Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बिले थकविणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी करा

0
0
शेतकऱ्यांची उसाची बिले थकविलेल्या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी दाखल करावी तसेच खरेदी कर माफ करावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी प्रादेशिक सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना खाण्यासाठी साखर दिली.

संत्र्यांची आवक वाढली

0
0
गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्र्यांची आवक सुरू झाली होती. सुरुवातीला २०० ते ३०० पेटी असणारी आवक बुधवारी वाढली असून, ती ११५५ पेटीपर्यंत पोहोचली आहे. सर्व संत्री नागपूर व नाशिक जिल्ह्यातून झाली आहे.

शिवसेनेकडून सरकारचा प्रतीकात्मक श्राद्धविधी

0
0
उसाला साडेतीन हजार रुपये दर द्यावा, गेल्या हंगामातील थकित हप्ते जमा करावेत, आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा प्रतीकात्मक श्राद्धविधी घालण्यात आला.

लोक अदालतमध्ये ५१ हजार खटले

0
0
प्रलंबित छोट्या स्वरूपाचे दिवाणी व फौजदारी वादातील तडजोडीच्या ५१ हजार खटल्यांचे सामंजस्याचे निराकरण होण्यासाठी शनिवारी (२३ नोव्हेंबर) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. कोर्टात वाद सुरू असलेल्या व्यक्तीने आपले हित विचारात घेऊन अदालतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. अहमद यांनी पत्रकार परिषदेत केले.

जीआयची कथा!

0
0
महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा सर्वच बाबतींत समृद्ध आहे, पण येथे उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यात आपण मागे पडलो आहोत. कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा अशा कितीतरी वस्तू व पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत, पण त्यांना ‘ब्रँड सरंक्षण’ मिळावे, त्यातून काही व्यावसायिक संधी मिळाव्यात असा प्रयत्न होताना दिसत नाही.

लाइफटाइम प्रोफेसर

0
0
कोल्हापूरशी घनिष्ट नाते असलेले माहितीपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते संजय केतकर यांनी काही वर्षांपूर्वी भारतातील पाच संशोधकांवर ‘महर्षीज ऑफ मॉडर्न इंडिया’ ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे.

मास्टरशेफ

0
0
गाणी, डान्स अशा वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजनंतर खानपानावर आलेल्या ‘मास्टरशेफ’ स्पर्धेनेही हल्ली प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. भारतातील शोजनंतर आपले स्पर्धक परदेशी शोजवरही छाप पाडतायत.

ब्रेकअपसाठी कव्हरअप टॅटू

0
0
आपल्या गर्लफ्रेंडचे ‌‌किंवा बॉयफ्रेंडचे नाव टॅटूमध्ये कोरून घेण्याचा प्रकार फारसा नवीन राहिलेला नाही. पण आता ब्रेकपचे प्रमाणही वाढत असल्याने कव्हरअप टॅटूची गरजही भासू लागली आहे. लाइफ टॅटूमध्ये आपल्या एक्स जीएफ किंवा बीएफचे नाव असेल तर कव्हर टॅटूला ऑप्शनच राहत नाही.

सुरक्षा रामभरोसे

0
0
एटीएम सेंटरचा दोन कोटीचा विमा उतरल्याने बहुतांशी बँकांनी एटीएम सेंटरवरील सुरक्षा रक्षक हटवले आहेत. बँकांनी एटीएम सेंटरचा विमा उतरवला असला तरी एटीएम सेंटरचा वापर करणाऱ्या ग्राहकाला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना ग्राहकांच्या सुरक्षेबाबत बँकांनी हात वर केल्याचेच चित्र आहे.

‘वारणा’ची ऊसतोड मांगल्यात रोखली

0
0
वारणा कारखान्याच्या वतीने मांगले (ता. शिराळा) येथे सुरू असलेली ऊसतोड ग्रामस्थांनी थांबवली. या ऊसतोडीच्या निषेधार्थ गावातून फेरीही काढण्यात आली.

सातारा रंगणार साहित्यरंगी

0
0
येथे शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) होत असलेल्या विभागीय साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने सातारकरांना साहित्य रंगात रंगण्याची संधी मिळणार आहे. सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल.

पोटनिवडणुकीसाठी पाच अर्ज

0
0
इचलकरंजी नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीन क च्या पोटनिवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी १४ अर्ज दाखल केले आहेत. उद्या (शुक्रवारी) छाननी होणार असून दोन डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे.

इचलकरंजीत वीज तोडणीला विरोध

0
0
वीज दरवाढ रद्द करण्यासाठी एकीकडे आंदोलन सुरु असताना दुसरीकडे थकीत बिलांसाठी वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अभियंत्यासह तिघा कर्मचाऱ्यांना गणेशनगर भागात तीव्र विरोध करण्यात आला.

हमीदवाड्यात १६०० मजूर बसून

0
0
हमीदवाडा (ता.कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यावर बीडहून सुमारे २०० ऊसतोड मजूरांच्या गाड्या आणि १२५ वाहनांसह १६०० मजूर दाखल झाले आहेत.

कारखान्याचा गळीत हंगाम बेकायदा

0
0
कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम बेकायदेशीर असल्याने याविरोधात सहकार आयुक्त व सचिवांकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कारखान्याच्या परवानग्या नियमानुसारच

0
0
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामुळे प्रदूषण होणार असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीचे पात्र प्रदूषित होणार असल्याची तक्रार करण्यात आली असून याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने सोमवारी पाहणी करण्यात येणार आहे.

वारणा परिसरात तोडी बंद

0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आव्हानानंतरही सुरू करण्यात आलेला वारणा कारखाना गुरुवारी धीम्यागतीने सुरू राहिला. गुरूवारी दिवसभर ठिकठिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करत विरोध दर्शविला.

फायर स्टेशन २५ पासून दलाल मार्केटमध्ये

0
0
महापालिकेच्या मुख्य इमारतीत असणारे फायर स्टेशन येत्या २५ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केटमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्याच इमारतीत शहरातील मुख्य कंट्रोल रुमही लवकरच बनवण्यात येणार असल्याचे महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी सांगितले.

सरकारवर दबावासाठी ‘शिवशाहू यात्रा’

0
0
राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक समस्यांचा आढावा घेवून जनतेत जागृती निर्माण करण्याबरोबरच ज्या गोष्टी सरकारकडून दुर्लक्षित आहेत त्याबाबत सरकारवर दबावगट तयार करण्यासाठी युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘शिवशाहू यात्रे’ ला २३ नोव्हेंबरपासून किल्ले शिवनेरी येथून सुरूवात होत असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वनांच्या संरक्षणासाठी सूक्ष्म आराखडा

0
0
एका विशेष कामासाठी कोणत्याही नोंदीशिवाय स्वतःजवळ ठेवलेले साडेसात लाख रूपये आणि ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमासाठी अ.भा.चित्रपट महामंडळाच्या मुदतठेव पावत्या मोडून खर्च केलेले १३ लाख रूपये असे २० लाख रूपये वर्षभराच्या कालावधीनंतरही न भरणाऱ्या महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांना महामंडळाकडून फौजदारी दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images