Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मेपूर्वी सर्व पोलिस ठाणी होणार स्मार्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी स्मार्ट करण्याचे काम सध्या सुरू असून सुविधांसह पोलिसांची मानसिकता, तंत्रज्ञानाचा वापर, तपासातील गतिमानता, कागदपत्रांचे जतन यासह पोलिस आणि नागरिकांमधील संबंधही सुधारले जाणार आहेत. मे २०१८ पर्यंत सर्व पोलिस ठाणी स्मार्ट होणार असल्याने पोलिस ठाण्यांचे रुपडे पालटणार आहे. हा बदल पोलिस ठाण्यातील कामकाज गतिमान करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन पोलिस ठाणी स्मार्ट करण्याची संकल्पना मांडली होती. यानंतर आयजी नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्वच पोलिस ठाणी स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पोलिस ठाण्यातील सुविधा, शिस्त, तंत्रज्ञानाचा वापर, तत्परता आणि पोलिस-नागरिक संबंध यावर विशेष भर दिला आहे. पुण्यातील सोर कन्सल्टिंग सर्व्हिसेस कंपनीकडे काम दिले आहे. या कंपनीने सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी आणि अधीक्षक कार्यालय स्मार्ट केले आहे. यानंतर कोल्हापुरातील शाहूवाडी पोलिस ठाणेही स्मार्ट केले आहे. सध्या आयजी ऑफिस, अधीक्षक कार्यालय आणि करवीर पोलिस ठाण्यात या कामाला सुरुवात झाली आहे. मे २०१८ पर्यंत जिल्ह्यातील ३० पोलिस ठाण्यांसह अधीक्षक कार्यालय आणि आयजी ऑफिसही स्मार्ट होणार आहे.

या उपक्रमांतर्गत पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष असेल. सुसज्ज फर्निचर, स्वतंत्र रेकॉर्ड रुम, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, शस्त्रे, हेल्मेट, अश्रूधुराच्या नळकांड्या, संरक्षण ढाली यासाठी स्वतंत्र कक्ष असेल. प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र कोठडीचाही प्रस्ताव पाठवला आहे. स्मार्ट पोलिस ठाण्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. सीसीटीव्ही, सीसीटीएनएस, इंटरनेट सुविधा, स्मार्ट फोनचा वापर, ऑनलाइन तक्रारींची नोंद यासह गुन्ह्यांची माहितीदेखील ऑनलाइन मिळण्याची व्यवस्था असेल. कामकाजात गतिमानता येण्यासाठी सुसज्ज वाहने, संपर्काची साधने, जीपीएस प्रणाली पुरवली जाणार आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट देणे, बिनचूक पंचनाम्याचे लेखन, जबाब लेखन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वतंत्र रेकॉर्ड रुम असेल. यात २० वर्षांतील कोणतीही फाइल केवळ तीन मिनिटात मिळेल. वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासह पोलिस आणि नागरिक यांच्यातील संबंध सुधारण्यावरही स्मार्ट पोलिस ठाण्यांमध्ये भर दिला आहे. जातीय सलोखा राखणे, महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करणे, शांतता कमिट्यांची जबाबदारी, सामाजिक प्रबोधन याबाबतही पोलिस ठाण्यांकडून काम होणार आहे. यामुळे पोलिस ठाण्यांमध्ये अंतर्बाह्य बदल होणार आहे. मे महिन्यापर्यंत हे सर्व काम पूर्ण होईल.

नागरिकांच्या मनातील पोलिसांची प्रतिमा बदलणारा हा उपक्रम आहे. पोलिसांच्या मानसिकतेसह पोलिस ठाण्यांतील सुविधांमध्येही अमूलाग्र बदल होणार आहेत. याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित केले जाणार आहे. लवकरच याची सुरुवात होईल.

विश्वास नांगरे-पाटील, आयजी

राज्यात अनेक ठिकाणी सध्या पोलिस ठाणी स्मार्ट होत आहेत. आम्ही नागपूर ग्रामीण विभागातील पोलिस ठाणी स्मार्ट केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये हा उपक्रम सुरू केला आहे. याचे परिणाम चांगले आहेत. कोल्हापुरातही सर्व पोलिस ठाणी मेपूर्वी स्मार्ट होतील.

सेजल रुपगल, प्रमुख, सोर कन्सलटिंग सर्व्हिसेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन खंडणीखोर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उजळाईवाडी येथील एका पानटपरी चालकास जिवे मारण्याची धमकी देऊन दर आठवड्याला एक हजार रुपये खंडणी मागणाऱ्या तिघा सराईत खंडणीखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अलंकार अभिजित मुळीक (वय १९ रा. जाधव कॉलनी, उजळाईवाडी), विशाल उर्फ गोट्या लातूर अविनाश माने (१९, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), विशाल प्रकाश वडर (२० रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. किशोर राजाराम ढोकरे (रा. तुळजाभवानीनगर, उजळाईवाडी) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

किशोर ढोकरे यांची उजळाईवाडी येथील शाहू टोल नाक्याजवळ सूर्या नावाची पानटपरी आहे. ३ मार्च, २०१८ मध्ये तीन तरुण पानटपरीवर आले. त्यांनी किशोर यांची गळपट धरून 'तुला या ठिकाणी पानटपरी चालवायची असेल तर दर आठवड्याला एक हजार रुपये खंडणी द्यावी लागेल. जर दिली नाहीस तर दुकान विस्कटून ठार मारणार', अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेले ढोकरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन खंडणीखोरांना पकडून गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. तिघेही सराईत गुनहेगार आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, रमेश डोईफोडे, यशवंत उपराटे, अनिल ढवळे, अनिल पास्ते, उत्तम सडोलीकर, राम कोळी, सुरेश पाटील, आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ थकबाकीदारांची कनेक्शन तोडली

$
0
0

कोल्हापूर: थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने या महिन्यात २८ थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. ७ ते २२ मार्च या कालावधीत ३८४ थकबाकीदारांकडून ६५ लाख ४८ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. ७ हजार ७८९ थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

ताराबाई पार्क, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, महाराष्ट्रनगर, कळंबा, आपटेनगर, लक्षतीर्थ वसाहत रिंगरोड, फुलेवाडी, रंकाळा परिसर, शिवाजी पेठ परिसरातील हौसाबाई नरके, चंद्रभागा जाधव, रेखा कांबळे, दीपक पाटील, अशोक हेरडे, अभिजित ठेंगेकर, प्रकाश हेडकाळे, पुष्पाराय सोडभिसे, मुरलीधर टोणे, शेवंता टोणे, बाळासाहेब कारंडे, अंकुश कुंभार, बाळु सुभे, आनंदा भाट, नामदेव सुतार, मधुकर नडाळे, बाजीराव शिंदे, अरुण शिंदे, मंगला मांडवकर, रघुनाथ सुतार, दुर्योधन बाटले या थकबाकीदारावर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराकडून जि. प.कर्मचाऱ्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात फाइल देण्यास विरोध केल्याने वरिष्ठ सहायक यूनूस नूरमहमद देसाई (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांना एका ठेकेदाराने मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी ठेकेदार संजय शामराव निकाडे (रा. महालवाडी, ता. भुदरगड) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कागलकर हाऊसमधील स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. हे वृत्त कळताच जि. प. मधील सर्व कर्मचारी एकत्र येत प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ठेकेदार निकाडे यांनी कार्यालयात येऊन 'काही कागद जोडायची आहेत. माझ्या कामाची फाइल द्या' अशी मागणी केली. 'तुम्ही सरकारी नोकर नसल्याने फाइल देता येणार नाही', असे स्पष्ट केल्यानंतर'फाइल घरी आणून देशील', अशी धमकी दिली. त्यानंतर टेबलवर ठेवलेली फाइल त्यांनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्यानंतर शिवीगाळ करीत तोंडावर, पाठीत बुक्या मारण्यास सुरुवात केली. सहकारी कर्मचारी तेजस मोरे, अमर पाटील, अभिजित पाटील, विनोद घाटगे, सचिन पाटील यांनी देसाई यांना सोडवून घेतले. मारहाणीचे वृत्त सर्व विभागात समजताच सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आले. ठिय्या आंदोलन करून त्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्याचे पडसात अर्थसंकल्पाच्या सभेत उमटले. सर्वच सदस्यांनी मारहाणीचा निषेध केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी, अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कर्चमाऱ्यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समित्यांची फेररचना करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी शांतता समित्या, मोहल्ला कमिटी आणि पोलिस मित्रांची फेररचना करा. लोकांमध्ये थेट कार्यरत असलेल्या आणि अवैध धंद्यांपासून दूर असलेल्या प्रतिनिधींनाच या समित्यांमध्ये स्थान द्या. त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाया वाढवा,' अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील अधीक्षकांना दिल्या. गुरुवारी (ता. २२) आयजी ऑफिसमध्ये परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांची बैठक पार पडली.

आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी मासिक क्राइम आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथील अधीक्षक उपस्थित होते. यावेळी बोलताना आयजी नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या शांतता समित्या, मोहल्ला कमिटी आणि पोलिस मित्रांची फेररचना करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, 'कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांना शांतता समित्या, मोहल्ला कमिटी महत्त्वाच्या आहेत. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे या समित्यांमध्ये बदल झालेले नाहीत. समित्यांमधील बहुतांश सदस्य निष्क्रीय आहेत. या समित्यांमध्ये तातडीने फेरबदल करा. ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे आणि अवैध धंद्ये, गुन्हेगार, खासगी सावकार यांच्यापासून दूर आहेत अशाच प्रतिनिधींची निवड शांतता समित्यांमध्ये करा. पुढील महिन्यांत आंबेडकर जयंती, शिवजयंतीपूर्वीच समित्यांची पुनर्रचना करून बैठका घ्या. सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी नवीन समित्या महत्त्वाच्या ठरतील.'

नांगरे-पाटील यांनी गेल्या महिन्यातील परिक्षेत्रातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी गुजरीत झालेल्या सराफ लुटीची सविस्तर चर्चा करण्यात आली. संशयित कारचा चालक अटकेत असूनही संशयित लुटारू पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या गुन्ह्याच्या तपासाबाबत आयजींनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. येणाऱ्या महिन्यातील आंबेडकर जयंती, शिवजयंती यासह जोतिबा यात्रा, शिक्षण वाचवा आंदोलन, धरणग्रस्तांचे आंदोलन याबाबत चर्चा झाली. सर्व आंदोलने आणि यात्रांना पुरेसा बंदोबस्त नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परिक्षेत्रातील पोलिस ठाणी स्मार्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे. याला प्राधान्य दिले जाणार आहे. परिक्षेत्रात वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांकडून ट्रॅफिक ड्राइव्ह घेतले जात आहे. यात अल्पवयीन वाहनचालकांवरील कारवाईत सातत्य ठेवण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.

सर्वच पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या शांतता समित्यांची फेररचना होणार आहे. संघटित गुन्हेगारी, मटका, आणि खंडणी वसुली करणाऱ्या संशयितांना हद्दपार केले जाणार आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया वाढवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, सांगलीचे सुहेल शर्मा, सातारचे संदीप पाटील, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणचे अधीक्षक उपस्थित होते.

सोशल मीडियावर विशेष लक्ष

सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. असे कृत्य करणाऱ्या संशयितांवर कारवाया सुरू आहेत. समाजकंटकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. येणाऱ्या काळात हा धोका आणखी वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही अपप्रचार होऊ नये, यासाठी सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथक निर्माण करण्याचे आयजी नांगरे-पाटील यांनी सुचवले आहे.

पोलिस कल्याण निधीचा आढावा

या बैठकीत आयजी नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रात पोलिस कल्याण निधीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील जमा-खर्चाचा आढावा घेतला. कल्याण निधीसाठी मिळालेल्या धनादेशांपैकी काही धनादेशांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने जमा-खर्चाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याबाबत तातडीने प्रक्रिया पूर्ण करून कल्याण निधी कार्यक्रमाचे हिशेब जाहीर करण्याच्या सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाई केल्यास आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाच्या फायली मंजूर करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची तक्रार गुरुवारी निवृत्त कर्मचाऱ्यांनी केली. या प्रस्तावांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवाजी विद्यापीठ सेवानिवृत्त कर्मचारी शिष्टमंडळातर्फे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांनी डॉ. नांदवडेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.

प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे आस्थापना विभागात कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीविना पडून आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासन व आस्थापना विभागाला ज्येष्ठांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आस्था नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनाने अद्याप अनेकांच्या निवृत्तीवेतनाच्या प्रस्तावाच्या मंजुरीचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे त्यांना आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या बैठकीस शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अतुल ऐतावडेकर, राम तुपे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या ४१ हजार खात्यांमध्ये त्रुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील जिल्ह्यातील ४१ हजार खातेदारांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. आयटी विभागाकडून शुक्रवारी त्रुटीची यादी सहकार विभागाला प्राप्त झाली असून तालुकास्तरीय समिती शनिवारपासून त्रुटी दूर करुन याद्या अपलोड करण्यास सुरुवात करणार आहे.

कर्जमाफीच्या उर्वरित यादीची आयटी विभागाने पडताळणी सुरू केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पाठवण्यात आलेल्या यादीतील ४१ हजार खातेदारांच्या अर्जामध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. शुक्रवारी यादी सहकार विभागाकडे पाठवण्यात आली आहे. आजपासून त्रुटी असलेली यादी तालुकास्तरीय समितीकडून तपासली जाणार आहे. यादीतील त्रुटी दूर करुन यादी त्वरित अपलोड करून आयटी विभागाला सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार बुडवण्याची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणारे सरकार वाड्या-वस्त्यांवरील शाळा बंद करून गोरगरिबांचा शिक्षणाचा हक्क पायदळी तुडवत आहे. खासगी कंपन्यांना शाळा काढण्यासाठी परवानगी देणारे सरकार कंपनीच्या दुकानदारीला खतपाणी घालत आहे. मोफत आणि सक्तीचा शिक्षणहक्क डावलून शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. शाळा बंदच्या निर्णयाविरोधात आवाज उठवताना आता शाळा वाचवण्याच्या निर्धारासोबत मतलबी सरकारही बुडवण्याची वेळ आली आहे,' असा प्रहार ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी केला.

राज्य सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने गेल्या दीड महिन्यापासून जनआंदोलनाचा रेटा सुरू आहे. याअंतर्गत काढण्यात आलेल्या महामोर्चाचे नेतृत्व डॉ. पाटील यांनी केले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या सभेत बोलताना डॉ. पाटील यांनी सरकारच्या शिक्षणहक्काविषयीच्या कोतेपणाचा समाचार घेतला.

राज्यातील १३०० तर जिल्ह्यातील १३ शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथून दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील ४६०० शाळांमधील अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सामाजिक संघटनांचे सदस्य यांच्यासह हजारांवर आंदोलकांनी सहभाग घेत शाळा बंद निर्णय रद्द करण्याची मागणी केली. मोर्चानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, 'सरकारचा कारभार मुर्दाडपणाचा आहे. भांडवलदारांची मर्जी जपण्यासाठी गरिबांवर अन्याय करणारे निर्णय घेण्यात सरकारला शहाणपणा वाटतो. राज्यातील सरकारी शाळा बंद करणे ही भविष्यात पुन्हा शैक्षणिक मागासलेपण आणण्याच्या परिस्थितीची धोक्याची घंटा आहे. एकीकडे सरकार डिजिटल इंडिया, तंत्रज्ञानाची कास अशा प्रगतीच्या गोष्टी करत आहे आणि दुसरीकडे समाजातील तळागाळापर्यंत असलेला शिक्षणाचा प्रवाहच थांबवण्याचे प्रयत्न करीत आहे. हा प्रकार म्हणजे सरकारच्या अडाणीपणाचा कळस आहे. या परिस्थितीत आपण शांत बसलो आणि सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात आवाज उठवला नाही तर सरकारच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्याचे नैतिक धारिष्ट्य आपण गमावून बसू.'

यावेळी व्यासपीठावर समितीचे समन्वयक अशोक पोवार, भरत रसाळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते.

'शिक्षण हक्का'ची शताब्दी आणि मोर्चाची वेळ

शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. प्रत्येक जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. कोल्हापूर ही शिक्षणाची गंगोत्री बनवली. त्या शाहू महाराजांच्या शिक्षण हक्क कायद्याचे यंदा शताब्दी वर्ष आहे. ज्या शाहू महाराजांनी शिक्षण हक्काचा कायदा केला त्या शाहूंच्या कोल्हापुरातच सरकारच्या धोरणामुळे बंद होण्याचा धोका असलेल्या शाळा वाचवण्यासाठी मोर्चा काढण्याची वेळ यावी, हा सरकारच्या शिक्षणखात्याचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत डॉ. पाटील यांनी सरकारचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८ कारखान्यांची धुराडी बंद ; ५७६ कोटीची एफआरपी थकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसदरावरुन सुरुवातीस पेटलेल्या संघर्षानंतर यावर्षीचा गळीत हंगाम पूर्णत्वाकडे जात आहे. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला असून केवळ सहा कारखाने सुरू आहेत. मार्चखेर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण होणार आहे. १५ मार्चपर्यंत गाळप झालेल्या उसापोटी जिल्ह्यातील उत्पादकांना दोन हजार ६१८ कोटी २२ लाख एफआरपी कारखान्यांनी दिली असून अद्याप ५७६ कोटी ९ लाख रुपयांची एफआरपी देणे बाकी आहे.

बाजारपेठेत साखरेला असलेला चांगला दर आणि केंद्र सरकारने एफआरपीमध्ये केलेल्या वाढीमुळे यावर्षीचा गळीत हंगाम ऊस उत्पादकांना चांगला फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. तरीही हंगामापूर्वीच ऊसदरांवरुन संघर्षाची ठिणगी पेटली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर एफआरपी अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पहिल्या पंधरवड्यामध्ये उत्पादकांना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांकडून एफआरपी मिळाली. पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण होत गेल्यानंतर उत्पादकांना एफआरपी वेळेत मिळण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. ठरल्याप्रमाणे एफआरपी देण्यास साखर कारखाने बांधिल असल्याचे कारखानदारांकडून स्पष्ट केले जावू लागले, तरी हंगामाच्या मध्यावरच एफआरपीमध्ये ५०० रुपये कमी करण्यात आले. कारखानदारांच्या एकतर्फी निर्णयाविरोधात उत्पादक व शेतकरी संघटनांनी प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. यानुसार कारवाइची प्रक्रिया सुरू असली, तरी सद्य:स्थितीत हंगाम पूर्णत्वाकडे जात आहे.

जिल्ह्यातील २३ कारखान्यापैकी २२ कारखान्यांनी गळीतास सुरुवात केली होती. त्यामध्ये १५ सहकारी व सात खासगी कारखान्यांचा समावेश होता. या सर्व कारखान्यांनी १५ मार्चपर्यंत १२.४५ सरासरी उताऱ्यांना एक कोटी ७० लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. गाळप झालेल्या ऊसापोटी उत्पादकांना जिल्ह्यातील कारखान्यांनी दोन हजार ६१८ कोटीची एफआरपी दिली असून अद्याप साखर कारखान्यांकडे ५७६ कोटीची एफआरपी थकीत आहे.

हंगामाच्या सुरुवातीनंतर साखर दरात झालेल्या घसरणीमुळे उत्पादकांना पूर्ण एपआरपी मिळालेली नाही. साखर दरांमुळे साखर उद्योग पर्यायाने उत्पादकांसमोर निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवण्याबरोबरच निर्यात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा फायदा होण्यास काही काळ जावा लागणार असल्याने उत्पादकांना पूर्ण बिले मिळण्यास काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.


गळीत सुरू असलेले कारखाने

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, छत्रपती शाहू साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना, दत्त-शिरोळ, गुरुदत्त शुगर्स, दालमिया (आसुर्ले-पोर्ले) या जिल्ह्यातील सहा कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. सुरू असलेल्या सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम सांगता समारंभाची तारीख जाहीर केली असून मार्चअखेर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण होणार आहे.

जिल्ह्यातील उत्पादकांना मिळालेली एफआरपी - २,६१८ कोटी २२ लाख

थकीत एफआरपी - ५७६ कोटी नऊ लाख

विभागातील कारखान्यांनी दिलेली एफआरपी - ४,१७७ कोटी ४३ लाख

विभागातील थकीत एफआरपी - ८०६ कोटी ३९ लाख



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान जमिनप्रश्नी आंदोलनाचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, कुळांच्या वारसांच्या नोंदी सात-बारा उताऱ्यावर झाल्या पाहिजे, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलमध्ये मोर्चा काढण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत केला. शुक्रवारी टॉऊन हॉल येथे जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम यांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली.

निकम म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाशिक-मुबई येथे महामोर्चा काढण्यात आला. मोर्चामुळे देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनीबाबत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर करणार आहे. तरीही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे.'

बैठकीस प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्राचार्य ए. बी. पाटील, आप्पासाहेब परीट, अमोल नाईक, गणेश कुंभार, राजेंद्र आळवेकर, प्राचार्य कृष्णा चरापले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांचा मंगळवारी विधानभवनावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी माथाडी कामगारांचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. सध्याच्या सरकारने तर माथाडी कामगारांविरोधी धोरणांमुळे त्यांच्या असंतोषामध्ये अधिकच भर पडली आहे. ३६ माथाडी बोर्डांचे विलीनीकरण करण्याच्या धोरणांमुळे कामगार देशोधडीला लागणार असल्याने हा असंतोष अधिक उफाळून आला आहे. महामंडळ विलीनीकरणाविरोधात सरकारने काढलेला अध्यादेश मागे घ्यावा, यासाठी मंगळवारी (ता. २७) विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माथाडी कामगारांचे नेते व आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा माथाडी कामगार युनियनच्या वतीने आयोजित कुस्ती मैदानासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, 'राज्यात यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना, त्यांनी माथाडी कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. त्याचीच पुनरावृत्ती विद्यमान सरकारकडून सुरू आहे. माथाडी बोर्ड विलीनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय माथाडी कामगारांचा गळा घोटणारा आहे. सरकारच्या या निर्णयाला कामगारांचा मोठा विरोध आहे. या विरोधामुळेच मंगळवारी मस्जिद बंदर ते अझाद मैदान मार्गावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी राज्यातील हजारो कामगार मुंबईत दाखल होणार असून अध्यादेश मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.'

'राज्य सरकार माथाडी कामगारांच्या नावावर व्यापारी, उद्योजकांकडून कोट्यवधीचा निधी गोळा करत आहे, मात्र यातील एक छदामही खर्च करत नसून हा निधी जातो कोठे? आपण कोणत्याही पक्षाचा आमदार असलो, तरी आपल्याला माथाडी कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असून, त्यांना पेन्शन लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

००००

मराठा आरक्षणासाठी ठोस भूमिका आवश्यक

अण्णासाहेब पाटील यांनी प्रथम मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीकडे सर्वच पक्षांनी दुर्लक्ष केले. या मागणीचा दखल घेतली असती, तर मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. त्यामुळे सध्याच्या सरकारने आरक्षणासंबंधी ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स गुंतवणूकदारांचा दोन एप्रिल रोजी सेबीवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी मुंबईतील सेबी कार्यालयावर दोन एप्रिलला पर्ल्स गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेचे सचिव शंकर पुजारी यांनी केले.

दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे जिल्ह्यातील पर्ल्स गुंतवणूकदारांचा मेळावा झाला. यावेळी शंकर पुजारी म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सेबी प्रशासनाच्या मदतीने पर्ल्स कंपनीची एक लाख ८५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता विकून सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार रुपये गुंतवणूक असलेल्या छोट्या गुंतवणूकदारांनी ऑनलाइल अर्ज भरण्याची सूचना सेबीने केली आहे. त्यानुसार संघटनेच्या वतीने अर्ज भरण्यात येत आहेत. पण सेबीवर दबाव आणण्यासाठी पर्ल्स गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.'

मेळाव्याला अनिल म्हमाणे, ए. के. भालदार, एस. एम. हकाळी, केरबा शेटे, तुकाराम केलरेकर, शिवाजी ढेकळे, गजानन व्हनमारे यांनी मार्गदर्शन केले. सुमन पुजारी यांनी प्रास्ताविक केले. विजय बचाटे यांन आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे शनिवारी बजेट

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी, ता.३१ होणार आहे. सभेत महापालिकेचे २०१७-१८ चे सुधारित व २०१८ -१९ चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच परिवहन व प्राथमिक शिक्षण विभागाचे अंदाजपत्रकही असणार आहे. भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने स्थायी समितीत सत्ता मिळवल्यानंतर पहिलेच अंदाजपत्रक सादर होत आहे. राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतील भाजप, ताराराणी आघाडीकडून अंदाजपत्रकांत शहर विकासाच्या नवीन कोणत्या प्रकल्पांचा व योजनांचा समावेश असणार याविषयी शहरवासीयांत उत्सुकता आहे.

महापालिकेत सत्ता दोन्ही काँग्रेसची आहे. स्थायीवर वर्चस्व मिळवलेल्या भाजप, ताराराणी आघाडीकडून बजेटच्या माध्यमातून नव्या योजना आखून महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान आयुक्त अभिजित चौधरी यांनी सात मार्चरोजी महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प व वित्त आयोग मिळून ११५९ कोटी ९ लाख १७ हजार १३३ रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकांत महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, वायफाय सिटी, ई गर्व्हनन्स, मॉडेल स्कूल, उद्यान विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा यावर भर दिला आहे. प्रशासनाकडून सादर झालेल्या अंदाजपकावर स्थायी समितीत चर्चा झाली. स्थायीच्या शिफारसीसह सभापती आशीष ढवळे हे ३१ मार्चला महापालिका सभागृहासमोर बजेट मांडणार आहेत. केएमटी व प्राथमिक शिक्षण विभागाचे अंदाजपत्रकही मंजुरीसाठी सभेसमोर असणार आहे.

प्रशासनाने, महापालिकेची आर्थिक स्थिती व उत्पन्नाच्या मर्यादेमुळे नव्या प्रकल्पाऐवजी चालू योजना पूर्णत्वावर भर दिला आहे. दरम्यान महापालिकेत सत्ता स्थापनेवरुन सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडीत शह, काटशह कायम आहे. भाजपने, स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेला धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांची मते फोडली. राष्ट्रवादीत फोडाफोडी करत भाजप, ताराराणी आघाडीने स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. आशिष ढवळे यांच्या रुपाने महापालिकेत भाजपने महत्वाचे पद मिळवले. शहर विकासाच्या धोरणांना मंजुरी, नव्या योजनांची अंमलबजावणीत स्थायी समिती व सभापतीला अनन्यसाधारण महत्व आहे. राज्य व केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी भाजप, ताराराणी आघाडीचा प्रयत्न आहे. यामुळे अंदाजपत्रकांत नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश असेल भाजप, ताराराणी आघाडीच्या सूत्राकडून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारचालकावर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बिंदू चौक ते दसरा चौक मार्गावर बेदरकारपणे कार चालवून दुचाकीस्वाराला धडक देऊन जखमी केलेल्या कारचालकावर पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एम. एच. १३ बी. एन. ४८६१ ही कार गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास बिंदू चौकातून दसरा चौकाच्या दिशेने निघाली होती. स्वयंभू गणेश मंदिरासमोर कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील संतोष रंगराव पाटील (वय २७, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) हा तरुण जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून कारसह पोबारा केला होता. सीसीटीव्ही फुटेजमधून कारचा नंबर मिळवून पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक विश्वास पांडुरंग गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. लक्ष्मीपुरी पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात एक तास दिवे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, महापालिका, महावितरण आणि नॉर्थ फाउंडेशनतर्फे बिंदू चौकात शनिवारी रात्री 'अर्थ अवर' उपक्रम राबविला. यामध्ये दोन हजार मेणबत्ती प्रज्वलित करून ६० प्लस या लोगोची प्रतिकृती तयार केली. उपक्रमात ३०० विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमाअंतर्गत शहरात सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत नागरिकांनी एक तास वीज बंद ठेऊन पर्यावरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वर्ल्ड वाइल्ड फंडच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी कोल्हापूर शहरात २०१० पासून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. पर्यावरणासाठी एक तास दिवे बंद करून ६० प्लसचा संदेश दिला. बदलत्या वातावरणाबद्दल नागरिकांच्यात जागृती, वीज बचतीसाठी 'अर्थ अवर' कार्यक्रम झाला. यामध्ये नागरिकांनी घरातील दिवे, शहरातील हायमास्ट, हॅलोजन दिवे बंद केले. दररोज रात्री शहराच्या गजबजलेल्या भागात 'अर्थ अवर' मुळे केवळ वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश प्रखरपणे जाणवत होता. महापालिकेचे २२ हजार पथदिवे बंद राहिल्याने एका तासात सुमारे दीड लाख रुपयांची वीज बिलाची बचत झाल्याचा दावा करण्यात आला. तासभरात १३२० किलो कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याचे मनपाचे रोहन डावखरे यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव म्हणाले, 'विजेचा वाढता वापर, वाढती मागणी, उर्जानिर्मितीसाठी वापरलेल्या माध्यमांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. वाढत्या उर्जेतून निर्माण होणारा धूर, जागतिक तापमान वाढ होते. त्याचा परिणाम जैविक घटकांवर होतो. जैविक घटकांची साखळी विस्कळीत झाल्यास पर्यावरणाची हानी होत आहे. वीजेचा वापर मर्यांदित करण्याची काळाची गरज आहे. भविष्यात या उपक्रमात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज आहे.'

उपक्रमात महापौर स्वाती यवलुजे, जिमखाना प्रमुख राजेंद्र रायकर, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. ए. ए. राठोड, प्रा. योगेश चौगुले, एनएसएसचे पी. डी. चौगुले, नॉर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित प्रभावळे, नवनाथ पाटील, विश्वप्रकाश भट, संदीप मुंडे, अजिंक्य राऊत, शुभांगी साळोखे, सृष्टी इंगळे, आशिष रणदिवे, मृणमयी करंबे आदी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, आमदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवस्थान समितीकडून सीपीआरला साठ लाखाची देणगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हृदय शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत 'अॅन्हॉर्टिक व्हॉल्व्ह प्रेशर पंप' हे अंत्यत महत्त्वाचे उपकरण आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हे उपकरण निकामी होत आहे. सीपीआर प्रशासनानेही नव्या उपकरणाची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार सीपीआर प्रशासनाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मदतीचा हात दिला. नव्या उपकरणासाठी आवश्यक ६० लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांतील रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. सीपीआरमध्ये सर्व रोगांवरील उपचाराबरोबरच हृदयशस्त्रक्रिया विभाग सुरू केला आहे. या सुविधेमुळे हजारो गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हृदय शस्त्रक्रिया प्रक्रियेत आवश्यक एक उपकरण निकामी होत आहे. या उपकरणाची गरज आणि हृदयशस्त्रक्रिय विभागातील उपयुक्तता लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सीपीआरला ६० लाख रुपयांची देणगी देण्याचा ठराव मंजूर केला. समितीच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते ६० लाखांचा निधी देण्याचे ठरले. समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, बी. एन. पाटील मुंगळीकर, सुभाष वोरा, प्रमोद पाटील, समितीचे सचिव विजय पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला.

देवस्थान समिती सामाजिक बांधिलकीतून सीपीआरला मदत करत आहे. देवस्थान समितीच्या मदतीमुळे सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभाग पुन्हा सक्षम होईल. उपकरणाच्या उपलब्धतेमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने हटवली

$
0
0

शहरातील रस्त्यांवरील

वाहने हटविली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारी नादुरुस्त व बेवारस वाहने जप्त करण्याच्या कारवाईला महापालिकेने सोमवारी सुरुवात केली. एकच क्रेन असल्याने दिवसभरात केवळ चार वाहने जप्त केली. ही वाहने महापालिकेच्या बुद्ध गार्डन येथील वर्कशॉपमध्ये ठेवण्यात येत आहेत.

शहरातील अनेक रस्त्यांवर जुनी, बंद स्थितीत असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामध्ये चारचाकीपासून ट्रकचा समावेश आहे. अनेक रस्त्यांवर अशा वाहनांची रांगच आहे. या वाहनांमुळे त्या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत होता. अशा वाहनांना हटवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून तसेच पोलिस विभागाकडूनही महापालिकेकडे केली जात होती. त्यानुसार शहरातील ज्या रस्त्यांवरुन अशी वाहने आहेत, ती हटवण्यासाठी महापालिकेने २० मार्चपर्यंतचा कालावधी दिला होता. यानंतर मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर क्रेन आवश्यक होती. क्रेनची व्यवस्था करण्यात आली व सोमवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी शाहू क्लॉथ मार्केट, महावीर कॉलेज व शाहूपुरीतील घोरपडे गल्ली येथील चार वाहने जप्त केली. क्रेन एकच व छोटी आहे. त्यामुळे जप्त केलेले वाहन बुद्ध गार्डन येथे जाऊन ठेवण्यासाठी व परत दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागत आहे. या कारवाईला आणखी वेग येण्यासाठी मोठ्या क्रेन आवश्यक आहेत. वाहने जप्त केल्यानंतर ती परत केली जाणार नाहीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरके नगरात चेन स्नॅचिंग

$
0
0

आरकेनगरात वृद्धेचे

मंगळसूत्र हिसकावले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माहेरहून आल्यानंतर आरकेनगर येथील घरी जाताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले. रविवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास आरकेनगर येथे हा प्रकार घडला. याबाबत सुषमा शंकरराव पुजारी (वय ६७, रा. आरकेनगर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुजारी या माहेरी पट्टणकोडोली येथे गेल्या होत्या. रविवारी रात्री परत आल्यानंतर त्या बसस्टॉपवरून पायी चालत घरी निघाल्या होत्या. घराच्या गेटबाहेर पोहोचताच काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाने पुजारी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून ओढले. यानंतर चोरटे वीरशैव बँकेच्या दिशेने निघून गेले. यावेळी चोरट्यांच्या खिशातील काही कागद खाली पडले. त्यात एका दुकानदाराची व्हिजिटिंग कार्ड आहेत. पुजारी यांनी व्हिजिटिंग कार्ड पोलिसांकडे दिली आहेत. सोमवारी फिर्याद दाखल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवास योजनेसाठी सहा कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील पात्र ठरलेल्या २५२ लाभार्थींसाठी राज्य व केंद्र सरकारचे सहा कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे,' अशी माहिती स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी दिली.

ते म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेमध्ये घटक चार अंतर्गत प्रत्येक लाभार्थीला अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले होते. सहा हजार नागरिकांनी अर्ज केले होते. त्यांची छाननी केल्यानंतर या योजनेसाठी २५२ नागरिक पात्र ठरले. या नागरिकांना अनुदान मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे तसेच केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली होती. सोमवारी केंद्र सरकारनेही त्यावर मंजुरीची मोहोर उमटवली. त्यामुळे पात्र लाभार्थींना राज्याचे सव्वा लाख व केंद्र सरकारचे सव्वा लाख असे अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या लाभार्थींना लवकरच अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात येणार आहे. या अनुदानासाठी खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांचे सहकार्य लाभले.

यानंतर पुढील टप्प्यात घटक एकच्या अनुदानासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी २६ मार्च

$
0
0

डायरी २६ मार्च

शिबिर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने श्री श्री योगा शिबिर, स्थळ : स्टर्लिंग टॉवर, पहिला मजला, गवत मंडई, शाहूपुरी, वेळ : सकाळी ६ वा.

स्पर्धा : भगवान महावीर प्रतिष्ठानच्यावतीने वक्तृत्व स्पर्धा, स्थळ : महावीर कॉलेज, वेळ : सकाळी १० वा.

प्रदर्शन : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याच्या चित्रांचे प्रदर्शन, स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १० वा.

प्रवचन : सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळाच्या पोखरणकर यांचे प्रवचन, विषय : संतचरित्र स्थळ : अंबाबाई मंदिर, वेळ : सायंकाळी ७.३० वा.

स्पर्धा : भगवान महावीर प्रतिष्ठानच्या वतीने लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा, स्थळ : मानस्तंभ जिनमंदिर, गंगावेश, वेळ : रात्री ८ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images