Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगा घाट स्वच्छता अभियान

$
0
0

पुरोहित संघातर्फे

पंचगंगा घाट स्वच्छता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्यावतीने पंचगंगा घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याकामी महापालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीचे सहकार्य लाभले. स्वच्छता अभियानात घाट परिसरातील कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या एकत्र केले. गेल्या तीन वर्षापासून पुरोहित संघ नदी घाट स्वच्छता अभियान राबवत आहे. यंदा, घाट स्वच्छता अभियानमध्ये पुरोहित संघाच्या १५० हून अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांचेही सहकार्य लाभले.

बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून (ता. १४) राजोपाध्येनगर येथील सानेगुरुजी वसाहतीमधील बॉक्सिंग हॉल येथे विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून २०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा सिनियर मुले व मुली आणि यूथ मुले व मुली वजन गटात होणार आहे. अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव मंगेश कराळे व सहसचिव रविंद्र दड्डीकर आणि कोल्हापूर विभाग सचिव योगेश मुंदडा यांच्याशी संपर्क साधावा. सूरज देशमुख, डॉ. महादेव मोरे यांनी संयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डायरी...९ एप्रिलसाठी

$
0
0

प्रदर्शन : निर्मिती विचारमंचतर्फे पुस्तक प्रदर्शन, स्थळ: शाहू स्मारक कलादालन, वेळ : सकाळी १०वा.

शिबिर : आजरेकर फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत मोटरसायकल प्रशिक्षण शिबिर, स्थळ : सुसरबाग मैदान, वेळ : सकाळी १० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंघोषित नेत्यांकडून प्रतारणा

$
0
0

स्वयंघोषित नेत्यांकडून

मराठा समाजाशी प्रतारणा

क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाने राज्यात मूक मोर्चा काढत असताना कोणत्याही राजकीय व्यक्तीला वा अन्य कुणालाही नेतृत्व दिले नाही. पण त्या मोर्चाचे भांडवल करुन मराठा समाजाचे स्वयंघोषित नेते म्हणून पुढे येत सुरेश पाटील यांनी गोलमेज परिषद घेतली. अशा स्वयंघोषित नेत्याने मराठा समाजाच्या मूक मोर्चाशी प्रतारणा केली आहे. समाजाने अशा घरभेदींना बाजूला ठेवावे', असे आवाहन क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आर. के. पाटील, जयेश कदम, रुपेश पाटील यांनी पत्रकातून केले आहे.

पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 'शांतेतेने काढण्यात आलेले मोर्चे ही मराठा समाजाची अस्मिता आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. सरकारला समाजाच्या प्रश्नांची पुर्ण जाणीव आहे. ते प्रश्न न सोडवल्यास त्याबाबत योग्यवेळी समाज निर्णय घेईल. पण सुरेश पाटील यांच्यासारख्या स्वयंघोषित नेत्यामुळे या प्रश्नाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी वापरलेली ठोक मोर्चाची भाषा अशोभनीय आहे. समाजाने ५८ मोर्चे काढले. जवळपास आठ ते दहा राज्यस्तरीय बैठक घेतल्या. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला नेतृत्व दिले नाही. राजकीय व्यक्तींना नेतृत्वापासून लांब ठेवले. सुरेश पाटील हे राजकीय व्यक्ती आहेत. ते कधीच मोर्चात दिसले नाहीत. त्यांनी शनिवारी कोल्हापुरात बैठक घेतली. स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी ते समाजाचा वापर करत आहेत का हा प्रश्न तयार झाला आहे. समाजाने जगाला आदर्श दाखवणारे मोर्चे शांततेत काढले. त्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यांनी सरकारकडे समाजाचे प्रश्न उपस्थित केले नाहीत. तसेच कोणत्याही मागण्या मांडल्या नाहीत. त्यांनी बैठक घेऊन चुकीची माहिती दिली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसंचालक कार्यालयासमोरआज बेमुदत उपोषण

$
0
0

आजपासून ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या दप्तर दिरंगाई, वेळकाढूपणाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (ता.९) पासून हत्तीमहल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती दगडू थडके यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. खुल्या प्रवर्गातील शिक्षक भरतीस बंदी आहे. तरीही आरक्षित प्रवर्गाचा दाखला काढून शिक्षक सरकारी फसवणूक करीत आहेत. त्याकडे शिक्षण प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याविरोधात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

-------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसतर्फे सोमवारी उपोषण

$
0
0

कोल्हापूर : राज्यातील सामाजिक सलोखा राखण्यात सरकार अपयशी ठरले. त्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (ता.९) सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणात जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार, आमदार, महिला पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकातून दिली.

---------------------

श्रीलंकेच्या पथकाची भेट

कोल्हापूर : श्रीलंका सरकारचे सहाजणांचे पथक अभ्यासासाठी सोमवारी (ता.९) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. यावेळी अध्यक्षा शौमिका महाडिक, सीईओ डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्षांसह इतर पदाधिकारी यांच्याशी ते प्रशासकीय कामकाजासंबंधी चर्चा करतील.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती , रनाआऊट कोण

$
0
0

अवती भवती, रनाआऊट कोण?

लोकसभा आणि निवडणुकीची चर्चा मैदानावरही सुरू आहे. कागलच्या मैदानावरील राजकारणातील दिग्गज खेळाडू पॅड बांधून तयार आहेत. एका क्रिकेटच्या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी निवडणुकीसाठी तयार असलेल्या नेत्याबद्दल 'बाबांनी बॉलिंग करावी, आणि दादांनी बॅटिंग करावी', 'दादांनी बॉलिंग करावी, बाबांनी बॅटिंग करावी' अशी सूचना सूत्रसंचालकाने केली. यावेळी बोलताना दादांनी 'बाबा व दादांनी फक्त बॅटिंगच करावी' अशी इच्छा व्यक्त केली. दोघेही एकाच 'सेने'त आहेत. पण निवडणुकीच्या बोलीत दोघांना 'राष्ट्रवादी' आणि 'भाजप'च्या संघात येण्यासाठी ऑफर दिली आहे. दोघे खेळपट्टीवर बॅटिंग करू लागले आणि धाव घेण्यासाठी चुकीचा कॉल झाला तर रनआऊटही होण्याची भीतीही आहे. दोघांपैकी रनाआऊट कोण होणार याकडे कागलमधील दोन 'स्टार' खेळाडू त्यांच्यावर नजर ठेऊन आहेत.

सतीश घाटगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानाची ट्रायल रन यशस्वी

$
0
0

कोल्हापूर विमानसेवेचा मार्ग मोकळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर सुरू होणाऱ्या विमानसेवेची 'ट्रायल रन' कोल्हापूर विमानतळावर यशस्वी झाली. एअर डेक्कन कंपनीचे २० सीटर विमान दुपारी तीन वाजता विमानतळावर दाखल झाले. 'टेक ऑफ'चा मुहूर्त रविवारी (२२ एप्रिल) रोजी जाहीर केला असून त्या पार्श्वभूमीवर ही 'ट्रायल रन' घेण्यात आली. कोल्हापूर विमानतळ 'ओके' असल्याचा निर्वाळा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. 'वॉटर सॅल्यूट'ने विमानसेवेचे उदघाटन करण्यात आले. बेंगळुरू ते तिरूपती मार्गावरही लवकरच विमानसेवा सुरु होणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुपारी तीन वाजता मुंबईहून कोल्हापूर विमानतळावर एअर डेक्कन कंपनीचे विमान दाखल झाले. एकूण २० सीटर असलेल्या विमानात १९ प्रवासी आणि एक जागा हवाई सुंदरीसाठी आहे. कंपनीचे ऑपरेशन हेड बालाकुमार, कंपनीचे सिव्हील मॅनेजर राजेश अय्यर, केबिन क्रू उमा पांडे, कॅप्टन अॅण्ड्री, कोल्हापूर विमानतळाच्या व्यवस्थापक पूजा मूल यांनी विमानतळाची पाहणी केली. विमानाची धावपट्टी, सुरक्षा व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा, तिकीट विक्रीचे काउंटर, धातू शोधक यंत्रणा आणि कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध असलेल्या तांत्रिक सुविधांची पाहणी केली. या चाचणीत कोल्हापूरचे विमानतळ यशस्वी ठरल्याने टेक ऑफचा मार्ग मोकळा झाला आहे. विमाानतळावरील रन वे ची लांबी १५०० मी. आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत पथकाने चर्चा केली. त्यांनी करवीरवासिय विमानसेवेला निश्चितच प्रतिसाद देतील, अशी ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. पुन्हा मंगळवारी (ता. १० एप्रिल) ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही सेवा २२ एप्रिलपासून सुरू होत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर १९७० रूपयांत प्रवास करता येणार आहे. आठवड्यातून तीन वेळा रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीन दिवस सेवा दिली जाणार आहे. मुंबई ते कोल्हापूर १ वाजून १५ मिनिटांनी, कोल्हापूर ते मुंबई ३ वाजून १५ मिनिटे अशी विमानसेवेची वेळ आहे. या प्रवासाचे तिकीटाचे ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच प्रवाशांनी बुकिंग केले आहे. चाचणीच्या काळात काही प्रवाशांना ऑन दि स्पॉट बुकिंग किंवा मोफत विमानसेवेचा लाभ घेता येऊ शकेल, असा प्रयत्न सुरू आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समीर शेठ, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेऊनही साळसूदपणाचा आव

$
0
0

लाच घेऊन साळसूदपणाचा आव

तपासणी फी घेऊनही केली लाचेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिन्याला दीड लाख रुपये पगार घेणाऱ्या प्राध्यापकाने त्रयस्त तपासणीसाठी १५ हजार रुपयांची शासकीय फीदेखील घेतली. यानंतरही पैशांची हाव सुटत नसल्याने त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने प्रा. शिवाजी तुकाराम काटकर यांनी शिक्षकी पेशालाच काळीमा फासल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रंगेहात सापडल्यानंतरही 'माझे रेकॉर्ड खूप चांगले आहे,'असे सांगत साळसूदपणाचा आव प्राध्यापक महाशय आणत होते.

तक्रारदार आशपाक मकानदार व त्यांच्या पत्नीचा बांबू फर्निचर व रिसॉर्टसाठी फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे त्यांनी श्री. क्षेत्र रामलिंग, आळते (ता. हातकणंगले) येथे वन पर्यटनासाठी बांबूची घरे बनविण्याचा ठेका घेतला. नऊ लाख रुपयांचे काम त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण केले. या कामाचे बील रेंज फॉरेस्ट यांच्यामार्फत संयुक्त वनविभाग समिती आळते यांच्याकडे पाठवले होते. मकानदार यांनी या कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन शासकीय विभागाकडून करून घेण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसकडून शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजकडे प्रस्ताव पाठवला. यानंतर प्राध्यापक शिवाजी काटकर याने ३ एप्रिलला सहकाऱ्यासह आळते येथे भेट देऊन बांबू हाऊसची तपासणी केली. या कामाचा अहवाल देण्यासाठी त्याला शासकीय फी म्हणून १५ हजार, ४९२ रुपयांचा धनादेश मिळाला होता. तपासणीसाठी पाच जणांचे पथक आहे. यातील प्रत्येकी एक हजार रुपये असे पाच हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा निर्दोष अहवाल देणार नाही, असे सांगत काटकर याने लाचेची मागणी केली.

टाकाळा परिसरात भर रस्त्यात सोमवारी संध्याकाळी लाच घेताना प्रा. काटकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. यानंतर जणू काही केलेच नाही, अशा अविर्भावातील प्राध्यापकाने आपण किती स्वच्छ आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. 'माझे रेकॉर्ड खूप चांगले आहे. कारवाई करू नका,' असे सांगत तो अधिकाऱ्यांपुढे गयावया करीत होता. लाच घेतली याचे काहीच शल्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. अधिकाऱ्यांनी त्याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या कार्यालयात आणल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती. आपण काहीच चुकीचे केले नाही. असे प्रकार सर्वत्रच घडत असतात, असे सांगण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सुरू होता.

पथकाने काटकर याच्या घराची झडती घेतली. हातकणंगले तालुक्यातील पारगाव हे त्याचे मूळ गाव असल्याने गावातील घराचीही झडती घेतली जाणार असल्याचे अधीक्षक गोडे यांनी सांगितले. ही कारवाई उपअधीक्षक गिरीष गोडे, हवालदार श्रीधर सावंत, मनोज खोत, आबा गुंडणके, संदीप पावलेकर, सर्जेराव पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी लिकर्स सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने बोलावलेल्या बैठकीमुळे तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत इमारतींना व व्यावसायिकांना मिळालेला दिलासा अल्पकाळ ठरला. महापालिकेचा परवाना न घेता व्यवसाय केले जात असल्याने विनापरवाना व्यवसाय म्हणून गांधीनगर फाट्यावरील तनवाणी लिकर्स हे देशी विदेशी दारुचे दुकान सोमवारी महापालिकेने सील केले. परवाना विभागाने ही कारवाई केली. या नियमानुसार निगडेवाडी नाक्यापर्यंतच्या जागेवरील शेकडो व्यावसायिकांवर भविष्यात सीलबंदची कारवाई होऊ शकते.

गांधीनगर फाट्यावर तनवाणी लिकर्स हे दुकान सुरु होते. तावडे हॉटेलपासून निगडेवाडी जकात नाक्यापर्यंतच्या जागेची मालकी महापालिकेची असल्याचा कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आपोआपच येथील बांधकामे व व्यवसायांना महापालिकेची नियमावली लागू झाली. सर्वच बांधकामे महापालिकेची परवानगी न घेता केल्याबद्दल अनधिकृत ठरली आहेत. तर व्यवसायांसाठी महापालिकेचा परवानाही आवश्यक ठरला आहे. अशा व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तसेच स्थायी समितीच्या बैठकीत केली जात होती. त्यानुसार तनवाणी लिकर्स या देशी-विदेशी दारु दुकानाला परवाना विभागाकडून विनापरवाना व्यवसायाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. तनवाणी लिकर्स यांनी कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयात अॅड. प्रफुल्ल राऊत व मुकुंद पवार यांनी महापालिकेच्यावतीने काम पाहिले. तनवाणी लिकर्स यांचा दावा फेटाळण्यात आला. त्याचा निकाल मिळताच विनापरवाना सुरु असलेले तनवाणी लिकर्स हे दुकान महापालिकेने तातडीने दुपारी दोन वाजता सील केले.

२५० एकर जागेवर अनेक व्यावसायिक आहेत. ही जागा महापालिकेची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत असताना सरकारकडून हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे अनधिकृत बांधकामाबाबतची कारवाई थांबली. पण या जागेवर व्यवसाय करताना महापालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. या परिसरातील व्यावसायिकांकडे हा व्यवसाय परवाना नाही. त्यामुळे तनवाणी लिकर्स या दुकानावर कारवाई करत अन्य व्यावसायिकांवरही अशी कारवाई होईल, असेच महापालिकेने सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीलंकेत महिलांना केवळ २५ टक्के आरक्षण

$
0
0

फोटो आहे.

.............

श्रीलंकन पथकाने घेतले महिला सक्षमीकरणाचे धडे

जिल्हा परिषदेसह बुबनाळ ग्रामपंचायतीला भेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'श्रीलंकेत पुरूषांच्या तुलनेत महिला ५७ टक्के आहेत. मात्र रूढी परंपरा, सांस्कृतिक,धार्मिक बंधनामुळे राजकारणातील महिलांचा सहभाग अल्प राहिला. २०१६ साली तेथील सरकारने कायद्यात दुरूस्ती करून महिलांसाठी २५ टक्के आरक्षण लागू केले. तरीही स्वत:हून महिला राजकारणात सक्रिय होत नाहीत. त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्रासह केरळ व इतर राज्यातील अभ्यासदौरा सुरू आहे', अशी माहिती श्रीलंकेतील सबरागुमवा प्रोव्हीन्सियल कौन्सिलचे मुख्य सचिव हेरथ कुलरत्ने यांनी सोमवारी दिली.

अभ्यासदौऱ्यात श्रीलंकेच्या उच्चपदस्थ पथकाने जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी पदाधिकारी, अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा परिषदेने राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना, राजकारणातील महिलांचा सहभाग कसा असतो, याची माहिती दिली.

कुलरत्ने म्हणाले, 'राजकारण वाईट आहे. घराबाहेर पडून पुरूषांसोबत काम करण्याबाबतची चुकीची मानसिकता श्रीलंकेतील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून त्यांचा राजकारणातील सहभाग नगण्य राहिला. तेथील महिला संघटना, संस्थांच्या दबावामुळे २०१६ मध्ये सरकारने महिलांना केवळ २५ टक्के आरक्षण ठेवले. देश शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्या सुधारला. मात्र राजकारणात, समाजकारणात महिलांचा ओढा कमी राहिला. तो वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच ५० टक्के महिलांसाठी आरक्षण असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना भेट देत आहोत. दौऱ्याचा अहवाल सरकारकडे दिला जाईल. त्यानंतर राजकारण, समाजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी श्रीलंका सरकार ठोस कृती आराखडा तयार करेल.'

समन्वयक दत्ता गुरव म्हणाले, 'श्रीलंका आणि भारत हे दोन्ही देश ब्रिटीशांच्या नियंत्रणाखाली होते. भारतात राजकारणात महिलांचा सक्रीय सहभाग लवकर वाढला. श्रीलंकेत वाढला नाही, तेथे महिलांना आरक्षणही उशिरा मिळाले. श्रीलंका सरकार आता गाव ते संसद पातळीवर राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे.'

-----------------

पुरूषांचे समुपदेशन करा

श्रीलंकेतील राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी काय केले पाहिजे यासंबंधी अध्यक्षा महाडिक, सभापती जयश्री तेली, डॉ. पद्माराणी पाटील यांनी विविध सूचना केल्या. राजकारण वाईट आहे ही मानसिकता दूर करण्यासाठी श्रीलंकेतील महिलांऐवजी पुरूषांचे समुपदेश करा, असे तेली यांनी सुचवताच अधिकाऱ्यांत हशा पिकला. शालेय अभ्यासक्रमात महिला राजकारणासंबंधीचा विषय असावा, अशी सूचना महाडिक यांनी मांडली. दरम्यान, श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने जि. प. मधील भेटीनंतर सोमवारी सर्व महिला सदस्य असलेल्या शिरोळ तालुक्यातील बुबनाळ ग्रामपंचायतीलाही भेट दिली.

-----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकिल्ल्यांचे संवर्धन

$
0
0

रायगडसाठी होणार करार

पुरातत्व विभाग आणि सा. बां. विभाग संयुक्तरित्या करणार काम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग व राज्याच्या सार्वजिनक बांधकाम विभागात सामज्यंस करार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान कार्यालयात याबाबत बैठक झाली. सामज्यंस करारामुळे पुरातत्व खात्याच्या नियमानुसार व देखरेखीखाली राज्यातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

पंतप्रधान कार्यालयात प्रथमच महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी व्यापक स्तरावर बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस, खासदार संभाजीराजे, पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या महासंचालक उषा शर्मा, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व खाते व राज्य सरकार यांनी संयुक्तरित्या काम करण्यासंदर्भात चर्चा झाली. रायगड संवर्धनाचे काम गतीने होण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सामज्यंस करार होणार असून त्यानुसार तत्काळ काम सुरू होण्याची शक्यता आहे. या करारामुळे परवानगीसाठी व निधी उपलब्धतेसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

राज्यातील गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. सामज्यंस करारानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम होणार आहे. या अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने आवश्यक अधिकारी व सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले 'पंतप्रधान कार्यालयातील बैठकीत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांचा आढावा घेतला. राज्य सरकारकडून रायगडच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर राज्य सरकारकडे द्यावेत, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली होती. राज्य सरकारची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.'

रायगड किल्ला हा सर्वांचे स्फूर्तिस्थान आहे. किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. आता पुरातत्व विभागासोबत सामज्यंस करार होणार असल्याने प्रत्यक्ष कामांना गती येईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी गडकिल्ल्याच्या जतन व संवर्धनाची कामे या निर्णयामुळे सुरू होतील.

खासदार संभाजीराजे छत्रपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडळकर कॉलनीत वाहनांची तोडफोड

$
0
0

(फोटो आहेत)

पाडळकर कॉलनीत वाहने फोडली

अज्ञातांनी तोडफोड करून माजवली दहशत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुचाकीवरून जाताना पाय लागल्याच्या वादातून हॉकी स्टेडियमजवळील पाडळकर कॉलनीत अज्ञात २० ते २५ तरुणांनी वाहनांची तोडफेड करून दहशत माजवली. सोमवारी (ता. ९) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. याबाबत रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास रितेश पाथरवट (वय १४, रा. पाडळकर कॉलनी) हा हॉकी चौकातून पाडळकर कॉलनीकडे निघाला होता. यावेळी संभाजीनगर चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा पाथरवट याला धक्का लागला. या घटनेने पाथरवट आणि दुचाकीस्वारामध्ये किरकोळ वाद झाला. स्थानिक नागरिकांनी हा वाद मिटवला होता. यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास हॉकी स्टेडियमच्या दिशेने दुचाकीवरून आठ ते दहा तरुण आले. त्यांनी दुपारी झालेल्या घटनेबद्दल विचारणा करीत वाद घालण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना माघारी घालवल्यानंतर साडेसातच्या सुमारास पुन्हा दुचाकींवरून २० ते २५ तरुण आले. तोंडावर रुमाल बांधलेल्या तरुणांनी पाथरवट याच्या घरासमोर पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड केली. यावेळी एका तरुणाने पाथरवट याला मारहाणदेखील केली.

या घटनेने परिसरात गोंधळ उडाला. पाथरवट याच्या घरातील महिला घाबरल्याने त्यांनी दरवाजा बंद करून आरडाओरडा केला. परिसरातील तरुण जमा होताच हल्लेखोरांनी हॉकी स्टेडियमच्या दिशेने पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांकडून घटनेची माहिती घेऊन तोडफोड झालेल्या पाच वाहनांचा पंचनामा केला. सर्वच हल्लेखोर अनोळखी होते, अशी माहिती स्थानिक तरुणांनी दिली. रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, विठ्ठल दराडे, राजारामपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, आदी उपस्थित होते.

घटनास्थळी तणाव

अज्ञात तरुणांनी फिल्मी स्टाइलने हल्ला करून वाहनांची तोडफोड केली. पाथरवट यांच्या घरासमोर तोडफोड झालेल्या पाच दुचाकी पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शंभराहून अधिक तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती. १५ ते २० वाहनांची तोडफोड झाल्याची अफवा पसरल्याने पोलिसांच्या गाड्याही सायरन वाजवत पाडळकर कॉलनीत पोहोचल्या. पोलिसांची वाहने, मोठा फौजफाटा आणि तरुणांच्या गर्दीने घटनास्थळी तणावाची स्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस पक्षाचे उपोषण

$
0
0

फोटो

.................

सामाजिक सलोख्यासाठी

काँग्रेसचे उपोषण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करत सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने देशव्यापी उपोषणाची घोषणा केली होती. जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार मोहन जोशी, भरमू सुबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणाला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, केंद्र व भाजपप्रणित राज्यांत चुकीच्या व व्देषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. भारत बंद आंदोलनात भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला, निष्पापांचे जीव गेले. अनेक राज्यात जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश राज्यात दंगलीमध्ये भाजप व संघाचा हात होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलप्रकरणी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे पुत्र आरजीत शाश्वत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही कोरेगाव भीमा येथे मराठा आणि दलित समाजात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट झाले आहे. भाजपशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग स्पष्ट असताना भाजप सरकारकडून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे असे संघर्ष निर्माण करणे हे भाजपच्या रणनितीचा भाग आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशभरात होणारे दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकार कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देश व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणून बुजून धोका पोहचिवण्याचा प्रयत्न होत असताना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.

आंदोलनात महापौर स्वाती यवलुजे, शहर प्रमुख प्रल्हाद चव्हाण, सुरेश कुऱ्हाडे, महानगरपालिका पक्ष प्रतोद दिलीप पोवार, अॅड गुलाबराव घोरपडे, नगरसेवक तौफिक मुल्लानी, हिंदूराव चौगुले, एस.के. माळी, गोकुळचे संचालक राजेश पाटील, पी.डी. धुंदरे, नामदेवराव दळवी, श्रीकांत पार्लेकर, संजय पाटील, सरलाताई पाटील, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, चंदा बेलेकर, संपत देसाई, किरण मेथे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाजीपूरची भटकंती

$
0
0

दाजीपूरची मनमुराद भटकंती

आनंद चरापले, राधानगरी

राधानगरी-दाजीपूर परिसर निसर्गसौंदर्याची खाणच. निसर्गाने या परिसराला भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. वर्षभर हिरवा शालू परिधान केलेल्या डोंगररांगा, रस्त्याच्या दुतर्फा असलेला मुबलक रानमेवा ,उन्हाळ्यातसुद्धा गारवा देणारा परिसर म्हणजे दाजीपूरचे अभयारण्य. घरगुती सहल असो वा युवकांची किंवा शैक्षणिक. गर्दीने गजबजलेले ठिकाण म्हणून दाजीपूर अभयारण्याचा उल्लेख केला जातो. उन्हाळी पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाण म्हणूनही दाजीपूर ओळखले जाते.

सह्याद्री डोंगररांगांचा परिसर विपुल झाडीने व्यापला आहे. याच भागात दाजीपूर

अभयारण्याचा भाग येतो. राज्यातील सर्वात प्राचीन जंगल म्हणून याची ओळख आहे. वन विभागाने विस्तारित जंगलास १९८५मध्ये मान्यता दिली. ३५१ चौरस किलोमिटर क्षेत्रात विखुरलेल्या जंगलात अनेक प्रकारचे पशू-पक्षी पाहण्यास मिळतात. पावसाळा संपल्यानंतर एक नोव्हेंबरपासून दाजीपूर अभ्यारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जातो. एकतीस मेपर्यंत पर्यटकांना परवानगी असते. मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असते. प्राणीगणनेचे दिवस वगळता अभ्ययारण्यात पर्यटकांना सोडले जाते.

कोल्हापूर शहरापासून ऐंशी किलोमीटरवर असलेल्या दाजीपूर अभ्यारण्याची चाहूल मांजरखिंड येथून लागते. राधानगरीपासून पंचविस किलोमीटर अंतराचा भाग नागमोडी आकाराची वळणे असलेला डोंगराळ आहे. कोकणाची सुरवात येथूनच होते. वन विभागाच्यावतीने दाजीपूर येथे पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी नियमावली तयार केली आहे. पर्यटकांना प्रवेशासाठी तिकीट आहे. परिसरातील काही युवकांनी भाडेतत्वावर जीप जंगल भ्रमंतीसाठी सज्ज ठेवल्या आहेत.

दाजीपूर प्रवेशद्वारापासून अभ्यारण्यात प्राणी तलावापर्यंतचे अंतर बावीस किलोमीटर आहे. जंगली रस्त्यावर जीप, सुमो गाडी सुरक्षित जाते. पश्चिम बाजूला मोठे जंगलाचे सडे, काही ठिकाणी गवताळ कुरणे, विविध प्रकारच्या वनस्पती आंबा, फणस, काजू, करवंदे, नेर्ली, जांभळे असा रानमेवा हमखास खायला मिळतो. प्रवास करताना गाडीच्या आडवे अनेक रानकोंबड्या जातात.

अभ्यारण्यात प्रवास करताना विविध पक्षी दिसतात. मधेच एखादे अस्वल पाहण्यास मिळते. काहीवेळा साप आणि इतर प्राणी दिसतात. इथे सव्वाशे प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आहेत. वाटेत पक्षी, प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी मनोरे उभारण्यात आले आहेत. पहिला मनोरा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा मनोरा प्राणी तलावाजवळ उभा करण्यात आला आहे.

तलावात पाणी पिण्यासाठी गवे कळपाने येतात. सकाळी किंवा सायंकाळी गव्यांचा कळप पाहण्यास मिळतो. याचबरोबर रान डुक्करे, हरीण, सांबर, भोकर, ससा, शेकरू, खवले मांजर असे वन्यप्राणी पाहण्यास मिळतात. राधानगरीतील बायसन क्लब, राधानगरी नेचर क्लबनी विशेष प्रयत्न करून पर्यटन वाढीला हातभार लावला आहे. इथे कोकण दर्शन पॉईंट, सापळा, सांबरकोंड आदी ठिकाणे रमणीय आहेत.

पर्यटन विभागाच्यावतीने तंबू निवास, हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय खाजगी हॉटेल्स, निवासस्थाने आहेत. पर्यटकाना पुन्हा पुन्हा दाजीपूरला यावे असे वाटणारे अभयारण्य आहे.

कसे जाल ?

कोल्हापूर -राधानगरी-दाजीपूर ७५ किलोमीटर

कणकवलीपासून पूर्वेकडे घाट माथ्यावर ३५ किलोमीटर

दाजीपूरपासून जंगल प्रवास २२किलोमीटर

काय पहाल

निरीक्षण मनोरे स्पॉट - सांबर कोंड, कोकण दर्शन, प्राणी तलाव.

भाडेतत्वावर गाईडसह गाडी उपलब्ध,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग ...

$
0
0

विनयभंग प्रकरणावर

पोलिस ठाण्यात पडदा

म.टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आलेल्या महिलेशी विनयभंग केल्याच्या प्रकारानंतर संतप्त महिलेने कार्यालयातील शिपायाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. गावभाग पोलिस ठाण्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर रात्री या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत हा प्रकार घडला.

राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान ओळखपत्र काढण्याचे तसेच त्यामध्ये सुधारणा करण्याचे कार्यालय येथील जुन्या नगरपालिकेत आहे. इचलकरंजीसह परिसरातील गावांसाठी एकमेव ठिकाण असल्याने येथे सतत गर्दी असते. शहरालगतच्या एका गावातील महिला ओळखपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहीती घेण्यासाठी या कार्यालयात आली होती. त्यावेळी तिच्याशी ओळख निर्माण करून तिचा मोबाईल क्रमांक या शिपायाने घेतला. फोनवरून देखील त्याने महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सोमवारी ही महिला कागदपत्रे घेऊन कार्यालयात आल्यानंतर तिचा विनयभंग करण्यात आला. लज्जा उत्पन्न होईल असे व्यक्तव्य करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न होताच, संतप्त महीलेने त्याला बेदम चोप दिला. गावभाग पोलिसांनी दिवसभर त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस महिलेची कोणतीच तक्रार नसल्याचे कारण सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. पोलिस ठाण्यातच सगळी सूत्रे हालत होती.

दरम्यान, शिपाई म्हणून नियुक्ती असलेला हा कर्मचारी संपूर्ण कार्यालयाचा कारभार सांभाळत होता. वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठबळावर या शिपायाचा रुबाब एका क्लास वन अधिकाऱ्याला लाजवेल असा होता. विनयभंग प्रकरण पोलिस ठाण्यातच मिटवण्यात आल्याने याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जाणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

.....................

अपघातात दोघे जखमी

जयसिंगपूर

कोल्हापूर-सांगली महामार्गावर कोंडिग्रे फाट्यावर मारूती वॅगनार कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोला धडक दिली. यानंतर कार रस्त्यालगतच्या रसवंती गृहात घुसली. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून वाहनांचे व रसवंती गृहाचे नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वॅगनार कार सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. कोंडिग्रे फाट्याजवळ समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना कारची समोरून येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोशी धडक झाली. यानंतर कार रस्त्यालगत असणाऱ्या रसवंती गृहात घुसली. अपघातात टेम्पो चालक राहुल दिलीप कुराडे (वय २५, रा. दत्त कॉलनी, जयसिंगपूर) व वॅगनार चालक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजी ब्रिगेड राज्य कार्यध्यक्षपदी हुजरे पाटील

$
0
0

फोटो आहे

..........

कार्याध्यक्षपदी हिंदूराव हुजरे

कोल्हापूर

संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्षपदी हिंदूराव हुजरे पाटील यांची निवड झाली. पुणे येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड होते. हिंदूराव हुजरे पाटील यांच्यासह रत्नागिरीच्या सुधीर भोसले यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. अन्य कार्यकारिणी अशी, प्रदेश सचिव सुभाष बोरकर (वाशिम), आत्माराम शिंदे (औरंगाबाद), उपाध्यक्ष छगन शेरे (परभणी), शरद चव्हाण (बीड), सुधांशू मोहोड (नागपूर), राहुल बनसोडे (औरंगाबाद), अमोल जाधवराव (मुंबई), कोषाध्यक्ष, अमोल काटे (बारामती), संघटक सोमेश्वर आहेर (पैठण), दशरथ गव्हाणे (अहमदनगर), सचिन सावंत (नवी मुंबई), मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर (पुणे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गानसरस्वती को भजे हम मैफल आज

$
0
0

मैफलीचे आज आयोजन

कोल्हापूर

प्रतिज्ञा नाट्यरंग आणि स्वर अविनाशी या दोन संस्थांच्या वतीने  'गानसारस्वती को भजे हम'ही संगीत मैफल मंगळवारी (ता.१०) रात्री केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित केली आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि गोपाळ खेर यांच्या स्मृतिनिमित्त ही मैफल होणार आहे. मैफलीची संकल्पना डॉ. आनंद धर्माधिकारी यांची असून यामध्ये आमोणकर यांच्या बंदिशी, तराणे, ठुमरी, भावगीते, भजन अशा अनेक गीत प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. प्रवेश शुल्क ऐच्छिक असून जमणाऱ्या निधीतून चिन्मय जाधव याच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू व प्रशासनाची विद्यापीठ हिताप्रती बांधिलकी सर्वोच्च

$
0
0

कुलगुरू व प्रशासनाची

विद्यापीठहिताप्रती सर्वोच्च बांधिलकी

विद्यापीठाशी संबंधित विविध संघटनांच्या बैठकीत सूर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची कार्यप्रणाली ही विद्यापीठहिताप्रती सर्वोच्च बांधिलकी असणारी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाशी संबंधित विविध संघटनांनी दिली.

शिवाजी युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट टिचर्स असोसिएशन (सुप्टा), शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर फोरम, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, शिवाजी विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनांच्यावतीने आपली भूमिका स्पष्ट केली. बैठकीस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे उपस्थित होते. 'कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनही विद्यापीठाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कार्यतत्पर आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. शिंदे आणि विद्यापीठ प्रशासन यांच्या सोबत विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्व संघटना कटिबद्ध असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,' असा सूर या बैठकीत उमटला.

या बैठकीला शिवाजी युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट टिचर्स असोसिएशन 'सुप्टा', शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर फोरम, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळच्या लेखापरीक्षकांकडून खुलासा सादर

$
0
0

दोष दुरुस्ती अहवालाच्या

वादावर अखेर पडदा

गोकुळच्या लेखापरीक्षकांकडून खुलासा सादर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) २०१६-१७ चा वार्षिक दोष दुरुस्ती अहवाल पशु, दुग्ध व मत्स (पदूम) विभागाच्या विशेष कार्यकारी कक्ष अधिकाऱ्यांना पाठवल्याची पावती लेखापरीक्षक एस. ए. फडणीस यांनी पुणे येथील दुग्धचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे सादर केली. राज्य सरकारच्या १९८९ च्या परिपत्रकानुसार दोष दुरुस्ती अहवाल आपल्याला सादर करण्याची आवश्यकता नसून गरज असल्यास अहवालाची प्रत यापुढे देण्यात येईल, असे फडणीस यांनी दिलेल्या खुलासा पत्रात नमूद केले आहे. याबरोबरच गोकुळच्या लेखापरीक्षकांना संबंधीत विभागांना वार्षिक अहवालाची प्रत वेळोवेळी देण्याची सूचना केली असल्याचे पत्र 'गोकुळ'च्यावती शिरापूरकर यांना देण्यात आले.

गोकुळच्या लेखापरीक्षकांनी २०१६-१७ चा वार्षिक दोष दुरुस्ती अहवाल सादर न केल्याने दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी गुरुवारी (ता. ५) गोकुळसह लेखापरीक्षक फडणीस यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार लेखापरीक्षक फडणीस यांनी गोकुळच्यावतीने सोमवारी कार्यालयात जाऊन खुलासा सादर केला. महाराष्ट्र राज्य सहकार कायदा १९६० च्या कलम ८१ व ८२ नुसार वार्षिक अहवाल 'पदूम'च्या विशेष कार्यकारी कक्ष अधिकाऱ्यांना पाठवणे बंधनकारक आहे. याबाबतचे राज्य सरकारने १९८९ रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाला २०१५ रोजी सरकारने मुदतवाढ दिली असून त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी 'पदूम' विभागाकडे अहवाल सादर केला आहे. त्यामुळे दुग्ध विभागाकडे अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही, तरीही वार्षिक अहवालाची आवश्यकता असल्यास प्रत पाठवण्याचे लेखापरीक्षकांनी केलेल्या खुलाशामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून दोष दुरुस्ती अहवालावरुन निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीआयडीचे गायकवाड यांची बदली

$
0
0

सीआयडीचे गायकवाड

यांची तडकाफडकी बदली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत झालेली लूट आणि सांगली येथील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांची सोमवारी तडकाफडकी बदली झाली. गेल्या काही दिवसांपासून ते रजेवर गेले होते. त्यांच्या जागी हेमचंद्र क्षीरसागर यांची नेमणूक केली आहे. क्षीरसागर यांनी पदभार स्वीकारला आहे. महत्त्वाचे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत चोरटा मैनुद्दीन मुल्ला याला हाताशी धरून सांगली पोलिसांनी केलेली कोट्यवधी रुपयांची लूट प्रकरणाचा कसून तपास गायकवाड यांनी केला होता. या प्रकरणात सात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. काही दिवसात या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात पाठवले जाणार आहे. बदलीबाबत विचारणा केली असता, कौटुंबिक अडचणीमुळे बदलीची विनंती केली होती, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images