Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निधीची खैरात

$
0
0

निवडक नगरसेवकांवर निधीची खैरात

स्थायी सभापती उत्तरेवर मेहेरबान, नाराज सदस्यांनी घेतली महापौरांची भेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतींनी अर्थसंकल्पात भाजप-ताराराणी आघाडीतील काही निवडक नगरसेवकांवरच निधीची खैरात केली आहे. अन्य नगरसेवकांसाठी तरतूद करण्यापेक्षा स्थायी सभापतींनी ६७ कामांच्या यादीत स्वत:च्या प्रभागातील २० कामांसाठी तरतूद केली आहे. याशिवाय सिद्धार्थनगरपासून कदमवाडी, विक्रमनगर या शहराच्या उत्तरेकडील प्रभागांतच निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीतील नाराज गटाने बुधवारी महापौर स्वाती यवलुजे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रभागांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

स्थायी सभापती आशीष ढवळे यांनी सभापतींसाठीचा २५ लाखांचा निधी, १३ लाखांचा ऐच्छिक निधी यासह इतर कामांसाठी एक कोटी ६७ लाख रुपयांचा निधी अशी दोन कोटी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे, तर शहराच्या दक्षिणेकडील प्रभागांपेक्षा उत्तरेकडील प्रभागांतच निधीची तरतूद केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सम्राटनगर व सानेगुरुजी वसाहत हे दोन प्रभाग सोडल्यास इतर १८ प्रभाग शहरातील मध्यवस्तीपासून कसबा बावडा, टेंबलाईवाडी, कदमवाडीपर्यंतचे आहेत. या सर्व प्रभागांत काँग्रेसचे अशोक जाधव, श्रावण फडतारे वगळता भाजप-ताराराणी आघाडीचेच नगरसेवक आहेत. तसेच स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून फुटून मतदान करणाऱ्या अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांना झुकते माप दिले आहे.

याशिवाय कार्यालयाकडून सुचविण्यात येणाऱ्या कामांसाठी विविध नावाखाली निधी दिला जातो. त्यासाठी आतापर्यंत एक नाव देऊन त्याअंतर्गत सर्वांना निधी मिळेल, अशी व्यवस्था केली जात होती. पण आता एखाद्या विशिष्ट कामासाठीच निधी दिला आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी हा निधी खर्च करता येणार नाही. अशा सुचवलेल्या कामांसाठीही भाजप, ताराराणी आघाडीच्याच ठराविक नगरसेवकांना निधी दिला आहे. तसेच स्थायी समितीतील काँग्रेस आघाडीच्या सदस्यांना जादा निधी दिलेला नाही. प्रत्येक नगरसेवकाला पाच लाख रुपयांचा, तर स्वीकृत नगरसेवकाला चार लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. स्थायी सदस्यांना प्रत्येकी सहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. भाजप, ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक नाराज आहेत. त्यांनी महापौरांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली आहे. तर काही नगरसेवकांनी आता काही बोलायचे नाही, असा पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत भाजप-ताराराणी आघाडीमध्ये दबून असलेली धुसफूस अर्थसंकल्पाच्या निमित्ताने उघड होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

......

या प्रभागांमध्ये निधी

महाडिक वसाहत, सर्किट हाउस, भोसलेवाडी कदमवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, सिद्धार्थनगर, पद्माराजे उद्यान, रंकाळा स्टँड, सम्राटनगर, सिद्धाळा गार्डन, टेंबलाईवाडी, लक्ष्मीविलास पॅलेस, सानेगुरुजी, कसबा बावडा पूर्व, शाहूपुरी तालीम, ताराबाई पार्क

......

रंकाळ्यासाठी काहीच नाही

सरकारकडून मंजूर केलेला चार कोटी ८० लाख रुपयांचा निधी रंकाळा विकासासाठी वापरण्यात येणार आहे. महापालिका आतापर्यंत स्वनिधीतून रंकाळ्यासाठी विशेष तरतूद करत होती. यंदा एक रुपयाही महापालिकेच्या निधीतील तरतूद नाही. यामुळे शहरातील पर्यटनाचे मोठे केंद्र असलेल्या रंकाळ्याकडे महापालिकेचे प्रथमच दुर्लक्ष झाल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले.

.....

इतका आटापिटा दोघांसाठी

स्थायी सभापतिपद मिळवण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीने प्रचंड आटापिटा केला. घोडेबाजारही केला. इतका आटापिटा शहराच्या विकासासाठी की या दोघांच्या प्रभागाच्या विकासासाठी, हेच आता समजेनास झाले आहे. तसेच ज्या ढवळेंनी यापूर्वी सभापतिपद भूषवले आहे, त्यांच्याकडून अशा प्रकारचा अर्थसंकल्प केला जाईल ही अपेक्षा नव्हती, असेही देशमुख यांनी सांगितले.

.....

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ विसरले काय?

'कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रभागाशेजारील भागात कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. शहरातील अपवाद प्रभाग वगळता सिद्धार्थनगरपासून कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहतीपर्यंतच्याच प्रभागांमध्ये निधीची तरतूद दिसत आहे. हे पाहून कदम आणखी एक वेगळा विधानसभा मतदारसंघ तयार करणार आहेत की काय असे वाटते. उत्तर मतदारसंघात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ यासारख्या जुन्या पेठांचे शहरही येते हे कदम विसरले आहेत की काय?' असा टोला देशमुख यांनी यावेळी लगावला.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२६ अधिकाऱ्यांचे पगार रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दैनंदिन टपालाद्वारे आलेल्या, शहरवासीयांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून व लोकशाही दिनामध्ये मांडलेल्या तक्रारींची मुदतीमध्ये सोडवणूक न केल्याबद्दल महापालिकेतील वर्ग एक व दोनमधील २६ विभागप्रमुख तसेच अन्य अधिकाऱ्यांचे पगार आयुक्तांनी रोखले. यामध्ये नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, उपशहर रचनाकार नारायण भोसले, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जोपर्यंत संबंधितांकडून तक्रारींचे निराकरण होत नाही तोपर्यंत पगार न करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्त दर महिन्याला सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतात. त्यामध्ये गेल्या महिन्यात आलेल्या तक्रारींची किती सोडवणूक झाली व विकास कामांची प्रगती याचा आढावा घेतला जातो. दररोज टपालातून तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची चार ते पाच दिवसांत सोडवणूक करण्याचे आदेश आयुक्त देत असतात. आयुक्त टास्क रिमाइंड यंत्रणेद्वारे त्या तक्रारींचा पाठपुरावा करतात. यापूर्वीच्या आढावा बैठकीमध्ये आयुक्तांनी सातत्याने अधिकाऱ्यांना या तक्रारींचा वेळेत निपटारा करा अथवा योग्य उत्तर देत जा, असे सांगितले होते. या महिन्याच्या पहिल्या सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी तक्रारींवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तसेच उत्तर अथवा कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत संबंधितांचा पगार करण्यात येऊ नये, असाही आदेश दिला होता. काही अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व तक्रारींची सोडवणूक केली. पण अन्य अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद दिला गेला नसल्याने त्यांचे पगार रोखण्यात आले. नऊ तारखेला वर्ग एक व वर्ग दोनमधील अधिकाऱ्यांचे पगार होतात. ज्यांनी तक्रारींची सोडवणूक केली आहे, त्यांचे पगार करण्याचे पत्र आस्थापना विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा. मोटार वाहन निरीक्षकपदी अनुराधा जाधव

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत अनुराधा अरुण जाधव-पाटील उत्तीर्ण झाल्या. आयोगाच्यावतीने ८३३ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. ७० हजार उमेदवारांतून मुख्य परीक्षेसाठी नऊ हजार उमेदवार पात्र झाले होते. यामधून ८३३ मध्ये जाधव-पाटील यांनी निवड यादीत पहिल्याच प्रयत्नात स्थान मिळवले आहे. अनुराधा या अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कोल्हापूर व मिरज येथे झाले. केआयटी कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतरी पुणे येथे विशेष प्राविण्यासह एम. ई. पदवी संपादन केली. त्यांना अरुण जाधव, आनंदा जाधव, शीला पाटील, विजय पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक संजय पाटील, क्रीडा शिक्षक सयाजीराव पाटील, अॅड. बाळासाहेब पाटील, दिनकर पाटील व रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट.. दादा

$
0
0

' भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या आणि भाजपविरोधात हल्लाबोल करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. ग्राामीण भागात भाजपवरील विश्वास वाढत चालल्याचे या निकालावरून दिसून येते.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकिता घुणके दुसरी

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत करवीर तालुक्यातील येवती येथील अंकिता अंकुश घुणके हिने तालुकास्तरावर व्दितीय क्रमांक मिळवला. तिला वर्गशिक्षिका अलका कारंजकर यांचे मार्गदर्शन तर गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव, केंद्रप्रमुख अशोक देशमुख, मुख्याध्यापिका कविता चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधुरी जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

$
0
0

(फोटो आहे)

दोन मुलांसह

विवाहिता बेपत्ता

कोल्हापूर

पती-पत्नीच्या वादातून राजेंद्रनगर येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता झाली आहे. सुषमा महादेव गायकवाड (वय २६) ही विवाहिता आपली मुलगी वृषाली (वय ७) आणि मुलगा राजदीप (वय ४) यांना घेऊन मंगळवारी (ता. १०) पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून निघून गेली आहे. याबाबत सुषमाचे पती महादेव लिंबाजी गायकवाड (४०, रा. राजेंद्रनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महादेव गायकवाड हे रिक्षाचालक आहेत. राजेंद्रनगरातील घरात ते पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. पत्नी सुषमाचे त्यांच्यासोबत वारंवार किरकोळ कारणावरून वाद घडत होते. मंगळवारी पहाटे झालेल्या वादानंतर सुषमा ही मुलगी वृषाली आणि मुलगा राजदीप या दोघांना घेऊन घराबाहेर पडली. महादेव यांनी दिवसभर तिघांचाही शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरेवाडी खुनातील आरोपींचा करवीर पोलिसांनी घेतला ताबा

$
0
0

खुनातील आरोपींचा

ताबा करवीर पोलिसांकडे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तामगाव आणि मोरेवाडी येथील दोन खुनांमधील संशयित आरोपींचा ताबा गुरुवारी (ता. १२) करवीर पोलिसांनी घेतला. भैरू ऊर्फ सुनील दगडू मोरे (वय ३९, रा. मोरेवाडी), रशीद सैफुद्दीन वजीर (४३, रा. गोकुळ शिरगाव), जावेद अमरबाबू शेख (४९, रा. तामगाव), सुनील पांडुरंग शिंदे (२३, रा. नेर्ली) आणि रोहित एकनाथ कांबळे (२६, रा. गिरगाव) हे पाच संशयित तामगाव खूनप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात होते. तामगाव येथील खुनाच्या तपासानंतर आता संशयितांची मोरेवाडी खूनप्रकरणी चौकशी होणार आहे.

प्लॉट विक्रीचा वाद आणि उसने घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ होत असल्याने मोरेवाडी येथील भैरू मोरे याच्यासह टोळीने अजीज वजीर आणि दस्तगीर तद्देवाड या दोघांचा निर्घृण खून केला होता. सिमेंटच्या पोलला बांधलेले मृतदेह मोरेवाडी येथील विहिरीत आणि तामगाव येथील खणीत आढळले होते. करवीर आणि गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुंड भैरू मोरे याच्या टोळीला ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावला होता. तामगाव येथील खूनप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. चौकशीनंतर आता या आरोपींना मोरेवाडी येथील खूनप्रकरणी अटक करण्यात आले आहे. त्यामुळे करवीरचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी गुरुवारी भैरू मोरे याच्यासह पाच आरोपींचा ताबा घेतला. या आरोपींनी दस्तगीर तद्देवाड याचा मृतदेह मोरेवाडी येथील विहिरीत टाकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमल महाडिकांची बैठक

$
0
0

महापालिकेत बैठक

कोल्हापूर

घनकचरा व्यवस्थापन, बहुमजली कार पार्किंग, कोंबडी बाजार संकुल, गाडीअड्डा भक्त निवास यासह अन्य विकास प्रकल्पांचा आमदार अमल महाडिक शुक्रवारी (ता.१३ ) महापालिकेत आढावा घेणार आहेत. सकाळी दहा वाजता आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत ते उपनगरातील समस्या, पाणीपुरवठा यांचाही आढावा घेणार आहेत. यासाठी सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजरा पान १

$
0
0

सिंगल फोटो

............

'आजरा' नगराध्यक्षपदी

भाजप आघाडी ज्योत्स्ना चराटी

भाजपप्रणित शहर विकास आघाडीकडे सत्तेची कमान

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून भाजप-मित्रपक्षांच्या आजरा शहर विकास आघाडीच्या ज्योत्स्ना अशोक चराटी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या अलका शिंपी आणि परिवर्तन आघाडीच्या स्मिता टोपले यांचा पराभव केला. चराटी यांना ४५६५ मते मिळााली. आजरा शहर विकास आघाडीने १७ पैकी ९ जागा जिंकून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राखल्या.

प्रमुख विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीला केवळ सहा जागा मिळाल्या. भाजपमधून असंतुष्ट होऊन बाहेर पडलेल्या परिवर्तन आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर एक जागा अपक्षाला मिळाली. प्रभाग दोनमध्ये दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीवर निर्णय झाला. यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे संभाजी पाटील निवडून आले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळण केली. तसेच चौकाचौकांत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. विजयी शहर विकास आघाडीने शहरातून भव्य मिरवणूक काढली.

सकाळी १० वाजता येथील प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात मतमोजणीला सुरवात झाली. केवळ दोन फेऱ्यांत झालेली मोजणी प्रक्रिया साडेअकराच्या सुमारास पार पडली. या मोजणी प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय काटकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी निकाल जाहीर केला. सहायक निवडणूक अधिकारी सुषमा कोल्हे, तहसीलदार अनिता देशमुख, सुरेश मुंढे व डी. डी. कोळी यांनी प्रक्रिया पार पाडली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सव्वादोनशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या नारायण राणे यांच्या 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ने दणदणीत विजय मिळवला. पक्षाने भाजप-शिवसेना युतीला धक्का देत पहिल्याच झटक्यात १७ पैकी १० जागांवर झेंडा फडकावला. त्यामुळे कणकवलीत पुन्हा राणेंचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत भाजपचे संदेश पारकर यांचा ३७ मतांनी पराभव झाला, तर नगराध्यक्षपदाची माळ राणेंचे निकटवर्तीय समीर नलावडे यांच्या गळ्यात पडली.

कणकवलीत राणे जिंकले, भाजप हरली

राज्याचे लक्ष लागूर राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीमध्ये नारायण राणे यांच्या स्वाभीमान पक्षाने १० जागा जिंकल्या. या ठिकाणी भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. आमदार नितेश राणे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये राणे जिंकले तर भाजपला हार पत्करावी लागली. नगराध्यक्षपदाची माळ राणेंचे निकटवर्तीय समीर नलावडे यांच्या गळ्यात पडली. स्वाभिमान पक्षाला १० आणि शिवसेना-भाजप प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवता आला, तर राष्ट्रवादीतर्फे अबीद नाईक निवडून आले.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन सोशल ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रम

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जैन सोशल ग्रुप मेनच्यावतीने आयोजित 'रंगोलो राजस्थान' या सांस्कृतिक कार्यक्रमात नागरिकांनी मनोरंजनाची मेजवानी लुटली. ग्रुपच्या सभासदांनी गीत, नृत्य सादर करत धमाल केली. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याहस्ते आणि ग्रुपचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मांगिलाल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी सोशल ग्रुप कोल्हापूर विभागाला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष वनेचंद कटारिया व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार झाला. तसेच पाचगाव कळंबा माध्यमिक विद्यालयाला ११ सिलिंग फॅन, कम्प्युटर प्रिंटर, स्कूल बॅग्ज प्रदान करण्यात आले. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रुपच्या बहुसंख्य सदस्यांनी सहभाग घेतला. ग्रुपचे महाराष्ट्र विभागाचे सचिव प्रितेश तातेड, रज्जू कटारिया, महावीर शहा, सुमित परीख, दिलीप गुंदेशा, रोहित पारेख, अतुल शहा, श्रेणिक ओसवाल, राजेश शहा आदी उपस्थित होते. दिव्या राठोड यांनी सूत्रसंचालन केले. जयेश ओसवाल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ पतसंस्था बातमी फोटो

‘प्राथमिक’मध्ये डल्ला मारू रॅकेट

$
0
0

' प्राथमिक' मध्ये डल्लामारू यंत्रणा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील आर्थिक व्यवहाराचे 'धडे' आता चव्हाट्यावर येत आहेत. अर्थपूर्ण व्यवहार झाल्यानंतर आंतरजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकास सोयीचे ठिकाण देणे, बढती, बदलीतून वरकमाई करणे, खोटी कागदे तयार करून वरिष्ठांची दिशाभूल करणे तसेच बदलीचे काम असलेल्या शिक्षकास परस्पर भेटून डल्ला मारणारी यंत्रणा सक्रिय झाली आहे. या यंत्रणेच्या दबावाला, पैशाच्या मागणीला बळी न पडल्याने आंतरजिल्हा बदलीने आलेल्या दत्तात्रय शिवाजी चव्हाण या शिक्षकास गैरसोयीची शाळा देऊन 'धडा' शिकवला आहे.

याउलट सहा महिनेच नोकरी झाली असताना जादा नोकरीची कागदपत्रे तयार करून लाखो रूपयांवर डल्ला मारत शिरोळ तालुक्यातील एका शिक्षिकेची सोयीच्या ठिकाणी बदली केली आहे. अशा शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षक चव्हाण यांनी सरकारच्या 'आपले सरकार' पोर्टलवरून वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

प्राथमिक शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे डल्ला मारणाऱ्या यंत्रणेचा वावर विभागात वाढला आहे. काहीजण संघटना पदाधिकाऱ्यांची झूल पांघरून वसुलीसाठी मोर्चेबांधणी करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी शिक्षण प्रशासनातील वरकमाईत पारंगत असलेले तीन लिपिक, एका अधिक्षकास त्यांनी हाताशी धरले आहे. त्यांनाही वाटा मिळत असल्याने ते मलिदा देणारी प्रकरणे बाहेरच्या बाहेरच मॅनेज करत आहेत. त्यातून मिळवलेल्या पैशातून ते मालामाल होत आहेत. प्रशासनाचा रोष नको म्हणून अनेक शिक्षक आर्थिक शोषण सहन करत आहेत.

---------------

कोट

'शिक्षक बदलीतील एजंटगिरी बंद होण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. आतंरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक चव्हाण यांच्यावर अन्याय झाला असेल तर नियमाच्या चौकटीत न्याय मिळवून दिले जाईल. त्यासाठी स्वतंत्र सुनावणी घेण्यात येईल. नियमबाह्य बदली झाली असल्यास चौकशी केली जाईल.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार पाटील वाढदिवस

$
0
0

फोटो

.......................

वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड

सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. 'चैतन्य लोकोत्सव ' म्हणून साजरा झालेल्या या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या वर्षीही वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन राबविलेल्या वह्या संकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार पाटील यांना 'यशवंत' निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, वैजयंती संजय पाटील, प्रतिमा सतेज पाटील,राजश्री काकडे, मेघराज काकडे, तेजस पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, निशांत पाटील, सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त आयोजित वह्या संकलन उपक्रमात लाखांहून अधिक वह्या जमा झाल्या . यामध्ये निशांत पाटील यांनी पाच हजार, कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम हायस्कूलने ५१ हजार, माजी महापौर सागर चव्हाण, सचिन चव्हाण यांनी ५० हजार वह्या दिल्या. सामाजिक कार्यकर्ते अनुप पाटील यांनी तीन हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले. पॅरालॉम्पिक स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने यांच्यासह दिव्यांग बांधवांनी रॅलीने शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त अनाथ बालकल्याण संकुलमध्ये धान्यवाटप करण्यात आले. काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनीही वह्या सुपूर्द केल्या. महापौर स्वाती येवलुजे, खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आर. के, पोवार, राजेश लाटकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के.पी.पाटील, उपमहापौर सुनील पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार, जयराम पाटील, अभिनेता भरत जाधव, माजी आमदार दिनकरराव जाधव, राजीव आवळे यांनी शुभेच्छा दिल्या. तर माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मोतीलाल वोरा, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अहमद पटेल, खासदार राजीव सातव, आमदार अमरेंद्रसिंह ब्रार, खासदार भावना गवळी, माजी मंत्री राजेंद्र मुळीक, हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख, आमदार जयंत पाटील, मदन भोसले, गुजरातचे आमदार परेश धनानी, माजी आमदार काकासो पाटील आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी१३ एप्रिल

$
0
0

पुस्तक प्रदर्शन : संवाद प्रकाशन व वाचनकट्टातर्फे पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक कलादालन, वेळ : सकाळी १० ते रात्री ८

शिबिर : भारतीय जीवन बीमा निगम वेलफेअर असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर, स्थळ : एलआयसी विभागीय कार्यालय, स्टेशन रोड, वेळ : सकाळी १०.००

शिवजयंती उत्सव : मंगळवार पेठ संयुक्त शिवजयंती समितीतर्फे शिवजयंती उत्सव, स्थळ : मिरजकर तिकटी, वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ८

पुरस्कार: शिवाजी विद्यापीठ व कणबरकर कुटुंबीय यांच्यातर्फे देण्यात येणारा रा. क.कणबरकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा, स्थळ : राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी विद्यापीठ, वेळ : दुपारी ४.००

कार्यशाळा : नीट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा, स्थळ : वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, वेळ : दुपारी ४.००

रंगसंवाद: फिल्म अँड थिएटर अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारावर आधारित रंगसंवाद सांस्कृतिक कार्यक्रम, स्थळ : गायन समाज देवल क्लब, वेळ : सायंकाळी ६.००

हलगीवादन : संयुक्त जुना बुधवारपेठ शिवजयंती उत्सवसमितीतर्फे हलगीवादन, स्थळ : जुना बुधवार पेठ तालीम, वेळ : रात्री ९.००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांची मारामारी, एक जखमी

$
0
0

सीबीएसजवळ

रिक्षाचालकांत मारामारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिक्षात प्रवासी घेण्याच्या वादातून मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दोन रिक्षाचालकांमध्ये मारामारी झाली. यात नाकावर ठोसा बसल्याने फिरोज हसन मुल्ला (वय ३८, रा. यादवनगर) हे जखमी झाले आहेत. मुल्ला यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. गुरुवारी (ता. १२) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांचे वडाप करणाऱ्या रिक्षाचालकात प्रवासी घेण्याच्या कारणातून वाद झाला. दुपारी चारच्या सुमारास वडापचालक मुल्ला हे मध्यवर्ती बसस्थानकाबाहेरील रिकाम्या जागेत प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. याचवेळी रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या रिक्षाचालकांनी मुल्ला यांना दुसरीकडे जाण्यास सांगितले. मुल्ला हे त्याच ठिकाणी थांबून प्रवासी घेण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे संतापलेल्या एका रिक्षाचालकाने मुल्ला यांच्याशी वाद घातला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. रिक्षाचालकाने मुल्ला यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्याने मुल्ला जखमी झाले. जखमी अवस्थेत ते सीपीआरमध्ये पोहोचले. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात पिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भाजप, ताराराणी आघाडीत एकाधिकारशाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

'काँग्रेस आघाडीच्या काळात निधी मिळाला नसल्याने भाजप आघाडीच्या स्थायी सभापतींकडून निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अर्थसंकल्पातील निधी वाटपामध्ये पदाधिकारी तुपाशी व नगरसेवक उपाशी अशी परिस्थिती आहे. भाजप, ताराराणी आघाडीत एकाधिकारशाही आहे,' असा आरोप करत नाराज असलेले भाजप ताराराण आघाडीचे विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनी आघाडीला घरचा आहेर दिला.

अर्थसंकल्पामध्ये काही ठराविक प्रभागांमध्येच निधी दिला असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेस आघाडीने केला होता. तर निधी न मिळाल्याने भाजप, ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक नाराज झाले होते. नुकतेच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घेतलेले वास्कर स्वत: नाराज होते. त्यामुळे गुरुवारी त्यांनी स्थायी सभापतींशी चर्चा केली. तसेच भाजपचे आमदार अमल महाडिक यांनाही हा प्रकार सांगितला.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता वास्कर म्हणाले, 'गेल्या अडीच वर्षांच्या काळात काँग्रेस आघाडीकडून काही विकास निधी मिळाला नाही. आता भाजप, ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे स्थायी सभापती झाल्याने काही निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ढवळे यांनीही जुन्यांचाच कित्ता गिरवला. त्यांनी केलेल्या निधीवाटपामुळे पदाधिकाऱ्यांचे भाग चकाचक होतील, पण नगरसेवकांचे भाग जैसे थे राहतील. याबाबत सभापतींकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी 'सर्वांना दिले आहे', असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार अमल महाडिक यांच्या कानावर हे प्रकरण घातले. यामध्ये दुरुस्ती केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे.' निधी वाटपातील विसंगतीमुळे आघाडीतील नगरसेवक नाराज आहेत, असे सांगत वास्कर यांनी आघाडीत एकाधिकारशाही आहे. त्याला नक्कीच चाप लागेल. नेते आवश्यक ती दुरुस्ती करतील, महापालिकेतून निधी न मिळाल्यास त्यांच्या फंडातून निधी देतील,' असेही सांगितले.

दरम्यान, निधी न मिळाल्याने दिवसभर अनेक नगरसेवक अस्वस्थ होते. काहीच प्रभागात निधी दिल्याचे समजताच काहीजण महापालिकेत आले होते. नेमकी माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. काही नगरसेवकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता. काही नगरसेवकांनी मते व्यक्त करण्यास नकार दिला पण ते नाराज दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला उद्योग धोरणावर आज कार्यक्रम

$
0
0

महिला धोरणावर कार्यक्रम

कोल्हापूर

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, अस्तित्व महिला बचतगट महासंघातर्फे शुक्रवारी (ता. १३) 'महिला उद्योग धोरण' विषयावर विशेष कार्यक्रम होत आहे. चेंबरच्या राजाराम रोडवरील शिवाजीराव देसाई सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष महिला धोरणांची माहिती उद्योग विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी देणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर, महासंघाच्या माधवी नाईक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर चित्पावन संघ

$
0
0

कोल्हापूर चित्पावन संघातर्फे जयंती सोहळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर चित्पावन संघातर्फे बुधवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर आणि परशुराम यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ७.३० वाजता महापूजा आणि दुपारी ४.३० वाजता वेदमूर्ती केशव भावे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे सामुदायिक मंत्र पठण, सायंकाळी ५.३० वाजता योगेश्वरी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता परशुराम पालखी सोहळा आयोजित केला आहे. गुरु महाराज वाडा, महाव्दार रोड, जोतिबा रोड असा पालखी मार्ग आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर चित्पावन संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे व कार्यवाह द. गो. कानिटकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळती ...

$
0
0

फोटो -

................

कृष्णा योजनेला गळती;

पाणी पुरवठ्यावर परिणाम

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मुख्य वितरण नलिकेला शिरढोणजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून युध्द पातळीवर काम करून गळतीचे काम पूर्ण केले असले तरी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.

शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेची वितरण नलिका निकृष्ट झाल्याने वितरण नलिकेला सातत्याने गळती लागते. त्याचा परिणाम इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठ्यावर होतो. शिरढोण याठिकाणी सातत्याने गळतीचा प्रश्न निर्माण होत आहे. गुरुवारी पुन्हा वितरण नलिकेला गळती लागली. त्याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने गळती काढण्याचे काम हाती घेतले. दुपारच्या सुमारास गळती काढण्याचे काम पूर्ण करून पाणी उपसा सुरू केला. मात्र दिवसभर उपसा बंद राहिल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार असून एकदिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडील अधिकारी कशाला पाहिजेत?सरकार निर्णय

$
0
0

सरकारकडील अधिकारी कशाला पाहिजेत?

सरकार निर्णय लादणार असेल तर फक्त पगार, फंड, भत्ते देण्यापुरतीच महानगरपालिका आहे का? सरकारकडून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक संचालक, कार्यकारी अभियंता दोन उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त हे अधिकारी हवेतच कशाला? शहरअभियंता, चार उपनगर अभियंता, आठ सहाय्यक अभियंता ४० कनिष्ठ अभियंता, सर्वेअर या सर्वांचा पगार, फंड व भत्ते देण्यापुरतीच महापालिका आहे का? त्यांना अधिकारच नसतील तर काय उपयोग असा सवालही लाटकर यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images