Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

माजी नगरसेविकेसह सहाजण हद्दपार

$
0
0
माजी नगरसेविका छाया खंडू कांबळे त्यांची तीन म‌ुले विश्वास, विलास व सागर आदींसह सहाजणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी ही कारवाई केली.

सीरियल किलरची दहशत

$
0
0
अनोळखी युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशन परिसरात उघडकीस आली. गेल्या तीन महिन्यात अशा प्रकारे सात फिरस्त्यांचे खून करण्यात आले असल्याची माहिती प्रजासत्ताक संस्थेचे दिलिप देसाई यांनी दिली.

अमेंझिंग मोरजाई

$
0
0
पाऊस आला की भटकंती वेड्यांची तयारी सुरू होते ती वर्षा पर्यटनाची. ‌‌चिंब पावसात भिजत, सह्याद्रीतील निसर्गवाटा धुंडाळणे म्हणजे एक पर्वणीच असते. यातून आपल्याकडे आंबोलीसारखे टुरिझम स्पॉट तयार झाले आहेत. अर्थात आंबोली हा काही एकमेव स्पॉट नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगांत निसर्गसौंदर्याने नटलेले असे अनेक स्पॉट आहेत जेथे पावसात छान फिरता येते. मोरजाई पठार हा त्यापैकीच एक स्पॉट होय.

दुहेरी पदाचे ओझे

$
0
0
महापालिकेचे मुख्य लेखापाल एलबीटी अधिकारी म्हणून काम करतात आणि सहायक आयुक्त म्हणूनही. प्रभारी इस्टेट ऑफीसर केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक म्हणून काम करतात. काही अधिकाऱ्यांकडे दुहेरी पदभार तर वरिष्ठ लिपिकांकडे अ​धिक्षकांचा कार्यभार आहे. दुहेरी पदभारामुळे अधिकारी सक्षमपणे काम करू शकत नसल्याने महालिकेचा गाडा ‘स्लो’ झाला आहे.

प्रभाग समिती सक्षमीकरण हवे...

$
0
0
प्रभाग समितीतील विभागीय कार्यालयांतर्गत सर्व नगरसेवक सदस्य असतात. पाणी, कचरा, गटर, रस्ते या पायाभूत सविधांच्या विषयांची सोडवणूक प्रभाग समितीत करावयाची असते, पण प्रभाग समितीच्या बैठका वेळेवर होत नसल्याने या विषयांचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटत आहेत.

अस्वस्थ पालकत्व

$
0
0
दैनंदिन लोकजीवनात सर्वच स्तरांतील लोकांना अनेक अडचणी, विवंचना असतात. कौटुंबिक, आर्थिक समस्या यांना ताकदीनिशी तोंड देता येते, पण मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या करिअरच हुरहुर मात्र दररोज अस्वस्थ करत असते. हे अस्वस्थ पालकत्व जगण्याची वेळ निव्वळ सध्याच्या समाजाच्या करिअर कॉन्शसनेच आहे हे विसरता येणार नाही.

खराब रस्ते, उघडे मॅनहोल, पाण्याची डबकी

$
0
0
शहरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेली लक्ष्मीपुरी धान्य बाजारपेठ सध्या अनेक समस्यांच्या गर्तेत अडकली आहे. या ठिकाणी महापालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसामुळे तर या ठिकाणी विविध समस्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. तसेच शहरातील एकाही व्यावसायिक ठिकाणाची स्थिती चांगली नसल्याबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पद्माराजे विद्यालयाच्या इमारतीची दुरवस्था

$
0
0
शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयाचे मैदान आणि तेथील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे, तसेच शाळा बंद असल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे तिची डागडुजी करणे गरजेचे आहे, अशी मागणी नाग‌रिकांतून होत आहे.

पार्किंगच्या जागेत खरमाती, सिमेंट ब्लॉक

$
0
0
अयोध्या ‌थिएटरसमोरील चौकात महापालिकेने पार्किंगच्या जागेतच खरमाती आणि सिमेंट ब्लॉक ठेवल्यामुळे येथे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. तरी या ठिकाणची खरमाती व सिमेंटचे ब्लॉक हलवून पार्किंगसाठी जागा मोकळी करावी, अशी मागणी होत आहे.

मार्केट चले हम...

$
0
0
रंगीबेरंगी गणवेश, व्हरायटीपूर्ण आणि आकर्षक ढंगातील स्कूल बॅग आणि वेगवेगळ्या कार्टूनची छाप असणाऱ्या शालेय साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. नव्या शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकासहित विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील प्रमुख बाजारेपठेतील शालेय साहित्याची दुकाने वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यांनी सजली आहेत.

नाल्यातील बांधकामे हटवण्याची मागणी

$
0
0
जयंती नाल्याच्या पाणलोट क्षेत्रातील बांधकामे आणि टाकण्यात आलेली खरमातीची टाकणाऱ्यांवर करावाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. तसेच बांधकाम काढून टाकण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

दंड आकारायचा कुणी?

$
0
0
राज्यात अनधिकृत शाळा आणि वर्ग जाहीर करण्याची मोहिम प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. आरटीईच्या तरतुदींनुसार लाखाचा दंड आणि फौजदारीचे आदेश आहेत. मात्र दंडाची शिक्षा सुनावायची कुणी, त्याबाबत राज्य स्तरावर नियमावली नसल्याने कारवाईचा केवळ फार्सच ठरणार आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच नियमावलीचे प्रारुप आणि अधिसूचना काढणे गरजेचे आहे.

आयटीआय ऑनलाइन

$
0
0
अर्ज वाटप, भरलेल्या अर्जांची छाननी, ट्रेडनिहाय कट ऑफ लिस्ट, त्यानुसार प्रवेश अशी इतकी वर्षे आयटीआयमध्ये होत असलेली किचकट प्रवेश​प्रक्रिया यंदापासून बदलण्यात येणार आहे. इंजिनीअरिंग व मेडिकलप्रमाणे येथील प्रवेशही ऑनलाइन देण्यात येणार असून येत्या दोन दिवसात त्याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

आनंदी जगणं शिकविणारे बाबा

$
0
0
बरीच मुलं पहिला शब्द उच्चारतात तोच, बाssबा! पण शब्द जेवढा सोपा असतो,‌तितकंच हे बाबापण निभावणं कठीण असतं. वडील आणि मुलांचं नातं वेगळंच असतं. पिढीनुसार अनेक गोष्टी बदलत जातात. तसं हे नातंही बदलत गेलंय. म्हणजे त्यातली काळजी आणि प्रेम बदललं नाही तर ते व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्यात. पण बाबा बदलला नाही. एरवी आई आपल्या मनाचा हळवा कोपरा असला तरी बाबा मात्र दरारा, धाक, आधार आणि मार्गदर्शक असतात. काळ बदलला, समाज बदलला, घरं बदलत गेली, पण बाबांची भूमिका मात्र कायम राहिली. उद्या (रविवारी) ‘फादर्स डे’ आहे त्यानिमित्त...

बाबा ग्रेटच...

$
0
0
आई आईच असते, हे त्रिकालाबाधित सत्य असले तरी वडील हे वडीलच असतात हेही ब्रह्मसत्य आहे. आयुष्य सर्वांगसुंदर असल्याचा प्रत्यय मला माझ्या वडिलांच्या शिकवणीतून सतत येतो. प्रेम घेण्यापेक्षा ते देण्यात परमानंद आहे.

माजी नगरसेविकेसह सहाजण २ वर्षांसाठी हद्दपार

$
0
0
माजी नगरसेविका छाया खंडू कांबळे त्यांची तीन म‌ुले विश्वास, विलास व सागर आदींसह सहाजणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी ही कारवाई केली. राजेंद्रनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या या सातजणांवर एकूण ४१ गुन्हे नोंद आहेत.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा

$
0
0
सासरच्या लोकांनी अमानुष छळ करून सौ.रोहीणी शेटके यांचा बळी घेतल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर गुरूवारी शिवसेनेने मुरगूड पोलिस ठाण्यावरच मोर्चा काढला.

शेतक-यांनो, पारंपरिक बियाणांचेही जतन करा

$
0
0
बाजारात येणाऱ्या नवीन वाणांचा शेतकरी वापर करू लागल्यामुळे पारंपरिक वाणे नष्ट होऊ लागली आहेत. अनेक जुन्या वाणांच्या जाती नष्ट होत आहेत. सध्या भात, सोयाबीन, भुईमूग पेरणीचा हंगाम आहे.

सुरूपलीतील शेतक-यांची पाणी उपशाबाबत तक्रार

$
0
0
बेनिक्रे (ता.कागल) येथील शेतीसाठी वेदगंगा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी पाटबंधारे विभागाने परवानगी दिली आहे. तसे झाल्यास सुरुपलीसह पुढील दहा गावांना पाणीच मिळणार नाही.त्यामुळे सुरूपलीतील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नागरी सुविधांसाठी शिवसेनेचा इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

$
0
0
शहरातील रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता याबरोबरच अत्यावश्यक नागरी सुविधांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images