Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तडजोडी सोडून कार्यकर्त्याला संधी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काहींच्या तडजोडीच्या राजकारणामुळे सून मेघा पाटील यांचा पराभव झाला. त्या पराभवाविषयी खंत नाही, पण पक्षाच्या पराभवाचे दु:ख मोठे आहे. 'स्थायी'तील घटनेनंतर आमच्या कुटुंबांतील कुठलाही सदस्य हिमालयासारखा वितळला नाही, उलट सह्याद्रीच्या पाषाणासारखे आम्ही ठामपणे उभे राहिलो. तडजोडीचे राजकारण सोडून जिल्हा नेतृत्वाने 'स्थायी'तील प्रकाराची सखोल चौकशी करुन योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. तडजोडीचे राजकारण सोडून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी गटबाजीच्या राजकारणावर त्यांनी निशाणा साधला.

पक्षाचे निवडणूक निरीक्षक दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतर्गत निवडणुकीसाठी ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार के. पी. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, माजी आमदार नामदेवराव भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चिंता करायची गरज नाही. पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आणण्याची ताकद पक्ष कार्यकर्त्यांत असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

महापालिकेतील राजकारणावर भाष्य करताना जिल्हाध्यक्ष ए. वाय.म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासून प्रामाणिकपणाने काम करत आहे. पक्ष नेतृत्वाने सोपविलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र स्थायीच्या निवडणुकीत राजकारण झाले, त्या पराभवाने नाउमेद झालो नाही. पण पराभवाने पक्षाची पिछेहाट झाली. आपण कधीच तडजोडीचे राजकारण करणार नाही. पक्षाने पाठीवर हात ठेवून लढण्याची ताकद द्यावी. राष्ट्रवादीचा झेंडा जिल्ह्यात फडकावू. '

पक्षातील गटबाजीवरुन माजी खासदार निवेदिता माने यांनी बैठकीत खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या की, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे जिल्ह्यात पक्ष संघटनेचे उत्कृष्ट काम करत आहेत. उत्कृष्ट संघटनेबद्दल त्यांचा पक्षीय पातळीवर गौरव झाला. पक्षाची बांधणी चांगल्या पध्दतीने होत असताना महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गालबोट लागले. कुटुंबांतील सदस्यांच्या पराभवाची जखम अस्वस्थ करणारी असते. पक्षामध्ये कुणीतरी शह देण्याचे, नेत्यांच्या विरोधात फूस लावण्याचे काम करत आहे. एकमेकांचे पाय ओढणे आणि कान भरण्याचे काम थांबले पाहिजे. स्थायीच्या निवडणुकीत फूस देणाऱ्यावर पहिल्यांदा कारवाई करावी.

पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविकात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तसेच जिल्ह्यात सुमारे आठ हजार सक्रिय सभासदाची नोंदणी झाल्याचे सांगितले. करवीर तालुका प्रमुख मधुकर जांभळे यांनी आभार मानले.

घोटाळा करणारे सगळे मोदी

निरीक्षक दिलीप पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गज नेते आहेत. त्यांच्या राजकारणाविषयी रोज वर्तमानपत्रातून वाचत असतो. पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यात लक्ष घातले आहे. त्यांचा दौरा संपल्यावर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये पुन्हा राजकारण सुरु झाले. त्यामुळे मी त्यावर बोलण्याचे धाडस करणार नाही. मात्र नेत्यांच्या राजकारणात पक्षाला कसली झळ बसणार नाही, याची खात्री आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारकडून लोकांची फसगत झाली आहे. या सरकारच्या कालावधीत ६५००० कोटींचा घोटाळा झाला आहे. आणि हा घोटाळा करणारे सगळे मोदी आडनावाच्या व्यक्ती आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष म्हणून समोर येणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीत ‘जय शिवाजी जय भवानी’चा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवरायांचे देशाच्या इतिहासात निर्णायक योगदान आहे. शिवरायांनी रयतेवरील अन्याय दूर करण्यासाठी लढाया केल्या. सामान्य रयतेला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरक व्यक्तीमत्त्व असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्य समारंभापूर्वी महाराष्ट्र सदनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती-घोडे, मावळे, नऊवारी साडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील मंडळी अशा सर्व लवाजम्यानिशी 'जय शिवाजी, जय भवानी' अशा गर्जनेने राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारांने प्रथमच राजधानी दिल्लीत पार पडलेल्या शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान 'जय शिवाजी, जय भवानी'च्या गजराने राजधानी दुमदुमून गेली. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद यांनी शिवरायांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.

ते म्हणाले की, शिवरायांनी संपत्तीसाठी लढाया केल्या नाहीत तर रयतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी केल्या. अत्याचाराने पिचलेल्या रयतेला त्यांनी स्वाभिमानाचा मंत्र दिला. त्यांच्या सैन्यात हिंदू व मुस्लिमधर्मियांचा समावेश होता. एक मुत्सदी राजा कसा असावा, हे त्यांच्या चरित्रावरुन लक्षात येते. जिजाऊंच्या संस्कारात शिवरायांनी महिलांचा सन्मान केला असल्याचेही कोविंद म्हणाले.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'छत्रपती शिवराय सामाजिक न्यायाचे प्रतीक असून त्यांनी पोर्तुगीज, इंग्रजांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या आरमाराची उभारणी केली. सार्वभौम स्वराज्याची स्थापना करणारे ते एक कुशल योद्धे होते.'

समारंभास लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौसेना प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गल्लोगल्ली अपघाताची भीती

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

कोल्हापूर : लांजा, रत्नागिरी, गणपतीपुळ्याहुन कोल्हापूरात येण्याचा, कोकणाशी जोडणारा मुख्य भाग म्हणजे शिवाजी पुल. कोकणाशी जोडणारे हे सर्वात महत्वाचे प्रवेशव्दार आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुना बुधवार पेठ परिसर म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्यांचा गावठाण भाग. रस्त्यावरच तब्बल २५ हून अधिक गल्ल्या येथे आहेत. छोट्या- मोठ्या वाहनांबरोबर अवजवड व प्रवासी वाहनांची वर्दळ असलेला अत्यंत धोकादायक मार्ग हा आहे. येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर शहरातून कोकणाकडे जाणारी वाहतूक शिवाजी पूलमार्गे बाहेर पडते. तावडे हॉटेल ते सीपीआर चौक हा रस्ता सरळ आहे. पण, शिवाजी पूल ते सीपीआर चौक हा मार्ग हा वळणावळणाचा. ब्रह्मपुरी टेकडी, तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ तालीम, क्षीरसागर चौक, डीवायएसपी ऑफीस ते सोन्यामारुती चौक या मार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनांचा ताबा सुटण्याच्या घटना सातत्याने घडतात. या मार्गावर गेल्या दहा वर्षात पाच ते सहा जणांना जीवाला मुकावे लागले आहे.

या रस्त्यावर सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहनांची मोठी गर्दी असते. एसटी, रिक्षा, वडाप वाहनांबरोबर बॉक्साईट घेऊन जाणारी अवजड वाहतूक, ऊस हंगामात राजाराम, आसुर्ले-पोर्ले, वारणा, कुंभी या साखर कारखान्यांची ऊस वाहतूकही याच मार्गावरुन जाते. जिल्ह्यातील जोतिबा, पन्हाळा आणि पैजारवाडीकडे जाणारे भाविक, पर्यटकांच्या वाहनांचा लोंढा सुट्टीच्या दिवशी मोठा असतो.

गजबलेल्या या रस्त्यांवर ब्रह्मपुरी टेकडी ते सोन्यामारुती चौकापर्यंत वीसहून अधिक गल्लीबोळ आहेत गल्लीतून येणारी वाहने थेट रस्त्यांवर येत असल्याने वाहतुकीचा मोठा धोका आहे. कोल्हापुरातील सर्वात जुनी लोकवस्ती याच भागात असल्याने पायी ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. क्षीरसागर चौक ते जुना बुधवार पेठ तालीम आणि तोरस्कर चौक ते तालीम हे रस्ते तीव्र उताराचे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताबा सुटण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. सोन्यामारुती चौक, डीवायएसपी ऑफीस, भगतसिंग चौक, जुना बुधवार पेठ तालमीजवळ रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. याच रस्त्याचा वापर म्हशी नदीकडे नेण्यासाठी केला जातो. त्यामुळे दररोज सकाळी सात ते आठ या वेळेत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते.

पर्यायांचा विचार हवा

कोकणातून कोल्हापूरात येणारे प्रवेशव्दार सुरक्षित असावे यासाठी या परिरसरात पर्यायी मार्ग करण्याची गरज आहे. शिवाजी पुलावरुन ब्रह्मपुरी टेकडीवरून शहरात येण्याचा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग ब्रह्मपुरी पिकनिक पाँईट, गायकवाड वाडा, जामदार क्लब हा आहे. रस्ता गंगावेशीपर्यंत सरळ असल्याने जुना बुधवार पेठ रस्त्यापेक्षा हा मार्ग कमी धोकादायक आहे. या परिसरात अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक हा रस्ता एकमार्गी करा म्हणून आंदोलने करतात. प्रशासन आश्वासन देते. पण नंतर कोणतीही कार्यवाही होत नाही हे वास्तव आहे.

भरधाव वाहनांचा ताबा सुटून २००५ मध्ये झालेल्या अपघातात माझ्या हाताची पाचही बोटे तुटली. गेल्या दहा वर्षात परिसरातील चार ते पाच जणांना जीव गमवावा लागला. पण प्रशासनाने पर्यायी मार्ग, स्पीड ब्रेकर यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हा रस्ता एकमार्गी करावा यासाठी निवेदन, रस्ता रोको आंदोलनाव्दारे मागणी करूनही सरकारने लक्ष दिलेले नाही. ट्रान्सपोर्टधारक, बॉक्साईट वाहनधारक आणि साखर कारखानदारांपुढे सरकार नांगी टाकत असल्याचे चित्र पहायला मिळते.

- संजय काटकर, तोरस्कर चौक

हा रस्ता अतिशय अरुंद असून वाहतूक धीम्या गतीने होण्यासाठी स्पीड ब्रेकरची गरज आहे. क्षीरसागर चौक ते तोरस्कर चौक रस्ता तिव्र उताराचा आहे. त्यावरही उपाय हवेत. शिवाजी पूल ते सिद्धार्थनगर या पर्यायी रस्त्याचा एकमार्गी वापर व्हावा. शिवाजी पूल ते सोन्यामारुती चौक उड्डाणपूल झाल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. वाहचालकांना सूचना देण्यासाठी तातडीने फलक उभारण्याची गरज आहे.

- प्रा. दिनेश डांगे, जुना बुधवार पेठ

पर्यायी मार्गावर अतिक्रमणे

खानविलकर पेट्रोल पंप ते ब्रह्मपुरी चर्चच्या पाठीमागून पर्यायी रस्ता महानगरपालिकेच्या नियोजनात आहे. या मार्गात काही अतिक्रमणे झाली असून सिद्धार्थनगर ओढ्याजवळ मोठा पूल बांधावा लागणार आहे. त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. राज्य सरकारकडून निधी मिळाल्यास हा पर्यायी रस्ता होऊ शकतो. पण लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी हे काम रेंगाळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातेवाईकांच्या आक्रोशाने सीपीआर सुन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाळा तुझ्यासाठी मी दिवस उगवायच्या आधीच इथं येऊन बसलेय. आता किती वेळ वाट पाहू? असशील तसा येरे, पण ये. एकदा तरी मला आई म्हणून हाक मार की रे...', अशा आर्त आक्रोशाने सीपीआर सुन्न झाले. अपघाताची माहिती मिळताच सीपीआरच्या अपघात विभागासमोर आलेल्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. रात्रीपर्यंत मोबाइलवरून बोललेला पोरगा आता आपली हाक ऐकण्यासाठी या जगात नाही हे मान्य करायला नातेवाईकांचे मन धजत नव्हते. नातेवाईकांच्या आक्रोशाने सीपीआरमधील डॉक्टर आणि बंदोबस्तावरील पोलिसांनाही हुंदके आवरता आले नाहीत.

पन्हाळ्यावरून शिवज्योत घेऊन सांगलीला जाताना वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ट्रकला नागाव फाट्यानजीक अपघात झाला. सोमवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी यातील सर्व जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. या गंभीर अपघातात पाच विद्यार्थी ठार झाले, तर ३० जण जखमी झाले. रस्त्याच्या एका बाजूला थांबलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घातला. अपघातातील मृतांना सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर सीपीआरमधील डॉक्टर आणि पोलिस चौकीतील पोलिसही गहिवरले. पहाटे पाचच्या सुमारास आठ रुग्णवाहिकांमधून मृत आणि जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्याचे काम पोलिस चौकीतील कॉन्स्टेबल संदीप कापसे आणि बी. डी. कांबळे यांच्याकडे आले. त्यांनी मृतांच्या खिशातील मोबाइल आणि जखमी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेवाईकांना कळवण्यास सुरुवात केली.

मृतांच्या नातेवाईकांची दिवसाची सुरुवातच या भीषण घटनेच्या माहितीने झाली. प्रणीत त्रिलोटकर या विद्यार्थ्याच्या चुलत्यांना फोन केला, तेव्हा ते मुंबईत लोकलमध्ये होते. आपल्या पुतण्याचा अपघात झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. पुढे काय बोलायचे हेच त्यांना सुचले नाही, त्यामुळे त्यांनी शेजारी बसलेल्या मित्राकडे मोबाइल दिला. शाहूवाडी तालुक्यातील विरळे येथील सुमित कुलकर्णी याच्या वडिलांना पोलिसांनी कळवताच तासाभरात ते सीपीआरमध्ये दाखल झाले. यावेळी सुमितच्या आईने अपघात विभागासमोर हंबरडा फोडला. 'सुमित बाळा येरे...मी तुला भेटायला आले. आता किती वेळ तुझी वाट बघू. असशील तसा ये, पण येरे आता. मला एकदा तरी आई म्हणून हाक मार,' असा आक्रोश पाहून सीपीआरही सुन्न झाले. नातेवाईकांचा आक्रोश दुपारपर्यंत सुरूच होता.

सुमितने आईचे ऐकले नाही

रविवारी रात्री सुमितने घरी फोन केला होता. यावेळी त्याने ज्योत आणण्यासाठी पन्हाळ्याला जाणार असल्याचे आईला सांगितले. 'जाऊ नको', असे आईने सांगितले होते, मात्र आईने सांगितलेले त्याने ऐकले नाही. हट्ट करून सुमित ज्योत आणण्यासाठी मित्रांसोबत गेला, मात्र परत येऊ शकला नाही. तो हट्टी नव्हता, पण रविवारी रात्री त्याने हट्ट केला आणि तो हट्ट शेवटचाच ठरला असे सुमितचे वडील हुंदके आवरत सांगत होते.

सुशांतला नोकरीची ऑफर

अंजनी (ता. तासगाव, सांगली) येथील सुशांत विजय पाटील हा हुशार विद्यार्थी होता. शेवटच्या वर्गात शिक्षण घेताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याची पुण्यातील तीन कंपन्यांनी निवड केली होती. कॉलेज संपण्यापूर्वीच मुलाला नोकरी मिळाली याचा आनंद घरातही होता. सुशांतची बहीण बीएससी करते, तर लहान भाऊ ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात उमद्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच पालकांना धक्का बसला. आपघाताने अंजनीचे पाटील कुटुंबीय खचले आहे.

घटनास्थळी विदारक दृष्य

पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या अपघातात पाच विद्यार्थ्यांच्या अंगावरून आयशर ट्रक गेला होता. ट्रक पलटी झाल्याने त्याच्या काचा फुटल्या. आतील सर्व साहित्य बाहेर पडले होते. मुलांचे बुट आणि चपलांचा खच लागला होता. ज्योतीसाठी लागणारे तेल, कापसाच्या वाती, कापूर, फुटलेले मोबाइल, केळी, अष्टगंध अपघातस्थळी पडले होते. ट्रकच्या धडकेत महामार्गाचे बॅरिकेटिंगही तुटले आहे. केतन खोचे, सुमित कुलकर्णी, अरुण अंबादास, सुशांत पाटील आणि प्रवीण त्रिलोटकर हे पाच विद्यार्थी ट्रकसमोर होते. यातील एका विद्यार्थ्याकडे ज्योत होती. दोघे ज्योतीमध्ये तेल घालत होते, तर दोघे दुचाकी घेऊन थांबले होते. अपघातात दोन्ही दुचाकी ट्रकखाली सापडल्या होत्या.

घटनाक्रम

- रविवारी रात्री ९.३०; सांगलीतून विद्यार्थी बाहेर पडले

पहाटे २ वा.: पन्हाळ्यातून ज्योत घेऊन निघाले

४.३० : नागाव फाट्यानजिक विद्यार्थी थांबले

४.३० : पाठीमागून आलेल्या ट्रकने आयशरला धडक दिली

४.५०: रुग्णवाहिका आणि पोलिस दाखल

५ वा. : जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले

५.२०: पोलिस अधिकारी सीपीआरमध्ये पोहोचले

६ वा.: पाच ठार झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर

९ वा. : पालकमंत्र्यांकडून सीपीआरमध्ये जखमींची विचारपूस

१२.१० वा. : धडक देणारा ट्रकचालक ताब्यात

ज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी आम्ही रस्त्याकडेला थांबलो होतो. आमचा ट्रकही पाठीमागेच थांबला. काही क्षणात पाठीमागून आलेल्या वाहनाने आमच्या ट्रकला धडक दिली. समोरचे विद्यार्थी ट्रकखाली सापडले, तर ट्रक उलटल्याने आतील विद्यार्थीही जखमी झाले. काही कळण्याच्या आतच हा सारा प्रकार घडला.

तुषार वाघमारे, प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी

दरवर्षी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी ज्योत घेऊन जाण्यासाठी पन्हाळ्यावर येतात. यापूर्वी कधीच असा प्रकार घडला नाही. शिस्त आणि शांततेत ज्योत घेऊन जाण्याची कॉलेजची परंपरा आहे. अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्हालाही याचा मोठा धक्का बसला आहे. जखमींना योग्य उपचार मिळावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रा. डॉ. गजानन पारिशवाड, संचालक, वालचंद कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेंच्या सभेवर बंदी घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे शुक्रवारी (ता. २३) शिवप्रतिष्ठानच्यावतीने संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन केले आहे. कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत असलेल्या भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली. मागण्यांचे निवेदन पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा येथे व त्यानंतर राज्यात झालेल्या दंगलीला शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भिडे यांची बांबवडे येथे सभा झाल्यास पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने सभेस परवानगी देऊ नये. निवेदनावर शहराध्यक्ष संजय गुदगे, राजन पिडाळकर, भगवान राजपाल, बाळासाहेब कांबळे, सचिन आडसुळे, शैलेंद्र झेंडे, प्रशांत वाघमारे आदींच्या सह्या आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केतनच्या आईला अश्रू अनावर

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

'पाच तास झाले दवाखान्याच्या पायरीवर बसून..पण माझ्या लेकराला काय मला बघायला देईनात. आरं माझ्या शिवाला मला बघू द्या की रं...त्याचा पाय मोडू दे...हात मोडू दे..आंधळंपांगळं झालं तरी मी सांभाळीन..पण देवानं त्याला मारू नये...'काळजात खोलवर घुसणाऱ्या केतन खोचे या दुर्दैवी मुलाच्या आईच्या या आक्रोशाने सीपीआर रुग्णालयाच्या आवारातील प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत होता. अपघातात जागीच ठार झालेल्या केतनची आई माधवी आणि पोलिस कर्मचारी असलेले वडील प्रदीप, पाठची भावंड सीपीआरमधील शवविच्छेदन विभागासमोरच्या एका झाडाच्या कठड्यावर सुन्नपणे एकमेकांना मिठी मारून बसले होते. कुणी कुणाचं सांत्वन करायचं...तरीही एकमेकांचे डोळे पुसन या कोलमडलेल्या कुटुंबातील २१ वर्षाचा तरणाबांड केतन कायमचा निघून गेल्याचे सत्य स्वीकारणं काही त्यांना जमत नव्हतं.

शिवजयंतीसाठी पन्हाळा येथे ज्योत आणण्यासाठी गेलेला वालचंद कॉलेजचा केतन खोचे अपघातात जागीच ठार झाला. सांगली जिल्ह्यातील अंजनी गावचा पण शिक्षणासाठी सांगलीत राहणाऱ्या केतनवर काळाने घाला घातला अन् हातातोंडाला आलेला मुलगा नियतीने हिसकावून घेतला. शिवजयंतीदिवशी खोचेंच्या घरातील मोठा मुलगा गेल्यामुळे 'माझा शिवाजी मला हवाय रं' म्हणत त्याच्या आईने हंबरडा फोडला.

तीन दिवस सुटी असूनही पोरगं कॉलेजात शिवजयंती आहे म्हणून सुट्टीला घरी नाही आलं...इंजिनीअरच्या अभ्यासाचं शेवटचं वर्ष संपणार म्हणून खूप खुश होता. रविवारी दुपारी फोनवर, शिवजयंतीच्या कामात आहे एवढच म्हणाला. पहाटे फोन वाजला अन् त्याच्या अपघाताची बातमी ऐकल्यावर काळजात धस्सं झालं. गळ्यात दाटून आलेला हुंदका आवरत केतनच्या एकेक आठवणी सांगताना आई माधवींच्या डोळयातील धार एक क्षणही थांबत नाहीय. केतनचा कॉलेजमध्ये शिकणारा भाऊ आणि धाकटी बहीण आईला धीर देत होते. माझ्या दाद्याला काय झालं गं...? असं म्हणत केतनच्या बहिणीने आईला मारलेली मिठी काळीज पिळवटून टाकत होती.

हतबल वडील आणि भाबडी आई

केतनचे वडील प्रदीप खोचे सांगली येथे सहाय्यक फौजदार आहेत. त्यांना पोलिसांनी केतनचा मृत्यू झाल्याचे सत्य सांगितले तेव्हा ते धक्क्याने कोसळले. मात्र त्यांनी स्वत:ला सावरले व ते पत्नी माधवीजवळ आले. माधवींजवळ बसल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली व हंबरडा फोडला. माधवी यांना केतन जखमी आहे असेच वाटल्याने त्यांनी पती प्रदीप यांना सांगितले, आपण केतनला उपचारासाठी सांगलीला नेऊया...ही विचार करण्याची वेळ नाही तर लगेच निर्णय घ्या...पत्नीचा हा आशावाद पाहून प्रदीप यांना धड रडताही येईना आणि पत्नीला समजावताही येईना. याक्षणी प्रदीप यांच्यातील कठोर पोलिसही बापाच्या काळजाने नियतीपुढे हतबल झाला अन् त्यांच्या साठलेल्या अश्रूंनी बांध फोडलाच.

सुशांतला आल्या होत्या दोन कंपन्यांच्या ऑफर

काही दिवसांपूर्वीच वालचंद कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तासगावच्या सुशांत पाटील याला दोन कंपन्यांकडून नोकरीची ऑफर आली होती. इलेक्ट्रीक डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षातच नोकरीची संधी मिळाल्याने सुशांतसह त्याचं कुटुंबीय आनंदी होते. दोन दिवसांपूर्वीच दोन्हीपैकी कोणत्या कंपनीची ऑफर स्वीकारायची यावर घरी संवादही झाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही आणि अवघा १८ वर्षाचा सुशांत काळाच्या पडद्याआड गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल हबसाठी प्रयत्नशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (केएमए)सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना पाठिंबा न देता कोल्हापूरचे आरोग्य राखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कोल्हापूरचे आरोग्य उत्तम राखण्याबरोबर कोल्हापूर मेडिकल हब होण्यासाठी केएमए प्रयत्शील आहे.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची स्थापना डॉ. जी.जी. वाटवे यांनी १९२४ मध्ये केली. त्यानंतर भारतातील शिखर संघटनेची १९२८ मध्ये स्थापना झाली. केएमएची स्थापना इंडियन मेडिकल असोसिएशनपूर्वी (आयएमए)असली तरी आएमएच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना कार्यरत आहे. संघटनेतील पदाधिकारी म्हणून निवड होताना कोणतीही निवडणूक होत नाही. संघटनेत संचालकापासून काम करणारे डॉक्टर आपले नेतृत्वगुण दाखवताना विविधपदे भूषवत १४ वर्षांनंतर अध्यक्षपदावर पोचतात. अध्यक्षपद भूषवल्यानंतर डॉक्टर मार्गदर्शकाच्या भूमिकेत केएमएमध्ये कार्यरत राहतात. एक हजारहून अधिक डॉक्टर केएमएचे सदस्य आहेत. त्यामध्ये प्रॅक्टिसर्नस, स्पेशॅलिस्ट, सुपर स्पेशॅलिस्ट यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शाखांचे डॉक्टर केएमएचे सदस्य आहेत.

१९५० मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी एस. एम. बाम यांनी जयप्रभा स्टुडिओजवळ केएमला जागा दिली. याच जागेवर केएमएची इमारत उभी असून वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास, संशोधन, चर्चासत्रे, सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. १९५० पासून संस्थेच्या इमारतीत बाल आरोग्य केंद्र चालवले जाते. डॉ. के. पी. प्रभू, डॉ. व्ही. एच. वझे, डॉ. पी. बी. भद्रे यांनी इमारतीचा विस्तार केला. तसेच डॉ. जी. एम. जाधव इमारतीत अत्याधुनिक सुविधा आणण्यासाठी प्रयत्न केले. डॉ. अतुल जोगळेकर एसी सभागृह बांधणीस सहकार्य करत आहेत. या सभागृहाचा वापर व्यावसायिक कारणासाठी न करता फक्त वैद्यकीय क्षेत्रातील चर्चा, परिसंवाद आणि डॉक्टरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला जातो. दर महिन्याला क्विनिक मिटिंगचे आयोजन केले जाते. त्यामध्ये देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होतात. केएमएचा खर्च सर्व डॉक्टरमंडळी स्वत:च्या खिशातून करतात.

केएमएच्या इमारतीत गेले ५९ वर्षे बाल आरोग्य केंद्र चालवले जाते. इथे बालकांच्यावर मोफत उपचार केले जातात. राजेंद्रनगर येथे ज्ञानदीप विद्या मंदिर प्राथिमक शाळा केएमएने दत्तक घेतली आहे. तसेच रक्तदान, सरकारच्या सर्व आरोग्य योजनांना सहकार्य करताना आरोग्यविषयक जनजागृती केली जाते. जागृती केंद्राव्दारे एचआयव्ही रुग्णांना समुपदेशन केले जाते. केएमए फ्लॅश या मासिकाचे दर महिन्याला प्रकाशन केले जाते. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील अद्यायावत ज्ञान व तज्ज्ञ डॉक्टर लेखकांचे लेखांचे प्रकाशन केले जाते. केएमएच्या उत्कृष्ट कामाबद्दल डॉ. एच.एस. चंद्रा बोस ट्रॉफी व आणी मेंढा ट्रॉफीने गौरवण्यात आले आहे.

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची संधी

इंडियन मेडिकल असोसिएशच्या अध्यक्षपदाचा मान कोल्हापूरच्या जी. एम. जाधव यांना मिळाला. १९९४ मध्ये ते अध्यक्ष होते. तत्पुर्वी जाधव यांनी जी. एम. जाधव यांनी १९८१ मध्ये उपाध्यक्षपद भूषवले होते. १९९४ मध्ये डॉ. डी. वाय सुळगांवकर तर २००० मध्ये बी. जी. जाधव ढेकळे यांनी उपाध्यक्षपद भूषवले होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेऊन जेरीटेक क्लिनिक योजना सुरू केली आहे. शहराला भेडसवणाऱ्या बायो मेडिकल वेस्टवर प्रक्रिया करण्याचा निर्णय केएमएने घेतला आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाबरोबर चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात तज्ज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने असून अत्याधुनिक तंत्राचा वापर करत आहेत. कोल्हापूर मेडिकल हब सिटी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत.

डॉ. रवींद्र शिंदे, अध्यक्ष केएमए

केएमए वर्षभर वैद्यकीय क्षेत्रासंबधी तज्ज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्राचे आयोजन करतात. तसेच सामाजिक बांधिलकी जपताना लेक वाचवा अभियान, एचआयव्ही प्रबोधन, रक्तदान शिबिर यांचे आयोजन करते. जे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासतात. त्यांच्या पाठीशी केएमए कधीच राहत नाही. तरुण डॉक्टरांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यावर संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात.

डॉ. संदीप साळोखे, सचिव केएमए

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन केएमए गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी लहान मुले, महिलांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. गरीब रुग्णांना औषधाबरोबर प्रसंगी शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. सर्व सरकारी योजनांचा प्रसार करणे व सरकारी रुग्णालयांना मदत केली जाते. केएमएचे अनेक डॉक्टर सरकारी रुग्णालयात मानद सेवा देतात.

डॉ. पी. एम. चौगुले, संचालक

केएमएने ज्येष्ठ नागरिकांची समस्या लक्षात घेऊन जेरॅटिक ओपीडी सुरू केली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्यावर उपचार केले जाणार आहेत. ही सेवा मोफत दिली जाणार आहे. जे वृद्ध घरी एकटे व असहाय्य आहेत त्यांनी केएमएशी संपर्क साधला तर त्यांना घरी जाऊन औषधे व उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी केएमएच्यावतीने नियोजनाची आखणी केली जात आहे.

डॉ. आनंद कामत, चेअरमन अॅडव्हाजरी बोर्ड

अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन डॉक्टर उपचारासाठी प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून डॉक्टर एकमेकांना सहकार्य करत आहेत. तर महिन्याच्या केएमए फ्लॅश हे मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकातील नवीन तंत्रज्ञात, उपचार पद्धतीचा वापर जिल्ह्यातील डॉक्टरांना व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुण पिढी या उपक्रमात अग्रेसर आहे.

डॉ. अशोक जाधव, उपाध्यक्ष केएमए

वर्षभर सुरू असणाऱ्या वैद्यकीय सेवेबरोबर डॉक्टरांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी केएमए आर्ट सर्कलध्ये संगीत, नृत्य, नाटक, फोटो प्रदर्शन हे कार्यक्रम आयोजित केले जातात. केएमए कट्टा मध्ये प्रत्येक महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी प्रसिद्ध कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजअखेर ५३ केएमए कट्टे यशस्वी झाले आहेत.

डॉ. अमर आडके, केएमए आर्ट सर्कल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ हजार कोटींची एफआरपी जमा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: MarutipatilMT

कोल्हापूर : ऊस उत्पादकांना ठरल्याप्रमाणे एफआरपी देण्यासाठी पुणे साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या राज्यातील उसाची ८,९७५ कोटी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. देशात सर्वाधिक एफआरपी देणारे महाराष्ट्र राज्य असले, तरी उर्वरित १,७१० कोटी एफआरपी रकमेसाठी कारवाई सुरुच ठेवली असल्याने उत्पादकांची एफआरपी रक्कमेची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. शनिवारी साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्यातील अनेक कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एफआरपी देण्यासाठी मूदत वाढवून मागतील असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

गळीत हंगामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम उत्पादकांच्या खात्यावर जमा केली. मात्र त्यानंतर साखर दरात वेळोवेळी झालेल्या घसरणीमुळे एफआरपीची रक्कम थकीत गेली. याविरोधात शेतकरी संघटना व उत्पादकांनी साखर आयुक्त व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांकडे लेखी तक्रारी दिल्या. राज्यातील एकूण सुरू असलेल्या राज्यातील १८३ साखर कारखान्यांपैकी ४७ कारखान्यांनी संपूर्ण एफआरपीची रक्कम उत्पादकांनी दिली होती. याची गंभीर दखल घेत साखर आयुक्त कार्यालयाने राज्यातील १३६ कारखान्यांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटीस दिल्यानंतर अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. तरीही गेल्या आठवड्यात काही कारखान्यांच्या सुनावणी पुणे साखर आयुक्त कार्यालयात तर काहींची प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात झाली. सुनावणीदरम्यान अनेक कारखान्यांनी एफआरपी देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली.

सुनावणीच्या नोटीस देण्यापूर्वी राज्यातील कारखान्यांनी ७६ टक्के एफआरपीची रक्कम दिली होती. नोटिशीनंतर हीच रक्कम ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपी देण्यास सकारात्मकात दाखवल्याने त्यांना मुदतवाढही मिळण्याची शक्यता आहे.

सुनावणीदरम्यान साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी कायद्यानुसार एफआरपीची रक्कम न दिल्यास शुगर कंट्रोल अॅक्टनुसार आरआसीची कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याने पुढील काळात एफआरपी रक्कम जमा करण्यासाठी कारखानदारांची चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

साखर मूल्यांकन वाढवण्याची प्रतीक्षा

नोव्हेंबरपासून साखर दरात घसरण झाल्यानंतर राज्य सहकारी बँकेने तब्बल तीनवेळा साखरेचे मूल्यांकन कमी केले. कमी केलेल्या मूल्यांकनामुळे कारखानदारांना बँकेकडून प्रतिटन १,७८५ रुपये मिळत आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून साखरेच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य बँकेने पुन्हा सुधारित साखरेचे मूल्यांकन जाहीर करावे लागणार आहे. नव्याने मूल्यांकन जाहीर केल्यानंतर कारखानदारांना बँकांकडून जाद रक्कम मिळणार आहे. त्यामुळे सर्वच कारखानदारांचे साखर मूल्यांकनाकडे लक्ष लागले आहे.

दृष्टिक्षेप साखर हंगाम

राज्यातील सुरू कारखाने - १८३

शंभर टक्के एफआरपी देणारे कारखाने - ४७

एकूण एफआरपी - १०,६८५ कोटी

दिलेली एफआरपी - ८,९७५ कोटी

थकीत एफआरपी - १,७१० कोटी

देशात एफआरपी देण्यास महाराष्ट्र आघाडीवर असले, तरी शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी हंगाम सुरू झाल्यापासून पंधरा दिवसाला साखर आयुक्त कार्यालयाकडून आढावा घेतला जात आहे. एफआरपी थकीत असलेल्या कारखान्यांना नोटिसा देऊन सुनावणी घेतली आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत एकूण एफआरपीपैकी ८४ टक्के रक्कम उत्पादकांना मिळाली आहे.

मंगेश तिटकरे, साखर सहसंचालक (पुणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हांडूळ तस्कर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुर्मिळ म्हांडूळ जातीच्या दोन सापांची तस्करी करणाऱ्या तिघांना करवीर पोलिसांनी कुडित्रे (ता. करवीर) येथे सापळा रचून अटक केली. संशयितांकडून दोन कार, एक दुचाकी आणि दोन साप असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिम्मत जयवंत पाटील (वय २७, रा. नेर्ली तामगाव, मूळ गाव खानभाग, सांगली), संजय मारुती जाधव (२९, रा. नावली पैकी धारवाडी, ता. पन्हाळा) आणि पंकज उत्तम कराळे (२६, रा. अरिहंत पार्क, कोल्हापूर) अशी अटकेतीस तिघांची नावे आहेत. सोमवारी (ता. १९) दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापांची तस्करी करणारे तिघे करवीर तालुक्यातील वावरत असल्याची माहिती मिळाली होता. यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर हॉटेल गुडलकसमोर सापळा रचला. दोन कारमधून आलेले तिघे संशयित मांडूळ खरेदीचा व्यवहार ठरवत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारमध्ये एका प्लास्टिक बरणीत अडीच किलो वजनाचे दोन म्हांडूळ होते. पोलिसांनी मांडूळ जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर हिम्मत पाटील याने सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून म्हांडूळ आणल्याची माहिती समोर आली. मांडूळ विक्रीसाठी तो मित्रांच्या मदतीने ग्राहक शोधत होता. एका शाळेत शिपाई म्हणून काम करणारा संजय जाधव याने मांडूळ खरेदी करण्याची तयारी दर्शवली. खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरवण्यासाठी हे तिघे सोमवारी दुपारी कुडीत्रे गावाजवळ पोहोचले होते. या दरम्यान पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली.

पाच लाख रुपये किंमतीच्या दोन कार, एक दुचाकी आणि दहा लाख रुपये किमतीचे दोन मांडूळ असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले मांडूळ पोलिसांनी वन विभागाच्या ताब्यात दिले. या घटनेने जिल्ह्यात सुरू असलेली वन्यजीवांची तस्करी समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा वाढीचा प्रस्ताव फेटाळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकाप्रशासनाकडून ठेवण्यात आलेला घरफाळा वाढीचा प्रस्ताव मंगळवारी(२० फेब्रुवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेतफेटाळला जाण्याची शक्यता आहे. घरफाळा विभागाच्या त्रुटींवर बोट ठेवत या प्रस्तावाला नगरसेवकांकडूनविरोध केला जाणार आहे. तोटा सहन करावा लागला तरी चालेल, पण याबरोबरच अन्य कोणतीही करवाढ करु दिली जाणार नाही, असे सत्ताधारी आघाडीचे मत आहे. तरीही या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेस आघाडी, भाजप आघाडी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक होणार आहे. भाडेतत्वावरील मिळकतींच्या कररचनेबाबत कदाचित पुढील सभेमध्ये स्वतंत्र निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मार्चमध्ये सादर करण्यात येणाऱ्या बजेटसाठी या महिन्यातील सर्वसाधारण सभेत कराचे दर ठरवले जाणे अपेक्षित असते. त्यातील वाढीच्या वा नियमित कराच्या अनुषंगाने किती उत्पन्न जमा होणार हे प्रशासन मांडत असते. त्यानुसार घरफाळा वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने या सभेसमोर आणला आहे. त्यामध्ये भाडेकरारावरील कर आकारणी बंद करुन इतर मिळकतींप्रमाणे आकारणी करण्याचा पण इतरांपेक्षा दुपटीचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर रहिवास व व्यावसायिक वापराच्या मिळकतींवर दहा ते तीस टक्क्यांपर्यंतची वाढ सुचवली आहे. मुळात भांडवली मूल्यावर आधारित कररचना स्वीकारली जात असताना त्यातील चटई क्षेत्र, बांधीव क्षेत्र हे वादाचे मुद्दे आहेत. तसेच त्रुटी दूर न करता या विभागाकडून केवळ वाढीचे प्रस्ताव दिले जात असल्याने नगरसेवकांकडून या प्रस्तावाला विरोध केला जाणार आहे. हाच मुद्दा पकडत प्रशासनाला धारेवर धरले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या त्रुटी समोर आणल्या जातील. त्यापूर्वी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अन्य कोणत्याही करवाढीला मंजुरी दिली जाणार नाही, असे दिसते. शिवाय केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाची दोन कोटी २५ लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सभेसमोर आहे. त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात लोकशाही नसून हुकूमशाही राजवट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात लोकशाहीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले होत असून काही विशिष्ट यंत्रणेकडून संविधान बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. देश विघातक मार्गाकडे नेण्याचे नियोजनपू्र्वक काम सुरू आहे, विचारांचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे सध्या देशात लोकशाही नसून हुकूमशाही आहे,अशी टीका राजस्थानच्या माजी आयएएस अधिकारी अरुणा रॉय यांनी केली. श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्त स्मृती जागर सभेत राजर्षी शाहू स्मारक भवनात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते.

'लोकशाही व्यवस्थेतील समकालीन प्रवाह' या विषयावर बोलताना रॉय म्हणाल्या, विचारांचा सामना विचारांनी करता आला नाही, म्हणूनच ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आल्या. केंद्र आणि राज्य सरकार लोकशाहीचे राज्य असल्याचे सांगते. मात्र प्रत्यक्षात विधायक समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्या विचारवंत, कार्यकर्त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. शब्दांचा विरोध हा शस्त्राने केला जात आहे. त्यातूनच देशभर हत्येचे सत्र सुरू आहे. विचारवंताची हत्या केलेले मारेकरी तीन वर्षे उलटूनही अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. सरकारही या प्रकरणी बघ्याची भूमिका घेत आहे'

त्या पुढे म्हणाल्या, 'लव्ह जिव्हादच्या नावाखाली काही विशिष्ट यंत्रणा खून करीत आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. चांगल्या विचारांना विरोध करणाऱ्या पर्यायी संघटना उभ्या राहत आहेत. शाळा खासगी कंपन्याच्या हाती सोपविल्या जात आहेत. सर्वच क्षेत्रात खासगीकरण आणले जात आहे. कॉरिडॉरच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत, ही लोकशाहीची गळचेपी आहे. लोकशाही आणि विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेत भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी संविधानाची नितांत गरज आहे. संविधानाची गरज नसल्याची भूमिका घेतली जात आहे. भाषिक आणि जातीय वाद निर्माण करुन लोकशाही धोक्यात आणली जात आहे.'

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, 'दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. पानसरे यांची विचारांचा पुनर्विरोध, धोरणांचा पुनर्विचार, संघटनेचा पुनर्विचार या त्रिसूत्रीची अंमलबजावणी अपेक्षित आहे.' मेघा पानसरे म्हणाल्या, 'लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या विचारवंताच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरले आहे.'

रॉय यांच्या हस्ते यावेळी ज्योती कांबळे लिखित 'कॉ. पानसरे जीवन आणि कार्य' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बी. एस. पाटील, ज्योती कांबळे, प्रा. विलास रणसुभे आदी उपस्थित होते. उमेश सूर्यंवंशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल दुरुस्तीची निविदा पाच महिने नाहीच

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या सिग्नल यंत्रणेची देखभाल करण्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहे. सप्टेंबर २०१७ पासून महापालिकेने नव्याने निविदा काढली नसल्याने अनेक ठिकाणी सिग्नल बंद आहेत. शिवाय सिग्नल सिंक्रोनायझेशनचे कामही रखडले आहे. मार्च २०१७ नंतर महापालिकेने महत्त्वाच्या चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंगचे पट्टेही मारलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक आणि पोलिसांमधील वादाचे प्रसंग वाढले आहेत.

शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी काही उपाययोजना सुचवल्या. दिवसभरातील गर्दीची ठिकाणे आणि वेळांचा अभ्यास करून सिग्नल सिंक्रोनायझेशन करण्याचा सल्ला शर्मा यांच्या समितीने दिला. शहरातील सर्व सिग्लन नियमित सुरू ठेवणे, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंग पट्टे, सूचना फलक, दिशादर्शक फलक लावणे, आवश्यकतेनुसार वन वे, स्पीड ब्रेकर, नो पार्किंग झोन तयार करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार वाहतूक पोलिसांनी नवीन सिग्नलचे चौक निश्चित करून महापालिकेशी पत्रव्यवहार केला.

महापालिका प्रशासनाने मार्च २०१७ मध्ये शहरातील सर्व चौकांमधील झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंगचे पट्टे मारले. सहा महिन्यांत हे पट्टे गायब झाले. पुन्हा पट्टे मारावेत यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाला चारवेळा स्मरणपत्र पाठवले. मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पार्किंगचे पट्टे मारलेले नसल्याने वाहनधारक रस्त्याकडेला रिकामी जागा मिळेल तिथे, वाहने पार्क करतात. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पार्किंगचे पट्टे नसल्याने पोलिस आणि वाहनधारकांमध्ये वाद होतात. रोजच वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने पोलिसांसह वाहनधारकही वैतागले आहेत.

सिग्नल देखभालीची मुदत संपली

शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे महापालिकेचे गंभीर दुर्लक्ष झाले आहे. ट्रॅफिक सिग्लनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या ठेक्याची मुदत सप्टेंबर २०१७ मध्ये संपली. मुदत संपण्यापूर्वीच नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया महापालिकेने राबवणे गरजेचे होते. मात्र मुदत संपून पाच महिने उलटले तरीही पूर्वीच्या ठेकेदाराला तात्पुरते काम देऊन चालढकल सुरू आहे. तात्पुरते काम असल्याने ठेकेदाराने गर्दीच्या चौकातील सिग्नलची दुरुस्तीच केलेली नाही. नागरिकांकडून कर स्वरुपात जमा होणाऱ्या रक्कमेतील किमान २ टक्के निधी महापालिकेने वाहतूक शिस्तीसाठी वापरावी, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

बंद सिग्नल

- माळकर चौक

- गोखल कॉलेज चौक

- सावित्रीबाई फुले रुग्णालय चौक

- शहाजी लॉ कॉलेज चौक

- सायबर चौक

सहा महिन्यांपासून बंद सिग्नल

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माळकर तिकटीचा सिग्नल ऑगस्ट २०१७ मध्ये बंद पडला. गंगावेशमार्गे पुढे जाणारी वाहतूक या मार्गावरून सुरू असते. अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांनाही माळकर चौकातून पुढे जावे लागते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आणि सर्वाधिक वर्दळीच्या चौकातील सिग्लन यंत्रणा सुरू राहावी, यासाठी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र सिग्नल सुरू झालेला नाही. सिग्नल दुरुस्तीसाठी महापालिकेकडून चालढकल सुरू असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे.

बॅरिकेट्स काढणाऱ्यांवर गुन्हे

ट्रॅफिक सिग्नलवर रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवावी असा नियम आहे. प्रत्यक्षात, डाव्या बाजुलाही वाहनधारक थांबतात. त्यामुळे डाव्या बाजुने जाणारी वाहने अडतात. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी पोलिसांनी शहरातील मोठ्या चौकांमध्ये डावी बाजू रिकामी राहण्यासाठी बॅरिकेटिंग केले आहे. काही ठिकाणी रात्रीच्या अंधारात बॅरिकेटिंग काढण्याचे प्रकार घडले. रंकाळा चौपाटी, टेंबलाईनाका उड्डाणपूल आणि असेंब्ली रोड येथील बॅरिकेटिंग काढणारे संशयित सीसीटीव्हीत स्पष्ट दिसले आहेत. बॅरिकेटिंग काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रॅफिक सिग्नलची दुरुस्ती व्हावी आणि पांढरे पट्टे मारावेत, यासाठी महापालिकेला अनेकदा पत्र पाठवले आहे. किमान माळकर तिकटी चौकातील सिग्नल तातडीने सुरू करावा अशी विनंती केली. मात्र, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. पांढरे पट्टे नसल्याने वाहनधारक पोलिसांशी हुज्जत घालतात.

- अशोक धुमाळ, वाहतूक पोलिस निरीक्षक

सिग्नल दुरुस्तीसाठी जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे. लवकरच बंद सिग्नल पुन्हा सुरू होतील. शिवाय रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यासाठी १३ लाखांची तरतूद केली आहे. आठवड्याभरात या कामांना सुरुवात होईल. याबाबत वाहतूक पोलिसांसोबत चर्चा केली आहे.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महानगरपालिका

- झेब्रा क्रॉसिंग अन् पार्किंग पट्टे मारण्यासही चालढकल

- सिग्नल सिंक्रोनायझेशनचे कामही रखडले

- पोलिस-वाहनधारकांचे वाढले वाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत राष्ट्रवादीचा नवा नेता कोण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्य सुत्रे हलविणारे प्रा. जयंत पाटील यांनी महापालिकेच्या कामकाजातून काहीशी अलिप्त राहण्याची घेतलेली भूमिका आणि दोन युवा माजी नगरसेवकांतील कुरघोडीचे राजकारण यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सैरभैर झाल्यासारखी स्थिती आहे. उपमहापौर सुनील पाटील यांनी यापूर्वीच गटनेतेपदाची जबाबदारी इतरांकडे सोपवावी असे नेत्यांना कळविले आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या धक्क्यानंतर पक्षाची अवस्था भरकटल्यासारखी झाली आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तारुढ आहे. काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने पक्ष सत्तेत वाटेकरी आहे. गेल्या सव्वादोन वर्षात राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसीना फरास यांनी महापौरपद भूषविले. नगरसेविका शमा मुल्ला उपमहापौर झाल्या. सध्या सुनील पाटील उपमहापौरपदी आहेत. नगरसेविका वहिदा सुभेदार यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी संधी मिळाली. स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे फुटीर नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी अनुक्रमे शिक्षण समिती सभापती आणि शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापतिपदी काम केले आहे.

स्थायीतील पराभवाचा झटका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. दोन नगरसेवकांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. या बंडखोरीला पक्षाचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची फूस असल्याचा संशय निर्माण झाल्यामुळे स्वत: प्रा. पाटील यांनी महापालिकेच्या कामकाजात आणि सर्वसाधारण सभेत सहभाग घेणार नाही असे जाहीरपणे सांगितले. प्रा. पाटील हे पक्षाचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत महापालिकेतील पदाधिकारी निवडणूक असो वा अन्य कोणतेही धोरण, त्यामध्ये पक्षाकडून प्रा. पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

स्थायी समितीच्या घडामोडी आणि नंतरचे संशयाचे वातावरण यामुळे पाटील यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. तर पालिकेच्या राजकारणात पडद्याआड सक्रिय असणारे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर आणि आदिल फरास यांच्यात कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. स्थायी समितीच्या घडामोडीतील सूत्रधारावर कारवाई करावी यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. तर काही नगरसेवक हे पक्षाच्या धोरणाशी देणे-घेणे नसल्यासारखे वागतात. पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. एकूण पंधरा नगरसेवकांपैकी दहाजण पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करतात. काही सदस्यांनी महापौरदावर दावा करत आतापर्यंत कोणतेच पद स्वीकारले नाही. दुसरीकडे नेत्यांनी मर्जीतील नगरसेवकांना पदे दिल्याची ओरडही काही सदस्य खासगीत करतात. परिणामी राष्ट्रवादीत सध्या संशयाचे वातावरण आहे. कुरघोडी राजकारण, पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांचा महापालिकेच्या राजकारणातील नवखेपणा यातून गोंधळाचे वातावरण आहे.

०००

(मूळ कॉपी)

महापालिकेचा लोगो वापरावा..

सत्तेत असूनही राष्ट्रवादी सैरभैर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभव, महापालिकेत राष्ट्रवादीचे प्रमुख कोण भूमिका वठविणारे प्रा. जयंत पाटील यांनी महापालिका कामकाजातून काढून घेतलेला सहभाग, आणि माजी नगरसेवक असलेल्या दोन युवा नेत्यामधील कुरघोडीचे राजकारण यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर झाल्यासारखी स्थिती आहे. उपमहापौर सुनील पाटील यांनी यापूर्वीच आपल्याकडील गटनेत्याच्या जबाबदारी दुसऱ्या नगरसेवकांकडे सोपवावे असे नेत्यांना कळविले आहे. स्थायीच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था भरकटल्यासारखी झाली आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने सत्तेत वाटेकरी आहे. गेल्या सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसीना फरास यांनी महापौरपद भूषविले. नगरसेविका शमा मुल्ला उपमहापौर झाल्या. सध्या सुनील पाटील उपमहापौरपदी आहेत. नगरसेविका वहिदा सुभेदार यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी संधी मिळाली. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे फुटीर नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी अनुक्रमे शिक्षण समिती सभापती व शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापतिपदी काम केले आहे.

स्थायीतील निवडणुकीचा झटका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. दोन नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली. त्या बंडखोरीला पक्षाचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची फूस असल्याचे संशय निर्माण झाल्यामुळे स्वत प्रा. पाटील यांनीच महापालिकेच्या कामकाजात व सर्वसाधारण सभेत सहभाग घेणार नाही असे जाहीरपणे सांगितले. प्रा. पाटील हे आमदार हसन मुश्रीफ यांना जवळचे म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत महापालिकेतील पदाधिकारी निवडणूक असो की अन्य कोणतेही धोरण त्यामध्ये राष्ट्रवादीकडून प्रा. पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

स्थायीतील घडामोडी आणि नंतरचे संशयाचे वातावरण यामुळे पाटील यांनी काही काळ अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.तर महापालिकेच्या राजकारणात पडद्याआड सक्रिय असणारे माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर व आदिल फरास यांच्यामध्ये कुरघोडीचे राजकारण आहे. स्थायीतील सूत्रधारावर कारवाई करावी यासाठी पक्षांतर्गत दबाव निर्माण होत आहे. पक्षाचे काही नगरसेवक हे पक्षीय धोरणाशी देणे घेणे नसल्यासारखे वागतात. पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. शिवाय पंधरा नगरसेवकांत दहा सदस्य पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करतात. काही सदस्यांनी महापौरदावर दावा करत आतापर्यंत कुठलेच पद स्वीकारले नाही. दुसरीकडे आतापर्यंत नेत्यांनी मर्जीतील नगरसेवकांना पदे दिल्याची ओरडही काही सदस्य खासगीत करतात. परिणामी राष्ट्रवादीत सध्या संशयाचे वातावरण आहे. कुरघोडीचे राजकारण, पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांचा महापालिकेच्या राजकारणातील नवखेपणा अशाने पक्षाच्या नगरसेवकांत गोंधळाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० विद्यार्थ्यांना डिस्चार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे-बेंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. २३ जखमींपैकी २० जखमींना डिस्चार्ज देण्यात आला. गंभीर जखमींमधील चिन्मय वडगावकर याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर इतर दोघांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आयशर ट्रकला धडक देणाऱ्या ट्रक चालकाला कोर्टात हजर केले असता, त्याला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पन्हाळ्यावरून शिवज्योज घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ट्रकला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली होती. या भीषण अपघातात सहा विद्यार्थी ठार झाले, तर २५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. सर्व जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. २३ जखमींपैकी २० जखमींना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अद्याप सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी चिन्मय वडगावकर याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वडगावकर याचे नातेवाईक आणि मित्र त्याच्यासोबत सीपीआरमध्ये थांबले आहेत. सिद्धार्थ प्रवीण कांबळे (१७, रा. लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि सांगे शेरपा (१७, रा. अरुणाचल प्रदेश) या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. शेरपा याचे नातेवाईक मंगळवारी संध्याकाळपर्यंत कोल्हापुरात पोहोचले नव्हते, त्यामुळे सीपीआरमधील परिचारिका आणि वालचंद कॉलेजचे विद्यार्थी शेरपाची देखभाल करीत आहेत. अपघातात ठार झालेला मुंबईतील प्रणीत शांताराम त्रिलोटकर आणि बुलढाण्याचा अरुण अंबादास बोंडे यांचे मृतदेह सोमवारी रात्री नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.

ट्रक दिसलाच नाही

वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ट्रकला पाठीमागून धडक देणारा ट्रक पोलिसांनी सोमवारी दुपारीच गोकुळ शिरगाव येथून ताब्यात घेतले आहे. अटकेतील ट्रकचालक सखाराम वामन हनवाड (वय ३२, रा. लातूर) याला पोलिसांनी मंगळवारी कोर्टात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. आयशर ट्रक रस्त्याकडेला थांबल्यानंतर चालकाने पार्किंग लाईट लावल्या होत्या, तरीही ट्रक चालकाने पाठीमागून धडक दिली. याबाबत पोलिसांनी ट्रक चालकाकडे विचारणा केली, मात्र समोरचा ट्रक दिसलाच नाही, त्यामुळे अपघात झाला असे त्याने पोलिसांकडे सांगितले. चालकाला डुलकी आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन न केल्याचा अहवाल आल्याचे करवीरचे उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाढीविरोधात शिवसेनेची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे आधीच महागाईच्या खाईत सर्वसामान्य जनता लोटली आहे. त्यांच्यावर लादण्यात येणारा अन्यायकारक घरफाळा दरवाढीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्या, अन्यथा शिवसेनेशी गाठ असेल,असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. महानगरपालिकेच्या प्रस्तावित घरफाळा दरवाढीविरोधात शिवसेनेच्यावतीने सभेपूर्वी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली.

यावेळी 'घरफाळा दरवाढीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो', 'अन्यायकारक घरफाळा दरवाढ प्रस्ताव रद्द झालाच पाहिजे', 'महापालिका प्रशासन हाय हाय' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'शहरात सरासरी दीड लाखांवर मिळकती आहेत. यातील व्यापारी मिळकतींची संख्या २५ हजारांवर असून मिळकतीपासून महापालिकेला वार्षिक ४२ कोटी रुपये घरफाळ्याचे उत्पन्न मिळते. वाढीव घरफाळ्यामुळे मोठ्या कंपन्या कोल्हापुरात येत नाहीत आणि नव्याने केलेल्या बांधकामात व्यापारी गाळ्यांची विक्रीही होत नाही. भाडेतत्वावरील घरफाळ्याची आकारणी करताना अन्याय करण्यात आला आहे. त्यांच्या करामध्ये कपात सुचवून रहिवाशांवर करवाढ लादण्याच्या प्रस्ताव ठेवला आहे. सर्वसामान्य जनतेकडून नियमबाह्य पद्धतीने हुकुमशाहीने घरफाळा वसूल करणे आणि घरफाळा दरवाढ करणे अन्यायकारक आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या होणाऱ्या लुटीस शिवसेनेने नेहमी विरोध केला असून यादरवाढीस महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा देऊ नये. प्रशासनाने हुकुमशाही पद्धतीने दरवाढ केल्यास तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा दिला.

शिवसेना गटनेता नियाज खान, नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले, नगरसेवक अभिजित चव्हाण, नगरसेवक अशोक जाधव, महेश उत्तुरे आदी शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्याकडे घरफाळा दरवाढ प्रस्ताव मागे घेण्याबाबत निवेदन सादर केले.

या मोर्चामध्ये शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक मंगल साळोखे, पूजा भोर, गीता भंडारी, गौरी माळतकर, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे, सोनाली पेडणेकर, पूजा कामते, शाहीन काझी, मीना पोतदार, दीपक गौड, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, अनिल पाटील, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, रमेश खाडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रीडा संकुलाची कामे वेगाने करणार-पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे लवकरच पुर्ण करुन क्रीडा संकुल पूर्णक्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल', असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विभागीय क्रीडा संकुलाच्या टेनिस संकुलातील महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोशियशन आणि रेसिडेन्सी क्लब आयोजित सिनियर इंटरझोन बक्षिस समारंभात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, क्रीडा संकुलातील ॲथलेटिक, जलतरण तलावासह अन्य विविध प्रकल्पांचे काम पूर्ण करून ही दालने क्रीडाप्रेमींसाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना व असोशियशनच्या सक्रीय सहभागाने या संकुलामध्ये विविध स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन व्हावे. सरकारच्यावतीने क्रीडा महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

असोसिएशनचे अध्यक्ष शीतल भोसले प्रास्ताविक केले. डॉ. सत्यव्रत सबनीस यांनी आभार मानले. विजेत्या खेळाडूंना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाला असोशियशनचे उपाध्यक्ष राजू देसाई, रेसिडेन्सी क्लबचे खलील अन्सारी, डॉ. दिपक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंचा सत्कार

ओपन डबलमध्ये कोल्हापूरचे निलेश सावंत आणि मेहुल केनिया,नाशिकचे किरण कुलकर्णी व कुमावत श्रीसागर,औरंगाबादचे विजय मेहर व डॉ.अक्रम खान व कोल्हापूरचे शितल भोसले व डॉ.दिनेश शिंगटे हे खेळाडू विजयी झाले आहेत. विजयी खेळाडूंना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी सत्यव्रत सबनीस व शितल केनिया यांचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजीएम कडील २०९ पदांच्या भरतीला हिरवा कंदिल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सरकारच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील दुस-या टप्प्यातील नियमित ६३ आणि १४६ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासह रुग्णालयातील कर्मचा-यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. कंत्राटी पद्धतीमध्ये ८७ कुशल व ५९ अकुशल पदांचा समावेश आहे. याबाबतचा अध्यादेश १७ फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आला आहे, तर १६ कर्मचा-यांच्या समावेशनाबाबत निर्णय अद्यापही राखीव आहे.

३० जून २०१६ रोजी आयजीएम हस्तांतरणाला सरकारने मंजुरी दर्शवून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ फेब्रुवारी २०१७ रोजी आयजीएममधील बाह्यरुग्ण सेवा सुरू केली आणि आयजीएमला सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळाला. रुग्णालय सरकारच्या ताब्यात गेल्यापासून ६९ अधिकारी व कर्मचा-यांना सरकार सेवेत सामावून घेण्यासह वेतनाचा प्रश्न प्रलंबित होता. या संदर्भात हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश हाळवणकर यांनी कर्मचा-यांच्या वेतनासाठी ३.२५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करून घेतल्याने कर्मचा-यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर गत महिन्यात १७ जानेवारीला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील ६९ पैकी ५३ कर्मचा-यांना सरकारच्या सेवेत समावेशन करण्यासंदर्भातील अध्यादेश जारी केला गेला. आता दुस-या टप्प्यातील नियमित ६३, काल्पनिक (कुशल) ८७ पदे निर्मितीस व कंत्राटी पद्धतीने काल्पनिक (अकुशल) ५९ पदे भरण्याबाबतचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव प्रदीप बलकवडे यांनी जारी केला आहे.

मंजूर पदांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध रोगतज्ज्ञ यांचा समावेश असून, अतिदक्षता, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, मनोविकृती चिकित्सा कक्ष, जळीत कक्ष, ट्रामा केअर युनिट, आदी विभागांसाठीच्या पदांचा समावेश आहे. या सर्व पदांच्या भरतीनंतर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील सेवा पूर्ववत होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीचा प्रस्ताव सरकारकडे जाण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन करवाढ नाहीच, उलट सध्याच्या उत्पन्नात तूट येईल असे दर ठरवण्यासाठी महापालिका सभागृहाचा आग्रह असल्यामुळे हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी सरकारकडे जाण्याची शक्यता आहे. दर कमी करण्याच्या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करावा तर इतर दरवाढीला चालना दिल्यासारखे होणार आहे. तर नामंजूर करताना दर कमी करण्याची उपसूचना देता येत नसल्याने सभागृहाची अडचण झाली आहे. यामुळे कराच्या दराबाबतचा प्रस्ताव सरकारकडे जाण्याचा हा पहिलाच प्रकार ठरण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने रहिवास व व्यावसायिक मिळकतींसाठी दहा ते तीस टक्क्यापर्यंतची दरवाढ सुचवली आहे. भाडंवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीची पद्धत कोल्हापूरबरोबर केवळ नांदेड व मुंबईत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पद्धतीमुळे मोठी आकारणी होत असल्याचा आरोप नगरसेवक करत असल्याने करवाढ करू दिली जाणार नाही, असा निर्णय सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने घेतला आहे. आता भाडेतत्वावरील मिळकतींना आकारण्यात येणारा कर कमी करण्यासाठी प्रशासनासमोर प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार मंगळवारच्या सभेत प्रशासनाकडून निर्णय न झाल्याने करवाढीबाबतच्या प्रस्तावावर सभागृहाने निर्णय घेतला नाही.

घरफाळा विभागाच्या सध्याच्या उत्पन्नात तूट येईल, असा प्रस्ताव प्रशासनाकडून स्वीकारला जाणार नाही. तर नवीन दरवाढीचा प्रस्ताव सभागृह मंजूर करणार नाही. हे दोन्ही प्रस्ताव एकत्र असल्याने त्यावर उपसूचना द्यायचीही बाब अडचणीची आहे. त्यामुळे सभागृहाकडून कमी दराचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करण्याचीशक्यता आहे. हा प्रस्ताव प्रशासनाकडून मात्र स्वीकारला जाणार नसल्याने आयुक्ततो विखंडीत करण्यासाठी सरकारकडे पाठवू शकतात. यामुळे दर कमी ठेवावे की नाही हे सरकार ठरवू शकते. यासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या मिळकती केवळ व्यावसायिक वापरासाठी देण्यात येत नाहीत. रहिवासासाठीही भाडेतत्वावर मिळकती देण्यात येतात. त्यासाठी प्रशासनाने काम करण्याची गरज सभागृहाने व्यक्त केली. शहरात अशा सर्व प्रकारच्या मिळून ३० ते ४० हजारावर मिळकती असण्याचा अंदाज सभेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचा कर ७६ टक्क्यांवरुन २५ टक्के केल्यास बोगस करारपत्रे केली जाणार नाहीत. बोगस करारपत्रामुळे घरमालकाला जितका मिळायचा तितका फायदा होतो, पण महापालिकेचे उत्पन्न कमी होत असल्याचे निदर्शनास आणले. यासाठी महापालिकेने असेसमेंट करण्याची आवश्यकता आहे.

.....

नगरोत्थानच्या कामावरुन आयुक्तांसोबत वाद

नगरोत्थान योजनेतील १०८ कोटी रुपयांची कामे अजूनही सुरू आहेत. या निधीचा वापर झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत नवीन २५० कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठीचा प्रस्ताव देता येणार नाही. याबाबत प्रशासन अजून काय करत होते? असा सवाल मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेमध्ये करण्यात आला. सत्यजित

कदम, शारंगधर देशमुख, किरण नकाते, अर्जुन माने, सुनील कदम, नियाज खान यांनी थेट आयुक्तांशी वाद घातला. कंत्राटदाराने काम करण्यासाठी मशिनरी आणली असताना आता त्याच्यावर कारवाई करुन फेरटेंडर काढण्यात आले तर त्याला वेळ लागण्याबरोबरच त्यासाठी जादा पैसेही मोजावे लागणार आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? जवळपास १७ कोटी रुपयांची कामे व्हायची आहेत. हा निधी परत गेल्यास पूर्वी सुचवलेली कामे कमी होण्याची भीतीही नगरसेवकांनी व्यक्त केली. भागातील नागरिक दररोज घरात येऊन बसतात. त्यांना काय उत्तरे द्यायची असे सवाल थेट आयुक्तांनाच करण्यात आले. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी काही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशीही नगरसेवकांची जोरदार वादावादी झाली. त्यामुळे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनासमोर आता केवळ त्या कंत्राटदाराकडून काम करुन घेण्यासाठी कारवाई करण्याचा एकमेव पर्याय हातात असलयाचे सांगितले. अन्यथा त्या कंत्राटदाराने काम करावे यासाठी विनंती करतच थांबावे लागेल. त्याला मुदत देऊनही काम सुरू केले नसल्याने ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे स्पष्ट केले.

......

सभेमध्ये 'रामपुरीचा'उल्लेख

नगरोत्थानच्या कामावरुन प्रशासनाने कंत्राटदाराला नोटिसा दिल्या आहेत असे सांगितले. पण त्यानंतर तो काम केव्हा सुरू करुन ते संपवणार केंव्हा याचा कालावधी द्या असा आग्रह मुरलीधर जाधव यांनी सरनोबत यांच्याकडे धरला. सरनोबत कालावधी सांगत नसल्याने जाधव यांनी वैतागून अखेर नोटीस देऊन कितीवेळा'रामपुरी'उघडणार व गळ्याला लावणार? केवळ'रामपुरी'दाखवतच राहणार का? असा सवाल केला. जाधव यांच्या या उदाहरणाने सभागृह काही काळ स्तब्ध झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळावाढ रोखली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सभेत प्रशासनाने आणलेल्या घरफाळावाढीच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. अन्यायी घरफाळा वाढ नामंजूर, आधी घरफाळा बुडव्यांचे घरफाळा वसूल करा, घरफाळा दरवाढ प्रस्ताव मागे घ्या, असे फलक सर्व पक्षीय नगरसेवकांनी दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत प्रचंड टीका केली. भाडेतत्वावरील मिळकतधारकांसाठी असलेला कर कमी करण्यास प्रशासनाची तयारी नसल्याचे लक्षात आल्यानंतर घरफाळावाढीच्या प्रस्तावावर पुढील सभेत निर्णय घेण्याचे ठरवून सभा तहकूब करण्यात आली. यामुळे प्रशासनाने सुचवलेल्या घरफाळावाढीबाबतचा प्रस्ताव लटकला.

नवीन वर्षातील घरफाळा दर निश्चितीबाबतचा प्रस्ताव मंगळवारच्या सभेत प्रशासनाने मांडला होता. दहा ते तीस टक्के दरवाढ सुचवली आहे. त्याला नगरसेवक, नागरिक तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विरोध होत आहे. महापौर स्वाती यवलूजे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरु होताच शिवसेनेचे नगरसेवक घरफाळावाढीचा प्रस्ताव मागे घ्या, असे फलक व घोषणा देत सभागृहात आले. ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम, भाजपचे विजय सुर्यवंशी, काँग्रेसचे शारंगधर देशमुख यांनी टीकेची झोड उठवली. प्रशासनाने हा विषय मुख्य कार्यपत्रिकेऐवजी पुरवणी कार्यपत्रिकेवर ठेवण्याचा प्रकार म्हणजे शोकांतिकाच आहे. सभेपूर्वीच्या आघाडींच्या बैठकांपर्यंत प्रशासनाकडून प्रस्तावात नेमके काय आहे, याची माहिती दिली नाही. सर्व करांची रचना करायची नेहमीची पद्धत असताना प्रशासनाने शेवटच्या टप्प्यापर्यंत दिरंगाई का केली? नगरसेवकांना विश्वासात न घेता कामकाज करुन शेवटी नगरसेवकांवरच खापर फोडण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सुनावले. तसेच प्रशासन जनतेची दिशाभूल करत असेल तर आता राजीनामे देतो, प्रशासनानेच महापालिका चालवावी, असा इशाराही दिला.

यानंतर मुरलीधर जाधव, नियाज खान, अशोक जाधव, भूपाल शेटे, मेहजबीन सुभेदार, विलास वास्कर, किरण नकाते यांनीही प्रशासन पाणी,आरोग्य, स्वच्छता अशासुविधा देत नसताना जादा दर आकारण्याचा हक्क नाही. पूर्वी घरफाळा आकारण्यासाठी राबवलेल्या पद्धतीतील चुकीची दुरुस्ती आता करता येते की नाही, असा जाब विचारला. सरकारची मान्यता नसताना चटई क्षेत्राऐवजी बांधीव क्षेत्रावर आकारण्यात येणाऱ्या घरफाळ्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे नागरिकांकडून वसूल केलेली जादा रक्कम, व्याज व बेकायदेशीर दंड परत करावा, अशी मागणीही केली. या वाढीच्या प्रस्तावाला सर्व सभागृहाने विरोध दर्शवला. तसेच शहरात अनेक मिळकती घरफाळ्याविना आहेत. त्यांची जबाबदारी कोण स्वीकारणार? दहा हजारांपर्यंतच्या थकबाकीदारांचा घरफाळा का थकला? अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. त्यानंतर घरफाळा विभाग प्रमुख दिवाकर कारंडे यांनी भाडेतत्त्वावरील मिळकती कर कमी करण्यामुळे येणारी आठ कोटीं तूट मांडली. ही भरुन काढण्यासाठी इतर मिळकतींवर वाढीचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगण्यास सुरुवात केली. ज्यांचा अवलंब करायचा नाही, त्याची माहिती देऊच नका, असे सांगत नगरसेवकांनी गोंधळ घालत त्यांना रोखले. भाडेतत्वावरील मिळकतींचा कर७६ टक्क्यावरुन २५ टक्क्यावर आणण्यात यावा, असे नगरसेवकांच्यावतीने सांगण्यात आले. त्याला प्रशासनाची तयारी नसल्याचे लक्षात येताच महापौरांनी घरफाळ्याच्या विषयावरुन सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर ‘पीएनबी’मध्ये व्यवहार सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेली पंबाज नॅशनल बँक (पीएनबी) नीरव मोदीच्या कथीत घोटाळ्यामुळे चर्चेत असली, तरी कोल्हापूर येथील जेम्स टोनमधील शाखेसह जिल्ह्यातील तीनही शाखांत याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तिनही शाखेतील व्यवहार सुरळीत ग्राहकांच्या मागणीनुसार सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होत आहेत. मुंबई येथील शाखेत झालेल्या गैरव्यवहारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्था असली, त्याचा परिणाम बँकेच्या व्यवहारावर दिसून येत नाही.

१८९५ मध्ये स्थापन झालेल्या पीएनबीच्या देशातील सर्व शाखांची १५ लाख कोटींची वार्षिक उलाढाल असून ३५, ५६६ कोटींचे भागभांडवल आहे. बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी शहरात प्रथम २००७ मध्ये पीएनबीची शाखा सुरू करण्यात आली. त्यानंतर इंचलकरंजी व रेंदाळमध्ये शाखा सुरू केल्या. इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाप्रमाणे पीएनबीचे व्यवहार सुरू होते. पण १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील शाखेमध्ये नीरव मोदी यांनी तब्बल ११ हजार, ३६० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीएनबीच्या सर्वच शाखा चर्चेत आल्या.

एखाद्या बँकेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक किंवा वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी काढण्यासाठी एकच झुंबड उडते. व्यवस्थापनावर प्रश्नांचा भडिमार करुन सर्वच खात्यावरील रक्कम देण्यासाठी तगादा लावतात. पण गेल्या चार दिवसांपासून पीएनबीबाबत विविध माध्यमावर चर्चा होत असताना जेम्स स्टोन येथील शाखेमधील दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरळीत होते. पैसे जमा करणे आणि काढण्याबरोबरच धनादेश वितरण आणि एटीएममधून नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. पीएनबी बँक सरकारी बँक असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे ग्राहकांनी सांगितले, तरी मुंबई शाखेत झालेल्या प्रकारांबाबत कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images