Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भाई वैद्य यांना आदरांजली

$
0
0

वैद्य यांना आदरांजली

कोल्हापूर : जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, जिल्हा सर्वोदय मंडळ, म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूल, जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना आदरांजली वाहण्यात आले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. माने होते. खादी संघाचे अध्यक्ष सुंदर देसाई, दादासाहेब जगताप, प्रा. सदाशिव मनुगडे, प्रा. सुजय देसाई, प्रा. आशा कुकडे, प्रा. डी. डी. चौगले, एम. आर. चौगले, आबाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एस. एस. तुपद, सखाराम सुतार, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत बांधकामांवर आज हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित टाकलेल्या जागेवर अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामावर बुधवारी हातोडा पडणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कारवाईला प्रारंभ होणार असून यामध्ये महापालिकेचे सुमारे ३०० कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. आयुक्त अभिजित चौधरीही कारवाई दरम्यान उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात १९ इमारतीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंतासह चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता असे ४० चाळीस अधिकारी सहभागी होणार आहेत. महापालिका प्रशासनाने या कारवाई संदर्भात सक्त सूचना दिल्या आहेत. महापालिकेने तावडे हॉटेल परिसरातील जागेवर ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व नो डेव्हलपमेंट झोन असे आरक्षण टाकले आहे. ही संपूर्ण जागा महापालिकेच्या मालकीची आहे. मात्र गांधीनगर येथील व्यापाऱ्यांनी उचगाव ग्रामपंचायतीकडून दाखला घेत याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. महापालिकेच्या सर्व्हेनुसार तब्बल दहा लाख चौरस फुटापर्यंत बांधकाम झाले आहे. दुमजली, तीन मजली इमारती, दुकानगाळे उभारले आहेत.

आरक्षित जागेच्या मालकी हक्कावरुन महापालिका आणि उचगाव ग्रामपंचायतीमध्ये कायदेशीर लढाई झाली. कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीचा असल्याचा निकाल दिला आहे. या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी कावळा नाका येथील ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय येथे जमणार आहेत. सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. कारवाईत आठ डंपर, चार जेसीबी, दोन पोकलँड, दहा ब्रेकर अशी यंत्रसामग्री असेल. महापालिका पहिल्या टप्प्यात १९ इमारतीवर कारवाई करणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांना कारवाईच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. महापालिकेत चारही विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. अनधिकृत बांधकामाच्या कारवाईवरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा झाली. कारवाईला विलंब होत असल्याच्या कारणावरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरू

$
0
0

'त्या' पोलिसांची चौकशी

महिलांची तक्रार न घेणे भोवणार; डॉ. अमृतकर यांनी मागवली माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छेडछाड, धमकी देणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या महिलांची तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश शहर डीवायएसपी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी मंगळवारी दिले. याबाबत तीन एप्रिल रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये 'महिलांच्या तक्रारी बेदखल' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत डॉ. अमृतकर यांनी चौकशीचे आदेश दिले.

तरुणांकडून दिली जाणारी धमकी, अश्लील फोन, मेसेज, नवऱ्याकडून होणारी मारहाण याविरोधात पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महिला व युवतींची तक्रार न घेता त्यांच्यावरच आक्षेपार्ह टिपण्णी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले होते. तक्रारी दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी या तरुणींनी शहरातील सामाजिक संस्थांकडे केल्या होत्या. महिला सुरक्षेबाबत निर्भया पथकासारख्या मोहिमा राबवल्या जात असताना पीडित महिलांची साधी तक्रारही दाखल करून घेण्यासाठी काही पोलिसांचे असहकार्य असल्याचे चित्र दिसून येत आहे. मार्च महिन्यात जुना राजवाडा पोलिस ठाणे, करवीर पोलिस ठाण्यात पुरुष पोलिसांसह महिला पोलिस कर्मचाऱ्यांनीही युवतींच्या तक्रारीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता.

मंगळवारी याबाबत डॉ. अमृतकर यांनी गेल्या दोन महिन्यांत संबधित पोलिसांकडे कोणता कार्यभार होता, किती महिलांनी तक्रार दाखल केल्या आहेत, त्याची काय कार्यवाही केली आहे, याची माहिती मागवली आहे. तसेच ज्या युवती व महिला तक्रार देण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्यांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या नाहीत, अशी ज्यांची तक्रार आहे त्या युवतींशी सामाजिक संस्थांच्या मदतीने संपर्क साधण्याचे आदेशही डॉ. अमृतकर यांनी दिले आहेत.

महिलांनी तक्रार देण्यासाठी धाडस दाखवावे, असे आवाहन पोलिस खात्यामार्फत करण्यात आले आहे. मात्र तरीही काही पोलिसांकडून तक्रारदार महिलांना सहकार्य मिळत नसल्याचे चित्र माध्यमांनी समोर आणले आहे. याची दखल घेऊन महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीडित महिलांशी संपर्क साधून त्यांना न्याय देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

डॉ. प्रशांत अमृतकर, शहर डीवायएसपी

समाजात होत असलेल्या छेडछाडीने अनेक युवती त्रस्त आहेत. पालकांच्या व संबंधित सडकसख्याहरीच्या भीतीने अनेक युवती तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने छेडछाड करणारे युवक मोकाट फिरतात. मात्र ज्या युवती धाडसाने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंत जातात त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा प्रकार गंभीर आहे. यासंदर्भात गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे.

गीता हासूरकर, सामाजिक कार्यकर्त्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारिप बहुजन महासंघ निवेदन

$
0
0

भारिपचे निवेदन

कोल्हापूर : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी राज्य बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात-बारा कोरा करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रिया कांबळे, उपाध्यक्ष समीर पटेल, धनपाल कांबळे, विनोद कांबळे, सुनीता जाधव, आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल .. ५ साठी

$
0
0

सिंगल फोटो

...........

स्वीकृत सदस्यपदी

अभिजीत पाटील यांची निवड

जयसिंगपूर

कुरुंदवाड नगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी निवडीची घोषणा करताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. स्वीकृत सदस्य निवडीसाठी मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सभा झाली. कुरुंदवाड नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची युती आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, जवाहर पाटील, सुनिल चव्हाण, फारूक जमादार, दीपक गायकवाड, मुमताज बागवान, गीता बागलकोटे, समरीन गरगरे आदी सदस्य उपस्थित होते

.........

फोटो - तेजस्विनी

तेजस्विनी करजगारचे यश

इचलकरंजी

महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झामिनेशन, पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तेजस्विनी राजेंद्र करजगार हिने इंग्रजी स्टेनोग्राफी १२० शब्द प्रतिमिनिट स्पिडमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला .

तिला रशिद शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

.............

नैराश्यातून एकाची आत्महत्या

इचलकरंजी

येथील आसरानगर परिसरातील अशोक आण्णाप्पा खोत (वय ४९) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी त्यांचे भाऊ धनपाल आण्णाप्पा खोत यांनी गावभाग पोलिस ठाण्यात दिली आहे. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा प्रचार

$
0
0

फोटो

..............

लोगो... आजरा नगरपंचायत निवडणूक

....................

मंत्रालय माहीत तरी आहे का?

आमदार हाळवणकर यांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'शहर विकास आघाडीचे नेते अशोक चराटी यांनी रात्रीचा दिवस करून नगरपंचायत मंजूर करून घेतली. त्यासाठी सातत्याने मंत्रालयात येऊन आम्हा आमदार व मंत्र्यांचा पाठपुरावा केला. आजारपण असतानाही त्यांनी मुंबईच्या चाळीस फेऱ्या केल्या. याचे श्रेय म्हणून चराटींना नगराध्यक्षपद देऊन निवडणूक बिनविरोध करायला हवी होती. पण त्याऐवजी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीवाले विकासाची भाषा करू लागलेत. पण त्यांना मुंबईचे मंत्रालय तरी माहीत आहे काय', असा टोला आमदार सुरेश हाळवणकर यांनी विरोधी आघाडीच्या स्थानिक नेत्यांना लगावला.

आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या शहर विकास आघाडीच्या येथील भगवा रक्षक चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक प्रमुख उपस्थित होत्या. हाळवणकर पुढे म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात नगरपंचायतसाठी प्रयत्न केले म्हणणाऱ्यांनी मग मंजुरी का आणली नाही. त्यांच्या नेत्यांनी ती का दिली नाही, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करावे आणि लोकांना खरे काय ते सांगावे.'

शौमिका महाडिक म्हणाल्या, 'आपल्या प्रकृतीची काळजी न करता आपला गाव आणि माणसांच्या विकासाची आस मनात ठेवून जो कष्ट करतो, अशा व्यक्तीलाच आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्या.'यावेळी माजी महापौर सुनील कदम, हिंदुराव शेळके यांचीही भाषणे झाली.

.............

चौकट-

एक रुपया आणलेला दाखवा

'मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची विकासाचीच भाषा होती. म्हणून माझा पराभव करून तुम्ही यांना निवडून दिले. मी माझा पराभव मान्य करतो. पण त्यानंतर सव्वा-वर्षाच्या कालावधीत यांनी आजरा शहर आणि परिसराच्या विकासासाठी किती निधी आणला? एक रुपया जरी आणला असेल, तर कोणीही दाखवून द्यावे. तरीही विकासाच्या भूलथापा अजूनही ते करीत आहेत. त्याला भुलायचे की नाही, हे आता मतदारांनी ठरवावे', अशी टीका अशोक चराटी यांनी जयवंतराव शिंपी यांचे नाव न घेता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी...४ एप्रिलसाठी

$
0
0

पारितोषिक वितरण: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या शहाजी वार्तापत्र प्रकाशन व सुषमा कडोलकर स्मृती संशोधन पारितोषिक वितरण , स्थळ : शहाजी कॉलेज, वेळ : सकाळी १० वा.

चित्रप्रदर्शन: श्रृती शहा, तृप्ती गोमसे, महेश तळपे, तुषार देसाई या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक कलादालन, वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वा.

भीमवंदना : संवेदना सोशल फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमवंदना संगीतमय कार्यक्रम, सहभाग : गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, स्थळ : शिवाजी स्टेडियम, वेळ : सायंकाळी ६ वा.

प्रवचन : सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवामंडळातर्फे सु. ग. शेवडे यांचे प्रवचन, स्थळ: अंबाबाई मंदिर कारंजा चौक, वेळ : सायंकाळी ७.३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानांचा मार्ग मोकळा

$
0
0

पान ४ मेन

..............

फाइल फोटो

............

दारू दुकानांचा मार्ग मोकळा

निकषांमध्ये केले बदल, प्राधिकरण हद्दीतील महामार्गांवरील दुकाने सुरू

..............

पॉंइटर

पाच हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावात मिळणार परवाना

दारू दुकानांची संख्या वाढणार

औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळीही वाढणार दारूविक्री

सरकारच्या महसुलात भर पडणार

दारू दुकानांची संख्या - १०२५

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर

प्राधिकरण हद्दीसह पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात दारू विक्री दुकानांना परवाना देण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. याशिवाय पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर अंतरातील दारू विक्री दुकानेही पुन्हा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. नव्या धोरणानुसार औद्योगिक वसाहत आणि पर्यटनस्थळीदेखील दारू विक्रीची दुकाने वाढणार आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीत घसघशीत भर पडणार आहे.

एप्रिल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारू विक्री दुकानांना कुलूप लागले होते. या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील ७० टक्के दारू दुकाने बंद झाली होती. सप्टेबर २०१७ मध्ये या निर्णयातून शहरातील बाधित दुकानांना वगळण्यात आले. उर्वरित दुकाने पूर्ववत सुरू राहावित यासाठी विक्रेत्यांकडून सरकार दरबारी फेऱ्या सुरू होत्या. दारू विक्री सुरू राहावी यासाठी सरकारने अखेर तोडगा काढला आहे. प्राधिकरण किंवा ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा सरकारने मंजूर केला आहे अशा गावांच्या हद्दीतील महामार्गावरील पूर्वीची बंद दुकाने सुरू करण्यासह नवीन दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ज्या गावातील लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे अशा गावात आणि त्या गावातून जाणाऱ्या महामार्गांलगत दारू विक्रीला परवानगी मिळणार आहे. विशेष म्हणजे जागतिक वारसा पर्यटन स्थळ (तीर्थस्थळे वगळून) आणि औद्योगिक वसाहतींमध्येही दारू विक्रीला परवानगी दिली आहे. ३१ मार्चला नवीन नियमांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सरकारच्या नव्या धोरणामुळे दारू विक्री दुकानांची संख्या वाढणार आहे. दोन दुकानातील अंतराची अटदेखील रद्द झाली आहे, त्यामुळे दारू दुकानांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. वाढत्या दुकानांचा फायदा सरकारला होणार असून, यातून भरघोस महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. याशिवाय अवैध मद्यविक्री बनावट मद्यनिर्मिती आणि विक्रीलाही आळा बसेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवीन परिपत्रकाची माहिती मिळताच पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील इच्छुकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जुन्या दुकानांचे परवाने नुतणीकरण करण्याचेही काम या विभागाने तातडीने सुरू केले आहे. या निर्णयामुळे सध्या बंद असलेली जिल्ह्यातील बहुतांश दारू दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चौकट

प्राधिकरणातील ४३ गावांचा समावेश

कोल्हापूर शहराच्या आसपास असेलल्या ४३ गावांचा समावेश प्राधिकरणमध्ये केला आहे. सरकारच्या नव्या निर्णयाने या सर्व गावात नव्याने दारू दुकाने सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणच्या हद्दीत परवाना मिळवणे कमी खर्चिक असल्याने अनेक इच्छुकांनी परवाना मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. अंतराचीही अट नसल्याने प्राधिकरण हद्दीत दारू दुकानांची संख्या वाढणार आहे.

..................

चौकट

असे आहेत नवीन निकष

पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत (२०११ च्या जणगणनेनुसार)

औद्योगिक वसाहती

जागतिक वारसा पर्यटन स्थळ (तीर्थक्षेत्र वगळून)

विकास आराखडा मंजूर असलेल्या ग्रामपंचायत

....................

कोट

' नवीन परिपत्रकामुळे दारू विक्री दुकानांची संख्या वाढणार आहे. महामार्गावरील ५०० मीटर अंतरातील अटीमुळे बंद असलेली अनेक दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे महसूलवाढीसह अवैध दारू विक्रीला आळा बसेल.

गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इ कचरा

$
0
0

सिंगल फोटो

...............

इ कचरा संकलनातून

विद्यार्थ्यांना मदत

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

वाढदिवस नेत्याचा असो अथवा कार्यकर्त्याचा, हार अन् पुष्पगुच्छांचा वर्षाव ठरलेला असतो. मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल उर्फ बिट्टू शहा यांनी वाढदिनानिमित्त शहरातील ई कचरा संकलित केला. या कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावून त्यातून मिळणाऱ्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे.

संगणक, प्रिंटर, फॅक्स, दूरध्वनी, मोबाईल, वॉशिंग मशिन, टीव्ही, मिक्सर यासह अन्य इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर वाढल्याने ई कचऱ्याची समस्या वाढली आहे. त्याची विल्हेवाट लावायची कशी हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शहा यांनी आपल्या वाढदिनी पुष्पगुच्छांऐवजी इ कचरा देण्याचे सोशल मिडीयावरून आवाहन केले होते. शहा यांच्या या आवाहनास मित्रपरिवाराने प्रतिसाद दिला.

इ-कचरा निर्मूलन उपक्रमातून सुमारे ८०० किलो इ-कचरा जमा करण्यात आला. इ कचऱ्याबरोबरच मित्रपरिवाराने तब्बल चार हजार वह्या भेट दिल्या. या वह्या आता समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. पर्यावरण सरंक्षणासाठी शहा यांच्याकडून इ कचरा संकलन उपक्रम राबविण्यात येत असून यास बळ मिळत आहे.

...........

'आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला असून ८०० किलो इ कचरा संकलित झाला आहे. हा इ कचरा योग्य पध्दतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात येणार असून यातून मिळणाऱ्या पैशातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल.

-स्वप्निल शहा, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायव्यवस्था सुकर करणारे पुस्तक

$
0
0

(फोटो आहे)

'न्यायव्यवस्था सुकर करणारे पुस्तक'

अॅड. डी. बी. भोसले यांच्या पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ वकील डी. बी. भोसले लिखित महसूल कायदे आणि त्यासंबंधी काही खटल्यांची माहिती देणाऱ्या 'लॉ रिलेटिंग टू द रेकॉर्ड ऑफ राइट्स' या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी झाले. कसबा बावडा येथील न्यायसंकुलात झालेल्या प्रकाशन समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुस्तकाची उपयुक्तता स्पष्ट केली. वकील, न्यायाधीश आणि पक्षकारांसाठी न्यायव्यवस्था सुकर करणारे हे पुस्तक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ वकील डी. बी. भोसले यांनी गेली ५५ वर्षे या क्षेत्रात काम केले आहे. महसूल कायद्यांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांनी दहा वर्षांपूर्वी 'लॉ रिलेटिंग टू द रेकॉर्ड ऑफ राइट्स' या पुस्तकाचे लेखन केले. या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. लवेकर होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'अॅड. भोसले यांच्या वकिलीतील अनुभवाचे सार पुस्तकरूपाने तयार झाले आहे. या क्षेत्रात दहा वर्षांत एखाद्या पुस्तकाच्या चार आवृत्त्यांचे प्रकाशन होणे यावरूनच पुस्तकाची उपयुक्तता स्पष्ट होते. ब्रिटिशकालीन महसूल कायद्यात फारसे बदल झालेले नाहीत. याबाबत लोकाभिमुख बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी अॅड. भोसले यांचे पुस्तक उपयुक्त ठरत आहे. महसूल कायदा ज्या सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आहे, त्यांनाच कायद्याची माहिती नसते. वकील, न्यायाधीश आणि पक्षकार या सगळ्यांसाठी न्यायव्यवस्था सुकर करणारे हे पुस्तक ठरेल.'

पुस्तकाचे लेखक अॅड. भोसले यांनी महसूल कायद्यांबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'महसूल कायदे सोपे करणे गरजेचे आहे. क्लिष्ट कायद्यांमुळे पक्षकारांना वेळेत न्याय मिळत नाही. चुकीच्या गोष्टींचा उल्लेख खटल्यांमध्ये होतो. हे होऊ नये, यासाठी सोप्या भाषेत महसूल कायदे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी पुस्तकाद्वारे केला आहे. वकील आणि न्यायाधीशांनाही याचा फायदा होईल.' यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. लवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयातील सातवे जिल्हा न्यायाधीश सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत मोरे, सचिव किरण पाटील, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, आदी उपस्थित होते. अॅड. आसावरी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. उपाध्यक्ष नारायण भांदिगरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचे नवे विभाग नियंत्रक रोहन पलंगे

$
0
0

फोटो आहे...

नूतन एसटी विभाग

नियंत्रकपदी पलंगे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुट्टीच्या हंगामात कोल्हापूर विभागासाठी सर्वाधिक आरामदायी एसटी, प्रवासीभिमुख सुविधा राबविणार असल्याची ग्वाही एसटीचे कोल्हापूर विभागाचे नूतन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. नुकताच त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या वाहतुकीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. प्रवाशांच्या सूचना आणि तक्रारी प्राधान्याने सोडविल्या जाणार आहे. स्वच्छता, गाव तेथे एसटी, सुरक्षा आणि टीम वर्कला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरचे एसटीचे विभाग नियंत्रक पद गेली दोन वर्षे रिक्त होते. तत्कालीन विभाग नियंत्रक सुहास जाधव यांच्यानंतर गेली दोन वर्षे विभाग नियंत्रकांची खुर्ची रिकामीच होती. सहा महिन्यांपूर्वी सांगली विभागाचे विभाग नियंत्रक शैलेंद्र चव्हाण यांच्याकडे कोल्हापूरचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. त्यांची ठाणे येथे विभाग नियंत्रक म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी पलंगे यांची नियुक्ती झाली. पलंगे यांचे मूळ गाव चरेगाव (ता. कराड) असून राज्य परिवहन महामंडळात २०११ मध्ये महाड येथे वरिष्ठ आगार व्यवस्थापक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर विभाग अधिकारी म्हणून मुंबई मध्यवर्ती कार्यालयात काम पाहिले. त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन ते अकोला येथे सन २०१६ पासून 'विभाग नियंत्रक' पदावर कार्यरत होते. अकोला येथे त्यांनी विभागीय कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविला. 'दुष्काळातील पाऊस' या विषयावर लघुपट तयार केला आहे. राज्य परिवहन महामंडळातील 'सर्वांत कमी वयाचे विभाग नियंत्रक' म्हणून ते ओळखले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघे ठार

$
0
0

अपघातात दोघे ठार

म.टा.वृत्तसेवा शिराळा

शिराळा तालुक्यातील चांदोलीहून इस्लामपूरकडे जाणाऱ्या मोटारी (एम एच ०६ झेड ५५०५) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इस्लामपूर येथील दोघेजण जागीच ठार झाले . तर चारजण जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,इस्लामपूर येथील रघुनाथ खंबे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दोन वाहनांतून मित्रमंडळी चांदोली येथे आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी इस्लामपूरला परतत असताना पणुंब्रे वारुण येथील वळणावर चालक संदीप संभाजी सपकाल याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जवळच्या ओढ्यात १० ते १५ फूट खाली कोसळली. यामध्ये पाण्यात बुड़ून

दिपक कोंडिबा पाटील (वय ४२)हा जागीच ठार झाला. तर शशिकांत उर्फ बंडा खंबे(वय ३०) हा इस्लामपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत झाला. उर्वरीत जखमींना उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्ता बाळ यांची जयंती

$
0
0

दत्ता बाळ जयंती

कोल्हापूर : येथील श्री दत्ताबाळ हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक दत्ताबाळ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रगती कोरडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, मुख्याध्यापक डी. व्ही. पाटील, सचिन डवंग, कीर्ती मिठारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठाचे यश

$
0
0

कोल्हापूर: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात येत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम रँकबँडमध्ये स्थान मिळवले. देशातील टॉप १०० विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारती विद्यापीठाने यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून भारती विद्यापीठचा समावेश रँकबँडमध्ये होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणपत्र घोळप्रश्नी सुटाची आज कुलगुरुंशी चर्चा

$
0
0

प्रमाणपत्रातील घोळप्रश्नी

'सुटा'ची कुलगुरूंशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभादरम्यान पदवी प्रमाणपत्रावरील सहीचा घोळ, प्रमाणपत्रांची पुन्हा छपाई करावी लागल्यामुळे विद्यापीठाला बसलेला फटका यांसह विविध प्रश्नांसंदर्भात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) पदाधिकारी गुरुवारी (ता.५) कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. अधिकाऱ्यांतील कुरघोडी आणि नियमाला फाटा देऊन प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रकारामुळे तब्बल २५ हजार प्रमाणपत्रे नव्याने छापली. याप्रकरणी विद्यापीठाचे आर्थिक नुकसान होऊनसुद्धा अद्याप कुणावरही जबाबदारी निश्चित केली नाही. तसेच विद्यापीठाच्या निवडणुकीत अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्याविषयी तक्रार करूनही कारवाई झाली नाही. यासंदर्भात सुटाचे पदाधिकारी सायंकाळी पाच वाजता कुलगुरूंची भेट घेणार आहेत. शिष्टमंडळात संघटनेचे प्रा. सुधाकर मानकर, प्रा. आर. जी. कोरबू, प्रा. अरुण पाटील, प्रा. प्रकाश कुंभार, प्रा. सुभाष जाधव, आदींचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी विद्यापीठाचे मानांकन घसरले

$
0
0

शिवाजी विद्यापीठाचे

मानांकन घसरले

एनआयआरएफच्या टॉप १०० मध्ये स्थान नाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयातर्फे एनआयआरएफतर्फे (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क) विद्यापीठे व विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील उच्चशिक्षण संस्थांचे रँकिंग जाहीर झाले. यामध्ये जाहीर केलेल्या देशातील टॉप १०० यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. याच क्रमवारीत दोन वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठ देशात २८ व्या स्थानावर होते.

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे मानांकन शंभरच्या बाहेर असल्याने याबाबत पडताळणी सुरू असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. घसरलेल्या मानांकनात सुधारणा करण्यासाठी नियोजित आराखडा तयार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी राष्ट्रीय मानांकनाची यादी जाहीर केली. यात सार्वजनिक विद्यापीठांत राज्यातील तीन विद्यापीठांचा समावेश होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १६ वे मानांकन मिळाले. त्याचबरोबर शंभर ते दीडशेच्या यादीत औरंगाबाद आणि शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे. मात्र, त्याचे नेमके गुण प्राप्त झाले नाहीत. ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. त्याआधारे शिवाजी विद्यापीठाला राज्यात सार्वजनिक विद्यापीठ अंतर्गत दुसरे की तिसरे मानांकन मिळाले हे स्पष्ट होणार आहे. विद्यापीठास २०१६ मध्ये २८ वे मानांकन मिळाले होते. गेल्यावर्षी विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. यंदा मात्र विद्यापीठाचे मानांकन घसरले आहे. त्याला काहीसे बदललेले निकषही कारणीभूत आहेत. मात्र, नेमके कितवे मानांकन मिळाले हे स्पष्ट नसल्याने विद्यापीठ प्रशासन माहिती घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम

$
0
0

आबिटकर फोटो

.......................

दाजीपूर अभयारण्यासाठी एक कोटींचा निधी

म.टा.वृत्तसेवा,राधानगरी

जैव विविधतेचा ठेवा असलेल्या दाजीपूर(ता.राधानगरी) अभयारण्याला जाणाऱ्या मार्गाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. कोल्हापूर - राधानगरी - कोकण या राज्यमार्गावर मांजरखिंड ते दाजीपूर या रस्त्यावर जागोजागी चौक सुशोभीकरण आणि माहिती फलक यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य सरकारच्या वतीने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्राणी आणि वनस्पती यांच्या अनेक प्रजाती पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक दाजीपूर अभयारण्यात हजेरी लावतात. याशिवाय शाळा,महाविद्यलयातील शैक्षणिक सहली तसेच अन्य पर्यटक मोठ्या संख्येने दाजीपूरला भेटी देतात. कोल्हापूरपासून अवघ्या ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या दाजीपूर अभयारण्याची सुरवात मांजरखिंड (काळम्मावाडी जलाशय फाटा) येथून होते. अभयारण्याच्या मार्गावर माहितीचे फलक,चौक सुशोभीकरण,निवारा शेड,जंक्शन सुधारणा,पेव्हिंग ब्लॉक ,दगडी भिंती अशा प्रकारच्या कामासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीमधून मांजरखिंड चौक,फेजीवडे चौक आणि राधानगरी जलाशय फाटा येथील चौक अशा ठिकाणी सुशोभीकरण आणि जागोजागी अभयारण्याची वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र फलक,संक्षिप्त माहिती फलक उभारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाची शनिवारी गोलमेज परिषद

$
0
0

शनिवारी गोलमेज परिषद

मराठा आरक्षणप्रश्नी ठरणार निर्णायक आंदोलनाची दिशा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध संघटना गेल्या २५ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारप्रमाणेच सध्याच्या भाजप, शिवसेनेनेही मराठा समाजाचा विश्वासघात केला. परिणामी समाजात असंतोष पसरला आहे. आरक्षणासाठी निर्णायक लढा आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा समाजाची राज्यव्यापी गोलमेज परिषद शनिवारी (ता.७) आयोजित केल्याचे मराठा आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे दुपारी दोन ते पाच या वेळेत होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील तीस संघटना सहभागी होणार आहेत. परिषदेत सरकारने आजवर मराठा समाजाच्या सोयी-सुविधांसंदर्भात काढलेल्या अध्यादेशाबाबत इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक, विविध संघटनांचे प्रतिनिधी, वृत्तपत्रांचे संपादक यांच्यासोबत विचारविनिमय होणार आहे. विविध घटकांशी चर्चा झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल.

अध्यक्ष पाटील म्हणाले, 'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात ५७ मोर्चे काढले. तरीसुद्धा समाजाला आरक्षण मिळाले नाही. समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हायकोर्टात प्रलंबित आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे केवळ मराठा समाजासाठी राखीव असावे अशी मागणी केली. शिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित केलेली अट शिथिल करण्याचा निर्णय झाला. मात्र, हा निर्णयसुद्धा मराठा समाजासाठी लाभदायक नाही.'

पत्रकार परिषदेला विविध मराठा संघटनांत कार्यरत प्रा. मधुकर पाटील, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, परेश भोसले, बाळ घाटगे, संतोष कांदेकर, श्रीकांत भोसले, बाजीराव किल्लेदार, बा. बा. महाडिक, विद्या पोवार, सुनीता, पाटील आदी उपस्थित होते.

............

सरकारच्या योजना फसव्या

राज्य सरकारने ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या मराठा समाजाला मिळाव्यात म्हणून काही योजना जाहीर केल्या. मराठा समाजासाठी काही तरी करत असल्याचे दाखविण्यासाठी राज्य सरकारकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणात ५० टक्के फी भरण्याचे आश्वासन दिले, पण ते पोकळ आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत समाजातील युवकांना उद्योगासाठी जाहीर केलेली व्याजमाफीची योजना फसवी ठरली. शिक्षणासाठी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेतून समाजाची दिशाभूल होत आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना मराठा समाजाच्या कोणत्याही मुला-मुलींना फायद्याची नाही.

.....................................................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारेगार....

$
0
0

गारेगार....

उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. जिवाची काहिली होताना थंडगार पाण्यासाठी जीव कासावीस होतो. आजही माठामधल्या आरोग्यदायी पाण्यालाच महत्त्व दिले जाते. असे माठ शहरात अनेक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अमित गद्रे

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसी सेवासंघातर्फे सत्कार

$
0
0

रविवारी सत्कार

कोल्हापूर : येथील ओबीसी सेवा संघातर्फे रविवारी (ता.८) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी दोन वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. यावेळी अभ्यासक शरद मिराशी 'संविधान साक्षरता हक्क आणि अधिकार' या विषयावर मार्गदर्शन करतील, अशी माहिती शरद गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images