मोठा अनर्थ ...

ज्या ठिकाणी लग्न होते, त्याच्या शेजारीच ही अपघाताची घटना घडली. यावेळी मंडपाच्या आजूबाजूला जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. डंपर तसाच पुढे गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

....................

फोटो ओळी - जोतिबा पवार, चाळोबा रेबुळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिद्रापूर येथे कलशारोहण सोहळा

$
0
0

फोटो

....

निमशिरगाव पंचकल्याण

महोत्सवात मौजीबंधन संस्कार

चंद्रप्रभू भगवंतांची प्रतिष्ठापना , हजारोंची उपस्थिती

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

निमशिरगाव (ता.शिरोळ) येथे सुरू असलेल्या श्री १००८ भगवान चंद्रप्रभू तीर्थंकर मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवात ७६ मुलांवर मौजीबंधन संस्कार करण्यात आले. यावेळी यज्ञोपवित संस्कार, अक्षतारोपण, अष्टमुलगुण व्रत संस्कार करण्यात आले. याप्रसंगी श्री १००८ भगवान चंद्रप्रभू तीर्थंकर मुर्तीची प्रतिष्ठापना व १००८ कलशाभिषेक हजारोंच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाला.

सकाळी केवलज्ञान कल्याण, मंत्रन्यास, सर्व मूर्तीची प्रतिष्ठापना, आदिवासना, शिखरावरती कलशारोहण झाले. हत्तीवरून मंगलकुंभ आणण्यात आले. त्यानंतर मौजीबंधन संस्कार झाले. मौजी बंधन झालेल्या सर्व बालकांना सकाळी सात वाजता हळद, उटनेसह सुवासिनींनी मंगलस्नान घातले. भगव्या रंगाची गळ्यात झोळी, हातात पूजेचे पात्र, उंबराची काठी, गळ्यात हार, कपाळाला मंडोळ्या, डोक्याचे मुंडण हे रूप पूर्ण मंडपात दिसत होते. आचार्य श्री १०८ निश्‍चयसागर महाराज व प्रतिष्ठाचार्य महावीर उपाध्ये यांनी या मुलांवरती संस्कार केले. याला संगीतकार मनोज पाटील यांनी साथ दिली.

यानंतर समोशरण रचना, धर्मोपदेश, प्रश्‍नोत्तर, दिव्यध्वनी, निर्वाणकल्याण, संघपूजा झाली. दुपारी मान्यवरांचा तसेच योगदान दिलेल्या श्रावकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कलाशाभिषेक, ध्वजाअवरोहण, कंकणविमोचन, विसर्जन करण्यात आले. सायंकाळी भव्य रथोत्सव मिरवणूक निघाली. महोत्सवास खासदार राजू शेट्टी, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजगोंडा पाटील, सावकार मादनाईक, सागर शंभुशेटे, शैलेश चौगुले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

------------------------------------------------------------------------------------------

फोटो

खिद्रापूर येथे कोपेश्‍वर

मंदिरात कलशारोहन

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

'कोपेश्‍वर भगवान की जय...' च्या जयघोषात मंगलमय वातावरणात शांती पाठ, मंगलचरण, स्थापित देवता, षोडशोपचार पूजन यासह विविध धार्मिक विधीनंतर खिद्रापूर (ता.शिरोळ) येथे श्री कोपेश्‍वर मंदिरावर श्री जगद्गुरू शंकराचार्य प.पू.श्री विद्यानृसिंहभारती यांच्याहस्ते कलशारोहन करण्यात आले.

श्री कोपेश्‍वर मंदिरात कलशारोहन सोहळ्यात चार दिवस मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शुक्रवारी अखेरच्या दिवशी मंदिरावर नुतन कलश बसविण्यात आला. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी कळसाचे दर्शन घेतले.

यावेळी जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्यानृसिंहभारती स्वामीजी म्हणाले, 'कळस हा निर्गुण, निराकार आहे आणि संन्यासी हा निर्गुणाचा निर्वय्याचा उपासक असतो. लोभाची वृत्ती सोडून चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे. तरच आत्मिक सुखाची प्राप्ती होते. कृष्णा घाट हे कोपेश्‍वराचे हे पवित्रस्थान आहे. या पावित्र्याचा आपण व्यक्तिगत आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभ घेतला पाहिजे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने आपल्याला कदाचित व्यवहाराची उंची गाठता येईल पण अध्यात्मिक उंची गाठता येत नाही. यासाठी धर्मच पाळला पाहिजे. संतानी चांगल्या मार्गावरून चालण्याची शिकवण दिली आहे. यासाठी प्रत्येकाने आध्यात्माची वाट धरावी.'

दुपारी महाआरती, महाप्रसाद तर सायंकाळी लक्षदिपोत्सव झाला. दिपोत्सवाने मंदिर परिसर उजाळून निघाला होता. रात्री कु.कार्तिकी व चि.कौस्तुभ गायकवाड व प्रसिध्द संगीतकार, गायक समाधान गुडदे व निषाद गुडदे यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यास खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, जि.प.सदस्य बंडा माने, मुरलीधर जाधव, सतीश मलमे, कमरूद्दीन पटेल आदींनी भेटी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सहकार परिषदेची पुनर्रचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी शेखर चरेगावकर यांना मुदतवाढ दिल्यानंतर परिषदेची नव्याने पुनर्रचना केली आहे. यामध्ये पाच नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. नव्या सदस्यांमध्ये सांगली जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिले असून, सहकार पंढरी कोल्हापूर जिल्हा मात्र सदस्यांपासून वंचित राहिला आहे. सांगलीमधून शिवाजी पाटील यांना संधी मिळाली आहे.

राज्यात भाजप सरकार आल्यानंतर सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी चरेगावकर (सातारा) यांची नियुक्ती करण्यात आली. प्रथम त्यांची निवड तीन वर्षांसाठी होती. त्यांची मुदत २१ फेब्रुवारीला संपुष्टात आली होती. त्यामुळे या पदावर वर्णी लागण्यासाठी सहकार क्षेत्रातील अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे साकडे घातले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव आणि चरेगावकर याच पट्ट्यातील असल्याने त्यांना अध्यक्षपदाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा संधी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकार अधिनियम १९६० च्या कलम १५४ 'क' मधील तरतुदीनुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवाजी पाटील (सांगली), दत्तात्रय कुलकर्णी (उस्मानाबाद), दिलीप राजूरकर (अमरावती), सीताराम राणे (ठाणे), रामदास देवरे (नाशिक) व संजय भेंडे (नागपूर) यांचा समावेश केला आहे. परिषदेमार्फत सहकार चळवळ भक्कम करणे, राज्य सरकारला मार्गदर्शन, सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना सुचवणे, आदी स्वरूपाची कामे परिषदेमार्पत केली जात आहेत.

सहकार परिषदेत प्रतिनिधित्व देताना राज्याच्या सर्व विभागांना संधी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त सहकारी संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला मात्र यामध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खाते असताना सहकार संस्थांशी संबंधित अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतही सहकार चळवळीतील अनेक नेते पक्षामध्ये दाखल झाले. त्यांना सहकाराचा दांडगा अनुभव असताना त्यापैकी एकाचीही सहकार परिषदेवर वर्णी लागली नसल्याने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकात दोन ठिकाणी संशयिताचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणारा डॉ. आकाश महादेवराव आवटी (रा. गुलबर्गा, कर्नाटक) याचा पोलिसांकडून कर्नाटकात शोध सुरू आहे. करवीर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २०) गुलबर्गा आणि बेंगळुरू येथे त्याचा शोध घेतला. मात्र, डॉ. आवटी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

डॉ. आवटी याने लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केले आहेत. तो अनेकदा पीडित महिलेला घेऊन गोवा आणि बेंगळुरू येथे गेला होता. महिलेने लग्नाचा तगादा लावताच त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. आवटीने महिला खेळाडूची सोशल मीडियात बदनामी करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने मंगळवारी (ता. १७) करवीर पोलिस ठाण्यात डॉ. आवटीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयिताच्या अटकेसाठी तातडीने पथक कर्नाटकात रवाना केले. शुक्रवारी पथकाने डॉ. आ‌वटीचा गुलबर्ग्यातील घरात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी सुरू असून, मोबाइल लोकेशनवरून त्याचा माग काढला जात आहे. पोलिसांनी बेंगळुरूमध्येही संशयिताचा शोध घेतला. दोन दिवसांच्या शोधमोहिमेत अद्याप तो हाती लागला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची लिपिक टंकलेखक पद भरती

$
0
0

सोमवारपासून छाननी

कोल्हापूर : एसटीच्या कोल्हापूर विभागातील लिपिक-टंकलेखक पदासाठी अंतिम निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी २३ आणि २४ एप्रिलला विभागीय कार्यालयात होत आहे. या पदासाठी अंतिम आणि अतिरिक्त निवड यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून २३ एप्रिलला खुल्या आणि अनुसूचित जाती आणि २४ ला एसटी, एनटी, एसबीसी, ओबीसीसह अन्य प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी होईल. अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कोकण वास्तू प्रदर्शन’पाच मेपासून रत्नागिरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्स आणि क्रिडाई रत्नागिरी यांच्या वतीने पाच ते सात मे या कालावधीत रत्नागिरी येथील हॉटेल विवेक येथे 'कोकण वास्तू २०१८' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी किनारा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची पर्यटन, औद्योगिक, दळणवळण आणि नागरीकरणात होत असलेल्या प्रगतीची साक्ष या प्रदर्शनातून मिळणार आहे. प्रदर्शनात ११ लाखांपासून ते एक कोटीपर्यंतच्या सदनिकांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.

रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी डेव्हलपर्स, कन्स्ट्रक्शन, गृहकर्ज याचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. कोकणसह मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातून ५० हजारांहून अधिक नागरिक या प्रदर्शनाला भेट देणे अपेक्षित आहे.

क्रिडाई रत्नागिरीचे कार्यकारी अध्यक्ष दीपक साळवी म्हणाले, 'गेल्या दहा वर्षांत रत्नागिरी रिअल इस्टेटची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. भारतातील बंदरांच्या विकासात रत्नागिरी जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले आहे. रत्नागिरीत नाणार व अणुऊर्जा प्रकल्प हे दोन प्रकल्प येणार असल्याने औद्योगिक विकास होण्याची शक्यता आहे. यातून अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहे. येत्या काही महिन्यांतच रत्नागिरी ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी ते मुंबई हा चारपदरी रस्ता मंजूर असून, वर्षभरात तो पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. ते झाल्यास दळणवळणाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. मुंबईशी कनेक्ट सहज व गतीने होणार असल्याने बांधकाम व्यवसायाला त्याचा फायदा होणार आहे.'

पश्चिम भारतातील एक प्रमुख शहर म्हणून रत्नागिरी भविष्यात उदयास येईल अशी दूरदृष्टी ठेवून प्रयत्न सुरू आहेत. दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याने या विकासाला गती येणार आहे. यातूनच बांधकाम व्यवसायाला चांगली संधी मिळणार आहे. म्हणूनच या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये नामवंत बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात ११ लाखांपासून ते एक कोटीपर्यंतच्या सदनिकांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.

प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत औंधकर (९५२७९७२५००), मंदार मिरजकर (९६८९८८६६३०)यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट महामंडळाकडून कर्जपुरवठा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अन्य महामंडळांप्रमाणेच बँकेऐवजी थेट महामंडळातून कर्जपुरवठा करावा, जाचक अटी कमी करून कागदपत्रांची संख्या कमी करावी, प्रकल्प सादरीकरणासाठी मार्गदर्शन करावे, यांसह विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. कर्ज योजनेची माहिती देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे शाहू स्मारक भवनात शिबिर झाले.

शिबिरानंतर युवक आणि युवतींनी मार्गदर्शन केलेल्या प्रमुख पाहुण्यांसमोर मागण्या मांडल्या. अन्य महामंडळांकडून थेट कर्जपुरवठा केला जातो. मात्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बँकाकडून कर्ज दिले जाते. बँक आणि महामंडळ दोन्हीकडे अर्जदारांना हेलपाटे मारावे लागणार आहेत. यावेळी ऑनलाइन अर्ज, बँकांकडून कागदपत्रांच्या पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी नंद‌वाळ (ता. करवीर) येथील अक्षय पाटील म्हणाले, 'महामंडळाचे कर्ज घेण्यापेक्षा गृहतारण कर्ज स्वस्त मिळते. त्यामुळे तारण, जामीनदाराच्या अटी कमी कराव्यात. प्रत्येक बँकांचे कर्ज दर वेगवेगळे आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असावी, अशी अट घालू नये. ग्रामीण भागातील युवकांना सोयीस्कर पडेल अशी बँक निवडण्याची मुभा द्यावी.' पारगाव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र पाटील म्हणाले, 'इतर महामंडळांप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बँकेऐवजी स्वनिधीतून कर्जपुरवठा करावा. कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत महामंडळाने मदत करावी.' उत्रे (ता. पन्हाळा) येथील पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'योजनेसाठीच्या कागदपत्रांची संख्या कमी करून तत्काळ कर्ज मिळावे.' शुभांगी घेवडे म्हणाल्या, 'महामंडळाने कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांची नावे द्यावीत. ऑनलाइन पोर्टलमध्ये माहिती भरण्यासाठी डेस्क निर्माण करावेत.' इस्पुर्ली येथील शुभम ढेंगे म्हणाला, 'महिन्यातून एकदा महामंडळ आणि अर्ज केलेल्या उमेदवारांची बैठक घ्यावी. दर महिन्यात किती अर्जांचा निपटारा झाल्याची माहिती द्यावी. त्यासाठी मराठा महासंघाने पुढाकार घ्यावा.'

दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती बँकांना देण्यासाठी शनिवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता वीरशैव बँकेत बैठक होणार आहे, असे महामंडळाच्या समन्वयक शुभांगी जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उद्घाटनापूर्वीच कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून रविवार (ता. २२) पासून कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवा सुरू होत आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २३ एप्रिलला विमानसेवा उद्घाटन सोहळ्याचे नियोजन होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने उद्घाटनाचा सोहळा आणखी लांबणीवर पडला आहे.

राज्य सरकारने विमानसेवेचे अधिकृत उद्घाटन रविवारी होत असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी तयारीही सुरू केली होती. एअर डेक्कन कंपनीकडून दोन दिवस विशेष विमानाचे उड्डाण कोल्हापूर विमानतळावरून केले होते. कंपनीकडून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी विमानसेवा दिली जात आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे विमानाचे उड्डाण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: उमा पानसरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परिवर्तनवादी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात भाजप सरकार खुन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत उमा पानसरे यांनी निष्क्रिय भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. भाकपच्या वतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

तपास यंत्रणांनी खुन्यांना पकडण्यात कोर्टात हतबलता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे म्हणाल्या, 'भाजप सरकारला पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपासच करायचा नाही. त्यामुळे सरकार एकप्रकारे खुन्यांना पाठीशी घालत आहे. सरकारला बुद्धिवादी विचारवंतांची आवश्यकता नसून त्यांना साधुसंत, योगी आणि भ्रष्टाचारी लोकांची आवश्यकता आहे. यामुळेच खुन्यांचा तपास लागत नाही. याला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.'

बुद्धिवादी विचारवंतांचे बळी गेले, तरी त्यांचे विचार संपत नसतात. पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निष्ठुरवादी सरकारला हद्दपार करून रस्त्यावरील लढाई सुरू ठेवावी लागणार आहे. या लढाईत यश निश्चित येणार असून, सरकारला घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, यामध्ये यश येईल, असा आशावाद उमा पानरसे यांनी व्यक्त केला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाविरुद्ध मुलीच्या छळाची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलीचा छळ करणाऱ्या जावयाविरोधात सासऱ्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आनंद कृष्णराव कुलकर्णी (वय ७०, रा. निकम पार्क, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे फिर्यादीचे नाव असून, जावई प्रसाद विलास कुलकर्णी (वय ४०, मूळ रा. सांगली, सध्या रा. पुणे) याच्यावर पत्नीचा छळ केल्यासह फिर्यादीस धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद कुलकर्णी यांच्या मुलीचा विवाह सांगली येथील प्रसाद कुलकर्णी याच्याशी झाला आहे. प्रसाद सध्या पुण्यात राहतो. पतीकडून वारंवार छळ होत असल्याने पत्नी गौरी आणि मुलगा इशांत हे दोघेही कोल्हापुरात वडील आनंद कुलकर्णी यांच्याकडे राहिले आहेत. १८ एप्रिलला जावई प्रसाद कोल्हापुरात सासुरवाडीत पोहोचला. पत्नी आणि मुलाच्या इच्छेविरोधात तो त्यांना पुण्याला येण्याचा आग्रह करीत होता. तेव्हा सासरे आनंद यांनी मुलगी आणि नातवाला पाठवून देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रसादने सासरे आनंद यांच्या दोन्ही हाताची बोटे पाठीमागे दाबून त्यांना जखमी केले. शुक्रवारी रात्री त्यांनी जावयाविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images