Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अतिक्रमणे हटवताना धुमश्चक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वाशी नाका परिसरात अनाधिकृत केबीन हटवण्यावरुन स्थानिक युवक व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी धुमश्चक्री उडाली. फळविक्रेत्या केबीन मालकाने अर्वाच्य शिवीगाळ केल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला चोप दिला, त्याचवेळी मालकानेही स्थानिक युवकांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर धुमश्चक्रीचा प्रकार घडला. त्यानंतर कडकोट पोलिस बंदोबस्तात त्या रस्त्यावरील सर्व केबीन्स हटवण्यात आल्या. पुईखडी ते कळंबा साई मंदिरजवळील खाऊ गल्लीपर्यंतच्या ४८ केबीन्स, २१ शेड, ४० फलक हटवण्यात आली. खाऊ गल्लीतील कारवाईवेळीही केबीनधारक व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. मंगळवारी दिवसभर अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांच्यासह सर्व उपशहर अभियंता दिवसभर तळ ठोकून उभे होते.

महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम कडक राबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी गांधी मैदान विभागीय कार्यालयामार्फत शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पुईखडी येथून कारवाईला सुरुवात केली. चहाच्या तसेच वडापावच्या केबीन्स हटवण्यात येत होत्या. पुईखडीपासून नवीन वाशी नाका येथील चौकापर्यंत फुटपाथवर असलेल्या तसेच अनाधिकृत असलेल्या केबीन्स जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्या. जुना वाशी नाका येथून कळंब्याकडे जाणाऱ्या रिंगरोडच्या कोपऱ्यावरील चिव्याच्या बाजारासमोर काही केबीन्स होत्या. त्यातील एक केबीन फळविक्रेत्याची होती. दहा बाय वीसची केबीन व त्यापुढे दहा बाय पंधरा फुटाचे शेड मारण्यात आले होते. केबीन अनाधिकृत असल्याने फळ विक्रेत्या मालकाला शेड व केबीन हटवण्यास सांगितले. तरीही तो शेडही हलवण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच जेसीबीने शेड काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनाधिकृत केबीन असलेल्या त्या मालकाची शिवीगाळ काही काळ ऐकली. तरीही तो थांबत नसल्याचे पाहून सारे कर्मचारी संतापाने एकत्र आले व त्या फळविक्रेत्याला चोप दिला.

त्यावेळी स्थानिक युवक तिथे जमले व त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने जोरदार धुमश्चक्री उडाली. जवळपास दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता. हे प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला केले व दुसरीकडे उभे केले. त्यानंतर आलेल्या पोलिसांच्या बंदोबस्तात त्या फळविक्रेत्याबरोबरच त्याच्या शेजारीलही साऱ्या केबीन्स हटवण्यात आल्या. काही ठिकाणी महिलांनीही विरोध करण्याचा प्रयत्न केला. दुपारनंतर वाशी नाका ते साईमंदीर चौक या रस्त्यावरील सुर्यकांत मंगल कार्यालयालगतच्या महापालिकेच्या ओपन स्पेसमधील खाऊगल्लीतील १४ केबीन्सचे अतिक्रमण हटवण्यात आली. तसेच राधानगरी रोड व साळोखेनगर रिंगरोडवर शहर विद्रुपीकरण करणारे २३ फलक काढण्यात आले. पुईखडीपासून सुरू केलेल्या कारवाईमध्ये शहराला विद्रूप करणारे होर्डिंग्ज व फलक काढण्यात येत होते. साळोखेनगरजवळ एका शिक्षण संस्थेचा फलक काढण्यात आला नसल्याने नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. या कारवाईत कर्मचाऱ्यांबरोबर दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर ट्रॉली, तीन डंपर, बुम, कटींग वेलडिंग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगीप्रश्नी पाच पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्या बेसमेंटमध्ये साठलेले पाणी आढळेल त्या इमारतीच्या मालक, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हे दाखल करण्याबरोबरच मोठा दंड आकारण्याची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आढावा बैठकीतच अधिकाऱ्यांना दिले. तसेच जे पाच भाग डेंगीसाठी अतिसंवेदनशील ठरवण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पाच स्वतंत्र विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून त्यांच्याकडून अळ्यांची पैदास, औषध फवारणी, संशयित रुग्णांची रक्त तपासणी करण्यात येणार असल्याचेही सांगितले. उपायुक्तांच्या निदर्शनाखाली आठ दिवसांत विशेष मोहीम राबवून प्रत्येक घरांची तपासणी करण्यात येईल, असे सांगितले.

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवल्यानंतर आयुक्त डॉ. चौधरी यांनी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, ‘शहरात डेंगीचे रुग्ण वाढले आहेत. नोव्हेंबर महिन्यातच त्याचे प्रमाण वाढले आहे. धूर व औषध फवारणी करण्याचे वेळापत्रक करण्यास सांगितले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांना आदेश ​देण्यात आले आहेत. टायर, कुंड्या, अर्धवट बांधकामे, बांधकामाची ठिकाणे साठणाऱ्या पाण्यात अळ्या वाढू नयेत यासाठी परिपत्रक काढून टाकले आहे. शहरातील पाच ठिकाणे अतिसंवेदनशील ठरवण्यात आली असून त्यासाठी सिस्टर, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांची स्वतंत्र पाच पथके तयार केली आहेत. त्या ठिकाणी ती तपासणी तसेच स्वच्छतेचे काम करणार आहेत. ज्यामुळे त्या परिसरातील डेंगीच्या अळ्या नष्ट करता येतील.

आयुक्त चौधरी म्हणाले, ‘बेसमेंटमध्ये पाणी साठण्याच्या प्रकारामुळे डेंगीच्या डासांची पैदास होते. अशा बेसमेंटची पाहणी करुन जिथे पाणी आढळेल त्या इमारतीच्या मालकावर, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हे दाखल करा. त्यांच्यावर मोठा दंड आकारावा. अनेक भागात मुकादम जादा व कर्मचारी कमी असे प्रकार होऊ नयेत यासाठी एकापेक्षा जास्त मुकादम भागात आढळला तर तेथील आरोग्य निरीक्षकावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी नगरसेवकांनीही सहकार्य करावे. धूर फवारणीच्या मशीन वाढवण्यात येणार असून डासांची पैदास रोखण्यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी आठ दिवस विविध भागात मोहीम राबवली जाईल.

‘पेपरबाजीची गरज नाही’

लक्ष्मीपुरीतील परिसरात नाले तुंबण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारीनंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्या परिसरात पाहणी केली होती. त्यानंतर पुढे काय झाले असे विचारत नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी आयुक्त काय केवळ पेपरबाजी करण्यासाठी आले होते का? असा प्रश्न केला. त्यावर आयुक्त डॉ. चौधरी यांनीही तिथेच ‘मी सरकारी कर्मचारी असून मला पेपरबाजी करण्याची गरज नाही’, असे सांगितले. यावरुन बैठकीतील वातावरण काही काळ तणावाचे बनले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नियुक्ती’साठी मंत्र्यांपर्यंत फिल्डींग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधिसभा आणि अधिकार मंडळाच्या थेट निवडणुकीनंतर आता कुलगुरू आणि कुलपती नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी पडद्याआड हालचाली गतीमान झाल्या आहेत. विद्यापीठीय अधिकार मंडळात वर्णी लागावी यासाठी संघटना पातळीवर प्रयत्नशील असतानाच काही जणांनी मंत्र्यांपर्यंत फिल्डींग लावली आहे. विकास आघाडी, प्राचार्य संघटना, अभाविप, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघांनी कुलगुरू कार्यालयाकडे नावांची यादी सादर केली आहे. सिनेट, व्यवस्थापन परिषद आणि अकॅडमिक कौन्सिलमध्ये मिळून एकूण ४१ जणांच्या नियुक्त्या होणार आहेत. नियुक्त यादीमध्ये ‘अभाविप’चा वरचष्मा राहिल अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी गटात ‘अभाविप’ने विकास आघाडीसह सर्वच घटकांना चकवा दिला. त्याच पद्धतीने सिनेटसह अन्य ठिकाणच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी ‘अभाविप’ प्रयत्नशील आहे. विद्यापीठ निवडणुकीत अभाविप ही विकास आघाडीसोबत होती. त्यामुळे ‘अभाविप’च्या चालीबाबत विकास आघाडीने ‘वेट अँड वॉच’च्या भूमिका घेतली आहे. दुसरीकडे तिन्ही जिल्ह्यांतील उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी संघटना, आघाडी आणि व्यक्तीगत पातळीवर कुलगुरू कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. साधारणपणे एक जागेसाठी तीन अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येते. आठवडाभरात तिन्ही गटांतील नियुक्त्या होतील असे सूत्रांनी सांगितले.

अकॅडमीक कौन्सिलवर नियुक्त करावयाच्या प्राचार्य गटातील जागांसाठी सतरा नावांची शिफारस झाली आहे. यात प्राचार्य सुरेश साळोखे (विटा), प्राचार्य के. जी. कानडे (सातारा), प्राचार्य आर. एस. मोरे (सावळज), प्राचार्य एस. वाय. होनगेकर (कोल्हापूर), प्राचार्य आर. आर. आर. कुंभार (तासगाव), प्राचार्य आर. व्ही. शेजवळ (सातारा), प्राचार्य वाय. बी. गोडे (वाघोली), प्राचार्य एल. जी. जाधव (वडूज), प्राचार्य एम. बी. वाघमोडे (मेढा), प्राचार्य डी. जी. कणसे (सांगली), प्राचार्य एस. आर. पाटील (चिखली), प्राचार्य मेघा गुळवणी (विटा), प्राचार्य आर. एल. राजगोळकर (बिद्री), प्राचार्य आर. एस. तिळवणकर (कोवाड), प्राचार्य पी. आर. पाटील (चंदगड), प्राचार्य टी. के. जाधव (कुरुंदवाड), प्राचार्य एस. आर. बामणे (औंध) यांच्या नावाचा समावेश आहे.

यापैकी प्राचार्य एस. आर. बामणे, प्राचार्य एल. जी. जाधव आणि प्राचार्य कुंभार यांची प्राचार्य गटातून सिनेटवर बिनविरोध निवड झाली असल्याने अकॅडमीक कौन्सिलमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होणार नाही.

सिनेटवर १७ सदस्य

कुलपती नियुक्त सदस्य दहा. कृषीक्षेत्र, समाजकार्य, सहकार, कायदा, वित्तीय, बँकिग, सामाजिक क्षेत्रातील एकूण चार, उद्योग, शिक्षण, विज्ञान, फाइन आर्ट्स, पर्यावरण, महिला विकास, ज्येष्ठ नागरिक दळणवळण संपर्क प्रसारमाध्यमातील प्रत्येकी एक असे एकूण दहा सदस्य असतील. कुलगुरु नियुक्त सात प्रतिनिधीमध्ये विद्यापीठ सेवक, संलग्न महाविद्यालयीन सेवक, महापालिका व नगरपालिका व जिल्हा परिषद शिक्षण समितीमधील एक असे चार सदस्य असतील. सिनेटवर दोन आमदार आणि विधान परिषदेवरील एका आमदारांचा समावेश आहे. व्यवस्थापन परिषदेवर दोन अधिष्ठाता, विद्यापीठातील अधिविभाग प्रमुख एक आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतील तज्ज्ञ असे चार सदस्य नियुक्त केले जातील.

‘अकॅडमीक’वर २० जण

कुलगुरुंनी कुलपतींशी विचार विनिमन करुन शोध समितीच्या शिफारशीनुसार वीस सदस्यांची नियुक्ती करायची आहे. यामध्ये आठ प्राचार्य, दोन प्राध्यापक, मान्यता प्राप्त संस्था प्रतिनिधी एक, संस्था प्रतिनिधी एक असे बारा जण असतील. याशिवाय राष्ट्रीय दर्जाच्या मान्यता प्राप्त विविध संस्थेमधील मिळून आठ सदस्य अॅकेडमीवर नियुक्ती होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझी कन्या...’ योजना लालफितीत

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सरकारच्या सुधारित ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसारख्या जाचक अटी आणि अंमलबजावणीत असलेली प्रचंड उदासीनता यामुळे योजना लालफितीत अडकली आहे. मुलींच्या जन्मदरास प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या योजना अंमलबजावणी पातळीवर प्रचंड उदासीनता आहे. परिणामी जिल्ह्यातील एकाही दाम्पत्याच्या मुलीस त्याचा लाभ मिळालेला नाही. ऑगस्ट महिन्यात योजना जाहीर केल्यानंतर सरकारने व्यापक जाहिरातबाजी केली. मात्र, प्रत्यक्षात योजना लालफितीतच आहे.

सुकन्या नावाने ही योजना होती त्यानंतर तिचे नाव बदलून ‘माझी कन्या भाग्यश्री’ असे नामांतर केले. मुलीच्या जन्मदरात वाढ करणे, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक चित्र निर्माण होण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढवली. महिला व बालकल्याण विभागातर्फे १ ऑगस्ट, २०१७ सुधारित योजनेचा आदेश काढला. त्यामध्ये पूर्वी दारिद्रषेखालील कुटुंबांसाठी मर्यादित असलेली योजना साडे सात लाखांचे उत्पन्न असलेल्या दात्पंत्यांसाठीही लागू केली. दत्तक, अनाथालयातील मुलींनाही योजनेच्या कार्यक्षेत्रात घेतले.

जिल्हा, शहर, तालुका महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. मात्र योजनेस पात्र होण्यासाठी मुलगी जन्मल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र देण्याची सक्ती आहे. या दोन अटी जाचक असल्याने लाभार्थी वंचित राहत आहेत. तालुका, शहर, जिल्हा पदिषदेच्या महिला बालकल्याण विभाग कार्यालयाकडे प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा कुंटुब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचा दाखला जोडला आहे का याची विचारणा केली जाते. नकारात्मक उत्तर असेल तर प्रस्तावाला हातही लावला जात नाही.

शहरात, ग्रामीण भागात प्रसुतीनंतर त्वरित कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याबाबत जागृतता नाही. मुलगा असो मुलगी एक ते दोन वर्षाची झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण अधिक आहे. एक आणि दोन मुलगीनंतर योजनेचा लाभ घेता येतो असे निकषात नमुद आहे. तर दुसरीकडे एक मुलगी असली तरी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेची अट आहे. यामुळे योजनेचा लाभ घेताच येऊ नये अशा उलटसुलट अटी घातल्या गेल्या आहेत. सुधारित योजना जाहीर करून तीन महिने झाले तरी एकही प्रस्ताव शहर, जिल्ह्यातील कार्यालयात स्वीकारण्यात आलेला नाही. जाचक अटी शिथील न झाल्यास अंमलबजावणीपूर्वीच सु‌धारित योजना गुंडाळण्याची चिन्हे आहेत.

१८ वर्षांनंतर मिळणार एक लाख

पात्र मुलगीच्या पालाकास लाभासाठी पैसे भरण्याची गरज नाही. सरकार संबंधीत मुलीच्या नावे आयुर्विमा महामंडळाकडे २१ हजार २०० रुपये भरेल. मुलगी १८ वर्षानंतर झाल्यानंतर एक लाख रुपये दिले जातील. याशिवाय त्या कुटुंबास मुलगी जन्मोत्सव आनंद साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये, तिच्या आजी, आजोबांना सोन्याची नाणी भेट देण्यासाठी पाच हजार, ती मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षी पोषणासाठी दोन हजार, शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्षाला शिक्षणासाठी अडीच हजार तर सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला तीन हजार दिले जाणार आहे.

निधीची तरतूद नसल्याचेही कारण

पात्र लाभार्थीच्या नावे आयुर्विमा महामंडळाकडे २१ हजार २०० रूपये भरण्यासाठी सरकारने निधीची तरतूद केली नाही. यामुळे अधिकारी प्रस्ताव घेण्याचे टाळतात, असाही लाभार्थीडून आरोप होत आहे. प्रस्ताव घेतल्यानंतर लाभार्थीकडून विचारणा होणार, त्यापेक्षा पहिल्या टप्यातच त्यांना विविध कारणे सांगून परत पाठवून देण्याकडे प्रशासनाचा अधिक दिसून येतो.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा निकष आहे. निकष पूर्ण न केल्याने जिल्ह्यातून एकही प्रस्ताव आलेला नाहीत. योजनेच्या जागृतीसाठी पुढील महिन्यात विभागीयस्तरावर कार्यशाळा आयोजित केली आहे.

एस. डी. मोहिते, महिला व बाल कल्याण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन भेसळीचा फटका

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com
Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर : वाढत्या हवा प्रदूषणात सर्वाधिक वाटा वाहनांचा आहे. लाखो वाहने रोज रस्त्यांवर धावतात. यात मुदत संपलेल्या वाहनांचीही मोठी संख्या आहे. वाहनांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि इंधनातील भेसळीमुळे धुराचे प्रमाण वाढत आहे. वाहनांतून बाहेर पडणारे वायू आरोग्याला घातक ठरत आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा निष्क्रीय आहेत. कोल्हापुरातील हवा प्रदूषणात रिक्षांसह जुन्या वाहनांचा मोठा वाटा असल्याने धूर ओकणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दाभोळकर कॉर्नरला नाकाला हात लावून जाणारे अनेक नागरिक दिसतात. काही दिवसात या परिसरात नाकाला मास्क लावलेले लोक दिसले तरीही आश्चर्य वाटणार नाही. याचे कारण म्हणजे या परिसरात रिक्षांमधून सर्वाधिक धूर बाहेर पडतो. नैसर्गिकदृष्ट्या दाभोळकर कॉर्नरला तिन्ही बाजुंनी उतार आहे. कावळा नाक्याकडून येणाऱ्या वाहनांचा अपवाद सोडल्यास सासने ग्राऊंड, स्टेशन रोड आणि परिख पुलाकडून येणाऱ्या वाहनांना चढणीच्या रस्त्यावर प्रवास करावा लागतो. रिक्षा चालकांकडून भेसळीचे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर केला जातो. याशिवाय जुन्या रिक्षा आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरल्याने रिक्षा धूर ओकतात, त्यामुळे दाभोळकर कॉर्नर परिसरात नेहमीच धुराचे साम्राज्य असते.

शहरात अवजड वाहने, हलकी वाहने आणि दुचाकींच्या तुलनेत रिक्षा सर्वाधिक धूर सोडतात, असे धूर तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे रिक्षाच्या धुरात मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या वायूंचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

गॅसवर चालणाऱ्या रिक्षांसाठी सीएनजी गॅस वापणे गरजेचे असते. कोल्हापुरात एकही सीएनजी गॅसपंप नाही, त्यामुळे सर्रास वाहनधारकांकडून घरगुती वापराचा एलपीजी गॅस वापरला जातो. यामुळे रिक्षांचे धुराचे प्रमाण वाढते. रिक्षांची नियमित तपासणी आणि दुरुस्ती गरजेची असते. याकडे शहरातील बहुतांश रिक्षाचालकांचे दुर्लक्ष होते. इंजिनसाठी लूज ऑइल वापरले जाते. या ऑइलमुळेही रिक्षा अधिक धूर सोडतात, असा रिक्षा दुरुस्त करणाऱ्या तज्ज्ञांचा अनुभव आहे. शहरातील दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, मिरजकर तिकटी, उमा टॉकीज चौक, गंगावेश, कावळा नाका, आदी परिसरात हवा प्रदूषणाचे प्रमाण गंभीर आहे. कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड यांचे प्रमाण घातक पातळीवर पोहोचले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आजारांचाही धोका वाढला आहे.

मुदत संपलेल्या रिक्षा रस्त्यांवरच

मुदत संपलेल्या रिक्षा शहरात रस्त्यावरच फिरतात. या रिक्षांची आरटीओकडून तपासणी होत नाही, त्यामुळे धूर ओकणाऱ्या रिक्षा शहरात बिनधास्त फिरवल्या जातात. सहा आसनी रिक्षांना शहरात फिरण्याची परवानगीच नाही, तरीही प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या सहा आसनी रिक्षा शहरात मुख्य मार्गावरून धावतात. गांधीनगर ते शिवाजी चौक, कळंबा ते मिरजकर तिकटी, रंकाळा बसस्थानक ते भोगावती या मार्गावरही सहा आसनी रिक्षा धूर ओकत फिरतात. या रिक्षांमधून बाहेर पडणारे धुराचे प्रमाण अधिक आहे, तसेत हा धूर अधिक धोकादायक आहे.

भेसळीचे प्रमाण वाढले

शहरात सध्या इंधन भेसळीचे प्रमाण वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये रॉकेलची भेसळ केली जाते. सीएनजी गॅस ऐवजी एलपीजी गॅस वापरला जातो. इंधन भेसळीचा प्रमाण आरोग्यासाठीही घातक ठरत आहे. विशेष म्हणजे इंधन तपासण्याची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. या भेसळीमुळे धुराचे प्रमाण वाढते. यासह वाहनांचेही नुकसान होते.

सिग्नलवर वाहने सुरूच

शहरात २० हून अधिक ट्रॅफिक सिग्नल आहेत. यातील काही अपवाद वगळता इतर सर्व सिग्नल सुरू आहेत. सिग्नलला थांबल्यानंतर वाहन बंद करावे असा नियम आहे, पण सर्रास वाहने सुरूच असतात. ट्रॅफिक सिग्नलला रिक्षाच्या मागे थांबणाऱ्या वाहनधारकाला धुराची शिक्षा सोसावी लागते. धुराचे लोट सोडणाऱ्या रिक्षांमुळे ट्रॅफिक सिग्नल परिसरात वातावरण धूरकट बनते. याचा त्रास सर्वच नागरिकांना होत आहे.

धूर तपासणी केंद्रे बोगस

जिल्ह्यात ३५ ठिकाणी धूर तपासणी केंद्र आहेत. काही पेट्रोल पंपांसह गर्दीच्या ठिकाणे आणि महामार्गांवरही वाहनांची धूर तपासणी केली जाते. चारचाकी वाहनांसाठी १०० रुपये, तर रिक्षासाठी ५० रुपये घेतले जातात. दुचाकींची तपासणी करण्यासाठी ३० रुपये घेतले जातात. बहुतांश धूर तपासणी केंद्रांवर तपासणी न करताच प्रमाणपत्र दिले जाते. प्रत्यक्षात धूर ओकणाऱ्या रिक्षाही सुसज्ज असल्याचे प्रमाणपत्र रिक्षाचालकांकडे असते. या बोगस कारभारामुळे प्रदूषण वाढते.

वाहनांच्या धुराचे कमीतकमी प्रमाण

चारचाकी वाहने – ३.० टक्के

रिक्षा – ३.५ टक्के

दुचाकी – ४.५ टक्के

(प्रत्यक्षात याच्या दुप्पट धूर सोडणारी वाहने रस्त्यांवरून धावतात.)

शहरात जुन्या रिक्षा खुपच आहेत. काही अपवाद सोडल्यास बरेच रिक्षालक वेळेत रिक्षांची दुरुस्ती करीत नाहीत. इंधनातील भेसळीचे प्रमाण खुपच वाढले आहे, त्यामुळे धुराचे प्रमाण वाढले आहे. वाहनांची वेळेत दुरुस्ती केल्यास धूर सोडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

जुबेर शेख, मेकॅनीक

शहरातील ट्रॅफिक सिग्नलला थांबणे धोक्याचे ठरत आहे. धूर ओकणाऱ्या रिक्षा आणि इतर वाहनांमुळे नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. आरटीओने याची दखल घेऊन जुन्या वाहनांवर कठोर कारवाई करावी.

उत्तम पाटील, नागरिक

शहरात ३५ ठिकाणी धूर तपासणी केंद्र आहेत. निकषांप्रमाणे आम्ही वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देतो. काही वाहने तपासणीसाठी येतच नाहीत. बरेच वाहनचालक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती करतात. यानंतर त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण राहत नाही.

रईस बागवान, धूर तपासनीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडफेक प्रकरणी सातजण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरीतील चौथी गल्ली आणि बागल चौकातील ड्यूक कॉर्नरला झालेल्या दोन गटातील राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. दोन्ही गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दोन गटातील वादाने बागल चौक आणि शाहूपुरी परिसरातील तणाव पुन्हा वाढला आहे.

शाहूपुरीच्या चौथ्या गल्लीतील कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या शेजारी डीडी ग्रुप आहे. बागल चौकातील ड्यूक कॉर्नर परिसरात बागल चौक मंडळ आहे. या दोन गटात गेल्या काही वर्षांपासून वर्चस्ववाद धुमसत आहे. चार दिवसांपूर्वी डीडी ग्रुपच्या काही तरुणांनी बागल चौकातील मंडळाचा लोखंडी फलक कापल्याने वादाला सुरुवात झाली. रविवारी हा वाद शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचला, मात्र परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला होता. यानंतरही हा वाद मिटला नाही. फेसबूकवरून परस्परविरोधी प्रतिक्रिया टाकल्याने सोमवारी रात्री शाहूपुरीच्या चौथ्या गल्लीत आणि बागल चौकातील ड्यूक कॉर्नरला राडा झाला होता. हल्लेखोरांनी प्रचंड दहशत माजवत दुकानांची आणि दुचाकींची मोडतोड केली होती. याबाबत मंगळवारी पहाटे शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.

दत्तात्रय धोंडिराम पाटील (वय ३३, रा. ड्यूक कॉर्नर, बागल चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय पटकारे (वाड्या), प्रमोद पाटील, ओंकार पाटील, साईराज पाटील, आशिष चव्हाण, नीलेश चौगुले (सर्व रा. शाहूपुरी, ५ वी गल्ली), विजय पटकारे (रा. कदमवाडी रोड, विचारेमाळ) आणि रितेश पाटील (रा. लोहिया गल्ली, साईक्स एक्स्टेंशन) या आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन दगड आणि काचेच्या बाटल्यांसह ड्यूक कॉर्नर येथील तरुणांवर हल्ला केला होता. संजय पटकारे याने केलेल्या तलवार हल्ल्यात रोहित शिवाजी भडाळे (२३, रा. बागल चौक) हा तरुण जखमी झाला आहे.

स्नेहा शशिकांत पाटील (४१, रा. शाहूपुरी, ४ थी गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमित खत्री, संजय वाईकर, दत्ता पाटील, सचिन पाटील, संजय जाधव, सागर कारांडे (सर्व रा. बागल चौक) यांच्यासह अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्हीकडून दहशत माजवण्यासाठी तलवार, दगड आणि काचेच्या बाटल्यांचा वापर झाला. दोन गटातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पुन्हा वाद उफाळून आल्याने परिसरातील तणाव वाढला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. लवकरच हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी मंगळवारी अनिकेतच्या दोघा भावांनी शहर पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सीआयडीच्या तपासावर विश्वास नसल्याचे ओरडून सांगत दोघांनी दोन कॅनमधील रॉकेल स्वतःवर ओतून घेताच पोलिसांची धावपळ उडाली.

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्याने आमच्या कुटुंबाची दखल घ्यायला हवी होती, परंतु तसे झाले नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी दोघांच्याही हातातील रॉकेलचे कॅन काढून घेतले. आशीष आणि अमित कोथळे अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेची पूर्वकल्पना असल्याने कोथळेच्या घरापासून त्या दोघांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवल्यामुळे अनर्थ टळला.

शहर पोलिस ठाण्यासमोरच पोलिसांच्या अनागोदी कारभाराचा निषेध आणि तपास यंत्रणेकडून तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे ओरडून सांगत दोघांनी रॉकेलचे कॅन डोक्यावर पालथे करायला सुरुवात केली. समोरचे दृश्य पाहून पोलिसांची धावपळ उडाली. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, सीआयडीचे तपास अधिकारी, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, शहरचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यासह इतर पोलिसांनी या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील कॅन काढून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांनी वाढला ‘ओझोन’चा थर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीदरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजींमुळे वातावरणातील घातक ओझोनच्या थरात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण संजय घोडावत विद्यापीठातील अवकाश वैज्ञानिक डॉ. डी. पी. नाडे यांनी नोंदविले आहे. फटाक्यांमुळे गंभीर आजारांबरोबर कचऱ्याचे साम्राज्य वाढून ध्वनी प्रदूषणासह वायू प्रदूषण वाढत आहे. त्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच्या वातावरणातील विघातक ओझोनमध्ये वाढ झाल्याचे संशोधन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

डॉ. नाडे व संशोधक विद्यार्थी स्वप्निल पोतदार यांनी अतिग्रे आणि कोल्हापूर परिसरात ओझोन व त्यावरील परिणाम करणाऱ्या घटकांवर ‘मायक्रोटोप ओझोनमीटर’च्या साहाय्याने संशोधन करीत आहेत. १ सप्टेंबर २०१७ पासून दररोज ओझोनच्या पातळीचा अभ्यास ते करीत आहेत. या संशोधनाचा एक भाग म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वेगवेगवेळ्या ठिकाणी दिवाळीपूर्वी, दिवाळी सणाच्या कालावधीत आणि त्यानंतर वातावरणातील ओझोनच्या पातळीची मोजणी करण्यात आली. त्यावेळी असे निदर्शनास आले कि, दिवाळी व दिवाळीनंतर ओझोनचे पातळी अचानकपणे वाढली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात ही वाढ जास्त दिसून आली. या अभ्यासातून कोल्हापूर परिसरात जर एवढा बदल होत असेल तर मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमध्ये धोक्याची पातळी किती ओलांडली असेल याचा अंदाज येतो.

संशोधन अभ्यासातून असे दिसून आले कि, दिवाळी पूर्वी ओझोनचे प्रमाण २६५ डॉब्सन युनिट (DU) होते. पण दिवाळीमध्ये व त्यानंतर ओझोनचे प्रमाण २० डॉब्सन युनिट एवढे वाढून २८५ डॉब्सन युनिटपर्यंत पोहोचले. ओझोन श्वसनामध्ये आल्यास आरोग्यासाठी घातक ठरतो. त्यामुळे छातीत दुखणे, घशामध्ये खवखवणे, घुसमटल्या सारखे वाटणे असे निरनिराळे आजार होऊ शकतात. अस्थमा, दमा, यांसारखे रोग असलेल्या रुग्णांसाठी तर ओझोन खूपच घातक आहे. फुफ्फुसाचा कर्करोगही होऊ शकतो. वनस्पती व प्राण्यांच्यावरही तपांबरीय ओझोनचे वाईट परिणाम आढळून आलेले आहेत.

या संशोधनासाठी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ व्ही. ए. रायकर, कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांचे प्रोत्साहन मिळाले असे डॉ. नाडे, पोतदार यांच्या टीमने सांगितले. विज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. ए. डी. सावंत, भौतिकशास्त्र विभागप्रमुख सरिता पाटील, प्रा. डॉ. संतोष माने, डॉ. राणी पवार, डॉ. एस. ए. जगदाळे यांचेही सहकार्य मिळाल्याचे पोतदार यांनी सांगितले.


फटाके फक्त पैसाच नाही तर स्वच्छ हवेला, शांततेला जाळतात. न्यायालयाने दिल्लीत केलेली फटाक्यांची बंदी हा चांगला निर्णय आहे. देशभर याची अंमलबजावणी करायला हवी. फटाकेविरहित दिवाळीचे अनेक चांगले मार्ग आहेत. वस्तूतः सणांमधून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला गेला पाहिजे. त्यासाठी आपण पावले उचलण्याची गरज आहे.

डॉ. डी. पी. नाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगीप्रश्नी फौजदारी दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात डेंगीचा उद्रेक होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. जीव गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा आधीच काही करण्याची गरज आहे. दहा दिवसांत डेंगीची साथ रोखता आली नाही तर आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा महापौर हसीना फरास यांनी दिला. पदाधिकारी व नगरसेवकांनीही आरोग्यव्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड करत टीकेचा भडिमार केला. सफाई कामगार वीस दिवस गैरहजर असतात. मुकादही सात दिवस रजेवर असतात. पैसे घेऊन कारवाई थांबवली जाते, अशा कारभाराची पोलखोल करताना आरोग्य विभागाची व्यवस्था नीट बसवण्याचा इशारा देण्यात आला.

डेंगीमुळे शुक्रवार पेठेतील शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. डेंगीची परिस्थिती धोकादायक बनत असल्याने महापौर फरास यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर म्हणाले, ‘जूनपासून डेंगीने चार मृत्यू झाले आहेत. ७८ रुग्ण आढळले असून, त्यातील ३२ रुग्ण बरे झाले आहेत. ४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.’ ही माहिती देताच नगरसेवकांचा पार चढला. महापौर फरास यांनी आरोग्य कर्मचारी अनेक दिवस धूर व औषध फवारणीस येत नसल्याची बाब मांडली. शुक्रवार पेठेतील त्या मुलीला डेंगी झाल्याचे समजूनही तिथे स्वच्छता केली नसल्याचे सांगितले. गटनेते शारंगधर देशमुख यांनी अनेक भागात डेंगीचे रुग्ण असतानाही महापालिककडे माहिती नसल्याचा आरोप केला. त्यामुळे ज्या भागात रुग्ण सापडतात, तिथे तपासणीला कुणी येत नसल्याचे सांगितले. रुपाराणी निकम व स्मिता माने यांनी कामगारा बेशिस्त असल्याचा आरोप केला. काही कामगार २० दिवस गैरहजर जातात. मुकादम सात दिवस रजेवर असतात. त्यामुळे स्वच्छता होत नसल्याने गटारीमध्ये आळ्या सापडतात. सत्यजित कदम म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. पण कामावेळी हजर नसतात. हे कर्मचारी नेमके कुठे जातात? एका अधिकाऱ्याच्या घरात कामासाठी दोन महिला कर्मचारी आहेत. पंचवीस हजाराचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून शहराला आवश्यक ते काम करुन घ्या. त्याशिवाय शिस्त लागणार नाही.

राहुल चव्हाण यांनी तर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले, माझ्या भागातील एका दुकानदाराकडे आळ्या सापडल्या. त्याच्यावर कारवाई करण्याचे दूर, दंडही केलेला नाही. त्या दुकानदाराकडून पैसे घेऊन पाटील यांनी कारवाई केली नाही. काम जमत नसेल तर राजीनामा द्यावा. आदिल फरास यांनी धूर फवारणी करण्यापेक्षा जिथे आळ्या सापडतात तिथे औषध फवारणी करण्याची सूचना केली. त्यासाठी प्रत्येक भागातील गल्लीमध्ये कर्मचाऱ्यांना पाठवा, असेही सांगितले. सचिन चव्हाण यांनी महापालिकेच्या इमारतीतच डेंगीच्या आळ्या व डास सापडत असल्याचा गलनाथ कारभार मांडला. ते म्हणाले, कळंबा फिल्टर हाऊसच्या टाकीत आळ्या सापडल्या. कर्मचाऱ्यांना विनंती करुन तिथे सफाई केली. डासांचे प्रमाण भरपूर आहे. अशा परिस्थितीत डेंगीची साथ कशी कमी होणार? प्रा. जयंत पाटील यांनी याबाबत प्रशासन काय करणार आहे, मोहीम राबवण्यात नगरसेवकांची मदत घ्या. कुणी सदस्य विरोध करु लागला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण आरोग्य यंत्रणेने काम करण्याची गरज आहे, असे सांगितले.

निलोफर आजरेकर, दीपा मगदूम, शोभा कवाळे यांनीही जोरदार टिका केली. यावेळी कळंबा तलावातील गळती काढण्याचे काम दहा डिसेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

नगरसेवकाच्या दुकानातूनच हप्ता

प्लास्टिक पिशव्यांमुळे अनेक गटारी, नाले तुंबत असतात. त्यासाठी प्लास्टिक बंदी लागू केली. पण शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्या विकल्या जातात, असे सांगत सत्यजीत कदम म्हणाले, बंदी असली तरी अनेक दुकानांत जाऊन कर्मचारी हप्ते गोळा करतात. भाजपच्या एका नगरसेवकाच्या दुकानात जाऊन काही कर्मचाऱ्यांनी पाचशेचा हप्ता नेल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. अनेक ठिकाणी तीनशे रुपये घेऊन महिनाभर पिशव्या विक्री करण्याची मुभा दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २४६ रुग्णांना डेंगीची लागण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील २४६ रुग्णांना डेंगीची लागण झाली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील चार रुग्णांचा समावेश आहे. शहर व जिल्ह्यात डेंगीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पाणी साठवणुकीची भांडी, टाक्या पिंपे स्वच्छ करण्यावर भर दिला आहे. सीपीआर विभागात डेंगीच्या लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.

जून २०१७ पासून जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा फैलाव झाला असून ६३ जणांचे बळी गेले आहेत. स्वाइन फ्लूसाठी सीपीआरमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर डेंगीची साथ पसरली असून कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात २४६ जणांना डेंगीची लागण झाली आहे. कोल्हापूर शहरात चारजण डेंगीने दगावले आहेत. तर ग्रामीण भागातील एक रुग्णांचा समावेश आहे.

शहर व ग्रामीण भागात सर्दी,पडशासह तापांच्या रुग्णांचा संख्येत वाढ झाली आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्येही तापांच्या रुग्णांची वाढ झाली असून ताप आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रक्त तपासणीची अद्यायावत यंत्रणा असल्याने डेंगीसदृश्य रुग्णांची तातडीने रक्त तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली. डेंगीच्या रुग्णाला प्लेटलेटस् ताबडतोब उपलब्ध करुन देण्यात येतात. तसेच सलाईन व औषधे देण्यात येत आहेत. डेंगीचा धोका लक्षात घेऊन सीपीआर हॉस्पिटलमधील सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. पाण्यातील अळ्या खाण्यासाठी गप्पी मासेही सोडण्यात आलेले आहेत. शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाची स्वच्छता करण्यात आली आहे.

जिल्हा शल्यचिक‌ित्सक विभागाकडून ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे. डेंगीची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआरकडे पाठवले जाते. ग्रामीण भागात पाणी साठवणाऱ्या टाक्या, पिंपाची स्वच्छता करण्यासाठी आरोग्यसेवक घरोघरी जाऊन भेट देऊन नागरिकांना सूचना देत आहेत.

डेंगीची लक्षणे व उपाय

एकदम जोराचा ताप चढणे

डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे

डोळ्यांच्या मागील भागात वेदना होते.

डोळ्यांच्या हालचाली अधिक होते

चव आणि भूक नष्ट होणे

छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे

मळमळणे आणि उलट्या होणे

औषधोपचार

ताप असेपर्यंत आराम करावा.

चार दिवस ताप राहिल्यास डॉक्टरांकडे जावे.

निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा

रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करा

उपाययोजना

डेंगीला प्रतिबंध करण्यासाठी डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय आहे. घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नये. तसेच वेळीच साठलेले पाणी रिकामे करावा. एक दिवस कोरडा पाळावा. या प्रतिबंधात्मक गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. अंगभर कपडे घालावेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाटिवडेच्या बाप-लेकास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाटिवडे (ता. भुदरगड) येथे भाऊबंदकीच्या वादातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी बापलेकास मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेतीच्या पाण्यावरून आणि शेतात शेळी घातल्याच्या रागातून २०१६ मध्ये महादेव यशवंत गुरव (वय ३०) यांचा २० खून झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी केरबा दादू गुरव (५५) आणि त्यांचा मुलगा युवराज (३१) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी जन्मठेपेसह प्रत्येकी २० हजार रुपयांची शिक्षा सुनावली. दीड वर्षांच्या आत या गुन्ह्याचा निकाल लागला.

फिर्यादी यशवंत ईश्वरा गुरव हे भाटिवडे येथे कुटुंबासह राहतात. गेल्या वीस वर्षांपूर्वी शेतातील ओढ्यावर भावकीतील सर्वांनी मिळून विद्युत मोटर बसवली आहे. ती दत्तात्रय गुरव यांच्या नावावर होती. या मोटरीने पाळीप्रमाणे सर्वांच्या शेतीला पाणी दिले जात होते. दत्तात्रय गुरव यांच्या मृत्यूनंतर केरबा दामू गुरव यांच्या नावावर विद्युत मोटर करण्यात आली. त्यानंतर आरोपी केरबा गुरव हा भावकीतील इतरांना पाणी देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. यावरून यशवंत गुरव आणि केरबा गुरव यांच्यात वाद होता.

२५ जून, २०१६ मध्ये सायंकाळी साडेचारच्या सुमारास यशवंत गुरव यांचा मुलगा महादेव हा गवत आणि शेळ्या घेऊन घरी निघाला होता. ‘उसाला पाणी कधी देणार?’ अशी विचारणा त्याने केरबा गुरव याच्याकडे केली. त्याचा राग मनात धरुन आरोपी केरबा व त्याचा मुलगा युवराज गुरव यांनी विळ्याने वार करुन महादेवला गंभीर जखमी केले. त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यशवंत गुरव यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी केरबा आणि युवराज गुरव या बाप-लेकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. टी. राठोड, हवालदार मधुकर घाटगे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षातर्फे अॅड. विवेक शुक्ल यांनी १२ साक्षीदार तपासले. यात मृत महादेव याची आई व दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांचा युक्त‌िवाद आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायाधीश महेश जाधव यांनी आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भोगावी लागणार आहे. दीड वर्षांच्या आत हा निकाल लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेषांतर करून केला तपास

$
0
0

अत्याधुनिक पद्धतींचा वापर

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर

कोपर्डी येथे शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने प्रचंड जनक्षोभ आणि जातीय तणाव निर्माण झाला होता. या स्थितीत गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. नगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे आणि त्यांच्या पथकाने वेषांतर करून गुन्ह्याचा तपास केला. तपासातही अत्याधुनिक साधनांचा वापर केल्याने या गुन्ह्यातील तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा होऊ शकली. यामुळे कोपर्डी गुन्ह्याचा तपास हा पोलीस खात्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.

किरकोळ वादाचा राग मनात धरून जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय २५), संतोष गोरख भवाळ (३०) आणि नितीन गोपीनाथ भैलुमे (२६, तिघेही रा. कोपर्डी) या तिघांनी शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. १३ जुलै २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झाली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून १६ जुलैला तपास स्थानिक गन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर सर्वात आधी घटनास्थळावर पोहचणारे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली. पाटोळे यांनी यापूर्वी खर्डा, जवखेडा, शिर्डी, लोणीमावळा या ठिकाणी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास केला होता. यामुळे नगर जिल्ह्यातील सामाजिक स्थितीचा त्यांना नेमका अभ्यास होता. कोपर्डीमधील घटनेमुळे राज्यभर जनक्षोभ उसळला होता. संतप्त जमाव संशयितांच्या घरांवर हल्ले करून सूड उगवण्याच्या मानसिकतेत होता. याशिवाय राज्यकर्त्यांची वर्दळ आणि दबावही वाढत होता. चार ते पाच महिने कोपर्डीत रोज हजारो लोकांची वर्दळ होती. कोणत्या क्षणी गर्दीचा उद्रेक होईल याचा अंदाज बांधणेही कठीण होतं. या स्थितीत निरीक्षक पाटोळे आणि कर्जतचे तत्कालीन निरीक्षक बाजीराव गवारे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने तपास केला.

आरोपींना घेऊन घटनास्थळाची पाहणी करणे हा तपासातील महत्त्वाचा भाग होता. मात्र कोपर्डीतील गर्दीमुळे आरोपींना खुलेआम घेऊन जाणं शक्यच नव्हतं. पाटोळे यांनी मोजक्या पोलिसांना सोबत घेतलं. त्यांना वेषांतर करण्याच्या सूचना दिल्या. स्वतः दाढी लावली. डोक्यावर मळकट गांधी टोपी घातली. आरोपींचेही वेषांतर केले. खासगी वाहनातून त्यांना कोपर्डीत घेऊन गेले. गर्दीतच आरोपींकडून घटनेची माहिती घेतली. काही फोटोदेखील काढले. तपास करतानाही पोलिसांना अनेकदा हाच फंडा वापरावा लागला. उघडपणे आरोपींना घेऊन पोलीस फिरले असते तर कदाचित आरोपींसह पोलिसांवरही जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी बहुतांश तपास वेशांतर करूनच केला, अशी माहिती पाटोळे यांनी दिली. पाटोळे सध्या कोल्हापुरातील विशेष शाखेत कार्यरत आहेत.

अधिकारी बर्मुडा-टीशर्टवर

कोर्टात आरोपपत्र दाखल करतानाही पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली. आरोपपत्राबाबत माहिती मिळावी यासाठी प्रसार माध्यमं पोलिसांच्या मागावर होती. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आठवडाभर नगर कोर्टात तळ ठोकला होता. माध्यमांची नजर चुकवण्यासाठी तपास अधिकारी पाटोळे यांनी पोलिसांचे पथक बदलले. साध्या वेषातील पोलिसांकडून खासगी वाहनातून आरोपपत्र कोर्टात पाठवले. आपली खाकी वर्दी त्यांनी आधीच एका मित्राच्या घरी ठेवली होती. सकाळी फिरण्याच्या निमित्ताने ते बर्मुडा आणि टीशर्टवर घराबाहेर पडले. यानंतर ते मित्राच्या घरी पोहोचले. पुढे कोर्टात जाऊन त्यांनी आरोपपत्र दाखल केलं. आरोपपत्र दाखल केल्याची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना देऊन पोलीस अधिकाऱ्यांनी मोबाइल बंद ठेवले. मुख्यमंत्र्यांनी याची माहिती प्रसार माध्यमांना देईपर्यंत यातील काहीच माहिती बाहेर आली नाही.

अत्याधुनिक तपास साधनांचा वापर

पोलिसांनी तपासादरम्यान पारंपरिक पद्धतींसह अत्याधुनिक साधनांचाही वापर केला. आरोपींच्या नखांमध्ये पीडित मुलीच्या कपड्याचे अंश मिळाले होते. आरोपीने मुलीच्या शरीरावर चावा घेतला होता. पोलिसांनी दाताच्या जबड्याचा व्रण आणि आरोपीचा जबडा (टीथ पॅटर्न) याची प्रयगोशाळेत पडताळणी केली. हा पुरावा कोर्टात महत्त्वाचा ठरला.

३२८ पानांचे आरोपपत्र

पोलिसांनी ३२८ पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले होते. यात ७० साक्षीदारांच्या साक्षींसह पुराव्यांची मांडणी केली होती. पोलिसांना घटनास्थळावरून आरोपीची मोटारसायकल आणि चप्पल खरेदीची पावतीही मिळाली होती. मोटारसायकल आणि चप्पल हे मुख्य आरोपीने घटनेच्या आठवडाभर आधीच खरेदी केले होते. परिस्थितीजन्य पुराव्यांची मोठी यादीच पोलिसांनी आरोपपत्रात दिली होती.

जितेंद्र शिंदे याने थंड डोक्याने नियोजन करून पीडित मुलीचा खून केला होता. यासाठी त्याला दोन्ही साथीदारांनी मदत केली. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. कमीतकमी कालावधीत सर्व पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले होते. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याने पीडितेच्या नातेवाईकांना न्याय मिळाला.

- शशिराज पाटोळे, तत्कालीन तपास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजी, एसपींवर फौजदारी कराकोथळे कुटुबीयांकडून बेमुदत उपोषण, आत्मदहनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळेच्या खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे संगनमताने नष्ट करणाऱ्या संशयित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हलगर्जी केल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक दिपाली काळे, तत्कालीन अधिक्षक दत्तात्रय शिंदे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा अकरा डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोथळे कुटुंबीयांनी बुधवारी दिला आहे. उपोषणानंतरही न्याय न मिळाल्यास सरकारने दिलेला दहा लाखांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदनही कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सांगलीकरांनी पोलिसांची चूक पोटात घ्यावी आणि सुधारण्याची संधी द्यावी, असे विधान विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकवून अमानुष मारहाण करून त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या पोलिस गुन्हेगारांनी संपूर्ण पोलिस दलाला बदनाम केले. त्यांचे कृत्य चव्हाट्यावर आल्यानंतरही नांगरे-पाटील असे विधान करीत असतील तर ते संशयितांना मदत करण्यासाठी तपासात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीश, निवृत्त आणि एक सक्षम अधिकारी म्हणून परिचित असलेले अप्पर पोलिस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्या निरीक्षणाखाली खाली वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा, अशी मागणी अनिकेतचे वडील अशोक कोथळे, आई अलका, पत्नी संध्या, भाऊ अमित, अशिष, भावजय स्मिता, निता आदींनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तपास अहवाल वरिष्ठांकडे सादर होणार
अनिकेत कोथळे प्रकरणात गेल्या वीस दिवसांत झालेला तपासाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी आणि डीएनए चाचणी अहवाल लवकर मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यासाठी सीआयडीचे तपास अधिकारी उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी मुंबईकडे रवाना होत आहेत. दरम्यान, अद्यापही घटनेच्या रात्री साक्षीदार अमोल भंडारे याला नदीकाठावर धरून बसणारे दोघे नेमके कोण आहेत, हे उघड झाले नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी कौशल्य पणाला लावून त्या दोघांची माहिती मिळविण्यासाठी बुधवारी नदीकाठाची पाहणी केली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाची पद्धत वेगळी असून, यामध्ये तपास अधिकाऱ्याला वेळोवेळी तपासाच्या प्रगतीचा अहवाल अप्पर पोलिस अधीक्षक, अधीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक, अप्पर पोलिस महासंचालकांना द्यावा लागतो. तपासात कोणती त्रुटी राहिलेली असेल त्याची पूर्तता करण्याचा सुचना देण्याबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रसंगी जाबही विचारला जातो. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आजपर्यंतच्या तपासाचा अहवाल देण्यासाठी उपअधीक्षक कुलकर्णी मुंबईकडे रवाना होत असल्याचे सांगण्यात आले.
डीएनए अहवालाकडे लक्ष
अनिकेत कोथळे प्रकरणात डीएनए अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अनिकेतचे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने त्याच्या डीएनएचा अहवाल लवकर मिळविण्यासाठी तपास अधिकारी प्रयत्नशील आहेत. सर्वसाधारणपणे डीएनएचा अहवाल येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागत असतो. परंतु, अनिकेत प्रकरणाचे दोषारोपपत्र नव्वद दिवसांच्या आत दाखल करण्याचे उदिष्ट ठेवल्याने डीएनएचा अहवाल लवकर मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहितीही पुढे आली आहे. केवळ डीएनएच नाहीतर अनिकेतचा मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणीही पुराव्यादृष्टीने आवश्यक असलेल्या काही वस्तू तपास पथकाच्या हाती लागल्या आहेत. त्या वस्तूंची, गुन्ह्याच्यावेळी संशयितांच्या अंगावर असलेली कपडे, त्यांनी हाताळलेल्या वस्तू, मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहने याचीही तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. वैद्यकीय अहवाल हा एक भक्कम पुरावा मानला जात असल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्या बाजूवरही अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्याचा समीक्षा सिद्धांत सुधारण्याची गरजडॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे मत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कवीवर्य वि. दा. कंरदीकर नगरी, सातारा
‘साहित्याचा समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धतही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाच स्थान काय, हा संशोधनचा विषय आहे. समीक्षा व्यवहार पहिल्यापासून समाधानकारक नव्हता आणि आजही तो नाही. त्यामुळे या दोन्हीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे,’ असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विभागीय समीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी रा. भा. पाटणकर व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात, स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, किशोर बेडकिहाळ, मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ आदी उपस्थित होते.
कोतापल्ले म्हणाले, ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा चिकित्सकेचा विषय आहे. आपल्या दैनंदिन जीवनात समीक्षा सुरू असते. कोणत्याही बाबतीत मूल्यात्मक विधान म्हणजे समीक्षा. परंतु, समीक्षेच्या सिद्धांतमध्ये शास्त्र, निकष बदलेले असतात. साहित्य समीक्षेसाठी निकष, शास्त्र, पद्धती विकसित झालेल्या आहेत. सैद्धांतिक मांडणीनुसार समीक्षा होणे आवश्यक आहे. सिद्धांत मांडण्यासाठी त्याला इतिहास, संस्कृतीचा आधार घेतला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांत समीक्षेचे सिद्धांत बदलेले असून, त्याची मीमांसा करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मीमांसा करताना त्यासाठी वेगवेगळ्या घटकाची आवश्यकता आहे. सध्याची समीक्षा ही प्रकाशक आश्रित झाली आहे, तसेच समीक्षा पद्धतीही लेखकाश्रित झाल्या आहेत. त्यात जात नावाचा घटकाचे स्थान हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समीक्षा व्यवहार हा पहिल्यापासूनच चांगला नव्हता आणि आता तोही चांगला नाही, त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ही स्व. चव्हाण यांची इच्छा होती. आता मराठी भाषा टिकायची असेल तर ती ज्ञानभाषेबरोबरच उपजिविकेचे साधन झाली पाहिजे त्यादृष्टीने साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेने मिमांसा केली तर ती महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरेल.’

संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्या शिक्षणव्यवस्थेचे काय झाले आहे हे आपण पाहतो आहोतच. तिच्यातील उदारमतवादी दृष्टीकोनामुळे तत्वज्ञानासह मानव शास्त्रांचे अस्तित्व कसेबसे तग धरून होते. जागतिकीकरण, बाजार, शिक्षणाचे खासगीकरण, कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणांना आलेले महत्व या सर्व घटकांना दिलेल्या महत्वामुळे समीक्षेला, चिकित्सा करण्याला, विचार करण्याला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणक्षेत्राने पूर्णपणे झटकून टाकली आहे. जागतिकीकरणाच्या अरिष्टाने मराठी समीक्षेची आणि साहित्याचीही अक्षरश: गोची केली आहे. जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या महाबाजारात उतरायचे असेल तर मराठीत लिहून भागत नाही. कारण या बाजारात मराठीचे दुकानच नाही. अगदी राष्ट्रीय पातळीवर धडपडायचे असेल तरी आपल्या समीक्षकांना आणि लेखकांना इंग्रजीत लिहायची कसरत करावी लागते. हे टाळण्यासाठी मराठीमध्येच आपला लेखन व्यवहार करायचा म्हटले तर जागतिकीकरणाच्या दबावातून निर्माण झालेला संकुचित अस्मितांच्या सापळ्यात अडकण्याला पर्याय नाही. त्यासाठी धोका स्वीकारत स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रात मराठी ही भाषा व्यवहाराची भाषा झाली पाहिजे. साहित्य परिषदेला बरोबर घेऊन शिक्षणाला वेगळी दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मराठी ही भाषा जगण्याचे साधन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या विषयाच्या अनुषंगाने कौशल्य विकास मराठीत येणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची भाषा मराठी झाली पाहिजे. मराठी शाळा, संस्कृती जगली पाहिजे. त्यासाठी वेगळा उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.’ मसाप, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजाऱ्याकडे मागितली लाखाची खंडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओढ्यावरील रेणुका मंदिरातील पुजारी सुनील विलास मेढे (वय ३३, रा. सुभाषनगर) याला धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या खंडणीखोराविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्ता महादेव पवार (वय ५०, रा. शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे खंडणीखोराचे नाव आहे. पवार याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. यातील ५० हजार रुपये घेऊन उर्वरित पैशांसाठी मेढे याला मारहाण केली होती.

सुनील विलास मेढे हा गेल्या आठ वर्षांपासून ओढ्यावरील रेणुका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत आहे. मंदिराच्या मालकीवरून दोन कुटुंबात वाद आहे. यात पुजारी मेढे कोर्टाच्या कामासाठी मदनआई जाधव यांना मदत करतो. यावरून दत्ता पोवार हा गेल्या दीड वर्षांपासून त्रास देत आहे, असा आरोप सुनील मेढे याने केला आहे. पवार याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास मंदिरात थांबू देणार नाही, असेही त्याने धमकावले होते. जिवे मारण्याची धमकी देऊन पवार याने मे २०१७ मध्ये मेढे याच्याकडू ५० हजार रुपये उकळले. उर्वरित पैशांसाठी त्याच्याकडून त्रास सुरू होता. याशिवाय प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांचीही मागणी पवार याने केली होती.

२२ नोव्हेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास रेणुका मंदिरात येऊन पवार याने सुनीलकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने पवार याने मेढेला बेदम मारहाण केली. तसेच सौंदती येथील भाऊ प्रताप माने यांचे दागिने आणि पाचगाव येथील स्थावर मिळकतीची कागदपत्रे देण्याचा आग्रह धरला. दागिने आणि कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने पवारने सुनील मेढेस पुन्हा मारहाण केली. मेढे याने याबाबत मंगळवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पोवार याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पवार हा महापालिकेतील कर्मचारी असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... तर आयुक्तांनीच सभागृह चालवावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात एलइडी दिवे बसविण्याबाबत सभागृहाचे न ऐकता आयुक्त परस्पर निर्णय घेणार असतील तर आम्ही येतच नाही, त्यांनीच सभागृह चालवावे. आमच्या हक्कावर गदा येत असेल तर आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी भर सभेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिला. तर महापालिका डास निर्मूलनासाठी ४० लाख रुपयांना खरेदी केल्या जात असलेल्या औषधांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. याबाबत दोषींचे निलंबन करुन फौजदारी करण्याची मागणीही त्यांनी केली. पिण्याच्या पाण्यांमधील अळ्या, माती, पाण्याचे ऑडिट या विषयावरुन पाणीपुरवठा विभागाला या सभेतही पुन्हा धारेवर धरले.

पुढील महिन्यात महापौर व उपमहापौर राजीनामे देणार असल्याने उपमहापौर अर्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभा झाली. सभेमध्ये केएसबीपीला करार करण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला. शालिनी सिनेटोनसाठी भूखंड आ​रक्षित करण्याचा ठराव पुढील मिटिंग करण्यात आला.

शहरातील जुन्या सर्व दिवे बदलून तिथे एलईडी बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी किती क्षमतेचे दिवे बसवले जावेत याबाबत आशिष ढवळे यांनी विचारणा केली. आयुक्तांनी नवीन एलईडी बसवण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार त्या-त्या भागात दिवे बसवण्यात येतील, असे सां​गितले. यावरुन शारंगधर देशमुख यांचा आयुक्तांशी जोरदार वाद झाला. देशमुख म्हणाले, ‘उपनगरात काही पर्याय नाही, म्हणून ट्यूबलाइट बसवल्या आहेत. त्यामुळे तिथे कमी क्षमतेचे दिवे बसवण्यात यावेत, असे सांगितल्यास ते योग्य होणार नाही. आमच्या प्रभागात कुठे काय सुविधा हवी हे ठरवण्याचा नगरसेवकाला अधिकार आहे. त्याऐवजी तो बाहेरुन येणारा सर्व्हेअर जर आमच्या भागात कोणत्या लाइट बसवाव्यात हे सांगणार असेल आणि त्यानुसार आयुक्त कार्यवाही करणार असेल तर ते मान्य करणार नाही. सभागृहाचे न ऐकता आयुक्त निर्णय घेणार असतील तर आम्ही कशाला यायचे? आम्ही येतच नाही, त्यांनीच निर्णय घ्यावेत व सभागृह चालवावे.’

यामध्ये सत्यजित कदम यांनीही उपनगरांमध्ये सध्याच्या लाइटप्रमाणे दिवे बसवण्याऐवजी जादा क्षमतेचे दिवे बसवले जावेत, असे सांगितले. आयुक्तांनी त्या त्या प्रभागात प्रकाश चांगला पडण्यासाठी मदत म्हणून सर्व्हे केला जात आहे. नगरसेवकांना विचारात घेऊनच कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर नगरसेवकांच्या हक्कावर गदा येणार असेल तर अजिबात ऐकून घेणार नाही, असा इशारा देशमुख यांनी दिला.

शेटे यांनी महापालिका २४०० लिटर औषध खरेदी करत असते. ४० लाख रुपयांची खरेदी होत असताना किती आले व किती दिले याचा काही पत्ता नाही. त्याचे टेस्टिंगही येथील मेडिकल कॉलेजमध्ये करण्याऐवजी मिरजेतील एका संस्थेकडून घेतले जाते. यामध्ये महापालिका, कंत्राटदार यांच्यात साखळी असून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे मांडले. यासाठी चित्रीकरण करण्यात यावे अशी मागणी करुन या औषधाने डास मरत नसल्याने ते बनावट असल्याचाही आरोप केला. केमिकल व पावडर आणून दिली. रत्नेश शिरोळकर यांनी आयुक्तांच्या घराशेजारील गल्लीत डेंगीचे दहा रुग्ण आहेत. तेथील स्वच्छता नीट केली जात नाही. तसेच पाण्याच्या टाकीजवळही सातत्याने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करुनही पुन्हा भंगारवाली महिला येत आहे. त्यामुळे ते हटवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे निदर्शनास आणून​ दिले.

ड्रेनेजयुक्त पाणी आयुक्तांसमोर

शमा मुल्ला यांनी यादवनगरात येणारे ड्रेनेजयुक्त पाणी व किरण नकाते यांनी अळ्या असलेले पाणी आयुक्तांसमोर ठेवले. जलअभियंता केवळ आश्वासने देत असून काम काहीच होत नसल्याचा जोरदार आरोप नगरसेवकांनी केला. पाण्याच्या ऑडिटसाठी दोन कोटी दिलेले असताना पुन्हा महापालिका तपासणी करणार असेल तर ऑडिटचे पैसे पाण्यातच गेल्याचे अजित ठाणेकर यांनी मांडले. थेट पाइपलाइन योजनेचे काम केंव्हा पुर्ण होणार की योजना रखडणार असे नकाते यांनी विचारले. सत्यजीत कदम यांनी थेट पाइपलाइन कामावर प्रशासनाचा वचक नसल्याचा आरोप केला. तिथे तातडीने अधिकारी नेमल्याशिवाय कामे होणार नाहीत, असेही सांगितले. गेल्या महिन्यात कमलाकर भोपळे यांनी सार्वजनिक शौचालयांची दारे तुटल्याचे सांगितले होते. पण प्रशासनाकडून काहीच हालचाल झाली नसल्याने शेवटी त्या भागातील मतदार असलेल्या कारागिराने स्वतः दारे बसवली. त्याबद्दल अवलक यांचा सभेत सत्कार करण्यात आला.

४०दिवसात गॅस दाहिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवल क्लबचे ‘दर्द ए डिस्को’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सांस्कृतिक संचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या ५७ व्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब संस्थेच्या ‘दर्द ए डिस्को’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला. तर इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेच्या ‘नथिंग टू से’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील स्पर्धेत १८ नाट्यप्रयोग सादर झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वसंत दातार, सुहास वीरकर आणि मानसी राणे यांनी काम पाहिले. स्पर्धेत कोल्हापूरच्या फिनिक्स ​क्रिएशनच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ‘दर्द ए डिस्को’ या नाटकासाठी कोल्हापूरच्या विद्यासागर अध्यापक यांना मिळाले. तर दिग्दर्शनाचे दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी ‘नथिंग टू से’ या नाटकाच्या प्रताप सोनाळे यांची निवड झाली. विनायक सावर्डेकर यांना ‘के ५’ या नाटकासाठी उत्कृष्ट प्रकाशयोजनेचे बक्षीस मिळाले. तर याच विभागातील दि्वीतीय पारितोषिकावर ‘दर्द ए डिस्को’ नाटकाच्या माध्यमातून मंदार भणगे यांनी नाव कोरले.

नेपथ्याचे प्रथम बक्षीस शुभम वाडीकर यांना (नाटक- हयवदन), तर दुसरे बक्षीस विलास जाधव यांना (नाटक - इथे ओशाळला मृत्यू) यांना मिळाले. रंगभूषेसाठी प्रसाद गद्रे (नाटक - इथे ओशाळला मृत्यू) यांना प्रथम तर नुपूर कवठेकर (नाटक- हयवदन) यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

उत्कृष्ट अभिनय गटात संतोष आबाळे यांना नथिंग टू से नाटकासाठी रौप्यपदक मिळाले. राजश्री खटावकर यांना शांतता कोर्ट चालू आहे या नाटकासाठी रौप्यपदक मिळाले. अभिनयासाठी वैशाली घोरपडे (अग्निपंख), अश्विनी कनावजे (के ५), श्वेता कुलकर्णी (वाटले होते काही मैल), उमा नामजोशी (दर्द ए डिस्को), प्रकाश पाटील (सूर्यास्त), सुभाष टाकळीकर (इथे ओशाळला मृत्यू), प्रमोद पुजारी (शांतता कोर्ट चालू आहे), यशवंत कुलकर्णी (दर्द ए डिस्को).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरी आणि नागरिकांच्या हिताच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी हल्लाबोल आंदोलन केले. ‘खड्डेच खड्डे रस्त्यावर, सरकार नाही भानावर’, ‘खोटी आश्वासने, फसव्या जाहिराती - जनतेच्या माथी मी लाभार्थी’, ‘पेट्रोल-डिझेल-गॅस महाग, मरण स्वस्त जगणं महाग’ अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दुमदुमला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘फडणवीस सरकार चले जाव’चा इशारा दिला. भाजप, सेनेचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी करण्यात आली.

सरकारच्या निष्क्रीय कारभाराविरोधात अंगावर आसूड ओढणारी कडकलक्ष्मी मोर्चाच्या अग्रभागी होते. सरकारविरोधातील घोषणांचे फलक लक्षवेधी ठरले. दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला. आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, महापौर हसीना फरास यांच्या नेतृत्वाखाली व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील सभेत आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत कुठल्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. कर्जमाफी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा मांडली. नोटबंदी व जीएसटीमुळे जनतेचे वाट्टोळे झाले आहे. फडणवीस सरकार चले जावचा इशारा देण्यासाठी मोर्चा निघाला आहे. कर्जमाफी योजनेतून जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये मिळायला हवे होते, पण सरकारच्या जाचक अटींमुळे फक्त साडेतीन कोटी रुपये मिळालेत. तरुणांपासून नोकरदारापर्यंत आणि शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यापर्यंत कुठलाच घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. या सरकारला खाली खेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.’

ऑनलाइन नव्हे

वाट लावीन योजना

माजी आमदार के. पी. पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. चांदेकरवाडी येथील शेतकरी तानाजी खोत यांनी पोटतिडकीने भावना मांडत सरकारच्या ऑनलाइन योजनेची खिल्ली उडविली. ‘ऑनलाइन योजना ही शेतकऱ्यांचे हित साधणारी नव्हे तर वाट लावणारी आहे’ असे त्यांनी सांगितले.

नेत्यांच्या शिष्टमंडळाने ‘महसूल’ उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांना निवेदन दिले. माजी महापौर आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मदन कारंडे, अमरसिंह पाटील, विश्वनाथ कुंभार, पंडीतराव केणे, डी. बी. पिस्टे, मधुआप्पा देसाई, मधुकर जांभळे, युवराज पाटील, प्रताप माने, अनिल साळोखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. सरकारने कर्जमाफी योजनेत ६६ प्रकारच्या अटी घालून शेतकऱ्यांची छळवणूक सुरु केली आहे. जिल्ह्याला कृषी संजीवनी योजनेचा काहींच लाभ होत नाही. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.

धनंजय महाडिक, खासदार

माने, यड्रावकर अनुपस्थित

माजी खासदार निवेदिता माने, जयसिंगपूरचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, शाहूवाडीचे मानसिंगराव गायकवाड मोर्चात दिसले नाहीत. दुसरीकडे धनंजय महाडिक युवा शक्तीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग ठळक दिसत होता. मोर्चात राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील पाटील, महेश सावंत, संदीप कवाळे, सचिन पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रकाश गवंडी, रमेश पोवार, परिक्षित पन्हाळकर, विनायक फाळके, सलीम मुल्ला, फिरोज सौदागर, जि.प. सदस्या प्रियांका पाटील, विनय पाटील, सतीश पाटील, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, नितीन पाटील, सुनील देसाई, जयुकमार शिंदे, किसन कल्याणकर, रहिम सनदी, रामेश्वर पतकी, संगीता खाडे, जहिदा मुजावर आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील १७ शहरात वाढत असलेल्या हवा प्रदुषणाची केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. वाढते प्रदूषण कसे रोखता येईल याबाबत सर्वच महापालिकांनी आराखडा तयार करावा असा आदेशच देण्यात आला आहे. राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ कोल्हापूरातही हवा प्रदूषण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने आराखडा तयार करण्यात सुरूवात केली आहे. वाढती वाहनसंख्या हेच प्रदुषणाचे प्रमुख कारण असल्याने आराखडा करताना वाहतूक शाखेचीही मदत घेण्यात येणार आहे.

दिल्लीत काही दिवसापूर्वी हवा प्रदूषण वाढल्याने शाळांना सुट्टी द्यावी लागली. यामुळे देशभरात या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर संदर्भात केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्रातील १७ शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांपाठोपाठ कोल्हापूरचाही समावेश यात आहे. त्यामुळे केंद्र व राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी मुंबईत तातडीची बैठक घेतली. राज्यातील अनेक महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या विभागीय कार्यालयातील प्रमुख या बैठकीस उपिस्थित होते. बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘निरी’ व ‘आयआयटी पवई’ या दोन संस्थांनी जो अहवाल तयार केला आहे, तो यावेळी सादर करण्यात आला. या संस्थाच्या अहवालानुसार पदुषणाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तातडीने यावर संयुक्त अहवाल तयार करून त्यावर पुन्हा सविस्तर चर्चा करण्याचे या बैठकीत ठरले.

महिनाभरात होणार आराखडा

राज्यातील प्रदुषित १७ शहरांत कोल्हापूरचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेस तातडीने आराखडा तयार करावा लागणार आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा व्यापक बैठक होणार आहे. बैठकीत हा आराखडा सादर करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील याबाबत या आराखड्यात स्पष्ट उल्लेख असावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल तयार करण्यात येणार आहे. कोल्हापुरात वाहनांची वाढती संख्या हेच प्रदुषणाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आराखडा तयार करताना आरटीओ व वाहतूक शाखेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने तातडीने तिन्ही विभागप्र्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’वरील विरोधकांच्या आरोपांची खिल्ली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभारामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) देशात अग्रस्थान मिळवले. पण फक्त राजकीय द्वेषापोटी टीका करून काहींनी संघाची, संचालकांची आणि नेत्यांची बदनामी सुरू केली आहे. संघाला बदनाम करुन लाखो उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम सुरू आहे. यापुढे गोकुळची बदनामी खवपून घेतली जाणार नाही’ असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. आमदार सतेज पाटील यांचा नामोल्लेख न करता ‘असे आले किती, गेले किती...’ पण त्याचा संघाच्या ब्रँडला धोका नाही, असा विश्वास महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला. सात डिसेंबर रोजी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

‘दूध दरकपातीच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात उत्पादकांऐवजी मौनी विद्यापीठाचे शिक्षक आणि कसबा बावड्यातील युवकांचा भरणा होता’ असे सांगत मोर्चाची खिल्ली उडवून खासदार महाडिक म्हणाले, ‘दिवंगत आनंदराव पाटील आणि सध्याच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नामुळे ७५० लिटर दूध संकलनापासून १२ लाख लिटर दैनंदिन संकलनाचा टप्पा गोकुळने पार पाडला. पण केवळ राजकीय द्वेषापोटी संघाला बदनाम करुन जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी सातत्याने टीका होत आहे. जिल्ह्यातील अनेक संस्था बंद असताना, त्या सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. चांगल्या चाललेल्या संस्थेवर विनाकारण टीका केली जात आहे. तपोवन, शिरोळ व भुदरगडसारख्या संस्था केवळ बदनामीमुळे बंद पडल्या. याप्रमाणेच गोकुळ बंद पाडण्याचा हेतू दिसत आहे. याला आळा घालण्यासाठी गुरुवारी (ता. ७) दसरा चौकातून दुपारी १२ वाजता निषेध मोर्चा काढला जाईल. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. तेथे उत्पादकांचा मेळवा होईल. गोकुळ संघ सक्षमपणे चाला असे वाटणाऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे.’

चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, ‘गोकुळला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात येणार आहे.’

दूध उत्पादक सुरेखा शेगुशी यांनी ‘गोकुळकडून उत्पादकांना सुविधा दिल्या जातात. २५ प्रकारचे अनुदान देऊन उत्पादकांना दिलासा दिला जात आहे’ असे सांगितले. ‘लाखो उत्पादकांचे संसार गोकुळवर अवलंबून आहेत. संघ जो दर देईल तो मान्य आहे. उत्पादक त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत’ असे सुजाता जरग यांनी सांगितले. कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष संजय सावंत यांनीही संघ पाठिशी असल्याने कर्मचारी काळजी घेण्यास सक्षम आहेत असे सांगितले.

यावेळी संचालक अरुण डोंगळे, बाबा देसाई, दीपक पाटील, रामराजे कुपेकर, उदय पाटील, धैर्यशील देसाई, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, जयश्री पाटील, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते.

निवडणूक हे व्यासपीठ

‘महाडिक-पाटील वादासाठी निवडणूक हे व्यासपीठ आहे. निवडणुकीवेळी अनेकवेळा आमनेसामने आलो. पण संघामध्ये या वादाची किनार असू नये. निवडणुका येतील तेव्हा पुन्हा आमनेसामने येऊ’ असे सांगत खासदार महाडिक यांनी ‘स्वत:च्या कारखान्याच्या दराबाबत हे शेतकरी नेते बोलत नाहीत,’ असा टोलाही लगावला.

महिला त्या आणि या...

सोमवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात महिलांनी गोकुळ व्यवस्थापनाला निवेदन दिले. ‘आमचे करपलेले चेहरे पाहून तरी दूध दरवाढ द्या,’ अशी मागणी केली. आजच्या महाडिक यांच्या पत्रकार परिषदेस महिला उत्पादक सहभागी होत्या. त्यांनी सध्याचा दूध दर मान्य असल्याचे सांगितले. महिलांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images