Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापूर: ऊसदर आंदोलन गंभीर वळणावर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी सुरु केलेले आंदोलन चिघळत चालले असून 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांच्यासह दोघांची प्रकृती आज चिंताजनक बनली आहे. तोडगा निघाल्याशिवाय माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बाजीराव विहीर येथे ११ नोव्हेंबरपासून जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांच्यासह नवनाथ माने आणि चंद्रकांत बागल यांचे आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावू लागल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला मात्र ऊसदर तिढा सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेमुळे प्रशासन हादरले आहे. आज फाटे यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना सलायन देण्यास सुरुवात केली असली तरी डॉक्टरांनी मात्र त्यांच्यावर तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचार गरजेचे असल्याचे प्रशासनाला सांगितले आहे.

दरम्यान, आज सकाळपासून पुन्हा ऊसदर आंदोलन पेटले असून सोनके येथे लाकडे जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम करीत कराड रोड बंद पडला तर टेंभूर्णी रोडवरील भोसेजवळ रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चक्का जाम केला. काल रात्री पंढरपूर सातारा रोडवरील बस फोडण्यात आली असून माढा तालुक्यात रिधोरा येथे दोन बसची तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी भंडीशेगाव येथे अकलूज सोलापूर बसवर दगडफेक करीत पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्याने स्वाभिमानीचे नेते संतप्त झाले असून पोलीस बळावर आंदोलन मोडू देणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखाने २००० च्या पुढे दर देण्यास तयार नसल्याने सातारा जिल्ह्यातील कारखानदार आता येथील ऊस नेण्यासाठी प्रयत्न करू लागले असून उपरी येथे एका कारखान्याने २९०० रुपये दर देण्याचे आमिष दाखविल्याचे दत्त नागणे या शेतकऱ्यांनी 'म.टा.'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्धव ठाकरेंची२५ रोजी जाहीर सभा

$
0
0

सांगली :
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत. २५ रोजी साडेपाच वाजता मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर शेतकरी मेळावा होणार आहे. २६ रोजी जिल्ह्यातील काही गावांना भेटी देवून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत द्राक्ष बागांची पाहणी करणार आहेत, अशी माहिती सांगलीचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली.
बानुगडे-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी कागदावरच दिसत आहे. कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी ही सेनेची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. २५ रोजी शिरोळहून सांगलीत आल्यानंतर सायंकाळी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर शेतकरी मेळावा होणार आहे. या वेळी ते आगामी सांगली महापालिका निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर करतील. अनेकांचा पक्षप्रवेशही होईल. मेळाव्यानंतर सांगली-मिरजेतील व्यापारी, उद्योजकांशी संवाद. रविवारी मिरज तालुक्यातील बुधगाव, तासगाव तालुक्यातील अंजनी, मणेराजुरी चौकात शेतकरी भेट व संवाद होईल. बोरगाव येथे रोगाने उध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करतील. नंतर कार्वे (ता. खानापूर) येथे शेतकरी संवाद करून सेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी बैठक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कराडकडे जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याच्या खुनाचाआठ तासांत छडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या प्रथमेश संजय संकपाळ (वय १८, रा. विहे, ता. पाटण) याच्या खुनाचा अवघ्या आठ तासांत छडा लावून पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.
पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी समन्वयातून गुन्हाचा अवघ्या आठ तासांत छडा लावण्यात यश मिळविले.
दरम्यान, कॉलेजवरील किरकोळ मारामारीतील खुन्नस संपवण्यासाठी त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. मुख्य सुत्रधार चिन्मय प्रशांत जगताप (१९, वडगाव हवेली, ता. कराड) व विजय बाळू माने (१९, रा. शिरवडे-रेल्वेस्टेशन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासाची दखल घेऊन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तपास करणाऱ्या अधिकारी व पोलिसांना पंधरा हजरांचे बक्षीस जाहीर केले आहे. ढवळे म्हणाले, शुक्रवारी १७ रोजी दुपारी अडीच वाजता प्रथमेशचा पेपर संपला. त्यावेळी प्रथमेश बाहेर आला. त्यापूर्वीच चिन्मय जगताप, विजय माने व त्याचे दोन साथीदार त्यांची वाट पाहत बाहेर थांबले होते. त्यांनी जबरदस्तीने त्याला दुचाकीवर बसवले. त्याला पार्ले येथील शेत रानातून कराड रेल्वे स्टेशनकडे नेले. तेथे दोघांनी प्रथमेशचे हात धरले. दोघांनी त्याच्या मान, पाट व डोक्यावर वार केले. ते वार वर्मी लागल्याने प्रथमेश जागीच कोसळला. त्याचा मृतदेह तेथेच टाकून चोघेही पसार झाले. त्यावेळी चिन्मय व त्याचा अन्य अल्पवयीन साथीदार पुण्याला गेले. विजय माने व त्याच्या सोबतचा दुसरा अल्पवयीन अन्य गावी गेले. गणेशोत्सवापासून दोघांत झालेल्या मारामारीतून त्याचा खून केल्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व पो.नि.अशोक क्षीरसागर यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषण करणाऱ्याकार्यकर्त्यांची प्रकृती खलावली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी सुरू केलेले आंदोलन चिघळत चालले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांच्यासह दोघांची प्रकृती रविवारी चिंताजनक बनली आहे. तोडगा निघाल्याशिवाय माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर उपोषण करणारे आंदोलक ठाम असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बाजीराव विहिर येथे ११ नोव्हेंबरपासून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांचेसह नवनाथ माने आणि चंद्रकांत बागल यांचे उपोषण सुरू आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत आहे. प्रशासनाने त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला मात्र, ऊसदर तिढा सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेमुळे प्रशासनावरील तणाव वाढला आहे. आज फाटे यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना सलायन देण्यास सुरुवात केली असली तरी डॉक्टरांनी मात्र त्यांचेवर तत्काळ हॉस्पिटलमध्ये उपचार करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाला कळविले आहे.
दरम्यान, रविवारी सकाळपासून पुन्हा ऊसदर आंदोलन पेटले. सोनके येथे लाकडे जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्क जाम करीत कराड रस्ता बंद पडला. टेंभूर्णी रोडवरील भोसेजवळ रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चक्क जाम केला. शनिवारी रात्री पंढरपूर सातारा रोडवरील बस फोडण्यात आली. माढा तालुक्यात रिधोरा येथे दोन बस फोडण्यात आल्या. रविवारी सकाळी भंडीशेगाव येथे अकलूज-सोलापूर बसवर दगडफेक करीत पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिस वेळीच पोचल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्याने स्वाभिमानीचे नेते संतप्त झाले आहेत. पोलीस बळावर आंदोलन मोडू देणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
२२ नोव्हेंबरपासून शेट्टी मैदानात
सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन चांगलेच पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रान पेटविले आहे. रविवारी सकाळी पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे उसदरासाठी शेतकऱ्यांनी लाकडाचे मोठे ओंडके पेटवून रस्त्यावर टाकून आंदोलन केले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी चपलांचा हार घालत निषेध नोंदविला. आंदोलनात येत्या २२ नोव्हेंबरपासून खासदार राजू शेट्टी उतरणार असल्याचे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तुपकर म्हणाले, कारखानदार आणि लोकप्रतिनिधी यांची अभद्र युती झाली आहे. जिल्ह्यातील कारखानदार काटा मारतात, रिकव्हरी कमी दाखवतात आणि रिकव्हरी चोरतात. राज्य सरकारला जबाबदारी टाळून चालणार नाही. कुंपणच शेत खात आहे तर आम्ही बोलायचे कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखानदार कारखाने बंद करण्याची मस्तवाल भाषा करीत आहेत. कारखाने खुशाल बंद करा मात्र, त्यांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी ऊस सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकाच्या कारखान्यांना घालू.
राज्यभरातून कार्यकर्ते सोलापुरात?
आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदुरबारचे ऊसदर प्रश्न निकाली निघाला आहे. ते कार्यकर्ते सोलापुरातील आंदोलनात सहभागी होणार आहेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे. ऊसदराचा प्रश्न मिटेपर्यंत आणि देशद्रोहाचा खटला भरला तरी आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.
छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी
रक्तपात झाला तरी आंदोलन मागे घेणार नाही. छातीवर गोळ्या झेलण्याची आमची तयारी आहे. कारखानदार आपले गुंड स्वाभिमानाच्या आंदोलनात घुसवीत आहेत. या सरकारला अजून जाग येत नाही. नगरची पुनरावृत्ती सोलापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. कारखानदारी आणि शेतकरीही टिकला पाहिजे ही स्वाभिमानीची भूमिका आहे. बसेस टार्गेट करताना सामान्य माणसाला होणार नाही याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही तुपकर यांनी केले.
सहकारमंत्र्यांनी ऊसदराची कोंडी फोडावी
आम्ही अडेलतट्टू धोरण स्वीकारणार नाही. शेतकऱ्यांना विचारूनच २७००चा भाव आम्ही ठरविला आहे, स्वाभिमानीने स्वतः दर ठरविलेला नाही. चर्चेला आले तर नक्कीच तडजोड होईल. सहकार शिरोमणी आणि विठ्ठल साखर कारखान्यामध्ये घुसून स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी धाडी टाकल्या तेव्हा वजन काट्याचा सावळागोंधळ दिसून आला आहे, असेही तुपकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा नगरपंचायत प्रभागरचनेला सुरवात

$
0
0

आजरा

आजरा नगरपंचायत स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र या कालावधीत येथील निवडणूकांसाठी आवश्यक प्रभागरचना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. १७ सदस्यांसाठी स्वतंत्र १७ प्रभागांची रचना करण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतला जाणार आहे. २९ नोव्हेबरपर्यंत याबाबतचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, प्रभाग निहाय नगरसेवकांचे आरक्षण आठ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. साधारणत: सप्टेंबर २०१८ दरम्यान येथील नगरपंचायतीची पहिली निवडणूक होण्याची शक्यता असल्याने, त्यासाठी निर्माण होणारी प्रभाग रचना व आरक्षणाबाबत इच्छुकांत उत्सुकता वाढली आहे.

विषेश मंजुरीने मिळविलेली राज्यातील आजरा ही एकमेव नगरपंचायत ठरली आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या आरक्षणामध्ये नगरपंचायत अध्यक्षपदाचा पहिला मान इतर मागास गटातील महिलेला मिळणार आहे. त्यानुसार येथील पहिल्या निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे. प्रथमत: येथील १७ नगरसेवकांच्या जागांसाठीचे नवीन प्रभाग बनविण्याचे काम सुरू झाले आहे. आरक्षणानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, त्याबाबतच्या नागरिकांच्या हरकती मागवून सुनावणी घेणे आणि अतिम प्रभाग रचना मंजूर करणे अशा तीन टप्प्यात हे काम होणार आहे. यासाठी २०११ च्या जनगणनेनुसारच्या लोकसंख्येचा आधार घेतला जाणार आहे.

नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार आवश्यक १७ प्रभागांचे प्रारूप तयार करताना एकूण लोकसंख्या आणि अनूसुचित जाती-जमातीची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्या लोकसंख्यानुसार प्रभागक्षेत्र तयार करणे, सीमांकन करणे व नकाशे तयार केले जाणार आहेत. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे या महिन्याच्या अखेरीस पाठविला जाणार आहे. दोन डिसेंबर रोजी या प्रारूपास तेथे मान्यता मिळेल. त्यानंतर प्रारूप प्रसिध्द केले जाणार आहे. दरम्यान आठ डिसेंबरला होणाऱ्या प्रभाग आरक्षणानंतर १८ डिसेंबरपर्यंत या प्रारूपासह प्रभागांची रचना केलेल नकाशे आणि आरक्षणाबाबतच्या हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकतींवर २२ डिसेंबरला सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचा चढा भाव, ब्रासमध्ये काटामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाळू उपसावर बंदी घातल्यामुळे बाजारात मुबलक स्वरुपात मिळेनाशी झाली नाही. १८ ते २० हजार रुपयाला एक ट्रक वाळूचा दर आता ३५ ते ५० हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. अडीच ब्राससाठी इतका चढा भाव मोजूनही काटामारीमुळे ग्राहकांना किंमतीइतकी वाळू उपलब्ध होत नाही. वाळूला पाणी मारुन वजन वाढविण्याच्या प्रकारासोबत ट्रकमध्ये वाळूच्या मापातही काटछाट केली जात आहे. लहान सहान बांधकाम, घराची किरकोळ दुरुस्ती ते नवीन बांधकामाला या प्रकाराचा मोठा फटका बसत आहे. सध्याच्या वाळूच्या बाजारभावावर कुणाचेच नियंत्रण नाही. प्रशासन उपसाबंदी पुरताच आपली भूमिका असे सांगत वाळूच्या कृत्रिम भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली आहे.

एक ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर हे वाळू वर्ष मानले जाते. साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात लिलावाची प्रक्रिया आणि त्यानंतर कब्जेपट्टीचे सोपस्कर पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिना उजाडतो. कोल्हापूरात ३६ वाळू गट आहेत. गडहिंग्लज, कागल, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा येथे वाळू गट आहेत. प्रशासनाकडून यांत्रिक बोटीच्या वापराला परवाना देण्यास​ विलंब झाला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात परवाना मिळून उत्खनन सुरू झाले. दरम्यान एप्रिल २०१७ पासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वाळू उपसावर बंदी घालण्यात आली. वाळू उपसा बंद झाल्यामुळे त्याचा फटका सर्वच घटकांना बसला आहे.

उपसाबंदीचा निर्णय होण्यापुर्वी बड्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केला होता. त्यावेळी ट्रकभर वाळूचा दर १८ ते २० हजार रुपये होता. सध्या वाळू टंचाई निर्माण झाल्यामुळे वाळूच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. जादा पैसे मोजूनही अनेकदा पूर्ण क्षमतेने वाळू पुरवठा होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. काही जण कर्नाटकातून वाळू आणून चढ्या दराने विक्री करत आहेत.

व्यावसायिकांच्या सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या हालचाली

एप्रिल महिन्यात वाळू उपसावर बंदी घातल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ठेकेदारांचे जवळपास वीस कोटी रुपयांहून ​अधिक रक्कम अडकल्याचे व्यावसायिक सांगतात. उपसा बंदीमुळे झळ बसल्याने ठेकेदार, वाहतूकदार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली. वाळू उपसाला परवानगी द्या अन्यथा वाळूच्या ठेक्याची रक्कम परत करा अशी मागणी केली आहे. उत्खननाला परवानगी मिळावी यासाठी सरकारने राष्ट्रीय हरित लवादसमोर सक्षमपणे बाजू मांडावी अशी मागणी केली आहे. उपसाबंदी विरोधात कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, कराड, शिरोळ, गडहिंग्लज येथील व्यावसायिक सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

उपसा बंदीचा फटका सामान्य नागरिकांनाही बसला आहे. सध्या सिमेंट, सळीचे दर उतरले आहेत. पण वाळूची टंचाई आहे. यामुळे घराच्या बांधकामात अडथळे निर्माण झाले आहेत. सरकारने वाळू उपसाला परवानगी द्यावी. लिलावाची प्रक्रिया सुरु झाल्यास बांधकामातील अडचणी दूर होतील.

पांडूरंग पाटील, व्यावसायिक

नोटबंदी, जीएसटीचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. बांधकाम क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. एप्रिल महिन्यापासून वाळू बंदी असल्यामुळे मोठ्या गृहप्रकल्प उभारणीत अडचणी उद्‍भवत आहेत. काही जण कर्नाटकातून वाळू आणत प्रकल्प पूर्ण करत आहेत. वाहतूक, वाळूचा जादा दर यामुळे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. मोठ्या गृहप्रकल्पावरही मर्यादा पडत आहेत.

प्रकाश मेडसिंगे, बांधकाम व्यावसायिक


सध्या बाजारात मुबलक स्वरुपात वाळू उपलब्ध नाही. एका ट्रकसाठी ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूची उपलब्धता नसल्यामुळे बरीचशी कामे बंद ठेवली आहेत. नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. काही जण पर्यायी कृत्रीम वाळूचा वापर करत आहेत. मात्र या वाळूच्या दर्जाविषयी लोकांमध्ये साशंकता आहे. कृत्रीम वाळू ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, क्राँकीटसाठी त्याचा वापर करता येतो. मात्र गिलाव करता येत नाही.

प्रा. महेश साळुंखे, शुक्रवार पेठ


वाळू चोर मोकाट…

वाळू उत्खननावरील बंदीमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा गैरफायदा उठवत वाळू चोरांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. कुठे सरकारी यंत्रणेशी संगनमत तर कुठे अधिकाऱ्यांवर दादागिरी करत वाळूची चोरी होत आहे. दुप्पट व अडीच पट दरांनी वाळूची विक्री करत सामान्यांची लुबाडणूक करत आहेत. पोलिस व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे वाळू चोरांच्या विरोधात मोहीम उघडावी, अशी या क्षेत्रातील जाणकारांची मागणी आहे. वाळू चोरावर कुणाचेही नियंत्रण नसल्यासारखी स्थिती आहे. नदी काठ, मोठे ओढे यातून ‘चोरी चोरी छुपके छुपके’ वाळू उत्खनन सुरुच आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुंदकरला राजकीय पाठबळ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला पोलिस अधिकारी अश्विनी गोरे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होऊन दीड वर्ष उलटल्यानंतरही कुरुंदकरवर कोणतीही कारवाई झालेली नाही. आठ महिने सुट्टी घेऊन पुन्हा रुजू झालेल्या करुंदकरला पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही राज्यकर्तेही पाठीशी घालत आहेत, असा गोरे कुटंबीयांचा आरोप आहे. कुरुंदकरचे अनेक राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्याचे तपासात समोर आले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे आणि पोलिस निरीक्षक अभय कुरंदकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर कुरुंदकर यानेच अश्विनी गोरे यांचे अपहरण केल्याची फिर्याद अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल केली. अश्विनी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांच्या मोबाइलवरून शेवटचे लोकेशन मीरा रोड येथे असल्याचे मिळाले. त्याचवेळी संशयित अभय कुरुंदकर याचेही मोबाइल लोकेशन मीरा रोड परिसरात असल्याचे तपासात लक्षात आले आहे. ही माहिती तपास अधिकारी एसीपी निलेवाड यांनी हायकोर्टात सादर केली आहे, अशी माहिती अश्विनी गोरे यांचे पती राजू गोरे यांनी दिली. कुरुंदकर आणि अश्विनी यांच्यातील मोबाइलवरील संभाषण, काही व्हिडिओ क्लीप पोलिसांकडे आणि हायकोर्टातही सादर केल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार अर्ज देऊनही कुरुंदकर याच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही. उलट गोरे कुटुंबीयांना स्वतःची आणि मुलीची काळजी घेण्याचा सल्ला पोलिस देत आहेत, त्यामुळे कुरुंदकरला वाचवण्यासाठी मोठ्या राजकीय हस्ती कार्यरत आहेत, अशी शक्यता गोरे कुटुंबीयांनी वर्तवली आहे.

अभय कुरुंदकर हा सांगली जिल्ह्यात काम करताना त्याने अनेकदा राजकीय बळाची चुणूक दाखवली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी कुरुंदकर याची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून तासगाव येथे केली होती. कुरुंदकर याने तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांशी संपर्क साधून बदली रद्द करून घेतली होती. कामात कुचराई केल्याचा ठपका पोलिस अधीक्षकांनी ठेवला होता. तसा अहवालही तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस महासंचालकांकडे पाठवला होता. तो अहवाल दुर्लक्षित करून कुरुंदकर याला पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले. अनेक मोक्याच्या जागांवर त्याने स्वतःची वर्णी लावून घेतली होती. राजकीय पाठबळाशिवाय हे सर्व कसे शक्य झाले? असा सवाल गोरे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

‘त्या’ रात्री नेत्याच्या पुतण्याचा फोन

कुरुंदकर याची चौकशी करून त्याच्या चुकीच्या कृत्यांना पाठीशी घालणाऱ्यांचाही पर्दाफाश करावा, अशी मागणी गोरे कुटंबीयांची आहे. अश्विनी गोरे बेपत्ता झाल्याच्या रात्री दीडच्या सुमारास अभय कुरुंदकर याच्या मोबाइलवर एका बड्या नेत्याच्या पुतण्याचा फोन आला होता. बराचवेळ यांच्यात संभाषण झाल्याचे कुरुंदकर यांच्या कॉल डिटेल्सवरून उघडकीस आल्याचे राजू गोरे यांनी सांगितले. अश्विनी गोरे यांचे अपहरण करून हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय बळाचा वापर होत असल्याचा संशय गोरे यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे संशयित कुरुंदकरला पाठीशी घालणाऱ्यांचा पर्दाफाश व्हावा, अशी इच्छा राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकार्याला दातृत्वाचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संवेदनशील लेखक आणि वास्तववादी कादंबरीकार बाबा कदम यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या पत्नी कुमुदिनी तथा माईंकडून सामाजिक संस्थांना दिला जाणारा कृतज्ञता निधी नर्मदा बचाव चळवळीत काम करणाऱ्या भारती ठाकूर आणि बाबा आमटे यांच्या सेवाकार्याशी निगडीत असलेल्या अनंत झेंडे यांना रविवारी प्रदान करण्यात आला. झेंडे यांच्यावतीने त्यांचे सहकारी विकास पाटील यांनी तर ठाकूर यांच्यावतीने कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीपाद कहाळेकर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते धनादेश स्वीकारला. महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात रविवारी सकाळी कुमुदिनी बाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना शिपूरकर म्हणाले, बाबांच्या आयुष्यातील अगदी शेवटच्या दिवसांत त्यांच्याशी संपर्क आला. त्यांच्यातील सामाजिक जाणीव अतिशय समृद्ध होती. समाजातील चांगल्या गोष्टींबाबत ते नेहमी कौतुकाने बोलत. त्यामुळे त्यांच्या पत्नी माईंनी बाबांच्या नावाने जपली जाणारी ही कृतज्ञतेची भावना खऱ्या अर्थाने स्तुत्य आहे.

कुमुदिनी कदम म्हणाल्या, ‘बाबांच्या निधनानंतर जेव्हा त्यांच्या स्मृतीसाठी काहीतरी करावे असा विचार मनात आला तेव्हा समाजातील गरजू पण चांगले काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना आर्थिक निधी देण्याचा निर्णय घेतला. बाबांचे मित्र महादेव मोरे यांना मदत करण्यापासून या विचाराची सुरुवात झाली. कितीही प्रसिद्धी मिळाली तरी साधी राहणी सोडायची नाही हे बाबांचे तत्व जपून मी माझ्या गरजा मर्यादित ठेवल्या आहेत. बाबांच्या पेन्शनमधील रक्कम बचत करून हा निधी दरवर्षी सामाजिक काम करणाऱ्यांसाठी दिला जातो. हे काम मला बाबांची आठवण आणि समाधानाची पावती देते.’ यावेळी विकास पाटील व श्रीपाद कहाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.


आदिवासी उत्थानासाठी वाहून घेतले

चांगली आर्थिक स्थिती असलेल्या भारती ठाकूर या नर्मदा परिक्रमेच्या परिसरात ट्रे​​किंगसाठी गेल्या असता त्या लेपा या भागात थांबल्या. यावेळी त्यांना लेपामधील आदिवासी समाजाची अवस्था बघून अस्वस्थ वाटले. किती मागासलेपणाने आदिवासी लोक ​जीवन जगतात हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना. आरोग्य, शिक्षण यासह कोणत्याही मुलभूत सुविधा त्यांना नाहीत याची त्यांना जाणीव झाली. सहलीसाठी नर्मदा काठावरील लेपा येथे गेलेल्या भारती नाशिकमध्ये स्वगृ​ही परतल्यानंतर त्यांनी आदिवासी समाजासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पुरुषांना व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील सगळी स्थावर मालमत्ता विकून भारती पूर्णपणे लेपा येथे स्थायिक झाल्या. सध्या त्या लेपा येथे आदिवासी समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारती यांनी वाहून घेतले आहे.


फासेपारध्यांच्या उद्धाराचा वसा

बाबा आमटे यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या नावांपैकीच अनंत झेंडे हे एक नाव. मात्र केवळ बाबांच्या कामाचे कौतुक करत ते थांबले नाहीत तर त्यांच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी करता करता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावात बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था सुरू केली. या भागात मोठ्या प्रमाणात फासेपारधी व आदिवासी समाज आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने चोऱ्यामाऱ्या करून पोट भरणाऱ्या फासेपारधी समाजातील पुरूष अधिकाधिक तुरुंगात किंवा पोलिसांपासून वाचण्यासाठी फरार असतात. तर कुटुंबातील महिला मुलांना घेऊन भीक मागतात. अशा समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून झेंडे यांनी एका वाड्यात मुलांच्या निवास व भोजनाची मोफत व्यवस्था केली. जर ही मुलं शिकली तर गुन्हेगारीकडे वळणार नाहीत या भावनेतून झेंडे यांनी स्नेहालय येथे अनेक मुलांना आधार दिला आहे. सरकारी निधीशिवाय लोकसहभागातून निधी जमवून आता या संस्थेची इमारत उभी राहत आहे. येथे पाचशे विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह सुविधा देण्यात येणार आहे. संस्थेच्या माध्यमातून आता फासेपारधी व आदिवासींची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालेय गुणवत्तेत कोल्हापूर राज्यात सहावे

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या शाळांच्या झालेल्या स्वयं मूल्यमापनात भौतिक सुविधांसह सर्वांगिण गुणवत्तेत कोल्हापूर सहाव्या स्थानी असल्याचे समोर आले आहे. या यादीत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून सोलापूर, अहमदनगर, नाशिक, सातारा हे जिल्हे कोल्हापूरपेक्षाही पुढे आहेत. कोल्हापूर जिल्हा अद्याप गुणवत्तेत मागे असल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण क्षेत्रातील घटकांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

शाळांत दर्जेदार भौतिक सुविधा असल्यास आयएसओ मानांकन दिले जात होते. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ताचा फारसा विचार होत नव्हता. परिणामी, गुणवत्तेत कोणती शाळा अव्वल आहे हे नेमकेपणाने सांगता येत नव्हते. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सिद्धी उपक्रमातून शाळा सुधार आणि मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांचे विहित नमुन्यातील प्रश्नावली देऊन ऑनलाइन माहिती भरून स्वयं मूल्यांकन करून घेतले.

या मूल्यमापनात गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, भौतिक सुविधा, मनुष्यबळाचा वापर याला सर्वाधिक गुण आहे. त्यापाठोपाठ अध्यापन किती परिणामकारक आहे, यास गुण आहेत. त्यानंतर शिक्षकांची कामगिरी, व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व, व्यवस्थापन, आरोग्य, सुरक्षा, शाळेच्या उपक्रमात समाजाचा सहभाग किती आहे या बाबींवर गुण दिले आहेत. अशा प्रकारे शाळांतील स्वयं मूल्यांकन नुकतेच पूर्ण झाले. त्यामध्ये ए ग्रेडच्या शाळांची मार्च अखेरपर्यंत त्रयस्थ यंत्रणेकडून फेरपडताळणी होईल. त्यामध्ये ‘ए’ ग्रेडचे निकष पूर्ण असल्याचे दिसले पाहिजे. निकष पूर्ण नसल्यास ‘बी’ ग्रेड देण्यात येणार आहे. मूल्यमापनात गडचिरोलीत सर्वात कमी केवळ २०१ शाळा ए ग्रेडमध्ये आहेत.

शिक्षणातील सेवा, सुविधांमध्ये मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे गुणवत्तेत कोल्हापूर अव्वलच हवे अशी अपेक्षा असते. मात्र, शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापनात जिल्हा सहाव्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुणवत्तेत कोल्हापूर मागेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण प्रशासन, शाळा व्यवस्थापन, शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. पुढील काळात गुणवत्ता वाढीचे आव्हान पेलून शाळा ‘ए’ ग्रेडमध्ये आल्या तरच शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.


‘ए’ असेल तरच वेतनश्रेणी

बारा व चोवीस वर्षे सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळते. श्रेणी वाढल्याने वेतन वाढते. यापूर्वी केवळ हा निकष पूर्ण झाल्यानंतर वेतनश्रेणी मिळत होती. आता सरकारने घेतलेल्या नव्या‌ निर्णयानुसार ए श्रेणीत शाळा असेल तरच संबंधित शाळांतील शिक्षकांचे वेतनश्रेणी ‌मिळणार आहे.

पहिली ते १२ पर्यंतच्या एकूण शाळांची संख्या अधिक आहे. शिवाय भौतिक सुविधांसह सर्वांगिण गुणवत्तेचा निकष आहे. त्यामुळे शाळा सिद्धी योजनेत राज्यात कोल्हापूर जिल्हा सहाव्या स्थानी असल्याचे दिसते. ए श्रेणीत असलेल्या शाळांचे त्रयस्थ यंत्रणेकडून फेरमूल्यांकन होणार आहे. त्यानंतर श्रेणीचे प्रमाणपत्र सरकारकडून दिले जाईल.

सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावती नदी प्रदूषण बेदखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील हळदीनजीक भोगावती नदीतील पाणी रसायनमिश्रणाने प्रचंड दूष‌ित झाल्याने मासे मृत्यमुखी पडले आहेत. नदीत रसायनमिश्रीत पाणी मिसळल्याने जलचरांचा मृत्यू होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने भोगावती नदीचे प्रदूषण कुणी केले, त्याचा शोध घेणे अपेक्ष‌ित होते. मात्र त्यांनी केवळ पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवून हात झटकल्याचे दिसत आहे. नदी प्रदूषणप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन बेदखल करीत असल्याचे समोर आले आहे. प्रदूष‌ित पाणी पुढे वाहून येत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणात वाढ होत आहे.

भोगावती नदीतील पाणी पातळी या आठवड्यात खालावली आहे. पाणी प्रदूष‌ित झाल्याने मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. नदी काठावर माशांचा खच पडला आहे. रसायन मिश्रीत पाणी मिसळल्याने नदीचे पाणी दूष‌ित झाल्याचे त्या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे रसायन मिश्रीत पाणी नदीत आले कुठून त्याचा शोध घेऊन, दोषी घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळच्या प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. पण प्रशासनाने प्रदूषणाचे स्रोत शोधण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

चार दिवसांपासून नदीत प्रदूष‌ित पाणी वाढले तरी अजूनही प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्या घटकांचा शोध घेतलेला नाही. नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाचीही आहे. मात्र या विभागाने गांभीर्याने कार्यवाही केलेली नाही. परिणामी नदी काठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूष‌ित पाणी पुढे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले आहे. त्यामुळे दूष‌ित पाणी पुढे हळदी बंधाऱ्यापर्यंत आले आहे. नदीकाठावरील कुरूकली, हळदी, देवाळे, कोथळी, वाशी, कांडगाव या गावांनाही दूष‌ित पाण्याच्या परिणामाना सामोरे जावे लागत आहे. भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत होत असून काठावर माश्यांचा खच पडत आहे. ‌शनिवारी मृत मासे मोठ्या प्रमाणात तरंगू लागल्याने बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. गळीत हंगाम सुरू झाला की, या नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने घेण्याचा फार्स केला आहे. भोगावती नदीमधील दूष‌ित पाणी पुढे येऊन पंचगंगा नदीत मिसळते. हेच पाणी शहर आणि नदीकाठची गावे पित असल्याने साथीच्या रोगांचा धोका आहे.

भोगावती नदीत कोणत्या तरी साखर कारखानदाराने रसायन मिश्रीत पाणी सोडले असावे. यामुळेच पाणी दूष‌ित झाले आहे. मासे मरत आहेत. दूष‌ित पाण्यास कोण जबाबदार आहे, हे शोधून कारवाई करण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने दूर्लक्ष केले आहे. दूष‌ित पाणी पंचगंगा नदीत आले आहे. या नदी काठावरील ग्रामस्थांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

दिलीप देसाई, पंचगंगा नदी प्रदूषण याचिकाकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याद्यांचे काम अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या याद्या अपलोड करण्याचे काम रविवारी (ता. १९) पूर्ण झाले नाही. अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न करूनही रविवारी रात्रीपर्यंत तीन लाख ६० खात्यांची माहिती अपलोड करण्यात सहकार विभाग व जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. माहितीमधील तांत्रिक चुका, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि बदलणाऱ्या निकषांमुळे कर्मचारी अद्याप गोंधळलेले दिसून येत आहेत. याद्या अपलोड करण्यासाठी सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेत ठाण मांडले असून सोमवारी (ता. २०) काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

२८ जून रोजी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर २४ जुलैपासून ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. लाभार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी सहकार विभागाकडून प्रत्यक्ष कर्जमाफीचे निकष प्राप्त झाले. जिल्हा बँकेच्या १८४७ सेवा संस्थांकडून प्राप्त झालेल्या याद्यांचे लेखापरीक्षण झाल्यानंतर पुन्हा राज्य सरकारच्या आयटी विभागाकडून याद्या त्रुटींची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

आयटी विभागाच्या आदेशानुसार पुन्हा एक ते ६६ कॉलममध्ये माहिती भरण्यास सुरुवात झाली. अनेक अडचणींचा सामना करत शनिवारपर्यंत तीन लाख खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली. जिल्ह्या बँकेचे दोन लाख ५६ हजार कर्जदार खातेदार असले, तरी विविध कर्जखात्यामुळे ही संख्या वाढत गेली. तरीही रविवारी याद्या अपलोड करण्याचे निश्चित केले होते. मात्र रविवारीही संपूर्ण माहिती रात्री उशीरापर्यंत अपलोड होऊ शकली नाही. सहकारी संस्था व लाभार्थ्यांची संख्या वाढत असतानाच कुशल मनुष्यबळ व तांत्रिक साधनांच्या अभावांमुळे महिती अपलोड होण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे सोमवारी (ता.२०) संपूर्ण माहिती अपलोड होण्याची शक्यता आहे.

रविवारी कामाचा निपटारा करण्यासाठी विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, सहनिबंधक (लेखापरिक्षण) तुषार काकडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा रेखापरीक्षक डी. बी. पाटील, सहायक निबंधक सुनील धायगुडे आदी अधिकारी ठाण मांडून होते.

……………

दोन लाख ५६ हजार

कर्जमाफी लाभार्थी संख्या

चाल लाख ६० हजार

कर्ज खात्यांची संख्या

तीन लाख ३० हजार

अपलोड खाती



स्मिता गाताडे रुग्णालयात

कर्जमाफी याद्या अपलोड करताना आतापर्यंत पाच कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याची पुनरावृत्ती रविवारी झाली. लेखापरीक्षण विभागातील स्मिता गाताडे कर्जमाफी याद्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा बँकेच्या आयटी विभागात आल्या. दोन ते तीन तास याद्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी तात्काळ संपर्क साधून, त्यांना रुग्णालयात दाखल केले.

अद्याप १७ लाख येणेबाकी

कर्जमाफीची यादी राज्य सरकारच्या आयटी विभागाकडे दाखल झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या १०३२ शेतकऱ्यांना तीन कोटी ९१ लाख रुपयांची मागणी केली होती. चार दिवसांपुर्वी यातील तीन कोटी ५० कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. मात्र अद्याप २५ शेतकऱ्यांची १७ लाख रुपये येणे बाकी आहे. उर्वरीत १८ लाख रुपये रक्कम अपात्र ठरली असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरसीतील खूनप्रकरणी पोलसांची तपास पथके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

तालुक्यातील शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात शनिवारी झालेल्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. मृतदेहाची ओळख पटत नाही तो पर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे .प्राथमिक अंदाजानुसार तो नरबळी असावा असा पोलिसांचाही तर्क आहे .मात्र गुप्तधनाचा बळी की अमावस्येच्या रात्री केलेल्या करणीचा बळी याबाबत उलट सुलट चर्चा तालुक्यात होती. रविवारी त्यादृष्टीने विविध भागात पथके तैनात करण्यात आली आहेत, मात्र मृतदेहाची ओळखच अद्याप पटलेली नसल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.

दरम्यान, संबंधित मंदिर चक्रभैरवनाथ यांचे असून या ठिकाणी कसलाही बळी देण्याची प्रथा नाही, फक्त गोड नैवेद्यच दाखवला जातो, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले . घटनास्थळी रविवारी जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, ,अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बोराटे, उपविभागीय पोलिस अधीक्षक किशोर काळे ,सहा. पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे , प्रवीण जाधव यांनी पाहणी केली. यावेळी पोलिसांनी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय महिंद, निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव , सरपंच रुपाली भोसले, शेखर भोसले , मंदिराचे काम करणारे गवंडी आदींकडे चौकशी करून माहिती घेतली. शिराळा या डोंगरी तालुक्यात नरबळीचा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी शिराळा, शाहूवाडी तालुक्यात करणीचे प्रकार लोकांना नवे नाहीत. निवडणुकित तर गंडे दोरे,काळ्या बाहुल्या,टाचण्या टोचलेले लिंबू उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या शेतात ठेवून बकऱ्याचे बळी देण्याचे प्रकार घडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिनेट’चा आज फैसला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नव्या विद्यापीठ कायद्यांतर्गत पहिल्यांदाच होत असलेल्या शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळांच्या (सिनेट) निवडणुकीसाठी गेल्या १७ नोव्हेंबरला सरासरी ६२ टक्के मतदान झाले असून, सोमवारी (ता.२०) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. परीक्षा भवन येथे सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. अधिकार मंडळांच्या ७२ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणात असून, यंदाच्या निवडणुकीत कोण कोणासोबत आहेत यावर निकालाचा गुलाल कोणाच्या अंगाला लागणार हे अवलंबून आहे.

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचा (सुटा) सवता सुभा आणि त्यातूनही विभक्त झालेल्या सदस्यांनी नव्याने स्थापन करत रिंगणात उतरवलेली​ शिवाजी विद्यापीठ कॉलेज टीचर्स असोसिएशन (सुक्टा), विद्यार्थी कृती समिती तसेच प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक, व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासह विवेकानंद व रयतसारख्या मोठ्या संस्थांचा सहभाग असलेली शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी यांच्यात रंगलेली चुरस यामुळे ‘सिनेट’च्या अधिकारी मंडळावर कोण बाजी मारणार हे सोमवारी ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत आघाडीसोबत ‘सुटा’ संघटना होती आणि यंदाच्या निवडणुकीत ‘सुटा’ आघाडीपासून वेगळी झाल्याचा मुद्दा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच गाजला आहे. त्यातच ‘सुटा’तही अध्यक्षपदाच्या शीतयुद्धातून फूट पडल्याने ‘सुक्टा’ या नव्या संघटनेने निवडणुकीत पाऊल टाकले आहे. जागावाटप प्रकियेत समाविष्ट न केल्यामुळे वारणा शिक्षण समूहाने आपली स्वत:ची वेगळी चूल मांडली असतानाच त्यांना विद्यापीठ विकास आघाडीने बरोबर घेतले आहे. शिक्षक खुल्या गटातील एक जागा वारणा शिक्षण समूहाला दिल्याने हे दोन्ही घटक विद्यापीठ निवडणुकीत एकत्र आले आहेत. याचा फायदा ‘वारणा’च्या १३९ प्राध्यापकांना कसा होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यासाठी या गटातील निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ‘सुटा’तीलच काही सदस्यांनी काढलेल्या ‘सुक्टा’मधून होणारी विभागणी ‘सुटा’साठी आव्हान देणारी ठरणार आहे. खुल्या गटात अपक्ष उमेदवारांचे विकास आघाडी आणि ‘सुटा’समोर आव्हान आहे. ते मतांच्या गणितात कसे पेलले जाईल याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘सुटा’ची बंडखोरी हा चर्चेचा मुद्दा राहणार आहे.

एकीकडे आघाडी आणि ‘सुटा’ यांच्यातील दुरंगी लढतीने उत्सुकता ताणली असतानाच विकास आघाडीच्या हातात हात घालून उतरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सहभाग निर्णायक ठरणार आहे. राज्यपालनियुक्त प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर अभाविपचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याचाही परिणाम निकालातील जागांवर होणार आहे.

‘पसंतीक्रमानुसार मतदान’ ही पद्धत असल्यामुळे मतमोजणीमध्ये कुणाला पसंतीची पहिली पावती मिळते याचा निर्णय सोमवारी होणार आहे. विद्यापीठ शिक्षक गटात सर्वाधिक ९३ टक्के मतदान झाले आहे, तर नोंदणीकृत पदवीधर गटात सर्वांत कमी ४६ टक्केच मतदारांनी हक्क बजावला आहे. आजी-माजी विद्यार्थी कृती समिती पॅनेलला पदवीधर मतदारांकडून मोठ्या आशा आहेत, तर शिक्षक गटातील उमेदवारांची भिस्तही पदवीधर मतदारांवर काही प्रमाणात आहे. प्राचार्य, विद्यापरिषद या गटातील उमेदवारांसाठीही ९० टक्के मतदारांनी मतदानाला पसंती दिली आहे. यावेळी नव्या कायद्यानुसार होणाऱ्या मतमोजणीसाठी काही नियमांमध्ये बदल केले आहेत. पसंतीक्रमानुसार मोजणी केली जाणार असून, शेवटपर्यंत उत्सुकता ताणली जाणार आहे.

मतमोजणी व निकाल आज

‘सिनेट’ निवडणुकीची मतमोजणी ​आणि निकाल घोषित करण्याची तयारी शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे पूर्ण झाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा भवन येथे सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदारांनी केलेल्या मतपत्रिकांची मोजणी विशिष्ट पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गटातील उमेदवारांना मतदारांनी आपला पसंती क्रमांक दिला आहे. मतमोजणीसाठी २० टेबल मांडण्यात येणार असून, २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुल्करचना, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, परीक्षा पद्धती, निकालाचे वेळापत्रक यासह ​अनेक गोष्टी थेट विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत. विद्यार्थ्यांना आजही अनेक गोष्टींसाठी रस्त्यावर उतरावे लागते. प्रश्नपत्रिकांतील चुकांपासून ते निकालातील गोंधळापर्यंत असलेल्या त्रुटींचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती विद्यार्थी कृती समितीला मिळण्याची खात्री आहे.

डॉ. प्रवीण कोडोलीकर, अध्यक्ष, आजी-माजी विद्यार्थी कृती समिती


प्राध्यापक, विद्यार्थी, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यात संवाद राहावा, विद्यापीठात निकोप वातावरण निर्माण व्हावे, कारभार भ्रष्टाचारमुक्त व्हावा या धोरणातून विकास मंच निवडणूक लढवत आहे. विद्यापीठाचा शैक्षणिकस्तर वाढावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भरती बंद झाल्यामुळे अनेक समस्या आहेत. आगामी काळात भरती प्रक्रियेबाबत आग्रही राहणार आहे. त्यासाठी विकासमंच विजेतेपदावर नाव कोरेल.

डॉ. संजय डी. पाटील, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी


शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हा एकमेव अजेंडा आहे. मान्यता, सेवाशर्थी, वेतनआयोग, पेन्शन यांसह शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. सुटाच्या माध्यमातून त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संघ नेहमीच सक्रिय आहे. सिनेट मंडळांवर शिक्षकांच्या प्रश्नांची जाण एकमेव ‘सुटा’ला असल्यामुळेच आमच्या वर्चस्वाला आव्हान देणे सोपे नाही.

डॉ. आर. जी. कोरबू, सहकार्यवाह, ‘सुटा’

सेवा सातत्य, निर्वाहनिधीसाठी खाते, पीएचडी वेतनवाढी लागू करण्याची मागणी, प्रमोशननंतरच्या काळातील फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी ‘सुक्टा’ काम करणार आहे. भविष्यात शिक्षकांच्या संशोधन विद्यापीठ फंडातून अधिविभागाच्या पर्यायाने शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सिनेटच्या वर्तुळात येणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांचा पाठिंबा ‘सुक्टा’ला निश्चित मिळेल.

डॉ. एन. बी. गायकवाड, सचिव, ‘सुक्टा’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवउद्योजक, विद्यार्थ्यांना बूस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूर गुंतवणुकीसाठी पोषक शहर असून, मोठ्या उद्योगांना विस्तारण्यासाठी सुवर्णसंधी आहे. वाहनांचे सुटे पार्ट, रणगाड्यांचे झाकण, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे पार्ट, फाउंड्री उद्योगात कोल्हापूरचे नाव देशपातळीवर आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर आयोजित केलेले ‘मेक इन कोल्हापूर इन्व्हेस्ट’मधून नवउद्योजक आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना बूस्ट मिळेल,’ असा सूर कोल्हापूर इन्व्हेस्ट प्रदर्शनात उमटला. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील विक्रम हायस्कूलजवळ शाहूपुरी जिमखाना मैदानावर २१ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे ‘कोल्हापूर इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ प्रदर्शनात विविध तज्ज्ञांनी इलेक्ट्रिक व्हेइकल, हॉस्पिटॅलिटी आणि नवीन टेक्नॉलाजी विषयावर व्याख्यान झाले. टेक्नॉलॉजी विषयावर ताज ग्रुपचे सतीश जयराम म्हणाले, ‘प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यानुसार प्रत्येक उद्योगाने नवीन तंत्रज्ञानानुसार बदल करणे गरजेचे आहे.’ सिट्रस ग्रुपचे भविष्य रुतपर्णा म्हणाल्या, ‘कोल्हापूर शहर गुंतवणुकीसाठी उत्तम शहर आहे. उद्योगांचे माहेरघर कोल्हापूर असून अनेक प्रकारच्या वस्तूचे कोल्हापुरात तयार होत आहे. मेक इन कोल्हापूर असा ब्रॅण्ड परिचित झाला आहे. कोणत्याही उत्पादनाचे मार्केटिंग येथे प्रभावीपणे होऊ शकते. गुंतवणूकदारांना ही एक चांगली संधी आहे.’

‘इलेक्ट्रिक व्हेइकल आणि गतिमानता’ विषयावर टाटा मोटर्स लि. चे ए. के. जिंदाल, विजय पंखावाला यांनी मनोगत व्यक्त केले. २०४० मध्ये इलेक्ट्रिक मोटर व्हेइकल येणार आहे. त्यानुसार वाहन क्षेत्राने बदल करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधनाची बचत आणि वायू प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे उद्योगांनीही स्पेअर पार्ट आणि डिझाइनमध्ये बदल करणे गरजेचे आहे. कश्मिरा मेवावाला यांनी ‘उद्योग आणि व्यवसायात महिलांचे स्थान’ विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी इंडियन वुमेन नेटवर्कच्या कोल्हापूर शाखेचे उदघाटन करण्यात आले. उद्योजिका साधना घाटगे, अश्विनी दानिगोंड, प्रभा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनाला भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी भेट दिली. बेळगाव येथील १५० उद्योजकांनी प्रदर्शनाची पाहणी केली. प्रदर्शन सर्वांसाठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसातपर्यंत खुले राहणार आहे. सोमवारी (ता. २०) ‘ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, व्यापार व्यवसाय संरक्षण उत्पादन’ विषयावर सतीश बोकील, हर्षद वेदांत, ओंकार मेदाडे, प्रणव दिघे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० ते १ आणि दुपारी २ ते ५.३० या वेळेत चर्चासत्र होणार आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीआयआयचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी, क्रिएटीव्हज एक्झिबिशन अॅण्ड इव्हेंट संस्थेचे सुजित चव्हाण यांनी केले आहे.

काय आहे प्रदर्शनात...

नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांचे स्टॉल्स, मोठ्या मशिनरी, उद्योगांशी निगडित उत्पादने, नवे संशोधन आहे. नामांकित कंपन्यांचे १५० स्टॉल आहेत. एजर्समशिन, वजन करणारी मशिन, पि‍‍शवी कटिंग, केफील पॅक सिस्टीम मशिन, थ्रीडी पेंटिंग, सिद्धगिरी मठावरील म्युझियममधील वस्तू, पॅकेजिंग, सोलर, वेव्हिंग मशीन, स्टोअरेज सिस्टीम, सेफ्टी इक्विपमेंट, कटिंग, हायड्रोलिक्स, क्रेन, बेअरिंग्ज, मटेरियल, हॅण्डलिंग, न्यूमॅटिक टुल्स, बँकिंग, ऑइल, चेन्स अॅण्ड पुलिज, टेम्परेचन, इंडिकेटर इंडस्ट्रियल एअरकुलर, अॅण्ड इव्हा पोटेटिव्ह सीसी सिस्टीम आदी नामांकित कंपन्याची उत्पादने आहेत. प्रदर्शनाचे संयोजन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, फाउंड्री इक्विपमेंट, गोशिमा, स्मॅक, फाउंड्रीमॅन असोसिएशन, मॅक, स्लिमा, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, उद्यम सोसायटी, एमएसएमई संस्थांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीतून निर्यातदारांना सवलती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जीएसटीच्या माध्यमातून निर्यातदारांना मोठ्या सवलती आहेत. निर्यातीच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रात (एलओटी) जीएसटीविना निर्यात करण्याची व्यवस्था आहे. डोमेस्टिक खरेदीवेळी ०.१ टक्के जीएसटी लागू करण्याचे जाहीर केले आहे. त्याचा मोठा फायदा निर्यातदारांना होणार आहे, असे प्रतिपादन फेडरेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे (फिओ) उपसंचालक धनंजय शर्मा यांनी केले. जीएसटीच्या नवीन तरतूदी आणि आयात निर्यातावर होणारा परिणाम या विषयावर भारत सरकार अंगीकृत फेडरेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फिओ) आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजतर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. चेंबरच्या राजाराम रोडवरील शिवाजीराव देसाई सभागृहात व्याख्यान झाले.

उपसंचालक धनंजय शर्मा म्हणाले, ‘जीएसटी लागू झाल्यानंतर निर्यातदारांना भारतातील पुरवठादारांकडून माल खरेदी करताना जीएसटी द्यावा लागत आहे. निर्यात करतेवेळी सरकारला आजीएसटी द्यावी लागत होती. त्यामुळे निर्यातदारांना खेळते भांडवल कमी पडत होते. सरकारने देशातील पुरवठादारांना दिलेली जीएसटी आणि निर्यात करतेवेळी भरलेली आयजीएसटी परताव्याच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केली होती. मात्र जीएसटीच्या सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे जुलै-ऑगस्ट महिन्याचा परतावा निर्यातदारांना मिळाला नाही. त्यासंदर्भात सरकारला फिओ आणि काही संघटनांनी निवेदन देऊन गंभीर बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार मॅन्युअल पद्धतीने परतावा सुरू केला आहे.’

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेश ओसवाल म्हणाले, ‘जीएसटी संदर्भात व्यापारी आणि उद्योजकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जीएसटीच्या अडचणी समजावून घेऊन चेंबर आणि अन्य संघटनातर्फे सरकारकडे पाठविल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत ३० हून अधिक निर्यातदारांनी सहभाग घेतला.’ मिहिर शहा यांनी निर्यातदारांना मिळणाऱ्या सवलती विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जीएसटी अंतर्गत परिभाषा, निर्यात, शून्य रेटेड सप्लाय, एलयूटी बॉण्डची कार्यपद्धती, संकल्पना, आयटीसीची परतावा, आयजीएसटीच्या निर्यातीवर दिलेला परतावा, निर्यातीसाठी लागणारी कागदपत्रे, निर्यातीची फायदे, नवीन कारखाना स्थापन करण्याची पद्धत, आयात, शुल्कगणना विषयावर चर्चा करण्यात आली. चेंबरचे सचिव शिवानंद औंधकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपुरात शिवलिंग, कलश मिरवणूक

$
0
0

,जयसिंगपूर

ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणारे शिवलिंग तसेच कलशाची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशा आदी पारंपारिक वाद्यांच्या निनादात, हत्ती, घोडे, रथाच्या लवाजम्यासह मंगलमय वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर शिवलिंग व कलश मंदिरात नेण्यात आला. गुरूवारी करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण होणार आहे.

येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात कलशारोहन सोहळा सुरू आहे. यानिमित्त रविवारी सकाळी मंदिरापासून शिवलिंग व कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन रोड, क्रांती चौक, शिरोळ-वाडी रस्त्यावरून मिरवणूक शाहूनगरमध्ये आली. यानंतर सांगली-कोल्हापूर महामार्गावरून सहाव्या गल्लीतून मंदिरापर्यंत आली. मिरवणुकीत हत्ती, घोडे, बँजो, ढोल-ताशा पथकाचा समावेश होता. एका रथामध्ये शिवलिंग व ट्रॉलीमध्ये कमळाच्या प्रतिकृतीत कलश ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेल्या महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती.शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फटक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत करण्यात आले. मिरवणूक विसर्जीत झाल्यानंतर मंदिरात शिवलिंग व कलश नेण्यात आला. सकाळी मंदिरात दोन यज्ञकुंड करण्यात आले. एका यज्ञकुंडाचे यजमानपद सौ. व श्री. संभाजी मोरे यांना तर दुसऱ्या यज्ञकुंडाचे यजमानपद सौ. व श्री. सुरेश शहापुरे यांना मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभरातील शेतकऱ्यांचा दिल्लीत आज एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतमाल उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, सात-बारा कोरा करा यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज (सोमवारी) दिल्लीत रामलिला मैदानावर सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांचा एल्गार होणार आहे. तेथे दोन दिवस प्रती संसद आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचा सहभाग असणार आहे. रविवारी रात्री, विविध राज्यांतून आलेले हजारे शेतकरी रामलिला मैदानावर दाखल झाले.

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोग लागू करू, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांत सरकार फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली. म्हणूनच सरकारच्या विरोधात देशभरातील १८२ हून अधिक शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र आल्या. त्यांचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. २० नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्याच्या जागृतीसाठी खासदार शेट्टी दोन महिने गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध २२ राज्यांत किसानमुक्ती यात्रा काढून जागृती केली. त्यास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले. देशातील सर्वच राज्यांतून शेतकरी आंदोलनासाठी कूच झाले. रविवारी खासदार शेट्टी, शेतकरी नेते वी. एम. सिंह, योगेंद्र यादव, डॉ. सुनीलम, रामपाल जाट यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते थांबून आंदोलनाचे नियोजन करीत राहिले.

दिल्लीतील आंदोलनात सर्वच राज्यांतून शेतकरी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. केंद्र सरकार आंदोलन चिरडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी दोन दिवस प्रतीसंसद घेऊन मागण्या मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा केले जाईल. दिल्लीतील आंदोलन आणि संसद अधिक‌‌ाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन केले आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीएसकें’विरोधात २७८ गुंतवणुकदारांच्या तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील डीएसके ग्रुपविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील २७८ गुंतवणुकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी तक्रारी दाखल केल्या. डीएसकेंविरोधात आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात तक्रारदारांचे अर्ज साक्षीदार म्हणून जोडले जाणार आहेत. गुंतवणुकदारांचे सुमारे २० कोटी रुपये अडकल्याने ते हवालदील झाले आहेत. यापूर्वी पुणे आणि मुंबईतही डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

कोल्हापुरातील अनेक नागरिकांनी गेली दोन दशके डीएसके असोसिएशन, डीएसके डेव्हलपर्स, डीएसके ब्रदर्स, डीएसके कन्स्ट्रक्शन, डीएसके एंटरप्रायझेस या फर्म्समध्ये आर्थिक गुंतवणूक केली. मात्र जानेवारी २०१७ पासून या गुंतवणुकदारांना मुद्दल, व्याजाची रक्कम न मिळाल्याने ते हवालदील झाले. कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी डीएसके गुंतवणूकदार असोसिएशन स्थापन केली असून त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर अन्य तक्रारदारांची या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून नोंद होणार आहे.

रविवारी सकाळी अकरा वाजता, राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यापूर्वी गुंतवणुकदारांची हुतात्मा पार्कमध्ये बैठक झाली. गुंतवणूकदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार व अॅड. सत्यजित पवार यांनी सर्व ठेवीदारांना तक्रारी दाखल करण्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर गुंतवणुकदारांचे तक्रार अर्ज एकत्र करून राजारामपुरी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. दुपारी बारापासून रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते. फसवणूक, गुंतवणुकदारांचा विश्वासघात करणे या कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रोटेक्शन इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट १९९९ कायदा कलम तीन व चार यांनुसारही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यावेळी प्रकाश चव्हाण, उमेश सुतार, ए. बी. मिरजे, राजकुमार देवकाते, गिरीष पाटील, गिरीष कुलकर्णी आदींसह ठेवीदार उपस्थित होते. ज्यांची गुंतवणूक मॅच्युअर झाली, मात्र त्यांना पैसे मिळालेले नाहीत अशांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज करावेत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष किल्लेदार यांनी केले आहे.


‘डीएसकें’विरोधात आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. अन्य तक्रारदारांचे अर्ज घेण्यात आले आहेत. त्यांना या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून घेतले जाणार आहे. तक्रारींची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ठेवीदारांची रक्कम परत मिळवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना केल्या जातील.

संजय साळुंखे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल सोनेरी गुंतवणुकीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोने भिशी, बँकांतील नाणे खरेदी यांवर काहीसे निर्बंध आले असले तरी सोन्यातील गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल कायम आहे. दोन मिनिटांत सोने तारण कर्ज आणि पुढील पिढीसाठी काहीतरी धन हस्तांतरण करायचे म्हमून कुटुंबप्रमुखांकडून आजही सोन्यातील गुंतवणूकीला प्राधान्य अधिक आहे. लग्नसराईसह दिवाळी, दसरा, गुढीपाडव्यासह वर्षभरात सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल कायम आहे. जीएसटीमुळे काही महिने सराफ व्यवसायाला कमी प्रतिसाद होता. आता दोन लाख रुपयांपर्यंत सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती मागे घेतल्याने गुंतवणूकीचा टक्का वाढल्याचे बाजारपेठेत कल आहे. सोन्याचा दर लक्षात घेऊनच सोने गुंतवणूक किंवा योजनेत सहभाग घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. खात्रीने परतावा मिळत असल्याचा दावा ग्राहकांचा आहे.

गुंतवणूक, आपत्कालिन अडचण, लग्न, दागिन्यासह शुद्ध सोने नाणे, बिस्कीट स्वरुपात सोने खरेदीचा कल कायम आहे. सोने खरेदीत फायदा झाला नाही तर तोटा होत नाही. त्यामुळे सोने खरेदी-विक्री विश्वासार्ह असल्याचे ग्राहक सांगतात. सोन्यामध्ये काळा पैसा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केला जात असल्याच्या कारणावरुन सोने भिशी बंद करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १५०० दुकानांत सोन्याची भिशी सुरु होती. अकरा हप्ते भरल्यानंतर शेवटचा हप्ता हा ज्वेलर्सकडून भरला जात होता. त्यासह कारागीराची मजुरी दिल्यास सोन्याचे दागिने बनवून दिले जात होते. मात्र, सोने भिशीवर निर्बंध असल्याचे सराफी व्यावसायिक सांगतात. या योजनांत हफ्त्याने पैसे भरून सोने खरेदी करता येत असल्याने ग्राहकांचा अधिक कल होता. भागीदारी कायद्याअंतर्गत वा व्यक्तिगत व्यवसाय (प्रोप्रायटरी) कायद्याअंतर्गत असणाऱ्या संस्थांना कंपनी कायदा लागू नाही. त्यामुळे काही मोजक्याच सराफी व्यावसायिकांकडे सोने भिशी योजना सुरू आहेत. सोने भिशी योजना सुरू असलेल्या कंपनी वा संस्थेच्या घटनेची चौकशी गुंतवणूकदार संबंधितांकडे करू शकतात.

काही मिनिटांतच सोने तारण कर्ज मिळत असल्याने सोन्यात गुंतवणूक महत्त्वाची वाटते. जिल्ह्यातील सराफी बाजारपेठेत सोने गुंतवणूकीकडे कल वाढू लागला आहे. कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाकडे सराफी पेढी संलग्नित आहे. दोन्ही संघाकडे मिळून दोन हजारांवर सराफी दुकाने आहेत. पैकी शहरात गुजरीत ७५० दुकाने आहेत. राष्ट्रीयकृत आणि केडीसीसी बँकेने ग्रामीण भागात सोने तारण कर्ज तात्काळ देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे येणारा कर्जदाराची तात्काळ कर्जाची सुविधा गावांत होऊ लागली आहे. पर्यायाने सोन्यातील गुंतवणूकीकडे शहरांसह ग्रामीण भागातही कल वाढू लागला आहे.

केंद्र सरकारने जीएसटीमध्ये फेररचना केल्याने त्याचा फायदा सराफी बाजारपेठेला होत आहे. जीएसटीमधून हिरे, दागिने आणि अन्य उच्च किमतीच्या वस्तूंशी संबंधित दोन कोटींची उलाढाल असणाऱ्या संस्था मनी लाँड्रिंग कायद्याच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत. सोन्यावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर, केंद्रीय कर कमी करुन एकत्रितपणे तीन टक्के केला. यापूर्वी ५० हजारांपेक्षा जास्त किमतीच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्डची केलेली सक्ती मागे घेतली आहे. त्यामुळे दोन लाखांपर्यंतची सोने खरेदी कोणत्याही कागदपत्रांशिवाय ग्राहकांना करता येऊ लागली आहे. ३६ वर्षांपूर्वी ५४० रुपये तोळा असलेले सोने आज ३० हजारांच्या घरात गेले आहे. कितीही महागले तरी गुंतवणूक आणि दिवाळी सण, लग्नसराईसाठी सोन्या-चांदीची गरज असल्याने गुंतवणूकीला प्राधान्य दिले जात आहे.

केंद्र सरकार वा रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या भिशीवर निर्बंध घातले असल्याची ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही, मात्र, नवा कंपनी कायदा एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आला. त्यामुळे लिमिटेड वा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांकडून सोने भिशी योजनेसाठी जमा होणारी रक्कम ही ठेवी म्हणून समजली जाते. कायद्याचे उल्लंघन होऊ नये, म्हणून काही कंपन्यांनी सोने भिशी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

- चेतन ओसवाल, कमोडिटी तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरी ठाण्याला आज घेराओ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वे स्थानकासमोरील शाहू-भीम स्मारकांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी टाउन हॉल येथे आंबेडकरवादी पक्ष, संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी सोमवारी (ता.२०) सायंकाळी पाच वाजता शाहूपुरी पोलिस स्टेशनला घेराओ घालण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षस्थानी प्रा. विश्वास देशमुख होते.

माणगाव येथे १९२० मध्ये झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषद झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने झालेल्या परिषदेच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथमच कोल्हापुरात आले होते. डॉ. आंबेडकरांची शाहूपुरी येथील रेस्ट हाउसमध्ये निवासाची व्यवस्था केली होती. त्यामुळे या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व असताना वास्तूचा विध्वंस केला आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी शाहूपुरी पोलिस स्टेशनला घेराओ घालण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस २४, २५ रोजी दोनदिवसीय दौऱ्यावर कोल्हापुरात येणार आहेत. यावेळी शाहू-भीम स्मारकाकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात येणार असून यासाठी ‘शाहू-भीम स्मारक निर्माण कृती समिती’ची स्थापना केली. बैठकीस दगडू भास्कर, उत्तम कांबळे, सखाराम कामत, सुभाष देसाई, नंदकुमार गोंधळी, बी. के. कांबळे, बाळासाहेब भोसले, बबनराव सावंत, बाजीराव नाइक, अॅड. पंडितराव सडोलीकर, प्रा. उषा काळे, प्रा. शहाजी कांबळे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images