Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खासदार शेट्टी देणार पालकमंत्र्यांना इशारा

$
0
0

जि. प. फोटो...

खांदेपालटासाठी मित्रपक्ष सक्रिय

स्वाभिमानी, आवाडे, मिणचेकर गट पालकमंत्र्यांना भेटणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या घडामोडींसाठी मित्र पक्षांतील इच्छुक सदस्य सक्रिय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या गटाच्या सदस्यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. त्या भेटीत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षानंतर उपाध्यक्ष, महिला बालकल्याण, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण सभापती बदलासंबंधी चर्चा झाली. चर्चेत अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाचा तुम्ही निर्णय घ्या, अन्यथा आम्ही ठरल्याप्रमाणे आमच्या सभापतींचे राजीनामे घेऊ, दुसऱ्या इच्छुक सदस्यास संधी देऊ, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगण्याचे ठरले. त्यासाठी खासदार शेट्टी, आवाडे हे मंत्री पाटील यांची लवकरच भेट घेणार आहेत.

सभागृहात काँग्रेस, भाजपचे प्रत्येकी १४, राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे १०, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आवाडे गटाचे प्रत्येकी दोन, ताराराणी आघाडीचे ३, युवक क्रांती दल, शाहू आघाडीचे प्रत्येकी २ असे बलाबल आहे. सत्ता स्थापनेवेळी सव्वा वर्षानंतर खांदेपालट करण्याचा शब्द नेत्यांनी इच्छुकांना दिला. जून महिन्यात सव्वा वर्ष संपणार आहे. अजून दोन महिने असले तरी इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या अध्यक्षपद भाजपकडे आहे. दरम्यान, खांदेपालट करताना सर्वच पदाधिकारी बदल झाल्यास निवडीची प्रक्रिया सोपी होते.

काठावरचे बहुमत असल्याने अध्यक्ष बदलाचे धाडस पालकमंत्री चंद्रकांत पाटील करणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, अध्यक्षपदाचा निर्णय भाजप काय घ्यायचा घेऊ दे, आमच्यामध्ये तरी खांदेपालट करू, या निर्णयापर्यंत मित्रपक्ष आले आहेत. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. सोमवारी खासदार शेट्टी यांची शासकीय विश्रामगृहात इच्छुक सदस्यांनी भेट घेतली. त्यावेळी खांदेपालटासंबंधी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याशी चर्चा झाली. चर्चेत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षानंतर स्वाभिमानीकडे असलेले महिला बालकल्याण सभापतिपद आवाडे गटास देण्यास खासदार शेट्टी यांनी मान्यता दिली. उपाध्यक्षपदासाठी आमदार मिणचेकर गटाचे सदस्य यादव इच्छुक आहेत. यामुळे खासदार शेट्टी यांनी आमदार मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी मोबाइलवरून चर्चा केली. त्यासाठी खासदार शेट्टी, आवाडे हे पालकमंत्री पाटील यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांत जनसुराज्य पक्षातील इच्छुक सदस्य विनय कोरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पुढील हालचालींना गती येणार आहे.

--------------------

इच्छुक कोण?

अध्यक्ष : अरुण इंगवले

उपाध्यक्ष : शिवसेनेचे प्रवीणसिंह यादव (आमदार डॉ. सुजित मिणचेकर गट)

बांधकाम : जनसुराज्यचे शंकर पाटील

समाजकल्याण : जनसुराज्यच्या पुष्पा आळतेकर

महिला व बालकल्याण : वंदना मगदूम (आवाडे गट)

शिक्षण : शिवसेनेचे हंबीरराव पाटील (आमदार सत्यजित पाटील गट)

---------------------------------

कोट

महिला व बालकल्याण सभापतीसह इतर सभापती बदलासंबंधी चर्चा झाली. चर्चेत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षानंतर आमच्याकडील महिला, बालकल्याण सभापतिपद आवाडे गटास देण्यास तयार आहोत. अध्यक्षपदासह इतर पदाधिकारी बदलासंबंधी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. भेटीत तुम्ही अध्यक्षपदाचा निर्णय घ्या, अन्यथा आम्ही तरी आमच्या सभापतींचे खांदेपालट करू, असे सांगणार आहे.

राजू शेट्टी, खासदार

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिळवणीत ‘ग्रामस्वराज्य’

$
0
0

कोल्हापूर : केंद्र सरकारच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियान राबवण्यात येणार असून जिल्ह्यातील तिळवणी (ता. हातकणंगले) गावची निवड झाली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय सचिवांनी व्हिडोओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी या अभियानास प्रारंभ होणार आहे. १८ एप्रिल रोजी स्वच्छता अभियाना अंतर्गत हागणदारी मुक्त गाव या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. २० एप्रिल रोजी उज्वल योजनेअंतर्गत गरीब महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले जाणार आहे. २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिवस तर २८ एप्रिल राजी ग्राम शक्ती अभियान राबवण्यात येणार आहे. ३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत अभियान राबवण्यात येणार आहे. दोन मे रोजी किसान कल्याण कार्यशाळा तर पाच मे रोजी कौशल्य विकास अभियााचे आयोजन केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे तिळवणी गावाला भेट देणार असून हे अभियान राबवण्यासाठी बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राचे उत्पादकांना प्रतिटन ५५ रुपये थेट अनुदान

$
0
0

उत्पादकांना ५५ रुपये अनुदान

यंदाच्या गळीत हंगामातील प्रतिटन उसासाठी केद्राचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने घेतला. कृषीमूल्य आयोगाने निश्चित केलेल्या एफआरपीनुसार उत्पादकांच्या थेट बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असून साखर कारखान्यांचाही थोडा भार कमी होणार आहे.

चालू गळीत हंगामात सुमारे ५३ लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर उत्पादन झाले आहे. अतिरिक्त उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशातंर्गत बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे साखरेला सरासरी तीन हजार रुपये प्रितक्विंटल दर मिळत आहे. यामधून जीएसटी, वाहतूक व कमिशन वजा जाता २,७०० रुपयापर्यंत दर मिळत असल्याने निश्चित केलेली एफआरपी कशी द्यायची, असा प्रश्न कारखान्यांसमोर निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तर २,१०० रुपये दर असल्याने निर्यातीवरही मर्यादा येत आहेत. केंद्र सरकारने राज्यासह साखर कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा निश्चित करून दिला होता. आंतरराष्ट्रीय बाजार गेल्या अडीच वर्षातील सर्वात निच्चांकी दर असल्याने दरातील तफावत कमी करण्यासाठी राष्ट्रीय साखर संघाने निर्यात अनुदान देण्यासह बफर स्टॉक करण्याची मागणी केली होती.

एकीकडे साखर आयुक्त कार्यालयाकडून थकीत एफआरपीप्रश्नी कारवाई सुरू असताना केंद्र व राज्य पातळीवर निर्णय होत नसल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी अधिकच वाढल्या होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी केंद्र सरकारने थेट उत्पादकांना प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे उत्पादकांना दिलासा दिला आहे. तर या निर्णयामुळे कारखान्यावरील एफआरपीचा थोडा भार कमी होणार आहे.

साखर मूल्यांकनात पुन्हा घट

राज्य सहकारी बँकेने गेल्या आठवड्यात साखरेचे मूल्यांकन १८० रुपयांनी कमी होते. त्यानंतर पुन्हा मंगळावारी १२० रुपये घट करुन प्रतिक्विंटल २,८०० रुपये मूल्यांकन केले आहे. निर्णयामुळे कारखान्यांना ८५ टक्क्याप्रमाणे २,३८० रुपये मिळणार आहेत. यामधून ७५० रुपये प्रक्रिया खर्च वजा जाता केवळ १,६३० रुपये शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे उत्पादकांची एफआरपी कशी द्यायची, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

साखर खरेदी प्रस्तावच नाही

आंतरराष्ट्रीय व देशातंर्गत बाजारपेठेत कमी झालेल्या साखर दरांमुळे सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांनी कारखान्यांकडून साखर खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दीड महिन्यापूर्वी घेतलेल्या निर्णयावर अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्य सरकारने अनुदानासह साखर खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सहकार मंत्री देशमुख यांनी साखर खरेदीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचे जाहीर केले होते. पण मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत साखर खरेदीचा विषयच आला नाही. त्यामुळे साखर उद्योगांसमोरील अडचणी वाढल्या असून सरकार २५ टक्के साठा कधी करणार याकडे कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

साखर दर आणि राज्य बँकेने मूल्यांकन कमी केल्याने एफआरपीमध्ये ३०० ते ३५० रुपयांचा फरक निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेली तरतूद अत्यंत अल्प आहे. साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी बफर स्टॉक करून तीन हजारपर्यंत साखरेचे दर स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढील हंगामामध्ये यापेक्षा भयावह स्थिती निर्माण होईल.

राजेंद्र पाटील-यड्रावकर, अध्यक्ष, शरद कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांना तूर्त अभय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. तोपर्यंत या बांधकामांवर कोणतीही कारवाई करु नये, असा स्पष्ट आदेश मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महापालिकेला देण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ही जागा सरकारची, खासगी, ग्रामपंचायतीची की महापालिकेची आहे, याचा अभ्यास सरकार पुन्हा करणार असल्याने कारवाई करु नये, असे यावेळी सांगण्यात आले. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची यासाठी अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अतिक्रमणांवरील कारवाई रोखण्याचे आदेश दिल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 'तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांना एक आणि शहरातील अन्य अतिक्रमणांना दुसरा न्याय' असा भेदाभेद का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तावडे हॉटेल ते निगडेवाडी जकात नाक्यापर्यंतची जागा महापालिकेची असल्याचा निकाल हायकोर्टाने दिला होता. राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालाच्या आधारेच हा निर्णय घेतला होता. हायकोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची तयारी केली होती. पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने थांबलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. बैठकीला पालकमंत्री पाटील, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी सरकारच्यावतीने सादर केलेले प्रतिज्ञापत्र, जागेची मालकी, जागेवरील आरक्षणे, जागा किती आहे याची सविस्तर माहिती सादर केली. जागेची मालकी ठरवणारी कागदपत्रेही सादर केली. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी हा प्रश्न नगरविकास विभाग व महसूल विभाग या दोन्हींच्या अखत्यारित आहे. त्यामुळे प्रथम ही जागा नेमकी कुणाची आहे याचा सरकारला पुन्हा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी महापालिकेचीही पुन्हा बाजू ऐकून घेऊ. या वादग्रस्त जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अनुषंगाने सरकार निर्णय घेणार आहे. हा निर्णय होईपर्यंत महापालिकेने बांधकामांवर कारवाई करु नये, असे स्पष्ट केले. त्याबाबतचे लेखी पत्र लवकरच पाठवण्यात येईल, असेही सांगितले.

बैठकीतील या निर्णयामुळे महापालिकेला तावडे हॉटेल परिसरातील बांधकामासंदर्भात तसेच इतर नियमावलीनुसारही कोणती कारवाई करता येणार नाही. परिणामी सरकार जे निर्णय घेईल त्याप्रमाणेच महापालिकेला वाटचाल करावी लागेल, असेच दिसते.

....

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने आरक्षित केलेल्या जागांवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पुन्हा कोर्ट प्रकरणे होण्याची शक्यता असल्याने लवकर तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. सरकारला या प्रकरणात कोर्ट प्रकरणे व्हावीत, अशी अपेक्षा असावी, असा संशय येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फस्ट फ्लाइट हाउसफुल्ल - कोल्हापूर -मुंबई विमानसेवा

$
0
0

पहिले विमान हाउसफुल्ल

कोल्हापूर- मुंबई विमानाच्या १८ जागांचे बुकिंग; २२ ला झेपावणार विमान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर एअर डेक्कन कंपनीकडून सुरू होत असलेल्या पहिल्या विमान प्रवासाचे १८ सीटर विमान हाउसफुल्ल झाले आहे. उडान योजनेतून ९ आणि जनरलमधून ९ सीटचे बुकिंग झाले. २२ एप्रिलला (रविवारी) कोल्हापूरहून दुपारी तीन वाजता (KLH-BOM) विमान मुंबईकडे झेपावणार आहे. विमान कंपनीने २० एप्रिल ते २७ ऑक्टोबर पर्यंतचे शेड्युल जाहीर केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी गो-इंडिगो कंपनीकडून कर्मचारी भरतीसाठी एका खासगी हॉटेलमध्ये मंगळवारी मुलाखती झाल्या.

केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेतंर्गत प्रादेशिक हवाई जोड योजनेतून कोल्हापूरची विमानसेवा २२ एप्रिल पासून सुरू होत आहे. विमानसेवा सुरू होण्याची घोषणा झाल्यानंतर एअर डेक्कनकडून ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याची संधी घेत चारच दिवसांत याला प्रतिसाद मिळाल्याने बुकिंग फुल्ल झाली आहे. आठवड्यातून दर रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीन दिवस सेवा दिली जाणार आहे. उडान योजनेतून पहिल्या ९ सीटसाठी १९७० रुपये आणि उर्वरित सीटसाठी ३७४९ रुपये तिकीटदर आहे.पहिल्या सेवेचा प्रारंभ रविवारी होत आहे. फ्लाइट क्रमांक डीएन ( ६९४) हे विमान दुपारी तीन वाजता मुंबईकडे झेपावणार आहे. मुंबई ते कोल्हापूर मार्गावर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी 'टेक ऑफ' केलेले विमान कोल्हापुरात २ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. एअर डेक्कनने मुंबई शेड्युलमध्ये नाशिक (ओझर), पुणे,जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर ही विमानसेवा सुरू केली आहे. २० एप्रिल ते २७ ऑक्टोबरपर्यंत शेड्युल जाहीर केले आहे. यात फ्लाइट क्रमांक, शहर, टेक ऑफ आणि लँण्डिंगची वेळ, आठवड्यातून दिली जाणार सेवा दिली जाणार आहे. विमानसेवा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विमातळावरही भक्कम सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. कंपनीचे अधिकाऱ्यांनी प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

००

गो- इंडिगोकडून मुलाखती

दुसऱ्या टप्प्यातील विमानसेवा जूनअखेर कोल्हापूर विमानतळावरून सुरू होत आहे. या टप्प्यात गो-इंडिगो कडून कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती ही सेवा दिली जाणार आहे. या मार्गाला हवाई मान्यता मिळाली आहे. एलायन्स एअर या विमान कंपनीकडून कोल्हापूर- बेंगळुरू ही विमानसेवा सुरू होणार आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून एका खासगी हॉटेलमध्ये इंडिगो कंपनीकडून मुलाखती घेण्यात आल्या. 'स्टेशन ड्युटी मॅनेजर' पदासाठी सहा ते सात उमेदवारांनी मुलाखत दिली. एअर होस्टेस, काउंटर स्टाफ या पदासाठी या आठवड्यात मुलाखती घेण्यात येणार आहेत.

००

संभाजीराजेंनी मानले 'एअर डेक्कन'चे आभार

कोल्हापुरची रखडलेली विमानसेवा सुरू केलेबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 'एअर डेक्कन' चे मालक कॅप्टन गोपीनाथ यांची भेट घेऊन आभार मानले. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'एअर डेक्कन कंपनीने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची अट घातली होती. मात्र ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सोयीच्या वेळीच सुरू करावी,' अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने मांडली. केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर विमानसेवाप्रश्नी निवेदन दिले होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडाळा अपघात : आरटीओ अहवाल

$
0
0

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या रस्त्यावर उतार आणि वळण असून अपघातग्रस्त वाहनाचा शाफ्ट तुटल्याने जमिनीत घुसल्याची शक्यता आहे. या प्रकरणी दोन दिवसांत तपासणी अहवाल दिला जाणार असल्याचे सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. धायगुडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी घरटे बनवा....सुधारीत

$
0
0

चला, बनवूया

पक्ष्यांसाठी घरटी

मटा कल्चर क्लबतर्फे शनिवारी कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सच्या 'पक्षी वाचवूया' या मोहिमेंतर्गत पक्षीप्रेमींना अंगणात येणाऱ्या पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याचा आनंद मिळणार आहे. पर्यावरणावर होत असलेल्या मानवी आक्रमणामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या अंगणात येणाऱ्या पक्ष्यांसाठी घरटे बनवून त्यांना निवारा देण्यासाठी ही कार्यशाळा होणार आहे.

कार्यशाळा १४ एप्रिल रोजी कलर १४ आर्ट गॅलरीतर्फे राजारामपुरी येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. घरटे बनविण्यासाठी आवश्यक असलेली नारळाची करवंटी शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी आणावयाची आहे.

सध्या पर्यावरणाची हानी होत आहे. निसर्गातील अनेक गोष्टी सिमेंटच्या जंगलात हरवत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत पक्ष्यांचे अधिवास टिकवून ठेवण्यासाठी निसर्गप्रेमी अनेक उपक्रम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने 'पक्षी वाचवूया' मोहीम राबविण्यात येत आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकण्याचा आनंद आजच्या पिढीला मिळवायचा असेल तर घराभोवती पक्ष्यांचा वावर वाढवला पाहिजे. चिमण्यांनी आपल्या अंगणात यावे असे अनेकांना वाटते. त्यासाठी नैसर्गिक घरटे तयार करण्याचे प्रशिक्षण या शिबिरात देण्यात येणार आहे. नारळाच्या करवंटीचा वापर करून घरटे बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. नारळाची करवंटी नैसर्गिकरीत्या घरट्याची अनुभूती पक्ष्यांना देऊ शकते. त्यामुळे करवंटीपासून तयार होणारे घरटे अंगणात किंवा गच्चीत लावल्यास चिमण्यांना निवारा मिळेल या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे.

कार्यशाळेसाठी कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर अन्य वाचकांसाठी ३०० रुपये शुल्क आहे. नावनोंदणीसाठी ९९२२००८१६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचे आमिष दाखवून १ कोटी ४ लाखांची फसवणूक

$
0
0

कर्जाच्या आमिषाने कोटीची फसवणूक

आठ जणांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची एक कोटी चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत मदन अण्णासाहेब मिरजकर (रा. राजारामपुरी, आठवी गल्ली) यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात सिंगापुरातील मिलेनियर फायनान्स कंपनीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मरीन (मुख्य फायनान्स अधिकारी), अल अमीन, एस राजन, जी सुब्रम्हण्यम, अल रहमान, श्रीनिवास मूर्ती अय्या, बालचंद्र बाला आणि साळुंखे (पूर्ण नाव माहीत नाही) या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मदन मिरजकर यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. सिंगापूर येथील मिलेनियर फायनान्स ग्रुपकडून कमी व्याजदरात कर्ज मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली. खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मिळवून देणाऱ्या काही व्यक्तींशी त्यांचा संपर्क झाला. साळुंखे नावाच्या व्यक्तीने सिंगापुरातील मिलेनियर ग्रुपमधून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. १६ मे, २०१७ ते २१ नोव्हेंबर, २०१७ या कालावधीत मिरजकर यांच्या नावे एक कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यात आला. यानंतर तो डिमांड ड्राफ्ट रद्द करून मिरजकर यांच्याकडून एक कोटी चार लाख रुपये उकळले. पैसे घेऊनही कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत मिरजकर यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत धाव घेऊन तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सिंगापुरातील मिलेनियर फायनान्स कंपनीचे मुख्य फायनान्स अधिकारी मरीन यांच्यासह अल अमीन, एस राजन, जी सुब्रम्हण्यम, अल रहमान, श्रीनिवास मूर्ती अय्या, बालचंद्र बाला आणि साळुंखे यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या फसवणुकीचा अधिक तपास सुरू आहे. गुन्ह्याची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेच्या घातपाताची तक्रार

$
0
0

विवाहितेच्या घातपाताची तक्रार

पोलिस अधीक्षकांकडे दिले तक्रारीचे निवेदन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारंवार हुंड्यासाठी छळ करत बहिणेला मारहाण करणाऱ्या तिच्या पतीसह इतर नातेवाइकांनी मिळून घातपात केला आहे, अशी तक्रार गंगाराम शामराव शिंदे (वय २२, रा. खोची, ता. हातकणंगले) या तरुणाने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. शिंदे याची बहीण संगीता सुरेश पटकारे हिचा एकोंडी (ता. कागल) येथे ८ एप्रिलला विहिरीत मृतदेह सापडला होता. बहिणीने आत्महत्या केली नसून, तिचा घातपात झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली आहे. 'सासरच्या लोकांनी बहिणीचा छळ केला. तिचे पती सुरेश पटकारे यांनी प्लॉट खरेदीसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तेवढी ऐपत नसल्याने एक लाख रुपये कर्ज काढून दिले. या पैशांचे व्याज देण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा बहिणीला अधिकच त्रास दिला. त्यानंतर सात एप्रिलला बहीण घरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत मृतदेह आढळला, मात्र तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या. याबाबत योग्य तपास करावा,' अशी मागणी शिंदे याने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांना तूर्त अभय

$
0
0

दुटप्पी धोरणावर शिक्कामोर्तब

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांना सरकारचेच अभय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्याचे महापालिकेला आदेश देत सरकारने अतिक्रमणांना अभय दिले. या प्रकरणात पूर्वी सरकारने अभ्यास करुन हायकोर्टात अहवाल सादर केला होता. त्यामुळे पुन्हा अभ्यास करण्याचा प्रकार म्हणजे एकप्रकारे अतिक्रमणांना संरक्षण द्यायचेच असे सरकारने ठरवल्याचे स्पष्ट होत आहे. स्मार्ट शहराचा गाजावाजा करणाऱ्या भाजप सरकारच्या या भूमिकेमुळे केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर राज्यातील अन्य अतिक्रमणांबाबतच्या दुटप्पी धोरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शहरांना स्मार्ट करण्याचे धोरण अवलंबलेल्या या सरकारने अनधिकृत बांधकामांबाबत मात्र बोटचेपी भूमिका घेतली आहे. एकीकडे शहर स्मार्ट करायची आहेत, असे सांगायचे व दुसरीकडे ज्या बांधकामांमुळे शहरे बकाल झाली, त्यांना कायम करण्याचा निर्णय घ्यायचा अशी विसंगत भूमिका घेतली जात आहे. कोल्हापूर ड वर्ग महापालिका आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून हद्दवाढ झाली नसल्याने महापालिकेकडून सातत्याने हद्दवाढीची मागणी केली जात होती. या सरकारकडेही हद्दवाढीची मागणी केली होती. पण ती मागणी मान्य न करता प्राधिकरण स्थापन करण्याचा मार्ग अवलंबला. त्याचा महापालिकेला, शहरवासियांना काय फायदा होणार आहे, हे अजून गुलदस्त्यात आहे. महापालिकेची हद्दवाढ झाली नसल्याने विविध सुविधांसाठी जागा उपलब्ध नाहीत. कचरा टाकण्याच्या जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याने महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण सरकारने या आशेवरही पाणी फिरवले आहे.

चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना शहरवासियांबरोबर जिल्ह्यातील अन्य नागरिकांचाही विचार करावा लागतो. पण पालकमंत्र्यांनी एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. दक्षिण मतदार संघाचे आमदार अमल महाडिक हे भाजपचे असल्याने तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांवर कारवाई होऊ नये, हाच दृष्टिकोण ठेवून पालकमंत्र्यांनी महापालिकेला कारवाई करू नये, असे आदेश दिले. कायद्याचे राज्य असल्याचे सांगत असलेल्या पालकमंत्र्यांना या प्रकरणात मात्र कायदा कुठे आहे? असा प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळात निवडणूक होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतांवर डोळा ठेवत अतिक्रमणांना सरकारने अभय दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजप सरकार अतिक्रमणांना थेट संरक्षण देण्याची भूमिका घेत असताना विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी मात्र अजूनही शांत आहे. यामुळे काँग्रेस आघाडीलाही अतिक्रमणांवर कारवाई होऊ नये, महापालिकेला हक्काची जागा मिळू नये, असेच वाटत आहे का? हा प्रश्न शहरवासियांना भेडसावत आहे. सामान्य नागरिकांनी रस्त्यावर केलेली छोटी अतिक्रमणे चालत नाहीत. पण धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणाला सरकारने अभय दिल्याने कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचे धिंडवडेच सरकारने काढले आहेत.

'मटा'मध्ये सर्वप्रथम वृत्त

कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाई करण्याची तयारी केली. पण त्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळू नये, याची करण्यात आलेली व्यवस्था तसेच सरकारच्या पातळीवर बोलविलेली बैठक पाहता 'बैठकांमध्ये गुंडाळली जाणार कारवाई' हे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स' ने सर्वप्रथम दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारने या अतिक्रमणांना अभय देत महापालिकेची यापुढील कारवाई गुंडाळली जाणार हेच स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

तोडफोड प्रकरणी गुन्हा

कोल्हापूर: दुचाकीवरून जाताना धक्का लागल्याच्या कारणावरून पाडळकर कॉलनीत दुचाकींची तोडफोड करणारा जुनैद मुजावर (रा. सिरत मोहल्ला, जवाहरनगर) याच्यासह आठ ते दहा अनोळखी संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (ता. ९) रात्री साडेसातच्या सुमारास तोडफोडीचा प्रकार घडला होता. सचिन संभाजीराव पाडळकर (वय ३९, रा. पाडळकर कॉलनी, हॉकी स्टेडियमजवळ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पाडळकर कॉलनीतील रितेश पाथरुट याच्याशी झालेला वाद सोडवल्याचा राग मनात धरून मुजावर आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याचा संशय फिर्यादी पाडळकर यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅट दाखवण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

$
0
0

महिलेवर बलात्कार

कोल्हापूर: फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने उदय मनोहर पोवार (रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर) याने बलात्कार केल्याची फिर्याद महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत पोवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पती आणि पोवार यांची तोंडओळख आहे. या ओळखीतून पोवार याचे पीडित महिलेच्या घरी जाणे-येणे होते. नवीन फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने महिलेस कदमवाडी येथील फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याशिवाय पोवार याने पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन फसवणूक केली, असा उल्लेख पीडित महिलेने फिर्यादीत केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतराव चौगुले पतसंस्थेला तीन कोटीचा नफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेला २०१७-१८ वर्षात तीन कोटी सात लाखांचा निव्वळ नफा झाला. बाजारातील मंदी, गुंतवणुकीवरील व्याजातील कपात व कर्जमागणीमध्ये शिथिलता असूनही पतसंस्थेने नफ्यातील सातत्य राखले आहे. पतसंस्थेकडे १५३ कोटीच्या ठेवी असून शंभर कोटीचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेच्या सर्व १६ शाखा स्वमालकीच्या जागेत कोअर बँकिंग प्रणालीयुक्त, आरटीजीएस, एनइएफटी, वेस्टर्ण मनी ट्रान्सफर, करन्सी एक्सचेंज यासह सर्व शाखांमध्ये विज बिल भरणा केंद्र आदी सुविधी दिल्या जात आहेत. पतसंस्थेने ग्राहकांना अधिकाधिक सुविधा दिल्या असल्याने नफ्यामध्ये सातत्य राखले असल्याचे प्रसिद्ध पत्रक चेअरमन अनिल पाटील यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून हॅपीनेस प्रोग्रॅम

$
0
0

सोमवारपासून हॅपीनेस प्रोग्रॅम

कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत संपूर्ण राज्यात 'अतुल्य महाराष्ट्र' या हॅपीनेस प्रोग्रॅमचे आयोजन १६ ते २२ एप्रिल दरम्यान केले आहे. योग, श्वासाचे व्यायाम, ध्यान आदींचे मार्गदर्शन कोल्हापूर विकास केंद्रामार्फत मिळणार आहे. या कालावधीत सकाळी व सायंकाळी ६ ते ९ वेळेत विद्याभवन हॉल, शिवाजी पार्क विक्रम हायस्कूल येथे शिबिर होणार आहे. तणावमुक्त, उत्साही मन, नकारात्मक भावनेतून मुक्तता, रागावर नियंत्रण, एकाग्रता आदीचे फायदे शिबिरातून मिळणार आहेत. शिबिरात प्रशिक्षिका डॉ. अनिमा दहिभाते मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भालजी पेंढारकर केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे १८ एप्रिल ते ४ मे या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती केंद्र संचालिका अनघा पेंढारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेंढारकर म्हणाल्या की, गेल्या १४ वर्षांपासून कलाविषयक प्रशिक्षण देणारे शिबिर केंद्रातर्फे आयोजित केले जाते. यंदा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे तीन गट करण्यात आले आहेत. यामध्ये नाट्य, क्ले वर्क, कथाकथन, चित्रकला, डान्स, खेळ, हस्तकला, अक्षर सुलेखन शिकवण्यात येणार आहे. शिबिराचा सांगता समारंभ विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी होणार आहे. पालकांसाठीही शिबिरात प्रशिक्षणवर्ग होणार आहेत. यामध्ये १९ ते २१ एप्रिल या कालावधीत दुपारी ३ ते ५ यावेळेत वारली पेंटिंग, २३ रोजी दुपारी ३ वाजता पेपरबॅग्ज तर २४ ते २६ रोजी दुपारी ३ वाजता टेराकोटा ज्वेलरी शिकवण्यात येणार आहे. प्रवेशासाठी केंद्र संचालक उमेश बुधले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

पत्रकार परिषदेला श्रीकांत डिग्रजकर, सुषमा गजबर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्युनिअरचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १७ एप्रिलला अर्थमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले. राज्य सरकारकडून आश्वासनांचे पालन होत नसल्याने या शिक्षकांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश निघेपर्यंत बारावीच्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सुमारे ८० लाख उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच पडून होत्या. आंदोलन स्थगित झाल्यामुळे जिल्ह्यातील साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागण्याचा मार्ग खुला झाला आहे. मंगळवारपासून निकाल पत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष अविनाश तळेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणीच्या नोटीस

$
0
0

पिरजादे, चव्हाण यांना

सुनावणीच्या नोटिसा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मतदान करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांना मंगळवारी अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणीच्या नोटिसा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बजावल्या आहेत. १७ एप्रिल रोजी पहिली सुनावणी होणार असून त्यामध्ये लेखी वा तोंडी म्हणणे सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पिरजादे व चव्हाण यांनी पक्षाच्या उमेदवार मेघा पाटील यांच्याविरोधात मतदान केले. त्यामुळे भाजपचे उमेदवार विजयी झाले. पक्षाचा आदेश असताना त्याविरोधात मतदान केल्याबद्दल या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सादर केला जात असताना या दोघांनी पक्षाच्या विरोधात केलेल्या मतदानाची सर्व कागदपत्रे, चित्रीकरण, छायाचित्रे सादर केली होती. त्यामुळे या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सादर केलेल्या अपात्रतेच्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्तांनी मंगळवारी या दोन नगरसेवकांना सुनावणीला उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावल्या. १७ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीवेळी लेखी वा तोंडी म्हणणे सादर केले नाही तर आपल्याला काही म्हणणे मांडायचे नाही असे समजून एकतर्फी निकाल दिला जाऊ शकतो, अशा आशयाची नोटीस आहे. त्यामुळे ११ वाजता होणाऱ्या सुनावणीस दोन्ही नगरसेवकांना उपस्थित राहणे आवश्यक झाले आहे. सुनावणीच्या नोटीसमुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील २१ लॉजचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव

$
0
0

२१ लॉजचे परवाने रद्दचा प्रस्ताव

पोलिस अधीक्षकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील अनेक लॉज आणि यात्री निवासांमध्ये कुटंणखाने सुरू आहेत. अवैध व्यवसाय चालवणारे जिल्ह्यातील २१ लॉज आणि यात्री निवासचे परवाने कायमस्वरुपी बंद करावेत, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. येत्या महिन्याभरात ही कारवाई होणार आहे. शहरासह इचलकरंजी आणि जयसिंगपूरमधील लॉजचा यात समावेश आहे. याशिवाय अवैध धंद्यांना थारा मिळू नये, यासाठी पोलिसांनी लॉजमालकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

पन्हाळा, कोडोली परिसरातील लॉजमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा वावर वाढल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वच लॉजची तपासणी करण्याचे काम सुरू केले. जिल्ह्यातील २५० हून अधिक लॉजपैकी २१ लॉजमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लॉजमालकांना वारंवार नोटिसा देऊनही अवैध धंदे बंद झालेले नाहीत, यामुळे २१ लॉजचे परवाने कायमस्वरुपी बंद करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मोहिते यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे पाठवला आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून या कारवाईला परवानगी मिळेल. यानंतर संबंधित २१ लॉज सील केले जातील, असे अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.

कारवाई होणाऱ्या लॉजमध्ये सर्वाधिक लॉज शहरासह करवीर तालुक्यातील आहेत. याशिवाय इचलकरंजी आणि जयसिंगपूरमधील लॉजचाही समावेश आहे. कारवाई टाळण्यासाठी अवैध धंदे पुन्हा सुरू होणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्रही लिहून देण्याची तयारी लॉजमालकांनी दर्शवली आहे. 'लॉज सील करण्याच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील सर्वच लॉजमालकांना धडा मिळेल. अवैध धंद्यांना थारा मिळू नये, यासाठी सर्व लॉजमालकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतरही लॉजमध्ये अवैध धंदे सुरू राहिल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,' असा इशारा अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला आहे.

चौकट...

लॉज बनलेत कुंटणखाने

आडवाटेच्या लॉजसह शहरातील गर्दीच्या ठिकाणीही लॉजमध्ये कुंटणखाने तयार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरीतील किरण लॉजवर कारवाई केली. याशिवाय कोल्हापूर-सांगली मार्गालगत बहुतांश लॉजमध्ये अवैध धंदे चालतात. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर लॉजची संख्या वाढली आहे. यात तरुणांची गर्दी अधिक असते. या ठिकाणच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी तपासणी केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर कचरा नेऊन टाकणार

$
0
0

महापालिका लाोगो

.........

.. तर अतिक्रमित जागेवर कचरा टाकू

तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित जागेबाबत महापौरांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तावडे हॉटेल परिसरातील कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत. अन्यथा कसबा बावडा येथील प्रक्रिया प्रकल्पावर साठलेला कचरा त्या जागेवर टाकण्यात येईल', असा इशारा महापौर स्वाती यवलुजे यांनी बुधवारी दिला. तर 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत मध्यस्थी करुन 'श्रीमंत कोल्हापूर' करण्याऐवजी 'श्रीमंतांचे कोल्हापूर' करण्याचा आटापिटा चालवला असून ही लाजिरवाणी गोष्ट आहे', अशी टीका काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली.

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महापालिकेला देण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या या आदेशामुळे सरकारला तावडे हॉटेल येथील अनधिकृत बांधकामांना संरक्षण द्यायचे आहे हेच स्पष्ट झाले. त्यामुळे शहरवासियांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बुधवारी महापौर यवलुजे व काँग्रेसचे गटनेते देशमुख यांनी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत सरकारच्या धोरणांवर व पालकमंत्र्यांवर सडकून टीका केली.

महापौर यवलुजे म्हणाल्या, 'महापालिकेकडे कचरा टाकण्यासाठी जागा नाही. कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांना भयंकर त्रास सहन करत आहेत. अशावेळी तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा निकाल दिल्यानंतर महापालिकेला जागा ताब्यात घेण्यास मदत करण्याऐवजी सरकारने कारवाई थांबवली. कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने हटवली नाहीत तर कसबा बावड्यात साठलेला कचरा त्या आरक्षित जागेवर टाकण्यात येईल. कचऱ्याचा त्रास काय असतो हे दाखवून दिले जाईल.'

शारंगधर देशमुख म्हणाले, 'शहरातील जे नागरिक महापालिकेचा कर भरतात त्यांच्या पोटावर महापालिका प्रशासन उठले. त्यांची अतिक्रमणे काढण्यात आली. पण गांधीनगर परिसरात ज्या धनदांडग्यांनी कोणतेही नियम न पाळता बांधकामे केली, त्यांना संरक्षण देण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांचा उद्देश समजून आला नाही. कचऱ्याच्या जागेसाठी महापालिका अनेक कोर्टात हेलपाटे मारत आहे. शहरातील नागरिकांवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली जात असताना या दोघांना काही वाटले नाही. पण गांधीनगरमधील लोकांवर कारवाई होत असताना त्यांना वाचवण्याची का धडपड सुरु आहे? गांधीनगर परिसरातील बांधकामांचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग बंद करावा. गरीबांवर उचललेला अतिक्रमणाचा हातोडा आयुक्तांना थांबवावा लागेल. अन्यथा महापौरांसह सर्व नगरसेवक या मोहिमेला विरोध करु. तसेच योग्य कारवाईसाठी बंदोबस्त दिला नसल्याबद्दल जिल्हा पोलिस प्रशासनाचाही निषेध करत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेलबाबत उपोषण करणार

$
0
0

'स्मार्टऐवजी अतिक्रमण

शहर बनवू नका'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर स्मार्टऐवजी अतिक्रमण सिटी बनू नये, यासाठी तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवण्यात यावीत. अन्यथा माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल. तसेच कोर्टामध्येही दाद मागितली जाईल, असा इशारा संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे देण्यात आले.

२०१२ पासून संघटनेच्यावतीने तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांबाबत लढा देण्यात येत आहे. सध्या महापालिकेच्याबाजूने निकाल लागलेला आहे. महापालिकेची जागा असल्याचे स्पष्ट झाले असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती देऊन अतिक्रमणधारकांना अभय देणे ही दुर्देवी बाब आहे, असे माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षित जागेवरील बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निकाल दिला आहे. आरक्षित जागेवरील अधिकारात बदल करुन त्याचा व्यक्ती, संस्थेस लाभ मिळवून देता येणार नाही, असेही कोर्टाने निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिक्रमणधारकांना अभय दिले ही अतिशय चुकीची बाब आहे. या धोरणामुळे शहरातील १४०० आरक्षित जमिनींवरील अतिक्रमणांना अभय मिळणार आहे. त्यातून अतिक्रमण सिटी अशी शहराची अवस्था होईल. ही परिस्थिती टाळण्यासाठी अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. शिष्टमंडळामध्ये अनिल कदम, चंद्रकांत सांगावकर, सुजय पोतदार, रा. ल. जोशी, किरण दरवान, रामदास भाले, विलास केसरकर, धनाजी आमते, विश्वनाथ सांगावकर, आप्पा गायकवाड, अनिल कोळेकर, उदय जगताप, सुनील टिपुगडे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images