Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निपाणीत तरुणावर आर्थिक वादातून हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निपाणी परिसरातील वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने पैसे लुटण्याच्या हेतूने पाठलाग करून मारहाण केली, त्याचबरोबर गोळीबारही केला, अशी माहिती संदेश दत्तात्रय जाधव (वय ३४, रा. प्रतिभानगर) याने राजारामपुरी पोलिसांना दिली. या घटनेत जाधव याच्यासह मेकॅनिक मेहबूब मुल्ला हे दोघेही सुखरुप आहेत, मात्र अलिशान कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटत असून, निपाणी पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बुधवारी (ता. १) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभानगर येथे राहणारा संदेश जाधव हा कार आणि स्पोर्ट्स बाइक खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो एका कारच्या खरेदीचा व्यवहार करण्यासाठी मेकॅनिक मेहबूब मुल्ला यांना सोबत घेऊन अलिशान कारमधून निपाणीला गेला होता. परत येताना महामार्गावर १५ ते २० जणांच्या जमावाने कारमधून पाठलाग केला. कोगनोळी टोलनाक्याजवळ कारवर हल्ला केला, त्याचबरोबर आपल्या दिशेने गोळीबारही केला. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून कोल्हापुरात आल्याची माहिती जाधव याने राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी मेकॅनिक मुल्ला याच्याकडे स्वतंत्र चौकशी केली असता माहितीत विसंगती आढळली आहे. याबाबत राजारामपुरी पोलिस निपाणी पोलिसांकडून माहिती घेत आहेत. आर्थिक वादातून हल्ल्याचा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॅनेजरनेच मारला बॅंकेच्या पैशांवर डल्ला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पंढरपूर

सांगोला-पंढरपूर मार्गावर काल महाराष्ट्र बँकेच्या गाडीवर पडलेल्या दरोड्याचा तपास २४ तासामध्ये लावण्यात पंढरपूर पोलिसांना यश आले आहे. हा दरोड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्याच मॅनेजरने घातला असून दरोड्याची योजना आखणारा बँकेचा मॅनेजर अमोल भोसले याच्यासह अन्य एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून लुटलेल्या ७० लाखापैकी ३१ लाखाची रक्कम हस्तगत केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यानी दिली.

काल महाराष्ट्र बँकेच्या सांगोला शाखेचे मॅनेजर अमोल भोसले यांनी फिल्मी स्टाइल बनाव करून बॅंकेच्या ७० लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची फिर्याद पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून तपास भोसलेपाशी आणला. पोलिसी खाक्या दाखविताच भोसलेने आपण दरोड्याचा बनाव रचल्याचे कबूल केले.

भोसलेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भाऊसाहेब कोळेकर याच्या मंगळवेढा येथील घरातून ३१ लाखाची रक्कम हस्तगत केली. या दरोड्यात आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्याचे बाकी असून एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काल सांगोला-पंढरपूर रोडवर बँकेची रोकड घेऊन जाणारी कार अडवून रोकड लंपास करण्यात आली होती, बँकेची रक्कम घेऊन जाणारी आय ट्वेंटी ही गाडी (MH-45-N 5831) बँकेचे सांगोला शाखेचा मॅनेजर अमोल भोसले याचीच होती. तो स्वत: आपल्या कारमधून ही रक्कम घेऊन पंढरपूरकडे निघाला होता. या गाडीसोबत सुरक्षारक्षक नव्हते. सांगोला-पंढरपूर रस्त्यावर जगताप मळ्याजवळ दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी गाडी टप्प्यात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग करत आपली बोलेनो गाडी बँकेच्या गाडीला ओव्हरटेक करत अडवली आणि तिखट फेकत आपले काम फत्ते केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत साहित्याचे ग्रंथमंदिर

$
0
0

Balasaheb.Patil@timesgroup.com

Tweet : @balpatilMT

कोल्हापूर : लेखन, वाचनासाठी वय आडवे येत नाही. माणसाची ऊर्जाच त्याला लिहितं करते, वाचतं करते. तरुणांनाही आश्चर्यचकित करायला लावणारी अशीच ऊर्जा आहे ती निवृत्त प्राचार्य रा. तु. भगत यांच्याकडे. या ऊर्जेतूनच ८३ वर्षांचे भगत आजही अखंड लिहित, वाचत असतात. संत साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय असल्याने त्यांच्या घरी संतसाहित्याचे आगरच आहे. त्यांच्याकडील ग्रंथसंग्रहाला ते कौतुकाने ‘संत साहित्याचे ग्रंथमंदिर’ असे संबोधतात. याची प्रचिती यावी, असाच संग्रह त्यांच्याकडे आहे.

प्राचार्य भगत यांच्या रंकाळ्याजवळील मोहिते पार्कातील घरात प्रवेश केला की पहिल्या खोलीतच दिसतो तो संत गाडगेबाबांचा पुतळा. अंबाबाई मंदिराजवळ असलेला पुतळा या प्रतिकृतीवरून बनव‌िल्याचे ते सांगतात. त्यांनी दुसऱ्या खोलीतील कपाटात त्यांनी लिहिलेली जवळपास १२५ पुस्तके अगती-निगुतीने लावून ठेवली आहेत. आध्यात्म, संतसाहित्य, चरित्र, गौरवग्रंथ अशा विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. या पुस्तकाच्या अनेक प्रती आउट ऑफ प्रिंट आहेत.

दुसऱ्या मजल्यावरील बेडरूमलाच त्यांनी ग्रंथालय केले आहे. हे ग्रंथालय विविध अंगांनी समृद्ध आहे. यात चित्र, शिल्पे आणि विविध प्रकारचे दुर्मिळ ग्रंथ आहेत. संस्थानकालीन चित्रकार आबालाल रेहमान यांच्या जवळपास ५० चित्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. तसेच विविध चित्रकारांनी काढलेली संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत नामदेव, बसवेश्वर, गुरुनानक, येशू ख्रिस्त आदींची पेंटिग्ज आहेत. त्यांच्या ग्रंथालयात जवळपास ९ हजार ८२६ मराठी आणि ३१३ हिंदी पुस्तके आहेत. यात संतसाहित्य मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये संत तुकारामांवर ४२, गाडगेबाबांवरील २७, ज्ञानेश्वरांवर १२, कबीर १५, बसवेश्वर १२, नामदेव ५, गुरुनानक ७ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर आधारित १७, रामदासांवरील नऊ आणि अन्य संतांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रातील संत जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या संशोधनात्मक ग्रंथांचाही त्यात समावेश आहे. श्रीकल संतगाथा, नामदेव गाथा, अभंग ज्ञानेश्वरी, पवित्र येशू ख्रिस्त, , वाल्मिकी रामायण, पवित्र कुराण आदींसह दुर्मिळ ग्रंथ त्यांच्याकडे आहेत.

याव्यतिरिक्त जे. कृष्णमूर्तींची जीवनदृष्टी, बा. सी. मर्ढेकरांचे ‘कला आणि मानव’, डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे खाली जमीन वर आकाश, प्रतिमा इंगोले यांचे बोडखी, माधव देशपांडे यांचे सिनेमाचा रंग वेगळा, पी. बी. साळुंखे आणि डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, इंद्रजित सावंत संपादित रयतेच्या राजाचे

चित्रमय चरित्र, करवीर रियासत आदींसह ललि‌त साहित्याचा विपुल संग्रह त्यांच्याकडे आहे.

मासिके आणि विशेषांक

भगत यांना ग्रंथांबरोबरच मासिके आणि विशेषांकाचा संग्रह करण्याची आवड आहे. बालविकास, मैत्रीच्या पलिकडे, अशी चालवू बालमंदिरे, कथामाला, गीता मंथन, भारती, साधना, मुलांचे सानेगुरुजी अशी अनेक मासिके आहेत. शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील विशेषांक, संत गाडगेबाबा यांच्यावर लोकराज्यने काढलेला तीन भाषेतील विशेषांक वैशिष्ट्यपूर्ण आहे.

चतुरस्त्र लेखन

प्राचार्य भगत यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेले राज्य पुरस्कारप्राप्त संत गाडगेबाबा स्मारक ग्रंथ, रंगसम्राट आबालाल रेहमान, संह‌्याद्री की गोद में (काव्य), साने गुरुजींच्या साहित्य आणि चरित्रावर आधारित ४६ पुस्तके अशी विपुल ग्रंथसंपदा पहायला मिळते.

हिंदी साहित्याचीही आवड

प्राचार्य भगत यांना हिंदी साहित्याची आवड आहे. ‘सह्याद्री की गोद में’ हे त्यांचे हिंदीतील पहिले पुस्तक. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावना आहे. आवडीचा विषय असल्याने हिंदीतील विविध लेखकांच्या कथा, काव्य, कादंबऱ्या आणि समिक्षात्मक ग्रंथ त्यांच्याकडे आहेत. प्रेमचंद, मिर्जा गालिब, फणीश्वरनाथ रेणू, भोलानाथ तिवारी, भगवतीस्वरुप मित्र, मंटो आदी महत्त्वाच्या लेखकांचे साहित्य त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर विविध भाषांमध्ये प्रकाशित झालेले गांधीजींचे चरित्र, त्यांच्यावर आधारित ग्रंथ असा जवळपास २२ ग्रंथांचा समग्र ग्रंथसाठा त्यांच्याकडे आहे. तेवढेच ग्रंथ स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित आहेत.

माझ्याकडील बहुतेक ग्रंथ संतसाहित्यावरील आहेत. ललित साहित्याचाही मोठा संग्रह आहे. संत गाडगेबाबांच्या समर्पण वृत्तीने मला प्रेरित केल्यामुळे त्यांच्यावर आधारित जवळपास सर्व साहित्य आहे. आबालाल रेहमान यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या चित्रकाराची चित्रे हीच माझी संपत्ती आहे. या सर्व ग्रंथांची जपणूक हे एक आव्हान आहे.

- प्राचार्य रा. तु. भगत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावड्यात १ लाख ९० हजारांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावड्यातील साईनाथ कॉलनीत गुलामरसुल बाबालाल शेख (वय ६०, रा. साईनाथ कॉलनी) यांच्या घरातील सुटकेसमध्ये ठेवलेली एक लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास झाली आहे. घरात फरशी बसवण्याचे काम सुरू होते. यादरम्यान काम करण्यासाठी आलेल्या कामगारांनीच रक्कम चोरल्याचा संशय शेख यांनी व्यक्त केला आहे. यानुसार बशीर शेख, अनिल व विजय (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तिघांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुलामरसूल शेख हे पत्नी आणि मुलासह कसबा बावड्यातील साईनाथ कॉलनीत राहतात. जुन्या घरातील फरशी बदलण्याचे काम सुरू असल्याने त्यांनी १७ ऑक्टोबरला मुलाच्या बँक खात्यातील दोन लाख रुपये काढून आणले होते. यातील १० हजार रुपये इतर कामासाठी खर्च झाल्यानंतर उर्वरित एक लाख ९० हजार रुपये त्यांनी घरातील लोखंडी तिजोरीत ठेवले होते. २१ ऑक्टोबरला फरशी बसवणारे कामगार बशिर शेख, अनिल आणि विजय हे तिघे घरात आले. फरशी बसवण्यासाठी रुममधील साहित्य दुसऱ्या रुममध्ये हलवण्याचे काम सुरू होते, यावेळी तिजोरीतील रक्कम काढून त्यांनी सुटकेसमध्ये ठेवली. सर्व साहित्य दुसऱ्या रुममध्ये हलवल्यानंतर सुटकेस ठेवताना त्यांना त्यातील रक्कम दिसली नाही. याबाबत त्यांनी पत्नी आणि मुलाकडे विचारणा केली, मात्र त्यांनी पैसे घेतले नसल्याचे सांगितले. यानंतर शेख यांनी फरशी बसवण्यासाठी आलेल्या कामगारांकडे चौकशी केली. कामगारांनीही पैसे पाहिले नसल्याचे सांगितले. यानंतर शेख यांनी घरात शोधाशोध केली, मात्र पैसे सापडले नाहीत, त्यामुळे अखेर गुरुवारी (ता. २) शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. फरशी बसवण्यासाठी आलेले कामगार बशिर शेख, अनिल आणि विजय या तिघांवर त्यांनी संशय व्यक्त केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयप्रभाच्या जागेवर बांधकामाचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयप्रभा स्टुडिओ सोडून इतर जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मागितली जात आहे. अशा प्रकारे पळवाट काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेने हा परिसर हेरिटेज केला असताना हा प्रकार गंभीर असल्याची बाब आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, कसबा बावड्यातील दहा वर्षे रखडलेल्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यास १५ नोव्हेंबर अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतरही कंत्राटदाराने काम सुरू न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आमदार क्षीरसागर यांनी आयुक्तांची गुरुवारी महापालिकेत भेट घेतली. त्यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, कसबा बावडा परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिथे महापालिकेने पाण्याची टाकी बांधण्याचे नियोजन केले. त्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यासाठी महापालिकेने सुस्थितीत असलेल्या प्राथमिक शाळेचे बांधकाम एका रात्रीत पाडण्यात आले. पण दहा वर्षे झाली त्या टाकीचे काम पुर्ण झालेले नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने काम थांबवले जात आहे. यामुळे भागातील पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत काम सुरू करतो, असे सांगितले होते. पण त्यानंतर काहीच हालचाल नाही. सर्व नियोजन असताना काम केले जात नसेल तर कंत्राटदाराला बदलून टाका. याबरोबर कचरा प्रकल्पावरील साठलेल्या कचऱ्याचे प्रकरण आता पुर्णपणे बंद करण्याची वेळ आली आहे. तेथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आमदार क्षीरसागर यांनी फेरीवाल्यांचा प्रश्नही मांडला. ते म्हणाले, ‘फेरीवाला झोन केव्हा कार्यरत होणार आहेत?, त्यासाठी नेमण्यात आलेल्या कमिटीमध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी घेतले तर झोन निर्माण होत असतानाच प्रश्नांवर मार्ग काढता येतील. झोन मंजूर नाहीत म्हणून तक्रारी होणार नाहीत.’ क्षीरसागर यांनी ट्रॅफिक आयलँड, पार्किंग, प्रशासकीय इमारत, स्मशानभूमीवरील नोंद करणारे कर्मचारी, लाइन बाजार येथील हॉकी स्टेडियमचे प्रश्नही मांडले.

याबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांनी कंत्राटदाराला काम सुरू करण्यास १५ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. त्यानंतर जर काम सुरू झाले नाही तर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. इतर प्रश्नांबाबत ते म्हणाले, ‘फेरीवाला झोनसाठी उपसमिती नेमली आहे. त्यांच्याकडून झोनबाबतचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. त्यानुसार ओळखपत्र व झोन यापद्धतीने काम केले जाईल. स्टँडवरील बहुमजली पार्किंगबाबत रिक्षा संघटनाशी लवकरच बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्याचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. झूमवरील कचरा प्रकल्प ठिकाणी डिसेंबरअखेर वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येईल. सध्या या कंपनीच्या कंत्राटदाराला मोठा दंड आकारला जात आहे. एक लाख टन कचऱ्यापैकी ७० हजार टन कचरा उचलला आहे. उर्वरित कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रक्रिया केली जाणार आहे. ‘जयप्रभा’ बाबत वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल.

या बैठकीस जलअभियंता सुरेश कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर,सुनील जाधव, संजय लाड, रवींद्र माने, सुभाष पाटील, विद्यानंद थोरवत, राकेश चव्हाण, सचिन पाटील, राहुल माळी,अक्षय खोत, अरविंद तिवडे उपस्थित होते.

पद्माराजे गार्डनमध्ये दीड कोटीचा आराखडा

पद्माराजे गार्डनमध्ये मर्दानी खेळाच्या विकासासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी मिळावा, अशी मागणी आयुक्त डॉ. चौधरी यांनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे केली. त्यावर जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आमदार क्षीरसागर यांनी मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांच्या विळख्यात गोशिमा

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीला सर्वत्र कचरा आणि त्यामुळे सुटलेली दुर्गंधी तसेच अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामांचा घट्ट विळखा बसला आहे. पावसाळ्यात वाढलेल्या झाडाझुडपांनीही नैसर्गिकरीत्या अतिक्रमण केले आहेच, परंतु एमआयडीसी परिसरात असणाऱ्या चार ग्रामपंचायतींचेही अस्तित्व केवळ कर गोळा करण्यापुरतेच राहिले आहे. त्यामुळे येथील बसथांबेसुद्धा झुडपांनी वेढले आहेत. अवैध व्यवसायांनी या परिसरात आपले बस्तान बसवले आहे ते वेगळेच.

कागल-कोल्हापूर या महत्वाच्या शहरांदरम्यान असलेली गोकुळ शिरगाव एमआयडीसी म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमजगताचे एक महत्त्वाचे पाऊल. एमआयडीसीसाठी गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, नेर्ली, आणि तामगाव अशा चार ग्रामपंचायींनी आपली जागा उद्योगांसाठी दिली आहे. सध्या या ठिकाणी ३८२ लहान-मोठे उद्योग आहेत. हायवेवरून एमआयडीकडे वळल्यावरच एमआयडीच्या समस्यांची मालिका सुरू होते. उड्डाणपुलावरून जाताना पादचाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला दोन-दोन फुटांची जागा सोडली आहे. त्यावर फळे, भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाल्याची अतिक्रमणे आहेत. त्यामुळे पादचारी मुख्य रस्त्यावरूनच ये-जा करतात. एखादा दहा चाकी ट्रक येथे आल्यास त्याला वळताना अडचणी येतात. अनेकवेळा पुलाच्या कोपऱ्याला ट्रक घासून जातो. अपघाताची शक्यता गृहित धरून येथे सुधारणांसाठी अनेकांनी निवेदने दिली आहेत. पादचारी मार्ग एक फुटांचा करण्याबाबत आणि रस्ता रुंदीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. मात्र या निवेदनांना हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने केराची टोपली दाखवली आहे. एमआयडीसीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडवर टपऱ्या बांधल्याने प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. येथे चहापासून ते चिकन विक्रीपर्यंतचे सर्वच व्यवसाय चालतात. यातून बाहेर पडणारे सांडपाणी, टाकाऊ अन्नपदार्थ हे मुख्य महामार्गावरील गटरमध्ये टाकले जातात. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटते. उड्डाणपूल ओलांडून एमआयडीच्या मुख्य रस्त्यावर आल्यानंतर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर तर इतकी दुर्गंधी आहे की, नाकाला रुमाल बांधूनही येथून पुढे सरकणे अशक्य ठरते.

आतील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत टपऱ्या थाटलेल्या आहेत. त्यांना मिळणारे स्थानिक लोकप्रतिनिधींचे अभय आणि टपऱ्यांची संख्या यात वाढच होत आहे. त्याच्या समोरच भाजी, फळे आणि फुल विक्रेते दिवसभर ठाण मांडून बसलेले असतात. कचरा, व्रिकेते आणि खरेदीदारांची गर्दी, दुर्गंधीने भरलेले वातावरण यातूनच प्रवासी बस ये-जा करतात.

त्यापुढील चौकात तर चक्क बाजारच भरतो. चौकाच्या उजव्या बाजूला काही उद्योगांच्या जागांवर रेसिडेन्शीयल पार्क उभारण्यात आले आहेत. काहींनी आपले बंगले उभारून स्वत:ची राहण्याची सोय केली आहे. एमआयडीसीतून फिरताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी इतकी झुडपे वाढली आहेत की वळणावर समोरून एखादे वाहन, व्यक्ती येत आहे की नाही हे दिसतच नाही. परिणामी या ठिकाणी धोकादायक वळणे तयार झाली आहेत.

येथील उद्योजकांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा सर्व्हिस चार्ज जमा होतो. महामंडळाकडून सफाईसाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. अलिकडे विजेची सोय करण्यासाठी जुन्या खांबांच्या शेजारीच नवीन खांब टाकण्याची तयारी सुरू आहे. याबाबत उद्योजकांनी विचारणा केली असता ‘पुण्यातून ऑर्डर आहे’ असे सांगून वेळ मारून नेली जाते. येथे असलेल्या ‘डब्ल्यू’ ब्लॉकमध्ये फाउंड्रीची वाया जाणारी वाळू टाकली जाते. ती वाळू आजूबाजूच्या कारखान्यांत वाऱ्याने उडून सीएनसी आणि व्हीएमसी मशिनमध्ये अडचणी निर्माण करते. सातत्याने येथे वाळू टाकली गेल्याने या ठिकाणी ओढ्यालगत सपाट जागेवर डोंगरच तयार झाला आहे. आता जागा मिळेना म्हणून रस्त्याच्या दुतर्फा अशा वेस्ट सँडचे ढिग टाकण्यात आले आहेत. ओढ्यातदेखील जागोजागी अशी वाळू पडलेली दिसते. येथे वाहते पाणी अडल्याने पाण्याला दुर्गंधी पसरलेली आहे. एमआयडीसीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपला बऱ्याच ठिकाणी गळती आहे. बसव अनंत इंड्रस्ट्रिजसमोर तर गळतीमुळे रस्त्यावरच पाणी तुंबले आहे. ते झिरपून समोरच्या अल्फा इंड्रस्ट्रीजमध्ये घुसते. याशिवाय संपूर्ण एमआयडीसीत बऱ्याच ठिकाणी विजेच्या फ्यूज पेट्या उघड्यावरच आहेत. येथे वारंवार होणाऱ्या चोऱ्या ही एमआयडीसीतील उद्योगांसमोर फार मोठी डोकेदुखी आहे. या ठिकाणी स्वतंत्र पोलिस स्टेशन आहे. मात्र तरीही बीएसएनएलची लाइनसुध्दा तुकडे पाडून चोऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बी ब्लॉकपासून पुढे सहा ते आठ महिने इंटरनेटसेवा बंद आहे. एमआयडीसीत कुठेही पार्किंगसाठी जागा नाही. ट्रक टर्मिनससाठी ठेवलेली जागासुद्धा आरक्षण बदलून अन्य उद्योगांना देण्यात आली आहे.

एमआयडीसीमधून पूर्वेस नेर्लीकडे जाताना टपऱ्यांवर कामगारांची प्रचंड गर्दी असते. चहापासून ते चिकन, मटण दुकाने असा सर्वच व्यवसाय येथे चालतो. पण या व्यवसायाआडून या ठिकाणी मटक्यासारखे अवैध व्यवसाय चालतात असे नाव न छापण्याच्या अटीवर कामगारांनी आणि परिसरातल्या कारखानदारांनी सांगितले. संपूर्ण एमआयडीसी परिसरातील ओढ्यांमध्ये एकीकडे प्रचंड झुडपे वाढली असताना कुणीही उठावे आणि यात कचरा टाकावा, येथे काहीही जाळावे अशीच परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ठिकाणी पासिंग ट्रॅक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवजड वाहनांचे पासिंगचा ट्रॅक सरकारी जागेत करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने कोल्हापूर, सांगलीतील अवजड वाहनांचे पासिंग बुधवारपासून बंद करण्यात आले. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी संभाजीनगर बसस्थानक, कागल येथील नवीन चेकपोस्ट नाका येथील जागा सुचविली आहे. त्यासह मोरेवाडी येथील पंधरा गुंठे जागेतील ट्रॅकवर डांबरीकरण करण्यात येणार आहे.

परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र सरकारी मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घ्यावी. कोणत्याही खाजगी जागेत किंवा सार्वजनिक रस्त्यांवर घेण्यास मनाई केली आहे, असा आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना काढला. मात्र कोल्हापूर आणि सांगलीत परिवहन विभागाचा सरकारी मालकीचा ट्रॅक उपलब्ध नाही. परिवहन विभागाच्या ४० कार्यालयांच्या ताब्यात असलेल्या जागांवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ब्रेक टेस्ट उभारणी सुरू आहे. यापैकी १४ ठिकाणी ट्रॅक उपलब्ध आहेत. कोल्हापुरात हा ट्रॅक उपलब्ध नसल्याने कोल्हापूर, सांगलीतील वाहनांचे पासिंग कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगाव, नंदूरबार, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर (ग्रामीण), अकोला व यवतमाळ या ठिकाणी घेऊन जावीत, असा आदेश दिला. त्यामुळे कोल्हापुरातून २५० ते ३०० किलोमीटर पासिंगसाठी जाण्यास परवडणार नसल्याने अनेकांची कोंडी झाली. बुधवार पासिंगसाठी अपाँइमेंट देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली.

कोल्हापुरात मोरेवाडी येथील पंधरा गुंठे जागेवर ट्रॅकचे कामकाज सुरु आहे. मात्र पावसामुळे या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले नाही. तोपर्यत शिये फाटा येथे वाहनांच्या पासिंगची चाचणी घेतली जात होती. अवजड वाहनांच्या पासिंगसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा संभाजीनगर डेपोतील येथील ट्रॅक, कागल येथील नवीन चेकपोस्ट नाका येथील जागा सुचविली आहे. दहा दिवसांत पर्यायी ट्रॅकची व्यवस्था पूर्ण केली जाणार आहे. या कालावधीत जवळच्या पासिंग ट्रॅकवर जाण्यासाठी नोंदणी आणि पासिंगसाठी कोल्हापुरातून अधिकारी देण्याची तयारी आरटीओ कार्यालयाने दर्शविली आहे. ज्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट संपले आहे, त्या वाहनांनी ‘ना वापर’ म्हणून कार्यालयाला कळवावे. वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन फिटनेस सर्टिफिकेस संपले असल्यास वायूवेग पथक कारवाईत शिथिलता आणेल अशी तयारीही कार्यालयाने दर्शविली आहे.



जिल्ह्यातील वाहनांची वाढती संख्या पाहता शहर आणि परिसरात ३ पासिंग ट्रॅकची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीन एकर जागेची मागणी केली होती. पैकी १५ गुंठे जमीन मिळाली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव जागा दिल्यास प्रश्न मार्गी लागू शकेल. सोलापूर आणि पिंपरी चिंचवड येथे पासिंगला जाणाऱ्यांना येथून अपाँइमेंट दिली जाणार आहे. नवीन ट्रॅकसह सध्या मोरेवाडीत सुरू असलेला ट्रॅक दहा दिवसांत तयार होणार आहे. त्यासंदर्भात परिवहन आयुक्ताकडे पाठपुरावा सुरू आहे.

डॉ. डी. टी. पवार, आरटीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडेंचा भाजपात सन्मान करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

‘जे-जे आमच्याकडे आले आहेत, त्यांच्यांवर कोणताही पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. तुम्ही आलात तर तुमचाही योग्य सन्मान केला जाईल,’ अशी जाहीर ऑफर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश आवाडे यांना दिली. हुपरी (ता. हातकणंगले) येथे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी ऊस गाळप समारंभात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्री पाटील यांनी आवाडे यांच्या राजकीय भवितव्याविषयी थेट विचारणा केली.

तर आवाडे यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत ऊसदरप्रश्नी एकत्र काम करण्याच्या घोषणेचा संदर्भ घेत शरद पवार यांनी, ‘संघर्षाच्या चळवळीतून खासदार निवडला गेला. आता आवाडे-शेट्टी एकत्र आल्याने सदाभाऊचं काय होणार’ असा टोला लगावला.

कार्यक्रमात आवाडे यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आवाडेंनी वातावरण निर्मिती केली आहे. कमानी उभारल्याचे पाहून निवडणुकीचे वातावरण असल्याचा मला भास झाला. इथे उपस्थितांची गर्दी पाहून आवाडे राष्ट्रवादीत जाणार की भाजपात प्रवेश करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यांनी भाजपमध्ये यावे.’ दरम्यान ‘ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी कारखानदारांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घ्यावा’, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

आवाडे दादांनी तेथेच रहावे

‘आवाडे हे भाजपात आले तर त्यांचाही योग्य सन्मान केला जाईल. हे शक्य नसेल तर आवाडेदादांनी येथेच रहावे,’ असे मंत्री पाटील म्हणाले.


मग सदाभाऊंचे काय होणार?

दरम्यान, माजी मंत्री पवार यांनी टोलेबाजी केली. ‘कारखाने सुरु झाले की जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरात गजबज सुरू होते. वेगवेगळी आंदोलने छेडत मतमतांतरे व्यक्त केली जातात. पण, आता आवाडे आणि शेट्टी एकत्र आल्याने एक विचाराने निकाल होणार असेल तर सदाभाऊंच काय होणार?’ अशी टिप्पणी त्यांनी करताच एकच हशा पिकला. पालकमंत्री पाटील यांना उद्देशून ‘सरकारने ऊसाचा दर ठरवावा. त्यावर सदाभाऊ ४०० रुपये अधिक देणार असल्याने शेतकऱ्यांना फायदाच होईल’ अशी टोलाही पवार यांनी लगावला.


मी आणि शेट्टी एकत्र

'मी आणि राजू शेट्टी ऊस दरप्रश्नी एकत्र आहोत. शेट्टी यांना सर्वजण घेरणार असतील तर ते चालणार नाही' असा इशारा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिला. शेतकरी मेळाव्यात ते म्हणाले, ‘आता राजकारण झाकून करणार नाही. अनेक वादळं बघितली. खूप शिकलो. अनुभव घेतला. आता ताराराणी आघाडीच्या माध्यमातून खुले राजकारण करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१७ तळीरामांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांनी शहरातील ओपन बारवरील कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरूच ठेवली. बुधवारी (ता. १) रात्री राजारामपुरी पोलिसांनी आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागील रोडवर बसलेल्या सहा तळीरामांना ताब्यात घेतले, तर जुना राजवाडा पोलिसांनी रंकाळा तलावाजवळ तांबट कमान परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या ११ तळीरामांना ताब्यात घेतले. या १७ मद्यपींवर मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारवाई सुरू असून, पोलिसांनी तीन दिवसात ४६ तळीरामांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जुना राजवाडा पोलिसांनी रंकाळा तलावाजवळ तांबट कमान परिसरात कारवाई केली. याठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणारे स्वप्निल किशोर कारंडे (वय २९, रा. भोगम कॉलनी, कळंबा), विनायक बाबुराव पवार (३८, रा. संभाजीनगर), स्वप्निल लक्ष्मण पाटील (२४, रा. फुलेवाडी), श्रीकांत गोविंद मुसळे (५१, रा. न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर), नीलेश मारुती चौगुले (३०, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर), अक्षय शहाजी नाईक (२३, रा. लक्षतीर्थ वसाहत), उदय दत्तात्रय सुतार (२९, रा. फुलेवाडी), प्रशांत पांडुरंग पाटील (२२, महेश्वरी कॉलनी, फुलेवाडी रोड), विजय उत्तम दाभाडे (१९, रा. तिरंगा चौक, कोल्हापूर), कपिल श्रीराम मिठारी (२२, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि सुशील उर्फ सुशांत शशिकांत लोहार (२३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) या ११ मद्यपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राजारामपुरी पोलिसांनी आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागील रोडवर छापा टाकून सहा मद्यपींना ताब्यात घेतले. अनिल मोहन चौगुले (२७, रा. रामानंदनगर), अभिजित रामराव देसाई (२५, आर. के. नगर), रजनीकांत बबन पाटील (३२, रा. अष्टविनायक कॉलनी, आर. के. नगर), सोहेल रमजान जमादार (४३, बोंद्रेनगर), सुमित राजेंद्र पाटील (२४, रा. राजारामपुरी, ४ थी गल्ली) आणि राजेश मुकुंद पोवार (३१, रा. सुभाषनगर) या सहा तळीरामांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या १७ जणांवर मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोणीही मद्यप्राशन करू नये. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी आला, कामे रेंगाळली

$
0
0

दीपक मांगले, गडहिंग्लज

एव्हीएचविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग, मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी केलेला पाठपुरावा, पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन केलेले काम, वंचित मुलांसाठी शैक्षणिक सुविधा पुरविण्यासह अनेक विकासाभिमुख कामांसाठी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांची आजवरची कारकीर्द समाधानकारक दिसत असली तरीही काही प्रश्नांबाबत घोर निराशाही आहे. जनमानसात त्यांच्यातले होऊन वावरणाऱ्या संध्यादेवींनी कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर व पुतण्या रामराजे कुपेकर यांच्या साथीने नेहमीच विकासाभिमुख कामाला प्राधान्य दिले आहे. मात्र, सद्यःस्थितीत त्यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे प्रकर्षाने बोलले जाते.

आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कुपेकर यांनी दत्तक घेतलेली तेरणी (गडहिंग्लज), कुरणी (चंदगड) व हत्तीवडे (आजरा) ही गावे अजूनही दुर्लक्षितच आहेत. कुरणी येथील घटप्रभा नदीवर सुमारे साडेपाच कोटी, तर हडलगे येथील घटप्रभा नदीवरील पावणेचार कोटींच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे असा त्यांचा दावा आहे. चंदगड तालुक्यातील कलानंदीगड व गडहिंग्लज येथील सामानगड विकसित करण्यासाठी आमदार कुपेकर यांनी विशेष प्रयत्न केले असून, यासाठी दोन कोटी ४३ लाखांचा निधी उपलब्ध झाला. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याचे दिसत नाही.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हडलगे-सांबरे-कुमरी-अमरोळी रस्ता डांबरीकरण व यशवंतनगर ते तुडये तालुका हद्द रस्ता डांबरीकरणासाठी दोन कोटी सहा लाखांचा निधी मंजूर होऊन काम पूर्णत्वास गेले आहे. अर्थसंकल्पीय कामातून सुमारे १० कोटी ५० लाखांचे काम झाले असून, यामध्ये कवळीकट्टी ते तेरणी, येणेचवंडी ते नंदनवाड, कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-नागनवाडी, महागाव-वैरागवाडी-हलकर्णी आदी गावांतील रस्ता सुधारणा कामांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी २० लाख रुपयांची निधी उपलब्ध झाला. यामध्ये हिटणी जोडरस्त्याचे डांबरीकरणासह मतदार संघातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे झाली असल्याचा त्यांचा दावा आहे.

विशेष साकव योजनेतून साकव बांधणी कार्यक्रमातून गडहिंग्लज, चंदगड व आजार तालुक्यातील २२ कामांसाठी ६ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर करून काही कामे पूर्णत्वास, तर काही अंतिम टप्प्यात आहेत. २५१५ पायाभूत सुविधा कार्यक्रमांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात तेरणी व हिटणी व चंदगड तालुक्यात तुर्केवाडी व माणगाव येथे २५ लाखांचा निधी मिळाला. आरोग्याच्या दृष्टीने आमदार कुपेकर यांनी विशेष प्रयत्न केले असून कोवाड येथे आरोग्य केंद्र इमारत तर मेजरे कार्वे (ता. चंदगड) व बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सन २०१५-१६ ते २०१६-१७ मध्ये आमदार फंडातून ९६ कामांसाठी ५ कोटी २१ लाखांचा निधी आला आहे. तर सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत ५५ कामांसाठी २ कोटी ९७ लाखांचा निधी मिळाला आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बंधारे बंधनेकामी २ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडेंनी शेतकऱ्यांना स्थैर्य दिले

$
0
0

इचलकरंजी

‘ उजाड माळावर चमत्कार घडवून जवाहर कारखान्याच्या माध्यमातून आवाडेंनी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले आहे. यशवंतराव चव्हाण, दत्ताजीराव कदम, वसंतदादा पाटील, आबासाहेब कुलकर्णी, अनंतराव भिडे यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली आवाडे यांनी परिवर्तन घडविले आहे. द्रष्ट्या नेतृत्त्वामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या रौप्य महोत्सवी ऊसगाळप हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष प्रकाश आवाडे आणि मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी सर्वच मान्यवरांची सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. धनगरी ढोल, झांजपथकाच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत मंगलकलश घेतलेल्या सुवासिनी सहभागी झाल्या होत्या.

शरद पवार म्हणाले, ‘आवाडेंच्या द्रष्ट्या नेतृत्त्वामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. कारखाने सुरु झाले की जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरात गजबज सुरु होते. वेगवेगळी आंदोलने छेडत मतमतांतरे व्यक्त केली जातात. पण आता आवाडे आणि शेट्टी एकत्र आल्याने एक विचाराने निकाल होणार असेल तर सदाभाऊंचं काय होणार, असा उल्लेख करताच एकच हशा पिकला. तोच धागा पकडत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून सरकारने उसाचा दर ठरवावा, त्यावर सदाभाऊ ४०० रुपये अधिक देणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले. देश बदलासाठी शेतकऱ्याला सन्मान मिळण्याची गरज असून त्यासाठी त्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले. यावेळी पवार यांनी कोणतेही राजकीय भाष्य करणे टाळले.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ कल्लाप्पाण्णा आवाडे आणि प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नामुळेच जवाहरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले. आवाडेंच्या जीवनात राजकीय चढ-उतार आले तरी त्यांनी सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष केले नाही म्हणूनच आज वटवृक्ष उभारला असून लाखोंच्या घरात चुली पेटल्या आहेत. उसाचा दर काय असावा याची चर्चा असली तरी सर्वच कारखान्यांनी एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा जादा दर द्यायचा असेल तर त्याबाबत सर्व साखर कारखान्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. त्यासाठी आवाडेंनी पुढाकार घ्यावा. त्याला सरकार एकमताने सहकार्य करेल.कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे कारखान्याच्या प्रगतीचा विस्तृत आढावा घेताना म्हणाले,‘ हा कारखाना रौप्य महोत्सवी वर्षापासून दैनंदिन १२ हजार मे.टन उसाचे गाळप करणार आहे. बदलत्या काळानुरुप आधुनिकतेची कास धरत कारखान्याने वर्षागणिक गाळप क्षमता वाढवत साकारलेला सहवीज निर्मिती प्रकल्प आणि ऊस विकास योजना यामुळे कारखाना आदर्शवत ठरला आहे. पवार यांनी सातत्याने विधायक कामात आम्हाला मदत केली असून आज ही गर्दी आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी जमली असून ती कायम राहिल.’ यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, कर्नाटकचे सहकार मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, खासदार प्रभाकर कोरे, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार जयंत पाटील, हसन मुश्रीफ माजी मंत्री विनय कोरे, रावसाहेब पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, सतेज पाटील, संध्याताई कुपेकर,अमल महाडीक, गणेश हुक्केरी, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, काकासो पाटील, वीरकुमार पाटील, हाफिज धत्तुरे, गणपतराव पाटील, संजय मंडलिक, प्रकाश मोरे, सुनिल पाटील, मदन कारंडे, राहुल आवाडे, स्वप्निल पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन पंडीत कंदले व अशोक केसरकर यांनी केले. आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले यांनी मानलेचौकट

आवाडे आणि शेट्टी आता एकत्र

कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पवार आणि आवाडे परिवारात असलेल्या ऋणानुबंधाचा उल्लेख करत शरद पवार यांच्यामुळेच या परिसराचा प्रामुख्याने सहकाराचा कायापालट झाला असल्याचे सांगितले.जवाहरच्या उभारणीपासूनचा आढावा घेताना राजकीय कुरघोड्यांचाही समाचार घेतला. सध्या साखर कारखाने आणि ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावरुन खासदार राजू शेट्टी यांना घेरु नका असा सल्ला देताना आवाडे आणि शेट्टी एकत्र आल्याचे सांगितले. उसाचा दर आम्हीच ठरवला असता, पण तो सर्व संमतीने व्हावा ही आमची अपेक्षा आहे. केवळ एफआरपीवर शेतकरी समाधानी होणार नसून त्यासाठी मार्ग काढावा अशीही अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसच्या जिल्ह्यासह प्रदेश नेतृत्त्वावर टीका करताना पक्षाकडून केल्या जात असलेल्या गळचेपीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता लपून छपून नाही तर कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून खुल्लमखुल्ला राजकारण करणार असल्याचे सांगताना आवाडे आणि शेट्टी एकच असल्याचे उघडपणे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल असोसिएशनचे उद्या वार्षिक अधिवेशन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे दोन दिवशीय वार्षिक अधिवेशन शनिवारी (दि. ४ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. हॉटेल सयाजी येथे सायंकाळी साडेसात वाजता कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (कराड) मानद कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. मेडिकल असो​सिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे यांनी ही माहिती दिली.

डॉ. शिंदे म्हणाले, ​‘थिंक ग्लोबली...अॅक्ट लोकली या संकल्पनेवर अधिवेशनात चर्चा होणार आहेत. दोन दिवसांच्या अधिवेशन काळात डॉ. साईप्रसाद, डॉ. सचिन पाटील, डॉ. अनिल जाधव हे अत्यावश्यक सेवा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. एल. व्यंकटकृष्णन हे पोट​विकाराबाबत उच्चश्रेणीतील उपचारांची माहिती देणार आहेत. डॉ. हरीश शेट्टी हे उपचारांसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचे विवेचन करणार आहेत. डॉ. सूरज पवार, डॉ. चेतन देशमुख, डॉ. पंकज चतुर्वेदी, डॉ. संतोष प्रभू, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, डॉ. राजेंद्र चव्हाण,डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ.राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार आहे.’

असो​सिएशनचे मानद सचिव डॉ. संदीप साळोखे, अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. सूरज पवार, स​चिव डॉ. साई प्रसाद, सचिव डॉ. सरोज शिंदे, डॉ. नीता नरके, डॉ. गीता पिल्ले, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रतिमा खरे यांना चार सुवर्ण

$
0
0



कोल्हापूर : नांदेड येथे झालेल्या चौथ्या नॅशनल मास्टर्स जलतरण स्पर्धेत डॉ. प्रतिभा खरे यांनी चार सुवर्ण,एक रौप्य अशी पाच पदके पटकावली. त्यांनी ५० व १०० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मिडले, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, २०० मीटर रिले या शर्यतीत भाग घेतला. त्या सागर पाटील जलतरण तलावावर सराव करतात. कोल्हापूर मास्टर अॅक्वॅटिक स्विमर्स असोसिएशनच्या त्या खेळाडू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या विकासाचेद्वार खुले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा नवीन प्रादेशिक विकास योजनेला गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामध्ये नवीन पाच एमआयडीसी, कोल्हापूर व इचकरंजी या दोन शहरांसाठीचे नवीन रिंगरोड आणि दोन रेल्वेमार्गांचा अंतर्भाव केल्याने जिल्ह्याच्या विकासाचे नवीन द्वार खुले झाले आहे. या आराखड्यामध्ये वीस नवीन विकास केंद्रे निश्चित केली आहेत. प्रमुख तालुका रस्त्यांचे रुंदीकरण, सहा रस्त्यांचे चौपदरीकरण, चार ट्रान्स्पोर्ट हब, शहराबाहेर वाहनतळ अशा विविध सुविधांचे नियोजन आराखड्यामध्ये करण्यात आले आहे. मात्र, यासाठी तब्बल साडेपाच हजार हरकती आल्याने त्याची सुनावणी व ‘सरकारी’ गतीमुळे विकास आराखडा मंजुरीचा प्रवास बराच लांबला होता.

२० विकास केंद्रात १२४ गावांचा समावेश

छोट्या गावातून मोठ्या गावाकडे वाटचाल करणाऱ्या १२४ गावांची २० विकास केंद्रात विभागणी प्रादेशिक आराखड्यात केली आहे. या गावाचे झोनिंग केले असून पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये गावठाणाची हद्द २०० मीटरवरून १५०० मीटर केली आहे. शेतामध्ये उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शेती क्षेत्रात मात्र इमारती बांधण्यास परवानगी नाकारली आहे. कोल्हापूर शहराची वाढ उभी होत असताना शहराजवळील गांधीनगर, वळिवडे, उचगाव, सरनोबतवाडी, मुडशिंगी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, निगवे दुमाला, वाशी, कंदलगाव, पाचगाव, मोरेवाडी, गिरगाव, कळंबा, बालिंगे, शिंगणापूर, नागदेवाडी, हणमंतवाडी, चिखली, रजपूतवाडी, आंबेवाडी, भुये, भुयेवाडी, शिये या गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

बेळगाव विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांचे रूंदीकरण

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी तालुके येतात. या भागातील नागरिकांना व उद्योगांना जलद विमान सेवेची गरज लक्षात घेता बेळगाव विमानतळ सोयीचे ठरते. त्यामुळे बेळगावकडे जाणाऱ्या प्रमुख तालुका मार्गांवरील रस्त्यांचे रूंदीकरणाची सूचना करण्यात आली होती.

कोल्हापूर-रत्नागिरीसह सहा रस्त्यांचे चौपदरीकरण

मुंबई-बेंगळुरू रस्त्याला संलग्न असलेल्या सहा रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर ते गगनबवडा, देवगड ते निपाणी, सावंतवाडी ते संकेश्वर, वेंगुर्ला ते बेळगाव, बोरपाडळे ते इचलकरंजी या रस्त्यांचा समावेश आहे. सहा मार्गांवरील कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांची लांबी ३४३ किलोमीटर इतकी आहे.

चार ठिकाणी ट्रान्स्पोर्ट हब

शहराला जोडणारा चौपदरी व नियोजित सहापदरी रस्त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या रस्त्यांवर मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे. शहरातील बाजारपेठा या गावठाणात असल्याने रस्ते अरूंद आहेत. मालाची ने-आण करताना वाहतुकीची कोंडी होते. मालवाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन शहराबाहेर अंबप (ता. हातकणंगले), विकासवाडी (ता. कागल), केर्ले (ता. करवीर), हातकणंगले या ठिकाणी ट्रान्स्पोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या कामाची जबाबदारी कोल्हापूर महापालिकेवर टाकली आहे.

कागल ते वारणापूल महामार्गावर १० मीटर सर्व्हिस रोड

मुंबई-बेंगळुर महामार्गावर वारणा पूल ते कागल हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या हा रस्ता चौपदरी असून, लवकरच सहापदरी रस्ता होणार आहे. या मार्गावर औद्योगिक वसाहती, बाजारपेठा, शोरूमची उलाढाल वाढली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यांवर मालाची चढउतार केली जाते. त्यामुळे दोन्ही रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती. या अडचणी लक्षात घेऊन किणीजवळील वारणा पूल ते कागल या मागावर दोन्ही बाजूला १० मीटर रूंदीचा सर्व्हिस रोड करण्याचा प्रस्ताव केला होता.

धार्मिक स्थळांना जोडणारे २३ रस्ते होणार दुपदरी

जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना जोडणारे २३ रस्ते दुपदरी होणार आहेत. या रस्त्यांची लांबी १६६ किलोमीटर आहे. उदगिरी, जोतिबा, ख्रिदापूर, नृसिंहवाडी, रामलिंग धुळोबा, बाहुबली, खोची, अंबप दत्त मंदिर, मनपाडळे, पळसंबे, बोरबेट, वाघापूर, निष्पण (ता. भुदरगड), नरतवडे, काळभैरी गडहिंग्लज, बहिरेश्वर (करवीर), सावर्डे (ता. कागल) या गावांतील धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

नऊ ​ठिकाणी वाहनतळ व भक्त निवास उभारणार

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील वाहतुकीवर ताण येतो. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी वाहनतळ व भक्त निवास उभारण्याचा प्रस्ताव केला आहे. शिये फाटा, शिरोली, उचगाव, कळंबा, वाशी नाका, फुलेवाडी खांडसरी, चिखली वडणगे फाटा, भुये भुयेवाडी या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची सूचना आहे.

कोल्हापूरबाहेरून रिंगरोड

जाजल पेट्रोल पंप कणेरी, कोगील खुर्द, गिरगाव, नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडित्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपिरे, यवलूज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगाव, हेर्ले, रूकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते जाजल पेट्रोल पंप

इचलकरंजी रिंगरोड

हुपरी, रेंदाळ, इंगळी, रूई, कबनूर, गंगानगर, यड्राव, जांभळी, टाकवडे, अब्दुललाट, रांगोळी, हुपरी.

कराड-बेळगाव रेल्वेमार्ग

कराड ते बेळगाव रेल्वेमार्ग कराड व्हाया मिरज, कोल्हापूर, कोल्हापूर व्हाया मिरज बेळगाव असा रेल्वे साधारण ८० ते १३० किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. कराड, तांबवे, इस्लामपूर, वाळवा, आष्टा, दूधगाव, नेज, इचलकरंजी, हुपरी, कागल, आडी, कणंगला, संकेश्वर, हलकर्णी, दड्डी, सुतगुट्टी, बेळगाव असा नियोजित मार्ग आहे. तसेच कोल्हापूर-वैभववाडी हा ७४ किलोमीटरचा कोकण रेल्वेला जोडण्याचा मार्ग आहे. या नवीन रेल्वेमार्ग २०१६-१७ मध्ये मंजूर झाला आहे. रेल्वेमार्गाचा कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतींना फायदा होणार आहे. याचबरोबर कोल्हापूर, कराड, पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर अशी लोकल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

चौकट...

कसा झाला आराखडा

कोल्हापूरच्या पुढील वीस वर्षांच्या विकासाचा साकल्याने विचार करून विविध आठ अभ्यास गटांनी हा विकास आराखडा सादर केला आहे. सन १९७८ ला कोल्हापूर इचलकरंजी असा पहिला प्रादेशिक आराखडा तयार केला. यामध्ये कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी या संकुलांचा समावेश होता. २३ फेब्रुवारी २०११ ला कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळ स्थापन करण्यात आले. यामध्ये सन २०३६ साली कोल्हापूर प्रदेशाची प्रस्तावित लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून दळणवळण, प्रादेशिक उद्यान, औद्योगिक विकासासाठी नवीन प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र, लोकसंख्या वाढीच्यादृष्टीने नागरी संकुलांचा विकास, ब्ल्यू लाइन, रेड लाइन सर्व्हे या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून समिती​ने नवा आराखडा तयार केला. प्रादेशिक नियोजन मंडळामध्ये लोकप्रतिनिधींसह २१ सदस्य होते. शिवाय, आठ अभ्यास गट ​समित्या होत्या. विभागीय आयुक्त, जिल्हा​धिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व सुमारे शंभरहून अधिक मान्यवरांनी विकास आराखडा तयार केला.

विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे

१ पर्यावरण संरक्षण ः पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी प्रादेशिक उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे. प्रादेशिक आराखड्यामध्ये १९:५ पेक्षा जास्त चढ-उतार असलेल्या जमिनींवर प्रादेशिक उद्यान प्रस्तावित करण्यात आले आहे.

२ नवीन एमआयडीसी ः औद्योगिक विकासाच्यादृष्टीने जिल्ह्यात सध्या ६ एमआयडीसी क्षेत्रे आहेत. आणखी ५ ठिकाणी नव्याने एमआयडीसी क्षेत्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

३ नागरी संकुल ः नागरी विकास ज्याठिकाणी वेगाने आहे अशा १४ ठिकाणांचा सूक्ष्म विकास आराखडा तयार केला आहे. सर्व्हे नंबरनिहाय यलो झोन निश्चित केले आहेत. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल आणि गडहिंग्लज याठिकाणी नागरी संकुल प्रस्तावित केले आहे.

४ नागरी विकास केंद्रे ः हुपरी, कोडोली, हातकणंगले येथे ग्रामीण विकास संकुले प्रस्तावित केली आहेत. शाहूवाडी, गगनबावडा, गारगोटी, आजरा, राधानगरी, चंदगड येथे नागरी विकास केंद्रे, बांबवडे, कुंभोज, भादोले, अब्दुललाट, दानोळी, उत्तूर येथे नागरी विकास केंद्रे प्रस्तावित आहेत.

५ बांधकाम परवाना ः पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावठाणापासून ७५० मीटर तर पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावठाणांपासून १५०० मीटर आणि इकोसेन्सिटीव्ह झोनपासून २०० मीटर निवासी घरासाठी मान्यता प्रस्तावित केली आहे.

……………………………

चौकट...

साडेपाच हजार हरकती

कोल्हापूरच्या विकासासाठी तयार केलेला आराखडा हा प्रथम हरकती व सूचनांसाठी जनतेसमोर ठेवण्यात आला होता. जनतेकडून यासंदर्भात ५ हजार ३९० हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यामधील सर्वात जास्त हरकती या रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबतच्या होत्या. यामध्ये अनेक मोठ्या गावांमध्ये तसेच १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये बायपास रस्ते सुचविण्यात आले होते. कोल्हापूर हा प्रगतशील जिल्हा असल्याने भविष्यातील गरज ओळखून शासकीय नियमाप्रमाणे राज्य महामार्गासाठी ४५ मीटर आणि राष्ट्रीय महामार्गासाठी ६० मीटर रुंदी ठेवण्यात आली आहे.

………………

चौकट

रहिवाशी क्षेत्रात यंत्रमागांसाठी परवानगी

इचलकरंजी शहरात रहिवासी क्षेत्रामध्ये अनेक यंत्रमाग आहेत. त्याच पद्धतीने नवीन रहिवासी क्षेत्रामध्येही यंत्रमाग व्यवसाय करण्यासाठीची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली होती. मात्र, वस्त्रोद्योगापुरताच हा निर्णय राहणार असून, इचलकरंजीतील नवीन वसाहतीत यंत्रमागाला परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समितीच्या कारभाराची चौकशी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पुणे

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अंबाबाई मंदिरासह सुमारे तीन हजार देवस्थाने आहेत. समितीनेच अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले असून समितीची चौकशी करावी,’ असा आरोप कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पुजाऱ्यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी गजानन मुनिश्वर, मकरंद मुनिश्वर, गजानन नारायण मुनिश्वर आदी उपस्थित होते.

मुनिश्वर म्हणाले, ‘देवस्थान समितीकडे वीस हजार एकर इनाम जमीन आहे. मंदिरांची पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रमांना लागणारी सामग्री आणि खर्च त्यातून करणे अपेक्षित आहे. शिवाय समितीला अंबाबाई मंदिरातूनही आर्थिक उत्पन्न मिळते, त्यामुळे समितीने मिळणारे एकूण उत्पन्न आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा. त्यांनी प्रथम स्वत:चा कारभार पारदर्शी करावा. समितीनेच अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले आहे. २०१२ साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात २२ अतिक्रमणे असून, ती काढण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत समितीने कोणतीच कारवाई केलेली नाही’, असा आरोपही त्यांनी केला.

एक आठवडा पूजेचा मान

‘मूळ तीन घराण्यांतील ५४ कुटुंबांना पूजेचा हक्क आहे. त्यामुळे वर्षातील एक आठवडा एका कुटुंबाकडे पूजेचा हक्क येतो. या काळातील उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये आहे. पूजेचा ठरवून दिलेला आठवडा संपल्यानंतर इतर कोणतेही उत्पन्न मिळत नाही’ असा दावा गजानन मुनीश्वर यांनी केला.

‘आद्य महालक्ष्मी’

‘करवीर निवासीनी ही आद्य महालक्ष्मी आहे. तिला काही भाविक अंबाबाई म्हणत असतील, तर आमचा विरोध नाही. ती विष्णू पत्नी लक्ष्मी नाही, तर आद्य महालक्ष्मी आहे, सर्वांची माता आहे. तिच्या हातात म्हाळूंग हे फळ आहे. शंकराची पत्नीही महालक्ष्मीत सामावलेली आहे. या बाबतचा वाद आम्ही कधीच निर्माण केला नाही. शाहूकालीन कागदपत्रांमध्येही महालक्ष्मी, असाच उल्लेख आहे. या वादाशी आमचा काहीही संबध नाही’, अशी भूमिका गजानन नारायण मुनीश्वर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रादेशिक विकास योजना मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या प्रादेशिक विकास योजनेला तब्बल ३५ वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे कोल्हापूरच्या विकासाला भरारी घेण्यास सुवर्णसंधी मिळणार आहे. रस्ते, विमानतळ, ट्रान्सपोर्ट हब, शहरात चार उड्डाणपूल, रिंगरोड या पायाभूत सुविधांसह नवीन एमआयडीसी व १२४ गावांचा समावेश असलेल्या २० विकास केंद्रांचा विकास योजनेत समावेश आहे. गावठाण क्षेत्रामध्ये ७५० ते १५०० मीटरची वाढ केल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.

कोल्हापूर-इचलकरंजी असा पहिला प्रादेशिक विकास आराखडा १९७८ मध्ये तयार करण्यात आला होता. यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी या भागाचा समावेश होता. २३ फेब्रुवारी २०११मध्ये कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाने २०३६ सालाची कोल्हापूर जिल्ह्याची प्रस्तावित लोकसंख्या नजरेसमोर ठेऊन विकास योजनेचा आराखडा तयार केला. नियोजन मंडळात लोकप्रतिनिधींसह २१ सदस्यांचा समावेश होता. यासाठी आठ अभ्यास समित्यांची स्थापना करण्यात आली होती. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसह १०० जणांनी विकास आराखडा तयार केला.

राज्य सरकारने आराखडा मंजुरीपूर्वी नागरिकांच्या हरकती, सूचना मागविल्या होत्या. नागरिकांकडून ५ हजार ३९० हरकती, सूचना आल्या होत्या. रस्ते, नाग​री वसाहती, औद्योगिक वसाहती, डोंगरी भागांचा विकास, वीस संकुले यावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. असोसिएशन ऑफ अर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सने विभागीय आयुक्त, प्रधान स​चिवांकडे आराखड्याबाबत तक्रारी, सूचना दिल्या होत्या. या सर्व हरकती, सूचनांचा विचार करून राज्य सरकारकडे सुधारित प्रादेशिक विकास योजनेचा आराखडा पाठविण्यात आला होता.

काय आहे आराखड्यात?

शहरीकरणामुळे मोठ्या गावांकडे वाटचाल करणाऱ्या १२४ गावांसाठी २० विकास केंद्रे प्रस्तावित आहेत. पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये गावठाणाची हद्द २०० मीटरवरुन १५०० मीटर करण्यात आली आहे. या गावामंध्ये उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूर शहराजवळील २४ गावांना याचा लाभ होणार आहे. योजनेमध्ये पायाभूत सुविधावर भर देण्यात आला आहे. बेळगाव विमानतळाला जोडणाऱ्या आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यातील रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. कोल्हापूर - रत्नागिरीसह जिल्ह्यातील बोरपाडळे, इचलकरंजी, कोल्हापूर- गगनबावडा, देवगड-निपाणी, सावंतवाडी-आंबोली-आजरा, गडहिंग्लज, संकेश्वर, वेगुर्ला, चंदगड, बेळगाव याजडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. विकास योजनेत जिल्ह्यातील ३४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

ट्रान्स्पोर्ट हब, भक्त निवास

अंबप (ता. हातकणंगले), विकासवाडी (ता. कागल), केर्ले (ता. करवीर) आणि हातकणंगले येथे अवजड माल वाहतुकीच्या वाहनांसाठी ट्रान्सपोर्ट हब साकारणार आहे. कागल ते वारणापूल मार्गावर १० मीटर सर्व्हिस रोड तर जिल्ह्यातील २३ धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते दुपदरी करण्यात येणार आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईला येणाऱ्या भावकांसाठी शहराजवळ असलेल्या गावांमध्ये नऊ ठिकाणी वाहनतळ व भक्त निवास उभारण्याचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहराबाहेरून रिंगरोड तर कराड-बेळगाव नियोजित रेल्वमार्ग उभारण्याची सूचना केली आहे. कोल्हापूर-वैभववाडी हा ७४ किलोमीटरचा मार्ग कोकणरेल्वेला जोडण्याचा समावेश विकास योजनेत केला आहे.

शहरात उड्डाणपूल

कोल्हापूर शहरातील गर्दी टाळण्यासाठी शिवाजी पूल ते ताराराणी चौक, कसबा बावडा मेनरोड, सायबर चौक ते राजारामपुरी, संभाजीनगर ते मिरजकर तिकटी,रंकाळा टॉवर ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाण पूल उभारण्याची सूचना अभ्यासगटाने केली आहे.

पाच नवीन एमआयडीसी

पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी प्रादेशिक उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे. उद्योग व व्यवसायाला चालना देण्यासाठी पाच ठिकाणी नव्याने एमआयडीसी क्षेत्रांचा प्रस्ताव दिला आहे. १४ ठिकाणी नागरी संकुल, तसेच ग्रामीण भागात नागरी विकास केंद्रांची उभारणी होणार आहे. पाच हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावठाणापासून ७५० मीटर तर पाच हजारापेक्षा जास्त गावठाणांपासून १५०० मीटर तर इको सेन्सेटिव्ह झोनपासून २० मीटर अंतरावर निवासी घरांसाठी मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल.


प्रादेशिक विकास योजनेला सहा महिने आधी मंजुरी अपेक्षित आहेत. मात्र अनेक संस्था, नागरिकांचे काही आक्षेप होते. त्यांचे आक्षेप, सूचनांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारणांनंतर आराखडा मंजूर केला. आराखड्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल. मंजूर झालेल्याआराखड्यावरील आक्षेपांचाही विचार केला जाईल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पूलप्रश्नी अर्धमुंडन आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी गुरुवारी अर्धमुंडन आंदोलन करून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने यावेळी शंखध्वनी करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.

केंद्रीय पुरातत्त्व कायद्यातील सुधारण्याच्या प्रस्तावाला हिवाळी अधिवेशनात लोकसभा व विधानसभा अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतीची कायद्याच्या प्रस्तावावर सही होणार आहे. त्यानंतर पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. या कायद्याला मंत्र‌िमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळाल्याचे फलक लावून ऑक्टोबर महिन्यात बांधकाम सुरू होणार अशी घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात ऑक्टोबर बांधकाम सुरू न झाल्याने केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणून पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी मुस्ल‌िम ब्रिगेडचे फिरोजखान उस्ताद यांनी पर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अर्धमुंडण करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पुलाचे काम अर्धवट झाल्याने अर्धमुंडण करण्यात आले असे उस्ताद यांनी सांगितले. यावेळी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून कार्यकर्त्यांनी शंखध्वनी केला.

यावेळी पुलाचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अशोक पोवार, अजित सासने, कॉ. चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, किशोर घाटगे,संभाजीराव जगदाळे, अॅड पंडितराव सडोलीकर, अशोक रामचंदाणी, हर्षल सुर्वे, प्रसाद जाधव, सुभाष देसाई, विजय घाटगे, अॅड प्रकाश मोरे, अॅड विवेक घाटगे, बाबा महाडिक, रामभाऊ कोळेकर, राजेंद्र पाटील, महादेव पाटील, जयदीप शेळके, चंद्रकांत बराले, श्रीकांत भोसले, महेश जाधव, गौरव लांडगे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक दरोडा: राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत

$
0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

महाराष्ट्र बँकेच्या गाडीवर पडलेल्या ७० लाखाच्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आली आहे. मासाळ यांचा या दरोड्याच्या कटात सहभाग असल्याचं समोर आलं आहे.

काल रात्री उशिरा मासाळ यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रामेश्वर मासाळ हा जिल्ह्यात अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. बँकेच्या पैशाची संगनमतानं लूट झाल्यानंतर दरोड्याचा बनाव रचला गेला होता. या कारणावरून बँक व्यवस्थापक अमोल भोसले आणि दरोड्यातील भाऊसाहेब कोळेकर याना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. बँक व्यवस्थापक अमोल भोसले याच्याशी मासाळचे जवळचे संबंध होते. यातूनच ही रोकड लुटण्याचा व तो दरोडा असल्याचं भासवण्याचा कट रचण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींकडून ३१ लाखाची रोकड जप्त केली असून रात्री उशिरा या दरोड्यातील उर्वरित ३ आरोपीनंही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून लुटीतील उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदिक डॉक्टरचीजतमध्ये आत्महत्या

$
0
0

सांगली :
जत येथील डॉ. श्रीनिवास पांडुरंग माने (वय ३१) यांनी सातारा रोडवरील स्वतःच्या क्लिनिकमध्ये पंख्याला बेडसीटने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एमडी आयुर्वेदिक असलेल्या डॉ. माने दुपारी डॉ. पत्नी जेवणासाठी घरी गेल्यानंतर आपण आराम करीत असल्याचे भावाला सांगून क्लिनिकमधील रुममध्ये गेले होते. काही वेळाने भाऊ त्यांना उठविण्यासाठी गेल्यांनतर त्यांनी गळफास लावून घेतल्याचे समोर आले.
डॉ. श्रीनिवास मूळचे येळवी (ता. जत) येथील रहिवाशी होते. गावचे माजी पोलिस पाटील पांडुरंग माने यांचे चिरंजीव आणि जतचे माजी सभापती आर. के. माने यांचे पुतणे म्हणून परिचित होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर आर. के. माने यांनीच श्रीनिवास यांचे संगोपन केले होते. अवघ्या वर्षाभरापूर्वीच लग्न झालेल्या माने यांनी डॉक्टर पत्नीबरोबर चार महिन्यांपूर्वी स्वतःचे क्लिनिक सुरू केले होते. शुक्रवारी दुपारी पत्नी जेवण करण्यासाठी घरी गेल्यानंतर डॉ. श्रीनिवास यांनी बाजूच्या मेडिकलमधील आपल्या भावास आपण आतील रूममध्ये विश्रांती घेत असल्याचे सांगितले होते. डॉ. माने यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हाल’शुगरकडून ३१५१ ची पहिली उचल, महाराष्ट्रातील दराकडे लक्षकर्नाटकातील ऊसदराचे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याकडून पहिली उचल ३१५१ रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्याबरोबरच संकेश्वरच्या हिरा शुगर्सनेही पहिली उचल तीन हजार रूपये जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागाबरोबरच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसमोर दराचे आव्हान असणार आहे. दरासाठी सुरू असलेले आंदोलन आणि कारखान्यांची सावध भूमिका या कात्रीत सध्या शेतकरी अडकला आहे. मात्र हा तिढा लवकरात लवकर सुटण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
हाल शुगरच्या दराची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिली. सीमाभागातील शेतकरी, सभासदांनी अधिकाधिक ऊस हालशुगरला द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले, ‘हालशुगरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०१७-१८ सालच्या गळीत हंगामासाठी पहिली उचल ३१५१ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयीचा ठरावही करण्यात आला.’
दरम्यान, अद्याप महाराष्ट्रात दराचा तोडगा जाहीर नसल्याने यापूर्वीच सीमाभागातील ऊस कर्नाटकात जात आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कर्नाटकात लाखभर टन ऊस गेल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दराअभावी झालेली ठप्प यंत्रणा आणि जाहीर झालेली हालशुगरची उचल यामुळे सीमाभागातील ऊस हालशुगरकडे जाण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ​ राजू शेट्टी म्हणाले, हालशुगरची रिकव्हरी ११.१६ इतकी आहे. त्यांची एफआरपीही तोडणी खर्च वजा जाता २४९५ इतकी बसते. म्हणजेच त्यांनी एफआरपी अधिक ६५६ रुपये दिले आहेत. ही चांगली गोष्ट असली तरी आमची मागणी ३४०० रुपयांची आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत आम्ही ऊस परिषदेच्या धोरणांवरच ठाम रहाणार आहे. परंतु, महाराष्ट्रातील कारखान्यांची सरासरी रिकव्हरी १२.५ असून काहींची १३ आणि १३.४० इतकी आहे. त्यामुळे कर्नाटकातील कारखान्याला एवढा दर द्यायला जमत असेल तर त्यामानाने आम्ही मागितलेली ३४०० उचल फारच कमी आहे आणि ती द्यायला काहीच हरकत नाही.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images