Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अनधिकृत बांधकामांसाठीही सुपारी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर :शालिनी सिनेटोनच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेतील कारभाऱ्यांनी पुन्हा एकदा आरक्षित जागेचा बाजार मांडण्याचा डाव आखला आहे. तावडे हॉटेल ते निगडेवाडी जकात नाकापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस महापालिकेच्या आरिक्षत जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. चार वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर २५० एकर जागा महापालिकेच्या मालकीची झाली. मात्र या जागेवर बेकायदेशीररित्या बांधकाम करणाऱ्या व्यापाऱ्यांची सुपारी काही जणांनी घेऊन अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा सौदा ठरविला आहे. महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांनी संयुक्तपणे ही कोट्यवधी रुपयांची सुपारी घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. अनधिकृत इमारती नियमावलींच्या चौकटीत बसवून त्या धनदांडग्यांच्या घशात घालण्यासाटी महापालिकेतील कारभाऱ्यांची लुडबूड वाढली आहे.

नियमितीकरणाच्या कामासाठी मोठे 'डिलींग'ठरल्याने कारभाऱ्यांच्या हालचाली वेगावल्या आहेत. राजारामपुरी विभागीय कार्यालय येथील नगर रचना विभागाच्या कार्यालयात कारभाऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत. हद्दवाढीअभावी कोल्हापूर शहराच्या विस्ताराला मर्यादा आहेत. महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी जागांची आवश्यकता आहे. शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेची जागा ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व अन्य कारणासाठी आरक्षित आहे. त्या ठिकाणावरील बांधकामे हटवून जागा खुली करण्याऐवजी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची खेळी कारभाऱ्यांनी केली आहे.

सर्वसामान्यांना दंडुका; धनदांडग्याना पायघड्या

२०१४ पूर्वी व नंतरच्या बांधकामाविषयी धोरण ठरवून त्यामध्ये तावडे हॉटेल परिसरातील बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न असल्याने इतर नगरसेवकांत अस्वस्थता आहे. तावडे हॉटेल परिसरातील २५० एकर जागेचा महापालिकेच्या प्रकल्पासाठी वापर झाला पाहिजे, अशी नगरसेवकांची भूमिका आहे. मात्र नगरसेवकांना अंधारात ठेवून काही जणांनी परस्पर आरक्षित जागेवरील बांधकामांना मान्यता देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. वास्तविक आरक्षित जागेवर कसल्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही, मग धोरण ठरविण्याचे कारण काय करायचे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. महापालिका, सामान्य मिळकतधारकांचे अतिक्रमण, बांधकाम उद्ध्वस्त करते. तर दुसरीकडे धनदांडग्यांच्या बेकायदेशीर बांधकामांना अभय मिळवून देण्यासाठी काही नगरसेवक पुढे सरसावले आहेत.

तत्कालिन आयुक्तांचा विभागीय आयुक्तांकडे अहवाल

महापालिकेच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेत कचरा डेपो, ट्रक टर्मिनस व नो डेव्हलपमेंट झोनखाली जवळपास २५० एकर जागेवर आरक्षण टाकले आहे. तावडे हॉटेल ते निगडेवाडी जकात नाकापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात रहिवास, वाणिज्य वापरासाठी अनधिकृत बांधकामे झाल्याचा अहवाल तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी १५ फेब्रुवारी २०१३ मध्ये विभागीय आयुक्तांना दिला होता. त्यामध्ये रिसनं ८४, ८७, ९१, ९२, ९३, ९४, ९६, ९७, १००, १०१, १०२, १०३, ११८, ११९, १२०, १२२, १३, १२४, १२५, १३४, १३७, १३८, १४३, १४४, १४६, १४७, १४८ या मिळकती कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत आहेत. यामध्ये ३० मीटरचा रस्ता, ग्रीन आयलँड आरक्षण क्रमांक १५८, ट्रक टर्मिनस क्षेत्र ९.१८ हेक्टर व आरक्षण क्रमांक १५७ कचरा डेपो क्षेत्र ४.३३ हेक्टर आरक्षित आहेत. उर्वरित जागा ना विकास क्षेत्रामध्ये समाविष्ठ आहे. मात्र या ठिकाणी उचगांव ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे बांधकामास परवानगी दिली असल्याची तक्रारही त्यावेळी केली होती. शिवाय बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

१२८ मिळकतीवर मोठ्या प्रमाणात बांधकामे

महापालिकेने आठ मार्च २०१३ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ८१ मिळकतीवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. त्यानंतर झालेल्या सर्व्हेत ३८ ठिकाणी अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. महापालिकेन जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात नऊ व्यापाऱ्यांनी तीन लाख चौरस फूट बांधकाम केल्याचे सामोरे आले आहे. कसला परवाना नाही, बांधकाम विषयक नियमावलींचे पालन नाही. वाहतूक, फायर सेफ्टीसंदर्भात कसलीही खबरदारी घेतली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान उचगाव ग्रामपंचायत व महापालिकेत जागेच्या मालकीवरून कोर्टात वाद सुरू असताना काही अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना टीडीआर दिल्याची माहिती आहे.

आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे नियिमत करता येणार नाहीत. महापालिकेने हायकोर्टात सुनावणीवेळी तावडे हॉटेल परिसर व निगडे मळा येथील आरक्षित जागेवर अनिधकृत बांधकामे झाल्याची प्रतिज्ञापत्र दिले आहे. मग पुन्हा त्या अनधिकृत मिळकतींना नियमित करणे हे कायदाबाह्य ठरणारे आहे. बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न झाल्यास कोर्टात पुन्हा दाद मागू. तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांची संख्या, रिसनंची माहिती आयुक्तांना सादर केली आहे.

अनिल कदम, माजी नगरसेवक

शहर हितापेक्षा मतपेटीवर डोळा

गांधीनगर येथील मतदानावर सर्वपक्षीय नेते मंडळीचा डोळा आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गांधीनगरचा समावेश आहे. महापालिकेतही नेतृत्व करायचे, 'दक्षिण'मध्ये राजकारण साधायचे अशा दोन्ही डगरीवर हात ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींची या संदर्भातील भूमिका दुटप्पी आहे. शहरहितापेक्षा मतपेटी महत्त्वाची असा त्यांचा कारभार आहे. गांधीनगर येथील एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून त्या मिळकती वाचविण्यासाठी एका लोकप्रतिनिधीनी मंत्रालयापर्यंत धावाधाव केली. मंत्र्यांना निवेदने दिली. तर दुसऱ्या दोन लोकप्रतिनिधींचा कारभार हा कारभाऱ्यांच्यावर अवलंबून असल्यासारखे चित्र आहे. सर्वपक्षीय कारभारीच आरक्षित जागेतील बांधकामासाठी बुद्धी आणि वाकचातुर्य पणाला लावत असल्याने नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे का? अशी शंका अन्य नगरसेवक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबईचा पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चांदे कोते पैकी आनेवाडी येथील फॉर्म हाऊसवर रोहन शंकर फाटक (वय ३९, रा. मिठबाव, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग) या मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्याचा रविवारी मृत्यू झाला. फाटक हे मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आज रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

होळीनिमित्त फाटक गावी आले होते. शनिवारी मिठबावमधील मित्रांनी कोल्हापुरात सहल आयोजित केली होती. मित्रासमवेत फाटक शनिवारी चांदे कोते पैकी आनेवाडी येथील गणेश माधव सरनाईक यांच्या फार्म हाऊसवर आले. शनिवारी रात्री फार्म हाऊसवर त्यांचा मुक्काम होता. रविवारी दुपारी सर्वजण मिठगाव जाण्यासाठी तयारी करत होते. मित्राच्या कारमध्ये साहित्य ठेवत असताना फाटक यांच्या छातीत कळ आली. ते जागेवरच कोसळले. त्यांच्या मित्रांनी त्यांना धामोड येथील डॉ. बिडकर यांच्या दवाखान्यात नेले. त्यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी फाटक यांना कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचारास दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार फाटक यांना सीपीआरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सीपीआर पोलिस चौकीत या प्रकरणी नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई वॉर्डला अपुरे पाणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरीपासून ते पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या उचगावजवळील लोणार वसाहतीपर्यंत पसरलेला ई वॉर्ड हा शहरातील सर्वाधिक लोकवस्तीचा भाग. या परिसरासाठी दररोज १५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात पाच ते सहा एमएलडी पाण्याचाच येथे पुरवठा केला जातो. त्यामुळे या परिसराला पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नेहमीचीच आहे. आता उन्हाळ्याच्या काळात तर याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.

पुईखडीपासून कावळा नाका टाकीपर्यंतच्या परिसरासाठी शिंगणापूर योजनेवरुन पाणी देण्यात येते. मात्र अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ई वॉर्डमधील निम्मा भाग तहानलेला रहात आहे. त्याचबरोबर परिसरात अनेक ठिकाणच्या गळतीमधून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जाते. याला पाणीपुरवठा विभाग प्रतिबंध करू शकलेला नाही. त्यामुळे ई वॉर्डाची अपुरा पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.

शिंगणापूर योजनेवरुन पुईखडीत आणलेले पाणी शुद्ध करुन पुढील भागाला पाठवले जाते. पुईखडी येथील शुद्धीकरण केंद्रातून दररोज जवळपास ७६ एमलएलडी पाणी बाहेर पडते. यापैकी ६० एमएलडी पाणी ई वॉर्डात कावळा नाका व राजारामपुरी येथील टाक्यांसाठी देणे आवश्यक आहे. कावळा नाका टाकीवरील भागासाठी किमान १५ एमएलडी पाण्याची गरज असते. प्रत्यक्षात पुईखडीपासून बाहेर पडणारे पाणी ई वॉर्डपर्यंत व्यवस्थित पोहचत नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पुईखडीपासून येणारे पाणी ई वॉर्डला रात्री दीड ते दुपारी दीड वाजेपर्यंत देण्याचे नियोजन आहे. बारा तास पाणी राजारामपुरी तसेच कावळा नाका टाकीकडे येण्याची आवश्यकता आहे. पण, राजारामपुरीतील टाकी वगळता कावळा नाका येथील टाकीत पाणीच जात नसल्याची स्थिती आहे. २२ लाख लिटर साठवण क्षमतेच्या टाकीत कधीतरी तीन लाख लिटरपर्यंत पाणी साठते. याला पर्याय म्हणून बायपासच्या माध्यमातून पाणी दिले जाते. परिणामी उंचावरील भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही.

कावळा नाका टाकीमधून २७ प्रभागांमध्ये पाणी देण्यात येते. येथे दररोज किमान १५ एमएलडी पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात कसेबसे पाच एमएलडी पाणी मिळते. शिंगणापूर योजनेवरुन बारा तास पाणी देण्याचे नियोजन असले तरी त्यापैकी सहा तासच कसाबसा पाणीपुरवठा होतो. या सहा तासांत पाण्याचे पुरेसे पंपींग होत नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी विविध भागात असलेली पाण्याची गळतीही कारणीभूत आहे. रस्ते प्रकल्पामध्ये शिंगणापूर योजनेची पाइपलाइन रस्त्याखाली गेली. त्यातील अनेक ठिकाणी गळतीद्वारे लाखो लिटर पाणी दररोज वाहून जात आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने काहीच खबरदारी घेतली नसल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

कावळा नाका टाकीवर अवलंबून भाग

- साईक्स एक्स्टेंशन, शाहूपुरी, पाच बंगला, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, महाडिक कॉलनी, लोणार वसाहत, लिशां हॉटेल, विचारे माळ

कसबा बावडा टाकीवर अवलंबून भाग

कसबा बावडा, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, महावीर कॉलेज परिसर, स्टेशन रोड, टेंबलाईवाडी परिसर, सर्किट हाऊस परिसर,

गळती लाखो लिटरची

शहराच्या विविध भागांमध्ये जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग त्या-त्या वेळी गळती दुरुस्त करण्याची तातडीने गरज असल्याचे सांगत असतो. याप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून अनेक ठिकाणी गळतीची दुरुस्ती केली गेली. प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च झाले. या खर्चासाठी तातडीची मंजुरी घेतली जाते. पण त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाल्याचे दिसत नाही. अद्याप पाणीटंचाई कायम असल्याची स्थिती आहे. आणखी काही भागात मोठ्या प्रमाणात पाणीगळती आहेत. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी नाल्यामध्ये, गटरमध्ये वाहून जात आहे.

पुईखडी केंद्रात शुद्ध होणारे पाणी - ७६ एमलएलडी

कावळा नाका, राजारामपुरीची गरज - ६० एमएलडी

कावळा नाका टाकीवरील प्रभाग - १५

कावळा नाका टाकीची गरज - १५ एमएलडी

प्रत्यक्ष होणारा पुरवठा - ५-६ एमएलडी

कावळा नाका टाकी साठवण क्षमता - २२ लाख लिटर

टाकीत प्रत्यक्ष साठणारे पाणी - ३ लाख लिटर

पाणीपुरवठ्याची यंत्रणा

ई वॉर्डची पाण्याची वेळ - रात्री दीड ते दुपारी दीड वाजेपर्यंत

अपुऱ्या पाण्याला पर्याय - बायपास पद्धतीने पुरवठा

परिणाम - उंचावरील भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा नाही

अडचणी काय ?

शिंगणापूर योजनेवरुन बारा तास पाणी देण्याचे नियोजन.

पैकी सहा तासच कसाबसा पाणीपुरवठा होतो

सहा तास पाण्याचे पुरेसे पंपींग होत नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाच्या ट्रॉलीवरुन पडून युवकाचा मृत्यू

$
0
0

ट्रॉलीवरून पडून युवर ठार

कोल्हापूर : ट्रॉलीतील ऊस व्यवस्थित लावत असताना तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने म्हाकवे (ता. कागल) येथील स्वप्निल ऊर्फ चंद्रकांत रामू खोडे (वय २४) याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआरमध्ये आणले जात असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीपोटी दिड कोटीचा धनादेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

जलसंपदा विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या २१ कोटी ९४ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी महापालिका मंगळवारी दीड कोटी रुपयांचा धनादेश देणार आहे. ५ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याची अंतिम नोटीस जलसंपदा विभागाने महापालिकेला दिली होती. त्यानुसार महापालिकेकडून दीड कोटी रुपयांचा भरणा करण्यात येणार आहे. अन्य थकबाकीपोटी चर्चा करण्यात येणार आहे, असे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

महापालिका भोगावती व पंचगंगा नदीतून पिण्याचा पाणीउपसा करते. त्यासाठीची जलसंपदा विभागाची पाणीपट्टी महापालिकेने भरली नव्हती. त्याबाबत दंड, विलंब शुल्कही आकारला जात होता. डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पाणीपट्टीची थकबाकी १९ कोटी २२ लाख ५५ हजार रुपये आहे, तर दंड पाच कोटी सहा लाख ५७ हजार रुपये, उपकर तीन कोटी ४८ लाख व विलंब शुल्क तीन कोटी ७५ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम २१ कोटी ९४ लाख असल्याने जानेवारीत नोटीस दिल्यानंतर दीड कोटी रुपये भरले होते. आता जलसंपदाने अंतिम नोटीस दिल्यानंतर पुन्हा दीड कोटी रुपयांचे बिल भरण्यास मंजुरी घेण्यात आली असून, मंगळवारी त्याचा धनादेश जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमावेत या मागणीसाठी पुजारी हटाव कृती समितीने सोमवारी शिवाजी चौकात निदर्शने केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमणारच या कृती समितीला दिलेल्या आश्वासनाची आठवण निदर्शनांव्दारे करुन देण्यात आली.

अंबाबाई मंदिर पुजारी हटाव समितीच्यावतीने मंदिरात पगारी पुजावे नेमावेत यासाठी लढा सुरू आहे. मंदिरात किंवा मंदिर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी व मंदिरातील शांतता धोक्यात येऊ नये यासाठी संयमाने रस्त्यावर लढा सुरु आहे. पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीस, कोणत्याही परिस्थितीत अंबाबाई मंदिरात सरकारी नियुक्त पगारी पुजारी नेमणार, प्रसंगी वटहुकूम काढू असे आश्वासन कोल्हापुरच्या जनतेला व भाविकांना दिले आहे. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द या अधिवेशनात पाळावा याची आठवण करून देण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

यावेळी समितीच्या सदस्यांनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावे अशा आशयाच्या घोषणा दिल्या. पालकमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी नगरसेवक बाबा पार्टे, विनायक फाळके, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, अॅड चारुलता चव्हाण, दिलीप पाटील आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुक्यामुळे वीज पुरवठ्यात बिघाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे वातावरणात अचानक झालेला बदल, दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड निर्माण होऊन वीजपुरवठा विस्कळीत झाला. धुक्यामुळे महापारेषणच्या मुडशिंगी, गोकुळ शिरगाव व फाइव्ह स्टार एमआयडीसी अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाला तर चार अतिउच्चदाब वाहिन्यांची आर्थिंग तारा तूटन पडल्या. धुके ओसरताच महापारेषण व महावितरणने युद्धपातळीवर यंत्रणा राबविल्याने अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात विस्कळीत झालेला वीजपुरवठा चार तासांत सुरळीत केला. सांगलीच्या दोन अतिउच्चदाब वाहिन्या वगळता जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होता.

प्रचंड धुक्यामुळे आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे, मुडशिंगी मुडशिंगी अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले. मुडशिंगीसह तळंदगे ते बिद्री, तळंदगे ते तिळवणी, तळंदगे ते सावंतवाडी अशा एकूण चार २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिन्यांच्या अर्थिंग तारा तुटल्याने संबंधित वीज उपकेंद्रांना येणारा वीजपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पहाटे सव्वापाच ते सकाळी साडेनऊ काळात खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली होती. गोकुळ शिरगाव व फाइव्ह स्टार एमआयडीसी उपकेंद्राचा वीजपुरवठा सकाळी पूर्ववत करण्यात आला. परंतु काही कालावधीत उपकेंद्रातच बिघाड निर्माण झाल्याने दुपारी पुन्हा खंडित झाला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो सुरळीत झाला. मुडशिंगी उपकेंद्राला कराडहून आलेल्या वाहिनीवरून वीज पुरवठा सुरळीत करुन बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. महावितरणचे मुख्य अभियंता किशोर परदेशी व प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर यांनी महापारेषण अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून परिस्थिती हाताळली. तर महापारेषणचे अधीक्षक अभियंता ए. बी. दडमल, कार्यकारी अभियंता ए. सी. ढमाले, चाचणी विभागाची टीम व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती करुन सर्व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले.

बिघाडाचे कारण…

दाट धुके पडल्याने हवेतील आर्द्रता वाढते. आर्द्रतेत पाण्याचा अंश असल्याने वाहिनीतील दोन तारांमधील हवेमुळे विलग राहणारा विद्युत दाब एक होतो. त्यामुळे विजेचे वहन, पारेषण पुढे होऊ शकत नाही. पर्यायाने वीजपुरवठा ठप्प होतो.

या वीज उपकेंद्रांना बसला फटका

महापारेषणच्या मुडशिंगी, तिळवणी, बिद्री, गोकुळ शिरगांव, फाइव्ह स्टार, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोथळी, राधानगरी, कुरूंदवाड या अतिउच्चदाब वीजउपकेंद्रांना धुक्याचा फटका बसला. यामुळे सुमारे २९५ मेगावॅट विजेचे पारेषण चार तास ठप्प झाले.

सांगलीला कमी फटका

सांगली जिल्ह्यात मिरज एमआयडीसी भागातील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचा पुरवठा खंडित झाला होता. मात्र तो पर्यायी मार्गाने तातडीने सुरू करण्यात आला. मिरज ते विटा व कर्वे ते कडेगाव अतिउच्चदाब वीज वाहिन्यांवर बिघाड झाला होता. त्यामुळे कर्वे- कडेगाव वाहिनी कराडहून सुरू केली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत दोन्ही अतिउच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने काढून घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध करांच्या वसुलीसाठी भाड्याने गाड्या घेऊन त्यातून वसुलीपेक्षा जास्त खर्च होईल. भाड्याच्या वाहनांपेक्षा अधिकाऱ्यांची वाहने वापरा, असे सांगत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वसुलीवरुन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच नगररचना व पाणीपुरवठा विभागाचे अपेक्षित उत्पन्न जमा न झाल्यास सहाय्यक संचालक तसेच जलअभियंता यांची वेतनवाढ रोखण्याचा खरमरीत इशाराही दिला आहे.

आर्थिक वर्ष संपत आलेले असले तरी महापालिकेच्या विविध विभागांकडून अपेक्षित उत्पन्न जमा झालेले नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये उत्पन्न वाढीच्यादृष्टीने आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची झाडाझडती घेतली. शेवटचा महिना राहिलेला असताना सर्व विभागांनी वसुलीवर भर देण्याचे आदेश देण्यात आले. वसुली जोरात करण्यासाठी भाडेतत्वावर वाहने घेण्याचा प्रस्ताव यावेळी आयुक्तांसमोर मांडण्यात आला. यासाठी दररोज तीन हजार रुपयांच्या आसपास भाड्याने दहा वाहने घेण्याबाबतची चर्चा करण्यात आल्याचे समजते. या प्रकारे भाड्याने वाहने घेऊन जमा किती होणार व त्या वाहनांवर किती खर्च होणार याबाबत आयुक्तांनीच शंका उत्पन्न केली. त्यामुळे भाड्याने वाहने घेण्यापेक्षा अधिकाऱ्यांची वाहने वसुलीसाठी घ्या, असे आयुक्तांनी सांगितले. त्यानुसार काही अधिकाऱ्यांनी वाहने देण्याची तयारीही दर्शवली. अधिकाऱ्यांचे वाहन वसुलीला वापरल्यानंतर नागरिकांवर एक दबावही पडतो, असा त्यामागील तर्क आहे.

नगररचना व पाणीपुरवठा विभागाकडून मोठा महसूल अपेक्षित आहे. पण या दोन्ही विभागाकडून त्यानुसार काम झाले नसल्याचे बैठकीत दिसून आले. त्यामुळे महसुलाची उद्दिष्टपुर्ती न झाल्यास नगररचना विभागाचे प्रमुख सहाय्यक संचालक व पाणीपुरवठ्याचे प्रमुख जलअभियंता यांची वेतनवाढ रोखण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या जागेतील मिळकतींचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचाही आढावा घेताना आयुक्तांनी विभागीय कार्यालय व नगररचना विभागाला झापले. दोन्ही विभागांकडून केल्या जात असलेल्या सर्व्हेमध्ये तफावत आढळत असल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार दोन्ही विभागांकडून एकच अहवाल आला पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाडी अड्ड्यातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात वाहनतळ व भक्त निवाससाठी राखीव असलेल्या व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्याच्या जागेवरील व्यापाऱ्यांनी जुनी वाहने ठेवून केलेले अतिक्रमण हटवण्यास महापालिकेने सोमवारपासून धडाक्यात सुरुवात केली. या परिसरात ९० स्क्रॅप व्यापारी असून दहा अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम केले आहे. व्यापाऱ्यांनी विरोध न करता स्वत: स्क्रॅपची वाहने हटवण्यास प्रारंभ केला असून सर्व जागा रिकामी होण्यास जवळपास १५ दिवस लागण्याची शक्यता आहे.

दिवसभरात ट्रक, डंपर, जुन्या गाड्या अशा ४५ वाहनांवर तर तीन शेडवर कारवाई करण्यात आली. महापालिकेने ४५ वाहने हटवल्याचा दावा केला असला तरी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने वाहनांच्या बाजूने असलेला कचरा साफ करून केवळ सपाटीकरण करण्याचे काम करून तुरळक साहित्यच हटवले गेल्याचे सायंकाळी तिथे पाहणी केल्यानंतर आढळून आले.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात वाहनतळ, भक्त निवास, दर्शन मंडप या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यातील व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्यात वाहनतळ व भक्त निवास बांधण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या जागेवर १५ वर्षांपासून स्क्रॅप वाहनांचे व्यापारी आहेत. लक्ष्मीपुरीतील हरिहर विद्यालयाजवळील स्क्रॅपची ३२ दुकाने हलवण्यात आली होती. त्यांना गाडी अड्ड्यात जागा देण्यात आली होती. येथे जवळपास तीन एकर जागा आहे. गेल्या वर्षभरापासून येथील स्क्रॅप व्यापाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अनेकवेळा वादावादी झाली होती. स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत एक मार्चपूर्वी गाडी अड्डा येथील अतिक्रमण दूर करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या प्रशासनाने सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी या कारवाईवेळी भेट देऊन पाहणी केली.

या जागेवर बंद पडलेली, अपघातात नुकसानग्रस्त झालेली तसेच सरकारच्या नियमानुसार आर्युमान संपलेल्या वाहनांना आणून त्याचा स्क्रॅपसाठी वापर केला जातो. तीन एकर जागेवर ट्रक, चारचाकी वाहने, त्यांचे साहित्य अस्ताव्यस्त पसरले आहे. महापालिकेचे चार जेसीबी, चार डंपर, क्रेन तसेच कर्मचारी सोमवारी सकाळी या जागेवर आले. व्यापाऱ्यांशी पूर्वीपासूनच चर्चा झाली असल्याने व्यापाऱ्यांनीही काही विरोध न करता महापालिकेला काम करू दिले. अनेक मोठ्या वाहनांची चाके नसल्याने त्यांना हलवणे महापालिकेच्या यंत्रणेला शक्य नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या यंत्रणेला ही वाहने काढून घेतो असे सांगितले. त्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मुजीब महात यांनी सांगितले. व्यापारी या जागेवरील वाहने हटवून अन्यत्र ठेवतील, पण तिथे करण्यात आलेली जवळपास दहा पक्क्या बांधकामांची अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेला बळाचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. भोवताली पत्र्याचे शेड उभे करुन आतमध्ये बांधकाम केली आहेत. अशा अतिक्रमणांनाही हटवण्यात यावे, अशी चर्चा त्या परिसरात होती. रिकाम्या झालेल्या जागेवर मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात येणार आहे. उपशहर अभियंता एस. के. माने, कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे, राजेंद्र वेल्हाळ, अनिरुद्ध कोरडे, ९० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

.....

जुनी वाहने व्यापणार अन्य जागा

येथील व्यापाऱ्यांनी तेथील जुनी, खराब वाहने हलवण्यासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी महापौर व आयुक्तांकडे केली आहे. सध्या तर व्यापारी ही वाहने त्यांना जिथे जागा उपलब्ध होईल, तिथे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे काही वाहने महापालिकेचीच खुली जागा व्यापण्याची शक्यता आहे. या प्रकाराने गाडी अड्डयातून हलवली जातील व त्यातील काही रस्त्यांवर उभी केली जातील अशी भीती आहे.

....

अनाधिकृत गॅस भरणा केंद्र

सायंकाळी या अड्ड्याच्या जागेवर अनेक रिक्षांची रांग लागलेली पहायला मिळाली. तिथे रिक्षामध्ये अनाधिकृतपणे गॅस भरुन दिला जात असल्याचे समजले. यामुळे या अड्डयावर गॅस भरणासारखीही कामे होत असल्याचे निदर्शनास आले. तिथे येणाऱ्या रिक्षांची संख्या पाहता अनाधिकृत गॅस पंपच तयार झाल्याची चर्चा होती. सकाळी कारवाई सुरू केल्यानंतर तिथे जुनी वाहने तोडण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहमदाबाद रेल्वे दोन वेळा सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते अहमदाबाद रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सोडावी, तसेच ही गाडी अहमदाबादच्या पुढे आबूरोडपर्यंत करावी, अशी मागणी राजस्थानी समाजाच्या शिष्टमंडळाने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे केली. यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात राजस्थानी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी कोल्हापूर ते अहमदाबाद या रेल्वेची सोय करण्यात आली. कोल्हापूर रेल्वेस्थानकातून आठवड्यातून एकदा ही गाडी धावते. या मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त आहे. आठवड्यातून एकदा जाणारी रेल्वे हाउसफुल्ल असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. चार महिन्यांपूर्वी तिकिटाचे आरक्षण करुनही अनेकदा तिकिट उपलब्ध होत नाही. किमान आठवड्यातून दोनदा ही रेल्वे सोडण्याची गरज आहे. आबुरोड पर्यंत ही रेल्वे धावल्यास माउंट आबू पर्यटनस्थळापर्यंत रेल्वेला हजारो प्रवासी मिळू शकतात. रेल्वेचा महसूल आणि हजारो प्रवाशांची सोय होऊ शकेल. शिष्टमंडळात संभवनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, लक्ष्मीपुरी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, महावीरनगर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लीलाचंद ओसवाल, भक्तीपूजा नगर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ललित गांधी, शत्रूंजय जैन मंदिर ट्रस्टचे अमृत ओसवाल, शिरोली येथील सिमंधरधाम जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गांधी, सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, नगरसेवक ईश्वर परमार, मोहब्बत सिंह देवल, रमेश पुरोहित, मकनसिंह देवडा आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी वृद्धाकडील सोन्याची चेन, अंगठी आणि किमती घड्याळ असा तीन लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला. रविवारी (ता. ४) सांयकाळी साडेपाचच्या सुमारास रुईकर कॉलनीतील मैदानाशेजारी हा प्रकार घडला. याबाबत शिवाजी महादेव लायकर (वय ६४, रा. एल. आय. सी. कॉलनी, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी लायकर यांचे इचलकरंजी येथे चित्रपटगृह होते. पाच वर्षांपूर्वी ते कोल्हापुरात राहण्यासाठी आले. रुईकर कॉलनीतील बंगल्यात ते पत्नीसह राहतात. त्यांच्या तिन्ही मुली विवाहित आहेत. लायकर हे रोज संध्याकाळी शिवाजी विद्यापीठात फिरायला जातात. रविवारी कारचालकाला सुटी असल्याने ते रुईकर कॉलनीतील ग्राउंडमध्ये फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले. कॉलनीतील वडगावे यांच्या दुकानासमोर आल्यानंतर समोरुन दोन अनोळखी तरुण दुचाकीवरुन आले. दुचाकी थांबवून त्यातील एकाने, 'आम्ही पोलिस आहोत, ओळखले नाही का? अंगावर सोने घालून फिरू नका, चार दिवसांपासून परिसरात लूटमार सुरू आहे. सोने काढून खिशात ठेवा,' असे सांगत सोबतच्या व्यक्तीकडून रुमाल घेऊन तो लायकर यांच्याकडे दिला. अंगावरील सर्व दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. लायकर यांनी लूटमारीच्या भीतीपोटी गळ्यातील दहा तोळ्यांची चेन, एक तोळ्याची अंगठी, सव्वा लाख रुपये किमतीचे घड्याळ असा सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज रुमालात ठेवला. रुमालाची गाठ बांधून देतो असे सांगून लायकर यांच्या हातातील रुमाल घेऊन दोन्ही भामट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. लायकर यांनी आरडाओरडा केला, मात्र चोरटे निघून गेले. यानंतर त्यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

संशयितांमधील एकाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, तर दुसऱ्याचे वय ३० ते ३५ वर्षे असल्याचे लायकर यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस असल्याची बतावणी करून लूट करण्याचे प्रकार गेल्या महिन्याभरात थांबले होते, मात्र पुन्हा भरवस्तीत असा प्रकार घडल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी परवान्यांचा प्रश्न मार्गी लागणार ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढीव परवाना शुल्क भरण्यास नकार दिल्याने व्यापारी परवाना देण्यास कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने नकार दिला आहे. याबाबत दि कोल्हापूर ग्रेन मर्चं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर येथे भेट घेऊन याबाबत मार्ग काढण्याची मागणी केली. शिष्टमंडळाची मागणी लक्षात घेऊन परवाना शुल्काबाबत त्वरित तोडगा काढण्याची ग्वाही दिली. निवेदन देऊन शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर संबंधित विभागाला प्रस्ताव पाठविल्याचा संदेशही मंत्र्यांकडून पाठविण्यात आल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सहकारमंत्री देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'बाजार समिती आवारातील भूखंड व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनी घेतले आहेत. या भूखंडावर व्यापाऱ्यांना गेल्या वर्षीपासून अन्यायकारक वार्षिक शुल्क आकारणी केली आहे. समितीकडे शुल्क जमा न केल्यास परवाना नूतनीकरण करणार नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचा ठराव समितीने जिल्हा उपनिबंधकांकडून बेकायदेशीरपणे पोटनियमामध्ये दुरुस्ती करून पोटनियमात दुरुस्ती केली आहे. नियमाप्रमाणे पोटनियमामध्ये दुरुस्ती करताना सभासदांची नोटीस देऊनन सभा बोलावणे आवश्यक असते, पण अशी कोणताही नोटीस अथवा सभा न बोलवता पोटनियमामध्ये दुरुस्ती केली आहे.'

याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे एप्रिल २०१७ रोजी तक्रार दाखल केली. तसेच पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली. पणन संचालक अथवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसताना व्यापारी परवाना नूतनीकरण सुरू झाल्यानंतर वाढीव शुल्कांबाबतचे समितीने पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार पोटनियम दुरुस्तीनुसार शुल्क लागू करू नये, तसेच भूखंडावरून मालाची विक्री न झाल्याने सेस लागू करू नये, अशी मागणी केली.

असोसिएशनने निवेदन दिल्यानंतर वाढीव शुल्काचा प्रश्न मार्गी लावत परवाने नूतनीकरणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची ग्वाही दिली. सहकार मंत्र्यांना निवेदन देवून शिष्टमंडळ कोल्हापूर येथे दाखल होऊ पर्यंत संबंधीत विभागाला पत्रव्यवहार केल्याचा संदेश प्राप्त झाल्याने परवाना नुतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष किशोर तांदळे, विजय कागले, नयन प्रसादे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठपुराव्यानेच अडकला कुरुंदकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकारी महिला पोलिस अधिकाऱ्याचा निर्घृण खून केल्यानंतर हा प्रकार दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न संशयित आरोपी अभय कुरुंदकर याने केला होता. अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तपास होऊ नये, यासाठी कुरुंदकरने राजकीय वजन वापरले. खुनाचे पुरावे मिळू नयेत यासाठी खबरदारी घेतली. तपास अधिकाऱ्यांना 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकरवी बिद्रे-गोरे कुटुंबीयांना धमकावण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, बिद्रे-गोरे कुटुंबीयांच्या पाठपुराव्यामुळेच अखेर कुरुंदकरसह त्याचे सहकारी गजाआड झाले.

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे १५ एप्रिल २०१६ रोजी नवी मुंबईतून बेपत्ता झाल्या. १४ जुलैला त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद नातेवाइकांनी कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल केली. फिर्याद दाखल होताच याचा तपास होऊ नेय, यासाठी अभय कुरुंदकरने खबरदारी घेतली. सुरुवातीलाच एसीपी संगीता अल्फान्सो यांनी गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवसांतच त्यांची बदली झाली. यानंतर सीपी हेमंत नगराळे यांनी तपासाची सूत्रे स्वीकारली. मात्र, त्यांच्याकडून तपास फारसा पुढे गेला नाही. यामुळे बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी ३१ जानेवारी २०१७ रोजी हायकोर्टात धाव घेतली.

हायकोर्टाने या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश देताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. तरीही अपेक्षित गतीने तपास पुढे सरकला नाही. बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी कुरुंदकरविरोधातील पुरावे देऊनही पोलिस त्याच्या अटकेचे धाडस दाखवत नव्हते, त्यामुळे बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महासंचालक, राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडेही दाद मागितली. वारंवार पत्रव्यवहार करून कुरुंदकरविरोधातील पुरावे सादर केले. मुख्यमंत्र्यांना ३६ वेळा पत्र आणि निवेदने पाठवली. हा मुद्दा अधिवेशनात चर्चेला यावा यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकरवी तारांकित प्रश्न उपस्थित केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी अल्फान्सो यांच्या पुनर्नियुक्तीची मागणी केली होती. यानुसार पुन्हा जानेवारी २०१८ मध्ये अल्फान्सो यांच्याकडे तपास आल्यानंतर तपासाची चक्रे गतिमान झाली. त्यांनी संशयित आरोपी कुरुंदकरसह भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील या दोघांना अटक केली. यानंतर कुरुंदकरचा कारचालक कुंदन भंडारी आणि जवळचा मित्र महेश पळणीकर यांना अटक केल्यानंतर फळणीकरने गुन्ह्याची कबुली दिली.

गुन्हा घडल्यानंतर अखेर २२ महिन्यांनी याची उकल झाली आहे. संशयित आरोपींकडून गुन्हा लपविण्याचा अटोकाट प्रयत्न झाला. त्याच्या कुटुंबीयांनीही फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिद्रे यांच्या पाठपुराव्यामुळेच गुन्ह्याची उकल होऊ शकली. बदनामीची भीती असूनही त्यांनी गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याच्या निश्चयाने पाठपुरावा केला. संशयितांच्या भीतीने बिद्रे-गोरे कुटुंबीय तपासाची वाट पाहत बसले असते, तर कदाचित अद्यापही संशयित मोकाट फिरले असते आणि तपासही फाइलबंद झाला असता.

गृहखाते विरोधात, तरीही पाठपुरावा

  1. अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केल्यापासून बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे अनाहूत सल्ले खुद्द पोलिस अधिकाऱ्यांनीच बिद्रे-गोरे कुटुंबीयांना दिले होते. पोलिस महासंचालकांनी निवेदने स्वीकारली. मात्र, यावर ठोस कारवाई करण्यास विलंब लावला. कुरुंदकर याच्या कुटुंबीयांनीदेखील तपास अधिकाऱ्यांवर दबाव वाढवला होता. संपूर्ण गृहखाते विरोधात असतानाही बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या मुसक्या आवळण्यास भाग पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवाहरनगरात दोन गटात मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवाहरनगर येथील शिरत मोहल्ला परिसरात रविवारी (ता. ४) मध्यरात्री दोन गटांत जोरदार मारामारी झाली. त्यात निसार खुदबुद्दीन मुजावर (वय ४२), शाकीब शब्बीर मुजावर (२२), किशोर युनूस मकानदार (४२) जखमी झाले आहेत, तर दुसऱ्या गटातील अब्दुल हमीद मिरशिकारी (२१) आणि अब्दुल करीम मिरशिकारी (२४), शहानवाज मिरशिकारी (५७) आणि उमर सैद मिरशिकारी (२८, रा. सर्व जवाहरनगर, शिरत मोहल्ला परिसर) जखमी झाले. दोन्ही गटांतील तरुणांनी काठ्या, हॉकी स्टिक, लोखंडी सळी यांनी मारहाण केली. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध घोटाळा प्रकरण अधिवेशनात गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या औषध खरेदीमधील घोटाळा प्रकरण या अधिवेशनात गाजणार आहे. घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होणार आहे. त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांनी सविस्तर माहिती घेतली.

कागलकर हाउसमधील औषध भांडारातील औषध खरेदीमधील घोटाळ्याचे प्रकरण महाराष्ट्र टाइम्सने चव्हाट्यावर आणले. यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. दोन वर्षांच्या खरेदीतील चौकशीत अर्धा कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले यांना सक्तीच्या रजेवर पाठवून नोटीस दिली आहे. मात्र या प्रकरणात मोठे रॅकेट कार्यरत आहे. झालेली चौकशी वरवरची असल्याने त्रयस्त यंत्रणेकडून चौकशीची मागणी पुढे येत आहे.

आरोग्य अधिकारी दोषी असताना त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या प्रभारी अतिरिक्त आरोग्य अधिकारी यू. जी. कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चौकशी केली. हा अहवाल स्वयंस्पष्ट नव्हता, क्लीन चिट देणारा, घोटाळ्याची रक्कम निश्चित न करणारा होता. वित्त विभागाकडून कुंभार यांच्या पथकाने चौकशी न केलेल्या मुद्द्यांची चौकशी केली. त्यामध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर सातत्याने मटाने प्रकाशझोत टाकल्याने जिल्ह्यातील आमदारांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आमदार आबिटकर यांनी स्वत: जिल्हा परिषदेत येऊन आरोग्य अधिकारी कुंभार यांची भेट घेऊन घोटाळ्याची सविस्तर माहिती घेतली.

सोमवारी सर्वश्री आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील यांनीही घोटाळ्याची माहिती घेतली. त्यामुळे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात गाजणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हडबडून जागी झाली असून, संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनात केवळ औषध घोटाळ्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. घोटाळ्यातील इतर दोषींची पळापळ सुरू आहे. औषध निर्माण अधिकारी ते मुख्य लेखाधिकारी यांच्यापर्यंतच्या फाइल्सच्या प्रवासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

---------

चौकट.

पदाधिकाऱ्यांचे 'कानावर हात'

अध्यक्ष शौमिका महाडिक, सभपती सर्जेराव पाटील - पेरीडकर, सभापती अंबरिश घाटगे, सदस्य अरूण इंगवले, भोजे यांनी स्थायी समिती बैठकीत औषध खरेदीवरील चर्चेची माहिती दिली. आवश्यक औषधे खरेदी करावी, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांनी औषध घोटाळ्यावर पदाधिकाऱ्यांचे मौन का असे विचारले. त्यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी थेट उत्तर न देता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कानावर हात ठेवत सावध पवित्रा घेतल्याचे जाणवले. परिणामी औषध घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजत असतानाही पदाधिकारी कसे अनभिज्ञ, त्यांना कसा चौकशी अहवाल मिळाला नाही, खरंच त्यांना माहित नाही की माहित नसल्याचा बनाव करीत आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्वंयस्पष्टता का नाही ?

प्रभारी अतिरिक्त आरोग्य अधिकारी कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चौकशी केली. त्यांनी अहवाल देताना स्वयंस्पष्टता, किती रकमेच्या घोटाळ्यास कोण जबाबदार हे का दिले नाही, सुरुवातील अहवाल दडवून का ठेवला हे प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे.

औषध घोटाळ्याची संपूर्ण माहिती घेतली. घोटाळ्याची झालेली चौकशी वरवरची आहे. त्रयस्त यंत्रणेकडून चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अधिवेशनात करणार आहे.

प्रकाश आबिटकर, आमदार

औषध खरेदी घोटाळा प्रकरणी सीईओंनी दोघांना नोटीस काढली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. औषध घोटाळा आणि इतर तक्रारीवरून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

शौमिका महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद

अनावश्यक औषधांची खरेदी केली आहे. त्यातील काही औषधे सरकारने खरेदी केली आहेत. खरेदीसंबंधी तक्रारी आल्यानंतर चौकशीचा आदेश सीईओंनी दिला आहे. आम्ही आदेश दिलेला नाही. अद्याप चौकशी अहवाल पाहायला मिळालेला नाही.

सर्जेराव पाटील-पेरीडकर, सभापती, आरोग्य समिती

प्रशासनाने आम्हाला विश्वासात न घेता चौकशी केली आहे. औषध खरेदीपासून वितरणापर्यंतच्या सर्व प्रक्रियेची चौकशी होण्याची गरज आहे. औषध भांडारातून काही औषधे खुल्या बाजारात विकली जातात. त्यामुळे सखोल चौकशीची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.

विजय भोजे, पक्षप्रतोद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवैध गॅस भरताना कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वयंपाकाचा गॅस अवैधरित्या रिक्षात भरणाऱ्या सेंटरवर मंगळवारी (ता. ६) दुपारी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत चार रिक्षा, गॅस सिलिंडर, वजन काटे असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने रंकाळा परिसरात कारवाई केली. याप्रकरणी रणजित शहाजी मस्के (वय २८, रा. कल्याणी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रंकाळा येथील सागर गायकवाड यांच्या दुकान गळ्यात अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस रिक्षात भरला जात असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांच्या पथकाला मिळाली होती. यानुसार मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पथकाने गॅस सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी गॅसचे १० सिलिंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. बेकायदेशीरपणे गॅस भरणारा संशयित रणजित मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. भर वस्तीत अवैधरित्या गॅसभरणा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक सागर भागोजी गावडे याचीही पोलिसांनी चौकशी केली. लक्ष्मीपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंगपंचमीच्या निमित्ताने शहरात दुचाकींच्या पुंगळ्या काढून कर्कश्श आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० हून अधिक तरुण-तरुणींवर पोलिसांनी मंगळवारी (ता. ६) दंडात्मक कारवाई केली. हुल्लडबाजांकडून ४० हजार रुपये दंड वसूल केला असून, रात्री उशिरापर्यंत ड्रंक अँड ड्राइव्हच्याही कारवाया सुरू होत्या. याशिवाय दिवसभर शहरात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदीही करण्यात आली होती.

दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करू नये, तसेच स्पिकर, डॉल्बी लावून गोंधळ घालू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले होते. काही तरुणांनी याकडे दुर्लक्ष करून मंगळवारी सकाळपासूनच दुचाकींवरून धूम स्टाइलने शहरात फेरफटका मारणे सुरू केले होते. यातील काही तरुणांनी दुचाकींच्या पुंगळ्या काढल्या होत्या. ट्रीपल सीट आणि वनवेतूनही वाहतूक सुरू होती. अशा हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ट्रीपल सीट, कर्कश्श हॉर्न आणि बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या सुमारे दीडशेहून अधिक हुल्लडबाजांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यातील दहा तरुणांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त करून त्यांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा हुल्लडबाजांच्या पालकांसमोर समज देऊन सोडण्यात आले.

ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १५ जणांवर कारवाई केल्याचे उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी सांगितले. चौकांमध्ये स्पिकर आणि स्टेरिओ लावून नाचणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. लक्ष्मीपुरी परिसरातील सहा स्टेरिओ जप्त करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शहर उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवायांमध्ये ४० हजार रुपयांचा दंड वसूल झाला. पोलिसांच्या कारवायांमुळे मारामारी आणि अपघातांची संख्या घटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपटेनगरात तोतया पोलिसाने लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपटेनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ कट्ट्यावर बसलेल्या वृद्धास दोन भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चेन लुटली. रविवारी (ता. ४) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत शिवाजी दत्तात्रय साठे (वय ६७, रा. आपटेनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. साठे हे रविवारी संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. साडेपाचच्या सुमारास ते पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कट्ट्यावर बसले असता, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करून साठे यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. यानंतर दोन्ही संशयितांनी पोबारा केला. ३८ हजार रुपयांची चेन लंपास केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. जुना राजवाडा पोलिस भामट्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्ड्यातील अतिक्रमण हटावची कारवाई महापालिकेने दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवली. स्क्रॅप व्यापाऱ्यांव्यतिरिक्त अन्य दहा अतिक्रमणधारकांमधील काही शेड हटवण्यात आली. काही अतिक्रमणधारकांनी कोर्टाकडून स्थगिती घेतली आहे, त्यांची सुनावणी १७ मार्च रोजी आहे. दरम्यान, ज्या जागेवरील वाहने हटवण्यात आली आहेत, तिथे बुधवारपासून मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात येणार आहे.

महापालिकेच्यावतीने गाडी अड्डयातील स्क्रॅप वाहने हटवण्यास सुरुवात झाली. तेथील व्यापाऱ्यांनीच स्वत: वाहने हटवली आहेत. त्यामुळे ट्रक, चारचाकी वाहनांनी अडलेली जागा रिकामी झाली आहे. एकीकडे व्यापारी वाहने हटवत असताना महापालिकेच्यावतीने अतिक्रमणधारकांची पत्र्याची शेड काढण्याची मोहीम मंगळवारी राबवली. त्यावेळी गोठ्याचे शेड काढताना नागरिकांनी विरोध केला. बुधवारी शेड काढून घेण्यास सांगण्यात आले आहे. तर उर्वरित ओढ्याकडील शेड काढण्यात येणार आहेत. अनेक स्क्रॅप व्यापाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत वाहने तोडण्याचे काम सुरू ठेवले होते. बुधवारी निम्म्यापेक्षा जास्त वाहने तिथून हटवली जातील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही अतिक्रमणधारकांनी महापालिकेकडून विस्थापित म्हणून कमी जागा मिळाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कोर्टात दावा दाखल केला असून तेथील स्थगितीही मिळवली आहे. या दाव्याची सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे अशा शेडबाबतचा निर्णय सुनावणीमध्ये होणार आहे.

दरम्यान, दोन दिवसात ४५ हजार चौरस फुटापर्यंतची जागा रिकामी झाली आहे. त्या ठिकाणी मुरुम टाकून सपाटीकरणाच्या कामाला बुधवारी सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने वाहनतळ सुरू करता येणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी आरोपी दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंथरुणाला खिळून असलेल्या ९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणारा विष्णू कृष्णा नलवडे (वय ५०, रा़ नांगरवाडी, ता़ भुदरगड) या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश आदिती कदम यांनी दोषी ठरवले. आरोपीला फाशीची शिक्षा की जन्मठेप होणार याचा फैसला सोमवारी (ता. १२) होणार आहे़ असहाय वद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, ४ मार्च, २०१५ मध्ये दुपारी पीडित वृद्धेच्या घरात इतर कोणी नसल्याचे पाहून आरोपी विष्णू नलवडे याने साडेअकरा ते साडेतीन या वेळेत वृद्धेवर बलात्कार केला. अंथरुणास खिळून असलेल्या वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा घेवून, तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीस शेजारच्या नागरिकांनी पकडले होते. नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर गारगोटी पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बी. टी. बारवकर यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने कोर्टात नऊ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश आदिती कदम यांनी विष्णू नलवडे याला दोषी ठरवले. आरोपीस कोणती शिक्षा द्यावी या मुद्यावर ॲड. ए. एस. पिरजादे यांनी सरकार पक्षामार्फत युक्तिवाद केला. आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. आरोपीच्या वकिलांनी शिक्षेबाबत म्हणणे मांडण्यासाठी अवधी मागितल्याने याबाबत सोमवारी (ता. १२) निकाल दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images