Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहा हजार गुरूजी बदलीस पात्र

0
0

पान ६ मेन

जि.प. लोगो

.............................

सहा हजार शिक्षक बदलीस पात्र

सुगम, दुर्गमनुसारच होणार बदली, ऑनलाइन प्रक्रिया सुरू

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

सरकारच्या वादग्रस्त ठरलेल्या सुगम, दुर्गम नियमानुसारच यंदाही प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ९५३ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार जिल्हास्तरावर बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार केली आहे. बुधवारी ती यादी प्रसिध्द करण्यात आली. यादीनुसार संबंधित शिक्षकांना बदलीसाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. दरम्यान, सुगम, दुर्गम भागांतील शाळांची नावे निश्चित झाली आहेत. दुर्गम भागात आणि सुगम भागात प्रत्येकी १५७ शाळा आहेत.

शिक्षण विभागाने मागीलवर्षी सुगम, दुर्गम निकषानुसार ऑनलाइन बदल्या करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार दहा वर्षे सुगम ठिकाणच्या शाळेत काम केलेल्या शिक्षकास दुर्गम तर सलग तीन वर्ष दुर्गम ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली सुगम ठिकाणच्या शाळेत करणे बंधनकारक आहे. यामुळे वर्षानुवर्षे राजकीय आश्रय घेत सुगम भागातील शाळेत अध्यापनापेक्षा राजकारणात सक्रिय असलेल्या शिक्षकांची उचलबांगडी होणार आहे. यामुळेच सुगम भागातील शिक्षकांनी संघटनेच्या माध्यमातून नव्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायप्रविष्ट झाल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत, त्यामुळे सुगम भागातील शिक्षकांना एक वर्षे दिलासा मिळाला.

न्यायालयाने सरकारच्या नव्या आदेशानुसारच बदली करण्याचे आदेश दिले. त्यानुसारच यावर्षीही बदलीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. येथील प्राथमिक शिक्षण प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांतर्फे सर्व शिक्षकांचे सेवा ज्येष्ठता यादी मागवली. ती जिल्हा स्तरावर प्रसिध्द करण्यात आली. अर्ज भरण्यापासून ते नियुक्तीचे ठिकाण मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. वशिलेबाजीने सोयीच्या शाळेत राहू इच्छिणाऱ्यांची निराशा झाली आहे. न्यायालयीन अडथळाही यावेळी चालणार नसल्याने पात्र साऱ्यांचीच बदलीस सामोरे जावे लागणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दुर्गम शाळांची यादी वाढवून जवळपास सोयीच्या शाळेत वर्णी लागण्यासाठी काही गुरूजींनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीचा विषय शिक्षण प्रशासनास डोकेदुखी ठरणार आहे.

------------------------------------------

एकूण शाळा

२००२

विद्यार्थी संख्या

१ लाख ७३ हजार ९७१

बदलीस पात्र अध्यापक (१० वर्षे सेवा पूर्ण)

३ हजार ८५७

पदवीधर

१५०९

मुख्याध्यापक

३४८

तीन वर्ष पूर्ण अध्यापक

२१२

पदवीधर

२७

मुख्याध्यापक

------------------------------

सर्वाधिक शाळा शाहूवाडीत

तालुकानिहाय दुर्गम तर कंसात सुगम शाळांची संख्या अशी : आजरा : १२ (१२), भुदरगड : २६ (२६), चंदगड :१२ (१२), गडहिंग्लज : ७ (७), गगनबावडा : ३ (३), हातकणंगले : ०, कागल :१४ (१४), करवीर : ३ (३), पन्हाळा : १४ (१४), राधानगरी : २१ (२१), शाहूवाडी : ३४ (४५), शिरोळ : ११.

----------------

कोट

' आगामी शैक्षणिक वर्षासाठी सुगम, दुर्गमनुसार प्राथमिक शिक्षकांची बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बदलीपात्र शिक्षकांची जिल्हास्तरावर यादी प्रसिध्द केली आहे. यादीतील नावानुसार संबंधित शिक्षकांनी ऑनलाइन बदलीसाठी अर्ज भरायचे आहेत. अर्जात हव्या असलेल्या शाळेची नोंद करावी लागणार आहे.

सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसतर्फे निवेदन

0
0

पेट्रोल, डिझेल

जीएसटी कक्षेत आणा

कोल्हापूर: पेट्रोल आणि डिझेल या जीवनावश्यक वस्तू वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणाव्यात. सर्वसामान्याची आर्थिक ससेहोलपट थांबवावी, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बांगड्या आहेर प्रशासनाला दिला. निवेदनात म्हटले आहे, 'अच्छे दिन' च्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक सुरू केली आहे. इंधनाची मूळ किंमत ४० रुपये असून अन्य प्रकारचे सर्व सेवा कर लागू केले आहेत. त्याचा मोठा फटका वाहनधारकांना बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी होण्याची शक्यता नाही. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या इंधनाची किंमती ठेवण्याऐवजी दरात सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांना जीएसटीच्या कक्षेत आणावे. शिष्टमंडळात संजय पाटील, निलेश यादव, योगेश हत्तलगे, गजानन हावलदार, प्रदीप पाटील, दीपक कांबळे, अनिल कांबळे, आकाश डोंगळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठ बातमी

0
0

विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या

अध्यक्षपदी विशांत भोसले

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सन २०१८ ते २०१९ या कालावधीसाठी अध्यक्षपदी विशांत भोसले यांची व

उपाध्यक्षपदी सुनीता धुमाळ यांची एकमताने निवड झाली. यावेळी संस्थेचे संचालक राम तुपे, अरविंद पाटील, रमेश नरके, राजेंद्र चव्हाण, विजय पाटील, गजानन चव्हाण, अजित इंगळे, उल्हास माने, जनार्दन सुरकुले, महेश सणगर, अमोल चव्हाण, सुनीता वांगीकर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून यू. एस. उलपे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन एप्रिल १२

0
0

सदाशिव करंबे

कोल्हापूर

शिवाजी पेठेतील प्रगतशील शेतकरी सदाशिव गणपत पाटील करंबे (वय ८८) यांचे निधन झाले. ते महाकाली तालमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, भाऊ, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता बातम्या

0
0

फोटो आहे.

श्रीपती कुराडे

कोल्हापूर

कुराडवाडी (ता. शाहूवाडी) येथील श्रीपती शंकर कुराडे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

-------------

विवेक करांडे

कोल्हापूर

मंगळवार पेठ, मंडलिक वसाहतीमधील विवेक वसंतराव करांडे (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

----------------------------

अनुसया खंडागळे

कोल्हापूर

कदमवाडी येथील अनुसया दत्तात्रय खंडागळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे

----------------

मन्सूर पटवेगार

कोल्हापूर

बाजारगेट येथील कटलरी व्यापारी मन्सूर इब्राहिम पटवेगार (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान ६ सिंगल

0
0

एचआयव्ही पॉझिटिव्ह

वधू-वरांचा मेळावा

इचलकरंजी

येथील मेडिकल असोसिएशन, माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्यावतीने एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींसाठी सर्वधर्मीय १० वा वधू-वर परिचय मेळावा रविवारी २२ एप्रिल रोजी आयोजित केला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत टी. बी. क्लिनिक येथे हा मेळावा होणार आहे, अशी माहिती माई आधार केंद्राचे डॉ. ए. के. चौगुले यांनी दिली. ते म्हणाले, 'या उपक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या वधू-वरांविषयीची माहिती गोपनीय ठेवली जाते. मेळाव्यात सहभाग घेवू इच्छिणाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत दोन रंगीत फोटोसह नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांकडे एचआयव्ही व सीडी फोर चा सहा महिन्याच्या आतील रिपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच पूर्वी विवाह झालेला असल्यास जोडीदाराचा मृत्यूचा अथवा घटस्फोटाचा दाखलाही असणे आवश्यक आहे. आजअखेर अशा परिचय मेळाव्यातून ६० सुयोग्य अशा जोडीदारांची लग्ने झाली आहेत. मेळाव्यात सहभागी स्त्री उमेदवारांना प्रवासखर्च दिला जाणार आहे.' अधिक माहितीसाठी माई आधार केंद्र (०२३०)२४३७४१९ येथे संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

..................

इचलकरंजीतील

तागे चोरीचा छडा

इचलकरंजी

येथील स्वस्तिक डाईंग अ‍ॅण्ड ब्लिचिंग मिलमधील चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीनसह दोघांना अटक केली आहे. लक्ष्मण घंटाळे (वय २६) असे चोरट्याचे नाव असून अल्पवयीन मुलास बाल न्यायालयात पाठविण्यात आले आहे. चोरीतील १ लाख ७० हजार रुपयांचे कापड तागे हस्तगत करण्यात आले आहेत. तर तिसरा आरोपी राजू सौदागर भोरे हा अद्याप फरारी आहे.

लक्ष्मी प्रोसेसर्सनजीक जयदीप मोघे यांचा स्वस्तिक डाईंग अ‍ॅण्ड ब्लिचिंग मिल नावाचा कारखाना आहे. रविवारी सकाळी याठिकाणी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी कारखान्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या गोडावूनची भिंत फोडून कारखान्यातील ७० हजार रुपये किंमतीचे सात कापड तागे, ३० हजार रुपये किमतीचे तीन कापड तागे, दहा हजार रुपये किमतीचे दोन कापड तागे, ३० हजार रुपये किमतीचे तीन कापड तागे व २० हजार रुपये किमतीचे दोन कापड तागे असा सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील डी.बी. पथकास सतर्कतेच्या सूचना देत शहर व परिसरातील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केले होते. चौकशीदरम्यान लक्ष्मण घंटाळे याने राजू भोरे व अल्पवयीन साथीदारासह ही चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार घंटाळे व अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी चोरीची कबुली दिली.

..................

आत्महत्याप्रकरणी खासगी

सावकाराला अटक

इचलकरंजी

कबनूर येथील किरण आण्णासाहेब पाटील (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, रुई रोड) याच्या आत्महत्येप्रकरणी खासगी सावकार अभिजित उर्फ गोपी राजाराम ठाणेकर (वय ३४ रा. भोनेमाळ) याला अटक केली आहे. किरण याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ठाणेकर याचे नाव समोर आले होते. हॉटेल कर्मचारी असलेल्या किरण पाटील याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ठाणेकर या खासगी सावकाराकडून व्याजाने घेतलेल्या रकमेच्या तगाद्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केल्याचे समोर आले आहे. किरण याने ठाणेकर याच्याकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या कर्जापोटी ठाणेकर हा ६३ हजार रुपयांची मागणी करीत होता. तर कर्जफेडीसाठी मुजावर नामक व्यक्तीकडे किरण याने घर गहाणवट ठेवले होते. त्यामुळे या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा शाबित झालेला नसला तरी चौकशी सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगरूळ ...

0
0

'लोकसभा निवडणुकीत

साथ द्या '

म. टा. वृत्तसेवा , कुडित्रे

'मंडलिक घराण्याशी सांगरुळच्या जनतेचे ऋणानुबंध हे राजकारणापलीकडचे आहेत. येथील जनतेने मंडलिक कुटुंबावर भरपूर प्रेम केले आहे. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीशी आपल्या गावाने भक्कम आधार दिला होता. यापुढेही हे ऋणानुबंध कायम ठेवण्याचा विश्वास देऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सांगरुळची साथ अशीच राहू दे ', असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले .

करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील जोतिबा भक्त मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सदाशिव खाडे होते. काँग्रेसचे राज्यसरचिटणीस अॅड. सुरेशराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.मंडलिक म्हणाले , 'दिवंगतसदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिक काम केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या हिताला प्राधान्य दिले. राजकारण आणि समाजकारण करताना त्यांनी नेहमीच स्पष्ट व परखड भूमिका घेतली. आपलेही काम त्यांच्या विचार व आचारांचा वारसा जपत काम सुरू आहे.'या परिसराच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम गुरुवर्य स्व.डी.डी. आसगांवकर यांनी केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.याप्रसंगी प्रा. जयंत आसगांवकर यांचेही भाषण झाले.स्वागत सर्जेराव खाडे यांनी केले. यावेळी कुंभीचे संचालक निवास वातकर , भरत खाडे , तंटामुक्त अध्यक्ष कृष्णात खाडे , दिलीप खाडे, बी. आर. नाळे आदी उपस्थित होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित रुग्णालयांची तपासणी

0
0

बावड्यातील रुग्णालयांची तपासणी

अल्पवयीन विवाहितेच्या प्रसुतीबद्दल पतीवर गुन्हा; 'कारा'ची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अल्पवयीन मुलींची प्रसुती आणि गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून बालकल्याण समिती आणि कारा (केंद्रीय दत्तक प्राधिकरण) या संस्थांच्या पथकाने गुरुवारी (ता. १२) रात्री कसबा बावडा येथील रत्ना पॉलिक्लिनिक आणि ज्ञानदीप हॉस्पिटलची तपासणी केली. यापैकी रत्ना पॉलिक्लिनिकमध्ये अल्पवयीन विवाहितेची प्रसुती झाल्याचा प्रकार तपासणीत समोर आला आहे. याबाबत संबंधित विवाहितेचा पती मोहसीन बाकुद्दीन पकाली (रा. कागल) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर रुग्णालय प्रशासनालाही बाल कल्याण समितीने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात काही रुग्णालयांमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची आणि अल्पवयीन मुलींची प्रसुती होत असल्याची तक्रार दिल्ली येथील कारा संस्थेकडे दाखल झाली आहे. यानुसार गुरुवारी रात्री काराचे सल्लागार समितीचे सदस्य शिवानंद डंबल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन म्हस्के, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते आदींनी संशयित रुग्णालयांची तपासणी केली. कसबा बावडा येथील रत्ना पॉलिक्लिनिकमध्ये गेल्या दोन वर्षांत दाखल झालेल्या रुग्णांची माहिती घेतली असता, जुलै २०१७ मध्ये अल्पवयीन विवाहितेची प्रसुती झाल्याचे निदर्शनास आले. याची खात्री करण्यासाठी संबंधित विवाहितेचे आधार कार्ड मागवून पडताळणी केल्यानंतर तिचे सध्याचे वय साडेसतरा वर्षे असल्याचे लक्षात आले. अल्पवयीन मुलींचा विवाह करणे आणि ती अल्पवयीन आहे याची माहिती असूनही रुग्णालयात प्रसुती करणे हे बेकायदा आहे. याबाबत रत्ना पॉलिक्लिनिकच्या डॉक्टर तेजश्री तहसीलदार यांनी रुग्ण दाखल होताच पोलिसांना कळवणे आवश्यक होते. डॉ. तहसीलदार यांनी माहिती लपवल्याबद्दल तपासणी पथकाने रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल केल्याबद्दल तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपासणी पथकाने डॉक्टरांना दिले होते. यानुसार डॉ. तहसीलदार यांनी गुरुवारी रात्री कागल येथील मोहसीन पकाली याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल केला. शाहूपुरी पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पथकाने कसबा बावड्यातील ज्ञानदीप हॉस्पिटलचीही तपासणी केली. या रुग्णालयात केवळ दोन टक्के महिला कर्मचारी आहेत, त्याचबरोबर मुलांच्या जन्माचे प्रमाण अधिक असल्याने पथकाने कागदपत्र जप्त केली आहेत. रुग्ण दाखल होताच त्यांचे आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील आणि सीपीआरचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन पथकाने रुग्णालयांमधील संशयास्पद कारभाराची चर्चा केली. या कारवाईने शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

अर्भकांच्या तस्करीचा संशय

काही महिलांच्या नावावर दुसऱ्याच अल्पवयीन मुलींना रुग्णालयात दाखल केले जाते. त्याच्या अर्भकांची तस्करी होते. यात रुग्णालय प्रशासनापासून तस्करांचे रॅकेट सहभागी आहे. हा प्रकार रोखण्यासाठी प्रसुतीसाठी रुग्ण दाखल होताच त्याचे आधारकार्ड लिंक करणे रुग्णालयांसाठी बंधनकारक केले आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश रुग्णालयात आधार कार्ड घेतले जात नाही. रुग्णांच्या आ‌वश्यक नोंदी ठेवल्या जात नाहीत, अशी माहिती बालकल्याण संकुलाच्या अध्यक्षा चोरगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता कचरा टाका

0
0

तावडे हॉटेलजवळ कचरा टाका

स्थायी समिती सभेत सदस्यांची सूचना; अतिक्रमणांबाबत आक्रमक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाइन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर कचरा टाकण्याचे बंद करुन तावडे हॉटेल परिसरात कचरा डेपोसाठीची जी जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, तिथे प्रशासनाने कचरा टाकण्यास सुरुवात करावी, अशी सूचना शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांनी दिले. 'सभापती स्थायी सदस्यांसमवेत आहेत की नाही याचा खुलासा करावा' असा आग्रह धरल्यानंतर भाजपचे सभापती आशिष ढवळे यांना 'मी सर्व सदस्यांसोबत आहे' असे स्पष्ट करावे लागले. तसेच कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळत नसेल तर प्रशासनासोबत नगरसेवक रस्त्यावर उतरतील, असेही ठणकावून सांगितले.

स्थायी समितीच्या सलग दुसऱ्या आठवड्यातील बैठकीत तावडे हॉटेलच्या प्रश्नावरच जोरदार चर्चा झाली. काँग्रेसचे माजी सभापती डॉ. संदीप नेजदार, प्रतिक्षा पाटील, दीपा मगदूम, शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच सरकारच्या धोरणावरही जोरदार टीका केली. 'तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाबाबत सरकार निर्णय घेणार असेल तर आम्ही कशाला निवडून आलो आहोत, असा सवाल केला. तेथील अतिक्रमणे नियमबाह्य आहेत हे प्रशासनाला मान्य आहे का? सरकारने लेखी आदेश महापालिकेला दिले असतील तर तसे दाखवा. त्या बैठकीतील इतिवृत्ताची प्रत घ्या. केवळ तोंडी आदेश मान्य करायचा का? यापूर्वी बंदोबस्त नसताना कारवाई केलेली आहे. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करायची आहे की नाही? याचे स्पष्टीकरण द्या,' अशीही मागणी नगरसेवकांनी केली. तसेच 'जोपर्यंत तावडे हॉटेल परिसरात कारवाई होणार नाही, तोपर्यंत शहरातील कोणत्याही अतिक्रमणास हात लावू देणार नाही,' असा इशाराही दिला. पोलिस बंदोबस्त मिळाला नाही तर सर्व नगरसेवकांसह कारवाईसाठी जाऊ. प्रशासनाने लेखी उत्तर द्यावे, आम्ही पुढे काय करायचे ते करू असेही सांगितले.

अनेक सदस्य तावडे हॉटेलबाबत तीव्र भावना मांडत असताना 'स्थायी सभापती सदस्यांसोबत आहेत का' असा सवाल दीपा मगदूम यांनी विचारला. तसेच सभापती ढवळे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह धरला. त्यानुसार 'मी सर्व सदस्यांसोबत आहे' असे ढवळे यांनी सांगितले. तसेच ट्रक टर्मिनल जागेवरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्त न घेता काढता येण्यासारखे आहे का? असे विचारत आरक्षित जागेवरील बांधकामाबाबत तसेच जी जागा आरक्षित नाही, त्याबाबतही निर्णय घ्यावा लागेल, असेही सूचित केले.

तावडे हॉटेल परिसरात तीन ठिकाणी आरक्षित जागेवर बांधकामे झाली आहेत, असे प्रशासनाने सांगितले. यावेळी इतर जागेबाबतची सविस्तर माहिती दिली. 'ट्रक टर्मिनलची जागा संपादन करायची आहे. तिथे दहा बांधकामे आहेत. कचरा डेपोच्या आरक्षित जागेवर दोन मिळकती आहेत. कचरा डेपोच्या जागेपैकी काही जागा ताब्यात आहे. बांधकाम झालेली जागा अजून ताब्यात नाही. ट्रक टर्मिनल जागेलगतच्या रस्त्याशेजारी असलेली जागा ताब्यात नाही. उर्वरित जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही ठेवत आहोत. त्यासाठी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. कारवाई करण्यापूर्वी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. पोलिस बंदोबस्त मिळत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही,' असेही स्पष्ट केले.

शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. बंदोबस्त करण्याची मागणी सविता घोरपडे यांनी केली. त्याबाबत प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले असल्याचे सांगितले. केएमटीकडील ठोक मानधनावरील वाहनचालकांना महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी दीपा मगदूम, भाग्यश्री शेटके यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाउंड्री उद्योजकांसाठी ‘वेस्कॉन’ चर्चासत्र उद्यापासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फाउंड्री उद्योजकांसाठी १५ एप्रिलपासून चर्चासत्र आयोजित केले आहे. पश्चिम विभागातील फाउंड्री उद्योजकांचा सहभाग असलेले 'वेस्कॉन २०१८' हे चर्चासत्र हॉटेल सयाजी येथे १६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. 'व्हीजन २०२५' असे चर्चासत्राचे ब्रीद असून चार राज्यांतील तीनशेहून अधिक फाउंड्री उद्योजक यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती दि इन्स्टिट्युट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन (आयआयएफ) च्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष दीपंकर विश्वास यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वास म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रिसिजन कॅमशॅफ्टस् लिमिटेडचे अध्यक्ष, उद्योजक यतीन शहा यांच्या हस्ते १५ एप्रिलला सकाळी नऊ वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. चर्चासत्रात चार राज्यातून तीनशेहून अधिक फाउंड्री उद्योजक सहभागी होणार आहेत. शहा यावेळी 'लोकल ते ग्लोबल' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. फाउंड्री उद्योगाची वाढ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने आणि उपाय सुचविणार आहेत. दोन दिवस होत असलेल्या चर्चासत्रात फाउंड्री उद्योजक राजेंद्र बागवे, मोहिनी केळकर, डॉ. रणजित दाते, उदयन पाठक, एन. विश्वनाथन, नागेश धुम्मा, जीम्मी सोरेसन, सुमीत वार्गसे मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्रात फाउंड्री उद्योगाची सद्यस्थिती, व्यवस्थापन, नियोजन, गुणवत्ता आणि मेक इन इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी असलेल्या संधी आदी विषयांवर चर्चा होईल. कोल्हापुरात ३५० हून अधिक फाउंड्री कार्यरत असून १० लाख टन कास्टिंग तयार होत आहे. त्यातून सुमारे ७ ते ८ हजार कोटींची उलाढाल होत असून, दोन लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. कोल्हापूर शाखेत ३५० सभासद असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सभासद आहेत.

पत्रकार परिषदेला नियोजन समितीचे अध्यक्ष राजीव परीख, फाउंड्री मेनचे उपाध्यक्ष सुरेश चौगुले, सेक्रेटरी सुमीत चौगले, एम. बी. शेख, जयकुमार परीख, नरेंद्र झंवर, मल्हार भांदुर्गे, संजय कारखानीस, विलास जाधव, सुनील बत्तासे, रवी चिरपूटकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ एप्रिल डायरी

0
0

व्याख्यान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांचे व्याख्यान, विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना, स्थळ : शाहू सभागृह, शिवाजी विद्यापीठ, वेळ : सकाळी ९.३०

पुस्तक प्रदर्शन : संवाद प्रकाशन व वाचनकट्टातर्फे पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक कलादालन, वेळ : सकाळी १० ते रात्री ८

मिठाई वाटप : एलआयसीतर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मिठाई वाटप, स्थळ : बिंदू चौक, वेळ : सकाळी ११.००

व्याख्यान : रिपब्लिकन सोशल फाउंडेशनतर्फे प्रा. विजय काळेबाग यांचे व्याख्यान, विषय : समग्र डॉ. आंबेडकर, स्थळ : कोपार्डे, वेळ : दुपारी १२.००

कार्यशाळा : मटा कल्चर क्लब व कलर १४ तर्फे घरटे बनवा कार्यशाळा, स्थळ : कलर १४ आर्ट गॅलरी, राजारामपुरी, वेळ : दुपारी ३.००

मिरवणूक : डिगे फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक, स्थळ: बिंदू चौक, वेळ : दुपारी ४.००

चित्रपट महोत्सव : राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे राजा परांजपे चित्रपट महोत्सव उदघाटन, स्थळ: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ : सायंकाळी ५.००

व्याख्यान : राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त प्रा. राहुल कोसंबी यांचे व्याख्यान, विषय : डॉ. आंबेडकर यांचे जाती विश्लेषण व समकालीन जातीव्यवस्था, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी ५.३०

व्याख्यान : कसबा बावडा येथील शाहू प्रतिष्ठानतर्फे राजन खान यांचे व्याख्यान, विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील माणूस, स्थळ : मातंग वसाहत, कसबा बावडा, वेळ : सायंकाळी ७.००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागल महाआरोग्य शिबिर

0
0

फोटो

...............

समरजितच कागलचे भावी आमदार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

म. टा. वृत्तसेवा, कागल

'उमर अब्दुल्ला यांनी देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना २०१९ च्या निवडणूका लढू नका असा सल्ला दिला. आजरा नगरपंचायत निवडणुकीनंतर मी कागलपुरती एवढीच सूचना करतो की, समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात २०१९ ला लढून वेळ आणि पैसा वाया घालवू नका. कारण तेच कागलचे भावी आमदार असणार आहेत. मी तुम्हाला शब्द देतो, या पाच वर्षात समरजितसिंह समाधानी होतील. २०२४ ला आम्ही त्यांना राज्यसभेवर घेऊ आणि तुम्हाला २०२४ ची विधानसभा देऊ,' अशी खळबळजनक ऑफर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता दिली.

कागल येथे दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच्या प्रारंभप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, राजीवजी महाराज, मुपीन काडसिद्धेश्वर स्वामीजी, निडसोशीचे शिवलिंगेश्वर महाराज आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी पुण्याई असावी लागते आणि ती पुण्याई दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यारूपाने मिळाली असून त्यांचाच वसा आणि वारसा समरजितसिंह आणि त्यांच्या पत्नी चालवत आहेत. विक्रमसिंहराजे ज्यासाठी जगले तो सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून समरजितसिंह सामान्यांच्या सुख आणि स्वाभिमानासाठी झटत आहेत. त्यांचा हा कार्यक्रमांचा धडाका बघून अनेकांच्या मनामध्ये आता धडकी भरली आहे.'

म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'मतदारसंघात हृदयरोग, कॅन्सर अशा दुर्धर आजाराने त्रस्त असणारे असंख्य रूग्ण पाहायला मिळाले. खासकरून महिला आणि लहान मुलांच्यामध्ये आजारांचे प्रमाण जास्त आहे. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांपुढे आरोग्य शिबिरांची संकल्पना मांडली. असे तीन कॅम्प होणार असून या शिबिरांमध्ये कितीजणांनी तपासण्या केल्या यापेक्षा यामध्ये किती रूग्णांवर चांगल्या प्रकारे व मोफत उपचार झाले, हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.'

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये म्हणाले, 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजहिताचे काम करणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांच्यामागे मोठ्या ताकदीने उभे राहण्याच्या दृष्टीने मला खास बाब म्हणून कागलला पाठवले आहे. त्यांच्याकडील एकही रूग्ण रिकाम्या हाताने परत जाणार नाही.'

यावेळी नवोदिता घाटगे, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, शाहू साखरचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बाबा देसाई, वीरेंद्रसिंह प्रविणसिंह घाटगे, डॉ. श्रीकृष्ण देशमुख, शाहूचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. आभार विक्रमसिंहराजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील यांनी मानले.

---------------------------

चौकट

पैशाअभावी उपचार थांबणार नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे रयतेचे विचार घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहाय्यता निधीतून तब्बल रूपये ९०० कोटींच्या वर केवळ सामान्यांच्या आरोग्यावर खर्च केले आहेत, असे स्पष्ट करून पालकमंत्री पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये आरोग्य हा फार खर्चिक विषय बनला आहे. परंतु पैसे नाहीत म्हणून वैद्यकिय सुविधा मिळाली नाही असे होणार नाही. पैशाअभावी राज्यातल्या कोणाचेही उपचार थांबणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागल शिबिर

0
0

तीन हजारहून अधिकजणांची आरोग्य तपासणी

म.टा. वृत्तसेवा, कागल

येथे दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात तीन हजारांवर नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतली. या शिबरामध्ये तीनशेच्या वर रुग्ण आढळले असून त्यांच्यावर पुणे व मुंबई या ठिकाणी तपासण्यांसह मोफत उपचार केले जाणार आहेत. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचीही रहाण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे. याशिवाय अ‍ॅन्जिओग्राफी व अ‍ॅन्जिओप्लास्टी तसेच बायपास सर्जरी अशा ५० हून अधिक रुग्णांना तातडीने उपचार करण्यासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोल्डनगर्ल’च्या घरी आनंदाला उधाण

0
0

'गोल्डनगर्ल'च्या घरी आनंदाला उधाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारी रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या गोल्डनगर्ल तेजस्विनी सावंतने शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावल्यानंतर वर्षानगरातील तिच्या घरात आनंदाला उधाण आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षानगरातील सावंत यांच्या घरी भेट देऊन सावंत कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

तेजस्विनीने गुरुवारी ५० मीटर प्रोन प्रकारात रौप्य पदक पटकावल्यानंतर वर्षानगरातील घरात जल्लोष साजरा करण्यात आला होता. गुरुवारी दिवसभर तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत यांचे विविध स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले. शुक्रवारी पहाटे तेजस्विनीची शूटिंगमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराची मॅच होती. पहाटेपासून सावंत कुटुंबाच्या नजरा मॅचकडे लागल्या होत्या. तेजस्विनीचे पती समीर दरेकर, बहीण अनुराधा सावंत यांच्यासह नातेवाइक आणि मित्रमंडळींनी टीव्हीवर सामना पाहिला. थ्री पोझिशनमध्ये अचूक लक्ष्य गाठत सुवर्ण पदक पटकावले. तसेच राष्ट्रकुल स्पर्धतील ४५७.९ गुणांसह नवीन विक्रम प्रस्थापित केला.

सुवर्णपदकाची घोषणा होताच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वर्षानगरातील तेजस्विनीच्या घरी पुन्हा एकदा दिवाळी सुरू झाली. बंगल्यासमोर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. बंगल्यावर पुन्हा तिरंगा फडकावण्यात आला. साऊंड सिस्टीमवर देशभक्तीपर गीते लावण्यात आली. मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही वर्षानगर येथील सावंत यांच्या घरी भेट देऊन सावंत कुटुंबीयांचे अभिनंदन केले. पालकमंत्री पाटील यांनी तेजस्विनीचे पती समीर दरेकर यांना मिठाई भरवली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, सुनीता सावंत व अन्य नातेवाइक उपस्थित होते. दिवसभर सावंत यांच्या घरी अभिनंदनाचे फोन खणखणत होते.

आईने मॅच पाहिली नाही

तेजस्विनीचा मॅच पहाटे होती. पण मॅच पाहताना टेन्शन येत असल्याने तेजस्विनीची आई सुनीता यांनी मॅच पाहिली नाही. तेजस्विनीची बहीण अनुराधाने तेजस्विनीच्या सुवर्ण पदकाची बातमी दिल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. इलिमेटर पद्धतीमुळे टीव्हीवर मॅच पाहताना खूप दडपण येत असल्याचे सुनीता सावंत यांनी सांगितले. दुपारी मॅचचे रेकॉर्डिग पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

मिरवणूक काढणार...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी दसरा चौकात 'आडवाटेवरचं कोल्हापूर' या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना त्यांना मोबाइलवर तेजस्विनीने सुवर्णपदक जिंकल्याची माहिती कळताच पालकमंत्री , 'तेजूला गोल्ड...' असे मोठ्याने ओरडले. पालकमंत्र्यांनी उपस्थितांना तेजस्विनीने सुवर्णपदक जिंकल्याची माहिती सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर पालकमंत्री तेजस्विनीच्या घरी गेले. तेजस्विनी रविवारी पहाटे भारतात परतणार आहे. त्यानंतर पुण्यात तिचा बालेवाडी सत्कार सोहळा होणार आहे. पुण्यातून दुपारी तेजस्विनी कोल्हापुरात येणार असून तिची मिरवणूक काढण्याचे नियोजन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध घोटाळ्याप्रकरणी १३ जणांवर ठपका

0
0

घोटाळ्याचा चौघांवर ठपका

औषध घोटाळ्यातील उर्वरितांना क्लीनचीट देण्याच्या हालचाली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या औषध खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी आणखी चार जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र घोटाळ्याच्या फाइलवर सही करणारे लेखा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अद्याप नामानिराळे राहिले आहेत. यामुळे सर्वाचा शोध घेतल्यास ठपका असलेल्यांची संख्या १३ वर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, घोटाळ्याचा ठपका आरोग्य विभागावरच ठेवून अर्थ विभाग नामानिराळा राहणार आहे. अर्थ विभागातील दोषींना क्लिन चीट देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

औषध घोटाळ्याचे प्रकरण सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्सने चव्हाट्यावर आणले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगले यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. औषध खरेदीतील अंतिम मंजुरी मुख्य लेखाधिकारी देतात. त्यांच्यापर्यंत फाइल जाईपर्यंत अर्थ विभागातील विविध टेबलांवर फिरते. त्यावर सही केलेल्या सर्वांवर ठपका ठेवणे आवश्यक आहे. मात्र मुख्य लेखाधिकाऱ्यांनी केवळ आरोग्य विभागातील फायलीवर सही केलेल्यांवर ठपका ठेवत, त्यांच्यावर कर्तव्यात कसुरी केल्याचा आरोप ठेवला आहे.

आयुर्वेदिक व तालुका दवाखान्यात साधन सामुग्री, उपकरणे, फर्निचर, रेबीज इंजेक्शन, सर्पदंशावरील इंजेक्शन, मेडिक्लोर, फ्लोरोस्कोप खरेदी, वैद्यकीय साधन सामुग्री पुरवणे, तीव्र रक्तक्षय असणाऱ्या गरोदर मातांना शिरेतून लोह देणे, प्राथमिक आरेाग्य केंद्र, उपकेंद्रासाठी औषधे, साहित्य सामुग्री, आयुर्वेद युनानी दवाखान्यात सुविधांमध्ये वाढ करणे, कन्यागत महापर्वकाळात औषधांची खरेदी जादा दराने केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले. या खरेदीच्या फायलीवर डॉ. पाटील, बी. डी. चौगले, बर्डे, व्हटकर, एम. बी. चौगुले यांच्या सह्या आहेत. त्यांच्यावरही कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवला आहे. हे सर्व कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत. आरोग्य विभागातून फाइल फिरून अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागात जाते. त्यामुळे घोटाळ्याच्या फायलीवर सही केलेले अर्थ विभागातील संबंधित टेबलेचे अधिकारीही दोषी आहेत. मात्र ठपका ठेवण्याची जबाबदारी अर्थ विभागावर सोपवलेली होती. त्यांनी घोटाळ्याच्या फायलीवर सही केलेले आपल्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे लपवून ठेवली आहेत. या प्रकरणातील सर्वांवर कारवाई होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार काय कार्यवाही करणार याकडे लागून राहिले आहे.

यांच्यावर आहे ठपका

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले, कनिष्ठ लेखा अधिकारी बर्डे, सांखिकी लेखा अधिकारी व्ही. एस. व्हटकर, कक्ष अधिकारी उदय गोडवे, प्रभारी कक्ष अधिकारी एम. बी. चौगुले.

शुक्रवारी अहवाल

सक्तीच्या रजेवर असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, औषध निर्माण अधिकारी चौगले यांनी नोटिशीला उत्तर दिले. त्यांचा खुलासा अमान्य केला. त्यांच्यावरील आरोप कायम राहिले. त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठीचा अहवाल शुक्रवारी डॉ. खेमनार यांनी आरोग्य सचिवाकडे पाठवला.

औषध खरेदी प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. पहिल्या टप्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकाऱ्यांवरील कारवाईचा अहवाल सचिवांकडे शुक्रवारी पाठवला.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन वाढवणार आडवाटेवरचे कोल्हापूर

0
0

(फोटो आहे)

'आडवाटेवरचे कोल्हापूर' वाढवणार जिल्ह्याचे पर्यटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आडवाटेवरचं कोल्हापूर हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. यात राज्याच्या अन्य जिल्ह्यातील पर्यटकांचा सहभाग घेतला जाईल. या उपक्रमातून जवळपास १४०० पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचा ठेवा पहायला मिळणार आहे,' असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. हिल रायडर्स फाऊंडेशन व ॲक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित केलेल्या 'आडवाटेवरचं कोल्हापूर' या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या उपक्रमात १३ एप्रिल ते २६ मे दरम्यान १४ पर्यटन सहलींचे आयोजन केले आहे. पालकमंत्री पाटील आणि चित्रपट अभिनेता भरत जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाहू स्मारक येथून पहिल्या पर्यटन सहलीच्या दोन बसेसना मंत्री पाटील आणि भरत जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, 'कोल्हापूरमध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आणि संधी असून, अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. या सहलीतून कोल्हापुरातील नवीन पर्यटन स्थळे पाहता येतील.'

या उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन दिवस महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सहलींचे आयोजन केले आहे. शुक्रवारी पुरुषांसाठीच्या पहिल्या सहलीची सुरुवात झाली. दोन दिवसांच्या सहलीदरम्यान प्रवास, निवास, न्याहरी व भोजन व्यवस्था पूर्णत: मोफत करण्यात आली आहे. पर्यटकांना या सहलीचा लाभ घेता यावा यासाठी Unexplored Kolhapur या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. दोन दिवसांच्या या सहलींमध्ये गौतम बुध्द, सम्राट अशोक, सातवाहन, यादव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीतील अनेक वारसास्थळे, शिलालेख, गुहा, वास्तू, गड, मंदिरे व युद्धभूमी पाहता येईल. जागतिक वारसास्थळ असेलल्या जंगलात राहणे, नद्या, धरणांचा जलाशय, देवराई, रानमेवा यांचा आनंद घेत निसर्ग भ्रमंती करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय निरभ्र आकाशदर्शनासह, जंगलट्रेक व लोककला यांचाही अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. उपस्थित पर्यटकांशी पालकमंत्री पाटील यांनी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

यावेळी अंजली पाटील, अभिनेते भरत जाधव यांच्या पत्नी डॉ. सरिता जाधव, प्रमोद पाटील, डॉ. अमर अडके, उदय गायकवाड, अनिल चौगुले, अनंत खासबागदार, राहुल चिकोडे, बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा

0
0

महापौर फुटबॉल चषक स्पर्धा बुधवारपासून

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेच्यावतीने १८ एप्रिल ते ४ मे दरम्यान महापौर चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये शहरातील १७ नामांकित संघ सहभागी होणार असून विजेत्या संघास एक लाख रुपये व चषक तर उपविजेत्या संघास ५० हजार व चषक, असे बक्षिस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर स्वाती यवलुजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तृतीय क्रमांकास २० हजार व चतुर्थ क्रमांकास १५ हजाराचे बक्षिस आहे.

शाहू स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन महापौर स्वाती यवलुजे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. तर बक्षीस वितरण आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेदरम्यान दररोज ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा सत्कार करण्यात येणार आहे.

महापौर यवलुजे म्हणाल्या, 'यंदा प्रथमच सर्व संघांना रोख रकमेचे बक्षीस देण्याचे नियोजन केले आहे. उत्कृष्ट गोलकिपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ट फॉरवर्ड खेळाडूंना प्रत्येकी पाच हजार व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस दहा हजार व चषक असे बक्षिस आहे. पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी पाच हजार व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या चार संघास प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. स्पर्धा बाद पध्दतीने खेळवण्यात येणार आहे. कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांच्या नियमानुसार स्पर्धा होणार आहे. पहिले चार दिवस दुपारी दोन व चार वाजता असे दोन फुटबॉल सामने होतील. त्यानंतर आठ दिवस दुपारी चार वाजता एक सामना होणार आहे.

स्पर्धा संयोजक समिती प्रमुख नगरसेवक सचिन पाटील, संयोजक आचारसंहिता अंमलबजावणी गटनेता शारंगधर देशमुख, प्रोटेस्ट कमिटी माजी नगरसेवक विनायक फाळके, मैदान व्यवस्था व तिकीट विक्री इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले व सहाय्यक इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, स्पर्धा प्रसिध्दी समिती प्रमुख जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी संरक्षणासाठी अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभागाकडील अॅम्ब्युलन्स, फिजीओथेरपीस्ट उपलब्ध असतील. पत्रकार परिषदेस गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार, नगरसेवक अशोक जाधव, सुभाष बुचडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अपुरा

0
0

शहरात शुक्रवारी

पाण्याचा ठणठणाट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा उपसा केंद्राजवळील गळती व शिंगणापूर येथील उपसा केंद्राच्या सबस्टेशनमधील दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी शहरात पाण्याचा ठणठणाट जाणवला. ई वॉर्डमध्ये मोठी पाणीटंचाई जाणवली. शहरात दिवसभरात सहा टँकरच्या माध्यमातून ५० फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बालिंगा उपसा केंद्राजवळील मुख्य दाबनलिकेस गुरुवारी गळती उद्भवली. त्यामुळे तीनऐवजी दोन पंप सुरू ठेवण्यात आले होते. यामुळे ३३ टक्के पाणीपुरवठा कमी झाला. तेथील दुरुस्तीचे काम रात्री पुर्ण झाले. त्याचवेळी शिंगणापूर उपसा केंद्राकडील सबस्टेशनमधील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे शिंगणापूर ते आपटेनगर व शिंगणापूर ते कसबा बावडा फिल्टरकडे पाणी उपसा करणारे पंप बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळेही पाणी उपशावर मोठा परिणाम झाला. आपटेनगर येथील तीन पंप गुरुवारी रात्री सुरू करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे पाणी उपसा कमी झाल्याने शुक्रवारी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. बावडा फिल्टर हाऊसची यंत्रणा सकाळी सुरू झाली असली तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास शनिवार उजाडणार आहे.

कसबा बावडा व ई वॉर्डमधील अन्य परिसरात दिवसभर पाणीटंचाई जाणवली. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने कळंबा फिल्टर हाऊस व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथे टँकरची मागणी वाढली होती. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीन टँकर उपलब्ध होते. या टँकरच्या माध्यमातून दिवसभरात ५० ठिकाणी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर तालुक्यात १४ जणांना प्रवेश मनाई

0
0

करवीर तालुक्यातील

१४ जणांना प्रवेश मनाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी १४ जणांना करवीर तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास मनाई केली आहे. १४ एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून १९ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंदीचा कालावधी आहे.

गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इम्रान शकिल नायकवडी (रा. सरनोबतवाडी, ता. करवीर), रणजित भगवान पुंदीकर (रा. कंदलगाव, ता. करवीर), अर्जुन अशोक पुंदीकर (रा. कंदलगाव, ता. करवीर), अमित यशवंत पुंदीकर (रा. कंदलगाव, ता. करवीर), भगवान कृष्णा पुंदीकर, (रा. कंदलगाव, ता. करवीर), ओमकार किशोर इंदुलकर (रा. माधवनगर, कणेरवाडी ता. करवीर)यांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच करवीर पोलिस ठाणे हद्दीतील श्रीनिवास वसंतराव पाटील (रा. कसबा बीड, ता. करवीर), राहुल चंद्रकांत दळवी (रा. कसबा बीड, ता. करवीर), रोहन रवींद्र पाटील, (रा. कसबा बीड, ता. करवीर), प्रशांत उर्फ शामराव केरबा गावडे, (रा. कसबा बीड, ता. करवीर), अभिजीत शहाजी मांगुरे, (रा. कसबा बीड, ता. करवीर), नितीन पांडुरंग गावडे, (रा. कसबा बीड, ता. करवीर), सुनील रघुनाथ नलवडे, (रा. कसबा बीड, ता. करवीर), विजय ज्ञानदेव कांबळे, (रा. शिंगणापूर, ता. करवीर) यांच्यावर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शहर आणि उपनगरात मिरवणूक, व्याख्यान असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने मुख्य कार्यक्रम होणार आहे. एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे दुपारी चार वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती राजाराम महाराजप्रेमी विचारमंचतर्फे दुपारी दोन वाजता सीपीआमधील सर्व विभागप्रमुखांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात येणार आहे. राजेंद्रनगरातील संयुक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे सकाळी साडेनऊ वाजता विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस देण्याचा कार्यक्रम होईल. महापौर स्वाती यवलुजे, जिल्हा पोलिस प्रमुख संजय माहिते आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कसबा बावड्यातील श्री शाहू प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, कवी नारायण पुरी, रवींद्र केसरकर, जेष्ठ साहित्यिक राजन खान मार्गदर्शन करणार आहेत. संवेदना फाउंडेशनतर्फे शाहूपुरीतील लॉ कॉलेजसमोर पाच रूपयांत जेवण उपक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत सकाळी ११ वाजता अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याहस्ते प्रतिमा पूजन होईल. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्रीच जि. प. इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images