Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मिस्टी ट्रीप

$
0
0
आता थंडी चांगलीच पडू लागली आहे. थंडीमध्ये मॉर्निंग वॉ‌क किंवा जॉगिंगला नेहमीच जातो. पण थंडीत भल्या पहाटे, धुक्यातून मॉर्निंग मिस्ट्री ट्रीपही करता येते. सकाळी केवळ दोन-तीन तासांत पूर्ण होऊ शकेल अशी मिस्टी ट्रीप म्हणजे वाघजाई होय.

जेईई-मेन चा सक्सेस पासवर्ड

$
0
0
अभ्यास, सराव आणि आत्मविश्वास हीच या परीक्षेतील यशाची त्रिसूत्री असल्याचे विजेता अकादमीचे प्रा. जयंत पाटील यांनी शुक्रवारी आयोजित जेईई-मेन शिबिरात सांगितले. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात शिबिर घेण्यात आले.

‘स्वाभिमानी’ ने ऊसवाहतूक रोखली

$
0
0
अजिंक्यतारा सहकारी कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरची हवा करंजे नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.

लैंगिक अत्याचार : एकाला पोलिस कोठडी

$
0
0
साताऱ्यातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सदरबझार येथील सरकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

माजी आमदार शिंदेंच्या ३ संस्थांची चौकशी

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे अध्यक्ष असलेल्या दोन आणि त्यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या एक, अशा तीन सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिले आहेत.

सांगली महापालिकेची सदनिका सोडत रद्द

$
0
0
महापालिकेतर्फे झोपडपट्टीवासीयांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील २० सदनिका लाभधारकांनीच ५० ते ८० हजार रुपयांना परस्पर विकल्याचे आढळून आल्याने पालिका प्रशासनाने पुढील सदनिका वाटपाची सोडत गुरुवारी रद्द केली.

बंधारे दुरुस्तीसाठी निधी नाही

$
0
0
आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी बंधाऱ्यांमार्फत पाणी अडविले जाते. पण गेली कित्येक वर्षे बरगे किडल्यामुळे या बंधाऱ्यांमधून गळती रोखता येत नाही.

पैलवानांच्या जिवावर आंदोलन मोडाल तर याद राखा

$
0
0
लढा शांततेच्या मार्गाने सुरु असताना काचेच्या घरात बसून ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर संस्था उभ्या केल्या, त्याच शेतकऱ्यांचे आंदोलन गुंड आणि पैलवानांच्या जीवावर विनय कोरे मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

घोरपडे कारखान्याला २४ गावांचा पाठींबा

$
0
0
कागल तालुक्यातील चिकोत्रा खोरे (कापशी) भागातील २४ गावांतील सरपंच व नागरिकांच्या शिष्टमंडळाने बेलेवाडी काळम्मा येथील सरनसेनापती संतोजी घोरपडे शुगर फॅक्टरी उभारण्याचा पाठींबा दिला.

मुश्रीफांना घेरण्याची जय्यत तयारी

$
0
0
बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या प्रस्ताव‌ित डिस्ट‌िलरी आणि सहवीज प्रकल्प रद्द करावा या तक्रारीविरोधात सोमवारी (ता. २५)रोजी कारखाना कार्यस्थळावर सुनावणी होणार आहे.

‘स्वाभिमानी’ची रॅली रोखली

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज काढलेली मोटरसायकलची महारॅली वारणा कारखान्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हातकणंगले तालुक्यातील पारगाव गावाजवळ थांबवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी घेतला.

वीज बिलांसाठी SMS योजना राबविणार

$
0
0
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महावितरण संदर्भातील समस्या चर्चेतून सोडविण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

अर्थशास्त्राच्या शंका विचारा, केव्हाही कधीही

$
0
0
अर्थशास्त्र विषयातील एखाद्या प्रश्नाविषयी शंका निर्माण झाली, अभ्यासक्रमातील एखाद्या घटकावरील समाधानकारक उत्तर मिळत नाही, अर्थ जगतातील काही घडामोडींविषयी माहिती पाहिजे आहे, पण विचारायचे कुणाला ? या संभ्रमात आता विद्यार्थ्यानी राहण्याचे कारण नाही.

जादा पाणी वापरणाऱ्यांचे बिल वाढणार

$
0
0
महापालिकेने नव्या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या सांडपाणी अधिभारासह पाणी बिले शहरवासियांना दिली जात आहेत. एकूण बिलावर ही आकारणी होणार असल्याने जे जास्त पाणी वापरतील, त्यांच्याच बिलातील अधिभाराचा आकडा फुगणार आहे.

स्थायी सभापतींना नोटीस देणार

$
0
0
स्थायी सभापती रमेश पोवार यांनी केलेल्या मारहाणीची लेखी मा​हिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता भरत शिंदे यांनी शुक्रवारी आयुक्तांना फॅक्सद्वारे दिल्याने आयुक्तांच्यावतीने पोवार यांना खुलासा मागणी करणारी नोटीस दिली जाणार आहे.

म.ए. समितीची कोल्हापूरकरांना हाक

$
0
0
कर्नाटक सरकारच्या २५ नोव्हेंबरपासून बेळगाव येथे सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी दडपशाहीच्या अन्यायी धोरणाला जोरदार विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आहे.

ई वॉर्डचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार

$
0
0
ए, बी, सी, डी वॉर्डमधील पाणीपुरवठा दोन दिवसानंतर सुरु झालेला असताना आता कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रामधील नुतनीकरणाचे व दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने सोमवारी (ता. २५) ई वॉर्डचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

सर्किट हाउसजवळ उपजलवाहिनी निसटली

$
0
0
सर्किट हाऊसनजीकच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेली आठ इंची उपजलवाहिनी निसटल्याने शुक्रवारी दुपारपासून लाखो लिटर पाणी वाहून गेले. धैर्यप्रसाद मंगल कार्यालयाच्या चौकातील व्हॉल्व बंद केल्यास इतर भागाचाही पाणीपुरवठा बंद होणार असल्याने ही गळती सायंकाळपर्यंत सुरुच होती.

अंतिम निर्णयापर्यंत कारवाईस महापालिकेला मनाई

$
0
0
तावडे हॉटेल परिसरातील जागेवरील बांधकामाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास येथील कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने महापालिकेला मनाई केली आहे.

संभाजीराजेंचा साइडट्रॅक

$
0
0
लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगामी निवडणुकीतील उमेदवारीबाबत युवराज संभाजीराजे यांना साइडट्रक केले, त्यामुळे त्यांनी मूळ मतदारसंघात ताकद निर्माण करण्याऐवजी महाराष्ट्रभर फिरण्यास सुरूवात केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images