Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्लास्टिक बंदी, डॉ. अविनाश सुभेदार टॉकटाईम

$
0
0

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार टॉकटाइम...

०००००००००००

थेट प्लास्टिक उत्पादनावरच बंदी घालणार

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी राज्य सकारने प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर कायद्याने बंदी घातली आहे. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींकडून अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कशी होणार याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी साधलेला संवाद.

०००००

प्रश्न : प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली जाणार आहे?

प्लास्टिक बंदीसाठी कायद्याने प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित केली आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, वनविभाग, शिक्षण, पोलिस यांच्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांची लवकर बैठक घेतली जाईल. सर्व विभागांत समन्वय ठेवून अंमलबजावणी केली जाईल.

प्रश्न : प्लास्टिक उत्पादन व वितरण कसे रोखणार ?

महापालिका व नगरपालिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू जप्त करण्यास सुरुवात केली. थेट प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू वितरण करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. ज्यांच्याकडे प्लास्टिक वस्तूंचा साठा आहे, त्यांना साठा संपविण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. मुदत संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाईचा बडगा उचलला जाईल.

प्रश्न : कारवाईला प्रबोधनाची जोड देणार का ?

प्लास्टिकचे संकट महाभयानक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्लास्टिकच्या दुष्परिणांमाबद्दल मुलांना शिक्षणाद्वारे विद्यार्थीदशेतच धोके समजावून दिले जात आहेत. तरीही शाळा व महाविद्यालयांच्या मदतीने समाजप्रबोधन केले जाईल. पण प्रशासनाचा भर प्रबोधनाबरोबर कायद्याच्या अंमलबजावणीवर राहील.

प्रश्न : प्लास्टिक बंदीच्या छुप्या विरोधाला कसे सामोरे जाणार?

प्लास्टिक बंदीला काही व्यापारी, उद्योजक विरोध करत आहेत. पण कायद्याने प्लास्टिक बंदीची प्रशासनाला अंमलबजावणी करावीच लागणार आहे. मॉलमध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. व्यापारी व उद्योजकांतूनही प्लास्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तूंचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी व्यापारी व उद्योजकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

प्रश्न : प्लास्टिक बंदीसाठी लोकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत ?

प्लास्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात लोकांचा सहभाग आवश्यक आहेत. बंदीपूर्वी अनेक जागरूक नागरिकांनी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी, कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. लोकांनीही स्वत:हून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. लोकसहभागातून १०० टक्के प्लास्टिकबंदीचा निर्णय अमलात येऊ शकेल. लोकांचीही प्लास्टिक टाळण्यासाठी मानसिकता तयार होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचे आंदोलन

$
0
0

फोटो आहे..

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा

शिवसेनेतर्फे तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई झालीच पाहिजे' या मागणीसाठी शिवसेनच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. 'सामान्यांवर कारवाई, धनदांडग्यांना अभय देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध, बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करा' अशा घोषणांनी परिसर दणाणला. तावडे हॉटेल परिसरातील रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

महापालिकेने, तावडे हॉटेल व गांधीनगर रोड परिसरातील जागेवर ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व नो डेव्हलपमेंट झोनसाठी आरक्षण टाकले आहे. मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. महापालिकेने, या बांधकामावर कारवाईचा निर्णय घेतला होता, मात्र पोलिसांनी बंदोबस्त नाकारल्यामुळे महापालिकेला कारवाई गुंडाळावी लागली. अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आंदोलन झाले. घोषणाबाजी करत तावडे हॉटेल परिसरातील वाहने अडविण्यात आली. रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवी चौगुले, दुर्गेश लिंग्रस, राजू यादव, विराज पाटील, महिला आघाडीच्या सुवर्णा कारंडे, रिया पाटील आदींचा समावेश होता. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी, दहा मिनिटांच्या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर अतिक्रमण

$
0
0

तर १४०० अतिक्रमणांचा

निर्णय घ्यावा लागेल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षित अथवा संपादित जागेचा उद्देश सरकार बदलू शकत नाही, असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाचा तसेच राज्य सरकारच्या कायद्याचा अवमान करून तावडे हॉटेल ते निगडेवाडी नाक्यापर्यंतची अतिक्रमणे नियमित करून देणार आहे का? तसा निर्णय घेतला तर शहरातील १४०० आरक्षित जागांवरील अतिक्रमणांबाबतही निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा माजी नगरसेवक अनिल कदम यांनी दिला. याबाबतचे निवेदन नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना पाठविण्यात आले आहे.

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांबाबतची वस्तुस्थिती कदम यांनी निवेदनातून नगरविकास विभागाला सादर केली आहे. त्यामध्ये महापालिकेने प्रतिज्ञापत्रासह अतिक्रमणांची यादी हायकोर्टात सादर केली असल्याचे मत मांडले आहे. ही परिस्थिती असताना ते अतिक्रमणधारक महापालिकेच्या की उचगावच्या हद्दीत आहेत याची फेरतपासणी करण्याची गरज नसल्याचे सांगत कदम यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात विनाकारण दिरंगाई करण्याचे नगरविकास विभागाचे धोरण दिसत आहे. आरक्षित जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत नियमित करता येत नसताना अतिक्रमणधारकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही भूमिका संशयास्पद आहे. सरकार जर २५० एकर जागा महापालिकेला मिळवून न देता अतिक्रमणधारकांच्या पाठीशी उभे राहणार असेल तर ही नामुष्की असेल. नगरविकास विभागाने कायद्याचा अभ्यास, कोर्टाचे निकाल विचारात घेऊन तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफी दुकानातून सोन्याची चेन लंपास

$
0
0

दुकानात खरेदीला आला,

सोन्याची चेन चोरुन गेला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाऊसिंगजी रोडवरील चिपडे सराफ या दुकानात खरेदीचा बहाणा करून चोरट्याने ४१ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवल्याची घटना. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सराफी दुकानाचे मालक तुषार मनोहर चिपडे (वय ३५, रा. चौरंगी कॉम्प्लेक्स, नागाळा पार्क) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.

जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले की, चिपडे सराफ दुकानात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती आली. या व्यक्तीने दुकानातील कामगार उमेश कोरे याला सोन्याची चेन दाखवण्यास सांगितले. चेन दाखवत असताना त्याने रिक्षाने आलो आहे, असे सांगितले. रिक्षावाल्याला भाडे देऊन येतो असे सांगून चेन खरेदी करणारी व्यक्ती दुकानाबाहेर गेली. मात्र परत आली नाही. चेन खरेदी करणारा ग्राहक परतला नसल्याने कामगार कोरे याने ग्राहकाला दाखवलेल्या चेनची तपासणी केली असता ४१ ग्रॅमची चेन नसल्याचे आढळले. खरेदीसाठी आलेल्या चोरट्याने पसंत केलेली चेन हातचलाखीने लंपास करून दुकानातून पोबारा केल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुकानाचे मालक चिपडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमणी वाचवा उपक्रम

$
0
0

फोटो - आहे

लोगो - पक्षी वाचवा

'हरिपूजापुरम्'ने दिले

पक्ष्यांसाठी धान्य, पाणीपात्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चिमण्यांसह अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक कुटुंबाने पक्षी वाचवा मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची गरज आहे, अन्यथा भावी पिढीला पक्षी केवळ चित्रातच दाखवावे लागतील', असे प्रतिपादन पक्षीमित्र युवराज पाटील, पक्षी निरीक्षक बंडा पेडणेकर यांनी केले. नागाळा पार्क परिसरातील हरिपूजापूरम येथील रहिवाशांनी पक्षी अभियानाला प्रतिसाद देत धान्य आणि पाणीपात्र दिले. महाराष्ट्र टाइम्स आणि दि कॉन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने 'पक्षी वाचवा मोहिमेतंर्गत' हा कार्यक्रम झाला.

पक्षीमित्र युवराज पाटील म्हणाले, 'भविष्यात चिमण्यांची संख्या हातावर मोजण्यासारखी स्थिती निर्माण होणार आहे. नव्या पिढीला पक्षी हे केवळ चित्रात दाखविण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास वाढविण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती गरजेची आहे. जंगलासह प्रत्येक अपार्टमेंट आणि घरातही पक्षांचा किलबिलाट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पक्षांना घरटी, पाणी देऊन पक्षी वाचवा चळवळीला बळ देण्याची गरज आहे.महाराष्ट्र पक्षी मित्र ग्रुपतर्फे जनजागृती केली जात आहे.'

पक्षी निरीक्षक बंडा पेडणेकर म्हणाले, 'महाराष्ट्र टाइम्सने 'पक्षी वाचवा मोहिम' हा चांगला उपक्रम राबवला आहे. पक्ष्यांचा अधिवास प्रत्येक ठिकाणी होण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने प्रयत्न केले पाहिजेत. तत्कालिन काळातील इंजिनीअर घरांचे बांधकाम करताना पक्ष्यांचा अधिवास राहण्यासाठी स्वतंत्र रचना करीत होते. सध्या सिमेंटच्या घरात ही व्यवस्था होत नाही. पक्षांना जीवदान देण्यासाठी कल्पक सूचना युवकांना मांडल्या पाहिजेत.'

दि कॉन्झर्वेशन ऑफ इंडियाचे आशिष घेवडे, येस बँकेचे शाखा व्यवस्थापक यतीश शहा यांनी, पक्षी वाचवा मोहिमेची माहिती सांगितली. 'कार्यालय, बंगले आणि बागेत ही चिमण्यासाठी घरटी लावली जातात. पक्षी वाचविण्याची मोहिम घराघरातून सुरू झाली पाहिजे', असे शहा यांनी सांगितले. हरिपूजापूरममधील रहिवाशांनी पक्ष्यांसाठी जमा केलेले धान्य, पाणी पात्र हरिपूजानगरचे अध्यक्ष बसवराज आवटे यांनी दि कॉन्झर्वेशन ऑफ इंडियाकडे सुपूर्द केले. अपार्टमेंटचे कुंजबिहारी कोठारी, सुरेश मेहता, अॅड. दत्तात्रय राणे, अमरसिंह माने, जीवन पाटील, संजय साळोखे, विक्रम शहा, योगेश सामाणी, गिरीश बदाणी, मनुभाई पंड्या, दिलीप मोटवाणी, अवधूत अपराध आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती....

$
0
0

अवतीभवती....

सरकारचे स्पोकसमन व्हा

सरकार भाजप-सेनेचे असो की काँग्रेस-राष्ट्रवादीचे. प्रत्येकाचा सरकारी यंत्रणेवर प्रभाव राहतो. सरकारच्या माध्यमातून राबविणाऱ्या योजनेवर अनेकदा पक्षीय अजेंडा राबविला जातो अशी टीका विरोधकांकडून होते. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्याही झडतात. विरोधकांच्या टीकेवर मात्र म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कामाची नवी शिकवण दिली. सर्किट हाऊस येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांचा वर्गच घेतला. 'मी तुम्हाला भाजपाचा प्रचार करा असे म्हणणार नाही. पण सरकारी योजना लोकापर्यंत पोहचवा. कुणा पक्षाचे नव्हे तर सरकारचे स्पोक्समन म्हणून काम करा. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची योजना असो की जलयुक्त शिवार अभियान, त्यावर टीका करणारे उघडे पडतील' असा सल्ला पालकमंत्र्यांनी दिला. कार्यालयीन वेळेनुसार कामकाज करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना दादांचा सल्ला कितपत रुचला कुणास ठाऊक, मात्र सध्या सरकारवर विरोधक रोज हल्लाबोल करत आहेत. त्यांना, स्पोक्समन बनून सरकारी अधिकारी कुठपर्यंत लढणार अशी कुजबुज मात्र सभागृहात झाली.

आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल कपूर कोल्हापुरात फोटोसह बातमी

$
0
0

फोटो...अर्जुन टाकळकर

कसं काय कोल्हापूरकर...झक्कास

अनिल कपूर यांनी चाहत्यांशी साधला दिलखुलास संवाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कसं काय पाव्हणं... कोल्हापूरकर, झक्कास आहात ना' असे म्हणत अभिनेता अनिल कपूर यांनी कोल्हापूरच्या चाहत्यांशी संवाद साधला. एका खासगी कार्यक्रमासाठी रविवारी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी राम लखन, ताल, वेलकम, नो एंट्री या गाण्यांतील बोलांवर त्यांनी स्टाइल डान्स करत चाहत्यांनाही थिरकायला लावले. भरदुपारी बारा वाजता व्हीनस कॉर्नर चौकात त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी लोटली होती.

दुपारी बारा वाजता अनिल कपूर यांचे आगमन होताच चाहत्यांनी अनिल...अनिल म्हणत त्यांचे स्वागत केले. पांढऱ्या रंगाच्या शर्टवर करड्या रंगाचे मोदी जॅकेट आणि स्टायलीश गॉगल घालून आलेल्या अनिल कपूर यांनी गाडीतून उतरताच 'ताल से ताल मिला' या गाण्यावर डान्स करत स्टेजवर एन्ट्री केली. तुम्हाला भेटून मला आनंद झाला. असेच प्रेम करत राहा, असे म्हणत अनिल कपूर यांनी कोल्हापूरकरांची मनं जिंकली. चाहत्यांशी गप्पा मारताना ते म्हणाले, '४० वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलो होतो. त्यानंतर आता आलो. पण कलाकारांना दाद देणारे कोल्हापूरकर आजही तेवढेच उत्साही आहेत. कोल्हापूरच्या माणसांविषयी आणि इथल्या जेवणाविषयी भरभरून बोलल्यानंतर तुम्हाला पडद्यावरचा कोणता अनिल कपूर हवाय, असा प्रश्न विचारला. यावेळी चाहत्यांनी नायक.. नायकचा गजर केला. या सिनेमातील शिवाजीराव गायकवाड या भूमिकेची झलक अनिल कपूर यांनी दाखवली. त्यानंतर मोहिनी मोहिनी म्हणत डिंग डाँग डिंगच्या तालावर डान्स करतच त्यांनी चाहत्यांचा आता मला मुंबईला जावे लागेल असे म्हणत निरोप घेतला.

राजकारणात रस नाही

राजकारणात येणार का, या प्रश्नावर मात्र त्यांनी नकार दिला. चाहत्यांचे प्रेम ही कितीही ताकद असली तरी त्याचा वापर करून राजकारणात सक्रिय होण्यामध्ये मला रस नाही. नायक या सिनेमात एक दिवसाचा कार्यतत्पर मुख्यमंत्री साकारल्यानंतरही मला राजकारणात यावेसे वाटत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य सादरीकरणाचा विक्रम

$
0
0

'केशवराव'मध्ये साकारतोय

सलग नाट्यसादरीकरणाचा विक्रम

नाट्यप्रयोगांची सप्तपती, रंगभूमीसाठी हौशी कलाकारांचा अनोखा मेळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ते सगळे हौशी कलावंत, रंगभूमीच्या प्रेमाखातर एकवटलेले. नोकरी, व्यवसाय सांभाळत त्या कलाकारांनी सलग सात नाटकांच्या सादरीकरणाची रविवारी सकाळी नांदी केली. नाटकाची आवड, दर्दी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद या बळावर प्रत्येक नाट्यप्रयोग बहरला. सलग सात नाटकाच्या सादरीकरणाने सोमवारी सकाळी रंगभूमीवर नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. या अनोख्या उपक्रमासाठी जटाऊ कल्चरल अॅकेडमीचे कलाकार न थकता प्रयोग सादर करत आहेत.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सोमवारी सकाळी दहा वाजता सलग सात नाट्य सादरीकरणाचा समारोप होणार आहे. या नाट्याविष्काराची नोंद वर्ल्ड बुकमध्ये होणार आहे. ११ वर्षे घशाच्या कर्करोगावर मात करुन नितीन सुतार हा ५८ वर्षीय कलाकारांनी सगळ्या कलाकारांची मोट बांधली आहे. सुतार हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथील आहेत. सध्या ते पिंपरी चिंचवड येथे स्थायिक आहेत. त्यांच्यासह सुकन्या देशपांडे, अनघा देशपांडे, अभिजित कोरे, अनिल करंदीकर, संभाजी आरगुणे, सायली जठार, हेमंत वाणी, पार्थ साळवी, किशोर भुत्ते, अजय कदम या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, साहित्यिक चंद्रकुमार नलगे, संत निरंकारी क्षेत्रीय मंडळाचे शहाजी पाटील, दत्ता माळी, शेरसिंग मनहास, गीतकार श्रीधर पाटील, सरपंच महेश साळुंखे, शिरीष डोंगरे, मंगेश चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी जुन्या काळातील नाट्य कलाकार यशवंत कुंभार यांचा सत्कार झाला. उद्घाटनची औपचारिकता पूर्ण होताच 'नवा सारीपाट' या नाटकाने सुरुवात झाली. दिवसभरात 'असं का व्हावं, कडवं, आर्त किंकाळी, भारत माझा देश आहे' या नाटकांचे प्रयोग झाले. सातही नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत व प्रकाश योजना नितीन सुतार यांनी केली आहे. शिवाय प्रत्येक नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेत ते आहेत. २६ कलाकारांनी सात नाटकांचा डोलारा सांभाळला आहे. सोमवारी सकाळी 'आम्ही सारे भिकारी' या नाटकाच्या सादरीकरणाला प्रारंभ होऊन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाट्यमहोत्सवाचा समारोप होईल. दरम्यान अश्विनी रानडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राईम पट्टा ८ एप्रिल

$
0
0

क्राईम पट्टा ८ एप्रिल...

मनोरुग्णाचा मृत्यू

कोल्हापूर : रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णातील यल्लाप्पा शंकरआप्पा वायाघाटे (वय ५२) या मनोरुग्णाचा उपचार सुरू असताना रविवारी दुपारी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. १९८८ पासून वायाघाटे यांच्यावर रत्नागिरीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन एप्रिलला ते बेडवरुन खाली पडल्याने जखमी झाले होते. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते.

०००

ट्रकचालकाची आत्महत्या

कोल्हापूर : मुडशिंगी (ता. करवीर) येथे राहत्या घरी ज्ञानेश्वर बाळू गोंधळी (वय ३५) या ट्रकचालकाने फॅनच्या हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाइकांनी बेशुद्धावस्थेतील गोंधळी यांना सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गोंधळी हे टेंबलाईवाडी येथे रहात होते. गेल्या वर्षापासून ते मुडशिंगी येथे रहायला गेले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

प्राध्यापकाचा मोबाईल चोरीस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरजकर तिकटी परिसरात काकडी विकत घेत असताना चोरट्यांनी नितीन भाऊराव पाटील (वय ५३, रा. पारिजात रेसिडेन्सी, रमनमळा) यांचा मोबाइल चोरुन नेला. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. मिरजकर तिकटी येथे प्राध्यापक पाटील काकडी विकत घेत असताना दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. काकडी खरेदी करत असताना त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल एकाने चोरून नेला. प्राध्यापक पाटील यांनी मोबाइल चोरून नेल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

कोल्हापूर : देवाळे (ता. करवीर) येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. स्वाती चंद्रकांत कांबळे (वय३८) आणि चंदकांत गणपती कांबळे (४५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला आग, ९० लाख रुपयांचे नुकसान

$
0
0

कापड दुकानाला आग,

९० लाखांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर (ता. करवीर) येथील गुरूनानक मार्केटमधील प्रियांका क्रिएशन या कापड दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत अंदाजे ९० लाख रुपयांचे नुकसान झाले. रविवारी पहाटे सव्वापाच वाजता आग लागली. कोल्हापूर महापालिका अग्निश्मन दलाने तीन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.

गांधीनगर येथे संदीप जयवंत जाधव (रा. मंगेशकर कॉलनी, उचगाव) यांचे गुरुनानक मार्केटच्या पहिल्या मजल्यावर कापड दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास दुकानाला आग लागली. परिसरातील व्यापारी व नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाचा फायर फायटर घटनास्थळी आला, पण मार्केटकडे जाणारा मार्ग, मार्केटमधील अरुंद रस्ते यामुळे आग विझविण्यासाठी जवानांनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत ९० लाख रुपयांची कपडे जळून खाक झाली. गांधीनगर परिसरातील दुकाने व व्यापारी संकुलात कोणतेही नियम पाळले जात नसल्याने आग विझविताना अडचणी येतात असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतीभवती...

$
0
0

आधी अनिल... नंतर जोतिबा

आधी पोटोबा... नंतर विठोबा असं म्हटलं जातं हे खरं आहे. पण रविवारच्या भर दुपारी कोल्हापूरच्या व्हिनस कॉर्नरवर 'आधी अनिल नंतर जोतिबा' ही नवी म्हण जन्माला आली. हातात चुडा आणि मेंदीचा रंग ताजा असलेल्या नव्या नवरीने चक्क जोडीने जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्याच्या वाटेवर नवरोबांनाच हे वाक्य सुनावलं आणि पतीराजही बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी घामाच्या धारा वाहवत थांबले. एका कार्यक्रमासाठी अभिनेते अनिल कपूर आल्यामुळे व्हिनस कॉर्नर परिसर चाहत्यांच्या गर्दीने भरून वाहत होता. ग्रामीण भागातील नवं जोडपं चौकात आलं आणि बाइकवर नवऱ्याला बिलगून बसलेल्या बायकोचं लक्ष अनिल कपूरकडे जाताच, ती किंचाळलीच. 'अहो, अनिल कपूर आलाय... गाडी थांबवा.' दुपारचे साडेबारा वाजलेले. ऊन मी म्हणत असताना जोतिबा डोंगर गाठण्याचे वेध लागलेल्या पतीमहोदयांनी बायकोची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 'जोतिबा काय ओ... नंतर जाता येईल, अनिल कपूरला इतक्या जवळून पाहता येणार नाही. घ्या गाडी बाजूला' म्हणत सौभाग्यवतींनी मोबाइल उंचावत पडद्यावरच्या लखनला क्लिक केले आणि मग या नव्या जोडप्याने जोतिबाची वाट धरली.

०००

(अनुराधा कदम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्फाकिडसतर्फे १६ पासून उन्हाळी शिबिर

$
0
0

अल्फा किड्सतर्फे

उन्हाळी शिबिर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुईकर कॉलनी परिसरातील अल्फा किड्स इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. १६ ते ३० एप्रिल या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी १ यावेळेत शाळेत हे शिबिर होणार आहे. २ ते ८ वर्षापर्यंतच्या मुलांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे. शिबिरात निर्मितीचा आनंद देणाऱ्या गोष्टींसह डीप ब्ल्यू सी, यंग सायंटिस्ट असे उपक्रम शिकवण्यात येणार आहेत. या शिबिराचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन अल्फा किड्स इंटरनॅशनलच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लव्ह यू कोल्हापूर

$
0
0

लोगो : मी कोल्हापूरचा

कोल्हापूरनं मला समृद्ध केलं

- अशोक वाडकर

नियती काही अगम्य गोष्टी घडवून आणत असते. तसंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं. माझे वडील यळगूडहून कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कोल्हापूर संस्थानातील नोकरीसाठी आले. पुढे संस्थान विलीन झाल्यावर इथल्या पोलिस खात्यातून सेवानिवृत्ती घेतली. साहजिकच माझी जडण-घडण बव्हंशी कोल्हापुरात झाली. इथेच माझी जीवनवेल बहरत गेली. या माझ्या वाटचालीत मला इथल्या विविध क्षेत्रातल्या डोंगराएवढ्या माणसांचा स्नेह आणि साथसंगत लाभली. परिणामी माझी जडण-घडण व पुढील कार्यसिद्धी सुलभतेने होत गेली.

कोल्हापूरच्या दिलदार मातीचा गुणच जणू माझ्या कामी आला असावा! कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मेन राजाराम हायस्कूलमधून स्कॉलरशीपवर मी टेक्निकल विषयासह एसएससी व ड्रॉइंगची इंटरमिजीएट केली. भाषा हा माझा आवडीचा विषय. त्यामुळे मराठी, हिंदी व इंग्रजीत विशेष प्राविण्य मिळविले. शालेय जीवनात रुजलेले साहित्याचे बीज पुढे अंकुरत गेले. महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयनेच्या भुकंपानंतर आठवड्याभरात एका दैनिकात माझा विद्यार्थीदशेत असतानाच भूकंपावरचा एकमेव लेख प्रसिद्ध झाला. त्याचे यथोचित स्वागत झाले. त्याच वर्षी कोल्हापूर पॉलिटेक्निकच्या वार्षिकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच माझ्या काव्यास व इतर लेखनास कोल्हापुरातील अनेक नामांकित दैनिकांनी व दिवाळी अंकांनी सातत्याने प्रसिद्धी दिल्याने साहित्यात मी पुढे दमदार मुशाफिरी करू लागलो. पुढे हा परीघ महाराष्ट्रभर विस्तारत गेला. सांगली व कोल्हापूर आकाशवाणीने काव्यवाचनाची संधी दिली. पुढे पुणे आकाशवाणीचा मी मान्यताप्राप्त कवी झालो. सन्मित्र शशी गजवानी यांच्या 'राखणदार'चे गाजलेले निसर्गगीत व कोल्हापूरच्या प्रवेशद्वारातील महाराणी ताराबाई यांच्या भव्य देखण्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगीचे स्वागतगीत लिहिण्याची संधीही मला कोल्हापूरनेच दिली. कोल्हापूरच्या सांगीतिक क्षेत्रातल्या सृजनशील रसिक कलावंतांनी माझे दोन हिंदी ऑडिओ अल्बम करण्यात मोलाची साथ केली. इथेच मला काही नियतकालिकांचा संपादक म्हणून कार्य करता आले. माझ्या कोल्हापुरातील साहित्यिक कार्यास राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले.

कोल्हापुरात १९८१ च्या दरम्यान साहित्यिक चळवळींचे वारे वाहू लागले. तेव्हा कोल्हापुरातली ज्येष्ठांपासून नवोदितांपर्यंत अनेक लिहिती मंडळी एकमेकांच्या स्नेहबंधांनी एकत्र आली. त्यात मलाही सामील होता आले. त्यातूनच माझे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्र विस्तारत गेले. कोल्हापुरात चंद्रकुमार नलगे यांच्या पुढाकाराने व अन्य साहित्यप्रेमींच्या धडपडीतून व जिद्दीतून कोल्हापुरात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने द.म.सा.चे पहिले साहित्यसंमेलन १९८२ साली कोल्हापुरात शाहुमहाराजांनी बांधलेल्या पॅलेस थिएटरात (सध्याचे केशवराव भोसले नाट्यगृहात) राजेशाही दिमाखात संपन्न झाले. तेव्हा आम्ही उत्साही साहित्यप्रेमी लेखक-कवी मंडळी आपापल्यापरीने सहभाग नोंदवत होतो. ही सारी देण होती करवीरच्या रसिक मातीची! त्यानंतर द.म.सा.ची संमेलने व काव्यवाचन यांची परंपरा पुढे चालू राहिली. सिव्हिल इंजिनिअरिंगला असताना वास्तुरचनांची पुस्तके वाचनात आल्याने माझा कल वास्तुकलेकडे झुकत राहिला. शिवाय कोल्हापुरात त्याकाळी आर.एस. बेरी यांच्या व इतरांच्या आधुनिक धाटणीच्या काँक्रिटच्या वास्तूरचना दिमाखात उभारत होत्या. त्या अभ्यासण्यातही माझे मन रमू लागले. त्यातूनच माझ्यातला वास्तुशिल्पी घडत गेला. कोल्हापूर महानगरपालिकेचे पहिले द्रष्टे प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी मला त्यांच्या तत्कालीन 'सुंदर कोल्हापूर'या योजनेत आर्किटेक्ट व इंजिनिअर या नात्याने सहभागी होण्याची संधी दिली. अशाप्रकारे जडण-घडणीपासून आजवरच्या घटितांनी माझी जीवनयात्रा समृद्ध होत गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर सॅल्युटने विमानाचे स्वागत

$
0
0

कोल्हापूर विमानतळावर एअर डेक्कनचे विमान 'ट्रायल रन' साठी कोल्हापूर विमानतळावर दुपारी तीन वाजता दाखल झाले. या विमानाचे स्वागत अग्निशामक दलाच्या वाहनांतून 'वॉटर सॅल्यूट' देऊन करण्यात आले. ( अर्जुन टाकळकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान कोल्हापूर


गणेश खोडके कॉलम

$
0
0

तटबंदींमुळे झाले चौकात रुपांतर

- गणेश खोडके

युद्धप्रसंग उद्‌वण्याचा धोका संपला होता. पण रयतेस कोटाच्या बाहेर वस्ती करायला सांगितल्यास ती तयार होणार नाही म्हणून स्वत: छत्रपतींनी इ. स. १८७७ च्या सुमारास कसबा बावड्याच्या माळावर नवीन राजवाडा या भव्यदिव्य वास्तूची उभारणी करण्यास प्रारंभ केला. नवीन राजवाड्याचे बांधकाम १८८४ साली पूर्ण झाले. स्वत: छत्रपती कोटाच्या बाहेर रहायला गेल्याने टप्प्या टप्प्याने इतर वस्तीही कोटाच्या बाहेर विस्तारू लागली.

या दरम्यानच इ. स. १८७३ ते १८८९ च्या सुमारास तत्कालीन कोल्हापूर सिटी म्युनसिपालीटीने कोटाची तटबंदी व बुरूज पाडण्याचा व कोटाच्या सभोवती असणारा संरक्षक खंदकही मुजविण्याचा निश्चय केला व तटबंदी बुरुज खंदकातच पाडून खंदक मुजविण्यात आला. फक्त या भव्य तटबंदीचे प्रतिक म्हणून रविवार वेशीजवळ थोडी तटबंदी बुरूज व तेथील वेशीचा दरवाजा हे अवशेष आठवण म्हणून जतन केला गेला.

या कोट कोल्हापूरला ज्या प्रमुख सहा वेशी होत्या त्यापैकी सध्याचे बिंदूचौकात असणारी तटबंदी, बुरुज हे पाहिल्यानंतर आपल्याला कोट कोल्हापूरची भव्यता समजून येते. या ठिकाणी जी वेस होती तिला आदिववार वेस अथवा रविवार वेस म्हणून ओळखले जात होते. सध्याचा मिरजकर तिकटी परिसर या ठिकाणी होती मंगळवार वेस. याच चौकात सध्याचा गुणे डॉक्टरांच्या दवाखान्याकडून दैवज्ञ बोर्डिंगकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याचे कॉर्नरला तटबंदीतील काही दगडी भिंतीचे अवशेष आजही पहावयास मिळतात. येथून पुढे शिवाजी पेठेजवळील निवृत्ती चौकाजवळील शिवाजी महाराज अर्धपुतळा चौकात होती. वरुणतीर्थ वेस येथून पुढे आल्यावर सध्याचे रंकाळा एस. टी. स्टॅंडच्या परिसरात होती रंकाळा वेस. येथून पुढे आल्यावर गंगावेश चौकात होती गंगावेस व पुढे आल्यावर महापालिका व शिवाजी महाराज चौक परिसरात होती शनिवार वेस. अशा या प्रमुख सहा वेशी होत्या. या ठिकाणी असणारे भव्य बुरुज व तटबंदीमुळेच पुढे या ठिकाणांचे चौकात रुपांतर झाले. सध्या आपण मेन राजाराम हायस्कूल पासून बिंदू चौकात जाण्याचा जो रस्ता आहे. त्या रस्त्यावरुण आपण ज्या कमानीतून बाहेर पडतो तो दरवाजा हा मुख्य दरवाजा नाही. जो आदिवतार वेशीचा प्रमुख दरवाजा होता तो सध्या बिंदू चौकातील जेलच्या आवारात अस्तित्वात आहे. जेलच्या सुरक्षेच्या कारणास्तव सदर दरवाजा बंद केलेला आहे व रहदारीच्या सोईच्या दृष्टीने तटबंदी फोडून सध्याचा दरवाजा तयार केलेला आहे.

(लेखक कोल्हापूर पुराभिलेख कार्यालयात पुराभिलेखाधिकारी आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदय गायकवाड कॉलम

$
0
0

शैलीचाही आम्हाला अभिमान

- उदय गायकवाड

पर्यावरण अभ्यासक

आठव्या शतकापासूनची सुमारे हजार वर्षाची काष्ठशिल्पे कोल्हापूर शहरात आहेत. त्यांच्या शैलीनुसार वर्गीकरण किंवा त्याचा कालखंड ठरतो. काही वस्तू या भिन्न शैलीत असल्या तरी त्या एकजीनशी झाल्या आहेत. एकाच शहरात अशा भिन्न शैलीच्या इमारती, वास्तू असणं याचा कोल्हापूरकरांना अभिमान आहेच. हेमाडपंथी, जैन, दक्षिणात्य, मुघल, मराठा गॉथिक, ख्रिस्त, इंडो सार्सनिक अशा बहुरंगी शैलीचा वारसा या शहराला दिला.

हेमांडपंथी शैली असं संबोधल्या जाणाऱ्या वास्तुशिल्पांमध्ये दगडाचे अखंड कोरीव खांब दगडी जोत्यावर उभे करून त्यावर अडक असलेल्या दगडी तुळयांची रचना हे या शैलीचे वैशिष्ठ्य आहे. अशाच रचनेचा छत तयार होत. अर्थातच निसर्गत: या परिसरात उपलब्ध झालेल्या बेसाल्टचे अखंड दगड या शैलीला प्रोत्साहन देण्याचं कारण ठरतात. अंबाबाई, रंकवैभव, विठ्ठल मंदिरासह संध्यामठ हा देखील या शैलीचे वैभव दाखवितात. त्यावर असलेलं कोरीव काम हे त्या वास्तूंना अधिक देखणं बनवतात.

जैन शैलीचा काही काळ कोल्हापूरला लाभला. अंबाबाई मंदिराच्या परिसरात चंद्र-सूर्यमंदिराच्या पिछाडीस नवग्रह मंडप, विष्णू मंदिराचे छत अशा काही ठळक वास्तूचे अवशेष जैनशैलीचा परिचय देतात. माऊंट अबूच्या मंदिरातील छताचे साधर्म्य विष्णू मंदिराच्या छताशी हुबेहूब दिसून येते. शहरात इतर अनेक जैन मंदिरे, मठांचे बांधकाम दरम्यान मुळ जैन शैली नसली तरी त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसून येतो.

नगारखान्याची इमारत, पंचगंगा घाटावरील काही मंदिरे आणि विशेषत: दीपमाळा या अस्सल मराठमोळ्या बाज दर्शवितात. त्याच्या रचनेमध्ये काही वेळा मुघल शैलीचा प्रभाव दिसत असला तरी त्याच्या निर्मितीचा कालखंड विचारात घेतला तर मराठी राजवटीच्या त्या खुणा आहेत हे नक्की होते.

नवीन राजवाडा, शालिनी पॅलेस, मेन राजाराम हायस्कूलची वास्तू या इंडोसर्सिनिक शैलीतील आहेत. मुघल आणि मराठा शैलीचा हा मेळ आहे. त्या कालखंडातील कारागीर आणि साधने यामुळे ती दृढ झाली असावी. नगारखान्याच्या इमारतींशिवाय इतर इमारतीमध्ये अनेक बदल काही अपघातानंतर किंवा दुरुस्तीच्या कारणाने झाले असावेत. काही मशिदी, कमानी असलेले घुमटाकार रचना असलेल्याा वास्तू या मुघल शैलीच्या आहेत हे दिसून येते. वसाहतीच्या कालखंडातील ख्रिश्चन शैलीचे चर्च मुख्य पोष्ट ऑफिससमोर आहे. त्याच कायातील काही बंगले याच परिसरात बांधले गेले. जिल्हाधिकारी निवासासारख्या इमारती त्याचे उदाहरण आहे. टाऊन हॉलची इमारत ही उंच टोकदार कमानीचे दरवाजे आणि खिडक्या, लाकडाचा आणि विटेचा वापर करुन उभारलेल्या दिसतात. सी. पी. आर.ची इमारत ही समीश्र स्वरुपात दिसते. औद्योगिक क्रांतीच्या काळातील काही बदल हे खुणांच्या स्वरुपात दिसतात. धातूचे जीने, रेलींग इत्यादी बाबी नोंद देतात. गोलाकार जीन्याची रचना हे या इमारतीमध्ये आपले वेगळेपण दाखवतात.

रंकाळा टॉवर आणि त्याखालची रचना असलेली वास्तू ही मराठा-मुघल अशी मिश्रशैली दिसते. काही शिलालेख हे कानडीमध्ये आहेत. त्या ठिकाणी पूर्ण रचना कर्नाटकी किंवा दाक्षिणात्य नसली तरी त्याचा काही ठिकाणी प्रभाव दिसतो. कदंब, चालुक्य, बदामी अशा विविध शिल्पामधून संमिश्र अशी रचना नेमकेपणाने दिसत नसली तरी त्याचा प्रभाव दिसतो.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून अगदी अलिकडे बांधलेल्या न्यायालयाच्या इमारतीकडे पहाताना हाच वारसा पुढे समकालीन झालेला वाटतो. कोल्हापूरला यादव, सातवाहन, कदंब, चालुक्य अशा शैलीसह मुघल, मराठा, ख्रिश्चन शैलीची वहिवाट सुरू राहिलेली दिसते. ही वास्तूशिल्पांच्या शैलीचा वारसा जपणारी आहे. अभ्यास, ओळख, संरक्षण, संवर्धन अशा सर्वच टप्प्यावर आपण या वारशाला जपणं आवश्यक आहे. समकालीन नव्या मांडणीमध्ये अशा शैलींचा मेळ दिसला तर आश्चर्य न मानता त्या परंपरेला, वारसा जपण्याचा प्रयत्न ठरेल. त्याचा अभिमान तर आहेच. कोल्हापूर बहूविधशैलीचा वारसा जपणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांना साखर खरेदीची प्रतीक्षा

$
0
0

कारखानदारांना साखर खरेदीची प्रतीक्षा

दीड महिन्यानंतरही सरकारची घोषणा हवेत, राज्य संघाची अनुदान देण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३,२०० रुपये प्रतिक्विंटल दराने साखर खरेदीचा निर्णय जाहीर केला. मात्र, एक महिन्यानंतर साखर खरेदीची अंमलबजावणी झालेली नाही. सहकारमंत्र्यांच्या घोषणेनुसार सर्वच कारखान्यांचा २५ टक्के कोटा कमी होणार असल्याने कारखानदारांना साखर खरेदीची प्रतीक्षा लागली आहे. साखर खरेदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे साखर उद्योगाकडे लक्ष लागले आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये संपूर्ण देशामध्ये साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. अंदाजित उत्पादनापेक्षा तब्बल ४५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाल्याने उत्पादित झालेली साखर विक्रीसाठी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील शुल्क काढून टाकले, पण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल दर २,१०० रुपये असल्याने साखर निर्यात केली, तरी त्याचा फटका साखर उद्योगाला पर्यायाने कारखान्यांना बसणार आहे. यामुळे देशासह राज्यातील साखर कारखाने अडचणी येणार आहेत. यामधून मार्ग काढण्यासाठी २७ फेब्रुवारीला सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांनी कारखान्यांकडून साखर खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला.

सहकार मंत्र्यांनी सर्वच कारखान्यांकडील उत्पादित झालेल्या साखरेपैकी २५ टक्के साखर प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कारखान्यातील साखर साठा कमी होऊन एफआरपी देण्यासाठी फायदा होणार होता. मात्र निर्णय जाहीर होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाला, तरी या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. सहकारमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर तब्बल दीड महिन्यांतर मंत्रिमंडळासमोर साखर खरेदीचा मांडण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच सरकारच्या साखर खरेदीचा प्रश्न निकालात निघणार आहे. त्यामुळे संपूर्ण साखर उद्योगाचे मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले असतानाच राज्य सहकारी बँकेने साखर मूल्यांकनात पुन्हा घट केली आहे. या निर्णयामुळे कारखान्यांना शॉर्ट मार्जिनला सामोरे जावे लागणार असल्याने सरकारच्या निर्णयावरच कारखान्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

चौकट

५७६ कोटींची एफआरपी थकीत

जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. सुरुवातीच्या महिन्यात उत्पादकांना एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाली. त्यानंतर साखर दरांमुळे उत्पादकांना निश्चित केलेल्या एफआरपीपेक्षा कमी रक्कम देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील २२ कारखान्यांकडे उत्पादकांची ५७६ कोटींची एफआरपी थकीत राहिली आहे. साखर खरेदीचा निर्णय वेळेत न झाल्यास त्याचा फटका उत्पादकांना बसणार आहे. एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने बँकांची कर्जे घेतलेल्या कर्जदारांना जादा व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

चौकट

५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

केंद्र सरकारने देशांतर्गत साखरेचा उठाव करण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला. त्याप्रमाणे राज्याला सहा लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी मिळाली. राज्यातून सहा लाख टन साखर निर्यात झाली, तरी साठा कमी होणार नसल्याने राज्य साखर संघाने निर्यात कोटा दहा लाख मेट्रिक टन वाढविण्याबरोबरच प्रतिटन पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ नगर

$
0
0

अंत्यसंस्कारावेळी रस्ता रोको

औरंगाबाद येथे पोस्टमार्टेम झाल्यावर संजय कोतकर व वसंत ठुबे यांचे मृतदेह रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास केडगाव येथे आणण्यात आले. या खून प्रकरणातील आरोपी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना तातडीने अटक करावी तसेच सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांना निलंबित करण्याची मागणी करीत काही युवकांनी दोन्ही मृतदेहांसह नगर-पुणे रस्त्यावरील नेप्ती रोड चौकात बसून रस्ता रोको सुरू केला. अखेर ही कारवाई होण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार अनिल राठोड यांनी सांगितल्यावर दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आले. रात्री सव्वा आठच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले. या वेळी मोठी गर्दी झाली होती. पोलिस पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पालकमंत्री फिरकलेच नाहीत

शिर्डी येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होता; मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिर्डीला येणे टाळले. त्या ऐवजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. शिर्डीत येऊनही पालकमंत्र्यांनी नगरला येणे मात्र टाळले. त्याची वेगळी चर्चा शहरात होती. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि गुलाबराव पाटील या मंत्र्यांनी आपले नगर जिल्ह्यातील नियोजित दौरे रद्द केले. तर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि दीपक केसरकर मात्र नगरला येऊन दिवसभर थांबले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन ...

$
0
0

मधुकर गांधी

कोल्हापूर

जरग नगर येथील मधुकर नारायण गांधी वय ७९ यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा मुलगी, जावई ,नातू असा परिवार आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images