Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महानगरपालिका करणार कुत्र्यांचे निर्बिजीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बिजीकरणाचा प्रकल्प महापालिका राबवणार आहे. पण यासाठी टेंडर दिल्यास एका सर्जरीसाठी किमान एक हजार रुपयांचा खर्च होणार असल्याने महापालिका स्वत: हा प्रकल्प राबवण्याचा विचार करत आहे. यातून जास्तीत जास्त कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी प्रशासनाने बजेटमध्ये २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी विविध महापालिका टेंडर प्रक्रिया राबवून त्यातून शस्त्रक्रिया करतात. महापालिकेने त्यासाठी अशा महापालिकांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. सध्या टेंडरमध्ये एका शस्त्रक्रियेसाठी किमान एक हजार ते १३०० रुपये खर्च करण्यात येत आहे. यामुळे जास्त खर्च होऊ शकतो. यासाठी महापालिका स्वत: यंत्रणा उभी करुन देण्याचा विचार करत आहे. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर तसेच आवश्यक औषधे पुरवठा करायचा. प्रत्येक केससाठी मोबदला ठरवायचा, त्यानुसार डॉक्टरना द्यायचा. आणखी काही कर्मचारी लागल्यास महापालिकेने ते द्यायचे. यानुसार सध्याच्या टेंडरमधील खर्चाची तुलना केल्यास जवळपास ३० ते ४० टक्के खर्च कमी होऊ शकतो, असे प्रशासनाचे मत आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने अभ्यास केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर शहरात अपुरा पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जलसंपदा विभागाने महापालिकेचा पाणीपुरवठा तोडल्याने बुधवारी सात तास उपसा बंद राहिल्याचा परिणाम गुरुवारी शहरात पहायला मिळाले. ए, बी, ई वॉर्डमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. मात्र शुक्रवारपासून व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

बुधवारी महापालिकेची उपसा केंद्र सील केल्यामुळे पाणी उपसा बंद झाला. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. सात तास उपसा बंद असल्याने गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याचा अंदाज होता. त्यानुसार सकाळच्या सत्रात ए, बी, ई वॉर्डमधील पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. अनेक उंच भागात पाणी पोहचले नसल्याने टँकरच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे शहराच्या काही भागात दिवसभर टँकर फिरताना दिसत होते. शुक्रवारी मात्र सर्वत्र व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांनी रोखली कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रथम शहरात कारवाई करा व नंतर उपनगरात या, असा पवित्रा घेत गुरुवारी दुसऱ्या दिवशीही आजी माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या अनधिकृत केबिन हटावची मोहीम रोखली. बुधवारी शिवाजी पेठेत तर गुरुवारी आयटीआय कॉर्नरजवळ कारवाई रोखल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, दिवसभरात २५ केबिन, १२ डिजीटल फलक हटवण्यात आले.

महानगरपालिकेने बुधवारपासून अनधिकृत केबिन काढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. गुरुवारी कळंबा साई मंदिरपासून कारवाईला सुरुवात केली होती. तिथून मुख्य रस्त्यावरील केबिन व फलक हटवण्यात आले. तिथून दुपारी चारच्या सुमारास आयटीआय कॉर्नरजवळील केबिन्स हटवण्यात पथक आले. त्यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, पंडित पोवार उपस्थित होते. पाचगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील केबिन काढण्यात आल्या होत्या. त्यातील काही केबिन पुन्हा आणून ठेवल्याचे दिसून आले. अशा केबिन काढण्यास गेल्यावर नागरिकांनी विरोध केला. त्यावेळी तिथे मोठा जमाव जमला. त्यानंतर नगरसेविका दीपा मगदूम, विजय खाडे पाटील, माजी नगरसेवक सतिश लोळगे, दुर्वास कदम यांनी सातत्याने उपनगरात कारवाई केली जाते व शहरातील अतिक्रमणांवर कारवाई होत नाही. त्यामुळे प्रथम शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करा व नंतर उपनगरात कारवाई करा, असे सांगण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात असल्याने तिथे पुन्हा मोठा जमाव जमला. काही काळ वाहतुकीलाही अडथळा झाला. यानंतर मोहीम थांबवण्यात आली.

एक क्रमांक विभागीय कार्यालयाची बुधवारी शिवाजी पेठेतील बलभीम बँकेजवळ यंत्रणा गेल्यानंतर खाऊ गल्लीतील तसेच शहराच्या इतर भागात पैसे घेऊन बसवण्यात आलेल्या अनधिकृत केबिन काढा व नंतर येथील केबिन काढण्यास या, असे सांगत अनधिकृत केबिन काढण्याच्या मोहिमेला माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी विरोध केला होता. तसेच रंकाळा पदपथ उद्यानाच्या रस्त्यावरील केबिन हटवण्यासही मुदत देण्याबाबत आमदार अमल महाडिक यांच्या फोनमुळे तेथील मोहिमही थांबली होती. वरिष्ठ अधिकारी कुणीच नसल्याने पोवार यांनी तेथील मोहीम थांबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीची ४२० लाभार्थ्यांची यादी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवारी ४२० लाभार्थ्यांची सातवी ग्रीन लिस्ट कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झाली. तब्बल दोन महिन्यानंतर ग्रीन लीस्ट प्राप्त झालेली असली, तरी यामध्ये अत्यल्प लाभार्थ्यांचा समावेश आहे. दुपारी यादी जिल्हा बँकेस प्राप्त झाल्यानंतर तपासणीसाठी तालुकास्तरावर पाठवण्यात आली. खात्यांची तपासणी करुन कर्जदारांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एक लाख ९३ हजार लाभार्थ्यांना ३३३ कोटी, ३३ लाखांची कर्जमाफी मिळाली असली, तरी अद्याप अनेक कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील अडीच लाख खातेदारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. अद्याप सुमारे ५० ते ६० हजार खातेदारांची यादी राज्य सरकारच्या आयटी विभागाकडून तपासणी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थंसंकल्पात कोल्हापूरचा भ्रमनिरास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरसाठी भरीव निधीची अपेक्षा फोल ठरली आहे. अर्थसंकल्पातून कोल्हापूरसाठी ठोस काहीही निधीची तरतूद केली नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. विविध योजना आणि प्रकल्पांच्या केलेल्या घोषणांच्या निधीची तरतूदही केलेली नाही. यापूर्वी काही योजनांसाठी अध्यादेश काढले. मात्र, प्रत्यक्षात निधीची तरतूद केलेली नाही. राजकारण आणि अर्थकारणाचा समन्वय साधला आहे. कोल्हापुरात सुरू असलेल्या प्रकल्प, योजनांना पहिल्या टप्प्यातील निधी यापूर्वी मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधीची तरतूद करण्याची अपेक्षा होती. अर्थसंकल्पात खर्चाचा तपशील मांडण्यावर अधिक भर दिला असून, कोल्हापूरसाठी काहीही मिळाले नसल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

सर्वच घटकांना न्याय

जिल्ह्यातील बहुतांश सर्व विकासप्रकल्पांसाठी पहिल्या टप्प्यातील निधी दिला आहे. काही प्रकल्प, योजनांची कामे सुरू आहेत. शेती, कौशल्य विकास, उद्योगांना निधी दिला आहे. रिंगरोडसाठी निधी मंजूर आहे. जलसंपदाने विभागाने सर्वच विकासकामांसाठी भरीव निधी दिला आहे. गारमेंट क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांसाठी मुख्यमंत्री ड्रेनेज योजना महत्त्वाकांक्षी आहे. सर्किट बेंच, चित्रनगरी, रिंग रोड, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधी दिला आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदही सरकारने केली आहे. अर्थसंकल्प हा विचारपूर्वक असून सर्वच घटकांसाठी समाधानकारक आहे.

- अमल महाडिक, आमदार


अर्थहीन अर्थसंकल्प

अर्थहीन अर्थसंकल्प असूनही जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. १५ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प आहे. राज्य सरकारची ही दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत घटल्याचे स्पष्टपणे दिसते. विकास प्रकल्प पूर्णत्वाकडे धाडसी पाऊल टाकलेले नाही. जिल्ह्यात एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. केवळ भूमिपूजन, घोषणा केल्या. काँग्रेस सरकारच्या काळात चित्रनगरीला निधी देण्यात आला. त्या पलीकडे एक रुपयाही दिलेला नाही. संजय गांधी निराधार योजना, अंगणवाडी कर्मचारी, शाहू मिलचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती. अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासाठी काहीही निधी दिलेला नाही.

- सतेज पाटील, आमदार


सामान्य जनतेची थट्टाच

भुलभुल्लैया करणारा हा अर्थसंकल्प आहे. सामान्य जनतेची थट्टा करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. आर्थिक विकास दर वाढण्याऐवजी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हॅटमधून मिळणा-या महसुलाऐवजी जीएसटीतून मिळालेले उत्पन्न तोकडे आहे. सातव्या वेतन आयोगासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. ही फसवी घोषणा आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी कोणतीही ठोस तरतूद केलेली नाही. विकासाच्या नावाखाली प्रकल्प रखडले आहेत. जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. कोणत्याच घटकाला समाधान देणारा हा अर्थसंकल्प नाही. केवळ आकड्यांचा खेळ मांडला गेला आहे. विकासासाठी ठोस निधी दिलेला नाही.

- हसन मुश्रीफ, आमदार


राज्याला गाजर, कोल्हापूरला लॉलीपॉप

राज्याला गाजर आणि कोल्हापूरला लॉलीपॉप दाखविणारा अर्थसंकल्प आहे. कोल्हापूरच्या जनतेचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प असून सर्किट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, प्रादेशिक विकास आराखड्यात सुचविलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी एक पैसाही दिलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर अनेकदा बैठका घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात आर्थिक तरतूद केलेली नाही. कोल्हापूरसाठी ठोस काहीही दिलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळासाठी केलेली योजना कौतुकास्पद आहे. विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवूनच तरतुदी केल्या आहेत.

- राजेश क्षीरसागर, आमदार


सर्वच घटकांचा भ्रमनिरास

कोणतेही ठोस धोरण, व्हिजन, उद्दिष्ट नसलेल्या अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे. केवळ शेती, कौशल्य विकास डोळ्यासमोर ठेवला आहे. कोणताही निर्णय, धोरण आणि निधी धाडसाने दिलेला नाही. राजकारण आणि अर्थकारण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामे, प्रकल्पासाठी निधीची तरतूद केलेली नाही. नेमका अर्थसंकल्प कोणासाठी मांडला गेला आहे, याचा प्रश्न पडतो. अर्थसंकल्पातील अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या योजना मांडलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वच घटकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसते.

- डॉ. जे. एफ. पाटील, अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक


उद्योगाला ठेंगा

अर्थसंकल्पातून उद्योगाला निधीची तरतूद केलेली नाही. कोल्हापूरसाठी मोठा उद्योग आणण्याची घोषणा सातत्याने केली जाते. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात कोल्हापूर परिसरातील औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद केलेली नाही. वीजदरवाढीचा प्रश्नही जैसे थे आहे. नवीन एमआयडीसीसाठी काहीही घोषणा नाही. राज्यस्तरावर उद्योग आणि उद्योगाला पूरक असलेल्या व्यवसायासाठी तरतूद केली आहे. यामध्ये कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज देण्याची गरज होती. उद्योग क्षेत्राच्या असलेल्या अपेक्षांचा भंग झाला आहे.

- हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष, मॅक


शिक्षणासाठी तरतूद नाही

शेती, ऊर्जा क्षेत्राला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे. शिक्षणासाठी फारशा काहीही आर्थिक तरतुदी केलेल्या नाहीत. कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील निधी दिलेला नाही. सर्वच घटकांचे समाधान करणारा हा अर्थसंकल्प नाही. शेती क्षेत्रालाही चौकटीत राहूनच तरतुदी केल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काही प्रमाणात तरतुदी केल्या आहेत. मात्र, शिक्षणासाठी फारसा पोषक असा अर्थसंकल्प नाही.

- डॉ. पी. एस. कांबळे, अर्थशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ


आशादायी अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प आशादायी असून शिवाजी महाराजांचे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, इंदू मिल, जलयुक्त शिवार, पायाभूत सुविधा, पर्यटन उद्योगासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, राज्याचा आर्थिक कणा असलेल्या आणि राज्याचा भाग असलेल्या नागरी सहकारी बँका, पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.

- किरण कर्नाड, बँकिंग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगरावांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

$
0
0

सांगली :

शिक्षण आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज सांगलीतील वांगी गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यासाठी वांगी गावात लाखोंचा शोकसागर उसळला होता.

कडेगावमधील वांगी गावातील सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरात पतंगरावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र विश्वजीत यांनी पतंगरावांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

पतंगरावांच्या अंत्यसंस्काराला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने वांगी गावात दाखल झाले होते. दिलखुलास, दिलदार आणि अजातशत्रू नेता अशी ओळख असलेल्या पतंगरावांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच्या या लोकप्रियतेची प्रचिती आज आली. पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर वांगी गावात लोटला होता. या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनेच पतंगरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पतंगरावांचं पार्थिव आज सकाळी मुंबईतून पुण्यात नेण्यात आलं. पुण्यातील 'सिंहगड' या त्यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर पुण्यातील धनकवडी येथे भारती विद्यापीठात पतंगरावांचं पार्थिव नेण्यात आलं. तिथून नंतर हेलिकॉप्टरने पंतगरावांचं पार्थिव सांगलीतील सोनसळ या जन्मगावी नेण्यात आलं. तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी पतंगरावांच्या पार्थिवावर वांगी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकन ७८ रुपये किलो, खवय्यांची चंगळ

$
0
0

मटण मार्केटमधील स्पर्धेमुळे दर १६० वरून ७८ रुपयांवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटण मार्केटमधील चिकन व्यावसायिकांमधील स्पर्धा व ईर्ष्येमुळे ब्रॉयलर चिकनचा दर १६० रुपयांवरून ७८ रुपये झाल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे. स्वस्त चिकनमुळे ग्राहकांची गर्दी होत असताना मटण मार्केट वगळता अन्य दुकाने ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मटण मार्केट परिसरात तीन दुकानांत ग्राहक खेचण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. तीनही दुकानांत ग्राहकांची संख्या मोठी असल्याने चिकनचे दर खाली उतरवलेत आहेत.

तीनही दुकानांत स्कीनसह चिकनचा दर ७८ ते ८० रुपये किलो असून विदाउट स्कीन चिकनचा दर १०० रुपये किलो आहे. बोनलेस चिकनचा दर १५० रुपये किलो आहे. मटण मार्केटमध्ये काही दुकानांत मात्र १०० रुपये किलो चिकनचा दर आहे. स्थानिक मंडळीही कुकुटपालन करत असून त्या चिकनचा दर कमी असल्याची माहिती काही दुकानदारांनी दिली.

शहरात अनेक दुकानांत १६० ते १८० रुपये किलो चिकनची विक्री होते. गरम पाण्यातील चिकन स्वस्त असते, तर भाता काढलेले चिकन महाग असते, असा दावा केला जात आहे. गरीब व सर्वसामान्य ग्राहक स्कीनचे चिकनही मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत.

चिकनसाठी यापूर्वी परगावहून कंपन्या कोंबड्या पाठवत. आता काही कंपन्यांनी परगावाहून कोंबड्या पाठवण्यास खर्च येत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना कुकुटपालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कोल्हापूर शहरालगत अनेक ठिकाणी कुकुटपालन केंद्रात कोंबड्यांची वाढ होत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचला आहे. त्यामुळेही चिकन स्वस्त झाले आहे.

कोट...

चिकन विक्रीमध्ये स्पर्धा सुरू असून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी दर कमी केले जात आहेत. चिकनचे दरही रोज बदलत असतात. गेल्या काही दिवसांत चिकनचे दर कमी झाल्याने १६० रुपयांवरुन चिकनचा दर ७८ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

जब्बार देसाई, चिकन विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकविरोधातील संघर्षाला धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा धुरळा आतापासूनच उठायला सुरुवात झाली आहे. लोकसभेचे संभाव्य उमेदवार असलेल्या प्रा. संजय मंडलिक यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका केल्यामुळे आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडून महाडिकविरोधी तयार केल्या जात असलेल्या वातावरणात आणखी भरच पडणार आहे. एकीकडे महाडिकविरोधी गट आक्रमक होत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आमदार सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन दहशत दाखवण्याचा काळ गेला, असे खुले आव्हान दिले आहे. एकमेकांवर करण्यात येत असलेले वैयक्तिक आरोप पाहता आगामी काळातील हा राजकीय संघर्ष टोकाला पोहचण्याची चिन्हे आहेत.

खासदार महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळू नये, याच उद्देशाने आमदार हसन मुश्रीफ यांनी पायाभरणी सुरु केली आहे. त्याची उघड सुरुवात कै. सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यातून झाली. प्रा. संजय मंडलिक यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरी त्याच्या नियोजनाची धुरा आमदार मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी सांभाळल्याचे जाणवत होते. त्याचवेळी खासदार महाडिक यांना रोखण्यासाठी खेळण्यात येत असलेल्या खेळातील पहिली चाल खेळली गेली. राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असताना त्यांच्याविरोधात शिवसेनेतील नेत्याला खासदारकीचा उमेदवार म्हणून पुढे आणण्याचे तंत्र म्हणजे राजकीय डावपेचच होते. पण प्रा. मंडलिक यांनी मी शिवसेनेचा असे सांगून त्यावेळी सावध पवित्रा घेतला होता. रविवारी झालेल्या कार्यक्रमात प्रा. मंडलिक यांनी मात्र मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर खासदार महाडिकांच्या कामांची खिल्ली उडवली.

त्यांच्या या भूमिकेने मुश्रीफ व पाटील या दोघांनाही थोडे हायसे वाटणे स्वाभाविक आहे. या दोघांनी महाडिक यांना टार्गेट केले आहेच. पण त्यांच्यासोबत आता प्रा. मंडलिकही उतरले असल्याने महाडिकविरोधातील गट बांधणीला थोडे बळ आल्याचेच दिसून येत आहे. मुश्रीफ यांनी यापूर्वीच मंडलिक जर उमेदवारी घेणार नसतील तर मी स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरायला तयार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यातून त्यांचा महाडिक यांना असलेला तीव्र विरोधच दिसून येतो. रविवारी झालेल्या कार्यक्रमातही प्रा. मंडलिक यांनी माजी खासदार मंडलिक यांना मानणारे कार्यकर्ते सर्व पक्षात आहेत, असे सांगत मंडलिक गटाची जिल्ह्यात ताकद असल्याचे सूचकपणे नमूद केले आहे. हीच ताकद महाडिक यांना जेरीला आणण्यासासाठी उपयोगी पडणार असल्याने मुश्रीफ व पाटील यांनी प्रा. मंडलिक यांना उमेदवारीसाठी आम्ही पाठीशी असल्याची स्पष्ट ग्वाही दिली.

पालकमंत्र्यांकडून खुले आव्हान

दरम्यान, रविवारी दुपारी मंडलिकांचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी लाइन बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता बावड्यातील दहशतीचा काळ गेला. या दहशतीला घाबरण्याचे कारण नाही, असे खुले आव्हान दिले. मुश्रीफ, पाटील, प्रा. मंडलिक यांचा एक गट तर पालकमंत्री पाटील, खासदार महाडिक यांचा गट कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकमेकांवर कडवट टीका करु लागले आहेत. एकमेकांची पाळेमुळे भाषणातून उघड करायला सुरुवात केली आहे. लोकसभेची निवडणूक लागण्याच्या शक्यतेने जिल्ह्यातील राजकीय वातावरण यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात तापायला सुरुवात झाली असून सध्याचे आरोप पाहता प्रत्यक्ष निवडणुकीवेळी प्रचंड चुरस, ईर्ष्या पाहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायत कर्मचारी वेतनाबाबत सरकार गप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि आकृतिबंधाच्या शिफारशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने सरकारला अहवाल दिला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वेतनासंदर्भात सरकार गप्प असल्याचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाल्या, 'कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी जो खर्च येईल, त्यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय एक जानेवारीपासून लागू केला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीकडून प्रस्ताव मागविला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत संबंधितांची बैठक घेण्यात येणार आहे. उपदानाची मर्यादा तीन लाख पन्नास हजारऐवजी दहा लाख केली आहे. ही बाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी काही बाबींची तपासणी सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभवार्ता: आता रेशन दुकानात मिळणार दूध

$
0
0

नाशिक : मुंबई आणि ठाणेपाठोपाठ राज्यातही शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्त भाव दुकानातून महानंद दुग्धशाळेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकत मिळणार आहेत. याबाबतचा सरकारने निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील २९०० रेशनदुकानांमधून सर्वसामान्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा लाभ मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात लुटारुंची टोळी अटकेत

$
0
0

कोल्हापूर :

दुचाकीस्वारांची वाट अडवून तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील किंमती ऐवज आणि दुचाकी घेऊन पोबारा करणाऱ्या लुटारुंच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांमधील दोघे अल्पवयीन आहेत. टोळीकडून अडीच लाखांची रोख रक्कम, सात दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे साडेतीन लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील टोळी सराईत असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

सूरज सर्जेराव दबडे (वय २०, रा. वाठार पैकी साखरवाडी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सूर्यवंशी (१९), गोविंद वसंत माळी (१९, रा. दोघेही कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (रा. पाडळी दरवेश, ता. हातकणंगले) यांच्यासह दोन अल्पवयीनांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ५ मार्च दरम्यान पन्हाळा, कोडोली, शिराळा, कुरळप, इस्लामपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सलग लुटमारीचे गुन्हे घडले होते. लुटारूंकडून वाटेत अडवून दुचाकीस्वारांना तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली जात होती. नागरिकांकडील किंमती ऐवजासह दुचाकीही काढून घेण्याच्या घटना सुरू होत्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सराईत टोळीने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. टोळीतील काही संशयित वारणानगर येथील अमृतनगर फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सोमवारी सकाळी सहा संशयितांना अटक केली. यातील दोघे अल्पवयीन आहेत.

सूरज दबडे हा लुटारुंच्या टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. ओंकार सूर्यवंशी, गोविंद माळी, विराज कारंडे आणि इतर दोन अल्पवयीन साथीदारांना सोबत घेऊन त्याने घरफोडी, चोरी, मारामारी, जबरी लूट, दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत. ३ मार्चच्या रात्री या टोळीने पन्हाळा आणि कोडोली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विजय हिंदुराव पेटकर (रा. सावर्डे पैकी आमतेवाडी, ता. पन्हाळा) आणि गजानन सुभाष मोहिते (रा. नावली, ता. पन्हाळा) यांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते.

पोलिसांनी या टोळीकडून सात दुचाकी, ११ मोबाइल, २८ ग्रॅमचे सोन्याचे व १०२ ग्रॅमचे चांदीचे दागिने, वाहनांच्या दोन बॅटरी, देवाळे येथील तलाठ्यांची सात-बारा पुस्तके, एक इन्व्हर्टर, तलवार, कोयता असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांत टोळीवर गुन्हे दाखल असून, त्यांनी १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रयत्नपूर्वक सातत्य ठेवत यशाला गवसणी

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@:sachinpMT

सातत्य ठेवत प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते हे म्हाळुंगे (ता. करवीर) येथील प्रवीण पाटील यांनी दाखवून दिले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण तयारी, अपयशाचा अडसर सहन करीत पाटील यांनी अलीकडेच राज्य कर निरीक्षक परीक्षेच्या निकालात राज्यात २३ वा क्रमांक मिळवला. आव्हानांचा डोंगर पार परत सलग पाच वर्षे प्रयत्नांची पराकाष्टा केली.

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना नेमके कधी यश मिळेल, यशस्वी व्हायला किती वेळ लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. काहींना यश लवकर मिळते तर काहींना त्यासाठी फार झगडावे लागते. अनेकजण अपयश घेऊन बाहेर पडतात. पण प्रयत्न काय असतात हे प्रवीण यांच्याकडे पाहिल्यावर कळते. शेतकरी कुटुंबातील असलेल्या प्रवीणचे माध्यमिक शिक्षण भोगावती हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण भोगावती महाविद्यालयात झाले. त्याचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहेत. भूगोल या विषयात पदवी घेतल्यानंतर त्याने शिवाजी विद्यापीठातून याच विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली. दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१२ पासून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. शिवाजी विद्यापीठातील 'प्लेन' बिल्डिंगमधील अभ्यासिकेत त्याने सातत्याने रोज ७ ते ८ तास अभ्यास केला. परीक्षेशी संबंधित पुस्तकांसोबत इतर पुस्तके वाचल्याचा त्याला फायदा झाला. अनेकदा मुख्य परीक्षेपर्यंत जात त्याला अपयश आले. पण पुन्हा नव्याने अभ्यास सुरू करीत त्याने कर निरीक्षक परीक्षेत यश संपादन केले.

स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल, आजवरच्या प्रवासाच्या अनुभवातून तो प्रविण सांगतो, 'या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केवळ दुसरा करतोय किंवा या क्षेत्राला असणारे ग्लॅमर मिळते म्हणून इकडे वळू नका. मुळात या क्षेत्रात का यायचे? असा प्रश्न स्वतःला विचारून मगच निर्णय घ्यावा. या क्षेत्रातील अनिश्चितता पाहता एक पर्यायी 'बी' प्लॅन प्रत्येकाने तयार ठेवावा. नेमक्या संदर्भ पुस्तकांची निवड, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतल्यास यश हमखास मिळते. यश बऱ्याचदा जवळ येऊन हुलकावणी देत असते. तेव्हा निराश न होता, माघारीचा विचार न करता परत चढाई करण्याची तयारी ठेवावी.'

आता क्लास वन अधिकारी होत सामाजिक कार्य करण्याचा त्याचा मानस आहे. या मिळालेल्या यशात आईवडील आणि मित्रांचा मोठा वाटा असल्याचे तो सांगतो. आपल्या धेय्य पक्के ठरवत मार्ग निश्चित केल्यास यश हमखास गवसते याचे प्रवीण हे उत्तम उदाहरण. ग्रामीण भागातून येत आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांची तयारी करत राज्य कर निरीक्षक परीक्षेत राज्यातील यादीत आलेल्या प्रवीणचा संघर्षाचा प्रवास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्याना प्रत्येकास मार्गदर्शक ठरेल.

000

(मूळ कॉपी)

लोगो - युवामुद्रा

प्रयत्नपूर्वक सातत्याने यशाला गवसणीट

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@:sachinpMT

सातत्य ठेवत प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते हे त्याने दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना नेमका किती वेळ लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. काहींना यश लवकर मिळते तर काहींना फार झगडावे लागते. अनेकजण अपयश घेऊन बाहेर पडतात. एकंदरीत स्पर्धा परीक्षा हा एक अनिश्चित खेळ असल्याचे म्हटले जाते. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण तयारी, अपयशाचे झटके सहन करत त्याला सलग पाच वर्षे प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. अखेर त्याला यश गवसले. अलीकडेच राज्य कर निरीक्षक परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत राज्यात २३ वा आलेल्या म्हाळुंगे (ता. करवीर) येथील प्रवीण पाटील याच्या स्पर्धा परीक्षेतील प्रवास.

शेतकरी कुटुंबातील असलेल्या प्रवीणचे माध्यमिक शिक्षण भोगावती हायस्कूल भोगावती येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण भोगावती महाविद्यालयात झाले. त्याचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. भूगोल या विषयात पदवी घेतल्यानंतर त्याने शिवाजी विद्यापीठातून याच विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली. या दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१२ पासून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. शिवाजी विद्यापीठातील 'प्लेन' बिल्डिंगमधील अभ्यासिकेत त्याने सातत्त्याने रोज ७ ते ८ तास अभ्यास केला. परीक्षेशी संबंधित पुस्तकांसोबत इतर पुस्तके वाचल्याचा त्याला फायदा झाला. अनेकदा मुख्य परीक्षेपर्यंत जात त्याला अपयश आले, पण पुन्हा नव्याने अभ्यास सुरु करत त्याने कर निरीक्षक परीक्षेत यश संपादन केले.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना अनुभवाचे बोल सांगताना तो सांगतो की, या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केवळ दुसरा करतोय किंवा या क्षेत्राला असणारे ग्लॅमर मिळते म्हणून इकडे वळू नका. मुळात या क्षेत्रात का यायचे? असा प्रश्न स्वतःला विचारून मगच निर्णय घ्यावा. या क्षेत्रातील अनिश्चितता पाहता एक पर्यायी बी प्लॅन प्रत्येकाने तयार ठेवावा. नेमक्या संदर्भ पुस्तकांची निवड, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतल्यास यश हमखास मिळते. अपयश बऱ्याचदा जवळ येऊन हुलकावणी देत असते तेव्हा मात्र निराश न होता माघारीचा विचार न करता परत चढाई करण्याची तयारी ठेवावी. क्लास वन अधिकारी होत सामाजिक कार्य करण्याचा त्याचा मानस आहे. या मिळालेल्या यशात आईवडील आणि मित्रांचा मोठा वाटा असल्याचे तो सांगतो.

ध्येय पक्के ठरवत मार्ग निश्चित केल्यास यश हमखास गवसते याचे प्रवीण हे उत्तम उदाहरण आहे. ग्रामीण भागातून येत आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांची तयारी करत राज्य कर निरीक्षक परीक्षेत राज्यातील यादीत आलेल्या प्रवीणच्या संघर्षाचा, वाटचालीचा प्रवास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्याना प्रत्येकास मार्गदर्शक ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आयटी पार्क'मध्ये महापालिकेचा अडसर

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वतंत्र आय. टी. पार्क उभारण्यासाठीच्या सव्वा एकर जागेचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. या जागेबाबतचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे प्रलंबित आहे. स्थानिक कंपन्या आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोल्हापूर आय. टी. असोसिएशनकडून गेले आठ वर्षे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, जादा उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांसाठी जागा देण्याचा विचार महापालिकेचा आहे. ही जागा स्थानिक कंपन्यांना द्यायची की राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांना, या घोळात कोल्हापूरचा ब्रँड म्हणून विकसित होऊ शकणारा आयटी पार्क प्रलंबित राहिला आहे.

कोल्हापुरात आय. टी. पार्क सुरू करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. आय. टी. असोसिएशनकडून गेली आठ वर्षे याचा पाठपुरावा सुरू आहे. टेंबलाईवाडी परिसरातील टिंबर मार्केटसाठीच्या आरक्षणाचा झोन बदलून प्रस्तावित आय. टी. पार्कसाठी सव्वा एकर जागा मंजूर झाली. महापालिकेने आरक्षणाच्या झोन बदलासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने फेब्रुवारी २०१७ मध्ये मंजुरी दिली. मात्र मंजूर झालेल्या जागेचे हस्तांतरण रखडले आहे.

या पार्कमधील जागा स्थानिक कंपन्यांना मिळावी, अशी मागणी आहे. मात्र राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या या जागेचे भाडे अधिक देऊ शकतील. त्याचा चांगला आर्थिक फायदा महापालिकेला होऊ शकेल, अशा महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. त्यातून आय. टी. पार्कच्या जागेचे हस्तांतरण झालेले नाही. सव्वा एकर जागेत शंभराहून अधिक कंपन्यांना जागा मिळू शकेल. त्यासाठी चौरस फुटानुसार जागा भाडे आकारले जाणार आहे. पार्कमधील जागा स्थानिक की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांना द्यायची याचा निर्णय महापालिका प्रशासनाचा असेल. स्थानिक आय. टी. कंपन्यांनी निर्धारित दरानुसार भाडे देण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिकेने स्थानिक कंपन्यांना जागा दिल्यास असोसिएशनकडे नोंदणीकृत असलेल्या ६० हून अधिक कंपन्यांचा विकासाचा मार्ग खुला होईल. सुमारे एक हजार स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळू शकेल.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विद्यापीठातील कम्प्युटर सायन्स विभाग आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अनेक विद्यार्थी आय. टी.चे शिक्षण घेतात. येथे आय. टी. पार्क निर्माण झाल्यास मोठ्या कंपन्या येऊ शकतात. सध्या ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळील आयटी पार्कमध्ये टी कॉग्नीशन आणि गॅलीग्लर या दोन कंपन्यांचे काम सुरू आहे.

आयटी पार्कच्या जागेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र महापालिकेकडून जागा मिळालेली नाही. येत्या दोन आठवड्यात असोसिएशनतर्फे आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला जाणार आहे. स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्याची मागणी कायम आहे.

- कैलास मेढे, अध्यक्ष, आयटी पार्क असोसिएशन

आयटी पार्क हा कोल्हापूरचा ब्रँड बनू शकेल. येथे आय. टी. पार्क विकसित झाल्यास स्थानिक विद्यार्थ्याना अधिक संधी मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठातून अनेक विद्यार्थी आय. टी.चे शिक्षण घेऊन बाहेर पडतात. विद्यापीठ आणि कॉलेजांतर्फे कॅम्पस इंटव्ह्यूमधून अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कंपन्यात नोकरीची संधी मिळत आहे. मात्र स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती फायदेशीर ठरेल.

- डॉ. आर. के. कामत, विभागप्रमुख, कंम्प्युटर सायन्स विभाग, शिवाजी विद्यापीठ

आय. टी.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि मुंबईकडे नोकरीसाठी धाव घ्यावी लागते. कोल्हापुरात आयटी पार्क झाल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकेल. यासाठी प्रयत्न हवेत.

- ऋतुजा सुतार, विद्यार्थिनी आयटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक आराखडा कागदावर

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet@Uddhavg_MT

कोल्हापूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी वाहतूक आराखडा तयार केला आहे. तीन टप्प्यांतील उपाययोजनांपैकी तातडीने राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांना सध्या प्राधान्य दिले जात आहे. आराखडा उत्तम असला तरी, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेच आहे. पोलिसांनी वाहतूक शिस्तीसाठी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, आरटीओ आणि महानगरपालिकेच्या उदासिनतेमुळे वाहतूक कोंडी फोडण्यात अपेक्षित यश येत नाही.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात १३ लाख ३६ हजार नोंदणीकृत वाहनांची संख्या आहेत. यातील १० लाख ५६ हजार दुचाकी आहेत, तर २ लाख ८० हजारांहून अधिक चारचाकी आणि अवजड वाहने आहेत. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या पर्यटनामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक जीवघेणी बनली आहे. महानगरपालिका, आरटीओ आणि पोलिस यांच्या संयुक्त प्रयत्नातून वाहतुकीला शिस्त लागू शकते, मात्र यासाठी प्रमाणिक प्रयत्न होत नाहीत. चौकांमधील झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नल, स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक, पार्किंगची सुविधा, वनवेचे नियोजन यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करावा लागतो. शहरातील विनापरवाना आणि अवजड वाहतुकीवर आरटीओकडून कारवाई होत नाही. अनधिकृत रिक्षा स्टॉप, खासगी आरामबसच्या मालकांची आरेरावी, वडापमुळे होणारी कोंडी याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. यावर मार्ग काढण्यासाठी वाहतूक आराखडा गरजेचा होता. गेल्या दोन वर्षात शहरातील वाहतुकीचा अभ्यास करून पोलिस, महापालिका आणि आरटीओ विभागाने वाहतूक आराखडा तयार केला आहे. मात्र, याची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.

सिग्नल सिंक्रोनायझेशन नाहीच

शहरात सध्या २२ सिग्नल आहेत. याशिवाय आणखी तीन ठिकाणी सिग्नल प्रस्तावित आहेत. २२ पैकी ६ बंद आहेत. लिशां हॉटेल चौक ते सीपीआर चौक या मुख्य मार्गावर सहा सिग्नल आहेत, तर दसरा चौक ते हॉकी स्टेडियम या मार्गावर सहा सिग्नल आहेत. या दोन्ही मार्गावरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करणे गरजेचे आहे. सिंक्रोनायझेशनमुळे सिग्नल यंत्रणेत समन्वय राहणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठवला असून, महापालिकेच्या स्थायी समितीने २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.

दुभाजकांसह स्प्रिंग पोस्ट

बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रात दुभाजक लावण्याचे सूचवले आहे. यानुसार पोलिसांनी खासगी संस्थांच्या मदतीने स्टार बझारसमोर जुना पुणे-बेंगळुरू महामार्ग आणि रंकाळा चौपाटीजवळ राधानगरी मार्गावर दुभाजक बसवले आहेत. याशिवाय क्रशर चौक, हॉकी स्टेडियम, सायबर चौक, टाकाळा चौक, सीपीआर चौक, गोखले कॉलेज चौक, गंगावेश चौक, व्हिनस चौक आणि लिशां हॉटेल चौकात दुभाजक लावणे प्रस्तावित आहे. रस्त्याची डावी बाजू रिकामी राहण्यासाठी ताराराणी चौक, सीपीआर चौक, असेम्बली कॉर्नर, हॉकी स्टेडियम, सायबर चौक, आदी ठिकाणी कायमस्वरुपी स्प्रिंग पोस्ट लावण्यासह रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे महापालिकेला सुचवले आहे.

शहरात ११ ब्लॅक स्पॉट

कोल्हापूर पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आणि आरटीओ विभागाने रस्त्यांची पाहणी करून अपघातास कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. जिल्ह्यात एकूण ६१ ब्लॅक स्पॉट आहेत. त्यापैकी ११ ब्लॅक स्पॉट कोल्हापूर शहरात आहेत. ब्लॅक स्पॉटला स्पीड ब्रेकर बसवणे, रस्त्यांचे रुंदीकरण, दिशादर्शक फलक लावण्याचे सुचवले आहे. शहरातील तावडे हॉटेल परिसर, शिवाजी विद्यापीठ रोड, टेंबलाई नाका उड्डाणपूल परिसर, एसएससी बोर्डाजवळचे वळण, आदी ठिकाणांचा यात समावेश आहे.

झेब्रा क्रॉसिंगसाठी २० लाख

शहरातील रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग आणि दिशादर्शक फलकांसाठी महापालिकेने २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, स्पीड ब्रेकर तयार करणे, वाहनधारकांना सूचना देणारे फलक तयार केले जाणार आहेत. यातील काही फलक लावले आहेत, तर अन्य फलक लावले जाणार आहेत. लिशां हॉटेल चौक, ताराराणी चौक, दाभोलकर चौक, व्हिनस कॉर्नर चौक, सीपीआर चौक, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज चौक, क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौक आणि टाकाळा चौकात झेब्रा क्रॉसिंगचे काम नव्याने करावे लागणार आहे. नो पार्किंग, वनवे, सम-विषम पार्किंग या सूचनांचे फलकही जुने झाले आहेत. असे फलक बदलण्याचे वाहतूक पोलिसांनी सूचवले आहे.

फेरीवाल्यांसह जुनी वाहने रस्त्यातच

महापालिकेने फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. यानुसार वाहतूक कोंडीच्या ठिकाणी फेरीवाल्यांना थांबण्यास परवानगी नाकारली आहे. प्रत्यक्षात मात्र गर्दीच्या ठिकाणीच फेरीवालेही बस्तान मांडतात. धैर्यप्रसाद चौक, खानविलकर चौक, भवानी मंडप ते बिंदू चौक कमान या ठिकाणी 'नो फेरीवाला झोन' घोषित करून फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे, असा अहवाल वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेला दिला आहे. वाहतुकीस अडथळा करणारे १२९ फेरीवाले आणि दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागरिकांची नादुरुस्त वाहने वर्षानुवर्षे रस्त्याकडेला पार्क केली आहेत. अशा वाहनांच्या मालकांना नोटिसा पाठवून वाहने हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांनी ३९० बेवारस वाहने हटवली आहेत. अनेक गॅरेजच्या बाहेर दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांची गर्दी असते. यातील बहुतांश वाहने रस्त्यावरच उभी असतात. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या गॅरेजमालकांवर कारवाई केली जाणार आहे.

पार्किंगसाठी ७२ ठिकाणे

शहरात पार्किंग ही सर्वात मोठी समस्या आहे. अंबाबाई मंदिराच्या आसपास एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात स्थानिकांनी स्वत:च्या वाहनांसाठी पार्किंगसाठी सोय केलेली नाही. बहुतांश वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर पार्किंगऐवजी दुकानगाळे आहेत. नागरिकांची वाहने रस्त्यावर असल्याने कोंडीत भर पडते. खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचीही वाहने रस्त्याकडेलाच उभी असतात. याला शिस्त लावण्यासाठी दुचाकींसाठी ३७, तर चारचाकी वाहनांसाठी ३५ पार्किंगची ठिकाणे नियोजित आहेत. यातील काही ठिकाणी सध्या पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे. मध्यवर्ती बसस्थानक आणि अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग इमारत प्रस्तावित आहे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होणे गरजेचे आहे. महापालिकेने पे अँड पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खासगी आराम बसेसना कावळा नाका परिसरात जागा देण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू आहेत. याच्या अंमलबजावणी तातडीणे होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंद्रेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रायगड कॉलनी रोडवर महापालिकेच्यावतीने राबवण्यात आलेली अतिक्रमण हटाव कारवाई थांबवण्यासाठी शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. बोंद्रे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदन अतिक्रमण विभागप्रमुख पंडीत पोवार यांनी आयुक्तांना दिल्यानंतर आदेश दिले. कर्मचारी संघही यामध्ये सहभागी होणार असल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबतचे निवेदन पोवार यांनी महापालिका कर्मचारी संघालाही दिले आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी संघाची बैठक होऊन कामकाज बंद करण्याचा इशारा देण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रायगड कॉलनी रोडवर केबिन काढण्याची कारवाई सुरू असताना माजी नगरसेवक इंद्रजित बोंदे यांनी एक केबिन हटवली जाऊ नये यासाठी फोन केला. पोवार यांना 'मी सांगतो तेच ऐकायचे अन्यथा वाईट परिणाम होतील,' असा दम दिला. अशा प्रकारची वाक्ये वापरुन कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदन पोवार यांनी सोमवारी सांयकाळी आयुक्त डॉ. चौधरी यांना दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत होते. या प्रकरणाबरोबरच अतिक्रमण कारवाईवेळी यापूर्वीही बरेच प्रसंग घडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारांमुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे खच्चीकरण केले जात आहे. नागरिकही या विभागाकडे वेगळ्या नजरेने पहात आहेत. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवायचे असल्यास अशा बाबींना आळा बसण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर पोवार यांना संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. पोवार यांनी कर्मचारी संघालाही निवेदन दिले. त्यानुसार अध्यक्ष रमेश देसाई यांनी संघाची बैठक बोलवण्याचे नियोजन केले आहे. नगरसेवकांकडून घडणाऱ्या प्रकाराच्या निषेधार्थ या बैठकीत कामकाज बंद करण्याचा इशारा दिला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'बांधकाम'चा प्रश्न ऐरणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणच्या कार्यालयाकडे महिनाभरानंतरही कर्मचाऱ्यांची उपलब्धता झाली नाही. शहरालगतच्या ४२ गावांच्या समतोल विकासासाठी प्राधिकरणची स्थापना झाली. मात्र, कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, निधीची अनुपलब्धता आणि प्राधिकरण समितीच्या बैठकीला अद्यापही मुहूर्त न लाभल्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला अद्यापही सुरुवात झाली नाही. परिणामी विकास प्रकल्पासह एकीकडे ग्रामीण भागातील बांधकामासाठी काहीजणांचे सरकारी कार्यालयातील हेलपाटे वाढले आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. प्राधिकरणसाठी नेमलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कर्मचारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतीचे बांधकाम परवानाचे अधिकार २०११ ला संपुष्टात आले आहेत. नगररचना विभाग आणि प्रांत कार्यालयाकडे ते अधिकार वर्ग केले. सध्या विविध ग्रामपंचायत पातळीवर नागरिक बांधकामविषयक परवाने मागायला गेल्यावर प्राधिकरणकडे बोट दाखविले जाते. दुसरीकडे 'प्राधिकरण'कडून प्रत्यक्ष स्वरूपात अजूनही कामाला सुरुवात नाही. 'प्राधिकरण'कडे ग्रामीण भागातील बांधकाम परवान्याचे अधिकार आहेत. सद्य:स्थितीला प्राधिकरण कार्यालयाकडे आवश्यक आणि तांत्रिक मनुष्यबळ नाही. कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत प्राधिकरणचे कार्यालय सुरू केले आहे.

९ फेब्रुवारीपासून प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे शिवराज पाटील यांनी स्वीकारली आहेत. मात्र, कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. कार्यालयीन कामकाजासाठी आस्थापना विभाग नाही. कम्प्युटर व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता नाही. यामुळे सीईओ पाटील यांना कार्यालयीन कामकाजासाठी बिंदू चौकातील नगररचना मूल्य निर्धारण विभाग व राजारामपुरी येथील प्रादेशिक योजना नगररचना उपसंचालक कार्यालय गाठावे लागते. नगररचना विभाग व अन्य सरकारी खात्यांशी या दोन्ही कार्यालयातून पत्रव्यवहार करण्याची वेळ आली आहे.

आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणमध्ये कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागाचा सुनियोजित आणि नियंत्रित विकास साधण्यावर फोकस राहील असे प्राधिकरणचे सीईओ पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ४२ गावांसाठी प्राधिकरण कार्यालयाची कार्यकक्षा आहे. गावांची संख्या आणि कामकाजाचा विस्तार विचारात घेता आस्थापना व तांत्रिक घटकांसाठी मिळून सुमारे ४० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांचा आकृतिबंद तयार केला आहे. यासंदर्भात सीईओ पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. कर्मचारी उपलब्ध होताच कार्यालयीन कामकाज पूर्णक्षमतेने होईल असे सांगितले. दरम्यान, या आठवड्यात कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बांधकाम परवानासंदर्भात नियमावली स्पष्ट नाही. सरकारी यंत्रणेकडून कसलेही आदेश प्राप्त झाले नाहीत. काही ठिकाणी नगररचना तर काही ठिकाणी तहसिलदार कार्यालयाकडून परवाने घेतले जात आहेत. प्राधिकरणाची अद्याप कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे ग्रामस्थांत संभ्रमावस्था आहे. शिवाय प्राधिकरण आणि ग्रामपंचायतीचे अधिकार यासंदर्भात कसलीही स्पष्टता नाही. यामुळे नागरिकांना बांधकाम परवाने कुणाकडे मागायचे याविषयी साशंकता आहे.

सचिन चौगले, वडणगे सरपंच

प्राधिकरणची स्थापना झाली मात्र आज अखेर प्राधिकरण समितीची पहिली बैठकही झाली नाही. ग्रामीण भागात बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकाम परवान्यासंदर्भात ग्रामपंचायतीपासून तहसीलदार कार्यालयात सगळेजण हात झटकत आहेत. दुसरीकडे परवाना न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. वळीवडे, उचगाव, गांधीनगर, गडमुडशिंगी आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत, त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही.

प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप विरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

त्रिपुरात सत्तेत येणाऱ्या भाजपने लेनिनचा पुतळा पाडल्याच्या निषेधार्थ पुरोगामी लोकशाही आघाडीच्यावतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणा दिल्या. कॉ. अनिल चव्हाण म्हणाले, 'शहीद भगतसिंग, क्रांतिसिंह नाना पाटील या देशभक्तांचे लेनिन गुरू होते. त्यांचा पुतळा उखडल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, महात्मा गांधींच्या पुतळ्यांचीही विटंबना करण्यात आली. ज्या महामानवांनी गोरगरिबांसाठी आयुष्य वेचले अशा महामानवांबद्दल भाजपकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे आहे.' शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थ्यांचे प्रश्न तीव्र होत असताना भाजपकडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी पुतळा उखडणे व विटंबनेचे प्रकार घडत आहेत अशी टीका राजेश वरक यांनी केली. आंदोलनात बाबूराव कदम, बी.एल. बरगे, प्रा. सुभाष जाधव, शंकर काटाळे, मुकुंद कदम, अॅड पंडीतराव सडोलीकर, अशोक जाधव, दिगंबर सकट, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, मीना चव्हाण सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टंचाइच्या झळा तीव्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. पंचगंगा नदीतील पाणी प्रचंड दूषित झाले आहे. यामुळे नदीकाठावरील ३९ गावे आणि इचलकरंजी शहरासही दुषित पाणी पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात पाणी समस्या गंभीर होण्याची चिन्हे दिसत असून जिल्हा प्रशासनाने जून अखेरच्या संभाव्य पाणी टंचाईच्या तयार केलेल्या आराखड्यात ३३९ गावांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप एकाही गावात टंचाई निवारणासाठीची कामे सुरू झालेली नाहीत.

कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डात स्वच्छ, मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक प्रभागात दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ येत आहे. याशिवाय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरालगत असलेल्या उचगाव, कळंबा, पाचगाव परिसरातील अनेक उपनगरात पाणी टंचाई जाणवत आहे. या भागात विंधन विहिरी खोदाई करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पाचशे, सहाशे फूट खोल खोदाई केली तरी अपेक्षित पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. साठवलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने डासजन्य आजारांची लागण होत आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील हलकर्णी परिसर, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यातील वाड्यावस्त्यांत गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेथील रहिवाशी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणत आहेत. तलाव, ओढ्याची पाणी पातळी कमी झाली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासन अद्यापही कागदावरच टंचाईचे नियोजन करण्यात व्यस्त आहे. टंचाई आराखड्यातील कामास मंजुरी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहेत. मात्र कामास मंजुरीच्या प्रक्रियेस गती आलेली नाही. लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे अद्याप गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत नाही.

टंचाई बैठकीचा विसर

उन्हाचे चटके सुरू झाल्यानंतर पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री तर तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठका घेणे अपेक्षित असते. या बैठकीत टंचाई असणाऱ्या भागात तातडीने उपाययोजनेचा आदेश दिल्यास प्रशासन गतिमान होते. मात्र अजूनही अशा प्रकारच्या बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही कार्यालयात बसून तीव्र पाणी टंचाई नाही, असे सरकारी उत्तर देत असल्याचे चित्र आहे.

आराखडाही अपूर्ण

पाणी पुरवठा, महसूल विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्यातही टंचाई असलेल्या काही गावांचा सामावेश झालेला नसल्याच्या तक्रारी आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर जूनपर्यंत टंचाई भासलेल्या सर्व गावांचा समावेश आराखड्यात केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची टोळी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुचाकीस्वारांना वाटेत अडवून तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील किमती ऐवज आणि दुचाकी घेऊन पोबारा करणाऱ्या लुटारुंच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांमधील दोघे अल्पवयीन आहेत. टोळीकडून चोरीतील अडीच लाखांची रोख रक्कम, सात दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील टोळी सराईत असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

सूरज सर्जेराव दबडे (वय २०, रा. वाठार पैकी साखरवाडी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सूर्यवंशी (१९), गोविंद वसंत माळी (१९, रा. दोघेही कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे, रा. पाडळी दरवेश, ता. हातकणंगले) यांच्यासह दोन अल्पवयीनांना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ५ मार्चदरम्यान पन्हाळा, कोडोली, शिराळा, कुरळप, इस्लामपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सलग लुटमारीचे गुन्हे घडले होते. लुटारूंकडून वाटेत अडवून दुचाकीस्वारांना तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली जात होती. नागरिकांकडील किंमती ऐवजासह दुचाकीही काढून घेण्याच्या घटना सुरू होत्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सराईत टोळीने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. टोळीतील काही संशयित वारणानगर येथील अमृतनगर फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (ता. १२) सकाळी सहा संशयितांना अटक केली. यातील दोघे अल्पवयीन आहेत.

सूरज दबडे हा या टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. ओंकार सूर्यवंशी, गोविंद माळी, विराज कारंडे आणि इतर दोन अल्पवयीन साथीदारांना सोबत घेऊन त्याने घरफोडी, चोरी, मारामारी, जबरी लूट, दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत. तीन मार्चच्या रात्री या टोळीने पन्हाळा आणि कोडोली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विजय हिंदुराव पेटकर (रा. सावर्डे पैकी आमतेवाडी, ता. पन्हाळा) आणि गजानन सुभाष मोहिते (रा. नावली, ता. पन्हाळा) यांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते.

साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी या टोळीकडून चोरीतील सात दुचाकी, ११ मोबाइल, २८ ग्रॅमचे सोन्याचे व १०२ ग्रॅमचे चांदीचे दागिने, वाहनांच्या दोन बॅटरी, देवाळे येथील तलाठ्यांची सात-बारा पुस्तके, एक इन्व्हर्टर, तलवार, कोयता असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांत टोळीवर गुन्हे दाखल असून, त्यांनी १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना धरणग्रस्तही चालत मुंबईत धडकणार

$
0
0

कराड :

‘कोयना प्रकल्पग्रस्त सोळा दिवसांपासून कोयनानगर येथे आंदोलन करीत आहेत. मात्र, सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. सरकार आणि शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आंदोलकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे. त्यामुळे आंदोलक आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने सोमवार, १९ मार्चपासून चालत निघणार आहोत. रविवारी कोयनानगर येथील आंदोलनस्थळी गुढी उभारून मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. सातारामार्गे मुंबईला चालत जाणाऱ्या कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचा हा ऐतिहासिक मोर्चा असेल. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोयनानगर आंदोलनस्थळावरील गुढी उतरवली जाणार नाही,’ असा इशारा श्रमिक मुक्तिदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी बोलताना दिला.

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘कोयना प्रकल्पग्रस्त मुंबईत धडकले तर सरकार कोयनेच्या पाण्यात बुडाले असे समजा. सत्तेतील सरकार भांडवलदारांचे आहे. ५ लाख कोटींची कर्ज बुडविणाऱ्या भांडवलदारांच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांना जाण्यासाठी वेळ आहे पण, गेल्या ६४ वर्षांत प्रचंड अवहेलना आणि उद्ध्वस्त झालेल्या कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना वेळ देता येईना, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. श्रमिक मुक्तिदलाला रितसर शनिवारपर्यंत पत्र मिळायला पाहिजे. तसेच त्याचे प्रोसिडिंग झाले पाहिजे. कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. त्यासंदर्भात बैठक झाली पाहिजे. आम्हाला पूर्वीसारखे उपेक्षित ठेवण्याचा जर घाट घातला जात असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही.’

रविवारी आंदोलनस्थळी गुढी उभारून आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंदोलनस्थळी वृद्ध माणसे राहतील. चालत निघालेले प्रकल्पग्रस्त विजय घेऊन परत येत नाहीत, तोपर्यंत गुढी उतरवली जाणार नाही, असेही पाटणकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images