Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर फुटबॉलला हवी ‘ग्लोबल कीक’

0
0

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:@satishgMT

कोल्हापूर ः एकशे तीस संघ, तीन हजारावर खेळाडू आणि साडेचारशे सामने असलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलविश्वाशी सव्वा लाखाहून अधिक फुटबॉलशौकिन जोडले आहेत. असे असले तरी कोल्हापूरच्या फुटबॉल जगताने व्यावसायिकतेचा अंगीकार केलेला नाही. तो कररण्याची गरज आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, संघ आणि प्रशिक्षकांनी कोल्हापूरच्या फुटबॉलचा परिघ केवळ शहर आणि ग्रामीण भागापुरता मर्यादित न ठेवता ग्लोबल होण्यासाठी व्यावसायकितेचे धडे गिरवायला पुढाकार घेतला पाहिजे.

कोल्हापूरचा फुटबॉल केएसए आणि तालमी आणि संघांनी वाढवला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणारे अनिकेत जाधव (भारतीय फुटबॉल संघ व इंडियन अॅरो), सुखदेव पाटील (दिल्ली डेअरवील, भारतीय संघ), निखिल कदम (मोहन बागान) या खेळाडूंनी शाहू स्टेडियमवर एकही सामना न खेळता मैदाने गाजवली आहेत. तर शाहू स्टेडियमवर खेळणाऱ्या कैलास पाटील, इंद्रजित चौगुले, रोहन आडनाईक, निखिल जाधव, विक्रम पाटील आणि योगेश कदम यांनी राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली आहे.

कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये प्रचंड क्षमता आहे. मात्र व्यावसायिकतेची जोड देण्यासाठी योग्य नेतृत्व आणि मार्गदर्शक नसल्याने फुटबॉल् संघाची प्रचंड आर्थिक ओढाताण होत असते. तालमी व मंडळांच्या प्रेमाखातर दानशूर लोकांचे उंबरे झिजवत फुटबॉल संघटक प्रयत्न करत असतात. कोल्हापूरच्या फुटबॉलला व्यावसायिकतेचे धडे देण्यासाठी शिखर संस्था असलेल्या केएसएने पुढाकार घेण्याची गरज आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे सेमिनार आयोजित करताना संघ आणि खेळाडूंमध्ये आर्थिक स्रोत तयार व्हावेत, यासाठी सल्लागारांची भूमिका बजावण्याची गरज आहे. कोल्हापूर एफसी, आयलीगसाठी संघ उभारण्यासाठी केएसएने पुढाकार घेण्याची गरज आहे.

उत्कृष्ट खेळाडू आपल्या संघात असावेत यासाठी वरिष्ठ संघ खेळाडूंशी करार करतात. नायजेरियन खेळाडूंना सहा महिन्यांसाठी ५० हजार ते एक लाख रुपये मानधन, दर महिन्याला जेवण भत्ताही दिला जातो. शहरातील काही खेळाडूंना १५ ते २० हजार रक्कम दिली जाते. बहुतांशी खेळाडू तालमी आणि संघाच्या प्रेमाखातर मोफत खेळत असतात. खेळाडूला अडचण आली तर संघ मात्र आर्थिक मदत करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत, पण हल्लीच्या काळात ‘लष्कराची भाकरी भाजण्या’पेक्षा प्रत्येक खेळाडूंचा आर्थिक स्रोत सुरू राहण्यासाठी संघांनी पुढाकार घेतला पाहिजे.

शेकडो फुटबॉलशौकिनांचे पाठबळ लाभल्याने स्पर्धा आयोजकांना प्रायोजक मिळाले तर केएसए, वरिष्ठ संघांना प्रायोजक मिळू शकतात. त्यासाठी संघांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारून तसे प्रयत्न केले पाहिजेत. केएसए, संघ, खेळाडूंनी व्यावसायिक गुण अवगत केले तरच कोल्हापूरचा फुटबॉल आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. कोल्हापूरचा फुटबॉल आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर आयलीगचे संघ तयार होतील. देशभरातील बलाढ्य संघ कोल्हापुरातील खेळाडूंना बुक करतील. पेठा-पेठा आणि तालमी-तालमीतील फुटबॉल ग्लोबल होऊ शकेल.

तिकिट काढा, संघ सक्षम करा

फुटबॉल सामन्यासाठी दहा रुपये शुल्क आकारले जाते, पण बहुतांशी फुटबॉलशौकिन ऐपत असतानाही फुकट सामने पाहण्यात धन्यता मानतात. फुटबॉल तिकिटातील एकूण रकमेपैकी काही वाटा संघांना मिळतो. तिकिटाच्या रकमेतून केएसए व संघाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते. संघ आणि खेळाडूचा विचार लक्षात घेऊन फुटबॉलशौकिनांनी तिकिट काढून सामने पाहण्याचा निर्धार केला तर संघ आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला मदत होईल.

हुल्लडबाजी रोखायहा हवी

संघ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळालेच पाहिजे, पण काही हुल्लडबाज समर्थकांच्या अर्वाच्च भाषा, शिविगाळीमुळे फुटबॉल बदनाम होत आहे. हुल्लडबाजीमुळे काही वेळा सामने बंद ठेवावेत लागतात. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. दगडफेक आणि मारामारीच्या घटनेमुळे एखाद्याचे करिअरही खराब होऊ शकते. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी केएसए, संघ आणि समर्थकांनी आचारसंहितेचे पालन करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरपद न मिळाल्याने बनछोडेंचे कार्यकर्ते आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओबीसीसाठी राखीव असलेल्या साडेचार महिन्याच्या कालावधीसाठीच्या पदासाठी विचार होत नाही तर खुल्या प्रवर्गातून आमचा काय विचार होणार? पद द्यायचेच नव्हते तर आशा कशाला दाखवली? मुलाखतींचे नाटक कशाला केले? गेल्या सभागृहापासून आम्हाला डावलले, आता पक्षाचा विचार कशाला करायचा? आमच्यावर नेहमीच अन्याय होत आहे, पक्षाच्या जिवावर नव्हे तर आमच्या जिवावर विजय मिळवला आहे, विधानपरिषद निवडणुकीतही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिल्याचे हेच फळ का? अशा कडवट भावना नगरसेविका उमा बनछोडे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांसमोर व्यक्त केल्या. पक्षाचा राजीनामा द्या, नाही तर घराची पायरी चढणार नाही, असा इशाराही बनछोडे यांना कार्यकर्त्यांनी दिला. त्यानंतर माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे व नगरसेविका बनछोडे यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. यामुळे शनिवार पेठेतील बनछोडे यांच्या घरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

काँग्रेस पक्षाकडून महापौरपदासाठीची उमेदवारी मिळवण्यासाठी नगरसेविका उमा बनछोडे प्रयत्नशील होत्या. त्यांचे सासरे माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, पती शिवानंद बनछोडे यांनीही दोन दिवसांपासून लिंगायत समाजातील विविध मान्यवरांच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे फिल्ड‌िंग लावली होती. पण सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाती यवलुजे यांना निरोप गेला. त्यानंतर बनछोडे नाराज झाल्यानंतर आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयातून थेट घरी गेल्या. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बनछोडे यांच्या शनिवार पेठेतील घरी गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते प्रवीण केसरकर, अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, राजेश लाटकर, राहुल माने, प्रताप जाधव, इंद्रज‌ित बोंद्रे, मधुकर रामाणे, सचिन चव्हाण गेले होते. त्यावेळी श्रीकांत बनछोडे, शिवानंद बनछोडे तसेच नाराज झालेले कार्यकर्ते उपस्थित होते.

देशमुख यांनी ‘अजून अडीच वर्षाचा कालावधी असताना नाराज होण्याची आवश्यकता नाही. खुल्या गटातून प्रयत्न करा,’ असे बनछोडे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. परिसरात शिवसेनेचे वर्चस्व असताना आम्ही स्वतःच्या हिमतीवर सलग दोनदा विजयी झालोय. त्यावेळी पक्षाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतरही पक्ष व नेत्यांकडून जर आमचा महापौरपदासाठी विचार होत नसेल तर पक्षात कशाला रहायचे? सलग दोनवेळा कसबा बावड्यात पदे दिली जातात मग आम्ही पक्षाचे काम करत नाही का? अशा प्रकारे पक्षाकडून डावलले जात असेल तर पक्षात कशाला रहायचे? आत्ताच राजीनामा त्यांच्याकडे द्या, अन्यथा एकही कार्यकर्ता तुमच्या घराची पायरी चढणार नाही, अशा तीव्र शब्दात भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या. ‘साहेबांना आमच्यासमोर बोलवा,’ असाही आग्रह धरला.

त्यानंतर श्रीकांत बनछोडे यांनाही नाराजी लपवता आली नाही. ‘गेल्या सभागृहात स्थायी सभापतीपदाची इच्छा असताना मला थांबायला सांगितले. आता महापौरपदाची संधी असताना ऐनवेळी नाव वगळले. आमची काय लायकी नाही का? शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत ठेवण्यापेक्षा काल आम्हाला सांगितले असते तर आम्ही थांबलो असतो. काही अडचण नसताना, ज्येष्ठत्व असताना उमेदवारी नाकारण्याने माझा नव्हे तर लिंगायत समाजाचा अपमान केला आहे. कार्यकर्ते मला येऊन बोलत असून त्यांना रोखण्यास मी हतबल झालो आहे,’ असे सांगत त्यांना अश्रू अनावर झाले. नगरसेविका उमा बनछोडे यांनी जातीचा दाखल्याचे प्रकरण नसल्याने मला उमेदवारी मिळायला हवी होती, असे सांगताना त्यांनाही अश्रू लपवता आले नाही.

देशमुख, लाटकरांना काढली समजूत

देशमुख व लाटकर यांनी बनछोडे व कार्यकर्त्यांची समजूत काढली. देशमुख म्हणाले, ‘आमदार पाटील यांनी शब्द दिला व नंतर फिरवला असे नाही. तुमच्या भावना मी त्यांच्यासमोर मांडतो. ते ​अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही कार्यकर्त्यांसोबत त्यांची भेट घ्या व चर्चा करा. पण घाईने निर्णय घेऊन राजकारण संपवू नका. महापालिकेतील पदाधिकारी निवडीवेळी अशा वातावरणातून आम्हीही गेलो आहे. आधी निर्णय घेता येत नाहीत. त्यांच्या अडचणीही समजून घ्या.’ त्यानंतर सर्व नगरसेवक निघून गेल्यानंतर श्रीकांत बनछोडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. अतातायीपणे निर्णय घेणे बरोबर नाही,’ असेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइनबाजारमध्ये कारची विजेच्या खांबाला धडक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भरधाव कारने विजेच्या खांबाला जोराची धडक दिली. यावेळी विजेचा खांब दोन रिक्षा व तीन दुचाकींवर पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. रविवारी (ता. १७) रात्री लाइनबाजार परिसरात हा अपघात झाला. यात अमोल अशोक जाधव (२२, रा. लाइन बाजार), राहुल नंदकुमार जाधव (२५, रा. राजारामपुरी) हे दोघे जखमी झाले.

संग्रामसिंह विलासराव जाधव, अमोल जाधव आणि राहुल जाधव हे तिघे राहुल नंदकुमार जाधव (रा. लाइन बाजार, छावा चौक) यांची कार घेवून बाहेरगावी गेले होते. रविवारी रात्री ते लाइन बाजार येथे आले. घरापासून काही अंतरावरील पद्मा पथकाजवळ भरधाव करवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावरील विद्युत खांबाला धडकली. जोरदार धडकेत विद्युत खांब रस्त्यावर कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या तीन दुचाकी आणि एका रिक्षावर विजेचा खांब आदळल्याने वाहनांचे नुकसान झाले. कारच्या समोरील काच, हेडलाइट, बॉनेटचे दीड लाखांचे नुकसान झाले. रिक्षाचालक विलास पांडुरंग धुमाळ, चंद्रकांत शिर्के, तस्लिम असेफ शेख, प्रफुल्ल विलासराव धुमाळ, गजानन दिनकर जाधव, शामराव वसंतराव घाटगे (सर्व रा. लाइन बझार) आदींच्या वाहनांचे सुमारे ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले.

रस्त्यावर खांब कोसळल्याने विजेच्या ताराही लोंबकळत होत्या. त्यातून विद्युत प्रवाह सुरू असल्याने नागरिकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ अग्निशामक दलास कळवले. जवान ओंकार खेडकर, रमेश पोवार, सुरेंद्र जगदाळे, निवास जाधव, तानाजी वडर यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलवून विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर कारमधील जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाकडे या घटनेची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत योजनेसंदर्भात हरित लवादासमोर कागदपत्रे सादर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने ‘अमृत’ योजनेंतर्गत दिलेल्या ५८ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या वर्कऑर्डवरची माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी सोमवारी स्वतः हरित लवादापुढे हजर राहून सादर केली. याबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. २२) पुढील सुनावणी होणार आहे. न्यायाधीश यू. डी. साळवी व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नंदा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

अमृत योजनेअंतर्गत कामाच्या प्रगतीची माहिती मोघमात दिल्याचे सांगत राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आयुक्तांनी परिपूर्ण वर्क ऑर्डरसह हजर राहण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार आयुक्त डॉ. चौधरी यांनी २४ ऑक्टोबर, २०१७ पासून तीस महिन्यांत योजना पूर्ण करण्याचे हमीपत्र सादर केले. रंकाळा प्रदूषण व सुशोभिकरणाबाबत पर्यावरण प्रेमी सुनील केंबळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवादपुढे सुनावणी झाली. अमृत योजने अंतर्गत शहरात १६० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये ११२ किलोमीटरची ड्रेनेज योजना व दुधाळी येथे ६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधणे, नाले अडविणे व वळविणे या कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील ५८ कोटींच्या कामाची निविदा जादा दराने मंजूर झाली आहे. त्यामुळे सात कोटी रुपयांचा अधिक बोजा पडणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी ३० महिन्याचा कालावधी आहे. ही वर्क ऑर्डर प्रतिज्ञापत्रावर दिलेली नाही. फक्त नाले अडविणे व वळविणे इ. असा उल्लेख वर्कऑर्डरमध्ये असल्याने लवादाने याबाबत स्पष्टता मागितली होती. लवादापुढील सुनावाणीवेळी महापालिकेने सर्व कागदपत्रे सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या संपर्कातील व्यक्तींचीजबाब नोंदविण्याचे काम सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळे प्रकरणातील संशयितांच्या संपर्कात आलेल्यांचे जबाब नोंदविण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले आहे. संबधितांनी कोणत्या कारणासाठी संपर्क साधला, याची माहिती घेतली जात आहे. या चौकशीतून काही महत्वपूर्ण साक्षीदार समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, सीआयडीच्या पुणे विभागाचे अधीक्षक श्रीकांत पाठक मंगळवारी सांगलीत दाखल झाले असून, त्यांनी शहर पोलिस जाऊन अनिकेतवर थर्ड डिग्रीचा अमानुष वापर झालेली खोली आणि संशयितांकडून डी. बी. रुम म्हणून वापर केल्या जाणाऱ्या खोलीची पाहणी केली. रात्री उशीरांपर्यंत पाठक चौकशी करीत होते. अनिकेत कोथळे प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्सची यादी मोठी आहे. त्या कॉल डिटेल्सची छाननी करण्यात आली असून, घटनेच्या पूर्वी आणि घटनेनंतरच्या काही कालावधित संशयितांच्या संपर्कात आलेल्यांची एक यादी करण्यात आली आहे. त्या यादीनुसार संबधितांना बोलावून घेऊन त्यांच्या संपर्काचे कारण विचारले जात आहे. या चौकशीत कामटेसह इतर संशयितांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. काही खासगी व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. अनिकेत प्रकरणाशी संबधित असलेल्या व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत. यामधून काही महत्वपूर्ण साक्षीदार मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संशयितांच्या गुन्हेगारी कृत्याला किंवा गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्यांचे नाव निष्पन्न होण्याची शक्यता आहे. संशयितांचे केवळ कॉल डिटेल्सच सीआयडीच्या हाती लागले नाहीत तर घटनेनंतर संशयितांनी कुठे कुठे धावपळ केली, याचा ठाव ठिकाणाही मिळाला आहे. त्यामुळे घटनाक्रम निश्चित करण्यासाठी, आणखी कोणी संशयित असेल तर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि महत्वपूर्ण साक्षीदार समोर आणण्यासाठी कॉल डिटेल्सची कसून चौकशी उपयुक्त ठरणार आहे.
संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
अनिकेत कोथळे प्रकरणातील संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करून एक जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या अगोदर कोर्टाने दिलेल्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी कळंबा कारागृहातून सर्व सहाही संशयितांना सांगली कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी संशयितांच्या तोंडावर बुरखे नव्हते आणि त्यांच्यासाठी फार मोठा बंदोबस्तही नव्हता. बघ्यांनीही गर्दी केली नसल्याने संशयितांना थेट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत एक जानेवारीपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश दिला. पुन्हा त्या संशयितांना घेऊन पोलिस गाडी कळंबा कारागृहाकडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा व्याजदराच्या अमिषाने फसवणूकभूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लि. विरुद्ध गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
ठेवींवर भरमसाठ व्याज आणि मुद्दल किंवा त्या किमतीचा प्लॉट देण्याचे अमीष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या सांगलीतील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सुशिला सुभाष पाटील यांनी आपली दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद मंगळवारी दिली. संबधित कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम याच्यासह सर्व संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

मिरज तालुक्यातील इनामधाणमी येथील मनोज सुखदेव कदम याने काही वर्षांपूर्वी सांगलीतील पुष्पराज चौकात भूमी प्रॉपकॉन नावाची कंपनी थाटली. त्यानंतर गुंतवणुकीवर महिन्याला बारा टक्के व्याज देण्याचे अमीष दाखवून एक वर्ष ते नऊ वर्षांच्या मुदतीच्या ठेवी गोळा केल्या. सुशिला पाटील यांनी मनोज कदम हा गावचाच असल्याने त्याच्या अमिषाला बळी पडून आपल्या नावे पाच लाख आणि सून सन्मती विद्यासागर पाटील हिच्या नावे पाच असे दहा लाख रुपये मार्च २०१४मध्ये गुंतवले. त्यांनी ही रक्कम एका वर्षांसाठी गुंतवली. परंतु, त्यांच्या हातात पडलेल्या सर्टिफिकेटवर तुमची रक्कम सहा वर्षांसाठी गुंतवल्याची नोंद होती. या बाबत जाब विचारला असता कदमने ‘आम्हाला तसे रेकॉर्ड करावे लागते, तुमची ठेव एक वर्षानंतर तुम्हाला दिली जाईल,’ असे सांगितले. एक वर्ष लोटले तरी त्याने ठेवीची रक्कम दिली नाही. प्रत्येक महिन्याला ११ हजार रुपयांप्रमाणे तो व्याज देत होता. १६ महिन्यांचे १ लाख ७६ हजार रुपये दिल्यानंतर त्याने व्याजही देणे बंद केले. ऑगस्ट २०१६मध्ये हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील दर रोज कंपनीत हेलफाटे मारत राहिल्या. त्यांच्याप्रमाणे अनेक गुंतवणूकदार हेलपाटे घालत होते. आपले पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने मंगळवारी पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात धाव घेऊन आपली दहा लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावमध्ये तणाव;२३ जणांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
शहरातील संवेदनशील मानल्या गेलेल्या खडक गल्ली, दरबार गल्ली, खडेबाजार आणि जालगार गल्लीत सोमवारी रात्री समाजकंटकांनी तुफान दगडफेक करून वाहनांची मोडतोड जाळपोळ करून हैदोस घातला. समाजकंटकांनी काही घरात घुसून मारहाण केली आहे. पोलिस अधीक्षक शंकर मारिहाळ समाजकंटकांच्या दगडफेकीत जखमी झाले. पोलिसांना घटनास्थळी पोचण्यास उशीर झाल्यामुळे समाजकंटकांचे अधिकच फावले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेक, जाळपोळ प्रकरणी एकूण तेवीस जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरापासून शहरात किरकोळ घटनांमुळे तणाव उद्भवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लग्नाच्या वरातीवर दगडफेक करून शहापूर भागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला होता. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत देखील समाजकंटकांनी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी रात्री दगड, विटा आणि बाटल्यांचा खच संवेदनशील भागात पडला होता. अनेक घरावर दगडफेक करून, काचा फोडून नुकसान केले. रस्त्यावर थांबवल्या वाहनांची मोडतोड केली, पोलिसांच्या वाहनाचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे.
उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक आणि प्रभारी पोलिस आयुक्त डॉ. के. रामचंद्रराव, उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह संवेदनशील भागात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुस्लिम समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अटक करण्यात आलेल्या निरपराधांना सोडण्याची मागणी केली. तर हिंदुत्ववादी संघटनांच्या नेते मंडळींनी पोलिस महानिरीक्षक रामचंद्रराव यांची भेट घेऊन पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल कशी जाते? असा सवाल करून समाजकंटकाना अद्दल घडवावी, अशी मागणी केली. सायंकाळी पोलिसांनी संवेदनशील भागातून पथ संचलन केले. पथ संचालनात पोलिस महानिरीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी, स्पेशल फोर्स पथक सहभागी झाले होते. तणावग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुब्रतो रॉय यांच्यामालमत्तांची जप्ती

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा ग्रुपचे मालक सुब्रतो रॉय यांच्या साताऱ्यातील जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दाबे डोंगर पठारावरील दोन टेबल लँडवरील त्यांची शेकडो एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. या बाबतचे फलकही संबंधित जागांवर लावण्यात आले आहेत.
आठवड्यापूर्वी मोठ्या पोलिस बंदोबस्तात महसूल विभागाने उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्यातील दाबे पठारावर मोठा फलक उभा करून जप्तीचे आदेश जारी केले आहेत. सातारा महसूल व पोलिस यंत्रणेने फ्लेक्स लावले असून, शेकडो एकराचे डोंगर ताब्यात घेतले आहेत.
ही कारवाई अत्यंत गोपनीय असल्याने याची खबर कुणालाही समजली नाही. दरम्यान, सहारा ग्रुपच्या जावली, महाबळेश्वर, पाटण आणि म्हसवड या भागातील जमिनी जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती पुढे आली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोव्यातील तरुणांच्या पाच अपहरणकर्त्यांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोवा येथील चार तरुणांचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीतील पाच अपहरणकर्त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीमाभागातून अटक केली. नऊ डिसेंबरला चार तरुणांचे अपहरण झाले होते. पोलिसांनी अपहृत तरुणांची सुटका केल्यानंतर शिताफीने पाच अपहरणकर्त्यांना अटक केली.

नेताजी संभाजी मोहिते (वय २३, रा. सेनापती कापशी, ता. कागल), अवधूत संजय लुगडे (२१, रा. अर्जुनवाडा, ता. कागल), प्रवीण बाळासाहेब जाधव (२८, गुरुवार पेठ, निपाणी), मिलिंद सुरेश शोकासने (२८, महादेव गल्ली, निपाणी) आणि आकाश संजय मोरे (२३, आकोश रोड, निपाणी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. संशयितांना कागल पोलिसांकडे सोपवले आहे.

आठ डिसेंबरला म्हापसा येथून राहुल धारगळकर, सावळो गावकर, ज्ञानेश्वर गोकाककर आणि मनोज गावकर हे चौघे देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. नऊ डिसेंबरला त्यांचे निपाणी परिसरातून अपहरण झाले. त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांची मागणी नातेवाईकांकडे केली होती. दिलीप पुंडलिक धारगळकर (५६, रा. म्हापसा, गोवा) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अपहृत तरुणांची १२ डिसेंबरला सुटका केली. यानंतर सीमा भागातून पाच अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. पाच संशयितांना मंगळवारी रात्री कागल पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपहरणकर्त्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काही पिण्यात गेले, काही पुण्यात...

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले, पुरुष हे भाबडे, हळव्या मनाचे’, ‘मुंबई आणि पुणे येथील व्यक्तीचे स्वभाव, निवृत्तीनंतरचे आयुष्य, निवृत्त नोकरांचे बघा काय हाल झाले,’, अशा विडंबनात्मक कवितेतून सामाजिक व्यवस्थेवर मारलेले फटकारे, मिश्कील किस्से आणि हास्यरसाची निर्मिती कवी अशोक नायगांवकर यांनी करून रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री भास्करराव जाधव वाचनालयातर्फे आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेत हास्य मैफील रंगवली. या कार्यक्रमासाठी केशवराव भोसले नाट्यगृह हाउसफुल झाले.

मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी ‘पाणीपुरी, भेळ खाणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे’, या कवितेने नायगावकर यांनी काव्यमैफलीची सुरुवात केली. कुटुंबव्यवस्थेवर झालेला परिणाम, स्वेच्छानिवृत्तीनंतर घरातूनच मिळणारी सापत्न वागणूक, स्वानुभव, स्त्री-पुरुष स्वभावातील मूलभूत फरक, विविध बदलांचा समाज, भारतीय कुटुंब व्यवस्थेवरील मार्मिक कविता सादर करत हास्य फुलविले. पुरुष हे भाबडे, हळव्या मनाचे असल्याचा प्रत्यय स्वयंपाकघरात येतो. स्त्री जरी कोमल हृदयाची असली, तरी भाजीसोबतचा तिचा व्यवहार हिंसाचारी असतो, हे व्यक्त करणारी ‘वांग्याला भाजलं जातंय, भर बाजारात कांद्यावर सपासप वार होतोय, तिखट टाकलं जातंय भाजीच्या डोळ्यांवर’ ही कविता सादर करून नायगावकरांनी उपस्थितांना हास्यरसात डुंबविले. हल्ली साबणाच्या जाहिरातींत होणाऱ्या मॉडेलचा वापर सांगताना हल्ली टी.व्ही.वर सकाळी, दुपारी, संध्याकाळी फेसच फेस दिसतो. मात्र, पुरुषांच्या जाहिरातीमध्ये मात्र जंतुनाशक साबणच दाखवले जात असल्याच्या मिश्किल फटकाऱ्यांनी उपस्थितांत हास्यकल्लोळ उडाला.

महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या हस्ते कवी नायगावकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांच्या हस्ते ऊर्जा क्रिएश्नचे अरुण नाईक यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, ऐतिहासिक परंपरा असलेल्या करवीरनगरीतील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर पहिल्यांदाच आलो. या नाट्यगृहाचे नवे रूप पाहून थक्क झाल्याच्याही भावना नायगावकरांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनेक्टिव्हिटीतून होईल विकास

0
0


Sachin.Yadav

@timesgroup.com

Tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर विमानसेवा आठवड्यातून तीन दिवसांऐवजी सहा दिवस करण्याची गरज आहे. सहा दिवसांच्या विमानसेवेसह अन्य विमानतळांवर कनेक्टिव्हिटी झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. हॉपिंग सेवा देऊन बेळगाव, गोवा, हैदराबाद या विमानतळांची कनेक्टिव्हीटी वाढू शकते. कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर व्यापार, उद्योग, मेडिकल, आय.टी., शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटनासाठी कोल्हापूर मोठे डेस्टिनेशन ठरणार आहे. नऊ सीटसाठी सरकार अनुदान देणार असल्याने विमानसेवेला पाठबळ मिळणार आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २५०० रुपयांत करता येणार आहे.

कोल्हापूरची विमानसेवा सुरू होत असल्याने देशभरातील विमानतळांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. कोल्हापूरचा विमानतळ राष्ट्रीय रनवेवर येणार आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, नांदेड, नाशिक, जळगाव, सोलापूर, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, जम्मू, श्रीनगर, चंदीगडसह देशभरातील महत्त्वाच्या विमानतळांशी संपर्क वाढू शकतो. परिणामी छोट्या शहरांची कनेक्टिव्हिटी अधिक वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मुंबई विमानतळ प्रवाशांना महत्त्वाचा ठरणार आहे. गोवा आणि बेंगळुरू विमानतळावरूनही आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असल्याने त्याचा फायदा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर ते तिरूपती देवस्थानला दरवर्षी जाणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. कोल्हापूर ते हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्यास भाविकांना सोयीचे ठरणार आहे. तिरूपतीच्या दर्शनानंतर अंबाबाईचे दर्शन घ्यायलाच हवे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरची विमानसेवा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. हैदराबाद विमानतळावरून बेंगळुरू, चेन्नई मार्गावरील विमानसेवा सोयीची ठरणार आहे. प्रवासी विमानाची उड्डाणे सुरू झाल्यानंतर भविष्यात मालवाहतूक विमानांसह एक्स्पोर्ट हब कोल्हापुरात निर्माण होऊ शकेल. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होईल. कोल्हापूर विमानतळाचा उपयोग कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरातील प्रवाशांना होणार आहे. शेतीमाल उत्पादने आणि उद्योगाचे मोठे नेटवर्क जोडले जाणार आहे. पुणे, मुंबई, कर्नाटक आणि गोव्याशी संपर्क वाढणार आहे. गुजरातमधील अनेक नागरिक कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. कोकणातील काही मंडळीही कायमस्वरूपी कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. कोल्हापूरच्या विमानतळामुळे सागरी किनाऱ्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रहातूनही सिनेमा जगायला हवा

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भारतीय सिनेमा तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक होत आहे. पण कोणतीही सुविधा व साधने नसताना तयार झालेल्या सिनेमातून या क्षेत्राचा एक इतिहास आहे. सिनेमांच्या विषयातून विविधांगी संस्कृती मांडण्यात आली आहे. सिनेमाचा हा संग्रहित ठेवा जतन व संवर्धन होण्याची गरज आहे. या संग्रहातून सिनेमा जगायला हवा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यायला हवे,’ असे आवाहन राष्ट्रीय फिल्म संग्रहालयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी केले.

कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने व कोल्हापूर वस्तुसंग्रहालय आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (​किफ्फ) मुक्त संवाद व्यासपीठावर ते बोलत होते. ‘फिल्म संवर्धनाची गरज व महत्त्व’ या विषयावर मगदूम यांनी रसिकांशी संवाद साधला. यावेळी ‘किल्ले रायगड’ माहितीपटावरही सविस्तर चर्चा झाली.

सिनेमा पाहण्याइतकाच तो संग्रहालयाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडणे हा एक प्रवाह आहे असे सांगून मगदूम म्हणाले, ‘सिनेमांच्या फिल्म खराब होत आहेत. त्यापैकी अनेक फिल्म दुर्मिळ आहेत. त्यांची निगा राखणे गरजेचे आहे. सिनेमा हे तंत्र जेव्हा सुरू झाले आणि ते पडद्यावर साकारले तेव्हापासून ते आता स्पेशल इफेक्टचा वापर करून भव्यतेची अनुभूती देण्यापर्यंत सिनेमामध्ये अर्थातच आमूलाग्र बदल झाला आहे. पण भविष्याकडे वाटचाल करत असताना इतिहासाच्या खुणा जपून ठेवणे ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच सिनेमाही संग्रहातून जगायला हवा. हा संग्रह सिनेमाचं जन्मणं...वाढणं...प्रगल्भ होणं हा प्रवास समजून घ्यायला नक्कीच मदत होईल. सिनेमा ही कला सध्या व्यवसाय बनली असली तरी सिनेमासह संहिता, पोस्टर्स यासह जुन्या संग्रहाचे संवर्धन करण्यासाठी या क्षेत्रातील कलाकारांनी पुढाकार घ्यायला हवा.’

१९१३ साली पहिला सिनेमा बनला, तर १९६४ साली राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाची स्थापना झाली. मधल्या ५१ वर्षांच्या काळातील सिनेमांशी संबंधित फिल्मचे संवर्धन होऊ शकले नाही अशी खंत व्यक्त करत मगदूम म्हणाले, ‘त्यामुळे अनेक चांगल्या सिनेमांची एकही स्मृती जतन होऊ शकली नाही. सिनेमासंदर्भातील इतिहास सांगणारे विपुल ज्ञान व माहिती आपल्या देशात मौखिक स्वरूपात आहे. पण ते कागदावर नाही.

त्यामुळे भविष्यात ही दरी भरून काढण्याची गरज आहे. परदेशातील व्यक्तींना, रसिकांना भारतीय सिनेमाबाबत फार आकर्षण व आदर आहे. त्यांच्याकडून भारतीय सिनेमाशी संबंधित अनेक संग्रह आहेत.

लंडनमध्ये सिनेमा संवर्धनाबाबत तीव्र जागृती असून तेथे १२ राष्ट्रीय फिल्म संग्रहालये आहेत. ज्यामध्ये सिनेमाच्या विषयानुसार संग्रह केला आहे. ही मानसिकता आपल्या देशात नसल्यामुळेच अद्याप एकच संग्रहालय आहे. हे एकट्या सरकारचे काम नसून सिनेमा क्षेत्रातील सर्वांनी योगदान दिले पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगड प्राधिकरण अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे

0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे रायगड प्राधिकरणाची घोषणा केली. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली.

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. राज्य आणि देशभरातील शिवभक्त दरवर्षी रायगडावर जातात. रायगडासह शिवकालीन गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्यसरकारने भरीव निधी मिळावा, अशी मागणी दरवर्षी केली जात होती. २०१६ मध्ये रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड व परिसर संवर्धनासाठी ६०० कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. खासदार संभाजीराजे यांच्याकडून रायगड किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगडाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा व भुदरगड किल्ल्यांसाठी १० कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणला व त्याचे संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. युनेस्को या जागतिक वारसा जतन व संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूरात आमंत्रित करून महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेतही त्यांनी शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा, अशी मागणी केली आहे. यावर्षी पाच जून २०१७ रोजी राजगडाचे संवर्धन करण्यासाठी तज्ज्ञ, अभ्यासकांचा परिसंवाद आयोजित करुन चर्चा केली होती. रायगड प्राधिकरण योजनेत सिंधुदूर्ग किल्लाचा समावेश करण्यात आला आहे.

प्राधिकरणाच्या समितीत रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण आयुक्त जगदीश पाटील, पर्यावरण व सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव नितीन गद्रे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एएसआय रिजनल जनरल डॉ. एम. नंबीराजन, ​डायरेक्टर जनरल डॉ. उषा शर्मा, एमटीडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय वाघमारे, रायगड जि. प. सीईओ अभय यावलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, रघूजी आंग्रे, इतिहास अभ्यासक राम यादव, सुधीर थोरात आदींचा सामावेश करण्यात आला

भारताचा मानबिंदू व श्रद्धास्थान असलेल्या रायगडाचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली असून सर्व शिवभक्तांच्या वतीने मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. रायगड हा आपल्या सर्वांचा असून रायगडाच्या संवर्धन कार्यात प्रत्येक शिवभक्तांचे योगदान महत्त्वाचे आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, कायम विनाअनुदानित मूल्यांकनपात्र कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षकांना अनुदान द्यावे, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराव्यात, वरिष्ठ निवड वेतनश्रेणी आदेश रद्द करावा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात शिक्षकांनी मागण्यांबाबत सरकारच्या दिरंगाईचा तीव्र निषेध केला. शिक्षकांची आर्थिक कुचंबणा थांबवली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनेतर्फे अध्यक्ष ए. डी. चौगले यांनी दिला.

कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी अडीच ते साडेचार यावेळेत करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातून पाचशेहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी प्रा. अविनाश तळेकर, सी. व्ही. जाधव, पी. के. पाटील, विजय मेटकरी, सी. जी. कदम यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केले.

दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना चौगले म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासून संघातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. न्याय मागण्यांबाबत सरकारला पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे. गेल्या १५ वर्षांपासून कायम विनाअनुदानित काम करणारे शिक्षक तुटपुंज्या वेतनावर अध्यापन करत आहेत. त्यांना तत्काळ वेतन मिळाले पाहिजे. नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर अंशत: अनुदान, घड्याळी व अर्धवेळ कार्यभार लागू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याची मागणी संघातर्फे केली आहे. तर ​शिक्षकांना दिवाळीत वेतनाची रक्कम दिली जाईल हे शिक्षणमंत्री तावडे यानी दिलेले आश्वासन पाळले गेलेले नाही. ९३५ पदांमधील मान्यता न झालेल्या शिक्षकांमधील अनेक शिक्षकांचे अर्धवेळ वेतन सुरू होते ते सध्या बंद आहे. त्यांची मान्यता होईपर्यंत अर्धवेळ पायाभूत पदांचे वेतन मिळाले पाहिजे ही मागणीही अद्याप दुर्लक्षित आहे. जून २०१७ पूर्वी लागू झालेल्या तासिका व अर्धवेळ तसेच पूर्णवेळ कार्यभारावरील शिक्षकांना अभियोग्यता चाचणीतून वगळण्यात यावे हा मुद्दाही यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनकाळातही शिष्टमंडळातर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान मागण्या मान्य करण्यात ​दिरंगाई होत असून याविरोधात सातत्याने आंदोलन करण्याचा​ निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रद्दीसाठी परवाना विभागात चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या परवाना विभागात झालेल्या चोरीचा लक्ष्मीपुरी पोलिसांनी छडा लावला. भंगार गोळा करणाऱ्या दोन महिलांनी परवाना विभागाचे कार्यालय फोडून फाइल्स आणि कागदाचे गठ्ठे लंपास करून ते रद्दीत घातले होते. याप्रकरणी सुवर्णा मोहन गोसावी (वय ४५) आणि कविता संभाजी गोसावी (३५, दोघीही रा. वडणगे, ता. करवीर) या दोघींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीतील कागदपत्रे जप्त केली आहेत. शुक्रवारी (ता. १५) पहाटे चोरीचा प्रकार घडला होता.

शिवाजी चौकातील शिवाजी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर महापालिकेचे परवाना विभागाचे कार्यालय आहे. शुक्रवारी पहाटे या विभागाचे शटर उचकटून अज्ञातांनी कागदपत्रांची चोरी केली होती, मात्र शुक्रवारी महापालिकेला वर्धापनदिनाची सुटी असल्याने हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. चोरट्यांनी कार्यालयातील १९९० ते २०१५ या काळातील अन्न औषध प्रशासन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, हस्तांतर प्रस्ताव, सामान्य पावती पुस्तके, रजिस्टर, अर्ज लंपास केले होते. महत्त्वाचे दस्तऐवज लंपास झाल्याने या चोरीबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी वडणगे येथील सुवर्णा गोसावी आणि कविता गोसावी या दोघींना ताब्यात घेतले. दोघींनी चोरीची कबुली दिली असून, त्यांच्या घरात चोरीतील काही कागदपत्रे आणि फाइल्सही मिळाल्या आहेत. भंगार किंवा रद्दी मिळेल या हेतूने चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांकडे सांगितले आहे.

संशयित महिला पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्यावर करवीर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पहाटे त्या भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडतात. शुक्रवारी पहाटे त्या शिवाजी मार्केटच्या इमारतीत फिरत होत्या. परवाना विभागाचे शटर कमकुवत असल्याने त्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. कागदांचे गठ्ठे बांधून त्या घेऊन गेल्या. यातील ३० किलो कागद त्यांनी लक्ष्मीपुरीतील रद्दीच्या दुकानात विकले, तर उर्वरित कागद घरात ठेवले होते. या महिलांकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी वर्तवली आहे.

अन्य कारणांचाही शोध सुरू

परवाना विभागातील चोरी केवळ रद्दीच्या हेतूने झाली की अन्य कोणत्या हेतूने झाली याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस तपास करीत आहेत. रद्दी चोरण्यासाठी संशयित महिलांनी महापालिकेच्या कर्यालयाचीच निवड का केली? रद्दीच घेऊन जायचे होते, तर मोठ्या प्रमाणात कागद का घेऊन गेल्या नाहीत? इतरांच्या सांगण्यावरून चोरीचा प्रकार घडला आहे काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत, त्यामुळे इतर कारणांचाही शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधकांचे मौन, नेत्यांची अळीमिळी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील बहुमताच्या जोरावर सत्तारुढ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी शालिनी सिनेटोनची जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव नामंजूर केला. सत्तारुढ आघाडीच्या या कारभाराच्या विरोधात विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीनेही मौन बाळगणे पसंत केले आहे. एरव्ही दोन्ही आघाड्या महापालिकेत एकमेकांवर कुरघोडी आणि शह काटशहाची एकही संधी सोडत नाहीत. मात्र शालिनी सिनेटोन प्रकरणी विरोधक मौन बाळगण्याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सिनेटोन आरक्षित करण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत ‘वाटा’निश्चित झाल्याची माहिती असून यामुळे जागेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. चित्रपट व्यावसायिक, चित्रपट महामंडळाने मोर्चा, महापालिकेसमोर निदर्शने करुनही नेतेमंडळीची भूमिका ‘अळीमिळी गु​पचिळी’ सारखी का? अशी विचारणा सिने व्यावसायिक करत आहेत.

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीत टोकाचा संघर्ष आहे. सत्ताधाऱ्यांचा गैरकारभाराला साथ देणार नाही, अशी जाहीर वल्गना विरोधी आघाडी सुरुवातीपासून करत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत बैठक घेऊन महापालिकेतील प्रकल्पनिहाय, सरकारी निधीतून होणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. पालकमंत्र्याच्या सूचनेनंतर भाजप, ताराराणी आघाडीचे सदस्य सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजाचा पर्दाफाश करतील, नियमबाह्य कामाला चाप लावतील अशा अपेक्षा होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून विरोधी आघाडीतील काही प्रमुख नगरसेवकांची, सत्ताधारी आघाडीला साथ असल्याचे चित्र सभागृहात पाहावयास मिळत आहे. ‘इंटरेस्ट’च्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत समझोता झाल्यासारखे वागत आहेत.

शालिनी सिनेटोनमधील दोन्ही भूखंडाबाबत विरोधी भाजप, ताराराणी आघाडीकडून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर झाली नाही. यामुळे सिनेटोनप्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराला विरोधकांची मूक संमती असल्याची भावना काही नगरसेवकांत निर्माण झाली आहे. आरक्षित जागेप्रकरणी सत्तारुढ आणि विरोधी दोन्ही आघाड्या ‘शालिनी सिनेटोनचा वाटा, दोघे मिळून खाऊ’ अशा पद्धतीने व्यवहार सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्यामुळे कारभाऱ्यांच्यासह अनेकांचा डोळा त्या रकमेवर आहे. मोठी रक्कम डोळ्यासमोर उभी राहिल्याने अनेकजण सिनेटोन वाचविण्यापेक्षा आर्थिक आकडेमोड करत आहेत.

नेत्यांच्या घोषणेला हरताळ

महापालिका निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी राखीव जागा, खुल्या जागेवरील आरक्षण उठविले जाणार नाही, अशी ग्वाही नागरिकांना दिली होती. दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यातही राखीव व आरक्षित जागा कायम राखल्या जातील, असे स्पष्ट म्हटले होते. कोल्हापूरच्या सिने व्यवसायासाठी शालिनी सिनेटोनमधील दोन्ही जागा आरक्षित करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना, त्यांच्याच पक्षातील कारभारी ऑफ‌िस प्रस्ताव नामंजूर करतात. कार्यपत्रिकेवरील प्रस्तावावर सभागृहात चर्चा घडवून आणत नाहीत. नगरसेवकांना अंधारात ठेवून निर्णय घेतात या मागील अर्थ काय? अशी विचारणा दोन्ही आघाड्यातील काही नगरसेवकांचा आहे. राजकारण व पक्षीय दबावामुळे उघड बोलण्यात त्यांच्यावर मर्यादा आहेत. मात्र प्रत्येक निर्णयात इंटरेस्ट ठेवून कामकाज करण्याची कारभाऱ्यांची कार्यपद्धती बहुतांश नगरसेवकांना मान्य नसल्याचे ते खासगीत सांगतात. सर्वसाधारण सभा होऊन आठ दिवस झाले, तरीही नेतेमंडळी गप्प का? बहुमताच्या बळावर सिनेटोनची राखीव जागा विक्रीच्या प्रक्रियेत हातभार लावणाऱ्या कारभाऱ्यांना नेते मंडळी आवरणार की सोयीच्या राजकारणासाठी डोळेझाक करणार ?

तिघांचे धाडस, इतरांचे काय ?

महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ८६ आहे. शालिनी सिनेटोनप्रकरणी नगरसेविका सुरेखा शहा, किरण नकाते आणि ईश्वर परमार यांनी उघडपणे चित्रपट व्यावसायिकांच्या बाजूने उभे राहिलेत. पण इतरांचे काय ? काही जण खासगीत कारभाऱ्यांच्या कामकाजाच्या विरोधात बोलतात. काही नगरसेवकांना सभागृहात ज्या पद्धतीने हा विषय नामंजूर केला तो रुचला नाही. सर्वसाधारण सभेत सर्वंकष चर्चा घडली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान सिनेमा व्यावसायिकांनी शालिनी सिनेटोन वाचविण्यासाठी आंदोलनापासून उपोषणापर्यंतचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर साठ्यावरील निर्बंध उठवले

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चालू गळीत हंगामात देशांतर्गत साखरेचे उत्पादन २४९ लाख मेट्रिक टन होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून व्यापारी आणि साखर कारखान्यावर घातलेले साखर साठ्यावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने घेतला. निर्बंध शिथिल केल्याने कारखानदारांना काहीसा दिलासा मिळालेला असताना मंगळवारी राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन पुन्हा १७० रुपयांनी कमी केले. त्यामुळे कारखान्यांच्या पहिल्या उचलीमध्ये कपात होणार आहे. साहजिकच एफआरपी देताना कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत.

देशांतर्गत साखरेचे दर स्थिर राहावेत, यासाठी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाने साखर साठ्यावर निर्बंध आणले होते. खुल्या बाजारात साखरेचे दर ४००० ते ४१०० रुपये क्विंटल असताना व्यापारी आणि कारखान्यांच्या साठ्यावर निर्बंध आणले होते. या निर्बंधानुसार व्यापाऱ्यांना १५०० क्विंटल तर एकूण उत्पादनाच्या २१ टक्के हंगाम अखेरीस व सप्टेंबरपर्यंत आठ टक्के साठा करण्याचे निर्बंध कारखान्यांवर घातले होते. तसेच साखर दर स्थिर राहण्यासाठी आयात कर ६० टक्क्यांवरुन ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर अन्न मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये कच्ची साखरही आयात केली होती. केंद्राच्या या निर्णयाला राष्ट्रीयस्तरावर विरोध झाला, पण निर्णयावर केंद्र सरकार ठाम राहिले. त्यामुळे साखरेचा चांगला दर असताना साखर विक्रीवर परिणाम झाला. सध्या बाजारात साखरेचे दर ३३०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल असताना साठ्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत.

गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झालेला असताना सरकारने देशांतर्गत साखरेचे उत्पादन २४९ लाख मेट्रिक टन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण देशाची गरज उत्पादित होणाऱ्या साखरेतून पूर्ण होणार असल्याने साठ्यावरील निर्बंध उठवण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. निर्बंध उठवल्याने देशातील साखरेचे दर स्थिर राहतील असेही, स्पष्ट केले आहे.


मूल्यांकन पुन्हा घसरले

हंगाम सुरू होण्यापूर्वी तीन महिन्यातील साखर दराचा विचार करुन राज्य बँकेने प्रति क्विटंल ३५०० रुपये मूल्यांकन केले होते. ८५ टक्के प्रमाणे कारखान्यांना पहिल्या उचलीसाठी २९७५ रुपये मिळणार होते. प्रक्रिया खर्च व विविध कर्जाचे ७५० वजा जाता २२५० रुपये शिल्लक राहणार होते. त्यानंतर २५ नोव्हेंबरला ११० व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शंभर असे, २१० रुपये मूल्यांकन कमी केले. यातून एफआरपी देणे कारखान्यांना जि‌किरीचे होणार असतानाच मंगळवारी पुन्हा १७० रुपयांनी मूल्यांकन कमी करून ते ३१०० रुपये केले आहे. दीड महिन्यात सुमारे ४०० रुपयांनी मूल्यांकन कमी झाल्याने खर्च वजा जाता कारखान्यांना केवळ १९२७ रुपये शिल्लक राहणार आहेत. सर्वच कारखान्यांनी सरासरी तीन हजार रुपये एफआरपी जाहीर केल्याने एक हजाराचे शॉर्ट मार्जिन कसे भरुन काढायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.

=====

साखर उद्योग अडचणीत आहे. साठ्यावरील निर्बंध उठवले असले तरी साखर निर्यातीसाठी निर्यात कर कमी करुन अनुदान देण्याची आवश्यकता आहे. तसेच ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करुन आयात कर पुन्हा ५० टक्क्यांवरुन ६० टक्के करण्याची आवश्यकता आहे.

पी. जी. मेढे, मानद कार्यकारी संचालक, राजाराम कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीरमध्ये मुलींचा टक्का घटला

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: लेक वाचवा अभियानाचा ढोल सरकारी पातळीवर ‌बडविला जात असला तरी त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे समोर येत आहे. शहरालगत असलेल्या आणि बागायती शेती, उद्योगामुळे सधन असलेल्या करवीर तालुक्यात मुलींचा जन्मदर दरहजारी ८८१ असल्याचे समोर आले आहे. गेल्या ११ वर्षांपासून करवीर तालुका सर्वात मागे आहे. याउलट चंदगड तालुक्यात ९८८ जन्मदर आहे.

मुलगाच हवा या हट्टपायी स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे प्रकार होतात. त्यामुळे स्त्री जन्मदर घटत आहे. देशात मुलींची संख्या कमी असणाऱ्या पहिल्या दहामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सामावेश आहे. त्यासाठी २००७ पासून सातत्याने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारचे आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. जागृती करीत आहे. तरीही शहरासह एकाही तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्म अधिक असल्याचे चित्र नाही.

मुलींच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे व मुलगा, मुलगी जन्मदरातील तफावतींची चर्चा व्हावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक सर्वसाधारण बैठकीची सुरूवात याच विषयाचे करण्याचे आदेश सरकारचे आहेत. त्यानुसार प्रशासन पत्रिकेवर पहिलाच ‌विषय ठेवते. मात्र या विषयावर चर्चाही होत नाही. यावरून जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची स्त्री जन्मदर वाढवण्यासाठीची अनास्था किती आहे, हे स्पष्ट होते. मुलगाच हवा हट्टापायी अजूनही कुटुंब, नातेवाइकांचा दबाव महिलांवर असतो. सामाजिक आणि घरगुती दबावामुळे महिला हतबल असतात.

मानसिकतेशी असलेला संबंध, व्यापक यंत्रणेचा अभाव, समाजातून मिळणारा कमी प्रतिसादामुळे स्त्रीभ्रूण हत्या, मुलींचा जन्मदर वाढविण्यासंबधी आरोग्य विभागाची उदासीनता प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरही या विषय अलिकडे बेदखल केला जात आहे. यामुळेच उघडकीस आले तरच कारवाई होत आहे॓. भरारी पक्षक, सोनोग्राफी यंत्र तपासणी मोहीम थंडावली असून तक्रार झाली तर कारवाई या न्यायाने ही कारवाई केली जाते.

डोंगराळ तालुक्यांत महिला सुरक्षीत

चंदगड, गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यात स्त्री जन्मदर चांगला आहे. एक हजार मुलांमागे ९५० वर मुलींचा जन्मदर आहे. यावरून या डोंगराळ तालुक्यात सहजपणे सोनोग्राफी यंत्र, लिंगनिदान तपासणी केंद्र उपलब्ध नाही तेथे मुली सुरक्षीत आहे, असा निष्कर्ष निघतो. याउलट सरकारी यंत्रणा कितीही प्रयत्न केली तरी सधन समजल्या जाणाऱ्या करवीर, शिरोळ, कागल तालुक्यातील स्त्री जन्मदर वाढत नसल्याचे आकडेवारीरून दिसते.

स्त्री जन्मदर तालुकानिहाय

करवीर: ८८१,

आजरा : ९४७

भुदरगड: ९१६

चंदगड: ९८८

गडहिंग्लज :९५५

गगनबावडा:९८३

हातकणंगले: ९४७

कागल :९२७

पन्हाळा :९२९

राधानगरी : ९३०

शाहूवाडी: ९५९

शिरोळ: ९०४

२०१४ नंतर काहीप्रमाणात सुधारणा

वर्षनिहाय जिल्ह्याचा स्त्रीजन्म दर

२००७: ८२८

२००८: ८८०

२००९ :८७३

२०१०: ८८०

२०११: ८८१

२०१२: ८८४

२०१३: ८९७

२०१४: ९१९

२०१५: ९२४

२०१६: ९२७

२०१७ : ९३२ (ऑक्टोबरपर्यंत)

सोनाग्राफी, बेकायदेशीर‌लिंगनिदान, गर्भपात केंद्र नसल्याने डोंगराळ तालुक्यात स्त्री जन्माचा दर अधिक आहे, असे आकडेवारीवरून म्हणता येईल. सर्वच तालुक्यात मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग जागृती करीत असतो. बोगस डॉक्टरांकडून स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याचे यापूर्वीच्या घटनांतून समोर आले. यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जात आहे.

डॉ. कुणाल खेमनार, सीईओ, जि.प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर पडली आहे. विमानसेवा देणाऱ्या एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी केली आहे. ती मंजूर झाल्यास मुंबई-कोल्हापूर विमानसेवा देणे शक्य होईल, अशी अट घातली आहे. त्यामुळे येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होणारी मुंबई-कोल्हापूर विमानसेवा किमान आठवडाभर तरी लांबणीवर पडणार आहे. विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बैठक झाली. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके कंपनीनेही अद्याप वेळेचा स्लॉट दिलेला नाही. त्यामुळे विमानसेवा सुरु होण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

एअर डेक्कन कंपनीने नाशिक, जळगांवप्रमाणेच कोल्हापूर विमानतळावरुन आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची विनंती केली. मात्र जीव्हीके कंपनीने अद्याप मागणी मान्य केलेली नाही. मुंबईतील विमानतळावरुन दररोज ९४३ विमानांचे उड्डाण होते. त्यामुळे कोल्हापूरसाठी सकाळची वेळ उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी दुपारी १ वाजून २५ मिनिटांची टेकऑफची वेळ देण्यात आली होती. मात्र ही वेळही गैरसोय असल्याने सकाळच्या वेळेतील स्लॉट मागण्यात आला. मात्र तूर्ततरी सकाळच्या वेळेतील स्लॉट आणि आ‍‍ठ‍वड्यातून सहा दिवस सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे विमानसेवेचा २५ डिसेंबरचा मुहूर्त बारगळला आहे. कोल्हापूर विमानतळाला टूबीचा परवाना मिळाला आहे. उड्डाणासाठी कोल्हापूरचे विमानतळही सज्ज झाले आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळही अन्य विमानतळावरुन मागविले आहे. भौतिक सुविधांची पूर्तताही केली आहे. मात्र विमानसेवेची तारीख निश्चित नसल्याने विमानसेवा लांबणीवर पडली आहे. कोल्हापुरातून एअर डेक्कन कंपनीचे १८ सीटर विमान मंगळवार, बुधवार आणि रविवारी टेक ऑफ करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या उडान योजनेतून ही सेवा सुरू होणार आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयात मंगळवारी एअर डेक्कन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांऐवजी सहा दिवस सेवा असेल तरच ती सुरु केली जाईल, असा आग्रह धरला. त्यामुळे विमानसेवेचा पेच पुन्हा निर्माण झाला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, सचिव आर. एन. चोबे, सहसचिव उषा पाबी यांची खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली. त्यांनी कंपनीने आठवड्यातून सहा दिवस आणि सकाळच्या वेळेत सेवा सुरु करण्याची मागणी केल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत वाहतूक मंत्रालयाने निर्णय दिलेला नाही.

२४ डिसेंबरला एअर डेक्कनचे १८ सीटर विमानसेवा सुरु होण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी विमानसेवा सुरु होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र स्लॉटची वेळ आणि कंपनीने सहा दिवसाची घातलेली अट यामुळे विमानसेवेचे टेक ऑफ लांबणीवर पडले आहे.

०००

कोल्हापूरची विमानसेवा सुरु होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक राजू यांच्याकडे आग्रह धरला आहे. विमानसेवा सुरू होणार हे निश्चित आहे. मात्र किमान आठवडाभर ही सेवा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. बुधवारी पुन्हा या बाबत बैठक होत आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरची विमानसेवा दृष्टिपथात आली असून, विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याच्या हालचालींना गती आली आहे. छत्रपती राजाराम महाराजांनीच उजळाईवाडीच्या माळावर त्या काळात विमानतळ सुरू केला होता. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यादृष्टीने फाइलही तयार झाली असून, आता केवळ घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

कोल्हापुरात राजाराम महाराजांनी ७५ वर्षांपूर्वीच विमानसेवा सुरू केली. ५ जानेवारी १९३९ रोजी

कोल्हापूर विमानतळाचा प्रारंभ झाला. ४ मे १९४० रोजी कोल्हापुरातून पहिले विमान झेपावले. या विमानतळाची पायाभरणी करताना राजाराम महाराजांनी कोल्हापूरला ग्लोबल केले. विकासाचा नवा मार्ग दाखविला. विमानसेवा सुरू राहावी यासाठी त्यांनी आर्थिक मदतही केली, पण नंतर राजकीय इच्छाशक्तीअभावी ही सेवा बंद पडली. ती पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक नेत्यांची धडपड सुरू आहे; पण रोज नवी अडचण येत असल्याने या सेवेला मुहूर्त मिळत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विमानसेवेला नसला तरी नामकरणाला मात्र मुहूर्त मिळाला आहे. विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच नामकरणाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अ​धिवेशनात नामकरणाची घोषणा व्हावी यासाठी दोन दिवस हालचाली सुरू होत्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक नामकरणासाठी सतत पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे फाइल तातडीने तयार झाली; पण ती मुख्यमंत्र्यांपर्यंत वेळेत न पोहोचल्याने घोषणेचा आजचा मुहूर्त हुकला. पण येत्या आठ दिवसांत या नामकरणाची घोषणा करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी हिवाळी अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे अधिवेशनात घोषणा होणार नाही; पण पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images