Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारवाईबाबतच्या याचिकेवर २५ ला सुनावणी

0
0

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवण्याबाबत मंत्र्यांकडून महानगरपालिकेला काही निर्देश दिले होते का त्याचे पुढील सुनावणीमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असल्याची माहिती अॅड. भूषण मंडलिक यांनी दिली. पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे.

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामे सरकारने नियमित करु नयेत, याबाबत कोल्हापुरातील भरत सोनवणे यांच्यावतीने अॅड. मंडलिक यांनी सोमवारी हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यामध्ये तावडे हॉटेल येथील अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्यावतीने कारवाई करावी व तेथील ही बांधकामे सरकारने नियमित करु नये, अशी मागणी केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक व रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणीही झाली. अॅड. मंडलिक म्हणाले, 'सुनावणीमध्ये याचिकाकर्त्याच्या मागण्या ऐकून मंत्र्यांनी तावडे हॉटेल परिसरातील बांधकामावर कारवाई करु नये, असे निर्देश मंत्र्यांनी महापालिकेला दिले होते का? याचे सरकारच्यावतीने स्पष्टीकरण करावे, असे आदेश खंडपीठाने दिले. बुधवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत स्पष्टीकरण करावे, असे सांगितले आहे.' यावेळी महापालिकेच्यावतीने अॅड. अभिजित आडगुळे उपस्थित होते.

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात मंडळांचे डॉल्बी जप्त

0
0

(फोटो आहे)

सात मंडळांचे

डॉल्बी जप्त

आवाजमर्यादा वाढविल्याने पोलिसांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवजयंती मिर‌वणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारी साऊंड सिस्टीम लावल्याने पोलिसांनी सात मंडळांचे डॉल्बी जप्त केले. उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डीजे, ट्रॅक्टरमालक अशा १५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ही कारवाई केली.

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळ, संयुक्त मंगळवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठ, शिवजयंती मंडळ पाचगाव, व्हिनस कॉर्नर शिवजयंती मंडळ, कसबा बावडा मित्र मंडळ, सोमवार पेठ, घिसाड गल्ली मित्र मंडळांची ध्वनी यंत्रणा पोलिसांनी जप्त केली. आठ ते दहा मंडळांच्या कार्यकर्त्यांना डॉल्बी यंत्रणा काढून ठेवण्यास पोलिसांनी भाग पाडले. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. परंतु शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, महाद्वार रोड, गंगावेश, राजारामपुरी मेन रोड, कसबा बावडा आदी परिसरात आवाज मर्यादेचे उल्लंघन केले. डॉल्बी लावून नृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पोलिसांनी व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. दुचाकींच्या पुंगळ्या काढून हुल्लडबाजी करणाऱ्या ७० हून अधिक तरुणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ एप्रिलला सुनावणी

0
0

कोल्हापूर: महापालिकेतील अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण या दोन नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावरील पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत या दोन नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोघांवर अपात्रतेची कारवाई करावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. त्याची मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार होती. पण ही सुनावणी झाली नाही. २४ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांतून विमानसेवेचे स्वागत

0
0

दिव्यांग, शेतकरी, अनाथ मुलांनी लुटला विमानप्रवासाचा आनंद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेतून एअर डेक्कन कंपनीचे विमान कोल्हापूर विमानतळावर मंगळवारी दुपारी तीन वाजता उतरले आणि गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली विमानसेवा सुरू झाल्याचे समाधान कोल्हापूरकरांना मिळाले. यानंतर विशेष विमानाचे कोल्हापूरहून दुपारी साडेतीन वाजता उड्डाण झाले. दिव्यांग, अनाथ मुले, शेतकरी, कष्टकरी, बचत गटातील महिलांनी विमानप्रवासाचा आनंद लुटला. प्रदीर्घ काळाने विमानसेवा सुरू झाल्याने उद्योजकांनी आनंदोत्सव साजरा केला.

२२ एप्रिलपासून नियमित विमानसेवा सुरू होणार असली तरी मंगळवारी विशेष विमान दुपारी तीन वाजता छत्रपती राजाराम महाराज विमानतळावर उतरले. त्यानंतर कोल्हापूर ते मुंबई विमान मुंबईकडे झेपावले. या विमानातून दिव्यांग, महिला आणि शेतकरी दाम्पत्याला विमान प्रवास करण्याची संधी मिळाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून हेल्पर्स ऑफ हॅन्डिकॅप्ड या संस्थेतील इंद्रजित भातमारे, जरार पटेल हे दोन दिव्यांग विद्यार्थी, अंधशाळेतील विनायक पाटील, बालकल्याण संकुलमधील श्रीनाथ भोईटे, शुभम खोत ही दोन मुले, एकटी संस्थेतील कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या आक्काताई गोसावी, भारती कोळी, बचत गटाच्या सीमा पालकर, शीतल पोवार, आणि चिखली येथील आवबा माने, शेवंता माने या शेतकरी दाम्पत्याला पहिल्या विमानातून प्रवास करण्याची संधी मिळाली.

भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी या प्रवाशांचे विमानतळावर स्वागत केले. हॉटेल मालक संघाने अल्पोपहार दिला. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी रामराजे कुपेकर, सत्यजित कदम, मनीष झंवर यांच्यासह ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

मुंबईहून आलेले प्रवासी

विमान सल्लागार समिती सदस्य समीर शेठ, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष चंद्रकात जाधव, संजय पाटील, संजय शेटे, जयेश ओसवाल, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, महेंद्र जोशीलकर, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमाचे राजीव परीख, उद्योगपती महावीर गाठ, कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्जल नागेशकर, गोपालदास धुवामी, असद अत्तार.

००

'मॅक' तर्फे सत्कार

मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल हातकगणंले (मॅक) तर्फे खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. मॅकचे उपाध्यक्ष गोरख माळी, ऑनररी सेक्रेटरी संजय पेंडसे, श्रीनिवास कुलकर्णी, संचालक मोहन कुशिरे, संजय जोशी, यशंवत पाटील, भावेश पटेल, सुरेश क्षीरसागर, संगमेश पाटील आदी उपस्थित होते.

००

संभाजीराजेंनी केले स्वागत

छत्रपती राजाराम महाराज विमानतळावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विमानसेवा सुरू केल्याबद्दल एअर डेक्कनचे आभार मानले. या वेळी संभाजीराजे म्हणाले, 'सध्या आठवड्यातून तीन दिवस सुरू होणारी विमानसेवा आठवड्यातून सहा वेळा करावी. दुपारी तीन वाजता असलेली विमानाची वेळ सकाळी नऊ वाजता करावी. याबाबत एअर डेक्कनचे मालक कॅप्टन गोपीनाथ यांच्या सोबत पुन्हा चर्चा केली जाणार आहे. यापूर्वी कोल्हापूर ते मुंबई ही एअर डेक्कनकडून विमानसेवा सुरू करण्यासाठी कॅप्टन गोपीनाथ यांची भेट घेऊन चर्चा केली होती. केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनाही निवेदन दिले होते. विमान कंपनीने नियमित सेवा द्यावी.'

००

विमानसेवा सुरू झाल्याने पर्यटनाला आणि हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. परराज्यातील प्रवासी श्री अंबाबाई दर्शनासाठी येतील. हॉटेल मालक संघाकडूनही पर्यटकांना विशेष सवलती दिल्या जात आहेत.

उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, जिल्हा हॉटेल संघ

००

उद्योग क्षेत्रातून विमानसेवा सुरू करण्याची सातत्याने मागणी होती. जिल्ह्याच्या विकासाचा उद्योगाचे मोठे योगदान आहे. विकासाचा टक्का वाढविण्यासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे.

चंद्रकांत जाधव, उद्योगपती

नियमित विमानसेवा होण्यासाठी उद्योजकांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहे. अनेक महत्त्वाच्या बैठका वेळेत होण्यास मदत होणार आहे. परदेशी उद्योजकही तातडीने कोल्हापुरात दाखल होऊ शकतात.

राजू पाटील, अध्यक्ष स्मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेपाळ येथे पॅनासिआ आंतरराष्ट्रीय परिषद

0
0

नेपाळ येथे पॅनासिआ

आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर: क्राउन प्लाजा सोल्टी काठमांडू (नेपाळ) येथे १२ वी पॅनासिआ आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेचे आयोजन वनौषधी विद्यापीठ कोल्हापूर, महर्षी वेदिक फाउंडेशन, सर्बियन असोसिएशन ऑफ आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी संहिताशास्त्री अर्जुन प्रसाद बास्तोली यांची प्रमुख उपस्थिती तर अध्यक्षस्थानी डॉ. किंग्जले ब्रुक्स होते. मुंबई येथील डॉ. विनायक तायडे यांना महर्षी महेश योगी स्मृती आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव केला. याबरोबरच डॉ. यमुना प्रभाकर, डॉ. सतीश शिंदाडकर, डॉ. रत्नप्रभा चौधरी, डॉ. शिवानंद पाटील, डॉ. नूतन पाखरे यांचाही गौरव करण्यात आला. परिषदेमध्ये सुमारे २५ शोधनिबंध सादर करण्यात आले. डॉ. संदीप देवल, डॉ. संतोष ढगे, डॉ. संजय सातपुते यांना उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणाचे बक्षीस मिळाले. डॉ. ऋषिकेश जाधव यांनी स्वागत केले. डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. प्रणव पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस वर्षांत एकाही आरक्षणाला धक्का नाही

0
0

एकही आरक्षण उठवले नाही

आमदार हसन मुश्रीफ यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्ता मिळवल्यापासून गेल्या १५ वर्षांत महापालिकेच्या एकाही जागेवरील आरक्षण उठवलेले नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागवलेली माहिती त्वरित देण्याची सूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिली आहे. शेतकरी संघाची थकबाकी जमा करण्यासाठी सिक्युरिटी अॅक्टनुसार निविदा प्रक्रियेद्वारे जागेची विक्री केली असून यासाठी अर्बन लँड सिलिंग व अकृषक आकाराचे तीन कोटी रुपये भरले आहेत. पण पालकमंत्री पाटील पदाला शोभणार नाही, अशा प्रकारे संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील व राज्यातील नंबर दोनच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त न करता सहिष्णू राहावे,' असा सल्ला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'शेतकरी संघाच्या जागेवर बँकेचे कर्ज होते. कर्ज थकीत झाल्यानंतर सिक्युरिटी अॅक्टनुसार निविदा काढून विक्री केली. जागेची विक्री करताना अर्बन लँड सिलिंग व अकृषक कर भरून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जागेची विक्री केली. ही जागा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी विकत घेतली. त्यानंतर ही जागा संजय डी. पाटील यांनी विकत घेतली. या जागेसह इतर महापालिकेच्या जागांची माहिती पालकमंत्री पाटील यांना त्वरित देण्याची सूचना आयुक्तांना केली आहे.'

'तावडे हॉटेलची जागा महापालिकेची असल्याचा निकाल कोर्टाने दिल्यानंतर जागा ताब्यात घ्यावी असा आग्रह पदाधिकाऱ्यांचा होता. पदाधिकाऱ्यांची मागणी रास्त असताना पालकमंत्री पाटील धमकीची भाषा वापरत आहेत. विधानपरिषदेत, कोल्हापुरातील एका संघटनेचे पदाधिकाऱ्यांना अशीच धमकीची भाषा त्यांनी वापरली होती. महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसन अशा महत्त्वाच्या खात्यासह मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील व्यक्ती अशा धमक्या देतात हे अनाकलनीय आहे. आपण क्रमांक दोनचे बलाढ्य मंत्री असल्याचे सांगावे लागते हेच मोठे त्यांचे दुर्दैव आहे. २०१९ ची विधानसभा सोडा २०२४ ची तयारी करा, असं लोकशाहीमध्ये घडत का?' असा टोलाही आमदार मुश्रीफ यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, 'मी क्रमांक दहाचा तर आमदार सतेज पाटील वीस क्रमांकाचे मंत्री असताना शहर विकासासाठी १३०० कोटींचा निधी आणला. पालकमंत्री क्रमांक दोनचे मंत्री असताना त्यांना एवढा निधी आणता आलेला नाही. विकासकामाबाबत इर्षा न करता केवळ आपला संताप व्यक्त करत असून त्यामध्ये ते माध्यमानाही लक्ष करत आहेत. हॉटेल व्हिक्टर पॅलेस, शालिनी पॅलेस विकत घेतले, यासह उद्या विमानतळ चालवण्यास घेतले अशीही टीका त्यांच्यावर होईल. व्यक्ती मोठी होत असताना आणि संपत्तीचे प्रदर्शन झाले की अशा स्वरुपाच्या टीका जनमानसातून होत असतात. त्यासाठी साधेपणाने राहत सहिष्णू भूमिका घ्यावी लागते, असा टोला त्यांनी लगावला.

'त्यांची भिडेंच्या मांडीला मांडी...'

डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी डॉ. आंबेडकरांच्या कुटुंबीयांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी निमंत्रित केले असल्याबाबत ते म्हणाले, 'डॉ. आंबेडकरांच्या कुटुंबीयांना कोण कोणत्या पक्षात आहेत हे माहीत नाही. त्यामुळे त्यांनी निमंत्रण स्वीकारलेही असेल. दोन महिन्यांपूर्वी मनोहर भिडे यांच्या गडहिंग्लज येथील सभेत माझ्यावर जातीयवादी टीका केली. त्यावेळी शाहूंचे वंशज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते,' अशी टीका केली. २९ एप्रिल रोजी कागल येथे डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून त्यासाठी जोगेंद्र कवाडे यांना निमंत्रित करणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगिनी महोत्सव ४ मेपासून सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भगिनी मंचच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भगिनी महोत्सव यंदा ४ ते ६ मे या कालावधीत होणार आहे. मिस व मिसेस भगिनी या खास स्पर्धेसह तीन दिवस लावणी जुगलबंदी, स्टँडअप कॉमेडी, टीव्ही मालिकेतील कलाकारांचे नृत्य व कोल्हापूरकरांसाठी विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंची खरेदी व खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर खवय्येगिरीची संधीही मिळणार आहे, अशी माहिती भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्यावतीने होणारा हा महोत्सव प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.

महोत्सवाबाबत माहिती देताना क्षीरसागर म्हणाल्या, 'जागो मोहन प्यारे फेम अभिनेत्री श्रुती मराठे, कॉमेडी किंग भाऊ कदम, सुप्रिया पाठारे यांच्यासह अनेक दिग्गज मराठी सिने गायक, तारकांची 'कॉमेडी ट्रेन' पाहता येणार आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि संस्कृती बालगुडे यांची लावणी जुगलबंदी रंगणार आहे. अभिनेत्री व नृत्यांगना तेजा देवकर, हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री नृत्यांगना सीया पाटील, हिंदी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणारे गायक राहुल सक्सेना, प्रसिद्ध मराठी गायिका शुभांगी केदार या कलाकारांनाचे लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवात सुमारे २५० महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

४ मे रोजी दुपारी ४.०० ते ७.०० दरम्यान लहान मुलांच्या या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवार, ५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत टीव्ही कलाकार सुनील होळकर यांच्या वहिनी सरकार या महिलांच्या स्पर्धात्मक खेळांचे आयोजन केले आहे. मिस भगिनी आणि मिसेस भगिनी या महिला आणि युवतींच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन सायंकाळी ५ वाजता केले आहे. रविवार ६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महिलांच्या पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये झिम्मा - फुगडी, उखाणे, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धां पार पडणार आहेत. शिवसेना संपर्क नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर स्वाती यवलुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगिनी पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू आणि आंबेडकरांच्या वारसदारांची भेट

0
0

दोन फोटो

....................

'शाहू 'आंबेडकर घराण्यांच्या ऋणानुबंधांना मिळणार उजाळा

मुरगूडमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल ९८ वर्षानंतर होणार भेट

म.टा. वृत्तसेवा, कागल

तब्बल ९८ वर्षानंतर कागलचे शाहू घराणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारस ही दोन कुटुंबे एकत्र येत आहेत. १९२० मधील माणगावच्या अस्पृश्य परिषदेनंतर ही दोन कुटुंबे एकत्र आली नव्हती, परंतु मुरगूड येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबे शुक्रवारी एकत्र येत आहेत. कागलच्या शाहू घराण्याच्या चौथ्या पिढीतील समरजितसिंह घाटगे यांनी स्वतः आंबेडकर कुटुंबियांच्या घरी जावून त्यांना या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले आणि मोठ्या आनंदाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी ते स्वीकारले.

छत्रपती शाहू महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा घनिष्ठ संबंध आला तो १९२० साली अस्पृश्य समाजाच्या माणगाव परिषदेपासून. ही परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने भरली होती. म्हणूनच ते या परिषदेला आवजूर्न उपस्थित राहीले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या रुपाने अस्पृश्य समाजाला एक उमदे नेतृत्व मिळत असल्याचा आनंद व्यक्त करताना शाहू महाराजांनी म्हटले होते,'तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला आहे. याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उध्दार केल्याशिवाय रहाणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी वेळ येईल की ते साऱ्या हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते.'आणि इतिहासाने हे भाकीत सिध्द केले.

त्यानंतरच्या काळात २०१८ पर्यंत कोणत्याही प्रकारचा संबंध दोन्ही घराण्यांचा आला नाही. परंतु शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना केलेली मदत आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या आतापर्यंतच्या पिढीने स्मरणात ठेवले आहेत. मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांनी माणगाव ते पुणे 'मार्च' काढला होता. १९२० नंतर १९५४ साली भारतीय बौध्द महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली. त्यांच्या पश्चात याची सर्व धुरा ७० ते ८० च्या दशकात यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्यावर आली. अलिकडच्या काळात आरपीआयचे अनेक गट झाले. पण सामाजिक कारणासाठी लढल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. परंतु आपण डॉ. बाबासाहेंबाचा बाणा सोडला नसल्याचे आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकरांनी म.टा.शी बोलताना सांगितले.

१९ एप्रिलला शाहू कारखान्याच्या कार्यालयासमोरील शाहूंच्या पुतळ्यासमोर दोन्ही कुटुंबांची पत्रकार परिषद होणार असून २० तारखेला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कागलच्या गैबी चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मुरगूडपर्यंत निळे आणि भगवे झेंडे लावून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुरगूडमध्ये प्रसिध्द गायक आदर्श शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाडच्या चवदार तळ्याचे जलकलश आणि संविधानाचेही विधीवत पूजन होणार आहे.

......................

को

' भिमा कोरेगाव घटनेनंतर मराठा आणि बौध्द समाज एकमेकाकडे संशयाने पाहू लागले आहेत. त्याला तिसरा कुणीतरी येवून खतपाणी घालू लागला आहे. त्यामुळे शाहू,फुले आणि आंबेडकरांनी जी उद्दिष्टे ठेवली त्यापासून आपण दूर जाऊ लागलो आहोत. म्हणूनच आम्ही मुरगूडच्या कार्यक्रमात दोन कुटुंबे एकत्र जमत आहोत.

भीमराव आंबेडकर,

डॉ.आंबेडकरांचे नातू

----------------------------------------------------

कोट

'सध्या समाजसुधारणेवर फारसे कुणी बोलत नाही. महाराष्ट्रात समाजसुधारणेची सुरवात करणारी ही दोन्ही कुटुंबे एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे ९८ वर्षांनंतर माणगावचे 'म 'आणि मुरगूडच्या 'म' पासून सुरवात होत आहे. बहुजन समाजाच्या उध्दाराची कागल तालुक्यातील ही चळवळ राज्यभर जाईल असा विश्वास आहे.

समरजितसिंह घाटगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांना बुलेरोची धडक, दोघे जखमी

0
0

परीक्षेला जाणाऱ्या

विद्यार्थ्यांना वाहनाची धडक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील कळे येथील महाविद्यालयात परीक्षेसाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला बोलेरोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले.त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सिद्धार्थ शामराव कांबळे (वय २२) आणि महादेव पंडित कांबळे (वय २३, दोघेही रा. पोम्बरे, ता. पन्हाळा) अशी जखमींची नावे असून, यातील सिद्धार्थची प्रकृती चिंताजनक आहे. पोर्ले धरण फाट्यालगत मंगळवारी (ता. १७) दुपारी हा अपघात झाला.

कळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि महादेव हे दोघे परीक्षेसाठी कळे येथील महाविद्यालयात निघाले होते. बाजारभोगावजवळ पोर्लेधरण फाट्यालगत पाठीमागून आलेल्या बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात सिद्धार्थच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे, तर महादेवच्या पायाला व छातीला इजा झाली आहे. परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. सिद्धार्थची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर बोलेरोचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्ण वृद्धाचा तरुणीसह दोन महिलांवर कोयत्याने हल्ला

0
0

मनोरुग्णाचा बहीण,भाचीसह महिलेवर हल्ला

पडसाळे-कोल्हापूर एसटीत प्रकार; प्रवाशांनी दिला चोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मनोरुग्ण मामाने कोयत्याने केलेल्या हल्यात बहिणीसह, भाची व प्रवासी महिला जखमी झाली. संगीता प्रकाश कांबळे (वय ३६), मुलगी स्नेहल (१७, दोघीही रा. पोम्बरे, ता. पन्हाळा) आणि गिरिजाबाई गवळी (५४, रा. मनवाड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी पडसाळे ते कोल्हापूर एसटीत हा थरारक प्रकार घडला. प्रवाशांनी हल्लेखोर शामराव तुकाराम माळी याला बेदम चोप दिल्याने तोही जखमी झाला आहे.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील पोम्बरे येथील संगीता प्रकाश कांबळे आणि स्नेहल या दोघी पडसाळे ते कोल्हापूर एसटीतून कामानिमित्त कोल्हापूरला येत होत्या. स्नेहल ही गिरिजाबाई यांच्याजवळ बसली, तर तिची आई मागील सीटवर बसली होती. पोहाळे येथे संगीता कांबळे यांचा भाऊ शामराव माळी हा एसटीत बसला. माळी याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने संगीता यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने माळी हा भाची स्नेहलच्या जवळ गेला. अचानक त्याने पिशवीतून कोयता काढून स्नेहलवर हल्ला सुरू केला. शेजारी बसलेल्या गिरीजाबाई यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मारहाणीचा प्रकार लक्षात येताच स्नेहलची आई संगीता यांनीही भाऊ शामराव याला अडवण्याचा प्रयत्न केला. शामरावच्या हल्ल्यात स्नेहल, गिरिजाबाई आणि संगीता या तिघी जखमी झाल्या. एसटीतील प्रवासी आणि वाहकाने हल्लेखोरास पकडून त्याच्याकडील कोयता काढून घेतला.

संतप्त प्रवाशांनी हल्लेखोर शामराव याला बेदम मारहाण केल्याने तोही जखमी झाला. प्रवाशांनी सर्वच जखमींना उपचारासाठी कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तातडीने आरोग्य सुविधा न मिळाल्याने संतापलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घातला. कळे पोलिसांनी आरोग्य केंद्रात धाव घेऊन जखमींना सीपीआरमध्ये पाठवले. हल्लेखोर शामराव माळी यालाही पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरमध्ये जखमींच्या नातेवाइकांनी हल्लेखोर माळवी याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. उपचारानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, माळी याने केलेल्या हल्ल्यामुळे एसटीत प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्याने यापुर्वीही पोहाळे येथे अनेकांना मारहाण केली असून, ग्रामपंचायत कार्यालयावरही दगडफेक केल्याची चर्चा सीपीआर आवारात सुरू होती. या घटनेची नोंद कळे पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. परिसरात वाहनन लावण्याचे पत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद परिसरातील नो पार्किंगवर माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी सदस्या आणि आपल्या पत्नी सरिता खोत यांच्या नावे आक्षेपाचे पत्र प्रशासनास दिले आहे. पत्रात परिसरात वाहन लावण्यास परवानगी द्यावी, अन्यथा नो पार्किंगमधील वाहने दुसरीकडे लावण्यासाठी जिल्हा परिषदचा चालक मिळावा, अशी मागणी केली. ही मागणी प्रशासनाने फेटाळून लावली. जि. प. परिसर नो पार्किंग झोनच राहिल. तेथे वाहन लावू नये, कागलकर हाऊसजवळच वाहन पार्क करावे, अशा विनंतीचे पत्र प्रशासनाने सोमवारी सदस्या खोत यांना पाठवले. यामुळे खोत पुढील भूमिका काय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

चार दिवसांपूर्वी माजी उपाध्यक्ष खोत यांनी नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनाची हवा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सोडायला सांगितली. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही अध्यक्षा महाडिक नो पार्किंगच्या नियमावर ठाम आहेत. याउलट नो पार्किंगमध्येच वाहन लावण्याची भूमिका खोत यांनी घेतली. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. सदस्या खोत यांना विनंतीचे पत्र पाठवून नो पार्किंगला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

-------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी अर्जाला एक मेपर्यंत मुदतवाढ

0
0

कर्जमाफी अर्जाला तिसरी मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची पुन्हा एकदा मुभा मिळाली आहे. राज्य सरकारने याबाबतची घोषणा केली असून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीसाठी एक मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. कर्जमाफीसाठी आतापर्यंत तीनवेळा अर्ज करण्याची मुदतवाढ दिल्याने कर्जमाफीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच एकरकमी कर्जपरतफेडीसाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील ४६ लाख ५२ हजार लाभार्थ्यांना १४ हजार ३८८ कोटीची कर्जमाफी मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार लाभार्थ्यांना ३३३ कोटी ३३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. विधीमंडळामध्ये कर्जमाफीच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कर्जमाफीचे काम ठप्प झाले होते. तरीही राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या होत्या. शनिवारी ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांना एक मेपर्यंत अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे अद्यापही ज्या पात्र लाभार्थ्यांनी अर्ज केलेला नाही, अशा लाभार्थ्यांना कदाचीत अर्ज करण्याची शेवटची संधी मिळण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्याच्या मुदतीबरोबरच ज्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेत सहभागी व्हायचे आहे, अशा खातेदारांना ३० जूनपर्यंत या योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यापूर्वी एकरकमी परतफेड योजनेचा कालावधी ३१ मार्चपर्यंत निश्चित केला होता. बहुतांशी कारखान्यांनी मार्चअखेर एफआरपी दिली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता आले नव्हते. पण या निर्णयामुळे एफआरपीची रक्कम मिळाल्यानंतर सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

चौकट

४१ हजार खात्यांची तपासणी पूर्ण

विधीमंडळामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर केवळ एक हजार लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून कर्जमाफीचे काम ठप्प झाले आहे. २६ मार्च रोजी राज्यातील साडेचार लाख खात्यांसह जिल्ह्यातील ४१ हजार खात्यांची तपासणी करण्याची सूचना आयटी विभागाने २६ मार्च रोजी दिल्या होत्या. त्यानुसार तालुकास्तरीय समितीन ४१ हजार खात्यांची तपासणी करुन आयटी विभागाकडे पाठवली आहे. पण अद्यापही या यादीला लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ बैठक - कारखान्यांची खाती एनपीएमध्ये जाणार

0
0

पान ६ मेन

.......................

कारखान्यांची खाती एनपीएत जाणार

'भोगावती'ची साखर जप्त करता येणार नसल्याचा आमदार मुश्रीफ यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य बँकेने वारंवार कमी केलेले साखरेचे मूल्यांकन, बाजारात कमी झालेला साखरेचा दर आणि उठावच नसल्याने साखर कारखान्यांची बँक खाती तीन महिन्याच्या पुढे शॉर्ट मार्जिनमध्ये जावून एनपीमध्ये जाणार आहेत. यामधून मार्ग काढून साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा पुढील हंगामात कारखाने सुरू होणार नाहीत. त्यामुळे कर्जपुरवठा केलेल्या बँकाही अडचणीत येणार असल्याची भिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली.

थकीत एफआरपीप्रश्नी साखर जप्त करण्याचे आदेश दिले असले, तरी भोगावती कारखान्याची साखर बँकेकडे तारण असल्याने साखर जप्त करता येणार नसून तसे, पत्र साखर सहसंचालकांना दिले असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

चेअरमन मुश्रीफ म्हणाले, 'एफआरपी थकीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आरआरसी अंतर्गत साखर जप्तीचे आदेश दिले आहेत. पण तारण असलेल्या साखरेवर प्रथम बँकेचा अधिकार असतो. त्यामुळे बँकांचा अधिकार डावलून साखर जप्त करणे असा नसून त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना साखर सोडून इतर मालमत्ता जप्त करावी लागणार आहे. कोल्हापुरातील कारखाने नेहमीच दर देण्यात आघाडीवर राहिला आहे. मात्र सध्या हेच कारखाने अडचणीत आले आहेत. यावर्षी साखरेचे उत्पादन जास्त होईल असा सरकारला अंदाज असताना याबाबतची उपाययोजना केली नाही. असे उपाय केले असते, तर कच्ची साखर निर्यात करण्याची संधी कारखान्यांना मिळाली असती. पण केंद्र सरकारने कारखाने बंद झाल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात २,१०० व देशातंर्गत बाजारात २,६०० रुपये प्रतिक्विंटल साखरेचा दर आहे. बँकांनी ३,१०० रुपये प्रतिक्विंटल कर्जपुरवठा केला आहे. यातील फरक सरकारने तातडीने देण्याची आवश्यकता असून यापूर्वी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी असे निर्णय घेतले आहेत. असा निर्णय न घेतल्यास नवीन कर्जपुरवठा कारखान्यांना मिळणार नसून यासाठी सरकारने थकहमी देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा पुढील हंगामात कारखाने सुरू होणार नाहीत.'

'राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांनी साखर खरेदी, बफर स्टॉक व रेशनद्वारे साखर विक्री करण्याच्या घोषणा केल्या. पण याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली. उत्पादकांना समजावून सांगण्याची भूमिका घेतली, पण याकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे. साखर उद्योग सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा पुढील वर्षी साखर कारखाने बंद राहिल्याने उभ्या उसाला अनुदान देण्याची वेळ येईल,' अशी भितीही मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

.............

दृष्टीक्षेपात ...

पुढील गळीत हंगामावर संकट

पोत्याला एक हजार अनुदान द्यावे

अन्यथा उभ्या उसाला अनुदान द्यावे लागेल

सरकारने थकहमी देण्याची आवश्यकता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता जप्तीच्या आदेशाने धास्तावले जिल्हा शल्यचिकित्सक

0
0

मालमत्ता जप्तीच्या

आदेशाने सीपीआर धास्तावले

थकीत रकमेपोटी जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारास थकीत रक्कम मिळाली नसल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने सीपीआरमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे सीपीआर प्रशासन धास्तावले असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील हे तातडीने राज्याच्या आरोग्य सचिवांची भेट घेणार आहेत. दरम्यान, थकीत २ कोटी ७९ लाखांची रक्कम देण्यासाठी डॉ. पाटील यांनी ठेकेदाराकडून दहा दिवसांची मुदत मागून घेतली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गारगोटी येथील बांधकाम व्यावसायिक एम. डी. यलकर यांनी निविदेद्वारे गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. २००२ मध्ये कामाला सुरुवात करून त्यांनी २००४ मध्ये इमारत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ताब्यात दिली. वाढीव रकमेसह त्यांनी आरोग्य विभागाकडे मागणी केली, मात्र त्यांना रक्कम मिळाली नाही. यावर यलकर यांनी जिल्हा कोर्टासह हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही धाव घेऊन खर्च झालेल्या रकमेची मागणी केली. सुनावणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रीम कोर्टात हजर न राहिल्याने जिल्हा कोर्टात सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. यानुसार झालेल्या सुनावणीत जिल्हा कोर्टाने सोमवारी (ता. १६) थकीत रकमेपोटी सीपीआरमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम व्यावसायिक यलकर हे सोमवारी टेम्पो घेऊन मालमत्ता जप्तीसाठी सीपीआरमध्ये गेले होते. डॉ. पाटील यांची भेट घेऊन त्यांनी जप्तीचे आदेश दाखवल्यानंतर सीपीआर प्रशासन हादरले. डॉ. पाटील यांनी आरोग्य सचिव आणि कुटुंब कल्याण आयुक्तांशी मोबाइलवरून चर्चा करून जप्ती आदेशाची माहिती दिली. यानंतर यलकर यांना दहा दिवसात थकीत रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले. जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी डॉ. पाटील हे तातडीने आरोग्य सचिव आणि कुटुंब कल्याण आयुक्तांची भेट घेण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत तोडगा काढला जाईल. दरम्यानच्या काळात रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घेतली आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

............

चौकट

सरकारचे हायकोर्टात अपिल

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम केल्यानंतर ठेकेदार यलकर यांनी ८४ लाख रुपयांचे वाढीव बिल सादर केले होते. ही रक्कम व्याजासहीत १ कोटी ६५ लाख इतकी झाली आहे. याला सरकारने आक्षेप घेतला असून, हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी २० एप्रिलला होणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण सभेतर्फे मौजीबंधन

0
0

कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे ४ मे रोजी सामुदायिक मौजी बंधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बिनखांबी गणेश मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ज्या मुलांवर मौजीबंधन संस्कार करायचा आहे, त्या पालकांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संवेदनातर्फे अनुदान वाटप

0
0

कोल्हापूर : संवेदना मंचतर्फे येथील तृतीयपंथी व देवदासींना स्वयंरोजगारासाठी अनुदान वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि मीनलताई मोहाडीकर यांच्याहस्ते अनुदान वाटप केले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या तृतीयपंथी व देवदासींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनुदान देण्यात आले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, मानसी नाईक, साधना झाडबुके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १२९ गावेटंचाईग्रस्त जाहीर

0
0

कोल्हापूर

जिल्ह्यातील जूनअखेरच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात ३३९ गावांत उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, यातील १२९ गावे महसूल प्रशासनाने टंचाईग्रस्त जाहीर केली आहेत. त्या गावात टंचाईची कामे सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मात्र जाचक अटी, प्रशासनातील दिरंगाईमुळे प्रत्यक्ष कामांना विलंब होत आहे. परिणामी तहानलेल्या गावांची संख्या वाढते आहे. पाण्यासाठी संबंधित गावातील रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० हजार चौरस मीटरचा टीडीआर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तावडे हॉटेल परिसरातील जागेपैकी महापालिकेने दोन वर्षांत पाच एकर (२० हजार ६३६ चौरस मीटर) जागेचा तब्बल १८ कोटींचा टीडीआर दिला आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या कचरा डेपो आणि ट्रक टर्मिनसच्या जागेचा प्रत्यक्ष वापर केलेला नाही. एक महिन्यात या जागेचा कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठी वापर न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,' असा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिला आहे.

शेटे यांनी सांगितले की, महापालिकेने २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षात २० हजार ६३६ चौरस मीटरची जागा ताब्यात घेऊन १८ कोटीचा टीडीआर दिला आहे. पाच प्रकरणांमध्ये जवळपास पाच एकर जागेचा टीडीआर दिला आहे. यानंतर या जागा महापालिकेच्या ताब्यात असूनही महापालिकेने ती जागा बंदिस्त केलेली नाही. जवळपास दोन वर्षे त्या जागेचा वापर केलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून कचरा टाकण्यासाठी जागेचा वापर व्हावा. महापालिकेकडून टीडीआर देऊनही जागेचा वापर केला नसल्याबद्दल नगररचना विभागाचे सहायक संचालर धनंजय खोत व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार कायदे पाळत नाही

0
0

'अतिक्रमणांबाबत सरकारची मनमानी'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिक्रमणांबाबत आतापर्यंत केलेले कायदे व वेळोवेळी काढलेली परिपत्रके यानुसार तावडे हॉटेल परिसरातील जागेबाबत कार्यवाही न करता सरकारने मनमानी चालवली आहे. सध्याच्या कायद्यानुसार महापालिकेला कारवाई करण्याची मुभा द्यावी, अन्यथा महापालिका बरखास्त करून सरकारनेच कामकाज पहावे, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या काळातील बेकायदेशीर सनदांची चौकशी करून त्या रद्द करण्यात याव्यात, अशीही मागणी केली.

दरम्यान, तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करावेत. अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई तातडीने केली जावी. अन्यथा कायदा पूर्ण रद्द करून ज्याला हवे तसे बांधकाम करण्याची परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

देसाई म्हणाले, '१९८४ मध्ये अनधिकृत बांधकाम करणे हा दखलपात्र गुन्हा ठरवला. त्यानुसार कारवाई केली जात नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे कलम २०१२ मध्ये समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम १५६ अन्वये हा कायदा लागू असलेल्या क्षेत्रात याच कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा. इतर कायद्याने केलेली कारवाई ग्राह्य असणार नाही, असे नमूद केले आहे. या कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नसल्याने संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे सोडून सरकारने २०१७ मध्ये सुधारणा केली. अनधिकृत बांधकामांना नव्या सुधारणेनुसार अभय देण्यात आले. बफर झोन, बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर जागेवरील बांधकामांसाठी हा कायदा आहे. आरक्षित जागांवरील बांधकामांसाठी हा कायदा नाही. त्यामुळे सरकार कायद्यानुसार कार्यवाही करत नाही.'

तावडे हॉटेल परिसरातील जागांचा वापर व्यावसायिक व औद्योगिक कारणासाठी करण्याची सनद अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या काळात देण्यात आली आहे. मात्र ती बेकायदा असल्याचे दिसून आल्यावर या सनोनुसार दस्त नोंद केले जाऊ नयेत, असे जिल्हा प्रशासनानेच आदेश दिले आहेत. त्यामुळे अशा बेकायदा सनदांची चौकशी करावी व त्या रद्दही कराव्यात, अशी मागणी केल्याचे सांगत देसाई म्हणाले, 'ज्यांनी पूर्वी कोल्हापुरात जिल्हाधिकारी पदावर काम केले व सध्या मंत्रालयात सनदी अधिकारी आहेत. त्यांचा व त्यांच्या नातेवाइकांचे हितसंबंध या परिसरातील मिळकतीत आहेत का? याचीही सरकारने चौकशी करावी. यावेळी बुरहान नाईकवडी, सुशील कोरडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानतर्गंत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सहाव्या दिवशी काम बंद आंदोलन सुरूच ठेवत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी केली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघातर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.

सलग काम बंदमुळे प्राथमिक, उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली. मागण्या सोडवण्यासंबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेता येत नसल्याने जिल्हा प्रशासन हतबल आहे. अत्यावश्यक सेवेत आरोग्य विभाग असतानाही कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणची सेवा बंद झाली आहे. आंदोलनात महासंघाचे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल गोसावी, उपाध्यक्ष निंगोजी पाटील, कार्याध्यक्ष संदीप देसाई, सचिव ज्ञानेश्वर वाटगावे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

--------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images