Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सौंदत्ती यात्रेचा मुख्य सोहळा १६ डिसेंबरला

$
0
0
श्री क्षेत्र सौंदत्ती येथे १४ डिसेंबरपासून यात्रा सुरु होत आहे. यात्रेचा मुख्य सोहळा १६ डिसेंबर रोजी होणार असून रात्री आठ वाजता पालखी निघेल. भाविकांना खोळंबा आकाराची फरकाची रक्कमही वाटप केली जाणार असल्याची माहिती जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, अच्युत साळोखे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

फटाके टाळून केली जंगलभ्रमंती

$
0
0
दिवाळीमध्ये फटाके न उडवल्याबद्दल निसर्गमित्र संस्थेने जिल्ह्यातील ४५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेलगत असलेल्या चोर्ला परिसरातील जंगलभ्रमंतीची संधी दिली. मुलांनी जवळपास १० किलोमीटर अंतरात फेरफटका मारत सह्याद्री घाटातील विविध जैवविविधतेची जवळून ओळख करुन घेतली.

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

$
0
0
ज्ञान, मनोरंजन, चिंतन व चारित्र्यवर्धनाच्या वृद्धीसाठी दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेचे यंदा चौदावे वर्ष आहे. सात दिवसांच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुरुवार (ता. २८) रोजी हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश डी. जी. देशपांडे हे गुंफतील.

तत्त्वसंघर्षाचा समर्थ अंतःशोध

$
0
0
राज्य नाट्य स्पर्धा मध्यावर येऊन पोहोचली असताना एका उत्तम प्रयोगाचे समाधान प्रेक्षकांना मिळाले. याआधीही काही उत्तम संहिता स्पर्धेत सादर झाल्या खऱ्या. पण हाताळणीतल्या अपयशामुळे प्रयोगातील परिपूर्णता काही हाती लागत नव्हती. ‘शेवटचा दिस’ने मात्र हा शोध पूर्ण झाल्याचे जाणवले.

गडहिंग्लजला ७५ लाखांच्या निधीची मागणी

$
0
0
शहरातील नागरिकांच्या निरोगी आयुष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘योग विद्याधाम’ बांधकामासाठी व सार्वजनिक स्मशानभूमीचा विस्तार तसेच सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

$
0
0
चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील वैशाली राहुल चव्हाण (वय २१) या विवाहितेने पतीकडून हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून घरातील पोटमाळ्यावरील वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

इचलकरंजीत एसटीवर दगडफेक

$
0
0
ऊसदराची कोंडी न फुटल्याने संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी-टाकवडे रस्त्यावर एस. टी. वर दगडफेक केली. इचलकरंजी आगाराची एसटी. (एमएच २० एच ८८०३) ही कुरुंदवाडहून इचलकरंजीला रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास येत होती.

पोलिस असल्याचे भासवून दागिने लांबवले

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करुन वृध्देकडील पाच तोळे सोन्याच्या पाटल्या लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी मॉर्डन हायस्कूलनजीकच्या शिवमंदिरात घडली.

‘दौलत बचाव’साठी चंदगडला मोर्चा

$
0
0
गेले दोन हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरू करण्याबाबत संचालक मंडळाकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत.

जनसुनावणीवेळी शक्तिप्रदर्शन

$
0
0
कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे या खासगी साखर कारखान्याची प्रदूषणासंदर्भात सोमवारी दुपारी तणावपूर्ण वातावरणात जनसुनावणी झाली.

‘मनसे’ला महायुतीत घेण्यास अनुकूल

$
0
0
महायुतीमध्ये चौथा खेळाडू घेण्याबाबतचा भविष्यात परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे सांगून भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपगटनेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्यास आपण अनुकूल असल्याचे सोमवारी येथे पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले.

कारवाई तहकूब करण्याची फेरीवाल्यांची मागणी

$
0
0
महालक्ष्मी मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याच्या निर्णयाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने फेरीवाल्यांची चर्चा होऊ शकली नाही. चर्चा न झाल्याने कारवाई तहकूब करावी, असे आवाहन सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्यावतीने केले आहे.

‘दक्षिण’ स्वारीसाठी जिल्हाभर पेरणी

$
0
0
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी घातलेले जादा लक्ष, लोकसभेची धनंजय महाडिक यांनी जाहीर केलेली उमेदवारी,आमदार महादेवराव महाडिक यांचा विधानपरिषदेचा मतदारसंघ या सर्वच ठिकाणी आपली निर्णायक ताकद दाखवण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील नियोजनबध्द प्रयत्न करत आहेत.

ई बॅँकिंगद्वारे ७५ लाखांची फसवणूक

$
0
0
येथील तामिळनाडू मर्कंटाईल या बॅँकेतील दिनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि., इस्लामपूर या सूतगिरणीच्या खात्यातील विविध तारखेला सुमारे ७५ लाख रुपये ई बॅँकिंग प्र्रणालीद्वारे फसवणूक करुन उचलण्यात आल्याचे आज उघडकीस आले.

अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

$
0
0
अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगेत

$
0
0
शहर हद्दीतून निर्माण होणारे मैलामिश्रित सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना पंचगंगा नदीमध्ये मिसळत असून प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने सोमवारी जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याची पाहणी करुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेला वस्तुस्थिती मान्य करायला भाग पाडले.

मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू

$
0
0
‘कलेच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांच्या प्रलंबित मागण्यांची सरकारने दखल घ्यावी. वृध्द कलावंतांचे मानधन गेल्या कित्येक वर्षापासून रखडले आहे.

कोल्हापूरचा डीजे लेमन ‘बेस्ट डीजे’

$
0
0
ऑल इंडियन डीजेज् क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या बेस्ट इंडियन बॉलिवूड डीजेज स्पर्धेत कोल्हापुरातील डीजे लेमन याने बाजी मारली आहे.

पक्ष संस्कृतीवर मर्यादा देशासाठी घातक

$
0
0
‘२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कुणाचेही सरकार आले तरी पक्षसंस्कृती मर्यादित होणार आहे.

‘एमसीए’प्रश्नी मुंबईत आज बैठक

$
0
0
एमसीच्या थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ब्रीज कोर्ससंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे बैठक होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद, कोल्हापूर अशा विविध विद्यापीठाच्या बी.सी.यु.डी.संचालकांच्या समितीची मंगळवारी (ता.२६) बैठक होत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images