Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तीन हजारांसाठी तरुणाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

मोबाइलचे तीन हजार रुपयांसाठी गांधीनगर येथील तरुणाचा मित्रानेच खून केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संजय बेले या संशयितांला ताब्यात घेतले आहे. अतुल शिवाजी अंबुरे (वय २१, रा. धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल अंबुरे याने त्यांच्याच भागातील संजय बेले याच्याकडून सात हजार पाचशे रुपयाला मोबाइल विकत घेतला होता. अंबुरे याने साडेसात हजारांपैकी चार हजार रुपये दिले होते. परंतु राहिलेले पैसे देण्यासाठी अंबुरे यांच्याकडून विलंब झाला होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे आणि शिवाजी गणपतराव शिंदे यांनी अंबुरे याला रेल्वेलाइन जवळील वंदना फटाका गोडाऊन येथे बोलवून घेतले. यावेळी अतुल आणि संजय यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यात संजय बेले हा खाली पडला असता त्याला दारुची बाटली फुटून हाताला जखम झाली. त्याने रागाने ती फुटलेली बाटली तशीच उचलून अतुल अंबुरे याच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये अंबुरे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याच्या तोंडावर व पाठीवर फुटलेल्या बाटलीच्या काचांनी आणि दगडांनी हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळाले. गांधीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी केलेल्या पाहणीत अंबुरे मृत झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यायी पूल बांधकामात सव्वा कोटीचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामामध्ये तब्बल एक कोटी २३ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. मुंबईच्या मे. बंका कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने आठ कोटी ७० लाख, ६३ हजार, ९७२ रुपयांचे पुलाचे ८० टक्के काम केले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला सुमारे सव्वा कोटी रुपये इतकी जादा रक्कम दिली असून या विभागातील सात अधिकाऱ्यांची कॅगमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व सचिव बुरहान नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत केली. या अपहारामध्ये तत्कालिन उपअभियंत्यासह कोकण भवन विभागातील मुख्य अभियंत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

संपूर्ण प्रकाराची कॅगमार्फत चौकशी करावी, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी ईमेलव्दारे पत्रव्यवहार केला आहे. सरकारने या गैरव्यवहाराची चौकशी न केल्यास कोर्टात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी दिली. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे देसाई म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पर्यायी पुलाला मंजुरी आणली. त्यासाठी २००१ मध्ये प्रस्ताव तयार झाला. त्यानंतर पुलाच्या संकल्पचित्रात तीन वेळा बदल करण्यात आला. प्रथम अंदाजपत्रक नऊ कोटीच्या आसपास असताना कालांतराने १३ कोटीचे अंदाजपत्रक केले. यावरुन पुलाच्या अंदाजपत्रकाबाबतही साशंकता आहे. माहिती अधिकारातून उपलब्ध माहितीनुसार पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ठेकेदार कंपनीला ८० टक्के कामाचे ८,७०,६३,६२२ रुपये देण्याची आवश्यकता असताना बांधकाम विभागाने ९,९३,८६,९७२ रुपये दिले आहेत. सुमारे सव्वा कोटी रुपये काम न करताच जादाची रक्कम दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार, पोलिसांकडून कारवाई नाही

राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियहता संपत आबदार यांच्याकडे कामाची अंतिम देयके तयार करण्याची जबाबदारी होती. अंतिम देयके तयार करण्यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना जागेवर बांधकाम आढळले नाही. मात्र काम न करताच सव्वा कोटीची जादा रक्कम दिल्याचे तपासात पुढे आले. आबदार यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये जादाची रक्कम वसूल करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस दिली. पुढे वसुली संदर्भात कसलीही कार्यवाही झाली नाही. म्हणून आबदार यांनी ३० जून, २०१७ मध्ये सरकारच्या निधीच्या अपहारास जबाबदार धरून शाखा अभियंता एस. जी. पोवार (सध्या, उपअभियंता सा. बां. विभाग, कोल्हापूर), तत्कालिन उपअभियंता बी. ए. भाई(सध्या, सा. बां. विभाग, कागल),तत्कालिन कार्यकारी अभियंता (सध्या, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामंडळ, पुणे),तत्कालिन शाखा अभियंता आर. एस. पन्हाळकर (सध्या उपअभियंता, सा. बां. विभाग, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा अर्ज शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिला होता. मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांकडून कारवाई झाली नाही. सरकारी निधीचा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला नाही. उलट तत्कालिन उपअभियंता ए. ए. आवटे, कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे आणि राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम) विभाग मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करून चौघा अधिकाऱ्यांना पाठबळ दिले. त्यामुळे अपहारप्रकरणी सातही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.

पालकमंत्र्यांची माहिती घ्यावी

पुरातत्व विभागाने पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत ना हरकत दाखला दिला नसल्याने पुलाचे बांधकाम रखडले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा बांधकाम रखडण्याशी काही संबंध नाही. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नागरिकांनी कोर्टात तक्रार केली म्हणून काम थांबल्याचे सांगत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. कोर्टाने बांधकामास स्थगिती दिली नाही. पालकमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'घडीव दगडापासून पुलाचा कठडा बनवा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

शिवाजी पुलाचे बांधकाम अबाधित राहण्यासाठी अपघातात कोसळलेला कठडा दुरुस्त करताना सिमेंटऐवजी जुन्या रचनेप्रमाणे घडीव दगडापासून बनवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात असे म्हटले आहे, शिवाजी पूल हा कोल्हापूर व कोकणाला जोडणारा दुवा असून १३१ वर्षे जुना आहे. या पुलाची मुदत संपल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सात ते आठ वर्षापूर्वी प्राप्त झाले असतानाही आजअखेर पुलावरून वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी रात्री पुलाचा कठडा तुटून मिनीबस कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने तुटलेला कठडा बांधत असताना दगडी बांधकामाऐवजी सिमेंटचा वापर करून कठडा बांधण्याचे काम सुरू आहे. जुन्या ऐतिहासिक पुलाचे बांधकाम अबाधित राहण्यासाठी सदर पुलाचा कठडा दुरुस्त करत असताना जुन्या पद्धतीने घडी दगडापासून बनवणे आवश्यक आहे. प्रशासनाने सिमेंट ऐवजी दगडापासून कठडा बांधावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनाला उत्तर देताना जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'कठड्याचे बांधकाम मूळ स्वरुपात घडीव दगडामध्ये होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना देण्यात येतील.' शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, दिग्विजय कालेकर, सुरेश जरग, दिलीप मेत्राणी, मारुती भागोजी, आर. डी. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारी’त तंबाखूच्या पिचकाऱ्या

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : राज्य सरकारच्या आरोग्य विभागान घेतलेल्या मौखिक तपासणी शिबिरात शहरातील महत्वाच्या ११ सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे तोंडातील कॅन्सरची लक्षणे आढळली आहेत. त्यावरून सिगारेट व तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गंत बंदी असतानाही सर्वच शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, सुपारी, गुटखा, मावा खुलेआमपणे खाल्ला जातो, थुंकला जात असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 'व्यसनांपासून दूर रहा, आरोग्य सांभाळा' असा संदेश देणाऱ्या कार्यालयांतही तंबाखूबंदी पुडीत गुंडाळल्याचे, दिव्याखाली अंधार असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कायद्याने असलेली बंदी मोडून तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक, उपहारगृह, शहरांतील वर्दळीच्या ठिकाणी सिगारेट ओढणारे, तंबाखू, गुटखा खावून थुंकणारे सहजपणे दिसतात. सार्वजनिक ठिकाणी असे चित्र असताना सरकारी कार्यालयातील कर्मचारीही त्यास अपवाद नाहीत. सर्वच सरकारी कार्यालयांत तंबाखू, गुटखा, माव्याचा 'तोबरा' भरून काम करणारे अधिकारी, कर्मचारी दिसतात. असे कर्मचारी कार्यालयातील जवळच्या खिडकीतून, कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या डब्यात, झाडांच्या कुंडीत अथवा उघड्यावर थुंकतात. जिन्यातील कोपऱ्यात पिचकाऱ्या रंगलेल्या दिसतात. त्यामुळेच खिडक्यांचे गज, भिंती, कचऱ्याचा डबा रंगीत दिसतो. किमान कार्यालयांत तरी तंबाखू बंदीची अंमलबजावणी सक्तीने करण्याची जबाबदारी संबंधीत विभागप्रमुखांची आहे. मात्र, कार्यालयप्रमुख त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामीण प्रशासनाचे प्रमुख आहेत. या दोन्ही कार्यालयात तंबाखू खाणारे कर्मचारी अधिक प्रमाणात आहेत. तंबाखू नियंत्रण कक्ष सीपीआरमध्ये आहे. तेथेही तंबाखू खाणारे कर्मचारी, आरोग्य सेवक आहेत.

मौखिक तपासणी मोहीमेचे वास्तव

पान, तंबाखू खाणाऱ्यांची संख्या अशी

जिल्हाधिकारी कार्यालय - ९

जिल्हा सैनिक कार्यालय - २

अन्न व औषध प्रशासन विभाग - ३

वनविभाग - ८

प्रादेशिक परिवहन (आरटीओ) - ४

पोस्ट ऑफीस - ८

पोलिस मुख्यालय - ७

वस्तू व सेवा कर - २

जिल्हा परिषद - ४

शिक्षण उपसंचालक - ३

सीपीआर - २०

टाळली मौखित तपासणी

दरम्यान, अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपण पान, तंबाखू, सुपारी, गुटखा खातो किंवा सिगारेट ओढतो हे समोर येईल, या भीतीपोटी मौखिक तपासणी करून घेणे टाळले. कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी तपासणी झाली असती तर तंबाखू मळणाऱ्यांची संख्या आणखी वाढल्याचे समोर आले असते.

महापालिकेत भयानक वास्तव

महापालिकेत स्वतंत्र आरोग्य विभाग आहे. या विभागाने शहरील नागरिक, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र शहरातील इतर सरकारी कार्यालयात घेतलेले मौखिक तपासणी शिबिर आयोजित करण्याची साधी तसदी महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. यावरून आरोग्यासंबंधी प्रशासन किती सतर्क आहे, हे स्पष्ट होते. मौखित तपासणी शिबिर हा राष्ट्रीय कार्यक्रम असूनही त्याकडे महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयांत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाता येत नाही. आढळल्यास दंडात्मक शिक्षा होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचारी तंबाखू खाताना आढळल्यास कारवाई करण्याची सूचना दिली आहे. तंबाखूबंदीच्या जागृतीसाठी ३ फेब्रुवारी रोजी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली जाणार आहे.

- डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४७ खासगी शाळांत मोफत प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातर्गंत (आरटीई) सन २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांत २५ टक्के आरक्षीत जागांवर मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ३४७ शाळांतील ३ हजार ५४१ जागांवर २५ टक्के कोट्यातून आर्थिक दुर्बल कुटूंबांतील मुलांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित शाळांच्या परिसरातील पालकांनी https://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर आरटीई पोर्टल या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.

डॉ. खेमनार म्हणाले, 'खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात जिल्ह्यातील ३४७ शाळांत ३ हजार ५४१ आरक्षीत जागा आहेत. त्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. ३१ जानेवारी ते २० फेब्रुवारीअखेर अर्ज करण्याची मुदत आहे. एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकाचे बालक, घटस्पोटीत आणि विधवा महिलांचे बालक, दिव्यांग बालके प्रवेशास पात्र ठरतील. प्रवेशासाठी जन्माचे प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा, मागासर्गीय, अनुसूचित जाती-जमातीमध्ये असल्यास जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग असल्यास दाखला, बालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.'

डॉ. खेमनार म्हणाले, 'अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर २५ टक्के आरक्षीत जागेपेक्षा अधिक अर्ज आलेल्या शाळांत प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पात्र शाळांची एकाच ठिकाणी लॉटरी सोडत प्रक्रिया केली जाईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार होईल. यादीतील विद्यार्थ्यांना टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल. प्रवेश यादीतील विद्यार्थ्याचे पालक आणि संबंधीत शाळांतील मुख्याध्यापकांना याचा एसएमएस जाईल. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतरही जागा शिल्लक राहिल्यास दुसऱ्या टप्यातील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शहर आणि ग्रामिण भागातील शाळांमध्ये आरटीई प्रवेशासंबंधीचा फलक दर्शनी भागात लावण्याची सूचना दिली आहे.'

पत्रकार परिषदेस प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले उपस्थित होते.

अर्जासाठी २६ मदत केंद्रे

'ऑनलाइन अर्ज करताना पालकांना अडचणी आल्यास मदतीसाठी कोल्हापूर शहरात ५ तर जिल्ह्यात २१ अशी एकूण २६ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शहरातील मदत केंद्रे अशी - भारती स्कूल (कदमवाडी), प्राथमिक शिक्षण मंडळ (शिवाजी चौक), ओरीएंटल स्कूल (टाकाळा, राजारामपुरी), पी शिवाजी स्कूल (शिवाजी पेठ), पोदार स्कूल (सानेगुरूजी वसाहत) येथे भेट द्यावी. किंवा सह समन्वयक नचिकेत सरनाईक यांच्या ८१४९२७९७९७ या मोबाइल क्रमांकावर आणि ०२३१ - २५४३२८३ या कार्यालयातील क्रमांकावर संपर्क साधावा', असे आवाहन डॉ. खेमनार यांनी केले आहे.

तालुकनिहाय आरटीइ प्रवेशपात्र शाळा

कोल्हापूर शहर - ४४

करवीर -४२

आजरा - १०

भुदरगड - ९

चंदगड - ११

गडहिंग्लज - २४

गगनबावडा -२

हातकणंगले - ९७

कागल - २८

पन्हाळा - ३०

राधानगरी - १२

शाहूवाडी - ५

शिरोळ - ३३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजी, माजी नगरसेवकांना भोवणार शिवीगाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुरक्षा रक्षक तसे शहर अभियंत्याला शिवीगाळ केल्याचे प्रकरण माजी उपमहापौर सचिन खेडकर व माजी विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांना भोवण्याची चिन्हे आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना शिवीगाळ केल्याबद्दल भाजपचे नगरसेवक संभाजी जाधव यांच्यावर प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर पक्षाकडून शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर माजी उपमहापौर खेडकर यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणी महाराष्ट्र माजी सैनिक कार्पोरेशन लि. च्यावतीनेही गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

माजी उपमहापौर खेडकर यांनी महापालिका चौकात सुरक्षा रक्षकांना अर्वाच्य शिवीगाळ केली होती. तसेच झाडावर लटकवून फाशी देण्याची धमकीही दिली होती. महापालिकेत नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक हे माजी सैनिक कार्पोरेशनच्या माध्यमातून नेमण्यात आलेले माजी सैनिक आहेत. या कंपनीचे पुणे व दिल्ली येथे कार्यालय आहे. या प्रकरणानंतर सुरक्षा रक्षकांनी येथील प्रमुखांच्या माध्यमातून पुणे येथील कार्यालयास वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे व माहिती पाठवली आहे. कार्यालयाकडून जे काही आदेश देण्यात येतील, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. पण अजून काही आदेश आले नसल्याचे येथील सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र पुणे कार्यालयाकडून खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची कारवाई होण्याची शक्यता आहे.

सोमवारी झालेल्या प्रकाराबाबत मंगळवारी दुपारी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, महापौर यवलूजे यांचे पती सागर यवलूजे यांनी सुरक्षा रक्षकांची भेट घेतली. खेडकर यांच्याकडून झालेल्या प्रकाराबाबत माफी मागायला लावतो, प्रकरण पुढे नेऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला तर येथील नोकरी जाईल असा गर्भित इशारा देत दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना संभाजी जाधव यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी सरनोबत यांच्याबरोबर महापालिकेतील ४० कनिष्ठ अभियंत्यांनी मंगळवारी सायंकाळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेतली. यामध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी यामध्ये आता पाठीमागे फिरायचे नाही. शहर अभियंता यांना मुंबईतून परत आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे. बुधवारी मुंबईत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक आहे. त्याच्या तयारीत असल्याने काही कारवाई करण्यात आली नव्हती. गुरुवारनंतर याबाबतच्या हालचाली होतील. दरम्यान, भाजपच्यावतीनेही संभाजी जाधव यांचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. 'अशा वर्तनात सुधारणा करावी, अन्यथा शिस्तभंग कारवाई करावी लागेल, असा इशारा देण्यात येणार असल्याचे गटनेते विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यान विभागातील 'तो' कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावीर गार्डनमध्ये एका मुलीशी असभ्य वर्तन केल्यानंतर कामावर हजर करून घेण्यासाठी नगरसेवकाकरवी दबाव टाकणारा उद्यान विभागातील कर्मचारी तानाजी बंडेराव यादव या कर्मचाऱ्याला मंगळवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी निलंबित केले. या कर्मचाऱ्याला कामावर हजर करुन घेण्याबाबत माजी विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांनी सोमवारी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली होती.

उद्यान विभागातील कर्मचारी असलेला यादव महावीर उद्यानात कामावर असताना १५ दिवसांपुर्वी एका मुलीशी असभ्य वर्तन केले होते. त्याबाबत पालकांनी पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकारामुळे विभागप्रमुख म्हणून शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी यादवला कामावर हजर करून घेतले नव्हते. सोमवारी त्याची पत्नी शहर अभियंत्यांना भेटून पतीला कामावर घ्या, असे सांगण्यास आली होती. पण सरनोबत यांची भेट होऊ शकली नाही. त्या महिलेने संभाजी जाधव यांना फोन करून सांगितले. त्यानंतर जाधव यांनी फोन केल्यानंतर सरनोबत यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे जाधव यांनी कार्यालयात येऊन सरनोबत यांना शिवीगाळ केली. चूक करायची व नगरसेवकांना सांगून दबाव टाकायचा ही पद्धत बरोबर नसल्याने आयुक्त डॉ. चौधरी यांनी मंगळवारी कर्मचारी यादव याला निलंबित करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर सर्व्हिस फी अन्यायकारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात आलेले गाळे विविध ठिकाणी असून त्यांना रेडीरेकनरप्रमाणे एकसारखे भाडे आकारणी करणे चुकीचे आहे. मोठ्या शहरांमध्ये महापालिकेने स्वतंत्र आकारणी केली आहे. त्याप्रमाणे महापालिकेनेही भाडे आकारावे. तसेच घरफाळ्यातून फायर टॅक्स वसूल करत असताना पुन्हा फायर सर्व्हिस फी आकारणी अन्यायकारक असून ती रद्द करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. आमदार क्षीरसागर, व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी व आयुक्त डॉ. चौधरी यांची मंगळवारी गाळेधारकांचे भाडे, फायर सर्व्हिस फी, एलबीटी याबाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

कोरगावकर म्हणाले, 'आग प्रतिबंधक यंत्राचा उपयोग होत नाही. अग्निशमन दलालाच बोलावावे लागते. त्याचबरोबर घरफाळा फायर टॅक्स घेत असताना पुन्हा फायर सर्व्हिस फी घेणे चुकीचे आहे. परवाना नुतनीकरणावेळी कर जमा करण्याची सक्ती केली जाते. नवीन कर कशासाठी द्यायचा याबाबत माहिती द्यावी. तसेच आगीबाबत पाच प्रकारचे कर भरावे लागत आहेत.'

आमदार क्षीरसागर यांनी रेडीरेकनरप्रमाणे गाळ्यांचे भाडे आकारणी योग्य नसल्याचे सांगितले. अनेक गाळे व्यवसाय होत नसलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सर्वांना एकसारखे भाडे आकारणे चुकीचे आहे. प्रशासनाने सकारात्मक विचार करावा,' अशी मागणी केली. कोरगावकर यांनी एलबीटी लागू नसणाऱ्यांना कर आकारला जात आहे. त्याबाबत २५ जानेवारीला निवेदन दिले आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून नव्हे तर ऑनलाइन शॉपिंग विक्री करणाऱ्यांकडून एलबीटी वसूल करावा,'असे सांगितले. बैठकीस महासंघाचे अमर क्षीरसागर, अमोल नष्टे, सचिन शहा, प्रदिप कापडिया, संदीप वीर, बबन महाजन, अर्जुन पाटील, भरत पटेल, अजित कोठारी, इम्रान बागवान, राजमहंमद बागवान उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी उपनगराध्यक्षासह पंधराजणांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

साजणी (ता.हातकणंगले) येथील नवमहाराष्ट्र कामगार यंत्रमाग मागासवर्गीय औद्योगिक संस्थेच्या सर्व संचालकांवर एक कोटी ६४ लाखांना सरकारला फसविल्याप्रकरणी इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत इंगवले यांच्यासह पंधराजणांवर हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अप्पर लेखा परीक्षक व्यंकटेश भीमराव कुलकर्णी यांनी फिर्याद दिली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, साजणी येथील नवमहाराष्ट्र कामगार यंत्रमाग मागासवर्गीय औद्योगिक या संस्थेचे चेअरमन व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय इंगवले,व्हाइस चेअरमन अभिजीत बाळासो सावंत, संचालक सुलिंदर वसंत कांबळे , संजय विठ्ठल कांबळे, आप्पासो दत्तु कुऱ्हाडे, प्रभाकर पांडूरंग सुर्यवंशी, बाजीराव रेवाप्पा कांबळे, जाधवजी मनजी पटेल, नंदाताई ज्ञानदेव शेटे, सचिव प्रकाश रंगराव पाटील यांनी संगनमताने सन २००९ ते २०१४ पर्यंत बेकायदेशीररित्या जमीन विकासासाठी रोख रूपये पाच लाख पासष्ट हजार पाचशे रुपये खर्च केले. तर इलेक्ट्रीकल कामाकरीता बावीस लाख पाच हजार रूपये इतकी रक्कम कोणतेही काम न करता खर्च दाखवून उचलली. तसेच मशिनरी अॅडव्हान्सपोटी एक कोटी पन्नास लाख रूपये उचल केल्याचे प्रथम दर्शनी तपासात लक्षात आले आहे. ही कंपनी फक्त कागदावरच असल्याचे लेखापरीक्षणात निदर्शनास आले. त्यामुळे लेखापरीक्षक कुलकर्णी यांनी मंगळवारी हातकणंगले पोलिसांत तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सी.बी.भालके करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलालाही सैन्यात दाखल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सेवानिवृत्तीला केवळ दोन महिने शिल्लक होते, निवृत्तीनंतर गावी येऊन मुलांना चांगले शिक्षण द्यायचे. घर बांधायचे असे नियोजन केले होते. पंधरा दिवसानंतर सुट्टीवर येतो, असे ते म्हणाले होते. मात्र नियतीला कदाचित ते मान्य नसावे. १० ऑगस्ट २०१० रोजी सीमेवर ते शहीद झाले. कुटुंबावर जबर आघात झाला. मात्र ग्रामस्थ, जवळच्या नातेवाईकांच्या पाठबळावर वाटचाल सुरू आहे. मोठा मुलगा शिक्षण घेत आहे. त्यालाही वडिलांप्रमाणे देशाची सेवा करण्यासाठी आर्मीत दाखल व्हायचे आहे,' शहीद पांडुरंग इळके (रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) यांच्या पत्नी सुरेखा सांगत होत्या.

त्या म्हणाल्या, 'जम्मू काश्मीर येथे नियंत्रण सीमारेषेजवळ देश रक्षणाची सेवा बजावत असताना अतिरेक्यांच्या गोळीबारात पती पांडुरंग शहीद झाले. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३७ वर्षांचे होते. काश्मिरमधील पूंछ येथे कार्यरत असताना शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवत होते. त्यावेळी अतिरेक्यांची गोळी डोक्याला लागल्याने ते जागीच ठार झाले. १० ऑगस्ट रोजी ही घटना घडली. तोंडावर १५ ऑगस्ट होता. तो झाल्यानंतर १५ दिवसांनी ते सुट्टीवर येणार होते, तसे त्यांनी सांगितलेही होते. सेवानिवृत्तीसाठीही केवळ दोन महिने शिल्लक होते. दरम्यानच्या काळात देशाची सेवा बजावत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. ही माहिती गावात, तालुक्यात पसरली. आम्हाला मानसिक धक्का बसू नये, म्हणून तीन दिवसांनी सांगितले. क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते. पती गेल्याचे दुःख अनेकवेळा सहन करता येत नाही. त्यातून सावरत मुलांना चांगले शिक्षण देत आहे. मोठा मुलगा प्रथमेश ११ वीमध्ये शिकतो. लहान मुलगा रणजित ९ मध्ये शिकतो. दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन स्थिरस्थावर करणे, घराची प्रगती करणे अशी त्यांनी स्वप्ने पाहिली होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडते आहे. ग्रामस्थांचे सहकार्य लाभते. शहीद झाल्यानंतरचे मिळणारे लाभ मिळाले आहेत. सरकारी यंत्रणेकडून, शाळा कॉलेजमध्ये जवानांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलती मिळत आहेत.'

'गरिबीशी संघर्ष करीत पतींनी शिक्षण घेतले होते. कॉलेज झाल्यानंतर आर्मीत रूजू झाले. आमच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती. संसार सुखाने सुरू होता. त्याला दृष्ट लागली. पंजाब, आसाम, जम्मू येथे त्यांनी सेवा बजावली होती. नोकरी अंतिम टप्यात आली होती. तत्पूर्वीच ते शहीद झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनाला सात वर्षे झाली. कुटुबांवर आघात झाला तरी देशसेवेसाठी मोठ्या मुलास आर्मीत जाण्याची इच्छा आहे. इच्छेनुसार त्याच्या करिअरला मदत करणार आहे.

सुरेखा इळके, वीरपत्नी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंड डोक्याने संपवले दोघांचेही आयुष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराचे शिफ्टिंग करण्यासाठी मुलगा संतोष याला फोन करून मुंबईहून बोलवून घेतले. संतोष मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी पोहोचला, मात्र त्याआधीच आई-वडील जग सोडून निघून गेले होते. दोघांचेही मृतदेह एकाच बेडवर निपचित पडले होते. त्यांनी लिहिलेल्या पाच चिठ्ठ्यांमध्ये नातेवाईकांसह पोलिसांनाही सूचना दिल्या होत्या. अतिशय थंड डोक्याने नियोजन करून केलेला खून आणि आत्महत्येचा प्रकार पाहून पोलिसही थक्क झाले. घराचे थकलेले भाडे आणि मानसिक त्रासाला कंटाळून हा प्रकार करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. पोलिस अन्य कारणांचाही शोध घेत आहेत.

राज्य गुप्त वार्ता विभागातून निवृत्त झालेले पोलिस अधिकारी बबन पांडुरंग बोबडे (वय ६५, रा. विश्वकर्मा कॉम्प्लेक्स, देवकर पाणंद) हे आठ वर्षांपूर्वी पोलिस दलातून निवृत्त झाले. यांतर ते पत्नी रेखा (६०) हिच्यासह देवकर पाणंद येथील विश्वकर्मा कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट क्रमांक ५०३ मध्ये भाड्याने राहत होते. वर्षभरापूर्वीच त्यांनी मनीषा घोटगे यांचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. महिन्याला ५३०० रुपये भाडे देण्याचे ठरले होते. त्यांचा मोठा मुलगा संतोष हा मुंबईत एअरपोर्टमध्ये नोकरीस आहे, तर दुसरा मुलगा सचिन पुण्यात एका हॉटेलमध्ये कुक आहे. दोन्ही मुलांचे आई-वडिलांकडे फारसे येणे-जाणे नव्हते. कॉम्प्लेक्समध्येही बोबडे दाम्पत्य इतरांमध्ये फारसे मिसळत नव्हते. त्यांच्या दोन्ही विवाहित मुलींपैकी एक मुंबईत तर दुसरी वडूजमध्ये राहते. 'घराचे शिफ्टिंग करायचे आहे. यासाठी मंगळवारी घरी ये,' असा निरोप रेखा बोबडे यांनी सोमवारी रात्री संतोषला मोबाइलवरून दिला होता. यानुसार मंगळवारी तीनच्या सुमारास संतोष कोल्हापुरात पोहोचला, मात्र घरात पोहोचण्यापू्र्वीच त्याच्या आई-वडिलांनी जग सोडले होते. दोघांचेही मृतदेह बेडवर निपचित पडले होते. बबन यांच्या डोक्याशेजारी रिव्हॉल्वर पडले होते. दोघांच्याही अंगावर लाल रंगाची बेडशिट होती. हा प्रकार पाहताच संतोषने हंबरडा फोडला.

पोलिसांना बोबडे यांच्या घरात पाच चिठ्ठ्या मिळाल्या. पहिली चिठ्ठी फ्लॅटच्या मुख्य दारावरच चिकटवली होती. लॅचची चावी समोरच्या रंगकमल पाचमध्ये ठेवली आहे, असा उल्लेख यावर केला आहे. बेडरुमधील टेबलवर दुसरी चिठ्ठी होती. 'मोलकरणीचे तीनशे रुपये देण्यासाठी सोबत ठेवले आहेत, ते देणे.' 'दुसऱ्या मुलाला फोन करून निरोप देणे', असा उल्लेख केला आहे. याशिवाय पाच पानांचे पत्र लिहून टेबलवर ठेवले आहे. यात आत्महत्येचे कारण सविस्तर लिहिले आहे. पोलिसांसाठी रिव्हॉल्वरचा परवानाही एका पाकिटात घालून ठेवला आहे. हा सर्व प्रकार पाहून पोलिसही थक्क झाले. पोलिसांनी रिव्हॉल्वर, चिठ्ठ्या, बोबडे यांचा मोबाइल जप्त केला आहे. आई-वडिलांना भेटण्यासाठी मुंबईतून निघालेल्या संतोषला या घटनेचा धक्का बसला. भेट होण्यापूर्वीच त्यांनी जग सोडल्याचे कळताच त्याने आक्रोश केला.

'तिच्या' त्रासाने आत्महत्या?

'आता सर्व सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहे. अहंकार आणि दुराभिमानापोटी तिने आम्हास विनाकारण त्रास दिल्याने हे कृत्य करावे लागत असून, यास सर्वस्वी तीच जबाबदार आहे. तिने दिलेल्या धाकामुळेच आम्ही आत्महत्या करीत आहोत,' असा उल्लेख फ्लॅटमध्ये मिळालेल्या चिठ्ठीत केला आहे. यावरून 'ती' कोण? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पत्नीच्या कपाळावर हळद-कुंकू

हत्या आणि आत्महत्येचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळी कुंकू लावून महिला झोपत नाहीत, मात्र रेखा यांच्या कपाळावर हळद-कुंकू लावल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांना हळद-कुंकू लावल्यानंतर गोळी घातली असावी किंवा गोळी घातल्यानंतर हळद-कुंकू लावले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कॉम्प्लेक्स सुन्न

विश्वकर्मा कॉम्प्लेक्समध्ये एकूण ३५ फ्लॅट्स आहेत. बोबडे दाम्पत्य पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होते. पाचव्या मजल्यावर एकूण सहा फ्लॅट्स आहेत. त्यापैकी दोन फ्लॅट सध्या रिकामे आहेत. अन्य फ्लॅटधारकांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही, मंगळवारी दुपारनंतरच हा प्रकार समजला, त्यामुळे धक्का बसल्याचे बिल्डिंगमधील रहिवाशांनी सांगितले. बोबडे हे दोन महिन्यांपूर्वी आरोग्य तपासणीसाठी मुंबईला मुलाकडे गेले होते. विश्वकर्मा कॉम्प्लेक्समध्ये राहण्यास येण्यापूर्वी बोबडे हे मनोरमानगर येथे काही काळ वास्तव्यास होते.

परिसरातील दुसरा गोळीबार

देवकर पाणंद परिसरात २०१० मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने बंदुकीची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. बंगल्याच्या टेरेसवर सकाळच्या वेळेत ती घटना घडली होती. त्या पोलिसाने गळ्याला बंदूक लावून पायाच्या अंगठ्याने ट्रिगर दाबला होता. आठ वर्षांनी पुन्हा एकदा त्याच परिसरात पोलिस अधिकाऱ्याकडून गोळीबाराची घटना घडल्याने जुन्या घटनेचीही चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा चोरीतील तिघांवर दोषारोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील सव्वानऊ कोटी रुपयांच्या लूटप्रकरणी संशयित पोलिस अधिकारी सूरज चंदनशिवे, दीपक पाटील आणि मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला या तिघांवर सीआयडीने सोमवारी (ता. २९) पन्हाळा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुमारे ८०० पानांचे हे दोषारोपपत्र आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील या तिघांच्या विरोधात ठोस पुरावे दोषारोप पत्रात नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील चोरीप्रकरणी मैनुद्दीन मुल्लाला सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून साडेतीन कोटींची रोकड जप्त केली. फिर्यादी झुंझार सरनोबत यांनी चोरीस गेलेल्या रकमेबाबत आयजी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पुन्हा चोरीच्या गुन्ह्याचा आणि सांगलीतील पोलिसांच्या तपासाचीही चौकशी केली. यात तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच नऊ कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचा प्रकार पुढे आला. संशयित निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे, दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर, मैनुद्दीन मुल्ला आणि प्रवीण सावंत अशा नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली.

सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी पन्हाळा कोर्टात सहा कोटींच्या गुन्ह्यात सूरज चंदनशिवे आणि दीपक पाटील यांच्यावर पन्हाळा न्यायालयात सोमवारी दोषारोप पत्र सादर केले. हे दोषारोपपत्र सुमारे ८०० पानाचे आहे. त्यापूर्वी २३ जानेवारीला ३ कोटी १८ लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले आहे. हे सुमारे ६०० पानाचे आहे. अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून : पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवकर पाणंद विश्वकर्मा कॉम्प्लेक्स येथील निवृत्त पोलिस अधिकारी बबन पांडुरंग बोबडे ६५ यांनी रिव्हॉल्व्हरमधून पत्नी रेखा ६० यांचा गोळी घालून खून केला. नंतर स्वत:ही डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. या प्रकाराने देवकर पाणंद परिसरात खळबळ उडाली. बोबडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पाच चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्या आधारे पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे. बोबडे हे विश्वकर्मा कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये वर्षभरापासून भाड्याने राहत होते. थकीत घरभाडे आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख बोबडे यांनी चिठ्ठीत केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यापूर्वी सात ते आठ तास अगोदर घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस दलही हादरले आहे. शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तज्ज्ञांनी घटनास्थळी ठश्यांचे नमुने घेतले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

बोबडे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आहेत. आठ वर्षांपूर्वी ते मुंबई येथून सेवानिवृत्त झाले. वर्षभरापूर्वी ते देवकर पाणंद येथील विश्वकर्मा कॉम्प्लेक्स 'के' बिल्डिंगमध्ये भाड्याने राहायला आले होते. त्यांनी मनीषा मुकुंद घोटगे यांच्या मालकीचा ५०३ क्रमांकाचा फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहत होते.

बोबडे यांना दोन मुले व दोन विवाहीत मुली आहेत. त्यापैकी सचिन मुंबईत हॉटेलमध्ये कुक आहे. दुसरा मुलगा संतोष पुण्यात एअर पोर्टमध्ये आहे. बोबडे यांचा चुलत नातू महेश सुरेश अडसुळे हा विश्वकर्मा कॉम्प्लेक्सपासून जवळ असलेल्या रंगकमल सोसायटीत राहतो. बोबडे हे त्यांच्याकडे रोज येत जात. मंगळवारी दुपारी बोबडे यांच्या घरी धुणीभांडी करणारी मोलकरीण नेहमीप्रमाणे कामासाठी आली होती. तिने दरवाजा वाजवून हाक देण्याचा प्रयत्न केला, पण आतमधून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मोलकरणीने, बोबडे यांचे नातेवाईक अडसुळे यांना हा प्रकार सांगितला. अडसुळे यांनी बोबडेंना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाइलही उचलला नाही. अखेर अडसुळे यांच्या पत्नी संध्या व मोलकरीण बोबडे यांच्या घरी गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी लॅचची किल्ली घेऊन दरवाजा उघडला. आतमध्ये पाहताच बेडरुमध्ये बोबडे व त्यांच्या पत्नी रेखा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ नातेवाईक व पोलिसांना या घटनेविषयी कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

राजाराम बंधाऱ्यावरील अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राजाराम बंधारा आधीच धोकादायक स्थितीत असल्याने यावरून होणारी अवजड वाहतूक अधिकच धोक्यात टाकणारी होती. ही बाब तीन दिवसानंतर लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने पोलिसांना बंधाऱ्यावरील वाहतूक थांबण्याचे आदेश दिले. या ठिकाणी शाहूपुरी पोलिसांनी राजाराम बंधाऱ्याकडे जाण्यासाठी असणाऱ्या जय भवानी गल्ली येथे सुरुवातीला बॅरिकेट्स लावून मोठ्या वाहनांची वाहतूक थांबवली. तसेच दोन्ही बाजूला बंदोबस्त ठेवला आहे. शुक्रवारी रात्री शिवाजी पुलावरून कठडा तोडून मिनी बस नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत तेराजण मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर शिवाजी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. पर्यायी वाहतूक कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरून चालू होती.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर रितसर चाचणी घेऊन मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास शिवाजी पूल मोटारी व रिक्षा या हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. या निर्णयामुळे नदीपलीकडील गावांना थोडा दिलासा मिळाला आहे. शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहेत.

अपघातानंतर शिवाजी पुलावरुन अवजड व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला होता. पुलावरुन केवळ दुचाकीची वाहतूक सुरु होती. त्यामुळे चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावरुन सुरु आहे. कसबा बावडा ते निगवे रस्त्यावरील राजाराम बंधाऱ्यावरुन चारचाकी वाहनांचा प्रवास सुरु झाल्याने राजाराम बंधाऱ्याच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान वडणगे, प्रयाग चिखली, आंबेवाडी, निगवे दुमाला या गावातील नागरिकांनी शिवाजी पुलावरुन प्रवासी वाहतूक सुरु करण्याची मागणी केली आहे. या मागणीला अनुसरुन प्रशासनाने हलक्या वाहनांना शिवाजी पुलावरुन वाहतूक सुरु करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास दिला. त्यानंतर पोलिसांनी हलक्या वाहनांची वाहतूक सुरु घेऊन चाचणी घेतली. कठडा तुटलेल्या ठिकाणी दोन हलकी वाहने समोरुन पास होत असल्याचे लक्षात आल्यावर वाहतूक सुरु करण्यात आली. शिवाजी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याची बातमी पसरताच एसटी व केएमटी बससेही शिवाजी पुलापर्यंत आल्या, पण पोलिसांनी अवजड वाहनांना परवानगी दिली नसल्याचे सांगितले. सरंक्षक कठडा बांधून झाल्यानंतर अवजड वाहनांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एसटी व केएमटी या प्रवाशी वाहनानाच प्राधान्य देण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुभेदार सरंक्षक कठडा तातडीने बांधण्याचे आदेश दिले. अपघातामुळे लोकांच्या व वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पुलाच्या कठड्याची दुरुस्ती तत्काळ करणे आवश्यक असल्याने महामार्ग विभागाने पुलाच्या संरक्षक कठड्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याबाबत परवानगी देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, विभागीय वाहतूक अधिकारी सुनील शिंदे, व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाराम बंधारा धोकादायक

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

शिवाजी पुलाचा कठडा तोडून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांना जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर पर्यायी मार्गाने म्हणजेच कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ती अत्यंत धोकादायक आहे. विशेष म्हणजे या मार्गावरुन एसटीसह अवजड वाहनांचा वाहतूकही सुरू आहे. त्यामुळे शिवाजी पुलावरील दुर्घटनेपेक्षा भयंकर दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. पंचगंगा नदीवरील हा बंधारा ८९ वर्षे जुना आहे. आधीच दुरवस्था असणाऱ्या या बंधाऱ्यावरून अवजड वाहतूकही होत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. केवळ बैलगाडी जाण्याची सोय असलेल्या या बंधाऱ्यावरून अवजड वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने कशी परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गळीत हंगाम सुरू झाला की, या बंधाऱ्यावर बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक सुरू होते. ती काही महिन्यांपूरतीच असते. तथापी, शुक्रवारपासून या बंधाऱ्यावरून अवजड वाहतूक सुरू आहे त्यामुळे हा बंधारा अधिक धोकादायक बनला आहे. शिवाजी पुलासारखीच दुर्घटना पुन्हा या बंधाऱ्यावर घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

महाडच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने काही दिवस शिवाजी पुलावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. काही दिवसानंतर त्या प्रकरणाची तीव्रता संपली आणि पुन्हा या पुलावरुनच वाहतूक सुरू राहिली. अर्थात पूल भक्कम असल्याचा निर्वाळा देण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.

राजाराम बंधारा

सन १९२८

बांधकाम पूर्ण

८९ वर्षे पूर्ण

१६ ते ४८ वी मोरीपर्यंत

रस्त्याची दुरवस्था

१५० मीटर

बंधाऱ्याची लांब

४ मीटर

रुंदी

५८

मोऱ्या( गाळे)

१५ फूट

गाळ्यांची उंची

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसची बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधन दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी बैलगाडी, सायकलसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. सिलिंडरची प्रतिकृती, बैलगाडीत ठेवलेली मोटारसायकल आणि जोरदार घोषणांनी मोर्चा लक्षवेधी ठरला. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रमुख वक्त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली. शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांच्या निवेदन दिले.

मोर्चाला दसरा चौकांतून सुरुवात झाली. तत्पुर्वीच कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. जिल्हाध्यक्ष पाटील यांच्यासह प्रमुख नेतेमंडळीचे आगमन झाल्यानंतर सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा प्रवेशद्वारावरच आढवला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भूलथापा देणारे भाजप सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार नसून हे उद्योगपतींचे आहे. तीन वर्षांच्या कालावधीत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला असल्याने त्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. काँग्रेसच्या काळात क्रुड ऑइलचे दर प्रतिबॅरल १२० डॉलर असताना पेट्रोल ६५ तर डिझेलचा दर ५५ रुपये होता. पण सद्यस्थितीत क्रुड ऑइलचा दर ४० डॉलर असतानाही पेट्रोल ८० तर डिझेलचा दर ६७ रुपये प्रतिलिटर करून जनतेची लूट केली जात आहे. भाजपने एकही संस्था स्थापन केली नाही, पण काँग्रेसच्या कालावधीत स्थापन झालेल्या सहकारी, शिक्षण संस्था व कारखाने बंद पाडण्याचा उद्योग सुरू आहे. नागरिकांच्या बँक खात्यांत १५ लाख जमा करण्याचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात एक रुपयाही बँक खात्या जमा झाला नाही. तीन वर्षांच्या कार्यकाळात युवकांना रोजगार देण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवकांना शेती करण्याचा अजब सल्ला देत आहे. विभक्त कुटुंबामुळे शेतीची तुकड्यात विभागाणी झाली असून शेतकऱ्यांच्या मुलांनी जर शेती करायची तर तुम्हीही देवपुजेला जावा,अशी घणाघाती टीका केली.

माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवस द्या, महागाई कमी करतो, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देतो अशी अनेक आश्वासने दिली. आश्वासनातून सर्वसामान्यांची फसवणूक झाली, मात्र चार उद्योगपतींचे भले झाले.'

अॅड. सुरेश कुराडे यांनी 'अच्छे दिना'ची खिल्ली उडत 'बिते हुयेदिन वापस दे'अशी टिपणी करत भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले

मोर्चामध्ये महापौर स्वाती यवलुजे, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरलाताई पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, उदय पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, राजू आवळे, महिला जिल्हाध्यक्षा अंजनाताई रेडेकर, शहराध्यक्ष संध्या घोटणे, भोगावतीचे उपाध्यक्षउदयसिंह पाटील-कौलवकर, जिल्हा युवाध्यक्ष विद्याधर गुरबे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, अभिजित तायशेटे यांच्यासह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

उसाला १५०० रु. दरही देता येणार नाही

एफआरपी निश्चित करताना साखर दर अनुकूल होता. पण त्यानंतर साखरेचा दर क्विंटलमागे ८०० रुपयांनी कमी झाल्याने पुढील वर्षा १,५०० रुपये प्रतिटन दर देता येणार नाही. अशीच स्थिती गुळासह इतर पिकांची झाली असल्याचे सांगत पाटील यांनी सर्वच शेतीमालांना हमीभाव देण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी घेतला मिनी बसचा डेमो

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शुक्रवारी (ता. २६) रात्री शिवाजी पुलावर झालेल्या अपघातातील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) मुख्यालयात मिनी बसची गती आणि वळणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सुमारे ३० किलोमीटर प्रतितास वेगात ८० ते ८५ अंशाच्या कोनात मिनी बस वळू शकते, हे प्रात्यक्षिकांमध्ये स्पष्ट झाले. आरटीओचे अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रात्यक्षिकाचा अहवाल आरटीओ अधिकाऱ्यांकडून चार दिवसांत पोलिसांना प्राप्त होणार आहे.

शिवाजी पुलावर झालेल्या अपघातातील मिनी बस अपघातापूर्वी सुमारे ३० च्या गतीने आली होती, अशी माहिती सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना मिळाली आहे. प्रतितास ३० किमीच्या गतीला मिनी बस ८० ते ८५ अंशाच्या कोनात वळू शकते का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी मुख्यालयातील मोटार वाहन विभागाजवळ मिनी बसचे प्रात्यक्षिक घेतले. प्रात्यक्षिकासाठी शिवाजी पुलावरील अंतर आणि अपघातस्थळ लक्षात घेऊन ५० मीटरचा रस्ता निवडला होता. उजव्या बाजूला ९० अंशाच्या कोनात वळण असलेल्या रस्त्यावर गतीमध्ये बदल करीत दहावेळा प्रात्यक्षिक करण्यात आले. ३० ते २० च्या गतीमध्ये मिनी बस किती अंशात वळण घेऊ शकते, याचा अंदाज अधिकाऱ्यांनी घेतला. अपघातातील बस नवीनच होती. त्यामुळे पोलिसांनी प्रात्यक्षिकासाठी नवीन बसचा (एमपी ११ टीआरएबी ९०६३) वापर केला. चालक सचिन ढोबळे यांनी दहावेळी बसचे प्रात्यक्षिक केले.

अपघातग्रस्त मिनी बसचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी बसच्या गतीचा अंदाज काढला आहे. यानुसार प्रतितास ३० ते ४० या गतीने मिनी बस चालवून पाहिली. प्रात्यक्षिकांमध्ये बसने ८० ते ८५ अंशात वळण घेतले. पोलिसांसह आरटीओच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षिकांचे चित्रीकरण केले असून, फोटोही काढले आहेत. आरटीओचे अधिकारी याचा अभ्यास करून बसच्या वळणाबाबत चार दिवसांत पोलिसांकडे अहवाल सादर करणार आहेत. दरम्यान, २० ते ३० च्या गतीत मिनी बस ८० ते ८५ अंशात वळण घेऊ शकते, हे प्रात्यक्षिकांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बसमध्ये दोष नसल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत आरटीओ अधिकारी आणि पोलिस पोहोचले आहेत. अहवाल आल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते, तपास अधिकारी आरती नांद्रेकर, उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्यासह परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत साळी, ए. के. पाटील यांनी प्रात्यक्षिकांची पाहणी केली.

अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी मिनी बसचा डेमो करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. यानुसार आरटीओचे अधिकारी आणि पोलिसांनी मिनी बसचा डेमो घेतला. याचा सविस्तर अहवाल चार दिवसात प्राप्त होईल. प्रथमदर्शनी ३० ते ४० च्या गतीने मिनी बस तीव्र वळण घेऊ शकते हे स्पष्ट होत आहे.

दिनकर मोहिते, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मिनी बसने अचानक वळण घेतल्याचे दिसते. अशा पद्धतीने मिनी बस वळण घेऊ शकते काय याचा अभ्यास करण्यासाठी मिनी बसचा डेमो घेण्यात आला. डेमोचे चित्रीकरण तपासून याचा अहवाल पोलिसांना दिला जाईल.

डॉ. एस. टी. अल्वारीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणोत्सव पूर्वचाचणी यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बुधवारपासून (ता. ३१ जानेवारी) तीन दिवस होणाऱ्या किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळे काढल्यानंतर पूर्वसंध्येला मंगळवारी, किरणोत्सवाच्या घेतलेल्या चाचणीला यश आले. मावळतीची किरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचल्यामुळे मुख्य किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी किरणोत्सव, चंद्रग्रहण आणि पौर्णिमेदिवशी होणारा देवीचा पालखीसोहळा असा दुर्मिळ योग जुळून आला आहे.

अंबाबाई मंदिरात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असा तीन दिवस किरणोत्सव सोहळा होणार आहे. गेल्या आठवड्यापासून किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्याबाबत देवस्थान समितीचे प्रयत्न सुरू होते. समितीने पाठपुरावा केल्यानंतर सोमवारी दिवसभर महापालिकेच्या नगररचना विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे तात्पुरते अडथळे दूर करण्याची मोहीम राबवली. अडथळे दूर केल्यानंतर किरणोत्सव होतो की नाही हे पाहण्यासाठी मंगळवारी किरणोत्सव पूर्वचाचणी घेण्यात आली. यावेळी किरणे देवीच्या कमरेपर्यंत गेली.

सायंकाळी पाच वाजून ३६ मिनिटांनी किरणांची तिरीप महाद्वारातून गरूड मंडपात आली. नंतर पाच वाजून ५७ मिनिटांनी किरणांनी गणपती चौकात प्रवेश केला. सहा वाजून आठ मिनिटांनी किरणे कासवचौकातून पुढे येऊ लागली. त्यानंतर पितळी उंबरा ओलांडून किरणे पेटीचौकात पोहोचली, तेव्हा सहा वाजून अकरा मिनिटे झाली होती. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी देवीच्या चरणांना स्पर्श करून किरणे मूर्तीच्या वरच्या दिशेला गेली. नंतर किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली आणि लुप्त झाली.

यावेळी अभ्यासक मिलींद कारंजकार, केदार मुनीश्वर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांच्यासह युनिर्वसिटी ग्रॅँड कमिशनचे डॉ. एस. के. गार्क, कुलदीप पिनसा, डॉ. आर. नागराजन उपस्थित होते.

ग्रहणनिमित्त विशेष पूजाकाळ

बुधवारी सायंकाळी ग्रहणकाळ सुरू होणार आहे. सकाळपासूनच मंदिरात देवीसमोर धार्मिक विधी केले जाणार आहेत. तर देवीच्या नित्यपूजेमध्ये किरकोळ बदल होतील. सकाळी ६ वाजल्यापासून ग्रहणवेध लागणार आहेत. याकाळात गर्भकुटीमध्ये देवीच्या उत्सव मूर्तीवर संततधार अभिषेक घातला जाणार आहे. दुपारी देवीला कोरडा नैवेद्य दाखवला जाणार आहे. सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी किरणोत्सव काळात ग्रहण अनुष्ठान आरंभ होईल. देवीला स्नान घालून सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता देवीला वस्त्र नेसवले जाणार आहे. सायंकाळी ६ नंतर मावळतीच्या सूर्यकिरणांचा मूर्तीच्या चरणांना स्पर्श झाल्यावर देवीची आरती केली जाईल. रात्री ८.४१ नंतर ग्रहण समाप्ती झाल्यावर देवीला पुन्हा स्नान, अलंकार तसेच महापूजा बांधली जाईल. त्यानंतर देवीला महानैवेद्य अर्पण केला जाणार आहे. रात्री साडेनऊनंतर देवीचा पौर्णिमेनिमित्त पालखी सोहळा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांकडून परिपत्रकाची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने माथाडी मंडळाच्या विलीनीकरणाच्या नावाखाली कामगार विभागाने ३६ माथाडी मंडळे बरखास्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची दोन परिपत्रके काढली असून कामगारांच्या अन्यायकारी परिपत्रकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने होळी केली. मुठभर भांडवलदारांसाठी माथाडी कामगारांवर अन्याय करणारा निर्णयामध्ये बदल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी केला. मंगळवारच्या आंदोलनामुळे मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरीतील सर्व व्यवहार ठप्प राहिले.

निवेदनात म्हटले आहे, 'राज्यात ५० वर्षांपूर्वी माथाडी कायदा होऊन माथाडी मंडळे स्थापन झाली. या निर्णयामुळे कामगारांना थोडाफार न्याय मिळू लागला. मात्र राज्य सरकार भांडवलदारांसाठी माथाडी मंडळे विलीनीकरण करून कामगारांना देशोधडीला लावत आहे. देशातील अनेक राज्यात माथाडी कायदा सुरू असताना महाराष्ट्र सरकार व कामगार विभाग माथाडी कायदाच बंद करू पाहत आहे. माथाडी कायद्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस व विमा असे लाभ मिळत आहेत. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याऐवजी एकच माथाडी मंडळ करण्यासाठी १७ जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे. परिपत्रकांमुळे कामगारांवर अन्याय होणार आहे.'

या अन्यायाच्या विरोधात राज्यभरात एकदिवसाचे कामबंद करण्यात आले. आंदोलनात जिल्हा हमाल पंचायतीने सहभागी झाल्याने मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी येथील व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व माथाडी बोर्डाचे निरीक्षकांना निवेदन दिले. आजच्या आंदोलनात जिल्हा हमाल पंचायतीचे सेक्रेटरी कृष्णात चौगले, आण्णाप्पा शिंदे, विनोद बोरे, नितीन दळवी, महादेव मुराळ, रुद्राप्पा तेली, सुरेश कोरे, नामदेवर बागल, गोरख लेंडवे, गणपती पाटील, परमेश्वर काकडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ हजार खात्यांची तपासणी अंतिम टप्प्यात

$
0
0

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत तालुकास्तरावर ५७ हजार कर्ज खात्यांची तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खात्यांची तपासणी एक आठवड्यात पूर्ण होऊन कर्ज रक्क्म लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कर्जमाफीची १३२ कोटीच्या यादीमध्ये त्रुटी असल्याने राज्य सरकारच्या आयटी विभागाने यादी रद्द करून त्रुटी शोधण्याचे आदेश दिले. आदेशानुसार गेल्या १५ दिवसांपासून तालुकास्तरावरील समितीकडून यादी पडताळणीचे काम सुरू होते. यामध्ये जिल्हा बँकेच्या ३८ हजार तर राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकाकडील १८ हजार ५९० खात्यांचा समावेश होता. या सर्व खात्यांची तपासणी दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर यादी अपलोड केली जाणार आहे. अपलोड यादी ग्रीनमध्ये मिळाल्यानंतर त्यामधील लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. या प्रक्रिया किमान आठवडा लागणार आहे.

कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असून दीड लाखांवरील कर्जाची रक्कम भरण्याची मदूत ३१ मार्च २०१८ पर्यंत निर्धारीत केली आहे. त्यामुळे एकरक्कमी कर्जफेड करुन दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images