Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बसव व्याख्यानमाला...राजेंद्र कुंभार

$
0
0

बसव व्याख्यानमाला ... लोगो

..................

सिंगल फोटो

........

लिंगायत धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा

प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लिंगायत धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. महात्मा बसवेश्वरांनी वेद आणि पुराण म्हणजे थोतांड असे वचन साहित्यात नमूद केले आहे. लिंगायत धर्मात अंधश्रध्देला थारा नाही. हा धर्म विवेकी, बुध्दीवादी आहे. श्रम संस्कृतीला श्रेष्ठत्वाचा दर्जा व विचार-उच्चार-कृतीच्या स्वातंत्र्यावर आधारित हा धर्माचा पाया आहे. सध्याच्या फॅसिझमच्या वातावरणात वचन साहित्यातील क्रांतिकारी विचार बंधूभाव, समानतेवर आधारित समाज निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील,' असे मत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बसव व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'लिंगायत क्रांतिकारी प्रागतीक धर्म' हा व्याख्यानाचा विषय होता. डॉ. सुभाष देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य कुंभार यांनी महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य, शिवानुभव मंटपच्या कार्य पध्दतीचे विश्लेषण केले.

प्राचार्य कुंभार म्हणाले, 'महात्मा बसवण्णा व वचन साहित्यांनी विषमता, जातीभेदाला विरोध केला. हिंदू धर्म ज्या गोष्टीवर उभारला होता, त्या गोष्टी नाकारल्या. वेद, पुराण झिडकारले. आर्थिक, सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून समाजाला मुक्त केले. माणसाचे माणूसपण नाकारणारी प्रस्थापितांची बलस्थाने वचनांच्या माध्यमातून उध्दवस्त केली. परिस्थिती चळवळीला जन्म देते आणि चळवळीला प्रेरणा लागतात. बसवेश्वर व त्यांच्या अनुयायांचे वचन साहित्य हे चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. माणसासोबत माणुसकीच्या नात्याने व्यवहार हे वचन साहित्याचे वैशिष्ट्य समानतेच्या पातळीवर पोहचविते. श्रमिकांसाठी देश निर्माण करावयाचे असेल तर बसवेश्वरांच्या विचार कार्यांची अंमलबजावणी गरजेची आहे.' लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष बाबूराव तारळी यांनी प्रास्ताविक केले. चंद्रशेखर बटकडली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पांगे यांनी आभार मानले.

...............

धार्मिक स्वातंत्र्याच्या चळवळीला यश

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई म्हणाले, 'करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सरकारनियुक्त पगारी पुजारी नेमण्याचा लढा हा एका अर्थाने धार्मिक स्वातंत्र्याची चळवळ होती. पगारी पुजारी नेमण्याच्या कायद्यावर राज्यपालांची सही झाल्याने त्या चळवळीला यश आले. या चळवळीत समाजातील अनेकविध घटक सहभागी झाले. परिवर्तनवादी संस्था, व्यक्ती, डाव्या संघटना आदींचा सहभाग राहिला. गेल्या वर्षी मी कुडलसंगम येथे गेलो होतो. तेथील महात्मा बसवेश्वरांच्या समाधीजवळ बसून पगारी पुजारी नेमणुकीसाठी सुरु केलेल्या चळवळीला बळ मिळू दे, लढाईला ताकद मिळावी अशी प्रार्थना केली होती. अंबाबाई ही स्त्री देवता आहे. यामुळे या देवीची पूजा ही महिलांकडून झाली पाहिजे अशी भूमिका आहे. सरकार नियुक्त पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिला असतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांकडून निधी

$
0
0

हा निधी दिसत नाही का?

पालकमंत्र्यांनी २०२३ कोटींचा निधी आणल्याचा भाजपचा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकांसह सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे २०२३ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. ५०० कोटी रुपयांचा विकास निधी आणून दाखवा, हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आव्हान देणाऱ्या नेत्याला हा विकास निधी दिसत नाही का? गांधारीप्रमाणे पट्टी बांधल्यानेच पालकमंत्री पाटील यांच्यावर आरोप करण्याचे काम सुरू आहे,' अशी टीका भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, 'महापालिकेत सत्ता असणाऱ्यांनी थेटपाइपलाइनसह ज्या योजना आणल्या, त्यात केवळ ढपला पाडण्याचेच काम केले. इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक नेत्याला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जनतेवर लादलेले टोलरुपी भूत गाडले. महापालिका, स्थानिक जनतेवर कोणताही बोजा न टाकता हा निधी दिला आहे. त्यामुळेच विरोधकांच्या छातीत धडकी भरली. 'टोल पंचगंगेत बुडवू', अशी वल्गना केली. दुसरीकडे टोलची पावती फाडून जनतेचा अपमान केला. पालकमंत्री पाटील यांनी विरोधकांकडे लक्ष न देता, लोकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून विकासाचे पर्व जिल्ह्यात सुरू केले. रस्ते विकास प्रकल्पांतर्गत कंपनी काम सोडून गेल्यानंतर सौंदर्याला बाधा आली होती. ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी प्रयत्न केले. जिल्ह्याचा विकास न झाल्याने सर्वत्र नाराजी होती. ती दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्या माध्यमातून विकासाची गंगा आणली.  नवऊर्जा महोत्सव, भीमवंदना,  कलामहोत्सव यासारखे महोत्सव घेऊन सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्याचे काम केले. पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची कवाडे खुली केली. आडवाटेवरचं कोल्हापूर हा विकासाची नवी गंगा आणणारा उपक्रम आहे. त्यातून ग्रामीण भागातील आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. सांस्कृतिक, सहकार, शेती, औद्योगिक, ऐतिहासिक, सामाजिक क्षेत्रात विकास केला. राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला. तोच विचार घेऊन  पालकमंत्री पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांना राजाश्रय दिला आहे.' 

पालकमंत्र्यांनी आणलेला निधी

राष्ट्रीय महामार्गासाठी ८१५ कोटी 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत ४१ कोटी

ग्रामीण व मार्गाची सुधारणासाठी ३ वर्षांत १५२ कोटी

नवीन पद्धतीचे विश्रामगृहाची उभारणी 

वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी १०० कोटी 

पोलिस मुख्यालयातील सदनिकांसाठी पाच कोटी

अमृत योजनेअंतर्गत १९० कोटी रुपयांची कामे 

रंकाळा संवर्धन पाच कोटी 

रिंगरोडसाठी ४२५ कोटी रुपये मंजूर

शाहू जन्मस्थळ विकासासाठी २ कोटी ८ लाख 

चित्रनगरी विकासासाठी १२ कोटी ५७ लाख

चंद्रकांत मांडरे संग्रहालय २ कोटी ४९ लाख 

भूमिगत केबलसाठी २१ कोटी

शास्त्रीनगर क्रीडांगण विकास तीन कोटी

पंचगंगा घाट सुशोभीकरण ४ कोटी पाच लाख

अंबाबाई विकास आराखडा पहिला टप्पा ८० कोटी 

कन्यागत पर्वकाळसाठी दोन टप्प्यात ९२ कोटी ३० लाख 

✅जोतिबा विकास आराखडा २५ कोटी

माणगाव स्मारक विकासनिधी २ कोटी ३८ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात ठार

$
0
0

वाहनाच्या धडकेत ठार

हातकणंगले

पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता.हातकणंगले) येथे मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार मोहन बाजीराव कांबळे (वय. ४५,रा.रामनगर,शिये, ता.करवीर)हे जागीच ठार झाले. हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला . शिये येथील मोहन कांबळे हे कराडच्या दिशेने मोटारसायकलने निघाले होते. किणी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.या धडकेने कांबळे हे रस्त्यावर जोरात आपटले. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

$
0
0

झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी नाका परिसरात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोठे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. झाड पडले त्यावेळी कोणीच परिसरात नसल्याने जिवितहानी टळली. अग्निशमन दलाने तुटलेले झाड रस्त्यांवरुन हटवल्यानंतर वाहतूक सुरु झाली.

मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास वळवाच्या पावसास सुरुवात झाल्यावर ५० ते ६० वर्षापूर्वीचे हे मोठे झाड उन्मळून पडले. झाड रस्त्यांवर आडवे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक वाहने थांबून होती. शहर वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. स्थानिक नागरिकांनी संपर्क केल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत कटरने झाडाच्या फांदा तोडून रात्री उशिरा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांच्या सहभागाने रंगली शिवजयंती मिरवणूक

$
0
0

फोटो आहे

जयघोषात निघाली मिरवणूक

महिलांच्या सहभागाने रंगली जुना बुधवार पेठ मंडळाची शिवजयंती मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरवणूक मार्गावर महिलांनी साकारलेले शिवकाळातील देखावे, परिसरातील कार्यकर्त्यांनी धरलेला लेझमाचा ताल, फेटे बांधलेल्या सुमारे एक हजार महिलांचा घुमणारा 'जय भवानी...जय शिवाजी... ' अशा जयघोषात संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था तालीम मंडळांच्या शिवजयंती मिरवणुकीने बुधवारी लक्ष वेधून घेतले.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शिवजयंती उत्सवाची सांगता मिरवणुकीने झाली. शिवजयंती साजरी करण्यासाठी जुना बुधवार पेठ परिसरातील ८५ मंडळे, तालीम व संस्था एकत्र आल्या होत्या. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता तोरस्कर चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपरिक ढोलताशांच्या गजरात व लेसर रोषणाइच्या झगमगाटात दोन अडीच तास चाललेल्या या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्ग शिवमय झाले.

खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. संजय मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. शिवजयंती उत्सव समितीतर्फे किशोर घाटगे, भाऊ घोडके, सुशील भांदिगरे यांनी स्वागत केले. त्यानंतर ढोलताशांसह पोवाड्यांच्या शाहिरी पोवाड्याने मिरवणूक मार्गावर वीररस संचारला. तोरस्कर चौक, महापालिका चौक, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी असा मिरवणुकीचा मार्ग होता.

महिलांनी सादर केलेले देखावे यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अफझलखानाचा वध, पावनखिंड लढाई, शिवजन्मकाळ, स्वराज्याची शपथ या प्रसंगावर आधारित महिलांनी सादर केलेल्या देखाव्यानी मिरवणुकीची शोभा वाढवली. महिलांचा लक्षणीय सहभाग, भगव्या साड्या व फेटे परिधान करून मिरवणुकीत शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या महिलांचा उत्साह, महिलांचे लेझीम पथक यामुळे वातावरण भारावून गेले. फुलांनी सजवण्यात आलेल्या पालखीत शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. तर अश्वारुढ शिवपुतळाही मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

मुलींवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, शाळा वाचवा, लेक वाचवा, शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा, 'महागाई कमी करा', अशा सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर आधारित फलक अग्रभागी होते. शिवकाळातील निर्णय, कायदे याबाबत माहिती देणारे फलकही मिरवणुकीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्वच्छतेत ३६ गावे भारी

$
0
0

फाइल फोटो

......

जिल्हास्तरावर निवडीची प्रक्रिया सुरू, सर्वांगिण स्वच्छतेचे निकष

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानतर्गंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छतेच्या तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील ३६ गावे भारी ठरली. तालुकास्तरावर अनुक्रमे पहिला, दुसरा क्रमांक मिळवलेल्या गावांचे मूल्यमापन जिल्हास्तरासाठी एप्रिलअखेर करण्यात येणार आहे. गावांतील सार्वजनिक, वैयक्तिक स्वच्छतेच्या निकषावरील मूल्यमापनानंतर जिल्हास्तरावर पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवलेल्या गावांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. यातील दोन ग्रामपंचायतींची निवड विभागीय स्तरावर होणार आहे. तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर सर्वोत्कष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे.

ग्रामस्थांत स्वच्छतेची आवाड निर्माण होण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. सरकारच्या विविध योजना, लोकसहभागातून स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवल्यात आली. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. यामुळे गावे हागणदारीमुक्त झाली. स्वच्छतेमधील सातत्यासाठी सरकारी यंत्रणेव्दारे जागृती मोहिम राबवण्यात आली. घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरूस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुध्दता सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबवलेल्या गावांची निवड स्पर्धेसाठी झाली. तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मूल्यमापन केले. सर्वाधिक गुण मिळवलेल्या गावांची निवड करण्यात आली.

दरम्यान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मागील सरकारमधील दिवंगत आर. आर. पाटील यांनी सुरू केल्यामुळे या सरकारने त्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र विरोधकांनी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला. त्यानंतर सरकारने तालुका स्तरीय स्पर्धाचे मूल्यमापन करून पहिले तीन क्रमांक नुकतेच जाहीर केले. एप्रिलअखेर जिल्हास्तरीय पहिल्या तीन क्रमांकासाठी गावांच्या निवडीसाठी मूल्यमापन केले जाईल. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून तालुकास्तरावरील पहिला, दुसरा क्रमांक मिळवलेल्या गावांचे मूल्यमापन होईल. मूल्यमापनावेळी कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी जोरदार तयारी करीत आहेत.

------------------------

चौकट

उजळाईवाडी प्रथम

स्वच्छ ग्राम स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेते अनुक्रमे असे : करवीर : उजळाईवाडी, नागाव, शेळकेवाडी. आजरा : उत्तूर, श्रृंगारवाडी, हत्तीवडे. भुदरगड : मुधाळ, मडिलगे खुर्द, अंतुर्ली. चंदगड : कार्जिर्णे म्हाळुंगे, अलबादेवी, विंझणे. गगनबावडा : बावेली, साखरी, साळवण. गडहिंग्लज : हेब्बाळ जलद्याळ, हसूरचंपू, नांगनूर. हातकणंगले : पुलाची शिरोली, घुणकी, लाटवडे. कागल : फराकटेवाडी, बस्तवडे, बिद्री. पन्हाळा : पोर्ले तर्फे बोरगाव, पोर्ले तर्फ ठाणे, आंबवडे. राधानगरी : मांगोली, तळाशी, कोदवडे. शाहूवाडी : शिवारे, बांबवडे, नांदगाव. शिरोळ : हसूर, बुबनाळ, आगर.

---------------------

जिल्हास्तरावर ५ लाखांचे बक्षीस

ग्रामस्वच्छता स्पर्धेत जिल्हास्तरावरील अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायतीस पाच, तीन, दोन लाख रूपये रोख देण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतीस एक लाख, ५० हजार, २५ हजार रूपये सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात येणार आहे. याशिवाय सांडपाणी व्यवस्थापन, कुटुंब कल्याण, सामाजिक एकता असे तीन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा पुरस्कार मिळवलेल्या ग्रामपंचायतीस प्रत्येकी २५ हजार रूपयांचे बक्षीस मिळणार आहे.

-----------------------

कोट

'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेचा तालुकास्तरावरीय निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये क्रमांक मिळवलेल्या गावांचे मूल्यमापन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी एप्रिलअखेर करण्यात येईल. विजेत्यांना ग्रामपंचायतींना सरकारकडून रोख बक्षीस मिळणार आहे.

सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय्यतृतीया - मुहूर्ताने सोने खरेदीला तेजी

$
0
0

फोटो आहे

...............

अक्षय्य मुहूर्ताला कोट्यवधींची उलाढाल

सोन-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू व बांधकाम व्यवसायामध्ये उत्साहाचे वातावरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली . तर बांधकाम साईटवर फ्लॅट बुकिंग व मुहूर्ताने गृहप्रवेशाचा योग जुळून आला. सोने-चांदी, मोबाइल व बांधकाम विभागात तेजीचे वातावरण दिसत असताना वाहन विक्रिला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. तरीही मुहूर्ताच्या खरेदीने बाजारपेठेत एका दिवसांत सुमारे ८० ते ९० कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीनंतर सोने-चांदी, बांधकाम, वाहन व बांधकाम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येवू लागला आहे. याचे प्रत्यय अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताच्या खरेदीने पहायला मिळाले. त्यामुळे बुधवारी दिवसभर सराफ कट्टा व ब्रँडेड सोन्या-चांदीच्या शोरुममध्ये ग्राहकांची झुंबड उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून दहा ग्रॅम सोन्याचा दर ३१ हजारांवर स्थिर होता. पण सध्या हाच दर ३२ हजारांच्या पुढे जाऊनही मुहूर्ताच्या खरेदीसाठी ग्राहकांनी विशेष पसंती दिली. यामध्ये वधू-वरांसाठी लागणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची अधिक विक्री झाली. याचबरोबर मोबाइल व इलेक्ट्रॉनिक वस्तूवर आकर्षक गिफ्ट आणि सूट असल्याच्या जाहिरातींचा ग्राहकांनी विशेष लाभ घेतला.

त्यामुळे गुजरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, शिवाजी रोडवर ग्राहकांची गर्दी दिसत होती. अनेकजणांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. मुहूर्ताने होणारी खरेदी लक्षात घेवून अनेक शोरुमबाहेर मंडप उभारले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी १२ पर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. पण उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर काहीशी गर्दी कमी झाली, पण पुन्हा सांयकाळनंतर गर्दीमध्ये वाढ झाली. टीव्ही, फ्रीज, कुलर सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शून्य टक्के दराने कर्जपुरवठ्याची सुविधा फायनान्स कंपन्यांनी उपलब्ध करुन दिली होती. काहीनी फ्लॅट बुकिंग करताना मुहूर्ताने गृहप्रवेशही केला. ब्रँडेड दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शोरुमबाहेर 'वेटिंग' करावे लागत होते. तर फर्निचर व्यवसायतही चांगली उलाढाल झाली असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

.................

कोट

'नोटाबंदीनंतर बांधकाम व्यवसायामध्ये काहीसे मंदीचे वातावरण होते. पण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताने अनेकांनी फ्लॅट बुकिंग केले. तर काहींनी गृहप्रवेशही केला. यामुळे बांधकाम व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुंतवणुकीला कोल्हापूरला अधिक पसंती पुन्हा मिळू लागल्याने सहा महिन्यानंतर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

महेश यादव, अध्यक्ष क्रिडाई

.......

'दोन आठवड्यांपासून सोनेदरात वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा दर ३२,२०० असूनही ग्राहकांनी सोने-चांदी दागिने खरेदीसाठी उत्साह दाखवला. पुढील काळात विवाह मुहूर्त चांगले असल्याने वधू-वरांसाठी लागणाऱ्या सोने-चांदी दागिन्यांची ग्राहकांनी मुहूर्ताने खरेदी केली.

विजय निल्ले, सराफ

............

'नोटाबंदीनंतर वाहन उद्योगाला फटका बसला आहे. त्यामधून हा उद्योग अद्याप सावरलेला नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकली असल्याने दोन वर्षापूर्वीचा उत्साह आज दिसून आला नाही. दरवर्षीच्या तुलनेत अपेक्षित विक्री यावेळी झाली नाही.

विशाल चोरडिया, व्यवस्थापकीय संचालक, युनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावडा सतेज पाटील बैठक

$
0
0

कर्मचाऱ्यांना पैसे मागितले

तर कॉल करा

बावड्यातील बैठकीत आमदार पाटील यांची सूचना

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

'प्रभागात नवीन बांधकाम, घरदुरुस्तीबाबत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले तर थेट फोन करा,' अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी केली. सार्वजनिक आणि वैयक्तिक अडचणींबाबत तुम्ही कधीही संपर्क साधा, असेही स्पष्ट केले.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कसबा बावड्यातील सहाही प्रभागात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतरच्या विजयी मेळाव्यात दर सहा महिन्यांनी प्रत्येक प्रभागाची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा आमदार पाटील यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी यशवंत निवास येथे आढावा बैठक झाली.

यावेळी एका नागरिकाने प्रभागात नवीन बांधकाम करायचे झाले वा घराची दुरुस्ती काढली तर लगेचच महानगरपालिकेचे लोक येतात. त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते, अशी तक्रार एका नागरिकाने केली. बावड्यासाठी आतापर्यंत बराच निधी दिला असून काही भागात रस्ते खराब झाले आहेत. त्यासाठी पुढील बजेटमध्ये तरतूद केली जाईल. पाच वर्षांत सर्व कामे पुर्ण करण्याचा मानस असून सरकारकडे १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मागितले आहेत. निधी उपलब्ध होताच प्राधान्याने रस्ते करण्यात येतील प्रभागाचे नगरसेवक सुभाष बुचडे यांनी उलपे मळा, शुगर मिलसह प्रभागातील २९ कॉलनीमध्ये करण्यात आलेली रस्ते, गटर, विद्युत पुरवठा, पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती कामे प्रस्तावित असल्याचे सांगितले.

यावेळी उलपेमळा येथील रस्ते करा व एलईडी बल्ब, राजाराम कॉलनी गटर्स, पाण्याची व्यवस्था करावी, श्रीकृष्ण कॉलनीत गटार तुंबतात त्याची निर्गत करावी, स्वराज्य कॉलनी रस्ता, उलपे मळा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था आदीबाबत चर्चा झाली. बैठकीस महापौर स्वाती यवलुजे,बावडा परिसरातील सर्व नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तूर ग्रामपंचायत देशपातळीवर अव्वल

$
0
0

कोल्हापूर

केंद्र सरकारच्या दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान आणि नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार सन २०१८ साठी आजरा तालुक्यातील उत्तूर ग्रामपंचायतीची निवड झाली. या ग्रामपंचायतीस १७ लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात सरपंच, ग्रामसेवकांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. 'देशपातळीवर अव्वल ठरणारी राज्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे', असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

ग्रामसभेतील महिलांचा सहभाग, गतिमान प्रशासन, तंत्रज्ञानाचा वापर, गावातील आरोग्य यंत्रणा, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, वंचित घटकांचा विकास, ग्रामस्थांची आर्थिक उन्नती, सांडपाणी व्यवस्थापन, तरूण मंडळे, महिला बचत गटांची कामगिरी, महिला आणि बालविकास, पर्यावरण संरक्षण, सर्वांगिण विकास आराखड्याची अंमलबजावणी, उत्पन्न वाढीसाठीच्या उपाय योजना या निकषांवर या ग्रामपंचायतीची निवड झाली. त्यासाठी ऑनलाइन मूल्यमापन करण्यात आले.

---------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब कार्यशाळा

$
0
0

कल्चर क्लब लोगो वापरावा

मॉकटेल मेकिंग

कार्यशाळा रविवारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबतर्फे रविवारी (ता. २२)'मॉकटेल मेकिंग' कार्यशाळा आयोजित केली आहे. न्यू शाहूपुरी, भू विकास बँकेजवळ हॉटेल रेडियंट येथे दुपारी तीन वाजता कार्यशाळेची सुरुवात होईल. कार्यशाळेत रेन बो, वर्जिन पिनाकोलाडा, ग्रीन ग्रास, मिर्च मुमताज, रेडियंट स्पेशल, वर्जिन मॉर्डलो, माँगो स्मूदी, ब्लू लगून आदी पदार्थाचे प्रात्याक्षिक तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. इच्छुकांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी मोबाइल क्रमांक ९७६७८९०६२६ वर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण सभेतर्फे ४ मे रोजी सामुदायिक मौजीबंधन

$
0
0

सामुदायिक मौजीबंधन

कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे ४ मे रोजी सामुदायिक मौजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बिनखांबी गणेश मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ज्या मुलांवर मौजीबंधन संस्कार करायचा आहे, त्या पालकांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासित योजना आश्वासनाच्या वाऱ्यावर

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा...

'आश्वासित योजना' प्रगतीच्या मार्गावर

वर्षभराच्या पाठपुराव्याला यश लाभणार; ४७ जणांना लाभ मिळणार

कोल्हापूर टाइम्स टीम

सेवेत कार्यरत असताना पदोन्नती न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याची तरतूद आहे. मात्र, विद्यापीठातील २००६ ते २०१० या कालावधीतील ४७ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेच्या सुविधांपासून वंचित राहिलेत. सेवानिवृत्त होऊन आठ-दहा वर्षे झाले तरी लाभ मिळाला नव्हता. दरम्यान, मंगळवारी यासंदर्भात प्र-कुलगुरू व व्यवस्थापन परिषद सदस्यांत चर्चा झाली आणि या आठवड्यात सेवानिवृत्तांचे आश्वासित प्रगती योजनांचे प्रस्ताव शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर होणार आहेत.

एकाच पदावर सलग बारा व २४ वर्षे काम केलेल्या, परंतु त्या कालावधीत पदोन्नती मिळाली नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवांतर्गत सरकारने १९७४ आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. दरम्यान, सरकारने एक ऑक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत या योजनेतील लाभ बंद केले होते. सरकारने डिसेंबर २०१६ मध्ये नवा आदेश काढून त्या कालावधीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना योजना लागू करण्याचा नव्याने निर्णय घेतला. त्या निर्णयाने आश्वासित योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधितांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासोबत चर्चा केली होती. कुलसचिवांनी फेब्रुवारी २०१८ पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या लाभांचा प्रस्ताव शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येतील असे तोंडी आश्वासन दिले होते.

संबंधित कर्मचाऱ्यांनी मार्च २०१८ मध्ये प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावी म्हणून पत्र दिले होते. दरम्यान, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव यांनी मंगळवारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासोबत याप्रश्नी चर्चा केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विद्यापीठासाठी योगदान दिल्यामुळे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक जलदगतीने करण्याचे ठरले. शिर्के यांनी कुलसचिव नांदवडेकर यांच्याशी चर्चा केली. संबंधितांचे प्रस्ताव तयार करुन शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

.............................

कोट...

विद्यापीठातील ४७ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी विद्यापीठ प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भात कुलसचिव, व्यवस्थापन परिषद सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा झाली. आस्थापना विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या तीन-चार दिवसांत कुलसचिव कार्यालयामार्फत संबंधितांचे प्रस्ताव शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर होतील.

डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू शिवाजी विद्यापीठ

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचरकरंजीत प्रदूषण

$
0
0

फोटो

...................

पंचगंगा की धोबी घाट ...

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही इचलकरंजीत प्रदूषण रोखण्यात अपयश

म.टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पंचगंगा प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनाला यश येत नाही. कोणत्याही प्राथमिक आणि ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. नदी प्रदुषणाला जबाबदार गोष्टींना आळाही घातला जात नसल्याने कपडे, वाहने, जनावरे धुणे हे प्रकार आजही उघडपणे चालतात. नदी पात्रात हे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपाालिका यांना याचे काहीच गांभीर्य असल्याचे दिसत नाही.

राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. पण याठिकाणी आवश्यक सुविधांची वानवा असल्याने कापडावर प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळेच नदी प्रदूषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सर्व प्रक्रियेनंतर सोडल्या जाणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यावरही योग्य ती प्रक्रिया करुन त्याचा निचरा करण्याची गरज आहे. मात्र, इचलकरंजीत या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. तसेच शहरातील काळा ओढा आणि सारण गटारींची भयावह अवस्था दिसून येते. काळा ओढा आणि चंदूर रोडवरील ओढ्यातून रोज लाखो लिटर सांडपाणी थेट नदीत मिसळते. विशेष म्हणजे शहरवासियांना हा विषय गंभीर वाटत असला तरी नगरपालिका अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याचे फारसे देणे-घेणे अथवा गांभीर्य वाटत नाही.

इचलकरंजीतील कापड प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रीत सांडपाणी व ओढ्यातील मैलामिश्रित पाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून रोज लाखो लिटर केमिकलमिश्रीत सांडपाणी नदीत मिसळते. शहरातील नाल्यांमधील काळे पाणी बेधडक वाहत असताना, प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. परिसरातील प्रोसेस इंडस्ट्रीमधील कारखानदारांनी मिळून २० एमएलडी क्षमतेचा औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीइटीपी) हे प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या काळ्या ओढ्यातून रसायनमिश्रित सांडपाणी वाहते.

शहापूरपासून सुरू होणारा काळा ओढा सीइटीपीपासून पुढे बोहरा मार्केट, आमराई रस्ता, टाकवडे वेस येथून थेट पंचगंगेत जाऊन मिसळतो. दक्षिण दिशेला असलेल्या इचलकरंजी-चंदूर मार्गावरील ओढ्यातून पाइपलाइनमधून फेसाळलेले रसायनमिश्रित सांडपाणी सर्रासपणे वाहत असते. हे पाणी पुढे चंदूर गावातून थेट नदीत मिसळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षी शाहू प्रतिष्ठान लोगो प्रकाशन

$
0
0

शाहू महाराज प्रतिष्ठानच्या

लोगोचे अनावरण

कोल्हापूर: येथील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी एकत्र येत लोकराजा छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानची स्थापना केली असून लागोचे अनावरण करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. बाबा महाडिक यांच्या उपस्थितीत इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण झाले. प्रतिष्ठानमध्ये शहरातील विविध तालीम संस्थांचा सहभाग आहे. प्रतिष्ठानची १५ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाबा महाडिक, उपाध्यक्षपदी हिंदुराव हुजरे-पाटील व जगदीश जगताप यांची निवड करण्यात आली. सचिवपदी मदन पाटील, सहसचिवपदी रघुनाथ थोरात तर खजानिसपदी डॉ. संदीप पाटील यांची निवड झाली. अॅड. बाबा इंदुलकर यांची कार्याध्यक्षपदी तर सदस्य म्हणून हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर, कृष्णाजी हरुगडे, अजयसिंह देसाई, सदानंद कोरगावकर, डॉ. संजय देसाई, सुधर्म वाझे, आदिल फरास आणि राजू सावंत यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेलवरुन सभा गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा मुद्दा गुरुवारी (ता. १९) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत गाजण्याची चिन्हे आहेत. या मुद्द्यावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या इशाऱ्याचे पडसादही सभेमध्ये उमटण्याची शक्यता आहे.

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापालिकेतील पदाधिकारी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोप करत टीका केली होती. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर देत अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्यासाठी असल्याचा खुलासा केला. तसेच गेल्या २० वर्षांत शहरातील उठवलेल्या आरक्षणांची चौकशी करणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या सभेकडे लक्ष लागले आहे. सभेवेळी काही संघटना आणि पक्षांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली नसल्याबद्दल प्रशासनाचा निषेध म्हणून शिवसेना महापालिकेवर बांगड्या फेको आंदोलन करणार आहे.

हायकोर्टाने तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा निर्णय दिल्यानंतर त्यावर कारवाईसाठी महापालिकेने तयारी केली. पण सरकारने यासंदर्भात बैठक घेऊन नियमितीकरणाबाबत चर्चा केल्याने कारवाई थांबली होती. सरकारच्या बैठकीनंतर महापालिकेने पोलिस बंदोबस्तासाठी प्रयत्न केला नाही, तसेच कारवाईसाठी काही पावलेही उचलली नाहीत. यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली होती. कारवाईसाठी प्रशासनासोबत नगरसेवक रस्त्यावर उतरतील, असे सांगितले होते. पण प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे सभेत या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून प्रशासनाची कोंडी झाली आहे. या मुद्द्यावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यात होत असलेल्या आरोप, प्रत्यारोपांचे पडसादही चर्चेत उमटण्याची चिन्हे आहेत.

अर्थसंकल्पामध्ये निधीचे असमतोल वाटप झाल्याने सध्या सत्ताधारी आणि विरोधी आघाडीमध्ये धूसफूस सुरू आहे. हा विषय वादाचा ठरला असून सभेमध्ये भाजप आघाडीला कोंडीत पकडले जाऊ शकते. भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना झुकते माप देत भरपूर निधी दिल्याचा आरोप काँग्रेस आघाडीने केला आहे. तर मध्यंतरी भाजप- ताराराणी आघाडीचे विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनी आपल्याच आघाडीच्या स्थायी समिती सभापतींवर आरोप करत निधी पळविल्याचा आरोप केला होता. महापौर निवड महिन्यावर आली असल्याने त्यानिमित्ताने दोन्ही आघाडीमधील संघर्ष तीव्र होणार आहे. त्याची सुरुवात सभेपासून होणार असल्याचे बोलले जात आहे.

०००००००

मूळ कॉपी

००००००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा मुद्दा गुरुवारी (१९ एप्रिल) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत गाजण्याची चिन्हे आहेत. या मुद्द्यावरुन तापलेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद सभेमध्ये उमटण्याची शक्यता आहे. तसेच अर्थसंकल्पातील निधी वाटपावरुनही चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सभेत तावडे हॉटेल विषय गाजेलच, पण महापालिकेबाहेरही त्याच विषयावरुन आंदोलनाचे वातावरण राहणार आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली नसल्याबद्दल प्रशासनाचा निषेध म्हणून शिवसेना महापालिकेवर बांगडया फेकण्याचे आंदोलन करणार आहे.

हायकोर्टाने तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा निर्णय दिल्यानंतर त्यावर कारवाईसाठी महापालिकेने तयारी केली. पण सरकारने बैठक बोलवल्याने त्यावर कारवाई करता आली नाही. सरकारच्या बैठकीनंतर महापालिकेने पोलिस बंदोबस्तासाठी प्रयत्न केला नाही व कारवाईसाठी काही पाऊले उचलली नाहीत. यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली. प्रसंगी कारवाईसाठी प्रशासनासोबत नगरसेवक रस्त्यावर उतरतील, असे सांगितले होते. पण प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यावरुन सभेमध्ये प्रशासनावर जोरदार आगपाखड केली जाण्याची शक्यता आहे. तसेच या मुद्द्यावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यात होत असलेल्या आरोप, प्रत्यारोपांचे पडसाद सभेतील चर्चेत उमटण्याची चिन्हे आहेत.

अर्थसंकल्पाचाही विषय वादाचा ठरला असून सभेमध्ये सत्ताधारी आघाडीकडून भाजप आघाडीला कोंडीत पकडले जाऊ शकते. भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना भरपूर निधी दिल्याचा आरोप काँग्रेस आघाडीने केला आहे. त्यावरुन आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. महापौर निवड तोंडावर आली असल्याने त्यानिमित्ताने दोन्ही आघाडीमधील संघर्ष तीव्र होणार आहे. त्याची सुरुवात सभेपासून होईल, असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळच्या सभेस स्थगितीस सहकार कोर्टाचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) १५ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या वार्षिक सभेस स्थगिती देण्यास सहकार कोर्टाचे न्यायाधीश दांडगे यांनी नकार दिला आहे. वार्षिक सभेला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज अंबाबाई सहकारी दूध संस्थेसह करवीर तालुक्यातील अन्य दोन दूध संस्थांनी दाखल केला होता. सहकार न्यायालयाचे दांडगे यांनी बुधवारी हा अर्ज निकालात काढला.

१५ सप्टेंबर रोजी झालेली गोकुळची सर्वसाधारण वार्षिक सभा आणि त्यामध्ये झालेल्या ठरावांना स्थगिती देऊन कोर्ट कमिशनची नेमणूक करावी, तसेच पुन्हा सभा घेण्याची मागणी करणारा अर्ज सहकार कोर्टाकडे केला होता. या सर्व संस्था आमदार सतेज पाटील समर्थक असल्याने यासंबंधीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. सहकार कोर्टासह या संस्थांनी विभागीय दुग्ध उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. सहकार कोर्टात याबाबत तक्रार दाखल केल्यापासून सुनावणी सुरू होती. बुधवारी अर्जावर न्यायाधीश दांडगे यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंर न्यायाधीश दांडगे यांनी संस्थांचा अर्ज निकालात काढत वार्षिक सभेस स्थगिती देण्यास नकार दिला. अॅड. लुईस शहा यांनी ही माहिती दिली. गोकुळच्यावतीने अॅड. शहा यांनी तर अंबाबाई दूध संस्थेच्यावतीने अॅड. अशोक पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात भारनियमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरणचा शहरात बुधवारी विजेचा लपंडाव सुरू राहिला. काही भागांत वादळी वारा, पावसाळी पूर्व झाडांच्या तोडणीसाठी राजारामपुरी, शाहूपुरीसह उपनगरातील काही भागांत दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

सकाळी दहा, दुपारी दोन आणि सायंकाळी चार वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले. शिवाय कामेही खोळंबून राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारनंतर शहराच्या काही भागांत सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी शहरातील काही भागांतील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महावितरणने शहरातील काही भागांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार राजारामपुरी, शाहूपूरीसह उपनगरातील काही भागांत पुरवठा बंद करण्यात आला. कसबा बावडा, शिवाजी पेठ, संभाजीनगरसह काही परिसरात तासभर भारनियमन करण्यात आले. दरम्यान, शहरात अखंडपणे वीज पुरवठा सुरू असून काही तांत्रिक कारणांसाठी पुरवठा बंद केल्याचे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकाप महिला आघाडी मेळावा उत्साहात

$
0
0

शेकाप महिला मेळावा

कोल्हापूर

भारतीय शेतकरी कामगार पक्ष शहर आघाडीच्यावतीने नुकताच स्वयंरोजगार प्रशिक्षण मेळावा उत्साहात झाला. मेळाव्यात रोजगारासंदर्भात संगीता देवकर यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्यात आत्मविश्वास वाढवून स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे महिला अध्यक्षा अॅड उज्वला कदम यांनी सांगितले. यावेळी गीता कदम, मालूताई सावंत, माधवी हरेल, मीनाताई पाटील, शितल पोवाळकर आदी उपस्थित होते. वैशाली खाडे यांनी प्रास्ताविक केले. राजश्री सावंत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोसावी समाजसंस्थेतर्फे २९ रोजी वधूवर मेळावा

$
0
0

गोसावी समाज वधूवर मेळावा

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा २९ एप्रिल रोजी दैवज्ञ बोर्डिंग येथे सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्यात राज्यातील उपवर व उपवधूंसह पालक परिचयाचे आयोजन केले आहे. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूचा महामार्ग किणी ते कागल

$
0
0

कागल-किणी मार्ग असुरक्षित

महामार्गावर सर्व्हिस रोडचा अभाव; तीन महिन्यांत ४० अपघात

लोगो : मृत्यूचा महामार्ग

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर: पुणे-बेंगळुरू महामार्गाने वाहतुकीची गती वाढवली, मात्र यासोबत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यातील कागल ते किणी हा ३५ किलोमीटरचा मार्ग सर्वाधिक असुरक्षित आहे. या महामार्गावर तीन महिन्यांत ४० अपघात झाले असून अनेकजण जायबंदी झाले आहेत. महामार्गाचे अशास्त्रीय काम, सर्व्हिस रोडचा अभाव आणि वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे या मार्गावरील प्रवास मृत्यूचा महामार्ग बनला आहे.

या महामार्गाच्या बांधकामात ठेकेदाराने अनेक ठिकाणी गंभीर चुका केल्या आहेत. रस्त्यावरून पाणी निघून जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्थाच तयार केलेली नाही. पावसाळ्यात रस्त्यांवर साठलेले पाणी अवजड वाहनांमुळे लहान वाहनांवर जाते. लक्ष्मी टेकडी, नागाव फाटा आणि अंबप फाटा या ठिकाणी उड्डाणपुलांची गरज असतानाही ते तयार केले नाहीत. रस्ता दुभाजकांमध्ये योग्य पद्धतीने रोपांची वाढ करणे गरजेचे होते. बहुतांश ठिकाणी रोपांची देखभालच होत नाही. टोप येथे कासारवाडी फाट्यासमोरचा दुभाजक फोडून वाहतूक वळवली आहे. घुणकी येथील वारणा नदीच्या पुलाजवळचे तीव्र वणळही अशास्त्रीय आहे. तज्ज्ञांच्या मते महामार्गाचे अशास्त्रीय कामही अपघातांना कारणीभूत ठरते.

या महामार्गावरील किणी टोल नाका नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. काऊंटर कमी असल्याने दोनही बाजुला वाहनांच्या रांगा असतात. रुग्णवाहिकांसाठी मार्ग राखीव ठेवला जात नाही. रिटर्न टोलची व्यवस्था नसल्याने अनेकदा वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांचे वाद घडतात. टोल नाक्यापासून सुरू झालेला गैरसोयींचा प्रवास कागलपर्यंत कायम राहतो. किणी ते कागल या ३५ किलोमीटर अंतरात औद्योगिक क्षेत्र विस्तारले आहे. याशिवाय महामार्गालगत गावांची संख्या अधिक असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या तुलनेत सुविधांचा अभाव असल्याने महामार्गावर अपघात घडतात. सर्व्हिस रोड, बसस्टॉप, स्वच्छतागृह या महत्त्वाच्या सुविधा महामार्गावर नाहीत. अरुंद मार्ग आणि उलटी वाहतूक यामुळे प्रवास जीवघेणा बनत आहे.

सर्व्हिस रोडचा अभाव

किणी ते कागल या दरम्यान महामार्गावर केवळ अपवादात्मक ठिकाणीच सर्व्हिस रोड आहेत. गावांना जोडणारे फाटे सोडल्यास अन्यत्र सर्व्हिस रोड नाहीतच. सर्व्हिस रोड नसल्याने मुख्य मार्गावर वाहनांची गर्दी वाढते. महामार्गालतच्या गावातील वाहनधारक महमार्गावरून उलट्या दिशेने वाहतूक करतात. यात बैलगाडी, ट्रॅक्टर या वाहनांची संख्या मोठी आहे. मुळातच महामार्ग अरुंद असल्याने उलटी वाहतूक अपघातांना निमंत्रण देते. या वाहतुकीमुळे अपघात घडले आहेत. सर्व्हिस रोडसाठी जागा ताब्यात घेऊनदेखील ठेकेदाराने सर्व्हिस रोडचे काम केले नाही. कर्नाटकात सर्वत्र उत्तम सर्व्हिस रोड आहेत. या तुलनेत किणी ते कागल मार्गावर सर्व्हिस रोडचा अभाव असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

सुविधा आहेत कुठे?

किणी ते कागल दरम्यान महामार्गावर वाहनधारकांसाठी आवश्यक सुविधांचा पत्ताच नाही. वाहनांना थांबण्यासाठी थांबे नाहीत. पाणी, शौचालय आणि विजेचे दिवे यापैकी एकही सोय या मार्गावर नाही. एखादे वाहन नादुरुस्त असेल तर रस्त्याकडेलाच ते पार्क केले जाते. अपघात घडल्यास सर्व्हिस रोड नसल्याने उलट्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू करावी लागते. एमआयडीसी परिसरात रस्त्याकडेला अवजड वाहनांच्या रांगा लागतात. यावर कारवाई करणारे महामार्ग पोलिस वेळेत पोहोचत नाहीत. सूचना फलकही योग्य स्थितीत नाहीत. दुचाकीधारकांनी सर्व्हिस रोडचा वापर करावा, असा फलक टोपजवळ लावला आहे. प्रत्यक्षात जिथे फलक आहे, तिथे सर्व्हिस रोड तयारच केलेला नाही.

जीवघेणे स्पॉट

अंबप फाटा

टोप

गोकुळ शिरगाव

लक्ष्मीटेकडी

कागल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images