Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरटीओ कारवाई

$
0
0

दोषी वाहनधारकांकडून

५८ लाखांची वसुली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २ हजार ५८७ वाहनांवर कारवाई करून ५८ लाख २८ हजार ८५० रुपये वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस यांनी दिली. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खासगी ऑटो रिक्षा, मिनीडोअर, जीप, टाटा मॅजिक, ॲपेरिक्षांसह अन्य वाहनांवर कारवाई करण्यात आली. या तपासणीत कारवाईकरून तडजोड शुल्क ही रक्कम वसूल केली आहे. दरम्यान, खासगी ऑटोरिक्षा वाहनांसाठी सरकारने ३१ मार्च २०१८ पर्यंत परवाना देणे सुरू होते. मात्र, हा परवाना अत्यल्प वाहनधारकांनी घेतला आहे. येत्या काही दिवसांत बेकायदेशीर वाहनांवर कारवाईची मोहिम सुरू राहणार असून सर्व वाहनचालकांनी वाहनांची मूळ कागदपत्रे जवळ ठेवावीत, अशा सूचना अल्वारिस यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५० दुचाकीस्वारांवर कारवाई

$
0
0

२५० दुचाकीस्वारांकडून

५० हजार दंड वसूल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवत सदोष नंबरप्लेट, एकेरी मार्गावरून वाहन चालवणे, वाहन परवाना जवळ नसणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५० दुचाकीस्वारांवर बुधवारी दंडात्मक कारवाई केली. एका दिवसात सुमारे ५० हजार रुपये दंड केल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली. झेब्रा क्रॉसिंग, वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने उभी करणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकीस्वारावर कारवाई झाली. अठरा वर्षांखालील २० मुलांना दुचाकी चालविताना पकडून त्यांच्या पालकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीक्टर पॅलेसवर बोजा

$
0
0

व्हिक्टर पॅलेसच्या

प्रॉपर्टी कार्डवर बोजा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने २६ लाख ३१ हजार रुपयांच्या घरफाळ्याच्या थकबाकीपोटी हॉटेल व्हिक्टर पॅलेसच्या प्रॉपर्टी कार्डवर अखेर बोजा चढवला. याप्रकारे अन्य थकबाकीदारांवरही महापालिका कारवाई करणार आहे.

व्ही. एच. अपराध यांच्या हॉटेल व्हिक्टर पॅलेसच्या घरफाळ्याची २६ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी होती. थकबाकी जमा न केल्याबद्दल महापाालिकेने त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर बोजा चढविण्यासाठी गेल्या महिन्यापासून प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार महसूल विभागाकडून प्रॉपर्टी कार्डवर थकबाकीचा बोजा चढविला. या बोजामुळे थकबाकीची रक्कम जमा झाल्याशिवाय या मिळकतीची विक्री, हस्तांतर होऊ शकत नाही. याप्रकारे अन्य थकबाकीदार मिळकतींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने थकबाकी जमा करावी असे आवाहन घरफाळा विभागाकडून केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंती उत्सव बातमी

$
0
0

शिवजयंतीनिमित्त आजपासून

विविध कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवार पेठ परिसरातील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे परिसरातील १३ तालीम मंडळांनी एकत्रित शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत मिरजकर तिकटी येथे गुरूवारी १२ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ गुरूवारी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाने होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शनिवारी खाद्य महोत्सव रंगणार आहे. रविवारी राजा शिवछत्रपती मालिकेचे प्रक्षेपण आणि सोमवारी १६ रोजी पोवाडा सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी शिवजयंतीदिवशी सकाळी शिवजन्मकाळ सोहळा तसेच सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ८ फुटी शिवप्रतिमा, घोडे-ऊंट, झांजपथक हे मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. मिरजकर तिकटी, लाड चौक, महाद्वार रोड या मार्गावरून ही मिरवणूक निघणार आहे.

पत्रकार परिषदेला संदीप चौगुले, जयकुमार शिंदे, अवधूत शिंदे, केशव चेंडके, बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, संतोष माळी, राहुल कुलकर्णी, प्रथमेश पोवार, दिलीप निंबाळकर, संभाजी जगदाळे, रामभाऊ कोळेकर, सुनील खिलगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

फोटो आहे

रविवारपेठ शिवजयंती उत्सवसमितीच्या अध्यक्षपदी प्रवीण सोनवणे

संयुक्त जुना रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण सोनवणे तर उपाध्यक्षपदी सुमित पवार यांची निवड करण्यात आली. सोनम कुमार घोटणे, अमोल मोरे, वैभव हिलगे , रवी पाटील, आप्पा लाड, अजित गायकवाड, अशोक भोसले, बाळासाहेब मुधोळकर, गजानन तोडकर यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याला व्याज सवलतीचे ४० कोटी रुपये प्राप्त

$
0
0

जिल्ह्याला व्याज सवलतीचे

४० कोटी रुपये प्राप्त

१५ दिवसांत कर्जदारांच्या खात्यावर रक्कम होणार जमा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांमार्फत पुरवठा केलेल्या पीक कर्जावरील अनुदानापोटी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत जिल्ह्याला ४० कोटी २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्य सरकारकडून प्राप्त झालेली रक्कम १५ दिवसांत कर्जदारांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. याच्या फायदा जिल्ह्यातील दोन लाख ८४ हाजर शेतकऱ्यांना झाला आहे.

राज्यातील नियमीत पीक कर्जपरतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. ३० जूनपर्यंत परतफेड केलेल्या राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी व जिल्हा बँकेकडील कर्जदारांना पीक कर्जावरील व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येते. यानुसार एक लाखांपर्यंत तीन टक्के व एक ते तीन लाखांच्या पीक कर्जाला एक टक्का व्याज परतावा दिला जातो.

व्याज परतावा देण्यासाठी राज्य सरकार, जिल्हा नियोजन समिती व विशेष घटक योजनांचा वापर केला जातो. यानुसार २०१७-१८ वर्षाकरिता ४० कोटी २१ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीपैकी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विकास संस्थामार्फत पीक कर्ज घेतलेल्या दोन लाख ७२ हजार ९० शेतकऱ्यांना ३७ कोटी २२ लाख, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेच्या १२ हजार ४११ शेतकऱ्यांना दोन कोटी ९८ लाख असे दोन लाख ८४ हजार ५०२ शेतकऱ्यांना ४० कोटी २० लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. प्राप्त झालेला निधी कर्जदारांना देण्यासाठी संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. २०१६-१७ आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार ९९९ शेतकऱ्यांना ३४ कोटी २६ लाख रुयपे देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल क्राइम - ११

$
0
0

दुचाकीस्वार जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवचितवाडी (ता. कागल) येथे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात संभाजी दत्तात्रय अंगज (वय ५०, चिमगाव, ता. कागल) जखमी झाले. डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

०००

तरुणास बेदम मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर भरमा बसाप्पा पाथरवटे (वय ३०, रा. सहकारनगर, इचलकरंजी) या तरुणास दोघांनी बेदम मारहाण केली. यात तो जखमी झाला. हात, पाय व डोक्यास जखमा झाल्यामुळे त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

घरावरून पडल्याने वृद्ध जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घर दुरुस्तीचे काम करताना घरावरून पाय घसरून पडल्याने बसाप्पा सिद्धाप्पा कोळी (वय ६५, रा. कळंबा, पाण्याच्या टाकीजवळ) गंभीर जखमी झाले. मंगळवारी (ता. १०) सायंकाळी हा प्रकार घडला. डोक्याला मार लागल्यामुळे कोळी यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

दुचाकीवरून पडल्याने जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुचाकीवरून पडल्याने अश्पाक बापू पठाण (वय ४५, रा. भेंडवडे, ता. हातकणंगले) जखमी झाले. दूध डेअरीतील काम संपवून घरी जाताना भेंडवडेत त्यांचा अपघात झाला. नागरिकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध उपक्रमांनी महात्मा फुले जयंती

$
0
0

दरम्यान, शहर व उपगरात महात्मा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन, व्याख्यान, सत्यशोधक पद्धतीने विवाह असे उपक्रम झाले. शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय विवाह करण्यात आला. सीमा पाटील, अतुल दिघे, मेघा पानसरे, धनाजीराव जाधव, प्राचार्य टी. एस. पाटील आदींनी नवदामप्त्याला शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना-बालकल्याण संकुल येथे संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, कार्यवाह पद्मजा तिवले यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. अधीक्षक पी. के. डवरी, नजिरा नदाफ, द्रौपदी पाटील, संध्या तळेकर, स्मिता वायचळ, टी. एम. कदम, अश्विनी आवळे, राजश्री नाथबुवा, शर्वरी मोरे उपस्थित होते.

अवनि बालगृहात प्रतिमेचे पूजन सनी गाडे यांच्याहस्ते झाले. अमर कांबळे यांचे व्याख्यान झाले. अधीक्षिका सुनीता भोसले, पुष्पा शिंदे, दीपाली सटाले आदी उपस्थित होते. मोनाली साळुंखे यांनी आभार मानले. महाराष्ट्र हायस्कूल येथे प्राचार्य ए. एस. रामाणे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. डी. बी. महावीर, उदय पाटील, डी. बी. कांबळे, के. जी. पाटील, जी. बी. धुमाळे, एस. एस. मोरे, व्ही. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

बिंदू चौकात परिवर्तन फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. अॅड. पंडीतराव सडोलीकर यांच्याहस्ते पुतळा पूजन झाले. अमोल कुरणे, अक्षय साळवी, बाळासाहेब साळवी, बबनराव रानगे, विकास पाटील, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, सुभाष देसाई, विद्याधर कांबळे आदी उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी कार्यालयात उपमहापौर सुनील पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. आर. के. पोवार, जहिदा मुजावर, सुहास साळोखे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश म्हाळुंगेकर, विस्तार अधिकारी जयश्री जाधव यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, अधिकारी राजेंद्र भालेराव, संजय राजमाने आदी उपस्थित होते.

---------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

caption ...

$
0
0

संचलन...

शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील व पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बांबवडे येथे बुधवारी संचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळ अपहार - गोकुळ शॉपी अपहारप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश

$
0
0

गोकुळ शॉपी अपहारप्रकरणी खुलाशाचे आदेश

चौकशी अधिकाऱ्यांकडून संबंधितांना नोटिसा, महिनाअखेर अहवाल सादर

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) हॉटेल ओपल शेजारील शॉपीमध्ये झालेल्या अपहाराप्रकरणी चौकशी अधिकारी जी. व्ही. निकाळजे यांनी अपहारातील संशयितांना नोटिसा पाठवल्या असून सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल पाच महिन्यानंतर गोकुळच्या शॉपीतील अपहाराची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. खुलाश्यानंतर एप्रिलअखेर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांना चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

जिल्हा दूध संघाच्या जुन्या पुणे-बेंगळरू रोडवरील हॉटेल ओपल शेजारील गोकुळच्या शॉपीमध्ये ६३ लाख १८ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. एक एप्रिल २०१६ ते १४ जुलै २०१७ दरम्यान शाखा व्यवस्थापकांनी अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याबाबत दूध उत्पादकांच्यावतीने विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी अपहाराची चौकशी करण्यासाठी सरकारी लेखापरीक्षक निकाळजे यांची चौकशी अधिकारी म्हणून ३० ऑक्टोबर रोजी नियुक्ती केली होती. अपहाराची प्राथमिक चौकशी असल्याने दोन-तीन महिन्यात चौकशी पूर्ण होईल अशी शक्यता होती. निकाळजे शॉपीमध्ये जावून सर्व व्यवहारांची तपासणी करत अहवाल तयार करत होते. त्याला विलंब होत असल्याने शिरापूरकर यांनी स्मरण पत्र पाठवून चौकशी लवकर करण्याच्या सूचना दिली होत्या.

त्यानंतर निकाळजे यांनी अपहाराची चौकशी पूर्ण केली असून संबंधितांना सात दिवसात खुलासा करण्याची नोटीस पाठवली आहे. अपहारातील दोषींचे काहीही म्हणणे असले, तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात चौकशी अहवाल विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे गोकुळसह सहकार क्षेत्राचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार वैधानिक लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालामध्ये काही त्रुटी अढळल्यास लेखापरीक्षकांना निष्कर्ष नोंदवावे लागतात. गोकुळच्या अहवालामध्ये अपहाराकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे का? याबाबत चौकशी अधिकारी कोणता निष्कर्ष नोंदवतात याकडेही सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

....................

चौकट

अपहार दडपण्याचा प्रयत्न

गोकुळ शाखेत अपहार झाल्यानंतर सुरुवातीस अपहार दडपण्याचा प्रयत्न झाला. एका माजी संचालकांच्या चिंरजीवांचा अपहारांमध्ये समावेश असल्याने अपहाराची रक्कम भरुन यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न झाला. पण तक्रारदारांनी वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी दाखल केल्यानंतर शॉपीचे लेखापरीक्षण करण्यात आले. यामध्ये व्यवस्थापक अमित पवार यांनी दिलेला १८ लाख २० हजारांचा धनादेश वटला नाही. ३२ लाख ४३ हजारांचा शॉपीमध्ये मालच नसल्याचे आणि १२ लाख ८४ हजारांचे दूग्धजन्य पदार्थ विक्रिची रक्कमच भरली नसल्याचे लेखापरीक्षणामध्ये स्पष्ट झाले. याच अहवालाच्या आधारे तक्रारदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामुळे अपहाराची चौकशी सुरू झाली आहे.

........................

कोट

'गोकुळ शॉपीमध्ये अपहार झाल्यानंतर 'पदूम'चे सहायक निबंधक व विभागीय उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली. ‌विभागीय उपनिबंधक यांनी चौकशी अधिकारी नेमला असला, तरी चौकशीला विलंब झाला आहे. अपहाराचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केला असून पोलिसांकडून एफआरआयची प्रत अनेकवेळा मागणी करुनही मिळत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून दोषींना वाचवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

संपतराव पवार-पाटील, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन टोळ्यातील २४ गुंड हद्दपार

$
0
0

दोन टोळ्यांतील २४ गुंड हद्दपार

हातकणंगलेतील जाधव व इचलकरंजीतील दस्तगीर टोळीवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुंडांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील ५४ टोळ्यांवर 'मोक्का'ची कारवाई केल्यानंतर हद्दपारीच्याही कारवाया केल्या जात आहेत. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गेल्या चार दिवसांत २०० गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यात शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड हणमंत जाधव आणि हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड दस्तगीर महालिंगपुरे यांच्या टोळ्यांचा समावेश आहे.

दोन गटांतील संघर्षातून होणारे वाद, खंडणी, खासगी सावकारी यांसह अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी रेकॉर्डवरील गुंडांवर मोक्का आणि हद्दपारीच्या कारवाया करण्याचे आदेश ‌विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. यानुसार परिक्षेत्रातील ५४ टोळ्यांवर 'मोक्का'ची कारवाई केल्यानंतर उर्वरित गुंडांवर हद्दपारीच्या कारवाया करणे सुरू आहे. पोलिस अधीक्षक मोहिते यांनी बुधवारी दोन टोळ्यांतील २४ गुंडांना जिल्ह्यातून सहा महिने ते एक वर्षासाठी हद्दपार केले. यात शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हणमंत निवृत्ती जाधव आणि हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दस्तगीर हसन महालिंगपुरे या गुंडांच्या टोळ्यांचा समावेश आहे.

जाधव टोळीतील हणमंत जाधव याच्यासह संदीप प्रकाश कोरवी (रा. जवाहरनगर, इचलकरंजी), जयसिंग केशव माछरे (खोतवाडी, ता. हातकणंगले), अजय दगडू खामकर (वेताळपेठ, इचलकरंजी), सुरेश तुकाराम रणदिवे (तारदाळ), शशिकांत महादेव जाधव (तारदाळ), विलास बापू सूर्यवंशी (संगमनगर, तारदाळ), सुरेश विठ्ठल बंगाडी (कबनूर), अक्षय अर्जुन भोसले (जवाहरनगर, इचलकरंजी), लाला गुडेलाल कुशवाह (तारदाळ), नूरमहंमद ऊर्फ समीर बाबू मुल्ला (आसरानगर, इचलकरंजी), प्रवीण शंकर कांबळे (जवाहरनगर, इचलकरंजी), सुधाकर बापू हेरवाडे (शहापूर, इचलकरंजी), झाकीरहुसेन आबालाल शेख (हनुमान गल्ली, इचलकरंजी) या १४ जणांवर कारवाई झाली आहे.

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दस्तगीर महालिंगपुरे टोळीतील अजित दामोदर मोरे (रा. कुंभोज), विवेक मुरलीधर लोहार (कोरोची), किरण विश्वास भंडारी (नरंदे), भगवान ज्ञानू शेटे (नरंदे), संदीप बाबासाहेब भेंडगुले (नरंदे), गजानन पुंडलिक काकडे (आळते), राकेश शरद गायकवाड (हातकणंगले), संतोष विष्णू कुपटे (जवाहरनगर, इचलकरंजी) आणि शशिकांत पांडुरंग पाटील (वेताळ चौक, हातकणंगले) या दहा गुंडांवर कारवाई केली आहे. हद्दपारीच्या कारवाईमुळे इचलकरंजी आणि हातकणंगले परिसरातील गुन्हेगारी कृत्यांना आ‌ळा बसेल, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी १२ एप्रिलसाठी

$
0
0

पुस्तक प्रदर्शन : संवाद प्रकाशन व वाचनकट्टातर्फे पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक भवन कलादालन, वेळ : सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.

नेत्ररोग तपासणी : सर्वमंगल सेवासंस्थेतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार, स्थळ : सर्वमंगल सेवासंस्था, शाहूपुरी २ री गल्ली, वेळ : सायंकाळी ५ वा.

व्याख्यान : कसबा बावडा येथील शाहू प्रतिष्ठानतर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, वक्ते : विश्वास नांगरे-पाटील, स्थळ : मातंग वसाहत, कसबा बावडा, वेळ : सायंकाळी ७ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे बदलून देण्याची सुटाची मागणी

$
0
0

'सदोष प्रमाणपत्रे

बदलून द्यावीत'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली सदोष पदवी प्रमाणपत्रे बदलून चांगल्या दर्जाची प्रमाणपत्रे देण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रमाणपत्रांवर कुलसचिव यांची स्वाक्षरी नसल्यामुळे नव्याने छपाई करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवरील मजकूर अस्पष्ट आहे. तसेच कृष्णधवल प्रमाणपत्रांना लॅमिनेशन नसल्यामुळे फेरफार होण्याचा धोका आहे. विद्यापीठ प्रशासन प्रमाणपत्रांसाठी शुल्क घेते. त्यामुळे चांगल्या दर्जाची व सुरक्षित प्रमाणपत्रे देणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे बदलून नव्याने देण्यात यावीत. याबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासमवेत झालेल्या सुटा शिष्टमंडळाच्या बैठकीतही ही मागणी करण्यात आली होती. त्यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिले होते असेही या निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिसांच्या जागेसाठी प्रयत्नशील

$
0
0

'निवृत्त पोलिसांच्या

जागेसाठी प्रयत्नशील'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या कार्यालयासाठी सरकारी जागा मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. गरज भासल्यास खासदार फंडातून मदत देणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या निवृत्त पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते.

तीन दिवस चाललेल्या या शिबिराचा २२७ निवृत्त पोलिसांसह ३४० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. सीपीआर रुग्णालयात ७ ते १० एप्रिलदरम्यान आरोग्य तपासणी शिबिर पार पाडले. खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, योगतज्ज्ञ धनंजय गुंडे, यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. सीपीआरचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, कणेरीमठ रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक, तात्यासाहेब कोरे वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. शैलेश कोरे, अथायू हॉस्पिटलचे जितेंद्र हेगडे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार, डॉ. दिलीप पवार, ॲम्पथी फाउंडेशन मुंबई, रोटरी क्लबचे बोरसादवाला चॅरिटेबल ट्रस्ट, बालरोग डेव्हलपमेंट न्युरोलॉजिस्ट डॉ. दीप्ती चव्हाण, सीपीआर रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारका यांनी आरोग्य शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. असोसिएशनचे अध्यक्ष मदन चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब गवाणी, पंढरीनाथ मांढरे, पद्माकर पाटील, विष्णू शिंदे, फुलचंद चव्हाण, विष्णू कुंभार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कोअर कमिटीच्या सदस्यांनी शिबिराचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातून परिवर्तन यात्रा

$
0
0

कोल्हापुरातून राहुल गांधींच्या

उपस्थितीत परिवर्तन यात्रा

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातून परिवर्तन यात्रेची सुरुवात होणार आहे. पुणे विभागांतर्गत सरकारविरोधात जनजागृती करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा पोहोचेल. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी ही यात्रा यशस्वी ठरून काँग्रेस प्रबळ करेल, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी कोल्हापुरात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 'हल्लाबोल' आंदोलन सुरू झाले. हा त्या पक्षाचा अजेंडा आहे. काँग्रेस देशातील सर्वांधिक मोठा पक्ष आहे. काँग्रेसवर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारला लोक कंटाळले आहेत. त्यांच्या विरोधात उघडपणे बोलू लागले आहेत. सत्ताधाऱ्यांविरोधात लाट निर्माण झाली आहे. सामान्यांच्या विरोधाच्या आवाजाला बळ देण्यासाठी राज्यात 'परिवर्तन यात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात होईल. पुणे विभागांतर्गत ही यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसने कर्जमाफी, संघर्ष यात्रा, आक्रोश मेळावा घेतले. आता तिसरा टप्पा म्हणून ही 'परिवर्तन यात्रा' काढण्यात येणार आहे. यात्रेत सरकारने दिलेली आश्वासने, अजेंडा आणि प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या झालेल्या फसवणुकीचे खरे चित्र प्रत्येक मतदारसंघात उभे केले जाणार आहे. सरकारमध्ये सध्या निर्ढावलेले लोक आहेत. टीका-टिप्पणी करूनही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. 'कसेही' वागले तरी चालते अशी त्यांची भूमिका आहे. सरकारचा 'पोलखोल' करण्यासाठी ही यात्रा होत आहे. राज्यात बदललेल्या वातावरणात निश्चित काँग्रेसला साथ दिली जाणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष युवा असल्याने राज्यभरातील विविध समित्यांमध्ये युवकांना स्थान दिले जात आहे. महत्त्वाच्या पदावर युवकांची नियुक्ती केली जात आहे. दिल्लीपासून ते स्थानिक समितीपर्यंत बदलाची प्रक्रिया सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी २

$
0
0

हातकणंगले

'थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त डिजिटल उभारण्यापेक्षा तरुण पिढीने त्यांना आदर्श मानून त्यांच्या आत्मचरित्रांचे सामूहिक वाचन,व्याख्याने,निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात',असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी केले. पेठवडगाव(ता.हातकणंगले)येथील पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित शिवजयंती व डॉ.आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.

घाटगे पुढे म्हणाले, 'व्हाटस्अप व फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर थोर पुरुषांबद्दल चुकीचे मेसेज फॉरवर्ड केल्यास सायबर गुन्हे दाखल होतील. सायबर क्राईममध्ये आरोपीला जामीन मिळत नाही. ' पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संदीप पाटील,संतोष गाताडे, सचिन चव्हाण व परिसरातील गावांचे सरपंच,उपसरपंच,पोलिस-पाटील, तरुण मंडळांचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. स्वागत मायराम जाधव यांनी केले .

...................

लुबाडणुकीमुळे आंबे

व्यापाऱ्यांत घबराट

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कोकणातून अनेक व्यापारी , मोठे शेतकरी आंब्यांची विक्री करण्यासाठी कोल्हापूरला येत असतात. यावेळी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या आर्थिक उलाढालीचा मागोवा घेऊन दत्तात्रय शामसुंदर पाटणकर (रा. दाभोळे पाटथर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हे आंब्याचे व्यापारी कोल्हापुरात आंबे विक्री करून घरी परत जाताना कोल्‍हापूर - गगनबावडा राज्‍यमार्गावरील सैतवडे भुतलवाडी फाट्याजवळ

वाटेतच चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील आठ लाखांची रोख रक्‍कम लुबाडण्याचा प्रकार नुकताच घडला. या घटनेमुळे आंबे व्यापारी , मोठ्या शेतकरी यांच्यात घबराट पसरली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दत्‍तात्रय पाटणकर हे गेली कित्येक वर्षे आंबे विक्रीचा व्‍यवसाय करतात. आंबे विक्री करण्यासाठी त्यांचे कोल्हापूरला येणे - जाणे असते. त्यानुसार सोमवारी सकाळी ते त्‍यांच्‍या मालकीच्या चारचाकी गाडीमधून ते आंब्‍याच्‍या एक डझनाची एक याप्रमाणे १०० पेट्या घेऊन कोल्‍हापूर येथे विक्रीसाठी आले होते. सोमवारी दुपारी कोल्‍हापूर येथील बसंत बहार रोड, बागल चौक, लक्ष्‍मीपुरी येथील व्‍यापारी व रस्‍त्‍यावरील काही गिऱ्हाईकांना त्‍यांनी आंब्‍याच्‍या पेट्या विकल्‍या. त्यानंतर संभाजीनगर येथील त्‍यांच्‍या ओळखीचे मनीलाल ओसवाल यांनी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास धार्मिक कार्यक्रमासाठी आंब्‍यांची ऑर्डर आहे म्हणून बोलविले. यावेळी पाटणकर यांनी ओसवाल यांच्‍याकडे अॅडव्‍हान्‍स रक्‍कमेची मागणी केली. तेव्हा ओसवाल यांनी अॅडव्‍हान्‍सपोटी संभाजीनगर येथे एकाकडून पाच लाख रुपये रक्‍कम पाठवून दिलेली रोख रक्कम पाटणकर यांनी मोजून खात्री करून ताब्यात घेतली. त्याचबरोबर पाटणकर यांच्‍या ओळखीचे मारुती शिंदे यांनीदेखील आंब्‍याच्‍या अॅडव्‍हान्‍सपोटी मध्‍यवर्ती बसस्‍थानकासमोरील महालक्ष्‍मी चेंबर्सजवळ एका व्यक्तीसोबत येऊन पाटणकर यांना दोन लाख रुपये दिले.

मंगळवारी पाटणकर हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून गावी परतण्यास निघाले. कोल्‍हापूर - गगनबावडा राज्‍यमार्गावरील सैतवडे पैकी भुतलवाडी फाटा येथे साडे दहाच्या सुमारास आले असता रस्‍त्‍याकडेला उभ्‍या असलेल्‍या लोकांनी गाडी थांबविण्‍यासाठी विनंती केली. तिथे असलेल्‍या चारजणांपैकी एकाने पेशंट असून दवाखान्‍यापर्यंत घेऊन जाण्‍याची विनंती केली. दरवाजा उघडून आत बसण्‍याचा इशारा करत असताना दोघांनी पाटणकर यांना पकडून ठेवले. एकाने चाकूचा धाक दाखविला व गाडीत असलेल्‍या पैशांची मागणी केली. उर्वरित एकाने पाठीमागील दरवाजा उघडून बॅगमध्‍ये असणारे आठ लाख रुपये घेऊन ते पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच रुपयांत चपाती भाजी

$
0
0

पाच रुपयांत चपाती-भाजी

उपक्रम शनिवारपासून

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गरीब आणि गरजवंतांची भूक भागविण्यासाठी संवेदना सोशल फाऊंडेशनतर्फे पाच रुपयांत चपाती भाजी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवार (ता.१४) पासून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकालेल्या या उपक्रमामुळे समाजातील गरीब घटकाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे चिकोडे यांनी सांगितले.

शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेजसमोरील विद्या प्रबोधिन येथे चपाती भाजीचे केंद्र सुरु राहणार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे. उपक्रमांतर्गत सामान्य गरजूंसह ऑफीस कर्मचारी, विद्यार्थी, हॉस्पिटल्स येथे चपाती भाजी देण्यात येईल. कोल्हापुरात कामगार वर्ग मोठा असून अल्पदरात त्यांच्या जेवणाची सोय होणार आहे. सोमवार ते शनिवार हा उपक्रम सुरु राहील. रविवारी सुट्टी असणार आहे. दुपारी बारा ते दोन या वेळेत ही सेवा घरपोच दिली जाईल. यासाठी सकाळी आठ ते ११ या वेळेत नोंदणी करावी लागेल. इतक्या स्वस्तात चपाती भाजी मिळणारे हे एकमेव केंद्र असेल, असेही चिकोडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे संशोधन ठरणार समाजोपयोगी

$
0
0

संशोधन ठरणार समाजोपयोगी

विद्यार्थ्यांचे पीएचडी प्रबंधांमधील समाजभान कौतुकास्पद

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर : शिक्षण हे समाजाला दिशा देणारे असावे ही उक्ती सार्थ ठरवणारे उच्चशिक्षणातील संशोधनप्रबंध समाजाला उपयुक्त ठरणारे आशय मांडत आहे. यंदाही शिवाजी विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी निवडलेले विषय समाजासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. प्रबंधांमधील समाजभान कौतुकास्पद तर आहेच, पण संशोधन केवळ पदवीपुरते सीमित न राहता ते समाजातील समस्यांच्या सोडवणुकीचा स्रोत बनले पाहिजे हा विचारही संशोधन तरुणाई अधोरेखित करत आहे.

यावर्षी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात कला, वाणिज्य, शास्त्र या प्रमुख विद्याशाखांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विषयात २३९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. गेल्या काही वर्षांत संशोधनाला सामाजिक संदर्भ असलेल्या विषयांची जोड देण्याकडे कल वाढत आहे. भाषेसंदर्भातील विषयांमध्ये समाजाच्यादृष्टीने प्रत्यक्ष अमलात येईल असे संशोधन करण्यासाठी कमी वाव मिळतो. मात्र हा प्रवाह शास्त्र, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र, पत्रकारिता व गृहविज्ञान यांसारख्या विषयांमध्ये अधिक गतिमान होण्याची संधी असल्याने विद्यार्थ्यांच्या संशोधनात यावर्षी समाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या संशोधनाचा आलेख वाढता आहे.

शिवाजी विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी आरोग्यविषयक समस्या, त्याची कारणे, बदलते राहणीमान, फास्टफूड संस्कृती यावर भाष्य करत आरोग्याशी निगडित संशोधन केले आहे. गृहविज्ञान व फूड टेक्नॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन प्रबंधाकडे वळलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रबंध व त्यामध्ये मांडलेल्या अहवालातील नोंदी निश्चितच उपयुक्त ठरतील अशा आहेत. विद्यापीठातील फूड टेक्नॉलॉजीच्या सिद्धार्थ लोखंडे व इराण्णा उडचण यांनी 'हेल्थ इज वेल्थ' या संकल्पनेवर संशोधन प्रबंध सादर केले आहेत. त्याचा उपयोग व्यक्तिगत व सामाजिक या दोन्ही पैलूंनी प्रत्यक्ष अनुकरणीय ठरणार आहे. तर सरिता कसराळकर या विद्यार्थिनीने गृहविज्ञान विषयातून सादर केलेला प्रबंधही आहार व आरोग्य यांची सांगड घालणारा आहे.

आरोग्याशी निगडित पण आजार व व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या औषधांच्या संशोधनावर जीवरसायनशास्त्रातील संशोधन फायदेशीर ठरणार आहे. या विभागातील तानाजी मोरे याने मधुमेह आजारावर मात करणारे तंत्रज्ञान संशोधनातून मांडले आहे. इन्सुलीन या घटकाने मधुमेहींना दिलासा दिला असला तरी यासारख्या अन्य घटकांपासून मधुमेह नियंत्रित करण्याचे संशोधन केले आहे. गेल्या वर्षभरात या विभागातील दहा विद्यार्थ्यांनी मधुमेह विषयावर केलेले संशोधन वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून उपयुक्त ठरू शकते

पर्यावरणशास्त्र व भूगोल यंदा सादर करण्यात आलेले प्रबंध हे प्रदूषण समस्यांना उत्तर शोधणारे आहेत. यामध्ये पल्लवी भोसले, हेमंत सावंत व जालंधर पाटील यांच्या प्रबंधांमध्ये पर्यावरणावर आक्रमण करणारे घटक व त्यांचा सामाजिक आरोग्यावर होणारा परिणाम या अनुषंगाने मांडलेली निरीक्षणे भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

सामाजिक शास्त्रांमध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांतील संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांना सामाजिक सद्य:स्थितीची जोड आहे, तर गेल्या काही वर्षांत बदललेली आर्थिक समीकरणे हा गाभा ठेवून यंदा अर्थशास्त्र व व्यवस्थापन या विषयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा वित्तीय क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यशास्त्र विषयातील सूर्यकांत गायकवाड याने भाषेचे राजकारण हा विषय लोकशाही, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचूक टिपला आहे.

कोट

लोकांना आता समतोल आहाराचे महत्त्व पटत आहे. फूड अँड टेक्नॉलॉजी या विषयातील संशोधन थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. संशोधनातील निरीक्षणे प्रत्यक्ष जीवनात राबविताना किंवा त्यापासून काही घटक बनविताना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावेत याचाही विचार विद्यार्थी करतात.

डॉ. ए. के. साहू, विभागप्रमुख, फूड अँड टेक्नॉलॉजी

कोट..

सामाजिक शास्त्रातील संशोधन हे एका वेगळ्या अर्थाने उपयुक्त ठरू शकते. राज्यशास्त्रातील विद्यार्थी जेव्हा संशोधन करतात तेव्हा त्याची सैद्धांतिक मांडणी खूप महत्त्वाची असते. त्यातून समाजमनाला दिशा देणे, जाणीवजागृती करणे तसेच मतपरिवर्तन करणे यापातळीवर या संशोधनाची परिणती दिसून येते.

डॉ. भारती पाटील, विभागप्रमुख राज्यशास्त्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटातर्फे गिटारवादन कार्यशाळा

$
0
0

सभासद होण्याच्या चौकटी वापराव्यात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गिटारवादन शिकण्याचे स्वप्न असलेल्यांना सुट्टीत गिटारच्या सुरांशी मैत्री करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्स व पंचम म्युझिक यांच्यावतीने प्राथमिक गिटारवादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत सानेगुरूजी वसाहत येथील पंचम म्युझिकमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेत गिटार वादनाचे प्राथमिक ज्ञान देण्यात येणार आहे. पुस्तकी शिक्षणासोबत एखादी कला शिकावी असे अनेकांना वाटत असते. गिटारवेड्यांना गिटारचे सूर छेडण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. मटा कल्चरक्लब सदस्यांसाठी ७५० रूपये तर अन्य वाचकांसाठी १०५० रूपये शुल्क आहे. नावनोंदणी व अधिक मा हितीसाठी ९८६०१०२७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ दौरा

$
0
0

कृषी राज्यमंत्री खोत

आज जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत गुरुवारी (ता. १२) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी एक वाजता हातकणंगले येथील रघू जानकी सभागृहात खात्यांतर्गत सर्व विभागांची तालुकास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. तेथून ते इस्लामपूरकडे प्रयाण करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सतेज पाटील टॉकटाइम

$
0
0

काँग्रेसकडूनच 'अच्छे दिन'

००००००

'अच्छे दिन'चे दिवास्वप्न दाखवत भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. त्याचा पश्चात्ताप तळागाळातील प्रत्येकाला होत आहे. सरकारने ढीगभर जाहिराती आणि युवावर्गालाही भूलथापा मारून मिळविलेली सत्ता आता डळमळीत होऊ लागली आहे. काँग्रेस सरकारच 'अच्छे दिन' आणू शकते. विधानसभेसह लोकसभेत काँग्रेसचे वर्चस्व असेल. नवनवीन संकल्पना, युवकांना रोजगार, नवे प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकासासह ग्रामीण आणि शहरांचा विकास केवळ 'काँग्रेस'च करू शकते, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज यांनी व्यक्त केला. सचिन यादव यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

००

समाजकारण आणि राजकारण याविषयी काय सांगाल?

माझा नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणावर भर असतो. समाजातील प्रत्येक वर्गासाठी सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. काँग्रेसने स्थापनेपासून तळागाळातील सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. पक्षाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार वाटचाल सुरू आहे. पुष्पहार, आतषबाजीला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना वह्या देऊन वाढदिवस साजरा केला जात आहे. आजअखेर सुमारे विद्यार्थ्यांना ५० लाख वह्यांचे वाटप केले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गरीब विद्यार्थ्यांच्या हाती वह्या पडत आहेत. 'माणुसकीची भिंत' उपक्रमाला करवीरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. कपड्याची गरजू असलेल्यांना हा उपक्रम वरदानच ठरत आहे. कळंबा येथील रजनीगंधा येळापुरे या दृष्टिदोष असलेल्या युवतीला कदमवाडी येथील डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये नोकरी दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिने 'विजया' बँकेत नोकरी मिळविली. एमपीएससी केंद्रातून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सहकारी साखर कारखाना, स्पर्धा परीक्षा केंद्र, वैद्यकीय, इंजिनीअरिंग कॉलेजसह हॉटेल, सहकार आणि बँकिंग क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

००००००००

काँग्रेसचे नवे व्हिजन काय असेल ?

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्ष आहे. महापालिकेत काँग्रेस सत्तेत असून, जिल्हा परिषदेतील सत्ता थोडक्यात गेली. जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणा-या काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. युवकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देण्यात काँग्रेसच अग्रेसर आहे. जिल्ह्यात यूथ काँग्रेस आणि एनएसयूआय प्रबळ करण्यात येणार आहे. सरकारने विद्यार्थी आणि चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात सातत्याने आवाज उठविला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यूथ काँग्रेस आणि एनएसयूआय कार्यरत आहे. कदाचित निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊ शकेल. मात्र, काँग्रेसकडून जिल्हा भक्कम केला जात आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकारसह तरुण पिढीवर काँग्रेसचा अधिक भर राहणार आहे.

०००००

राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल खूश आहात काय?

सरकारने 'अच्छे दिन'चे दिवास्वप्न दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. बँक खात्यावर लाखो रुपये जमा होतील. कोल्हापुरात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक, नवे प्रकल्प उभारण्याचे स्वप्न दाखविले गेले. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. काँग्रेसच्या काळातच चित्रनगरी, शाहू जन्मस्थळाला निधी दिला आहे. थेट पाइपलाइन योजनेला निधी आणून कामे सुरू आहेत. राज्य सरकारने कोल्हापुरातील विकासकामांची केवळ खोटी आश्वासने दिली. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रात ३४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीच गुंतवणूक झालेली नाही. कोल्हापुरात नवा उद्योग आणणार म्हणून लोकप्रिय घोषणा झाल्या. उद्योग, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर राज्यात मंदीचा काळ आणण्यास सरकार अग्रेसर राहिले आहे. भूलथापा मारून आजअखेर सरकारने फसवणूकच सुरू आहे. एकाही युवकाला रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. दहा टक्क्यांच्यावर रोजगाराची आकडेवारी नाही. सरकार विकास, प्रकल्पाच्या मुद्द्यांवर गंभीर नसल्याने जिल्हा प्रशासनाचे कामकाजही तसेच आहे. त्यामुळे कृषी खात्याचा कोट्यवधी रुपयांचा निधी परत गेला आहे. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्याने सरकार निष्क्रिय आहे.

०००००

काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ कसे देणार?

बोलण्यापेक्षा एखाद्या गोष्टीचा अनुभव हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने दाखविलेल्या आमिषामुळे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले. सत्ता गेल्यानंतर या कार्यकर्त्यांना 'पळता भुई' होणार आहे. वाईट काळात काँग्रेस पक्ष सोडून गेलेले कार्यकर्ते आहेत. त्यांना पुन्हा पक्षात घेणे योग्य ठरणार नाही, अशा संधिसाधू कार्यकर्त्यांना पक्षाची दारे बंद असतील. काँग्रेसचा कार्यकर्ता हा सर्वसामान्यांची समस्या, अडचणी सोडविणारा आणि हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता आहे. स्वार्थ, प्रसिद्धी आणि पैशापासून अलिप्त असलेल्या कार्यकर्त्याची फौज काँग्रेसकडे आहे. त्यांच्या सक्षमतेसाठी पक्षाकडून विविध उपक्रम सुरू आहेत. पक्ष भक्कम करण्यासाठी जिल्ह्यात स्वच्छ प्रतिमा असलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची निवड केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना चांगली संधी दिली जाणार आहे.

००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images