Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लाचेच्या गुन्ह्यातील संशयितांना जामिन

$
0
0

लाच प्रकरणातील

सहाजणांना जामीन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दस्त नोंदणीसाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील पाच कर्मचारी व खासगी व्यक्ती अशा सहा जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची अट कोर्टाने घातली आहे. दुय्यम निबंधक यशवंत चव्हाण, लिपिक गौरी बोटे, शिपाई प्रकाश सणगर, डाटा ऑपरेटर नितीन काटकर, सुशांत वणिरे, शहाजी पाटील अशी संशयितांची नावे आहेत. सरकार पक्षातर्फे ॲड. समीउल्ला पाटील यांनी कामकाज पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गड खूनप्रकरण

$
0
0

दोन सिंगल फोटो

..............

खूनप्रकरणी पाच

दिवस पोलिस कोठडी

म.टा.वृत्तसेवा,गडहिंग्लज

किरकोळ कारणावरून भावजयीचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी श्रावण पोटे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. वडरगे येथे वेगळे राहण्यासाठी वाटणी देत नसल्याच्या कारणातून श्रावण पोटे याने केलेल्या हल्ल्यात भावजय मंगल पोटे यांचा मृत्यू झाला होता. पोटे कुटूंबिय हे गावातील प्रतिष्ठित शेतकरी कुटूंब म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण हा दारुच्या आहारी गेला आहे, त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली.

वडरगे येथील आप्पा पोटे व निंगाप्पा पोटे हे भाऊ एकत्र राहतात. तर मृत भाऊ यल्लाप्पा यांचे कुटुंबिय कोल्हापुरात राहतात. या कुटुंबाची अद्याप वाटणी झालेली नाही. श्रावण याचा मोठा भाऊ मधुकर हे नोकरीनिमित्त मुंबईत असतात. त्यांची पत्नी मंगल मुलांसह गावीच रहात होत्या. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आप्पा पोटे हे घराशेजारी असणाऱ्या गोठ्यात झोपायला जात होते. त्यावेळी श्रावण याने कौटुंबिक वादातून आप्पा यांच्याशी भांडण काढले. बोलण्यातून वाद विकोपाला गेला. त्यावेळी श्रावण हातात खुरपे घेऊन त्यांना मारण्यासाठी धावला. यावेळी भांडण सोडविण्याच्या उद्देशाने घरातील मंगल मधुकर पोटे, सरिता सदाशिव पोटे व मिनाक्षी श्रावण पोटे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात श्रावण याने मंगल यांच्यावर खुरप्याने वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

यावेळी गोंधळ ऐकून घरातील तसेच शेजारील काहीजण लगेच घटनास्थळी धावलेल. यावेळी संतप्त श्रावण याला पकडण्यासाठी धडपड सुरु होती. पण त्याच्या हातात विळा असल्याने कुणीही पुढे जाण्यास धजावत नव्हते. शेवटी आप्पा यांनी त्याच्या डोक्यावर काठीचा वार केला. त्यामुळे तोही जखमी झाला. दरम्यान, मंगल यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. श्रावणला न्यायालयासमोर उभे केले असता सात तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद एसीमुळे आयुक्तांचा पारा चढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातील वातानुकुलित यंत्रणेची दुरुस्त झाली नसल्याबद्दल सोमवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा पारा चढला. या प्रकरणावरुन आयुक्तांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. तसेच आढावा बैठकीला उशिरा आल्याबद्दल शहर अभियंत्यांचीही कानउघडणी केली.

महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेत लोकशाही दिन आयोजित केला जातो. आयुक्त कार्यालयाजवळील सभागृहात त्याचे आयोजन केले जाते. आयुक्तांना भेटण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळाशी याच सभागृहात चर्चा केली जाते. सभागृहाच्या वातानुकुलित यंत्रणेत काही दिवसांपासून बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. आयुक्त सोमवारी ज्यावेळी लोकशाही दिनासाठी सभागृहात आले त्यावेळी दुरुस्ती झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरुन भडकलेल्या आयुक्तांनी तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला चांगलेच झापले. त्यासाठी काही काळ लोकशाही दिनही थांबवला. लोकशाही दिनासाठी सर्व अधिकाऱ्यांना वेळेत हजर राहण्याच्या सूचना आयुक्तांनी गेल्या महिन्यात दिल्या होत्या. सोमवारी लोकशाही दिनासाठी आयुक्त सभागृहात उपस्थित राहिल्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत सभागृहात आले. त्यावरुन आयुक्तांनी शहर अभियंत्यांचीही कानउघडणी केली.

त्यानंतर झालेल्या लोकशाही दिनामध्ये १८ अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये नगररचना विभागाशी संबंधित आठ, पाणीपुरवठा विभागाशी संबंधित तीन, परवाना विभागाशी संबंधित दोन, पवडी विभागाशी संबंधित तीन, आरोग्य व इस्टेट विभागाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज होता. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे, असे आदेश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले!

$
0
0

कोल्हापूर :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सभागृहात पुरावे दिले आहेत. अशा घोटाळेबाज मंत्र्यांना एक मिनिटभरही खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना खुर्चीवरून पायउतार करावे, असे आवाहन करतानाच जर मी दिलेले पुरावे खोटे असतील तर कुठल्याही चौकात फाशी घ्यायला मी तयार आहे असे आव्हान विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

‘कॅग’च्या अहवालातही राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. तूरडाळ खरेदीत २५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचा अधिकार नाही. ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, डाळ खरेदीत डल्ला मारला ते सुभाष देशमुख, राष्ट्रवादीवर कुठल्या तोंडाने टीका करत आहेत असा टोलाही मुंडे यांनी लगावला. सहकारमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची डल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत, अशा शब्दांत खिल्ली उडविली होती. त्याला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतराव काळेयांची अध्यक्षपदी निवड

$
0
0

डॉ. पंजाबराव देशमुख

यांच्या प्रबंधाचे १० ला प्रकाशन

कोल्हापूर

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रबंधाचा अनुवाद व संपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार लेखक व गोवा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद पाटील यांनी केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० एप्रिल रोजी अमरावतीत होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पीएचडीचा इंग्रजीमधील प्रबंध'धर्माचा वैदिक वाड्‌.मयातील उदय आणि विकास' हा १९३३ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने छापला आहे. त्यावर पी. एस. देशमुख असे नाव असल्याने कृषी विद्यापीठाला नाव दिलेले, बॅरिस्टर, घटना मसुदा समितीचे सदस्य व स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री तेच आहेत. या प्रबंधाचा तसेच त्यावर युरोप अमेरिकेत प्रसिध्द झालेल्या परीक्षणाचा मराठी अनुवाद डॉ. आनंद पाटील यांनी केला आहे.

.......................

फोटो आहेत.

कोल्हापूर

येथील समर्थ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भरतराव काळे तर उपाध्यक्षपदी अर्जुन पाटील यांची निवड झाली. एस. एस. शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. शंकरराव मोरे, दत्तात्रय कावडे, अशोक वासुदेव, के. एम. चौगुले, मोहिनी काळे, मधुकर वासुदेव आदी उपस्थित होते.

---------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लाबोलनंतर होणार मनोमिलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातंर्गत ठिकठिकाणी नेत्यांमध्ये अंतर आहे, हे नाकारता येत नाही. हल्लाबोल आंदोलनानंतर पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यामध्ये स्थानिक पातळीवरील मतभेद मिटवले जातील. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातही पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत या दोघांत मनोमिलन होईल,' असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या उमेदवारीवरून सध्या महाडिक आणि मुश्रीफ यांच्यात अंतर वाढले आहे. मुश्रीफ यांनी तर जाहीर समारंभातून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी ताकत मिळावी, असे आवाहनही राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर केले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर तटकरे यांनी उत्तर दिले. तसेच राष्ट्रवादीपासून दुरावलेली मंडळी पुन्हा पक्षात सहभागी होतील, असा आशावाद व्यक्त केला.

तटकरे म्हणाले, 'विधानसभा व लोकसभेची निवडणूक समविचारी पक्षांशी आघाडी करून लढवू. मात्र या आघाडीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश नसेल. कारण या दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे स्वतंत्र विचाराचे आणि व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार आणि त्यांच्यामध्ये सदिच्छा भेट झाली. मात्र त्यामध्ये राजकीय चर्चा नाही. देशाच्या राजकारणात पवारांचे स्थान मोठे आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत. आगामी काळात त्यांची भूमिका निर्णायक राहील. त्यांचे श्रेष्ठत्व, राजकीय सौहार्दता, अनुभव पाहता नजीकच्या काळातील प्राप्त परिस्थितीत काहींही अशक्य नसल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेला माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, हसन मुश्रीफ, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रकाश गजभिये, व्ही. बी. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहराध्यक्ष राजू लाटकर, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.

१६ मंत्री भ्रष्टाचाराने बरटलेले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरटलेले आहेत. या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात सभागृहात पुरावे दिले आहेत, अशा घोटाळेबाज मंत्र्यांना एक मिनिटभरही खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना खुर्चीवर ठेवू नये. जर हे पुरावे खोटे असतील तर कुठल्याही चौकात फाशी घ्यायला तयार आहे, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 'कॅग'च्या अहवालाताही राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडल्याचेही त्यांनी सांगितले. तूरडाळ खरेदीत २५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टीका करण्याचा अधिकार नाही. ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढली, डाळ खरेदीत डल्ला मारला ते देशमुख, राष्ट्रवादीवर कोणत्या तोंडाने टीका करत आहेत, त्यांना शरम वाटली पाहिजे. २०१९ मध्ये सत्ता हातातून जाणार या भीतीमुळे भाजपचे मंत्री राष्ट्रवादीवर टीका करत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

....................

मोदींचे हुकुमशाही प्रवृत्तीचे पाऊल

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'शेतकरी कर्जमाफी, नोटबंदी, वाढती महागाई, बेरोजगारीमुळे नागरित्र त्रस्त आहेत. सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे समाजातील एकही घटक समाधानाने जगू शकत नाही. सर्वच आघाड्यावर सरकार अपयशी ठरले आहे. त्यांच्याकडून न्याय मिळत नसल्याची भावना नागरिकांची बनली आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्हा बँकेचे २५ कोटी अडकले.नागरिकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी जातीय तेढ निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हा हुकूमशाही प्रवृत्तीचे पाऊल आहे. फेक बातम्याप्रकरणी कारवाई करत त्यांनी प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी एकजूट दाखविल्यामुळे सरकार उघडे पडले. त्यामुळे निर्णय मागे घेतला. कमजोरांवर अन्याय आणि एकजूट आहे तिथं बॅकफूटवर अशी त्यांची नीती आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कॉँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. त्यासंबंधीची औपचारिक घोषणाच केवळ बाकी आहे, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात स्पष्ट केले. आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षासह डावे पक्षही असतील. केंद्र आणि राज्यातील भाजप-मित्रपक्षांचे सरकार हे खोटारडे आणि फसवे आहे. या सरकारला सत्तेवरुन खाली खेचणे हाच आघाडीचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

'हल्लाबोल आंदोलन'च्या निमित्ताने राष्ट्रवादीची नेतेमंडळी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी आगामी काळातील राजकारणाचे संकेतही दिले. ते म्हणाले, 'भाजप सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येत आहेत. देश आणि राज्य पातळीवर समविचारी पक्षांची मोट बांधली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याबाबत राज्यपातळीवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीकडून मी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय नेते शरद पवार अनेक पक्षांतील नेतेमंडळीशी भेट घेत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही पवार यांच्यासोबत चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी करुन लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय तत्त्वत: झाला आहे. '

मुख्यमंत्रिपदासाठी जुनाच फॉर्म्युला

हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन सुरु आहे का? या प्रश्नावर तटकरे म्हणाले, 'समविचारी पक्षासोबत आघाडी करुन निवडणूक लढविणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांची आघाडी करुन निवडणूक लढविताना मुख्यमंत्र्याचा उमेदवार जाहीर करत नाहीत. दोघांचीही समान ताकद आहे. निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद असे सूत्र आहे.' खासदार राजू शेट्टी यांनी सध्या एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. यापूर्वी त्यांनी संविधान बचाव रॅलीत सहभाग घेतला होता. शरद पवार, राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे. भाजपविरोधात सगळे पक्ष एकत्र येत आहेत. तेही आघाडीत सहभागी होऊ शकतात, असे सूतोवाचही तटकरे यांनी केले.

०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल असोसिएशनच्याअध्यक्षपदी डॉ. अशोक जाधव

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अशोक जाधव, उपाध्यक्षपदी डॉ. संदीप साळोखे तर मानद सचिवपदी भूलतज्ज्ञ डॉ. आबासाहेब शिर्के यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे यांच्याकडून डॉ. जाधव यांनी पदभार स्वीकारला. सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षासाठी त्यांची निवड झाली. कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी असे, खजिनदार, सहसचिव डॉ. अजित लोकरे, सल्लागार समिती सदस्य डॉ. आनंद कामत, डॉ. पी. एम. चौगुले, सदस्य : डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर अडके, डॉ. शितल देसाई, डॉ. संतोष प्रभू, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. रमकांत दगडे, डॉ. आशा जाधव, डॉ. नवीन घोटणे, डॉ. देवेंद्र होशिंग, डॉ. मंदार पाटील, डॉ. श्रद्धा वज्रमुष्टी, डॉ. लतिका पाटील, डॉ. भरत कोटकर, डॉ. शैलेश कोरे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. जोत्स्ना देशमुख, डॉ. अरूण धुमाळे, डॉ. सोपान चौगुले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांकडून आरोपींची बडदास्त

$
0
0

पोलिसांनी पाजला आरोपींना चहा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोरेवाडी आणि तामगाव येथील दुहेरी खुनातील आरोपींसाठी पोलिसांना पाझर फुटल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळाले. वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणलेल्या आरोपींना पोलिसांनी सीपीआरच्या आवारातील चहाच्या टपरीवर स्पेशल चहा पाजला. सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत नेहमीच कायद्यावर बोट ठेवून धाक दाखवणारे पोलिस आरोपींच्या बाबतीत मात्र भलतेच मायाळू झाल्याचे पाहून नागरिकांना धक्का बसला. गोकुळ शिरगाव पोलिसांनी हा पराक्रम केला आहे. दरम्यान, संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (ता. ६) वाढ झाली आहे.

मोरेवाडी आणि तामगाव येथील दुहेरी खुनातील संशयित आरोपी भैरू ऊर्फ सुनील दगडू मोरे (वय ३९, रा. मोरेवाडी), रशीद सैफुद्दीन वजीर (४३, रा. गोकुळ शिरगाव), जावेद अमरबाबू शेख (४९, रा. तामगाव), सुनील पांडुरंग शिंदे (२३, रा. नेर्ली) आणि रोहित एकनाथ कांबळे (२६, रा. गिरगाव) यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी (ता. ३) संपली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी या सर्वांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. 'दुहेरी खुनातील आरोपींकडून तपासात सहकार्य मिळत नाही, त्यामुळे खुनातील शस्त्र मिळवण्यासह संशयितांची चौकशी अद्याप बाकी आहे. मृत अजीज वजीर याच्या मृतदेहाच्या डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. गुन्ह्यातील आणखी एक कार पोलिसांना मिळालेली नाही, त्यामुळे पोलिस कोठडी वाढवून मिळावी,' अशी विनंती पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टात केली होती. यानुसार न्यायाधीशांनी पाच संशयितांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (ता. ६) वाढ केली.

पोलिस कोठडीत वाढ झाल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस पाचही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये घेऊन आले. तपासणी झाल्यानंतर त्यांना पोलिसच एका चहाच्या टपरीवर घेऊन गेले. या ठिकाणी पोलिसांनी आरोपींना स्पेशल चहा दिला. दुहेरी खुनातील आरोपी पोलिसांसमोरच स्पेशल चहा पित असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांना मात्र धक्का बसला. वर्दीतील पोलिसांसोबत हातात बेड्या असलेले आरोपी मजेत गप्पा मारत चहा पित असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आरोपींमध्ये भैरू मोरे या सराईत गुंडाचा समावेश आहे. त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नासह खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्ह्यातील आरोपींसाठी पोलिस एवढे मायाळू का बनलेत? असा प्रश्न उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलिसांचे गुंडांशी संगनमत

सर्वसामान्य नागरिकांसाठी कायद्यावर बोट ठेवणारे पोलिस गुंडांसाठी मात्र कायदा सोयीने वापरतात. खासगी सावकार, राजकारणी, गुंड यांच्यावर गुन्हे दाखल होताच त्यांच्या अटकेसाठी टाळाटाळ सुरू होते. यातूनही अटक झालीच तर संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्यांच्यासाठी हॉटेलमधून जेवण मागवले जाते. पिण्यासाठी बाटलीबंद पाणी, थंडपेय कोठडीत पोहोच केली जातात. कोठडीत मोबाइल वापरण्यास परवानगी नसते. मात्र ठराविक गुंडांसाठी कोठडीत मोबाइल पुरवला जातो. याकडे वरिष्ठ कानाडोळा करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंपरागत पुजाऱ्यांची नियुक्ती नको: डॉ. देसाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्त करण्याचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर सरकारी पुजारी नियुक्तीमध्ये परंपरागत पुजाऱ्यांना स्थान देऊ नये. तसेच पुजाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यापूर्वी त्यांच्या स्थावर, जंगम व अन्य मालमत्तेची चौकशी करून करपात्र संपत्तीच्या आधारेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी डॉ. सुभाष देसाई व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. या दोन्ही मागण्यांचा विचार सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने न केल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही यावेळी देसाई यांनी दिला.

डॉ. देसाई म्हणाले, 'पंढरपूर येथील सरकारी पुजारी कायद्याच्या धर्तीवर जर अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यात येणार असतील तर बडव्यांना हटवल्याप्रमाणे येथील परंपरागत पुजाऱ्यांनाही हटवले पाहिजे. गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पुजारी हटाओ आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत एकमुखाने कायदा मंजूर होणे ही चांगली गोष्ट आहे. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार पुजाऱ्यांचे वंशपरंपरागत हक्क संपुष्टात येतील. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या १३ मागण्यांपैकी फक्त एकच मागणी मान्य झाली आहे. अन्य १२ मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पुजारी हटाओ समितीतील सदस्यांना धमकीची पत्रे पाठवणारे कोण आहेत? हे पोलिसांना माहिती असूनही ते कारवाई करत नाहीत,' असा आरोप यावेळी केला.

दिलीप देसाई म्हणाले, 'अंबाबाईच्या प्राचीन मूर्तीची झीज, मोडतोड, विद्रुपीकरण ज्यांनी केले त्यासाठी कारणीभूत ठरलेल्यांवर आजअखेर गुन्हे दाखल केलेले नाहीत. ते तत्काळ दाखल करावेत. अंबाबाईच्या पूजेचे हक्कदार असल्याचे सांगणाऱ्या पुजाऱ्यांकडे पुजारी म्हणून काम करण्याचा अधिकृत कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. सन २००० मध्ये मूर्तीला चोथ्याने घासल्याने तत्कालीन देवस्थान समिती अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पुजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबत पुजाऱ्यांचे जबाबही घेतले गेले, पण आजतागायत त्या संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. अंबाबाई मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात नाही. तरीही मूर्तीवर वज्रलेप करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने कसा घेतला? असा प्रश्‍न उपस्थित करुन यासाठी जबाबदार असणाऱ्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पुजारी, देवस्थान समितीच्या सदस्यांवर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. '

पुजाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या विधेयकातील मसुद्याची कार्यवाही करण्यापुर्वी पुजाऱ्यांनी देवीला देणगीदाखल आलेले सर्व ऐवज सूचीनिहाय सरकारकडे जमा करावेत. तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करूनच करपात्र संपत्तीच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करावी. याबाबत सरकारच्या कार्यवाहीकडे लक्ष ठेवण्यात येणार असून सरकार जर पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचे धोरण अवलंबणार असेल, तर कायदेशीर आव्हान दिले जाईल- डॉ. सुभाष देसाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती पाटील स्मृती व्याख्यानमाला

$
0
0

'... तरच कुटुंबात लोकशाही रूजेल'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महिलांचे सबलीकरण हे कागदावर अधिक होत आहे. महिलांच्या अत्याचारात वाढ होत असून कौटुंबिक न्यायालयाकडे घटस्फोटाचा दावा दाखल होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. 'राज्यघटना' ही केवळ संसदेचे महत्वाचे कागदपत्र नसून प्रत्येक कुटुंबात जगण्याचे साधन बनले पाहिजे, तरच कुटुंबात लोकशाही रूजेल', असे प्रतिपादन 'सम्यक'चे कार्यकारी संचालक आनंद पवार यांनी केले. आरती पाटील स्मृती फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी लेखिका निलम माणगावे होत्या.

'कुटुंब व्यवस्थेचे लोकशाहीकरण' विषयावर बोलताना पवार म्हणाले, 'महिलांना पन्नास टक्के आरक्षण, महिला बचत गट, संपत्तीत वाटा, समानता दिली जात असल्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. प्रत्यक्षात समाजात महिलांचे वास्तव विदारक आहे. राजकारणात महिलांना दिलेले आरक्षण केवळ कागदावर आहे. प्रत्येक फाइलीवर पतीची सही घ्यावी लागते. हिंदू वारसा कायद्यात बदल झाले. मात्र महिलांना संपत्तीत वाटा दिला जात नाही. मुली, महिला शिक्षणात आघाडीवर आहेत, मात्र त्याचे नियंत्रण पुरूषसत्ताक संस्कृतीकडून केले जात आहे. कुटुंबात महिला सक्षमीकरणासाठी देशपातळीवर महिलांची 'प्रतीके' दिली जातात. मात्र युवती, महिलांना बंधनाच्या जोखडात अडकविले जाते. कोणत्याही प्रकारचे वैचारिक स्वातंत्र्य दिले जात नाही. प्रत्येक गोष्टी ही कुटुंबातील पुरुषांना विचारावी लागते. सबलीकरणाचे केवळ कार्यक्रमच घेतले जातात. प्रत्यक्षात समाजव्यवस्थेत महिलांना दुय्यम स्थान दिले जात आहे.'

फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. बी. एम. पाटील, सचिव एम. आर. पाटील, प्रसन्न पाटील आदी उपस्थित होते. ज्योती भालकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी हटाओ समितीतर्फे कॅव्हेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्तीबाबत मंजूर झालेल्या विधेयकाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्यांना पुजारी हटाओ संघर्ष समितीने कायद्यानेच उत्तर दिले. मंगळवारी पुजारी हटाओ समितीच्यावतीनेही कॅव्हेट दाखल करण्यात आले. यामुळे विधेयक मंजुरीबाबत आक्षेप घेत कायदा होण्याच्या प्रक्रियेला एकतर्फी स्थगिती येणार नाही.

अंबाबाई मंदिरात पंढरपूर मंदिरच्या धर्तीवर सरकारी पुजारी कायदा करण्यात यावा, या विधेयकाला विधीमंडळात नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे परंपरागत पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, विधेयकातील मसुद्याचा अभ्यास करून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातील परंपरागत पुजारी हक्कदार मंडळाच्यावतीने व्यक्त करण्यात आली होती.

याबाबत समितीचे सदस्य दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'पुजाऱ्यांनी जर उच्च न्यायालयात या विधेयकात मांडण्यात आलेल्या मसुद्यावर आक्षेप घेत याचिका दाखल केल्यास त्यांना कॅव्हेट दाखल करून कायदेशीर आव्हान देण्याचा इशारा पुजारी हटाओ संघर्ष समितीने दिला होता. समितीच्यावतीने शनिवारी ३१ मार्च रोजी कॅव्हेट दाखल करण्याची तयारी ठेवण्यात आली होती. मात्र आर्थिक वर्षअखेरीमुळे ही प्रक्रिया होऊ शकली नव्हती. दरम्यान मंगळवारी पुजाऱ्यांच्यावतीने याचिका दाखल करण्यासाठी पुजारी प्रतिनिधी अॅड. केदार मुनीश्वर उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार समितीतर्फे कॅव्हेट दाखल करण्याची तयारी ठेवली. पुजाऱ्यांनी याचिका दाखल करण्यापूर्वीच कॅव्हेट दाखल करण्यात आले. यामुळे आता अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्ती कायद्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही.' परिणामी हा कायदा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुईकर कॉलनीत चेन स्नॅचिंग

$
0
0

दुचाकीस्वारांनी लांबवली महिलेची मोहनमाळ

रुईकर कॉलनीत भरदुपारी घडला प्रकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुईकर कॉलनी येथे चालत घराकडे जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ चोरट्याने हिसडा मारून लांबवली. मंगळवारी (ता. ३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने ही चोरी केली. याबाबत कल्पना तरुण वसा (वय ५८, रा. रुईकर कॉलनी, पहिली गल्ली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना वसा या सासू तरलाबेन यांच्यासह रुईकर कॉलनी येथील घरात राहतात. त्यांची दोन्ही मुले हर्षल व अनुज नोकरीनिमित्त परदेशात आहेत. बहीण फाल्गुनी मीलन शहा (रा. सांगली) ह्या अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी कोल्हापुरात येतात. मंगळवारी दुपारी कल्पना वसा आणि बहीण फाल्गुनी या दोघी लिशां हॉटेल परिसरातील बँकेत कामानिमित्त गेल्या होत्या. काम आटोपून पुन्हा त्या घरी येत होत्या. रुईकर कॉलनीतील ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या घरासमोरून चालत जाताना प्लॉट नंबर ११ जवळ आल्यानंतर समोरुन काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने वसा यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ हिसडा मारुन लांबवली. अचानक घडलेल्या या प्रकाराने दोघींनी आरडाओरड केला. मात्र चोरटा दुचाकीवरून निघून गेला. वसा यांनी याबाबत शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अंदाजे २२ ते २५ वयोगटातील चोरटा असल्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी पत्रकार बैठक परिषद...चाौकट

$
0
0

मुख्यमंत्री कोण हे नेतेच ठरवतील

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जुळे भाऊ आहेत. त्यामुळे छोटा कोण आणि मोठा कोण हा प्रश्न उद्भवत नाही. दोन्ही काँग्रेसने आपआपली शक्तीस्थळे ओळखून जागा वाटपात सहकार्य करणे गरजेचे आहे. राजकारणात सर्वच पत्ते उघडे करायचे नसतात. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन मुख्यमंत्री कोण असणार हे पक्षाचे नेते ठरवतील. बारामतीत नारळ फोडूनच आमच्या प्रचाराची सुरुवात करणार आहे.

माझा उमेदवार जाहीर केलाय की...

खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे. मात्र मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याअगोदर कागल आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रा. संजय मंडलिक हेच उमेदवार असतील असे जाहीर सभा समारंभातून सांगत आहेत. प्रायव्हेट हायस्कूल येथील जाहीर समारंभातही त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी परमेश्वराने ताकत द्यावी, असे मत मांडले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सर्किट हाऊस परिसरात मुश्रीफांनी अनौपचारिक गप्पामध्ये, 'लोकसभेसाठी यापूर्वीच माझा उमेदवार जाहीर केलाय की....असे सांगून संभ्रम निर्माण केला. त्यांच्या त्या वक्तव्याने राष्ट्रवादीची उमेदवारी मंडलिक की महाडिकांना अशी चर्चा कार्यकर्त्यांत रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी सभा ...

$
0
0

फोटो

.................

भाजप सरकार

शेतकरी विरोधी

अजित पवार यांचा जयसिंगपूर येथील सभेत हल्लाबोल

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

'राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून शिक्षणांचा बोजवारा उडाला आहे. शेतीमालाला भाव नाही. समाजातील सर्वच घटकात मोठी अस्वस्थता आहे. भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे,' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्याबरोबरच देशात परिवर्तन घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जयसिंगपूर येथे नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह पटांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार प्रकाश गजभिये, संग्राम कोते-पाटील, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आर.के. पोवार, राजू लाटकर, भैय्या माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, 'आज राज्यात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्‍वासने दिली ती पाळली नाहीत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कर्जमाफ होत नाही. आपण एकीकडे शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जात असताना दुसरीकडे सरकार संविधान बदलण्याची भाषा करीत आहे. साखरचे दर ३४०० रुपयांवरुन २८०० रुपयांवर आले आहेत. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना आयात निर्यातीचे धोरण बदले जात होते. मात्र आताच्या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. भाजपचे सरकार शेतकऱ्यांचे हित जाणून घेत नाही. साखर कारखान्याबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढील वर्षी कारखाने सुरु होणार नाहीत, अशी स्थिती आहे. सुतगिरण्या अडचणीत आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देईल असा एकही मंत्री सरकारमध्ये नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन हाती घेतले आहे.'

प्रास्ताविकात बोलताना डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, 'गेल्या आठ दिवसात शिरोळ तालुक्यातील संपर्क दौऱ्यात सरकारबाबत असंतोष जाणवला. शिरोळ तालुक्यात २० हजार एकर शेतजमीन क्षारपड बनली आहे. एकरी एक लाख रुपये खर्च केले तर ही जमीन पुन्हा उत्पादनाखाली येईल. भाजीपाल्याचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने आजवर पोकळ आश्‍वासने दिली आहेत. याविरूध्द लढा देण्यासाठी येथील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहील.'

यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांची भाषणे झाली. आभार तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी मानले. या सभेस पी.एम. पाटील, माजी जि.प.अध्यक्ष नानासो गाट, नावीद मुश्रीफ, शिरोळ विधानसभा परिक्षेत्राचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष डी.बी. पिष्टे, मदन कारंडे, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका स्वरुपा पाटील-यड्रावकर, नितू पाटील-यड्रावकर, रावसाहेब भिलवडे, शिरोळ पंचायत समिती सभापती मिनाक्षी कुरडे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...........

चौकट

हल्लाबोल आंदोलनाचा धसका

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याने सरकारने याचा धसका घेतला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपले खरे नाही हे त्यांना कळून चुकले आहे. परदेशातून काळे धन आणू, नागरिकांच्या खात्यात १५ लाख जमा करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. मात्र निवडून आल्यानंतर ते आश्‍वासन विसरले. सहा कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली होती. मात्र त्यांनी तरुणाईची फसवणूक केली आहे. महागाई, रोजगार, अच्छे दिन यावर ते काही बोलत नाहीत. देशात जातीय तेढ वाढत आहे. राज्यातही ही स्थिती आहे. सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाला फसविले. या फसव्या सरकारला उलथवून टाकण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागल चोरी

$
0
0

तीन तोळ्याच्या

साखळ्या लंपास

कागल

येथील गैबी चौकातील एका सराफी दुकानातून दोन अज्ञात इसमांनी सुमारे तीन तोळ्याच्या सोन्या साखळ्या पळवून नेल्या. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. दुकानात बसलेल्या लहान मुलाला ढकलून भरदिवसा ही चोरी करण्यात आली. येथील गहिनीनाथनगरमध्ये राहणारे धनाजी धनवडे (मूळ रा.सांगली) यांचे येथील गैबी चौकात श्री लक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी धनाजी हे आपल्या चौथीत शिकणाऱ्या मुलासोबत दुकानात होते. यावेळी सांगलीहून त्यांची आई व दोन नातेवाईक महिला दुकानात आल्या. यावेळी आईला मुलाबरोबर दुकानात ठेवून दोन नातेवाईकांना घरी सोडून आले. त्यानंतर त्यांनी दुकानात मुलाला ठेवून ग्रील लावून आईला घरी साडेण्यासाठी घरी गेले. ही संधी पाहून दोघेजण दुकानाजवळ आले. त्यांनी आत हात घालून मुलाला ढकलले व शोकेसमध्ये लावण्यात आलेल्या पाच साखळ्या घेऊन पोबारा केला. चोरुन नेण्यात आलेल्या साखळ्यांमध्ये दहा ग्रॅमच्या दोन, पाच ग्रॅमची एक व सुमारे तीन ग्रॅमच्या दोन अशा सुमारे तीन तोळ्याच्या साखळ्यांचा समावेश आहे. या घटनेचे चित्रीकरण एका बँकेच्या व गैबी चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टरबाजांवर गुन्हे दाखल

$
0
0

(फोटो आहे)

इंगवले बंधूंसह तिघांवर गुन्हे

विनापरवाना फलक पोलिस बंदोबस्तात हटविले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील फिरंगाई देवीच्या पालखी सोहळ्यानिमित्त विनापरवाना लावलेले फलक काढून पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले. महानगरपालिका आणि जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) दुपारी संयुक्तरित्या कारवाई केली. यात माजी नगरसेवक रविकिरण इंगवले याच्यासह अजय इंगवले आणि मंजित माने यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी पोस्टरबाजांना दणका दिल्याने मंगळवारी शिवाजी पेठेत काही काळ तणावाची स्थिती होती.

पोलिसांनी शहरातील विनापरवाना फलक काढण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी दुपारी शिवाजी पेठेत कारवाई करण्यात आली. फिरंगाई देवीच्या पालखी सोहळ्यानिमित्त शिवाजी पेठेत विनापरवाना फलक लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महापालिकेच्या कार्यालयात जाऊन पोलिसांनी परवानगीबाबत चौकशी केली. मात्र, तीन फलकांना परवानगी घेतली नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी महापालिकेच्या अतक्रिमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन फलक काढण्याचे काम सुरू केले. या फलकांवर माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, अजय इंगवले आणि मंजित माने (तिघेही रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचे फोटो होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम १९९५ चे कलम ३ आणि ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी महापालिकेतील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या पोलिस बंदोबस्तात फलक हटवण्यात आले. कारवाई सुरू असताना शिवाजी पेठेतील तरुणांनी गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शिवाजी पेठेत बंदोबस्त ठेवला होता. महापालिकेचे सहायक लिपिक सयाजी सिदू कुंभार (वय ४८, रा. उचगाव, ता. करवीर) यांच्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी इंगवले बंधूंसह मानेवर गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याबद्दल तातडीने चौकशी करून दोषींच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र सादर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.

कारवाई सुरूच राहणार

विनापरवाना पोस्टर आणि ध्वज यावरून वादाचे प्रसंग वाढत आहेत. हे टाळण्यासाठी पोलिसांनी फलक हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अंमृतकर यांनी स्पष्ट केले आहे. वाढदिवस, सणसमारंभ, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी यांचे औचित्य साधून विनापरवाना फलक लावले जातात. यावर असलेले फोटो आणि नावांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँकेच्याकर्ज मर्यादेत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'येथील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने सभासदांना वैयक्तिक कर्ज १२ लाखांवरून २५ लाखांपर्यंत दिले जात आहे. बँकेचे कामकाज

चांगले सुरू असल्याने वर्षभरात सहकार विभागाची चौकशी टाळता आली आहे', असे बँकेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाटील म्हणाले, 'तांत्रिक कारणांने मागील वर्षापेक्षा यावर्षी ढोबळ, निव्वळ एनपीएमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात बँक फायद्यात आहे. इतिहासात पहिल्यांदाच यावेळी दोन कोटी ४८ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. आरबीआयच्या परवानगीने सभासदांना दहा टक्यांपेक्षा अधिक लाभांश देण्यात येणार आहे. बँकेचा कारभार सभासदकेंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध प्रशिक्षण, कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांना अनेकवेळा सायंकाळी उशिरापर्यंत थांबावे लागते. रात्री गावी जाणे शक्य नसलेल्या त्यातील शिक्षकांना बँकेत मोफत निवासाची सोय केली आहे. एखाद्या कर्जदार सभासदाचा आकस्मित मृत्यू झाल्यास त्याचे १२ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाते. कोअर बँकिंग, एटीएम अशा सुविधा दिल्या आहेत. बँकेने अद्यावत डाटा सेंटर तयार केले आहे.' पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अरूण पाटील, संचालक संभाजी बापट, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, दिलीप पाटील, नामदेव रेपे आदी उपस्थित होते.

-----------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी पीसी

$
0
0

३७८ कोटींचा निधी मंजूर

जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत जिल्हाधिका-यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये मिळालेल्या निधीच्या तुलनेत ९९ टक्के निधी विकासकामांवर खर्च झाला आहे. महसुलात कोल्हापूर जिल्ह्याने ११७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. योजनेत ३९७ कोटी ३६ लाख रुपये खर्ची पडले असून, १०९ कोटी ७१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. येत्या वर्षासाठी ३७८ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे निधी खर्ची आणि महसुलात वाढ झाली आहे. जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, आदिवासी घटक कार्यक्रम बाह्य, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम आणि डोंगरी विकास कार्यक्रमात विविध विकासकामांसाठी ३९७ कोटी ३६ लाखांचा निधी मिळाला. पैकी विविध विकासकामांवर मार्च २०१८ अखेर ३९३ कोटी ६० लाखांचा निधी खर्च झाला. एकूण निधीच्या ९९ टक्के खर्च झाला आहे. २०१७-१८ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर ३९७ कोटी ३६ लाख निधीपैकी ३९३ कोटी ६० लाखांचा निधी खर्च झाला. पैकी सरकारच्या कृषी विभागाकडून ३ कोटी ७५ लाखांचा निधी खर्ची पडलेला नाही. अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ११३ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मिळाला. हा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्हानिहाय खर्चाच्या क्रमवारीत राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महसूल विभागाने ९३ कोटी ६६ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यांनी १०१ कोटी ६२ लाख रुपयांची वसुली केली. सामाजिक न्याय विभागाकडून माणगाव (ता. हातकणंगले) येथील स्मारकासाठी २ कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. कन्यागत महापर्वच्या दुसऱ्या टप्यातील विविध विकासकामांसाठी २७ कोटी ५६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पैकी एक कोटी ७० लाखांचा निधी दिला आहे. त्यासह पहिल्या टप्प्यातील ४ कोटी ३५ लाखांचा निधी यापूर्वीच दिला आहे.

००

कृषी विभागाकडून खुलासा मागविणार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी 'एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम' योजनेचा ३ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी परत दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी किती निधी खर्ची पडला आहे, या संदर्भात आढावा घेतला होता. कृषी विभागालाही विचारणाही केली होती. मात्र, या विभागाने ३१ मार्च या शेवटच्या दिवशी सायंकाळी चार वाजता हा निधी परत केला. त्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितले.

००

तीन पथके नियुक्त समिती

तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या काळात झालेली नोकरभरती प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. पथकाने केलेल्या चौकशीत काही प्रकरणांवर वळवी यांची हुबेहूब स्वाक्षरी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तर प्रकरणात त्यांची स्वाक्षरी आहे. अद्याप या प्रकरणाची फेरतपासणी सुरू आहे. लवकरच नियुक्त केलेली पथकांकडून परिपूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतरच खरे प्रकरण उघडकीस येऊ शकेल, अशीही त्यांनी माहिती दिली.

००

२०१८-१९ चा निधी

३७८ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर

गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ कोटींनी वाढ

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २६३ कोटी ४ लाख

अनुसूचित जाती घटक कार्यक्रम ११३ कोटी ४१ लाख

आदिवासी घटक कार्यक्रम बाह्य १ कोटी ९० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग असोसिएशन मानद अध्यक्षपदी वाडीकर

$
0
0

दोन फोटो आहेत...

इंजिनीअरिंग असो.च्या

अध्यक्षपदी वाडीकर

कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या मानद अध्यक्षपदी नितीन वाडीकर आणि मानद उपाध्यक्षपदी अतुल आरवाडे यांची निवड झाली. संचालक मंडळाच्या सभेत हा एकमताने निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक दिनेश बुधले होते. मानद सचिवपदी रणजित शाह, मानद सहसचिवपदी हर्षद दलाल आणि मानद खजिनदारपदी कमलाकांत कुलकर्णी यांची फेरनिवड झाली. स्वीकृत संचालकपदी अभिषेक सावेकर, जयदीप मांगोरे यांची निवड झाली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल नूतन अध्यक्ष वाडीकर यांच्या हस्ते कोंडेकर यांचा सत्कार झाला. यावेळी संजय अंगडी, चंद्रकांत जाधव, प्रसन्न तेरदाळकर, अमर करांडे, प्रदीप व्हरांबले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images