Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अजिंक्यन्स फाउंडेशनतर्फे ७ मे रोजी सांगली येथे महिला उद्योजक परिषद

$
0
0

अजिंक्यन्स विमेन्स फाउंडेशनतर्फे

सांगलीत महिला उद्योजक परिषद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अजिंक्यन्स विमेन्स फाउंडेशनच्यावतीने ७ मे रोजी सांगली येथे महिला उद्योजक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नवउद्योजक महिलांसाठी मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शिक्षण याआधारे या परिषदेत माहिती देण्यात येणार आहे. सांगली येथील हॉटेल न्यू प्राइड येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत ही परिषद होणार आहे.

उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी उद्योगक्षेत्रातील संधी व कौशल्य याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन या परिषदेतंर्गत करण्यात आले आहे. व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवसायवाढीची कौशल्ये, व्यवसाय वृद्धीची तत्वे यासंदर्भात या परिषदेत माहिती देण्यात येणार आहे. लघुद्योग मराठी चेंबरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मेलक्स कंट्रोल गिअरच्या संचालिका मानसी बिडकर, पूर्णब्रह्म इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालक जयंती कोथळे आदी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून परिषदेत सहभागी होणाऱ्या नवउद्योजक महिलांशी संवाद साधणार आहेत. वरज इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जुन्नरकर व सिएल्टेक इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महिलांसाठी कार्यान्वित असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी संवाद साधणार आहेत.

या परिषदेमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानांसह इंडस्ट्रीच्या गरजा, प्रशिक्षण, कौशल्य निर्माण, घरगुती उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये, संपर्क यंत्रणा, भांडवल उभारणीतील पर्याय, महिला उद्योजकांसाठी असलेले प्रकल्प, डिजिटल मार्केटिंग या संकल्पनांवर मांडणी होणार आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी मंजिरी गाडगीळ यांच्याशी ९४२२०४८५३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगेत तरूणाची आत्महत्या

$
0
0

पंचगंगेत कामगाराची आत्महत्या

कोल्हापूर

शिरोली येथे पंचगंगा नदीच्या पुलावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. बाबूराव नवनाथ भोसले (वय ३५, रा. सावंत गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. हा प्रकार घडत असताना बघ्यांनी मदतीऐवजी चित्रीकरण केल्याने काहींनी संताप व्यक्त केला. पंचगंगा नदीच्या पुलावरून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाबूरावने उडी मारली. हा प्रकार मार्गावरील वाहनधारकांच्या लक्षात आल्याने पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. बाबूरावने 'वाचवा, वाचवा' अशी हाक देऊन पुलावर उभे राहिलेल्यांना विनंती केली. मात्र त्याच्या मदतीला कोणीही धावले नाही. काहींनी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळविले. दलाचे जवान नवनाथ साबळे, रवींद्र ठोंबरे, माणिक कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. भोसले शिरोली एमआयडीसीमधील एका कंपनीत टर्नर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिबिर

$
0
0

पालिका शाळांचे

सोनतळीला शिबिर

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षक समितीने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी २० ते २२ एप्रिल दरम्यान निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले आहे. सोनतळी येथे होणाऱ्या शिबिरात २५० विद्यार्थी सहभागी होतील, अशी माहिती शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांनी दिली. त्या म्हणाल्या, यापूर्वी शिबिर घेतले जात होते. पण गेली दोन वर्षे शिबिर झाले नव्हते. यंदा पुन्हा शिबिर घेण्यास प्रारंभ केला जात असून त्यासाठी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख व अन्य नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मदत झाली आहे. पुढील वर्षीपासून महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिबिरासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे. लेझीम, झांज, मर्दानी खेळ, अॅरोबिक्स, व्यायाम, चित्रकला, हस्तकला, व्याख्याने, चित्रपट अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच छोटे खेळ, पथनाट्य, गाणी, मैदानी पिरॅमीडचाही सहभाग आहे. पतंजली योग शिबिराचे घनश्याम पटेल विद्यार्थ्यांना योग शिकवणार आहेत. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, दिलीप कुडाळकर, विठ्ठल कोतेकर यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, '२० तारखेला सकाळी विद्यार्थ्यांना केएमटीतून शिबिरस्थळी नेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत ५० शिक्षक असतील. मुलांचा विकास पाहण्यासाठी पालकांना शेवटच्या दिवशी शिबिरस्थळी बोलविण्यात येणार आहे. याप्रसंगी नगरसेवक अशोक जाधव, संजय मोहिते, डॉ. संदीप नेजदार, माजी नगरसेवक राजेश लाटकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार लाखाला लुबाडले

$
0
0

साडेचार लाखाला लुटून

मुलीचे अपहरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आई वडिलाचा खून करण्याची भीती घालून एका शाळकरी मुलीकडून वेळोवेळी चार लाख ८० हजार रुपये लुटून अपहरण केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. जावेद शेख (रा. शिवाजी पेठ)असे तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहराशेजारील एका गावातील मुलगी शहरातील एका शाळेत शिकते. तिची शिवाजी पेठेतील एका तरुणाबरोबर ओळख झाली. यातून या तरुणाने तिला मोबाइलवर चाकूने भोसकून खून करत असल्याची क्लीप दाखवून 'तुझ्या आई- वडिलांसह भावाचा असाच खून करेन' अशी भीती घातली. त्यानंतर त्याने वेळोवेळी चार लाख ८० हजार रुपये घेतले. यानंतर जावेद शेख याने संबधित मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी करवीर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरच्या ‘आरोग्या’वरही परिणाम

$
0
0

एनआरएचएम आंदोलनाची झळ, जिल्ह्यातील सेवा विस्कळीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील सीपीआरमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानतर्गंत कार्यरत ३४ कर्मचारी आठ दिवसांपासून राज्यव्यापी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. सीपीआरमध्ये रिक्त जागांची संख्या अधिक असताना त्यामध्ये पुन्हा ३४ जण कामावर नसल्याने आरोग्य प्रशासन, सेवेवर परिणाम जाणवत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ विभागाचे कामकाज पूर्णपणे बंद आहे. आंदोलन लांबल्यास आरोग्य सेवेसंबंधी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही विस्कळीत झाली असून त्याचा रूग्णांना फटका बसत आहे. त्यांना तत्पर सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा, सुविधा द्याव्यात यासह विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघातर्फे ११ एप्रिलपासून सीपीआर, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य सेविका, डाटा ऑपरेटर, कार्यक्रम व लेखा व्यवस्थापक, तालुका लेखापाल, तालुका समूहसंघटक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी काम बंद आंदोलन करीत आहेत. ते कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली.

सीपीआरमधील राष्ट्रीय बाल स्वास्थ विभाग कार्यालयातील सर्वच कर्मचारी आंदोलनात आहेत. यामुळे त्या विभागातील कामकाज ठप्प आहे. परिणामी बालकांच्या आजारावरील उपचारासंबंधीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. तब्बल ३४ कर्मचारी कामावर नसल्याने प्रशासकीय शिथीलता आली आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या रूग्णांना सेवा देताना प्रशासन मेटाकुटीस येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या स्थानिक पातळीवर सोडवणे शक्य नसल्याने सीपीआर प्रशासन हतबल आहे. नियमित कर्मचाऱ्यांचे रजा, सुट्या कमी केल्या आहेत. मागण्यांबाबत ठोस निर्णय होईलपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महासंघाने केला आहे. यामुळे आंदोलन वाढण्याची शक्यता आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गोसावी, संदीप देसाई, निंगोजी पाटील, ज्ञानेश्वर वाटेगावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

------------------------

चौकट

जि. प. कर्मचारी संघटनेचा पाठिंबा

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनिनचे राज्य अध्यक्ष बलराज मगर, जिल्हा अध्यक्ष धनजंय जाधव, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे, ग्रामसेवक कर्मचारी संघाचे कृष्णात किरूळकर, लेखा संघटना जिल्हा अध्यक्ष किरण निकम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

----------------

कोट

'एनआरएचएमच्या आंदोलनात सीपीआरमधील ३४ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्याचा आरोग्य सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही. नियमित कर्मचारी त्यांच्या ठिकाणी कार्यरत आहेत.

डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेला चांगला प्रतिसाद

$
0
0

बुधवारीही विशेष

विमानसेवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उडान' योजनंतर्गत नियमित विमानसेवा सुरू होण्यास काही दिवसांची अवधी असला तरी कोल्हापूर ते मुंबई हवाई मार्गावर बुधवारीही विशेष विमान झेपावले. मुंबईहून दुपारी दोन वाजता आणि कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून दुपारी तीन वाजून १५ मिनिटांनी पुन्हा विमानाने मुंबईकडे उड्डाण केले. रविवारी (ता. २२)रोजी विमानसेवेची अधिकृत सुरुवात होणार आहे.

विमानसेवा सुरू होण्याआधी मंगळवारी विशेष विमानाचे उड्डाण आणि लँडिंग झाले. बुधवारीही हे विशेष विमान कोल्हापुरात आले. बुधवारीही कोल्हापूर ते मुंबई हवाई मार्गावर प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. तब्बल सहा वर्षांनंतर सुरु झालेल्या विमानसेवेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. येत्या रविवारी नियोजित वेळेनुसार विमानसेवा सुरू राहणार आहे. आठवड्यातून दर मंगळवारी, बुधवारी आणि रविवारी ही विमानसेवा दिली जाणार आहे. मुंबईहून दुपारी एक वाजून १५ मिनिटे तर कोल्हापुरातून मुंबईसाठी तीन वाजून १५ मिनिटे विमानसेवेची वेळ आहे.

०००

एअर डेक्कनकडून दर मंगळवारी, बुधवार आणि रविवारी नियमित विमानसेवा दिली जात आहे. नियोजित वेळेनुसार ही सेवा दिली जाईल. प्रवाशांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून कंपनीच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

नंदकुमार गुरव, विमानतळ व्यवस्थापक, एअर डेक्कन

०००००००००००००

मूळ कॉपी

०००००००००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या 'उडान' योजनंतर्गत कोल्हापूर ते मुंबई मार्गावर बुधवारीही विशेष विमान झेपावले. मुंबईहून दुपारी दोन वाजता आणि कोल्हापूरहून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पुन्हा विमानाने मुंबईकडे उड्डाण केले. येत्या २२ एप्रिल (रविवारी) विमानसेवेची अधिकृत सुरुवात होत आहे. विमानसेवेचा आनंद घेण्यासाठी मंगळवारी आणि बुधवारी छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून दोन दिवस विशेष विमान झेपावले. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर झालेल्या प्रवासाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. मंगळवारी विमानसेवेच्या पहिल्या फेरीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासह उद्योजकांनी विमानसेवेचा आनंद घेतला. दुपारी साडेतीन वाजता मुंबईकडे उड्डाण केलेल्या विमानातून अंध, अपंग, कचरावेचक, शेतकरी दाम्पत्याने प्रवास केला. बुधवारी मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. तब्बल सहा वर्षानंतर सुरु झालेल्या विमानसेवेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. येत्या रविवारीही नियोजित वेळेनुसार विमानसेवा सुरू राहणार आहे. आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी ही विमानसेवा दिली जाणार आहे. मुंबई ते कोल्हापूर १ वाजून १५ मिनिटांनी, कोल्हापूर ते मुंबई ३ वाजून १५ मिनिटे अशी विमानसेवेची वेळ आहे.

०००

एअर डेक्कनकडून दर मंगळवारी, बुधवार आणि रविवारी नियमित विमानसेवा दिली जात आहे. नियोजित वेळेनुसार ही सेवा दिली जाईल. प्रवाशांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून कंपनीच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

नंदकुमार गुरव, एअर डेक्कन कंपनीचे विमानतळ व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिव बसव’चा अखंड जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरुषांच्या वेशभूषेतील बालचमू, धनगरी ढोल आणि बँड पथकाचा निनाद आणि 'छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर की जय'चा घोष अशा उत्साही वातावरणात शिव-बसव जयंतीचा सोहळा बुधवारी साजरा झाला. कोल्हापूर लिंगायत समाजातर्फे सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. शिव-बसवच्या जयघोषांनी मिरवणूक मार्ग निनादून गेला. मिरवणुकीदरम्यान नष्टे गल्ली कॉर्नर येथे आतषबाजी करण्यात आली. मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाज आणि वीरशैव अक्कमहादेवी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. महापौर स्वाती यवलुजे, देवस्थान समितीच्या खजिनदार वैशाली क्षीरसागर, प्रतिमा सतेज पाटील, शुभलक्ष्मी विनय कोरे, नगरसेविका उमा बनछोडे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा शैला गाताडे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी अर्चना व राहुल शेटे आणि अनिता व अनिल महाजन यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली. शहराच्या विविध मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीची सांगता चित्रदुर्ग मठात झाली.

चित्रदुर्ग मठात सकाळी बसव जन्मकाळ सोहळा रंगला. मीना व वैभव सावर्डेकर यांच्या हस्ते महापूजा झाली. बसव जन्मकाळ सोहळ्यानंतर आयोजित व्याख्यान व सत्कार सोहळ्याला आमदार राजेश क्षीरसागर, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार क्षीरसागर यांनी वीरशैव लिंगायत रुद्रभूमी विकासकामासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाले आहेत. तसेच आणखी ५० लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नगरसेवक सत्यजित कदम यांनी रुद्रभूमीत मोफत दफनविधीसाठी महापालिकेतर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत स्वामी यांनी आभार मानले. याप्रसंगी चित्रदुर्ग मठाचे बसव महालिंग स्वामी, नानासाहेब नष्टे, अॅड. राजेश पाटील चंदूरकर, सतीश खोतलांडे, वसंतराव सांगवडेकर, चंद्रकांत हळदे, सीमा हळदे, सरला पाटील, राजशेखर तंबाखे, बाबुराव तारळी, चंद्रशेखर बटकडली, विलास आंबोळे, राजेंद्र वाली, शंकरराव कदम, संदीप नष्टे,डॉ. गिरीष कोरे आदी उपस्थित होते.

विद्यापीठात अध्यासन केंद्राची मागणी

महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरु करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 'महात्मा बसवेश्वर जीवन व कार्य' या विषयावर शिवशंकर उपासे यांचे व्याख्यानही झाले. उपासे यांनी व्याख्यानातून बसवेश्वरांच्य जीवनातील अनेकविध पैलू उलगडले. याप्रसंगी विद्यापीठाने बसवेश्वरांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करावे, अशी मागणी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रतिसादात पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही झालो पालक - बालसंकुलच्या ६७ अनाथांना मिळाला निवारा

$
0
0

'बालकल्याण'मधील ६७ मुलांना मिळाली मायेची ऊब

फोटो आहे

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : कुमारी माता, विधवा किंवा बेवारस स्थितीमध्ये सापडलेल्या बालकांना बालकल्याण संकुलामध्ये मायेची ऊब मिळते. पण अनाथ जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने अनेक मुलांना मायेची ऊब मिळते ती दत्तक आई-वडिलांमुळे. देशपातळीवरील कारा या संस्थेच्या निकषांची पूर्तता केल्यानंतर येथील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्थेच्या (बालसंकुल) शिशुगृहातील शून्य ते सहा वयोगटातील ६७ मुलांना पाच वर्षांत हक्काच निवारा मिळाला आहे. यामुळे मुलांबरोबरच दत्तक पालकांचीही आई-वडील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सेंटर अॅडॉप्शन रिर्सोस अॅथॉरिटीच्यावतीने (कारा) देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण (बालसंकुल) संस्था चालवली जाते. संस्थेमध्ये शून्य ते सहा वयोगटातील मुलांसाठी खास शिशुगृह चालवले जाते. यामध्ये कुमारी माता, विधवा, बेवारस स्थितीमध्ये सापडलेली मुले किंवा जे पालक सांभाळ करण्यास सक्षम नसतात अशा मुलांना भरती करून घेतले जाते. यामध्ये शून्य ते सहा वयोगटातील मुलांना मायेची ऊब मिळावी, यासाठी कायदेशीर गोष्टींची पुर्तता करून पालकत्व स्वीकारण्यासाठी अनेकजण पुढे येतात. एका मुलावर कुटुंबनियोजन केलेल्या किंवा अपत्यप्राप्ती नसलेली दाम्पत्य कारा संस्थेमार्फत अर्ज करतात. त्यानंतर ही संस्था त्या-त्या जिल्ह्यातील अनुरक्षण संस्थेला नावांची यादी पाठविते. त्यांची छाननी होऊन खातरजमा झाल्यानंतर दत्तक प्रक्रिया राबविली जाते.

दत्तक प्रक्रियेतून बालसंकुलच्या शिशुगृहातून गेल्या पाच वर्षांत ६७ मुलांना आईवडिलांच्या मायेची ऊब मिळाली आहे. यातील चार मुले परदेशात स्थायिक झाले आहेत. ही सर्व मुले सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील असली, तरी गेल्या दोन वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना दत्तक देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक मुलांना हक्काचा निवारा मिळाला आहे. बालसंकुलातून दत्तक प्रक्रिया पार पडल्यानंतर पहिली तीन वर्षे सहा महिन्याला आढावा घेतला जातो. संबधित मुलांच्या सर्वच घडामोडींवर लक्ष ठेवले जाते. या संस्थेतून दत्तक गेलेल्या अनेक मुलांचे चांगले करिअर घडले आहे. अनेकदा मुलांना दत्तक घेतल्याची माहिती दिली जात नाही. पण जे कुटुंब मुलांना अशी माहिती देतात, त्यापैकी अनेक पालक मुलांसह बालसंकुलला भेट देतात. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपूर्वी दत्तक गेलेले अनेक मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी करिअर घडविल्याचे शिशुगृहाच्या अधीक्षक कांचन हेब्बाळकर यांनी सांगितले.

बालकल्याणच्या शिशुगृहामध्ये सध्या २२ मुले आहेत. या मुलांची देखभाल शिशूगृहाच्या अधीक्षका कांचन हेब्बाळकर, संध्या तळेकर, सीमा कुलकर्णी, विजय यादव, राजश्री काळे, छाया सावंत, छाया चौगुले, वंदना महिंद्रकर, सरिता लाड, मंगल बुरुड, राधिका डांगोळे, संजीवनी पाटील, शोभा लोहार, लक्ष्मी चव्हाण, अमर माने आदी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

अशी आहे प्रक्रिया

केंद्र सरकारच्या कारा संस्थेच्या www.cara.inc.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. त्यानंतर सोयीनुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बालकल्याण संस्थेकडे नावे पाठवली जातात. आवश्यक शुल्क भरल्यानंतर क्षेत्रीय भेटीनंतर दत्तक प्रक्रिया पार पाडली जाते.

कायमपणे अनाथ राहण्यापेक्षा मुलांना हक्काचे आई-वडील मिळतात. आई वडिलांनाही मुलांचे प्रेम मिळत असल्याने यातून अनेक मुलांचे चांगले करिअर घडले आहे. यातून अनेक मुलांचे कायमचे अनाथपणे निघून जा‌ऊन मायेची ऊब मिळाली आहे.

पद्मा तिवले, सचिव, जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंढरपूरचा जि.प.सदस्यालाकळंबा कारागृहातून अटक

$
0
0

पंढरपूरचा जि.प.सदस्याला

कळंबा कारागृहातून अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार भाजपचा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ 'सरजी' याला पंढरपूर पोलिसांनी बुधवारी कळंबा कारागृहातून अटक केली. गेल्या महिन्यात गुढीपाडव्यादिवशी भरदिवसा पवार यांची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या झाली होती. 'सरजी' या नावाने गुन्हेगारी क्षेत्रात दहशत असलेला गोपाळ हा भाजपचा जिल्हा परिषद सदस्य असून एका व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी सध्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता.

गुढीपाडव्यादिवशीच नगरसेवक संदीप पवार यांचा पंढरपूर येथे निघृण खून करण्यात आला होता. पवार यांचे आई आणि वडील हे दोघेही पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. पवार यांच्या वडिलांची काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हत्या झाली होती. पवार कुटुंब हे सुरुवातीपासून माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या गटातील मानले जातात. यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे म्हणाले, नगरसेवक पवार यांच्या खुनाच्या तपासाचे धागेदोरे गोपाळ अंकुशराव याच्यापर्यंत पोहोचले. यापूर्वी पंढरपुरातील एका व्यापाऱ्यांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. पवार खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे अटक केली.'

पवार यांच्या खूननंतर पंढरपूर सलग तीन दिवस बंद होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बैठक घेतली होती. पवार यांच्या हत्येमागे अंकुशराव मुख्य सूत्रधार असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या पथकाने कळंबा कारागृहातून अटक केली. या हत्येप्रकरणी आजपर्यंत तेरा जणांना अटकेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेटा चोरीतून दहा लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सॉफ्टवेअर कंपनीचे काम करताना कंपनीचे गोपनीय सोर्सकोड आणि डेटा चोरून १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी प्रसाद विलास जोशी (वय ३३, रा. आर्या रेसिडेन्सी, बाबा जरगनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार पेठेतील अक्षयामृत इन्फोटेक सॉफ्टवेअर कंपनीचे अशोक बाबूराव बिरंजे (रा. वाकरे, ता. करवीर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक बिरंजे यांची मंगळवार पेठेतील तस्ते गल्ली येथे अक्षयामृत इन्फोटेक सॉफ्टवेअर कंपनी आहे. कंपनीने प्रसाद जोशी याला २५ शाळांचे ऑटो हजेरीपत्रक आणि प्रशासकीय कामकाजाचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम दिले. कंपनीचा विश्वास संपादन करून त्याने सोर्सकोड आणि काही महत्त्वाचा डेटा घेतला होता. सप्टेंबर २०१७ पर्यंत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते. मात्र, जोशीने चालढकल केली. या माहितीचा त्याच्याकडून गैरवापर होत असल्याचे लक्षात येताच बिरंजे यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोशी हा कंपनीचे सोर्सकोड आणि डेटा घेऊन पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. जोशीने कंपनीचे १० लाख रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद बिरंजे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल केली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावरुन बोंबाबोंब

$
0
0

पाणीपुरवठ्यावरून शिमगा

पाण्याच्या ठणठणाटावरून नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केवळ कागदावर नियोजन व प्रत्यक्षात पाण्याचा ठणठणाट अशा पाणीपुरवठ्याच्या भोंगळ नियोजनामुळे वैतागलेल्या नगरसेवकांनी गुरुवारी महापालिकेच्या सभेत प्रशासनाच्या नावाने अक्षरश: 'बोंबाबोंब' केली. विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनी सभागृहात टेबलवर उभे राहून शंखध्वनी केला. सभागृहात घोषणाबाजी करत रिकाम्या घागरी घेऊन आलेल्या कमलाकर भोपळे यांनी माझा राजीनामा घ्या, अशी मागणी महापौरांकडे केली. तर माजी महापौर हसीना फरास यांनी प्रशासनाचा निषेध करत सभात्याग केला. सर्वच नगरसेवकांनी या प्रश्नावरुन प्रशासनावर आगपाखड केली.

जलअभियंत्यांना शहरात फिरायचे बंद केले जाईल, त्यांचा राजीनामा घ्या, कायदा हातात घेण्याची वाट पाहू नका अशा टोकाच्या भावना नगरसेवकांनी मांडल्यानंतर महापौर स्वाती यवलुजे यांनी चार दिवसात पाणीप्रश्नावर विशेष सभा बोलवण्याची घोषणा केली. तसेच उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवड्यातून दोनदा आढावा बैठक घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महिनाभरात शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी पाणीप्रश्नावरुनच सभा तहकूब करण्यात आली होती. गुरुवारी ती तहकूब सभा घेण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देतच भाजप, ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक सभागृहात आले. ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके यांनी ई वॉर्डमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एक महिन्यात प्रशासनाने काय केले अशी विचारणा करत सभेच्या दरम्यानच व्यवस्थित पाणीपुरवठा कसा होतो असा प्रश्न केला. त्यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी व्हॉल्व्ह सेटिंग केले आहे, गळती दुरुस्तीचे इस्टीमेट तयार केले जात आहे, अशी नेहमीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे खांद्यावर दोन रिकाम्या घागरी घेऊन घोषणाबाजी करत सभागृहात आले. सोबत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा माझा राजीनामा द्या या मागणीचा फलकही आणला होता.

सभागृहातील जवळपास प्रत्येक नगरसेवकाने पाण्याचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केल्याने मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी पाणीप्रश्न केवळ ई वॉर्डला नव्हे तर संपूर्ण शहराला भेडसावत आहे. तरीही पाणीपुरवठ्याचे अधिकारी भागात व्यवस्थित पाणीपुरवठा आहे असे सांगत आहेत. नेमके कुठे पाणीपुरवठा व्यवस्थित आहे हे सांगावे, अशी मागणी केली. यासाठी जलअभियंता सुरेश कुलकर्णी जबाबदार असून त्यांचा राजीनामा घ्यावा. ते जाणीवपूर्वक त्रास देत असून त्यांना शहरात फिरायचे बंद केले जाईल. आम्ही कायदा हातात घेण्याची वाट पाहू नका, असेही सुनावले.

माजी महापौर हसीना फरास यांनी आयुक्त व प्रशासन पाणीप्रश्नाबाबत गंभीर नाही. या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या या दुर्लक्षाबद्दल निषेध करते, असे सांगत सभात्याग केला. या प्रकारानंतर विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांनीही प्रशासनाला पाणीप्रश्नाबाबत काही देणेघेणे नाही. पाण्यासाठी जनता शंख करत असल्याचे सांगत स्वत: टेबलवर उभे राहून आयुक्तांसमोर शंखध्वनी केला. शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांनीही खुर्चीवर उभे राहून पाणीप्रश्न आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. उमा इंगळे यांनी गाळयुक्त पाण्याची बाटली आयुक्तांना दाखवत याचे पैसे जनतेने का द्यायचे? असा प्रश्न केला. त्यावरुन शारंगधर देशमुख यांनी जलअभियंत्यांनी हे पाणी पिऊन दाखवावे. या पाण्याचे पैसे घेत असताना लाज वाटायला हवी, असे खडसावले.

स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी ९५ एमएलडी पाण्याचा हिशोब लागत नाही, असे मत मांडले. तर सत्यजीत कदम, संभाजी जाधव, स्मिता माने, किरण नकाते, उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, सुरेखा शहा, पूजा नाईकनवरे, भूपाल शेटे यांनी विविध प्रश्न मांडत प्रशासनाला भंडावून सोडले. नगरसेवकांना विश्वासात न घेता नवीन वेळापत्रक केले आहे, ते मान्य नाही. पाणीपुरवठा व्यवस्थित करा, असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर महापौर यवलुजे यांनी चार दिवसात पाणीपुरवठ्यावर विशेष सभा बोलवण्यात येईल. तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करावा. तसेच उन्हाळा संपेपर्यंत दर आठवड्यात दोनवेळा आढावा बैठक घेतली जाईल, असे सांगितले.

..........................................

इस्टीमेटसाठी पगार थांबवले

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पाणीपुरवठ्यात त्रुटी असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, 'पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलअभियंत्यांना सूचना केल्या आहेत. या प्रश्नासाठी जुनी कारणे आहेत. गळती दुरुस्त करण्यासाठी इस्टीमेट करण्यास सांगितले आहेत. २१ तारखेला होणाऱ्या बैठकीत गळती दुरुस्तीची इस्टीमेट सादर करण्यास सांगितले आहे. तोपर्यंत अधिकाऱ्यांचे पगार थांबवले आहेत. जीवन प्राधिकरणकडून आता अधिकारी मिळणार नाहीत. त्यामुळे आपले अधिकारी नेमण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी सात महिने लागतील. विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघांवरील आरोपनिश्चिती सुनावणी लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यासह चौघांवरील आरोपनिश्चितीची सुनावणी लांबणीवर पडली. गुन्ह्याशी संबंधित हायकोर्टात सुनावणी होणार असल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी होऊ शकली नाही. पुढील सुनावणी ५ जूनला होणार आहे.

पानसरे हत्येतील आरोपी समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जिल्हा कोर्टाने जामीन मंजूर केला असून, डॉ. तावडे सीबीआयच्या कोठडीत आहे. या गुन्ह्यातील चौघांवर आरोपनिश्चिती करण्यासाठी गुरुवारी जिल्हा कोर्टात सुनावणी होती. दरम्यान, तपास पूर्ण झाल्याशिवाय आरोपनिश्चिती करू नये, यासाठी पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टातील सुनावणी गुरुवारी होणार असल्याने जिल्हा कोर्टातील कमकाज होऊ शकले नाही. न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणीसाठी ५ जून ही पुढील तारीख दिली आहे. दरम्यान, जामिनावर सुटलेला संशयित समीर गायकवाडला दर रविवारी कोल्हापुरातील पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरी देण्याची अट कोर्टाने घातली होती. संशयिताने गेल्या वर्षभरापासून या अटीचे तंतोतंत पालन केले आहे. आता हजेरी देण्याची अट रद्द करावी, अशी मागणी कोर्टात करणार असल्याची माहिती संशयिताचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांना गंडा घालणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील महिला बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला राधानगरी पोलिसांनी अटक केली. अनिकेत शेट्टी ऊर्फ यल्लाप्पा वैजू कोलकर (वय २७, मूळ रा. सामरा, ता. कुंदापूर, जि. मंगळुरू, राज्य कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अनिकेत शेट्टीने दुर्वा संदेश संस्थेची बनावट कागदपत्रे तयार करून या संस्थेतून कर्ज देण्याचे आमिष महिलांना दाखवले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याने राधानगरी तालुक्यातील येळवडे आणि शेळेवाडी येथील दोन महिला बचत गटांतील २५ महिलांकडून तीन लाख ६६ हजार रुपये उकळले होते. वार्षिक ६ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्याने प्रत्येक महिलेकडून १६ हजार रुपये घेतले. यानंतर कर्ज न देताच त्याने पलायन केले. राधानगरी पोलिस ठाण्यात महिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अनिकेत शेट्टीला कोल्हापुरातील एका लॉजमधून ताब्यात घेतले. त्याने जिल्ह्यातील अन्य गावांतही महिलांना गंडा घातल्याची माहिती तपासात समोर येत असून, फसवणुकीची व्याप्ती वाढू शकते, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणाकाठचे शेतकरी आक्रमक

$
0
0

फोटो दुकॉलमी

............................

वारणाकाठचे शेतकरी आक्रमक

जुने पारगावमधील पाणी परिषदेत 'अमृत' योजनेला विरोध

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'वारणाकाठावरील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम इचलकरंजीसाठी होणाऱ्या 'अमृत' योजनेतून होत असल्याने याविरोधात दानोळी ग्रामस्थांनी उभारलेल्या वारणा बचाव कृती समितीस जाहीर पाठींबा असून पुढील लढ्यात पूर्ण ताकदीने उतरू. त्याचबरोबर ही अमृत योजना उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही',असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील यांनी दिला.

इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीवरुन प्रस्तावित 'अमृत' योजनेस वारणाकाठाच्या सर्वच गावांतून विरोध करण्यासाठी वारणा बचाव कृती समितीच्या वतीने जुने पारगाव(ता. हातकणंगले)येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी परिषद बोलविण्यात आली होती. यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील (भुयेकर)होते.

यावेळी बोलताना वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, 'वारणा नदीचे उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन विभागात नियोजन आहे. नियोजनात उजवा कालवा ११७ कि.मी.चा असून त्याचे काम ३० कि.मी. झाले आहे आणि डावा कालवा ७० कि.मी.चा आहे पण त्याचे काम कमी झाले आहे. संभाव्य अमृत योजनेस आजपर्यंत वारणा काठावरील पस्तीस गावांनी,निषेध,गावबंद,उपोषणे आणि गावसभेचे विरोधात ठराव दिलेले आहेत. चांदोली धरण बांधताना धरणातील पाणीसाठा हा सिंचनासाठी १८.०५ टीएमसी, पिण्यासाठी ९.५५ टीएमसी, उद्योगासाठी १.२७ टीएमसी, तसेच वापरात न येणारे पाणी यामध्ये बाष्पीभवन १.२८ टीएमसी आणि मृत साठा ६.८८ असा एकूण साठा ३७.४८ इतका अपेक्षित होता. मात्र धरण ३४.३९ चे बांधले आहे. म्हणजे धरण क्षमता ही गरजे पेक्षा ३.०९ टीएमसी ने कमी आहे. मुळातच ३.०९ टीएमसी कमी क्षमतेने बांधण्यात आलेल्या या धरणातील बहुतांशी उद्दिष्ट पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे धरणात पाणी साठा जास्त दिसत आहे. ठरल्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास मुळातच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे इचलकरंजीला पाणी देण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या वारणा लाभक्षेत्रात २८३ गावे आहेत पैकी फक्त ८२ गावाना पाणी मिळाले आहे तर बाकी २०१ गावांना अद्याप वारणेचे पाणी मिळालेले नाही. तर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे २०० संस्थांचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सध्या असणारा पाणी साठा कमी पडणार असून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इचलकरंजीकरांचा प्रोसेस व कापड उद्योगासाठी पाणी नेण्याचा डाव असून हे पाणी पुन्हा प्रदूषित होऊन ते पंचगंगा नदीमार्गे कृष्णा नदीच्या पात्रात मिसळणार आहे. '

कुंभोज सरपंच प्रकाश पाटील म्हणाले, 'कागदोपत्री जेवढे पाणी उपसणार असल्याचे दाखविले आहे, त्यापेक्षा तिप्पट पाण्याचा उपसा सुमारे चार हजार हॉर्सपॉवरच्या पंपाद्वारे २४ तास या योजनेतून होणार असल्याने शेतीसाठी पाणीच उरणार नाही. त्यामुळे वारणा काठी पुन्हा १९७२ ची दुष्काळ सदृष्य परिस्थिती उद्भवणार आहे.'

वारणा बचाव कृती समितीचे सचिव मानोजीराव भोसले म्हणाले, 'वारणा नदीवरुन इचलकरंजीला दररोज सुमारे एक कोटी लिटर पाणी नेण्याच्या अमृत योजनेस सरकारने मान्यता देऊन त्याचे टेंडर नुकतेच काढले. मात्र अगोदरच वारणाकाठावरील शेतीला पाणी अल्प प्रमाणात मिळत असताना व इचलकरंजीला दोन-दोन नद्यांच्या योजना कार्यरत असताना तिसऱ्या योजनेचा घाट घालून वारणाकाठच्या शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे.'

जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, किणीकर यांनी काळम्मावाडीचे शुद्ध पाणी इचलकरंजीपासून चार किलोमीटर वर आले असताना १७ किलोमीटर लांबीच्या पाईप लाईनचा प्रस्ताव मंजूर करण्याचे कामच काय, असा सवाल केला. बाबासाहेब पाटील(भुयेकर) यांनी वारणाकाठच्या लोकांनी या योजनेस कडाडून विरोध करावा, असे आवाहन केले.

यावेळी जगन्नाथ पाटील (ढवळी),माजी जि.प. सदस्य सुरेश कांबळे, गब्रू गावडे आदींनी मनोगत व्यक्त केले. वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुभाष भापकर,शिवाजीराव सिद,बाबासाहेब मोरे,इंद्रजित पाटील,सरपंच अरविंद पाटील, सुधा डोईजड यांच्यासह वारणा बचाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत बाबासाहेब मोरे यांनी केले. वीरभद्र डोईजड यांनी आभार मानले.

---------------------------

चौकट

वारणेचे पाणी पेटणार

इचलकरंजी शहरासाठी होणाऱ्या अमृत योजनेला वारणाकाठावरील सर्वच गावांनी तीव्र विरोध केला आहे. बचाव समितीच्या वतीने लवकरच ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील वारणाकाठावरील गावांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याने येत्या काळात वारणेचे पाणी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

..................

फोटो - जुने पारगाव (ता.हातकणंगले)- येथे वारणा बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत बोलताना शहाजीराव पाटील. यावेळी उपस्थित बाबासाहेब पाटील (भुयेकर),मानोजीराव भोसले,महादेव धनवडे, बाबासाहेब मोरे, शिवाजीराव सिद आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील २९ न्यायाधीशांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात २९ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील खटल्याची सुनावणी पाहणारे जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे, तर जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा जिल्हा न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांना मुदतवाढ मिळाली आहे. हायकोर्टाकडून बदल्यांचे आदेश आले आहेत.

मुंबई हायकोर्टाने राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात २९ न्यायाधीशांच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. जिल्हा न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी (इचलकरंजीहून उदगीर), आर. जी. असमार (इचलकरंजीहून अलिबाग), एल. डी. बिले (कोल्हापूरहून रत्नागिरी), एस. डी. जगताप (जयसिंगपूरहून उस्मानाबाद), के. आर. जोगळेकर (कोल्हापूरहून नागपूर), जे. एम. आंबोडकर (पेठवडगावहून पैठण), पी. एम. उन्हाळे (कोल्हापूरहून श्रीगोंदा), ए. पी. कोकाटे (इचलकरंजीहून दमण), जी. डी. निर्मळे (कागलहून ठाणे), यू. बी, काळपगार (कोल्हापूरहून लातूर), एम. आर. सोवणी (पेठवडगावहून परांडा), एम. डी. ठोंबरे (चंदगडहून कळम, उस्मानाबाद), व्ही. एस. देशमुख (कोल्हापूरहून औरंगाबाद), ए. ए. यादव (कोल्हापूरहून सातारा) येथे बदली झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात येणारे न्यायाधीश

ए. ए. भोसले (भूमहून कागल), एफ. बी. बागी (बीडहून पेठवडगाव), पी. ए. पाटील (जळगावहून कोल्हापूर), जी. जी. सोनी (सावनेरहून कोल्हापूर), पी. एस. भंडारी (सिंदखेडहून इचलकरंजी), जे. एस. गायकवाड (उल्हासनगरहून पेठवडगाव), ए. सी. बिराजदार (अकोलाहून चंदगड), के. एस. कुलकर्णी (जळगावहून कोल्हापूर), डी. बी. म्हालटकर (जालनाहून कोल्हापूर), वाय. पी. मानथकर (मुंबईहून जयसिंगपूर), आर. एन. बावणकर (ठाणेहून कोल्हापूर), ए. पी. कानडे (उस्मानाबादहून कोल्हापूर), एच. बी. शेळके (खेडहून कोल्हापूर), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश उमेशचंद्र मोरे आणि न्यायाधीश ए. यू. कदम आणि एस. यू. वडगावकर यांना हायकोर्टाने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात मुदतवाढ दिली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर बदलीच्या ठिकाणी न्यायाधीश हजर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य अधिकारी पुन्हादोन महिन्यांच्या रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औषध खरेदी घोटाळ्याचा ठपका असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी पुन्हा १८ जूनपर्यंत तब्बल दोन महिन्यांची रजा वाढवली. १३ एप्रिलला ते अचानक हजर झाले होते. त्यांनी एक दिवस कामकाजही पाहिले. मात्र, औषध खरेदीप्रकरणी गंभीर ठपके असल्याने त्यांना रजेवर जाण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी १८ एप्रिल ते १८ जूनपर्यंत रजा घेतली. या कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. उषादेवी कुंभार यांच्याकडेच कायम राहणार आहे.

जिल्हा परिषदेमधील औषध घोटाळा महाराष्ट्र टाइम्सने दीड महिन्यापूर्वी चव्हाट्यावर आणला. त्यानंतर डॉ. पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. १३ एप्रिलला कार्यालयात आल्यानंतर त्यांनी डॉ. खेमनार, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची भेट घेऊन कामकाज सुरू करण्यासंबंधी चर्चा केली. त्यावेळी डॉ. खेमनार यांनी तुमच्यावर गंभीर आरोप आहेत. रजा वाढवावी, असा सल्ला दिला. त्यानुसार डॉ. पाटील यांनी रजा वाढवली.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉकलेट मेकिंग कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे दोन दिवस 'चॉकलेट अँड मेकिंग' कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये केक आणि चॉकलेटचे विविध प्रकारांत एगलेस स्पंज केक, चॉकलेट केक, ब्लॅक फॉरेस्ट, पायनापल, मिक्स फ्रूट, पेस्ट्री चॉकलेट केक, जेल केक, आयसिंग, क्रिम पॉवर मेकिंग, व्हिप किम टेक्निक, ऑबरे टेक्निक, आदींचे प्रात्यक्षिक शिकविले जाईल. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी उद्योग भवन येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्पाधिकारी वनिता पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजस्विनीकडून सुवर्णपदक शहिदांना अर्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुल सुवर्णपदक शहीद जवान व सीमेवर लढणाऱ्या जवानांना सुवर्णपदक अर्पण केले. पुण्यातील आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'भारतीय जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असताना देशातील नागरिक सुखासमाधानाने आयुष्य कंठत आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासात सैनिकांचा मोठा वाटा आहे. ते देशाचे सरंक्षण करतात म्हणून आम्ही आमच्या खेळात लक्ष देऊन देशासाठी नाव कमवू शकलो. त्यांच्याबद्दलच्या अपार कृतज्ञेपोटी हे सुवर्णपदक त्यांना अर्पण करते,' असे ती म्हणाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मॅकमध्ये शनिवारी बैठक

$
0
0

स्मॅकतर्फ चर्चासत्र

कोल्हापूर

शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (स्मॅक) तर्फे शनिवारी (ता. २१) स्मॅक भवनात चर्चासत्र आयोजित केले आहे. मे. अल्टेक अलॉयचे गजानन कडूकर, आयआयएफचे अध्यक्ष दीपांकर विश्वास, मे. घाटगे पाटील इंडस्ट्रिजचे मिलिंद भावे मार्गदर्शन करणार आहेत. फाउंड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरने पर्यावरणपूरक सॅण्ड रिक्लमेशन प्लॅन्ट उभा केला आहे. या प्रकल्पातून पर्यावरणाचे नियम पाळून पुनर्वापरातील वाळू वापराची माहिती दिली जाणार आहे. चर्चासत्राचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष राजू पाटील, उपाध्यक्ष दीपक परांडेकर, चर्चासत्राचे संयोजक अमर जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कनेक्श्नसाठी कुटुंबाचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

वीज कनेक्शनसाठी चार वर्षे मंजुरी मिळूनही कणेरी (ता. करवीर) राजेंद्र बाळासाहेब हरिज्वाळे (कणेरी, ता. करवीर) कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज कंपनी प्रशासनाच्या निषेधार्थ एक दिवसाचे उपोषण केले. त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

हरिज्वाळे कणेरी येथे राहतात. गेली १९ वर्षे त्यांच्या घरी वीज कनेक्शन नसल्याने १३ ऑगस्ट २०१२ रोजी कनेक्शनसाठी वीज कंपनीकडे अर्ज केला होता. निधी मिळाल्यावर विद्युत पोल मंजूर होईल तेव्हाच कनेक्शन देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मार्च २०१६ मध्ये हरिज्वाळे यांच्या घराच्या परिसरात इलेक्ट्रिक पोल टाकले आहेत. हरिज्वाळे यांनी गोकुळ शिरगाव आणि कागल येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून वीज कनेक्शनबाबत चौकशी केली. त्यावेळी प्रवीण भूपाल शिंदे यांची तक्रार असल्याचे कनेक्शन देता येत नसल्याचे सांगितले. शिंदे यांच्या तक्रारीमुळे महावितरण कंपनी कनेक्शन देत नसल्याचा आरोप पत्रकात केला आहे. वीज मंडळ, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत या सर्व ठिकाणी प्रयत्न करून वीज कनेक्शन मिळत नसल्याने कुटुंबीयांसह उपोषणास बसल्याचे हरिज्वाळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत कागल वीज मंडळाचे उपअभियंता गणेश पोवार यांच्याशी संपर्क साधला असता, हरिज्वाळे यांनी कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत. कंपनीने पोलही उभारले आहेत. कनेक्शन देण्यास आम्ही तयार आहोत. पण प्रवीण शिंदे यांनी घरावरून विजेची वायर नेण्यास विरोध केल्याने आम्हाला कायदेशीर व तांत्रिक अडचणी येत आहेत. आम्ही कणेरी ग्रामपंचायतीला हरिज्वाळे यांच्या घराकडे विजेची वायर नेण्यासाठी रस्ता अथवा जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी मार्गदर्शन मागितले असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images