Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करा

$
0
0

स्त्रीभ्रूणहत्येला प्रोत्साहन

देणाऱ्या प्रवृत्तींना ठेचा

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्त्री-भ्रूणहत्या हा समाजाला लागलेला कलंक असून स्त्री-भ्रूणहत्येचा हा कलंक पुसून टाकण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून स्त्री-भ्रूणहत्येला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढा,' असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला. जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी.जी. शिंदे यांची उपस्थित आहे.

स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात केंद्रांची अचानकपणे तपासणी करून दोषी आढळणाऱ्या केंद्रावर पीसीपीएनडीटी कायद्यान्वये कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिले. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९३१ मुलींचे प्रमाण आहे. हे व्यस्त प्रमाण वेळीच रोखण्यासाठी कायद्याबरोबरच लोकशिक्षणाची गरज आहे. आरोग्य विभागाने कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच जनजागृती करणे गरजेचे आहे. सुबत्ता लाभलेल्या तालुक्यात स्त्री-भ्रूणहत्येचे अधिक प्रमाण असून ही चिंतेची बाब आहे. यापुढील काळात जिल्ह्यात एकही स्त्री-भ्रूणहत्या होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी कटिबद्ध राहावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी केली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील म्हणाले, 'जिल्ह्यात पीसीपीएनडीटीची कायद्याची अंमलबजावणी करण्यास यंत्रणेने प्राधान्य दिले असून, अलीकडे मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असले तरी अजूनही मुलींचा जन्मदर वाढणे काळाची गरज आहे. पीसीपीएनडीटी कायद्यान्वये जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सचे दर तीन महिन्यांनी तपासणी केली जात आहे.'

कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी.जी. शिंदे, ॲड. शरयू पाटील, ॲड. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी पीसीपीएनडीटी कायदा, अंमलबाजवणी आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. पीसीपीएनडीटी कायदे सल्लागार ॲड. गौरी पाटील यांनी स्वागत केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख यांनी आभार मानले. कार्यशाळेस रेडिऑलॉजिस्ट सुनील कुबेर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, पीसीपीएनडीटी कायदे सल्लागार ॲड. गौरी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलपर्णी काढण्याची मोहिम सुरूच

$
0
0

जलपर्णी काढण्याची मोहीम सुरूच

इचलकरंजी : पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्याची मोहीम गुरुवारी दुस-या दिवशी सुरू होती. मोहिमेत पालिकेचे कर्मचारी तसेच व्यंकोबा मैदानातील पैलवानांनी सहभाग घेतला. दिवसभरात ५० टनांहून अधिक जलपर्णी काढण्यात आले. शुक्रवारीसुद्धा मोहीम सुरूच राहणार आहे. पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होऊ लागल्याने पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लोकसहभागातून जलपर्णी काढण्याची मोहिम बुधवारपासून सुरू केली. मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीतून हजारो कार्यकर्ते हल्लाबोल मोर्चाला सहभागी होणार

$
0
0

हल्लाबोलमध्ये हजारो

कार्यकर्ते सहभागी होणार

राधानगरी : भाजपने अच्छे दिनाच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्रात बुरे दिन आणले आहेत. त्यामुळे सरकारवर शेतकरी कामगार, शिक्षक, दलित, अल्पसंख्याक, सामान्य जनता प्रचंड नाराज आहे. याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दोन एप्रिलला मुरगूड, गारगोटी व दसरा चौक कोल्हापूर येथे, तर तीन एप्रिलला नेसरी व जयसिंगपूर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. गारगोटी येथे होणाऱ्या मोर्चात राधानगरी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आणाजे (ता.राधानगरी) येथे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मेळाव्यात दिली. अध्यक्षस्थानी माजी आमदार नामदेवराव भोईटे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसईच्या साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना पेपरफुटीचा फटका

$
0
0

सीबीएसईची फेरपरीक्षा

कोल्हापूर: सीबीएसईचा दहावीचा गणितचा व बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याचा फटका कोल्हापुरातील साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना बसणार आहे. विद्यार्थ्यांना या पेपरची पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. कोल्हापुरात शांतिनिकेतन, कोल्हापूर पब्लिक स्कूल, शाहू विद्यालय, संजय घोडावत स्कूल, विबग्योर हाय, चाटे स्कूल, संजीवन स्कूल येथे सीबीएसई माध्यमातून शिक्षण देण्यात येते. या शाळांमधील ५५६ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी

$
0
0

पुरस्कार : संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषदतर्फे ग्रंथ पुरस्कार वितरण, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी ५.०० वा.

मेळावा : कोल्हापूर जिल्हा भोई समाज महिला मंडळातर्फे महिला मेळावा, स्थळ : यशवंतराव चव्हाण सभागृह, शहाजी कॉलेज, दसरा चौक, वेळ : दुपारी १२.३० वा.

उद्घाटन : आर. के. मेहता ट्रस्टतर्फे जोतिबा यात्रेनिमित्त अन्नछत्राचे उदघाटन, स्थळ : जोतिबा डोंगर, वेळ : सकाळी १०.०० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅट्रॉसिटीप्रश्नी बैठकीचे नियोजन

$
0
0

कोल्हापूर: अॅट्रॉसिटी कायद्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा संघटनेतर्फे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाहू स्मारक भवनात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कायद्याच्या गैरवापराने अन्याय झालेल्यांनी मराठा संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन नियोजनासाठी संघटनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळ घाटगे होते. नंदकुमार कदम, राम यादव, उदय सूर्वे, प्रवीण सावंत, राजेंद्र इंगळे, चंद्रकांत पाटील, राहुल सरनोबत, सर्जेराव भोसले, अरविंद जाधव, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर लक्ष

$
0
0

सोशल मीडियावर लक्ष

आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास गुन्हे; पुणे, सांगलीतील दोघांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोशल मीडियातून सामाजिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आंबेडकर जयंती, शिवजयंती यांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे. याप्रकरणी पुणे आणि सांगलीतील दोघे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी फलक लावणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर आंबेडकरवादी संघटनांसह हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यभर मोर्चे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातील वातावरण तापले आहे. दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असे मेसेज जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवला आहे. बुधवारी पुण्यातील धनकवडी येथील एका संशयिताने सोशल मीडियात आक्षेपार्ह मेसेज टाकला आहे. याशिवाय सांगलीतील एका वॉट्सअप ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झाला आहे. हे मेसेज कोल्हापुरातील काही ग्रुपवर पोहोचले आहेत. अधीक्षक मोहिते यांनी याची गंभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मेसेज व्हायरल करणाऱ्यांसह ग्रुप अॅडमीनवरही कारवाई होणार आहे. याबाबत कोल्हापुरात सायबर सेलमध्ये गुन्हे दाखल होणार आहेत. पुणे आणि सांगलीत संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. असे मेसेज व्हायरल करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन अधीक्षक मोहिते यांनी केले आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रातील विनापरवाना फलक काढून फलकबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले होते. यानुसार पोष्टरबाजीवर कारवाया सुरू आहेत. फलकांवर आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वाद निर्माण होतात. रुकडी येथील वादाला फलकच कारणीभूत ठरले होते. यामुळे विनापरवानगी फलक लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. छपाई व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या असून, आक्षेपार्ह मजकुराबाबत पोलिसांकडून शहानिशा करून घ्यावी असे सांगितले आहे. ठराविक मुदतीत फलक लावण्याची परवानगी देण्याचे ठराव जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

अल्पवयीन वाहनचालकांवर नियमित कारवाई

अपघात रोखण्यासाठी अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यात दीडशेहून अधिक अल्पवयीन वाहनचालकांसह त्यांच्या पालकांना कोर्टाने दंडात्मक कारवाईसह दिवसभर कोर्टात थांबण्याची शिक्षा दिली. या कारवाईमुळे अल्पवयीन वाहनचालकांची संख्या घटली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने अल्पवयीन वाहनचालकांवर यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकला पर्याय होईपर्यंत कारवाई नको

$
0
0

प्लास्टिक पिशवी व अन्य वस्तूंना नवीन पर्याय उपलब्ध होईपर्यंत व्यापारी वर्गावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्लास्टिक अँड डिप्सोजल ट्रेडर्स असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. सरकारच्या निर्णयामुळे व्यापारी, कामगार व त्यांचे कुटुंबियांचा रोजगार जाण्याची भीती आहे. बंदी हा पर्याय नसून सरकारने व्यापाऱ्यांच्या मदतीने प्लास्टिकच्या पुनर्वापराचे प्रकल्प उभे करण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिकला नवीन पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या मालाची विक्री करण्यास जास्तीत जास्त परवानगी द्यावी. तसेच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. शिष्टमंडळात विनोद वाधवा, समीर तांबोळी, पुरुषोत्तम बेंडके आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य अधिकाऱ्याच्यासक्तीच्या रजेत वाढ

$
0
0

डॉ. प्रकाश पाटील यांच्या

सक्तीच्या रजेत वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या औषध खरेदीमधील घोटाळ्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांच्या सक्तीच्या रजेत वाढ झाली आहे. २८ मार्चपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. रजेची मुदत बुधवारी संपली. मात्र, त्यांना हजर करून घेतले नाही. त्यामुळे पुन्हा १५ एप्रिलपर्यंत रजा टाकावी लागली.

औषध भांडारातील औषध खरेदीमधील घोटाळा महाराष्ट्र टाइम्सने उघडकीस आणला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी डॉ. पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्याच प्रकरणात औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगले यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अजूनही घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. आरोग्य, अर्थ विभागातील आणखी दोषींना शोधण्यात येणार आहे. राज्यपातळीवरही घोटाळ्याची दखल घेतली आहे. यामुळे डॉ. पाटील यांना हजर न करून घेण्यावर प्रशासन, पदाधिकारी ठाम आहेत. यामुळे डॉ. पाटील यांना दुसरीकडे बदली करून घेण्यासाठी हालचाली कराव्या लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्लाप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

$
0
0

चाकूहल्ला प्रकरणी

दोघांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील हॉटेलसमोर मुंबईतील व्यावसायिकावर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास विनय मुरारी लाला रतन (वय ५४, रा. दिंडोशी, म्हाडा कॉलनी, गोरेगाव, मुंबई) यांच्यावर दोघांनी हल्ला केला होता. रतन यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

मुंबईतील रतन यांनी गगनबावडा येथील बॉक्साइटच्या खणीकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा ठेका घेतला होता. या कामातील आर्थिक वादातून जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. कोर्टातील कामकाजासाठी ते मुलगा आणि खासगी सुरक्षारक्षकासह बुधवारी कोल्हापुरात आले होते. रात्री नऊच्या सुमारास ते कसबा बावड्यातील टोल नाक्याजवळ एका हॉटेलध्ये जेवण करण्यासाठी थांबले होते. रतन हे हॉटेलमधून बाहेर आले असता, ३० ते ३५ वयोगटातील दोन तरुणांनी त्याना नाव विचारून मारहाण सुरू केली. गगनबावड्यातील खणीच्या वादाचे संदर्भ देत त्यांनी रतन यांच्यावर चाकूहल्ला केला. जखमी रतन यांनी आरडाओरडा करताच हल्लेखोर पळून गेले. सीपीआरमध्ये उपचार केल्यानंतर रतन यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल चौगुले सिनेटवर

$
0
0

अनिल चौगुले

विद्यापीठाच्या सिनेटवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर पर्यावरणतज्ज्ञ अनिल चौगुले यांची राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिले. चौगुले गेली २५ वर्षे निसर्गमित्र संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करतात. त्याबरोबरच वृक्ष प्राधिकरण, जैव विविधता मंडळ, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. निर्माल्यदान, गणेश मूर्तीदान, बिया संकलन, नैसर्गिक रंगांपासून रंगपंचमी खेळण्यासाठी जागृती रानभाज्या, देवराईचा अभ्यास, खतनिर्मिती, सौरऊर्जा साधनेनिर्मिती अशा अनेक पर्यावरणपूरक कामात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. वृक्षतोड, प्रदूषण, खाणकामविरोधी लढ्यात त्यांचा सहभाग आहे. या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांसाठी सख्ख्या भावानेच केला खून

$
0
0

सख्ख्या भावानेच

पैशांसाठी केला खून

टी शर्टने केला खुनाचा उलगडा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लॉट विक्रीला विरोध केल्याने गोकुळ शिरगाव येथील अजीज सैफुद्दीन वजीर याला स्वत:चा जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे सख्ख्या भावानेच पैशांच्या हव्यासापोटी साथीदारांच्या मदतीने त्याचा काटा काढला. एक खून पचवल्याच्या आत्मविश्वासातून पुन्हा सुमारे अडीच महिन्यानंतर याच टोळीने दस्तगीर महंमदहनीफ तद्देवाडी याचाही खून केला. या दोन्ही खुनांचा सूत्रधार मोरेवाडीतील भैरू उर्फ सुनील दगडू मोरे (वय ३९) हा आहे. भैरूने परिसरात गँग तयार केली असून, राजकीय वरदहस्ताने त्याने अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

गोकुळ शिरगावातील अजीज वजीर हा नोकरीच्या निमित्ताने कुटुंबासह मुंबईत राहत होता. चार वर्षांपूर्वी तो पुन्हा गावाकडे परत आला. वडिलांनी एमआयडीसीत घेऊन ठेवलेल्या सहा गुंठ्यांच्या प्लॉटमध्ये त्याने लेथमशीन सुरू केले होते. त्याचा लहान भाऊ रशिद हा चैनीखोर स्वभावाचा असल्याने अनेकांकडून तो वेळोवेळी हातउसने पैसे घेत होता. याच सवयीतून रशिदने भैरू मोरे याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते. भैरूने चाणाक्षपणे एमआयडीसीतील प्लॉटवर नजर ठेवून रशिदकडून स्टॅम्प पेपर लिहून घेतला होता. पैशांची परतफेड करण्यासाठी प्लॉट विकण्याचा तगादा रशिदने अजिजकडे लावला. मात्र, प्लॉट विक्रीस अजीजने विरोध केला. प्लॉट हडप करण्यासाठी भैरू आणि रशिदने अजीजचा काटा काढण्याचा कट रचला. ४ नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याचे अपहरण करून रशिद आणि भैरू यांच्यासह पाच जणांनी अजीजचा निर्घृण खून केला.

खुनाची घटना घडल्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यांनी तामगावच्या खणीत मृतदेहाचा सापळा सापडला. यावेळी पोलिसांना एक टी शर्ट आणि तावीज मिळाला होता. हा टी शर्टच आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता फिर्यादीनुसार पोलिसांनी अजीजच्या पत्नीस बोलवून घेतले. तिने टी शर्ट ओळखला. अजीजने एकसारखेच दोन टी शर्ट घेतले होते. त्याला सोबत तावीज बाळगण्याची सवय होती. तावीज ठेवण्यासाठी पत्नीने शर्टच्या आतील बाजूला छोटा खिसा तयार केला होता. यावरून टी शर्टसह अजीजची ओळख पटली. दरम्यान, पोलिसांनी डीएनए टेस्टसाठी मृतदेहाचे अवशेष राखून ठेवले आहेत.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अजीजच्या मोबाइलमधील माहितीवरून पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे संशयितांमध्ये अजीजच्या सख्ख्या भावाचाही समावेश असल्याचे स्पष्ट होताच वजीर कुटुंबाला धक्का बसला. मृत अजीजच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे.

..................

चौकट - शिताफीने केला तपास

हे दोन्ही खून अतिशय थंड डोक्याने आणि तितक्याच क्रूरपणे केले आहेत. संशयितांनी कोणतेही पुरावे मागे सोडले नव्हते, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. मोरेवाडी येथील विहिरीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी सीमाभागात कसून तपास केला. तामगाव येथील मृतदेह मिळाल्यानंतर तपासाला गती आली. दोन्ही खुनांची पद्धत एकसारखीच होती, त्यामुळे पहिल्याच दिवशी उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दोन्ही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर निरीक्षक दिलीप जाधव यांनी जनरेटरच्या साहायाने तीन मोटर लावून विहिरीतील सर्व पाणी उपसले. टी शर्ट, ताविज आणि मोबाइलमुळे पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. शिताफीने तपास केल्यानेच या गुन्ह्यांचा उलगडा झाला.

....................

भैरू पोलिसांच्या रडारवर

भैरू मोरे याची बदललेली लाइफ स्टाइल करवीर पोलिसांच्या रडारवर होती. गेल्या दोन वर्षांपासून त्याने बीएम बॉइज हा ग्रुप सुरू केला आहे. परिसरातील चारशे ते पाचशे तरुणांची वर्दळ त्याच्याकडे असते. प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायासह तो खासगी सावकारीही करतो. अनेकांना गरजेपोटी आर्थिक मदत करून त्याने पैशांच्या बदल्यात प्लॉट, घरे, वाहने स्वत:च्या नावावर करून घेतली आहेत. त्याला मोरेवाडीतील एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचीही चर्चा सुरू आहे. दोन्ही गुन्हे घडल्यानंतर त्याच्यासह टोळीतील पाच जणांचे मोबाइल दोन दिवस बंद होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइन योजना........

$
0
0

एप्रिलनंतर जॅकवेलचे काम

थेट पाइपलाइनच्या काम ओलांडणार मुदत; मेनंतर मुदतवाढीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी धरणातील जॅकवेलसाठी खोदाई करावयाची जागा पाण्याखाली गेल्यामुळे गेल्या सात ते आठ महिन्यापासून ठप्प झालेल्या जॅकवेल उभारणीच्या कामाला एप्रिल महिन्यात पुन्हा सुरुवात होणार आहे. ठेकेदार कंपनीकडून सध्या तीन पंपाद्वारे पाणी उपसा सुरू आहे. दहा एप्रिलपर्यंत पाणी उपसा करून त्यानंतर जॅकवेलसाठी उर्वरित २१ मीटर खुदाई आणि अन्य कामांना सुरुवात करण्याचे ठेकेदार कंपनीने नियोजन आहे. पाइपलाइन योजनेतील प्रस्तावित कामावर दृष्टीक्षेप टाकल्यास मे २०१८ पर्यंतच्या मुदतीत योजनेचे काम पूर्ण होणार नाही हे स्पष्ट आहे. कंपनीने अद्याप नव्याने मुदतवाढ मागितली नाही. मे महिन्यातील कामाची स्थिती पाहून नव्याने मुदतवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे.

ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पाइपलाइन योजनेच्या कामाची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी यापूर्वीच डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ मागितली होती. मात्र महापालिकेने मे २०१८ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक नोव्हेंबर २०१६ अखेर योजना पूर्ण करावयाची होती. 'जीकेसी'ने मुदतीत योजना पूर्ण न केल्यामुळे महापालिकेने कंपनीवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ५२ किलो मीटर लांबीचा पाइपलाइन मार्ग आणि धरण्याच्या उजव्या बाजूच्या तिरावर जॅकवेल ही योजनेतील सर्वात मोठी कामे आहेत. धरणाच्या उजव्या बाजूला इनटेक वेल, जॅकवेल व पंप हाऊस प्रस्तावित आहे.

आतापर्यंत ३५ किलो मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तर जॅकवेलसाठी ४६ मीटर खोदाई प्रस्तावित आहे. गेल्यावर्षी २५ मीटरपर्यंत खोदाई झाल्यानंतर पाऊस व धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे काम थांबवावे लागले होते. दरम्यान जॅकवेलला लागून उभारलेल्या कॉपर डॅमच्या एका बाजूने पाणी पसरून जॅकवेलची जागा व्यापली. ज्या ठिकाणी खुदाई करावयाची आहे तो भाग पाण्याखाली असल्याने गेली आठ महिने जॅकवेल उभारणीचे काम ठप्प आहे.

प्रोजेक्ट इनचार्ज राजेंद्र माळी म्हणाले, 'आठ ते दहा दिवसांत पाणी उपसा काम पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलसाठी खुदाई व अन्य कामांना सुरुवात होईल. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. तसेच राजापूर ते पुईखडीपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३५ किलो मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या १२ किमीपैकी अडीच किलो मीटर अंतर पाइपलाइनचे काम पूर्णत्त्वास आले. काही ठिकाणी एमएसईबी पोल शिफ्टींगचे काम सुरू आहे. पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्त्वाच्या अंतिम टप्प्यात आहे.'

....................

योजनेतील प्रस्तावित कामे

काळम्मावाडी धरणाच्या उजव्या तिरावर इनटेक वेल, जॅकवेल व पंपहाऊस

पपिंग मशिनरी : ९४० अश्वशक्ती क्षमता

दाब नलिका : १८०० मि व्यासाची लोखंडी दाबनलिका १०० मीटर

ब्रेक प्रेशल टँक (दाब मोड टाकी) १५ लक्ष लिटर्स क्षमता

मौजे राजापूर ते पुईखडीपर्यंत ५२.९७ किमी पाइपलाइन

(आतापर्यंत ३५ किमी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण)

पुईखडी येथे ८० दश लक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र

(आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण, फिल्टर व अन्य कामे शिल्लक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर चोरी प्रकरणातील दोघे संशयीत अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गडहिंग्लज येथील काळभैरव मंदिरमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. सूरज तानाजी काळे (वय २६, रा. दौंड, जि. पुणे) व सिद्धनाथ सुदाम गायकवाड (वय २५, रा. गोरेवाडी, जि.सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना निपाणी पोलिसांनी चोरीप्रकरणी अटक केली होती. निपाणी पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी अटक केली आहे. अद्याप त्यांनी चोरीची कबुली दिलेली नाही.

गडहिंग्लज येथील काळभैरव मंदिरात २२ फेब्रुवारी रोजी चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामध्ये चोरट्यांनी मंदिरातील सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. याच दरम्यान, निपाणीत चोरी करीत असताना सिद्धनाथ गायकवाड व सूरज काळे यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून निपाणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हा प्रकार ९ फेब्रुवारीला घडला होता. इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासामध्ये दोघा संशयितांना मंदिर चोरीप्रकरणी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडीरेकनर वाढणाार नाही

$
0
0

रेडीरेकनरच्या दर

राहणार 'जैसे थे'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन कायदे तसेच मंदी यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसल्याने यंदा रेडीरेकनर दरात वाढ होणार नाही, असे संकेत मिळत आहेत. यापूर्वी सलग सात वर्षे दरवाढ झाली आहे. त्यामुळे यंदा दरवाढ करू नये, यासाठी क्रिडाईने सरकारकडे प्रयत्न केले होते. दरात वाढ झाली की जैसे थे राहिले हे आता एक एप्रिलला नवीन दर लागू झाल्यानंतर समजणार आहे.

नवीन घर वा जागा खरेदी करायची असल्यास त्या भागातील रेडीरेकनर दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यामुळे या दरावर खरेदी विक्रीचे व्यवहार अवलंबून असतात. यापुर्वी एक जानेवारीपासून नवीन दर अंमलात येत होते. पण यंदा सरकारने आर्थिक वर्षाप्रमाणे एक एप्रिलपासून नवीन दराची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार नवीन रेडीरेकनर काय असणार याकडे बांधकाम व्यावसायिक, खरेदीदार नागरिक यांचे लक्ष लागले आहे.

२०१० पासून गेल्या वर्षीपर्यंत दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील उलाढाल विचारात घेऊन ही दरवाढ केली जात होती. गेल्यावर्षीही फार वाढ होणार नाही, असे सांगत १० ते १२ टक्के दरवाढ करण्यात आली होती. काही परिसरातील दरात तर १५ ते २० टक्क्यापर्यंत वाढ झाल्याने व्यावसायिक गोंधळून गेले होते. त्यामुळे यंदा दरवाढ होऊ नये यासाठी क्रिडाईने सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सरकारने त्यानुसार दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. पण गेल्यावर्षी अशाच प्रकारचे आश्वासन असताना दरवाढ झाली. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष दर येत नाहीत, तोपर्यंत त्यावर भाष्य करण्याचे टाळले जात आहे. या क्षेत्रातील काही व्यावसायिक यंदा सरकार मोठी दरवाढ न करता दरवर्षी आवश्यक असलेली किरकोळ वाढ करु शकते, असे सांगत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

फसवणूकप्रकरणी

गुन्हा दाखल

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे मोबाइल टॉवरसाठी जागा भाड्याने पाहिजे म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी राम अवतार (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्यावर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबतची फिर्याद संदीप शिवाजी मेथे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : संशयित आरोपी राम अवतार याने मोबाइल टॉवरसाठी जागा भाड्याने पाहिजे म्हणून एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. जाहिरात वाचून फिर्यादी संदीप मेथे यांनी पेठवडगाव हद्दीतील जागा भाड्याने देण्यासाठी जाहिरातीमधील मोबाइलवर संपर्क साधला असता त्याने १४५० रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर करार करण्याची कागदपत्रे पोस्टाने पाठवून देऊन संशयित राम अवतारने बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ६०८६१०११०००३०६६ वर पेठवडगाव शाखेतून २० जुलै २०१५ रोजी २५ हजार, २१ जुलै २०२५ रोजी १८,२०० व १५,२०० असे एकूण ५९ हजार ८५० रुपये भरुन घेतले. त्यानंतर संशयित राम अवतारने करार रद्द झाल्याचे कळवले. याबाबत मेथे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेश्वर योजनेस मंजुरी

$
0
0

पालेश्वर पाणी योजनेस मान्यता

मलकापूरचे नगराध्यक्ष केसरकर यांची माहिती, एक वर्षात करावी लागणार प्रकल्पाची पूर्तता

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व बहुचर्चित थेट पालेश्वर नळपाणी योजनेच्या प्रस्तावित २.०२ कोटी रुपयांच्या प्रकल्पकामाला राज्य सरकारने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. सोमवारी झालेल्या राज्य नगरविकास विभागाच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य प्रवीण प्रभावळकर आदी सत्ताधारी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत साकारणाऱ्या या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पालिकेच्या सादर आकृतिबंधानुसार प्रकल्प किंमतीच्या नव्वद टक्के रक्कम (१.११८ कोटी रुपये) राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे, तर उर्वरित दहा टक्के प्रकल्प हिश्श्याची रक्कम (२०.२० लाख रुपये) मलकापूर नागरपरिषदेला स्वतः उपलब्ध करावी लागणार आहे. शिवाय कार्यादेश निर्गमित झाल्यानंतर बारा महिन्यांच्या आत थेट पालेश्वर नळपाणी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशही या प्रशासकीय मान्यतेला अनुसरून नमूद करण्यात आले आहेत.

मलकापूर (ता. शाहूवाडी) नगरपरिषदेने शहरासाठीचा थेट पालेश्वर पाणीपुरवठा प्रकल्प आराखडा नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. प्रशासन विभागाने तो राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यताधीन शिफारशीसाठी पाठविला होता. यापूर्वी मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांनी या प्रकल्पास तांत्रिक मान्यता दिलेली असल्याने आणि राज्यस्तरीय मान्यता समितीने १६ मार्चच्या बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार थेट पालेश्वर पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देण्याचा विषय सरकारच्या विचाराधीन होता. यालाच अनुसरून संबधित विभागाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार काही अटींच्या अधीन राहून मलकापूर नागरपरिषदेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाकडून मलकापूर पालिकेला कळविले आहे. वर्षभरात कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण, उपभोक्ता कर आकारणी व त्याची किमान ८० टक्के वसुली, दुर्बल घटकांसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद, घनकचरा व्यवस्थापन आदी सुधारणा बंधनकारक केल्या आहेत. तसेच मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत सांडपाण्याचे पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर घटक समाविष्ट करणे, पर्जन्यजल संचय करणे, नियमित जल लेखापरीक्षण आदी वैकल्पिक सुधारणाही सुचविण्यात आलेल्या आहेत. प्रकल्पाच्या अनुषंगाने मंजुरी देताना निधी वितरण, निविदा प्रक्रिया, प्रकल्पाचे त्रयस्थ तांत्रिक परीक्षण, देखभाल व दुरुस्ती, अनावश्यक वित्तीय अनियमितता याबाबतीतही नगरविकास विभागाने अपेक्षित स्पष्टता व्यक्त केली आहे. कोणत्याही कारणाने प्रकल्प खर्चामध्ये मंजुर निधीपेक्षा वाढ झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर राहील शिवाय त्यासाठी कोणतेही वाढीव अनुदान सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार नाही, असेही प्रशासकीय मान्यतेच्या शेवटी नगरविकास विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.

चौकट...

वचनपूर्तीचा सत्ताधारी आघाडीचा दावा..

पालिकेतील सत्ताधारी भाजप-जनसुराज्य आघाडीने सत्तेच्या वर्षपूर्तीलाच पालेश्वर नळपाणी योजनेला निधी व प्रशासकीय मंजुरी मिळवून देत शहरवासीयांना दिलेल्या निवडणूकपूर्व आश्वासनाची पूर्तता केल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नगरसेवक प्रवीण प्रभावळकर यांनी दिली. याकामी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार अमल महाडिक, जि. प.चे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेडला आग

$
0
0

राजारामपुरीत शेडला आग

कोल्हापूर : राजारामपुरी चौथ्या गल्लीतील पत्र्याच्या शेडला लागलेल्या आगीत लाखांचे नुकसान झाले. या ठिकाणी वॉचमन महेश भागील (वय ५५) राहतात. शुक्रवारी सकाळी या शेडला अचानक लाग लागली. यामध्ये टीव्ही, कपाट, प्रांपचिक साहित्य, कपडे असा सुमारे लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे पडल्याचे सांगून मोबाइल लांबवला

$
0
0

पैसे पडल्याचे सांगून मोबाइल लांबवला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी येथे बी. टी. कॉलेजसमोर केळी खरेदी करणाऱ्या सराफाला बाजुला पैसे पडल्याचे सांगत दिशाभूल करून अज्ञात तरुणाने किमती मोबाइल लांबवला. बुधवारी (ता. २८) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत किरण शामराव पेडणेकर (वय ४५, रा. सागाव. ता. शिराळा, जि. सांगली) यांनी शुक्रवारी (ता. ३०) शाहूपुरी पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीची फिर्याद दाखल केली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पेडणेकर हे बुधवारी कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. शाहूपुरीतील बी. टी. कॉलेजच्या समोर केळी खरेदी करण्यासाठी ते थांबले होते. यावेळी एका तरुणाने त्यांना दहा रुपयांच्या नोटा खिशातून खाली पडल्या आहेत, असे सांगितले. बाजुला दहा रुपयांच्या दोन नोटा पडल्या होत्या. पेडणेकर नोटा उचलण्यासाठी वाकल्यानंतर तरुणाने त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल घेऊन पोबारा केला. पेडणेकर यांनी आरडाओरडा करून संशयित तरुणाचा पाठलागही केला. मात्र, जवळच उभ्या राहिलेल्या दोन तरुणांसह तो राजारामपुरीच्या दिशेने पळून गेला. मोबाइल चोरणारा तरुण अंदाजे २० ते २२ वर्षे वयाचा होता. ४० हजार रुपये किमतीचा मोबाइल त्याने लांबवल्याची फिर्याद पेडणेकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. गेल्या महिन्यात याच परिसरात फळे खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाच्या मोपेडच्या डिकीतून ६५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली होती. पुन्हा याच परिसरात चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई पार्कात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

$
0
0

ताराबाई पार्कात घरफोडी

सव्वा लाखाचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्कातील सरदार कॉलनीत सुलोचना गार्डन होममध्ये बंद घराच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी घरातील किमती ऐवज लंपास केला. बुधवारी (ता. २८) रात्री सात ते साडेआठच्या सुमारास चोरट्यांनी ही धाडशी चोरी केली. कपाटातील चांदीची भांडी, देवाच्या मूर्ती, साड्या, समई, सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत विजय आप्पासाहेब भोसले (वय ६८) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भोसले हे सेवानिवृत्तीनंतर व्यापार करतात. बुधवारी रात्री सातच्या सुमारास ते घर बंद करून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पोवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरट्यांनी दरवाजाचे लॅच तोडून आतील लोखंडी तिजोरी व लाकडी कपाटातील साहित्य लांबवले. चांदीची एक किलो वजनाची दोन ताटे, अर्धा किलोचा तांब्या, वाट्या, देवतांच्या मूर्ती, समई, चार साड्या, मोबाइल, गळ्यातील दागिने असा सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद फिर्यादीत केली आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images