Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विद्यापीठ...

$
0
0

आघाडी शांत तर संघटना नामानिराळ्या

पदवी प्रमाणपत्र घोळप्रकरणी जबाबदारी अनिश्चित

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पदवी प्रमाणपत्रात छेडछाड करण्याचा प्रकार घडून आठ दिवसांचा कालावधी उलटला, प्रशासनातील सावळ्यागोंधळामुळे विद्यापीठाचे जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले, मात्र अद्यापही त्या प्रकरणी कुणावरही जबाबदारी निश्चित झालेली नाही. एरव्ही विद्यापीठीय निवडणूक असो की समारंभ प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी केंद्रीभूत धोरणाचा डांगोरा पिटणारी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व संलग्न संघटनाही या प्रकरणी मौन बाळगून आहेत. विविध अधिकार मंडळावर वर्चस्व गाजविणाऱ्या विद्यापीठ विकास आघाडीची प्रशासनाशी मिलिभगत आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी संघटनांची भूमिकाही पदवी प्रमाणपत्राशी काहीहीदेणेघेणे नसल्यासारखी आहे.

पदवीदान हा विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणारा समारंभ असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. यावर्षी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची एकमेकांवरील कुरघोडी आणि नियमांना फाटा देत कामकाज करण्याच्या पध्दतीचा फटका पदवी प्रमाणपत्राला बसला. केवळ कुलगुरुंच्या स्वाक्षरीने छापलेली २५ हजार प्रमाणपत्रे प्रशासनाला रद्द करावी लागली. त्यानंतर कुलगुरु आणि कुलसचिवांच्या स्वाक्षरीची नव्याने प्रमाणपत्रे घाई गडबडीने छापावी लागली. यानिमित्ताने प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला. पदवी प्रमाणपत्रातील या घोळानंतर याप्रकरणी दोषीवर जबाबदारी निश्चित केली जाईल अशी शक्यता होती. मात्र प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही झाली नाही.

. विद्यापीठ विकास आघाडीची विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर सत्ता आहे. व्यवस्थापन परिषद, सिनेटवर आघाडीचे वर्चस्व आहे. आघाडीची मोट बांधण्यात संस्थाचालक, प्राचार्य संघटनेचा पुढाकार असतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवडणुकीच्या कालावधीत विविध घटकांना एकत्र करुन विद्यापीठ विकास मंचची स्थापना केली. पदव्युत्तर शिक्षक संघटना, कास्ट्राईब, महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघ आदींचा मंचमध्ये समावेश आहे. सेवक संघही विद्यापीठीय राजकारणात आघाडीसोबत आहे. मात्र या घटकाचे प्रमुख या प्रकरणी मौन बाळगून आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाच्या विद्यार्थीं संघटना आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे पक्षाच्या विद्यार्थीं संघटना शहरात सक्रिय असताना पदवी प्रमाणपत्र घोळप्रश्नी कुणाचाही आवाज उमटला नाही. केवळ अखिल भारतीय मराठा महासंघ, युवक संघटना, जनता नागरी निवारा संघटनेने पदवी प्रमाणपत्रातील घोळप्रश्नी प्रशासनाकडे विचारणा केली. जनता नागरी निवारा संघटनेने तर कुलपती कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत.

......................

मिटवामिटवीसाठी यंत्रणा सक्रिय

पदवी प्रमाणपत्राच्या घोळानंतर अद्याप कुणावरही जबाबदारी निश्चित झाली नाही. उलट प्रशासनाकडून सिस्टीमचा दोष असल्याचे कारण पुढे करत प्रकरण मिटवामिटवीसाठी यंत्रणा सक्रिय राहिली. विद्यापीठ, संस्थाचालक, प्राचार्य संघटना, शिक्षक संघटना ते विद्यार्थी संघटना अशा प्रत्येक पातळीवर विद्यार्थींहिताला प्राधान्य, त्याला केंद्रस्थानी ठेवून धोरणे राबविण्याची हाकाटी पिटतात. मात्र पदवी प्रमाणपत्राचा घोळ अजून संपला नसताना या साऱ्या संघटना गप्प आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भलिंग निदानच्या संशयावरून रुग्णालयांची पाहणी

$
0
0

दोन रुग्णालयांची तपासणी

गर्भलिंग निदानाचा संशय; आणकी रुग्णालये रडारवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून दिल्लीतील 'कारा' या संस्थेने सोमवारी (ता. २६) कोल्हापूर आणि सातारा येथील दोन रुग्णालयांची तपासणी केली. या तपासणीत आक्षेपार्ह काही आढळले नाही. मात्र, गर्भवती मातांच्या नोंदणीत त्रुटी असल्याने त्यात सुधारणा करण्याच्या सूचना काराच्या सदस्यांनी संबंधित रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. येणाऱ्या दोन दिवसांत आणखी काही रुग्णालयांची तपासणी होणार आहे. यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापुरातील काही रुग्णालयांमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याच्या तक्रारी दिल्लीतील कारा या संस्थेकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींनुसार संस्थेचे सदस्य शिवानंद डंबल हे सोमवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. डंबल यांनी जिल्हा बालकल्याण संकुलाच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी नितीन म्हस्के यांच्यासह प्रमिला जरग यांच्या पथकाने राजारामपुरीच्या तिसऱ्या गल्लीतील जानकी रुग्णालयाची तपासणी केली. तपासणीत आक्षेपार्ह काही आढळले नसल्याचे पथकाने सांगितले. मात्र, गर्भवती महिलांच्या नोंदींबाबत पथकाने हॉस्पिटल प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. गर्भवती महिला उपचारासाठी दाखल होताच तिचे आधार कार्ड आणि फोटो घेऊन ठेवाव. प्रसूतीनंतर तिचा आणि बाळाचा फोटो द्यावा. त्याच्या नोंदी रुग्णालयात ठेवाव्यात. या बाबींची गांभीर्याने अंमलबजावणी करावी. आठ दिवसांच्या अवधीत पुन्हा रुग्णालयाची तपासणी करणार असल्याचेही समितीने सांगितले.

याबाबत जानकी रुग्णालयातील डॉ. गीता पिलई यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, 'रुग्णालयात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. समितीने तपासणी करून अद्ययावत नोंदी ठेवण्याची सूचना केली आहे. या सूचनांचे पालन केले जाईल.' कोल्हापुरातील तपासणीनंतर पथक सातारा येथे पोहोचले. साताऱ्यात एका रुग्णालयाची तपासणी केली आहे. या कारवाईबाबत समितीने अधिक माहिती दिली नाही. गर्भलिंग निदान करणाऱ्या रुग्णालयांची नावे काराकडे पोहोचली आहेत. येणाऱ्या दोन दिवसांत आणखी काही रुग्णालयांची तपासणी होणार आहे. यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता काराचे सदस्य शिवानंद यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले सफाई सुरु

$
0
0

फोटो

............

नाले सफाईला सुरूवात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गाळ व कचऱ्याने भरलेल्या नाल्यांच्या सफाईला महापालिकेने सोमवारपासून सुरुवात केली. कसबा बावड्यातील शुगर मिल व क्रांतिसिंह नाना पाटीलनगर,जिवबा नाना पार्क या दोन प्रभागातील चॅनेल व गटारींची सफाई करण्यात आली. पहिल्या दिवशी दोन प्रभागातील चॅनेल व गटारीत साठलेला पाच डंपर कचरा काढण्यात आला.

गाळ व कचऱ्यामुळे नाले, चॅनेल, गटारी भरल्या आहेत. या कचऱ्यामुळे पावसाळ्यात नाले व चॅनेल ओसंडून वाहून शहरवासियांना त्रास होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नालेसफाईचे नियोजन केले आहे. त्या नियोजनानुसार मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने सफाई कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली आहेत. ३२ कर्मचाऱ्यांचे एक पथक असून त्यांना एक जेसीबी व एक डंपर देण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एकपासून एक पथक तर शेवटच्या प्रभागापासून उलट दिशेने एक पथक नाले, गटारी, चरींची सफाई करणार आहे. सोमवारी शुगर मिल व क्रांतिसिंह नाना पाटीलनगर प्रभागात कर्मचाऱ्यांकडून सफाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांकडून चॅनेल, गटारीतून बाहेर काढलेला कचरा तत्काळ उचलला जात आहे. त्यामुळे आता गटारीशेजारी कचऱ्याचे ढिग दिसत नाहीत.

टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागात मोहीम राबवण्यात येणार आहे. बहुतांश ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सफाई करण्यात येणार आहे. पण ११ मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन मशिनरीच आवश्यक आहे. ज्या उपनगरांमध्ये अजून बंदिस्त चॅनेल नाहीत,त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून चरी खोदण्यात येणार आहेत. तसेच जुन्या चरींमध्ये साठलेला गाळही जेसीबीद्वारे काढण्यात येणार आहे. पोकलॅन मशिन भाडेतत्वावर घेण्यासाठी अल्पमुदतीची निविदा काढली आहे. लवकरच पोकलँड मशिनही उपलब्ध होणार आहे.

...............

२३०

मशिनरीद्वारे सफाई केले जाणारे नाले, गटर

४८०

कर्मचाऱ्यांकडून सफाई केले जाणारे नाले, गटर

१३१०

साफ केले जाणारे नाले, चॅनेल, गटारी

५९

सफाईसाठीचे दिवस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभिनव भारत’मधून अॅट्रॉसिटी रद्दचा डाव

$
0
0

अॅट्रॉसिटी रद्द करण्याचा डाव

राजा ढाले यांची अभिनव भारत संकल्पनेवर टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र सरकारची अभिनव भारत ही संकल्पना अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा छुपा अजेंडा आहे. हा कायदा रद्द करणे म्हणजे आंबेडकरांची घटना डावलून मनुचा कायदा चालविण्याचा प्रकार आहे.' अशी खरमरीत टीका आंबेडकरवादी विचारवंत राजा ढाले यांनी सोमवारी केली.

फुले, आंबेडकर विचारधारा कोल्हापूतर्फे 'आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा'या विषयावर सोमवारी सायंकाळी ढाले यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बापूसाहेब माने होते. शाहू स्मारक भवन येथे आयोजित व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी झाली होती.

'जात ही देशाला लागलेली कीड आहे. तर चळवळीत बांडगुळे निर्माण झाली आहेत. फुले आणि आंबेडकरांचा विचार डावलणारे पुरोगामी कसे? स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय व्यवस्था साहित्यातून अभिप्रेत आहे. ही मानवे मूल्ये आणि स्वातंत्र्य, समतेची विचारधारा जपली जाणार नसेल तर असे साहित्य जाळून टाका. शिक्षणाच्या माध्यमातून समता, बंधुता रुजवायची असेल त पाठ्यपुस्तक निर्मितीत पुरोगामी चळवळीतील सच्चा कार्यकर्त्यांच्या समावेशाची मागणी ढाले यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनव भारत संकल्पनेवर टीका करताना ते म्हणाले, 'लोकशाहीची टिंगल करणारे आज सत्तेवर आहेत. अभिनवच्या नावाखाली जात व्यवस्था टिकवण्याचा खटाटोप आहे. अॅट्रॉसिटीखाली सर्रास अटक नको ही मागणी म्हणजे अन्याय करणाऱ्याला अभय देण्याचा प्रकार आहे. आम्ही तुमच्यावर अन्याय करतो तुम्ही सहन करा, ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पूर्णविराम नव्हे, तो एक मार्ग आहे. त्या विचारधारेने मार्गक्रमण करत जीवन विकसित करा.' यावेळी प्राचार्य बापूसाहेब माने यांचेही भाषण झाले. प्रा. जी. बी. अंबपकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक चोकाककर यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर मधुकर कांबळे, ए. पी. कांबळे, प्रा. सिद्धार्थ पद्माकर उपस्थित होते.

लाखोचे मोर्चे काढणाऱ्यांनी दम देऊ नये

'एक मराठा, लाख मराठा'ची हाक देत मोर्चे निघाले. पण लाखाचे मोर्चे काढणाऱ्यांनी आम्हाला दम देऊ नये. लाखाचा मोर्चा आम्हीही मुंबईत काढला. महार हा शब्द वगळून महाराष्ट्र आकाराला येईल का? शिवाय 'मराठा'वरुन महाराष्ट्र शब्द निर्माण झाला असेल तर एकाच राज्यात मराठवाडा आणि महाराष्ट्र अशी दोन वतने कशी? महात्मा फुलेंचे विचार अनाथ नाहीत, पण माळी समाज नेमका कुठे आहे? अशी विचारणा ढाले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंकडून विद्यापीठ कायद्याची पायमल्ली

$
0
0

पान ५ मेन

विद्यापीठ....लोगो

.............

विद्यापीठ कायद्याची पायमल्ली

'सुटा'चा कुलगुरूंवर आरोप, आज सिनेटमध्ये बहिष्कार आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची सातत्याने पायमल्ली केली आहे. गेल्या वर्षभरात परिनियमबाह्य निर्णय घेतले आहेत. याबाबत त्यांना वेळोवेळी पत्रे देऊनही तक्रारीची दखल घेतलेली नाही,असा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा)पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. तसेच मंगळवारी होणाऱ्या सिनेट सभेत बहिष्कार आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुटाचे कार्यवाह डॉ. आर. जी. कोरबू यांनी दिली . यासंदर्भात सुटाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलगुरूंनी कायद्याचे उल्लंघन केलेल्या गोष्टी नमूद केल्या आहेत.

विद्यापीठांची सर्व प्राधिकरणांची स्थापना २८ फेब्रुवारी २०१८ पूर्वी करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र विद्यापीठातील गैरहजेरीमुळे कुलगुरूंकडून अद्यापही प्राधिकरणे स्थापित करण्यात आलेली नाहीत. विद्यापीठ कायद्यान्वये ५० प्राधिकरणांच्या स्थापनेअभावी महत्त्वाचे निर्णय खोळंबले आहेत.

कुलगुरूंनी विविध अभ्यास मंडळांवर सहा शिक्षकांचे नामनिर्देशन करताना मनमानी केल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे. पात्रतानिकष पूर्ण न करणाऱ्यांचा या नामनिर्देशनात समावेश करण्यात आला आहे. अभ्यासमंडळावर अशाप्रकारे नामनिर्देशन करणे चुकीचे असल्याचेही या पत्रकात नमूद नरण्यात आले आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी कुलगुरूंनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. ही नेमणूक बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही कुलगुरूंनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.विद्यापीठामध्ये शैक्षणिक सल्लागारपदासाठी नेमणूक करताना कुलगुरूपदासह व्यवस्थापन परिषदेच्या अधिकार कक्षेचा भंग केल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे. पद भरण्यापूर्वी पदाची निर्मिती करणे, जाहिरात देणे, वेतनश्रेणी ठरवणे, पात्रतानिश्चित करणे, अर्ज मागवणे, मुलाखत घेणे अशी कोणतीही प्रक्रिया सल्लागार नियुक्तीसाठी करण्यात आलेली नाही. या नेमणुकीमध्ये वैयक्तिक हित जपण्याचा प्रयत्न कुलगुरूंनी केल्याचे पत्रकात म्हटले आहे.

अधिष्ठातापदासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर अर्ज सादर करण्याची मुदत २१ डिसेंबरअखेर होती. अर्ज सादर करण्याची मुदत संपून तीन महिने उलटून गेले तरी या पदासाठी अद्याप रितसर नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पदवीदान समारंभात तात्पुरते अधिष्ठाते नामनिर्देशन करण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर आली. अशा अधिष्ठातामार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आलेले पदवीदान रद्द होऊ शकते. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापरिषदेची रितसर मान्यताही पदवीदानासाठी घेण्यात आलेली नव्हती.

वार्षिक अंदाजपत्रकाबाबत किमान दोन महिने आधी तयारी करणे आवश्यक आहे. मात्र कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया दोन ते तीन दिवसात उरकण्यात आली. व्यवस्थापन परिषदेच्या १३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत घाईगडबडीत तयार केलेले अंदाजपत्रक सदस्यांच्या हाती देण्यात आले होते. यातील त्रुटी सांगितल्यानंतर कुलगुरूंनी चूक मान्य केली होती. मात्र चाळीस कोटी रूपयांचे अंदाजपत्रक घाईगडबडीत तयार करणे हे बेजबाबदारपणाचे काम आहे,असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.

.............................

चौकट

'सुटा'ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शिवाजी विद्यापीठाचे पूर्णवेळ पगारी कुलगुरू असताना डॉ. शिंदे सतत गैरहजर राहतात. यामुळे विद्यापीठाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगाई झाली आहे. केवळ कार्यालयीन बैठकांपुरते डॉ. शिंदे मुंबईहूनविद्यापीठात येतात. दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची जबाबदारीही गेल्या वर्षभरात डॉ. शिंदे यांनी पाळलेली नाही. पदवीप्रमाणपत्रावरील कुलसचिवांच्या सहीवर फुली मारण्याबाबत कुणी निर्णय घेतला याची चौकशीही कुलगुरूंनी केली नाही. यामुळे विद्यापीठाला झालेल्या खर्चासाठी व विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापासाठी कुलगुरू जबाबदार आहेत. मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार असलेले कुलगुरू शिवाजी विद्यापीठात महिन्यातून केवळ ४ ते ५ दिवसच हजर राहतात. मात्र आपल्या गैरहजेरीत प्रकुलगुरूंकडे त्यांनी पदभार देण्याची प्रक्रिया न केल्याने निर्णय प्रलंबित राहत आहेत. विद्यापीठ कायद्याचा भंग करणाऱ्या कुलगुरूंनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तामगावच्या खुनाचा उलगडा

$
0
0

मृतदेहाची ओळख पटली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तामगाव येथील खणीत आढळलेला मृतदेह एका व्यावसायिकाचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित व्यावसायिक तामगाव येथील असून, तीन नोव्हेंबरला तो घरातून निघून गेला. यानंतर तो घरी न परतल्याने त्याच्या पत्नीने सहा नोव्हेंबरला गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. पत्नीने मृतदेहाच्या हातातील दोरा ओळखला आहे. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठवले आहेत. डीएनए टेस्टचा अहवाल आल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडे चौकशी सुरू केली असून, लवकरच तामगावसह मोरेवाडी येथे सापडलेल्या मृतदेहाचाही उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा ... वारणा

$
0
0

'वारणा लूट' ची चौकशी

सीआयडीमार्फत करावी

म. टा. वृत्तसेवा,पन्हाळा

वारणानगर (ता.पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळच्या शिक्षक कॉलनीतील बेहिशोबी सुमारे १५ कोटी रुपयांच्या झालेल्या चोरी प्रकरणातील कोट्यवधी रक्कमेच्या मालकीबाबत योग्य ती चौकशी सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे सरचिटणीस विजयसिंह जाधव यांनी केली. संस्थेचे तत्कालीन सचिव जी.डी.पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वारणा शिक्षण मंडळाची फसवणूक करून मिळविली असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांच्याकडे निवेदन दिले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव म्हणाले,' चोरी प्रकरणातील जप्त झालेली १५ कोटींची रक्कम फिर्यादी झुंझार सरनोबत (रा.कोल्हापूर) यांनी आपली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. परंतु सरनोबत यांनी वेळोवेळी कोडोली पोलिसांमध्ये विसंगत फिर्याद दिली आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणात नेमके काय रहस्य आहे, याचा उलगडा सीआयडीमार्फत जलद गतीने करावा. तसेच वारणा शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव जी.डी.पाटील यांच्या नावावर असलेल्या बेहिशोबी मालमत्तेचीही याच घटनेबरोबर चौकशी करावी.'

यावेळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडवून दिलेल्या वारणा लूट प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला (रा.जाखले ता.पन्हाळा) याने चोरी केलेली ३ कोटी ३० लाख रुपये इतके रक्कम मिरज येथे त्याच्या घरात सापडली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वारणा शिक्षक कॉलनीतील ज्या खोलीतून ही रक्कम त्याने चोरली त्या खोलीची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे १ कोटी ३० लाख रुपये रोख रक्कम आढळून आली होती. कोल्हापूर येथील झुंझार सरनोबत यांनी कोडोली पोलिसात ही आपली रक्कम असल्याचे सांगून फिर्याद दाखल केली, मात्र त्यातही विसंगती दिसून आली. यामध्ये पोलिसांच्यावरही पैसे घेतल्याचा आरोप करून त्यांनाही या गुन्ह्यात अडकवले. वारणा शिक्षण मंडळातील ज्या खोलीत हे पैसे सापडलेले ती खोली सरनोबत यांना कधीही वापरण्यास दिली नव्हती. त्यांचा या खोलीशी काडीमात्र संबंध नाही. ही खोली जी.डी.पाटील यांच्या ताब्यात होती. त्यांनी शिक्षण संस्थेच्या निगडीत असणाऱ्या संस्थातील विद्यार्थांच्या पालकांकडून डोनेशन रुपात घेतलेली बेहिशोबी रक्कम या खोलीत ठेवण्यात येत होती. ही रक्कम शिक्षण मंडळाच्या विश्वस्तांना अंधारात ठेवून जमा केली होती. ही बाब जी.डी.पाटील सोडून त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या आरोपी मुल्ला याला माहिती होती. त्यामुळेच त्याने रक्कमेवर डल्ला मारला. स्थानिक पोलिसांनी या इमारतीत राहणाऱ्या लोकांकडे कशी केली असता या इमारतीत सरनोबत आला नसल्याचे सांगून जी.डी.पाटील यांचाच वावर असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. जी.डी.पाटील राहत असलेला बंगला व अन्य स्थावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची असून ही सर्व मालमत्ता वारणा शिक्षण मंडळाचे विश्वस्त व संस्थेची फसवणूक करून मिळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला आयएसओ मानांकन

$
0
0

'पद्माराजे गर्ल्स' ला

आयएसओ मानांकन

शाळेत सुरू होणार अटल टिंकरिंग लॅब

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दि न्यू एज्युकेशन सेसायटीच्या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला 'आयएसओ २००९:२०१५' मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी माध्यमिक विभागातील ही जिल्ह्यातील पहिलीच शाळा आहे. या मानांकनाने शाळेच्या गु‌णवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर शाळेत अटल टिंकरिंग लॅबही सुरू होणार आहे,' अशी माहिती मुख्याध्यापिका राधिका मुंद्रुपकर यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत दिली.

मुख्याध्यापिका मंद्रुपकर म्हणाल्या, ' आमच्या शाळेत १८८० मुली शिक्षण घेतात. शहरातील नावाजलेली आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी ही शाळा आहे. शाळेतील सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळेच शाळेस आयएसओ २००९:२०१५ हे मानांकन प्राप्त झाले आहे. यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपासून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या मानांकनामुळे शाळेतील उत्तम गुणवत्ता, भौतिक सुविधा, अभ्यासक्रमाची योग्य अंमलबजावणी, विद्यार्थी, शिक्षण आणि पालक यातील समन्वय यावर शिक्कामोर्तब झाले आहे.'

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया आणि उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांनीही शाळेसह संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. आयएसओ मानांकन सातत्याने टिकवून ठेवणे आणि त्याच्या निकषांपुढे जाऊन विद्यार्थिनींना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. 'विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलता वाढावी यासाठी केंद्र सरकारमार्फत देशातील निवडक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू होणार आहेत. महाराष्ट्रातील ११६ शाळांचा समावेश या योजनेत झाला आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील १० शाळा आहेत. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची निवड अटल टिंकरिंग लॅबसाठी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पनांना आकार देणाऱ्या या उपक्रमातून भविष्यातील संशोधन घडणार आहेत. लॅबसाठी २० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. बेळगाव येथील स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत लॅबची उभारणी आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे,' अशी माहिती मंद्रुपकर यांनी दिली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रभाकर हेरवाडे यांच्यासह उत्कर्षा पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राइम

$
0
0

विहिरीत बुडून मृत्यू

जयसिंगपूर

गणेशवाडी (ता.शिरोळ) येथे विहिरीत बुडून संतोष किसन केडगे (वय ३४) याचा मृत्यू झाला. दुपारी त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. मयत केडगे याला दारुचे व्यसन होते. तपास हवालदार ए.बी. सरनाईक करीत आहेत.

........................

पोलिसांची कारवाई

शाहूवाडी

विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक शाळा शिक्षक कोरवी यांना वर्गात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी सोमवारी गडावरील सात आरोपींना अटक केली. त्यांना शाहूवाडी-मलकापूर न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाळुंजकर यांनी सर्वांची जामिनावर मुक्तता केली. सर्व सातही आरोपींवर जमाव जमवून बेकायदेशीरपणे वर्गात घुसून शिक्षकास लथाबुक्क्यांनी मारहाण करणे व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गुरुवारी रात्री पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकुर मैफल आज

$
0
0

कोल्हापूर: प्रख्यात गायिका सुवर्णा माटेगावकर यांची अंकुर ही संगीत मैफल मंगळवारी २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे रात्री नऊ वाजता ही मैफल रंगणार आहे. ताराबाई पार्क येथील रंगनाथ हॉस्पिटलमधील गोकुळ टेस्टट्यूब बेबी सेंटरच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मैफलीच्या मोफत प्रवेशिका पर्ल हॉटेलच्या पिछाडीस असलेल्या रंगनाथन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेहाची शोधमोहीम पुन्हा आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्याची मोहीम पोलिसांकडून पुन्हा सुरू होणार आहे. कोर्टासह राज्य सरकारने या शोध मोहिमेला परवानगी दिली आहे. खासगी कंपनीकडून अद्ययावत साधनांचा वापर करून समुद्राच्या तळाशी मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. या शोधातून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

बिद्रे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे पत्र्याच्या पेटीत आणि प्लास्टिकच्या पिशवीत बांधून समुद्रात टाकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. एप्रिल २०१६ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मृतदेहाचा शोध नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. समुद्राच्या तळाशी टाकलेली पेटी शोधण्यासाठी पोलिसांनी नौदलाची मदत घेतली होती. मात्र, या शोधात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर अद्ययावत साधनांच्या साहायाने मृतदेहाचा शोध घ्यावा, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी केली होती. यानुसार पोलिसांनी राज्य सरकारकडे तपासाला परवानगी मागितली होती. एल अँड टी, फुग्रो या खासगी कंपन्यांशी चर्चा करून ग्रॅडिओमीटर, मॅग्नेटोमीटर मशीनची मागणी केली होती. याच्या खर्चाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. चार दिवसात पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. यात ग्रॅडिओमीटर आणि मॅग्नेटोमीटरच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. यातून महत्त्वाची माहिती हाती लागेल, अशी अपेक्षा बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कुरुंदकर याने गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रांची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले वूडकटर आणि बॅटचा शोध सुरू आहे. त्याची खरेदी कुठे केली होती याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही वस्तूंचा शोध आजरा येथील फार्महाऊसमध्ये घेण्यात आला होता, मात्र त्या वस्तू पोलिसांना मिळालेल्या नाहीत.

अजित पवारांनी काढले

सरकारचे वाभाडे

अश्विनी बिद्रे खून प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार यांनी अधिवेशनात सरकारचे वाभाडे काढले. महिला पोलिस अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोणालाही पाठीशी घालू नये. संशयित आरोपी अभय कुरुंदकर याला राष्ट्रपती पदक मिळावे, यासाठी शिफारस करणारे कोण आहेत? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी अधिवेशनात केली आहे. या मुद्यावरून त्यांनी गृह खात्याला लक्ष्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षनेते वास्कर

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी सोमवारी ताराराणी आघाडीचे विलास वास्कर यांची नियुक्ती करण्यात आली. सलग दुसऱ्यावर्षी ताराराणी आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले आहे. किरण शिराळे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप व ताराराणी आघाडीने तातडीने वास्कर यांच्या निवडीचे पत्र दिले. भाजप, ताराराणी आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाची पहिली संधी भाजपचे संभाजी जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर ताराराणी आघाडीचे किरण शिराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तिसऱ्या वर्षासाठी भाजपच्या नगरसेवकाला संधी दिली जाणार होती. पण मध्यंतरी स्थायी सभापतिपदी भाजपचे आशिष ढवळे यांची निवड झाल्याने विरोधी पक्षनेतेपद पुन्हा ताराराणी आघाडीकडे सोपवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा, ऋणमुक्तेश्वर तालमीचे समर्थक मैदानावर भिडले

$
0
0

फुटबॉल सामन्यानंतर हाणामारी

रंकाळा, ऋणमुक्तेश्वरचे समर्थक भिडले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर केएसए ब गट अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेत सोमवारी सकाळी सामना संपल्यावर रंकाळा तालीम मंडळ आणि ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाच्या समर्थकांत हाणामारी झाली. वरिष्ठ गटातील समर्थकातील हुल्लडबाजीचे लोण कनिष्ठ गटात पसरल्याने फुटबॉल शौकिनांच्यातून नाराजी व्यक्त आहे. दरम्यान रंकाळा तालमीचा खेळाडू वरिष्ठ गटातील संघात खेळल्याने खेळाडू व संघावर कारवाई कारवाई करावी अशी मागणी ऋणमुक्तेश्वर तालमीने केली आहे. त्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेचा निकाल राखीव ठेवला आहे.

केएसए ब गट अव्वल साखळी स्पर्धेत रंकाळा, ऋणमुक्तेश्वर, खंडोबा तालीम मंडळ ब आणि मंगळवार पेठ फुटबॉल संघांचा समावेश आहे. सोमवारी स्पर्धेचा शेवटच्या दिवशी दोन सामने खेळवण्यात आले. सकाळच्या सत्रात ऋणमुक्तेश्वर आणी रंकाळा यांच्यात सामना झाला. यावेळी दोन्ही संघांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पूर्वार्धात २५ व्या मिनिटाला तुषार पुनाळकरने गोल करत ऋणमुक्तेश्वरला आघाडीवर नेले. आघाडीनंतर ऋणमुक्तेश्वरच्या समर्थकांनी जल्लोष केला. मध्यंत्तरास हीच स्थिती कायम राहिली. उत्तरार्धात रंकाळा तालमीच्या अक्षय व्हरांबळे याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. या गोलनंतर रंकाळा तालमीच्या समर्थकांनी जल्लोष केला. दोन्ही संघाच्या समर्थकाकडून मैदानावर घोषणाबाजी सुरु होती. पूर्णवेळेत दोन्ही संघाकडून गोल न झााल्याने सामना १-१ बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. त्यामुळे रंकाळा तालमीच्या गुणांची संख्या पाचवर तर ऋणमुक्तेश्वरचे दोन गुण नावावर जमा झाले. सामना बरोबरीत राहिल्याने रंकाळा तालीम संघ वरिष्ठ गटात जाण्याचा मार्ग मोकळा झालेल्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. काही हुल्लडबाज समर्थकांनी थेट मैदानावर धाव घेत ऋणमुक्तेश्वर तालमीच्या खेळाडूंवर शेरेबाजी केली. त्यामुळे वाद वाढल्याने दोन्ही संघ एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले. मैदानावर खेळाडू व समर्थकांत मारामारी झाली. मैदानावर अर्धा तास गोंधळ सुरू होता. या घटनेची माहिती कळताच जुना राजवाडा पोलिसांनी मैदानावर धाव घेत हुल्लडबाजांना पिटाळून लावले. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धा निरीक्षकाचा अहवाल आणि सीसीटीव्हीच्या मदतीने हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी फुटबॉल शौकिनांच्याकडून होत आहे.

रंकाळा तालमीच्या खेळाडूवर आक्षेप

रंकाळा तालमीकडून गोल नोंदवणारा खेळाडू अक्षय व्हरांबळे हा राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत वरिष्ठ गटातील महाराष्ट्र पोलिस संघाकडून खेळला होता. एकच खेळाडू दोन वेगवेगळ्या संघात खेळला असल्याने रंकाळा संघावर कारवाई करावी, अशी मागणी ऋणमुक्तेश्वर तालमीच्या प्रशासनाने केएसएकडे केली. ऋणमुक्तेश्वर तालमीच्यावतीने केएसएला तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांनी पुरावा सादर करण्यास सांगितले. ऋणमुक्तेश्वरने राजेश फुटबॉल स्पर्धेतील पाटाकडील व महाराष्ट्र पोलिस यांच्या सामन्यातील अक्षय व्हरांबळे खेळत असलेल्या फोटो दिले. ऋणमुक्तेश्वरच्या तक्रार अर्जावर स्पर्धा समिती लवकरच निर्णय देणार असल्याचे केएसएने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग ...

$
0
0

यंत्रमाग कारखान्याला आग

इचलकरंजी,

येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याला आग लागून सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्कीटने लागली असून याची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. खंजिरे इंडस्टि्यल इस्टेटमध्ये प्लॉट नं. ९ व १० मध्ये अशोका टेक्स्टाईल नावाचा अत्याधुनिक यंत्रमागाचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये शॉर्ट सर्कीटने आग लागली. या आगीमध्ये कारखान्यातील वायरींग, डॉबी, दोन कार्ड, बिमावरील सुत, १५० ते २०० मीटर कापड, लुमचे पार्ट आदी साहित्य आगीत जळून खाक झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी - ३६ हजार खात्यांची तपासणी

$
0
0

कर्जमाफीच्या ३६ हजार

खात्यांची तपासणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील त्रुटी असलेल्या जिल्ह्यतील ४१ हजार खात्यांपैकी ३६ हजार खात्यांची सोमवारपर्यंत तालुकास्तरीय समितीने तपासणी केली. यापैकी १३ हजार खाती राज्य सरकाच्या आयटी विभागाकडे अपलोड झाली. मंगळवारपर्यंत खात्यांतील त्रुटी दूर करुन बुधवारपर्यंत सर्व खाती अपलोड केली जातील अशी, माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिली.

बुधवारी (ता. २१) सहकार व आयटी विभागाने घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राज्यातील कर्जमाफीच्या चार लाख खात्यांमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शंभर खातेदारांचा समावेश होता. त्यानंतर दोन दिवस झालेल्या आढाव्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ४१ हजार खात्यांमध्ये त्रुटी असल्याचे समोर येवून आयटी विभागीने सर्व यादी सहकारी विभागाकडे तपासणीसाठी पाठवली होती. दोन दिवसांत खातेदारांच्या त्रुटी दूर करुन यादी पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी व सोमवारी त्रुटी असलेल्या ४१ हजार खात्यांपैकी ३६ हजार खात्यांची तपासणी तालुकास्तरीय समितीने केली. तपासणी केलेल्या खात्यापैकी १३ हजार खाती अपलोड करण्यात आली. 'मंगळवारी सायंकाळपर्यंत उर्वरीत खात्यांची तपासणी करुन तपासणी झालेल्या खाती पुन्हा अपलोड करण्यात येणार असून, बुधवारपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी दिली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधन वार्ता - यशोदा सणगर-नवाळे

$
0
0

यशोदा सणगर-नवाळे

कोल्हापूर

फुलेवाडी येथील यशोदा वसंतराव सणगर-नवाळे (वय ६७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉजमधील कुंटणखान्यावर छापा

$
0
0

यात्री निवासमधील

कुंटणखान्यावर छापा

मॅनेजर अटकेत, दोन पीडितांची सुटका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खरी कॉर्नर येथील सिद्धलक्ष्मी यात्री निवासमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी (ता. २६) सकाळी छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या दोन पीडित महिलांची सुटका केली, तर यात्री निवासचे मॅनेजर विशाल रवींद्र पन्हाळकर (वय ३५, रा. जुना गुरांचा बाजार, शिवाजी पेठ) यास अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाइल व रोख रक्कम असा सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

खरी कॉर्नर येथील सिद्धलक्ष्मी यात्री निवासमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली होती. या माहितीनुसार अनैतिक मानवी व्यापर प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी सोमवारी सकाळी कारवाई केली. यात्री निवासमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची खात्री होताच पोलिसांनी यात्री निवासचे मॅनेजर विशाल पन्हाळकर याला अटक केली. दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली. पन्हाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून, दोन्ही पीडितांचा रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, पोलिस हवालदार रवींद्र गायकवाड, आनंदा पाटील, आनंदा गोडसे, माधवी घोडके, वैशाली पिसे, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अन्नछत्र

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने जोतिबा यात्रेसाठी ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत मोफत अन्नछत्र सेवा देण्यात येणार आहे. पंचगंगा नदी घाटावर अन्नछत्रासाठी मंडप उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे यंदा २४ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांच्या नेतृत्वाखाली दीडशे कार्यकर्ते या अन्नछत्राची तयारी करत आहेत. यंदा एक लाख भाविकांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर सरकारी पुजारी कायदा चर्चेसाठी आज विधीमंडळात

$
0
0

सरकारी पुजारी

कायद्यावर आज चर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी कायदा विधेयक मंगळवारी विधीमंडळात चर्चेसाठी येणार आहे. चर्चेअंती विधेयक मंजुरीसाठी हालचाली होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गेल्यावर्षीच्या जून महिन्यात पुजारी अजित ठाणेकर यांनी अंबाबाईच्या मूर्तीला घागरा चोली पेहराव परिधान केला होता. याविरोधात भाविकांसह विविध सहघटनांनी आंदोलन केले. पुजाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात पुजारी हटाओ संघर्ष समितीने गेल्या दहा महिन्यांपासून आंदोलन सुरू ठेवले आहे. सध्याचे पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा संमत करावा, अशी मागणी समितीने केली आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुजारी नेमण्याबाबत वटहुकूम काढण्याचे आश्वासन यापूर्वी दिले आहे. तसेच राज्याचे विधी व न्याय मंत्री रणजित पाटील यांनीही सरकारी पुजारी नियुक्तीचा कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधीमंडळात सादर होणाऱ्या विधेयकाबाबत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमादार टोळीवर मोका

$
0
0

जमादार टोळीवर मोक्का

आणखी सात टोळ्यांवर प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मारामारी, दहशत, अपहरण, खून, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असलेला इचलकरंजीतील सराईत गुंड गुंड्या जमादार याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कारवाईचा प्रस्ताव सादर केला असून, महिन्याभरात कारवाई होणार आहे, अशी माहिती जयसिंगपूर उपविभागाचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे.

टोळीप्रमुख गुंड्या ऊर्फ मुसा अब्दुल रजाक जमादार, अविनाश संजय टेके, शीतल अविनाश टेके, जुबेर गुलाब कोटीवाले, इस्माईल मलिक मुजावर (सर्व रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१ते ४) २३ (१-अ) प्रमाणे मोकाची कारवाई केली. जिल्ह्यात खून, घरफोड्या, लूटमारीसारख्या घटना वाढत आहेत. जिल्ह्यातील मटका, जुगार व खासगी सावकार यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले होते.

यानुसार जिल्ह्यातून सात प्रस्ताव तयार करून ते विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. गुंड्या जमादारच्या टोळीविरोधात इचलकरंजी शहर, गावभाग व शहापूर पोलिस ठाण्यात खून, खंडणी, अपहरण, दरोडा, खुनी हल्ला असे १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक पिंगळे करणार असून, राज्याचे अपर पोलिस महासंचालकांच्या मंजुरीनंतर दोषारोपपत्र मोका न्यायालयात सादर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images