Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ऊसदरप्रश्नी तोडग्यासाठी कारखानदारांशी चर्चेला तयार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही सोळावी ऊस परिषद आहे. परिषदेत सध्याचा साखरेचा दर, उपलब्ध साखर, शिल्लक साखर आणि निघणारी एफआरपी यावर चर्चा होते. कुठलाही साखर कारखाना मोडून आम्हाला दर द्या, अशी आमची मागणी कधीच नाही. परंतु आमची हक्काची मागणी आम्ही करतो, यासाठी आम्हालाच श्रेय द्या, अशीही भूमिका नाही. त्यामुळे ऊस परिषदेपूर्वी ज्या कारखान्यांना चर्चा करुन ऊसदरावर तोडगा काढायचा आहे, त्यांच्याशी चर्चेचची तयारी आहे,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कारखानदारांचा तोडगा ऊस परिषदेत मांडून तो मान्य झाल्यास त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही करु, असेही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद २८ ऑक्टोबरला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी ‘मटा’ शी बोलत होते.

ऊस दर नियंत्रण समितीत आम्ही असल्यामुळे साखर कारखान्यांना शिस्त लागत आहे, असे स्पष्ट करुन शेट्टी म्हणाले, ‘जयसिंगपुरातील विक्रमसिंह मैदानावर भरणारी ऊस परिषद गेल्या सोळा वर्षांत ७५० ऊस दरावरून ३३५० ऊसदरापर्यंत पोहचली आहे. भविष्यातही परिषद माझ्या हयातीनंतरही अशीच भरेल. त्यामुळे मला ऊस दर ठरवण्याचा अधिकार नाही, असे म्हणणाऱ्यांनी दरवर्षी या परिषदेला येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहता आपणही शेतकऱ्यांचा असाच विश्वास कसा संपादन करता येईल याबाबत विचार करावा. मुंबईतील चेंगराचेंगरीतील मृतांना पाच लाख रुपये आणि औषध फवारताना मेलेल्या शेतकऱ्यांना केवळ दोन लाख रुपये हा शेतकऱ्यांवरील अन्यायच आहे. हे सरकार शेतकऱ्यांसाठी मारकच आहे असेच म्हणावे लागेल. रासायनिक खते, बियाणे आणि पाण्यावरही कर भरायला लावून रसातळाला गेलेल्या शेतकऱ्याला आणखी मारण्याचा हा प्रकार आहे. ८० टक्के शेतीप्रधान असणाऱ्या देशातल्या मालक शेतकऱ्याला कायमस्वरुपी गुलाम बनवण्याचा हा उद्योग आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेच्या बँक खात्यातील सहा हजार रुपये ऑनलाइन लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली आहे. याबाबत शुभांगी पांडुरंग पाटील (वय ३७, रा. राजेंद्रनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शुभांगी पाटील यांच्या मोबाइलवर सोमवारी सकाळी एक मेसेज आला. नामांकित कंपनीत नोकरी हवी असल्यास दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या, असा मेसेज वाचल्यानंतर पाटील यांनी संकेतस्थळावरील माहिती वाचली. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी काही रक्कम ऑनलाइन भरावी लागेल असा मेसेज आला. मंगळवारी पुन्हा पाटील यांच्या मोबाइलवर फोन आला. नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी एका बँक खात्यात केवळ ९९ रुपये भरण्यास सांगितले. रक्कम कमी असल्याने पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने ९९ रुपये भरले. यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ५ हजार, ६०० रुपये कमी झाल्याचा मेसेज मोबाइलवर आला. आलेल्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र तो नंबर बंद लागत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुभांगी पाटील यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधिस्थळाची विटंबना

$
0
0


उदयसिंह पाटील/अमित गद्रे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील टाउन हॉल परिसरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळाची विटंबना झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या परिसरातून जाणाऱ्या सजग नागरिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रस्तुत प्रतिनिधीच्या निदर्शनास हा प्रकार आणला. या भागातील तरुणांनी चक्क समाधिस्थळावरच मद्यपान करत धिंगाणा घालायला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले असून समाधिस्थळाचे पावित्र्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी करवीरवासीयांच्या भावी पिढ्यांचं जगणं सुकर करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्याच करवीरवासीयांमधील काही नतद्रष्टांनी या ‘लोकराजा’च्या समाधिस्थळाला ‘ओपन बार’ बनवले असून, त्याचे पावित्र्यच नष्ट करून टाकले आहे. समाधिस्थळाचे दर्शन घेऊन शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने साकारण्यात येत असलेल्या समाधिस्थळाचा मद्यपींकडून वापर करण्याचा प्रकार सर्व कोल्हापूरवासीयांसाठीच लाजिरवाणा आहे. दोन वर्षांपासून संथगतीने काम सुरू आहे. समाधीस्थळी लाइट नसल्याने महापालिकेनेही जणू अशा ‘उद्योगां’ना चालनाच दिली आहे.

आपली समाधी टाउन हॉल परिसरातील नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरातच व्हावी, अशी इच्छा खुद्द राजर्षी शाहू महाराजांनी मृत्युपत्रात व्यक्त केली होती. त्यानुसार ही समाधी साकारली. शाहूप्रेमींनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने समाधिस्थळासाठी प्रथम ७५ लाख रुपयांची तरतूद केली. त्यातून २४ जुलै २०१५ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. चबुतरा, परिसराचे सुशोभिकरण, म्युझियम अशी कामे त्यातून करण्यात येणार आहेत. त्यातील चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाला आले असून, त्यावर बसविण्यात येणाऱ्या मेघडंबरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्या कामाबरोबर या परिसरासाठीच्या संरक्षण भिंतीसाठी काहीही प्रयोजन केलेले नाही.

कोल्हापूरच्या राजाची समाधी आहे, तिचे पावित्र्य जपले पाहिजे, याची खबरदारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही घेतली नसल्याचे समाधी परिसरात गेल्यानंतर दिसून येते. या बांधकामाजवळ नेमके काम कशाचे सुरू आहे, याचा साधा फलकही नाही. दिवसभर या परिसरात वर्दळ असली तरी रात्री हा परिसर निर्मनुष्य होतो. त्यामुळे समाधिस्थळाचे बांधकाम अंधारात राहू नये म्हणून तिथे लाइटची सोय करण्यात आलेली नाही. मद्यपींनी आपण कोणता गुन्हा करतो आहोत, याचे भान न ठेवता चक्क समाधिस्थळावरच ठाण मांडायला सुरुवात केल्याने समाधिस्थळाची सर्रास विटंबना सुरू झाली आहे. समाधीच्या परिसरात बाटल्यांचा व प्लास्टिकच्या ग्लासचा खच पडलेला आहे. काही बाटल्या फुटलेल्या अवस्थेतही आहेत. मंगळवारी दुपारी समाधिस्थळाच्या चबुतऱ्यावर मद्याच्या बाटल्या आढळल्या.

आतापर्यंत सव्वा दोन कोटींचा निधी

दोन वर्षांत महापालिकेने स्वनिधीतून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामध्ये चबुतऱ्याबरोबर संरक्षक भिंतीचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचे काम लवकर झाले असते तर समाधिस्थळाचे पावित्र्य भंग पावले नसते. तिथे संरक्षक भिंत लवकर उभी राहत नसेल तर किमान त्या कामाभोवती बॅरिगेट्स उभारण्याचे काम तरी केले असते तर अशा नतद्रष्टांना अटकाव झाला असता; पण महापालिका प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने पाहिलेलेच नाही असेच यातून स्पष्ट दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक वाढले, सुविधांची वानवाच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

श्री अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर पर्यटकांनी कोल्हापुरात थांबून अन्य ठिकाणीही भेट द्यावी, पर्यटन करावे, असे होत नाही. ‘अतिथी देवो भव!,’ असे म्हटले जात असले तरी कोल्हापुरात पर्यटकांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत, हे त्यामागचे कारण आहे. कोल्हापुरात आल्यानंतर नेमके काय पाहायचे, असा प्रश्न पर्यटकांना पडतो. प्रशासनाकडून जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग पर्यटनासाठी सहज जावे, तशी आवड निर्माण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करावेत, असे अद्याप झालेले नाही. कोल्हापूर पर्यटन महोत्सवात पर्यटकांसाठी केलेल्या घोषणा आठवडाभरातच विरल्या.

पर्यटकांसाठी सुरक्षित पार्किंग, सवलतीच्या दरातील हॉटेल आणि भोजनाचे पॅकेज, शहर आणि परिसरातील पर्यटनाची ठिकाणे पाहण्यासाठी स्वतंत्र बस किंवा तत्सम व्यवस्था नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची काही रिसॉर्टही बंद आहेत. वाहतूक, हॉटेल, भोजन, पार्किंग व्यवस्थेत पर्यटकांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे एका दिवसापेक्षा जास्त वेळ न थांबता पर्यटक तातडीने कोकण किंवा कर्नाटकाकडे जाणे पसंत करतो.

विकासाच्या प्रक्रियेत पर्यटन हा केंद्रबिंदू मानून प्रयत्न अपेक्षित होते. मात्र पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांना हात झटकल्याने पर्यटनासाठी पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटक कोकण आणि कर्नाटककडे रवाना होत आहेत. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच हॉटेलिंग, वाहतूक व अन्य सर्व सेवा व्यवसायात असलेले घटकही बेफिकीर आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे शक्य आहे. मात्र त्याबाबत विचार आणि तातडीने अंमलबजावणी केली जात नसल्याने पर्यटक सु‌विधांच्या पातळीवर वाऱ्यावरच आहे. धार्मिक पर्यटनासह जिल्ह्यातील निसर्ग, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही समृद्ध आहे. मात्र सर्वंकष पर्यटन विकासासाठी ज्या ताकदीने मार्केटिंग होणे गरजेचे आहे, तेवढे होताना दिसत नाही. तापुरत्या आणि दीर्घकालीन उपयोजनांचा आराखडा अपेक्षित आहे.

श्री क्षेत्र शेगांव येथे पर्यटक पोहोचल्यानंतर शेगांव देवस्थानची बस भाविकांच्या सुविधांसाठी तैनात असते. तिरुपतीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना रेल्वेस्थानकाजवळ स्थानिक वाहतूक व्यवस्था सक्षम आहे. त्याच धर्तीवर कोल्हापुरात एसटी आणि रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांना श्री अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, रंकाळा, टाउन हॉल, चंद्रकांत मांडरे कलादालन, साठमारी, कुस्तीचे आखाडे, मर्दानी खेळ, पारंपरिक खेळांचा आनंद देता येणे शक्य आहे. या ठिकाणी जाण्यासाठी सवलतीच्या दरात वाहतूक व्यवस्थेचे पॅकेज नाही. पर्यटन विकासासाठी कोल्हापुरात मोठी संधी आहेत. मात्र पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांनी एकत्रितपणे विचार करणे अपेक्षित आहे.

वनवैभवाचा लाभ मिळणार कधी?

निसर्गाचा आनंद लुटण्यासाठीही पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था नाही. कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे ७० किलोमीटर अंतरावर वनवैभव आहे. कोकणाला जोडणारे चार घाट आहेत. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. मात्र आंबोली किंवा आंबा वगळता अन्य कुठेही निवासाची चांगली व्यवस्था नाही. पर्यटनाची अनेक चांगली स्थळे असूनही तेथे पर्यटक मुक्काम करू शकत नाहीत. कोल्हापूर शहरासह दाजीपूर, राधानगरी, पन्हाळा-पावनखिंड आदी ठिकाणीही पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र तेथे किमान काही मूलभूत सुविधा देणे अपेक्षित आहेत. दाजीपूर-राधानगरीत निवासाची व्यवस्था नाही. एमटीडीसीची राधानगरी, जोतिबा आणि गगनबावडा येथील रिसॉर्ट बंद आहेत. पर्यटकांना काय पाहायचे, हेच कळत नसल्याने केवळ जोतिबा आणि पन्हाळा ही दोनच ठिकाणे केली जातात. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे त्यांच्यापासून दूरच राहतात. प्रशिक्षित गाईडची सुविधा नाही. पर्यटकांसाठी एमटीडीसी आणि पर्यटनाचे नोंदणी करणाऱ्या संस्थांनी नाममात्र शुल्कात गाईड उपलब्ध करुन दिल्यास जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे पाहण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी आणि उपलब्ध असलेली पार्किंग व्यवस्था पाहता आणखी काही ठिकाणी वाहनतळ निर्माण करण्याची गरज आहे. गर्दीच्या काळात प्रायव्हेट हायस्कूल, राजाराम हायस्कूल, एमएलजी या शाळांची मैदाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

वाहतूकदारांची मानसिकता बदलायला हवी

ऑटो रिक्षा व्यावसायिक, यात्री निवासातील कर्मचाऱ्यांनी मानसिकतेती बदल गरजेचा आहे. कोल्हापुरी चप्पल, हॉटेलमधील सेवांचे दर पर्यटकांचा ओघ वाढला की दुप्पट केले जातात. पर्यटकांची ही फसवणूक थांबणे गरजेचे आहे. सीबीएस, रेल्वेस्थानकापासून अंबाबाई मंदिरापर्यंत तिप्पट आणि चौप्पट भाडे घेऊन भाविकांची फसवणूक केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे आदेश

$
0
0

इचलकरंजी

सर्वच खराब रस्त्यांचे तातडीने पॅचवर्कचे काम हाती घेण्याचे आदेश देतानाच रस्त्याची कामे ही नियम व अटीनुसार दर्जात्मक होतात की नाही याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिल्या. तसेच डांबरीकरणासाठी विशेष अनुदान मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीदरम्यान नगरसेवकच एकमेकांवर टीका करु लागल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून दुरुस्तीबाबत नगरपालिका प्रशासनाकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिक रस्त्यावर उतरुन प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा स्वामी यांनी मंगळवारी खराब रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात बैठक बोलविली होती. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, राजर्षि शाहू विकास आघाडीचे मदन कारंडे, रविंद्र माने, मदन झोरे, मनोज हिंगमिरे, संजय केंगार, युवराज माळी, भाऊसो आवळे, राजू आलासे, अमृता भोसले, जहाँगिर पटेकरी, संतोष शेळके, नगरअभियंता बापूसाहेब चौधरी, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांमयासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीलाच भाऊसो आवळे यांनी, वाढीव हद्दीत राबविण्यात आलेल्या भुयारी गटर योजनेमुळे रस्त्यांची दूरवस्था झाल्याचे सांगितले. तर मदन कारंडे यांनी, नगरपालिकेतील कामे नियम व अटीनुसार होत नसून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने कामांचा दर्जा निकृष्ट होत चालल्याचा आरोप केला. यावेळी सर्वच लोकप्रतिनिधींकडून आपल्याच भागातील कामाला प्राधान्य देण्यासाठी धडपड सुरु झाल्याने बैठकीत गोंधळ निर्माण होऊन त्यातूनच एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरु झाला. तर नगरअभियंता चौधरी यांनी रस्ता कामांसाठी निधीची गरज असल्याबद्दलचा तक्ता सादर केला. त्यावर उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी, नगरपालिकेकडे रस्ता कामांसाठी उपलब्ध निधी आणि कामांसाठी आवश्यक निधी या संदर्भात माहिती घेण्याची सूचना केली. त्यानंतरच कामाच्या निविदा काढाव्यात असा सल्ला दिला. तर चर्चेचा विषय अन्यत्र वळू लागल्याने रविंद्र माने यांनी अनावश्यक चर्चेपेक्षा मुख्य विषयावरच चर्चा करण्याची विनंती केली. अमृत भोसले यांनी गावभाग व मळे भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडेही प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी केली.

सुमारे दोन तास झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्षा स्वामी यांनी खराब रस्त्यांच्या पॅचवर्कचे काम सुरु तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले. तसेच डांबरीकरणासाठी विशेष अनुदान मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कोटी खर्चूनही वस्त्रनगरी कचऱ्यात

$
0
0

इचलकरंजी

नगरपालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शहरवासियांना बदल अपेक्षित होता, मात्र नागरी प्रश्नासंदर्भात चौफेर टीका होत असतानादेखील प्रशासनाला काहीच गांभीर्य नाही. स्वच्छतेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या पुण्याच्या भारत विकास ग्रुप (बिव्हीजी) यांच्याकडे शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला असला तरी शहरात घाणीचे साम्राज्य कायम आहे. कोंडाळे ओसंडून वाहत असून कचरा उठावाची मुख्य जबाबदारी सांभाळणारी कंपनीही हतबल होत असल्याचे दिसत आहे. वर्षाकाठी शहर स्वच्छतेसाठी तीन कोटी ७८ लाख नगरपालिकेच्या तिजोरीतूनच खर्च होणार आहेत याचा विसर मात्र सत्ताधारी आघाडीला पडलेला दिसत आहे.

वस्त्रनगरीतील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहेत. स्वच्छ व मुबलक पाणी, रस्ते आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात नगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली प्रशासन मिळकतधारकांकडून वर्षाकाठी लाखो रुपये वसुली करते. पण ही रक्कम जाते कुठे, हा संशोधनाचा विषय आहे. घनकचरा प्रकल्प विषयावर गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तक्रारी झाल्यानंतर काही अंशी प्रशासन जागे होते, पुन्हा मागे तसे पुढे या विभागाचा कारभार पहावयास मिळतो. वर्षाला कोट्यवधी रुपये या विभागावर खर्च करुनही नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यात नगरपालिकेला अपयश येत आहे.

दररोज सरासरी १७० ते १८० टन कचरा निर्माण होतो. हा कचरा उचलण्याचे उद्दिष्ट आजपर्यंत कुणीही यशस्वीपणे पेलू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी बचत गटांसह खासगी मक्तेदारांना शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला होता. परंतु समाधानकारक काम न झाल्याने ठेका रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. कचऱ्यातही अर्थ शोधण्याची संधी सत्ताधारी गटाने सोडली नाही. त्यातूनच भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली. विरोध झालाच तर तो दाबण्याची ताकदही यातून पुढे आली. शहरातील बहुचर्चित स्वच्छता व कचरा उठाव आजपर्यंत ठेकेदारामार्फत प्रभावीपणे राबविण्यात पूर्णत: अपयशी ठरलेल्या प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी कचरा उठावाचा ठेका पुण्याच्या ‘बीव्हीजी’ च्या हाती सोपविला आहे. या कंपनीने कचरा उठावाचे काम सुरु केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच या कंपनीची बनावगिरी उघड झाली. नगरपालिकेसोबत केलेल्या करारातील अटींचे कंपनीकडून पालन होत नसल्याने खुद्द सत्ताधारी नगरसेवकांनीच तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. तर कंपनीच्या कर्मचार्यांनी सुविधा व वेतनावरून कामबंद आंदोलन करून बीव्हीजीवर नाराजी व्यक्त केली.

घटांगाडीच्या माध्यमातून घरोघरी कचरा उठावाचे काम या कंपनीकडून होत असले तरी पुरेशी वाहने व मनुष्यबळाअभावी ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. करारानुसार कचरा उठावा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यास कंपनीला दंड ठोठावण्याचा अधिकार नगरपालिकेने आपल्याकडे राखून ठेवला आहे. परंतु याचे नियंत्रण कुणाकडे आहे, याबाबतची जबाबदारी प्रशासन झटकत आहे. एकमेकांकडे बोट दाखवून कंपनीच्या गैरकृत्यावर पांघरून घालण्याचा उद्योग सुरू आहे. कंपनीने कचरा उठावाचा ठेका हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी सुरु झाल्या. पण अद्याप एक रुपयाचाही दंड ठोठावण्याचे धाडस प्रशासनाकडून झालेले नाही. सत्ताधारी व प्रशासन यांचे हात ओले झाल्याने कितीही तक्रारी झाल्या तरी कंपनीवर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यातूनच ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा उद्योग स्पष्टपणे दिसून येतो.

चौकट

आरोग्याचा प्रश्न गंभीर

बिव्हीजी कंपनीला ठेका देण्यापूर्वी खासगी ठेकेदारामार्फत कचरा उठाव केला जात होता. १७० ते १८० टन दैनंदिन गोळा होणारा कचरा सांगली रोड वरील आसरानगर येथे टाकला जातो. केवळ कचरा वाहतुकीसाठी वर्षाला तीन कोटी ७८ लाख रुपये नागरिकांच्या कर रूपातून खर्च होत आहेत. गावभर कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. दिवाळीच्या सणामुळे यामध्ये अधिकच भर पडला आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे महत्वाचे असताना त्यावरील पर्याय शोधण्याऐवजी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीनी केवळ कचरा उठावाचा मध्यमार्ग काढून अर्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा खेळ अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा उठाव होत नसल्याने कोंडावळे भरुन वाहत असताना आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, याचे कोणतेही भान लोकप्रतिनिधी व प्रशासनाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरळगुंडी परिसरात टस्करचे दर्शन

$
0
0

गारगोटी

भुदरगड तालुक्यातील आरळगुंडीच्या शिवारात शेतकऱ्यांना टस्कर हत्तीचे दर्शन झाले. हत्तीने केलेल्या नुकसानीत दोघा शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरळगुंडी शिवारातील जनावारांच्या गोठ्यातून दूध काढून घरी येत असताना पांडुरंग मारुती पाटील यांच्या पत्नीला टस्कर उसाच्या शेतात जाताना दिसला. त्यांनी घरी येऊन ही माहिती दिली. दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या शिवाराच्या दिशेने गेले. ही माहिती समजताच सकाळी सात वाजता वनरक्षक अमोल चव्हाण व वनमजूर दत्तात्रय जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली असता त्यांना टस्करच्या पायाचे ठसे आढळून आले. हा टस्कर आजरा - वझरे मार्गे आरळगुंडी व चिमणे दरम्यानच्या ‘बादे’ नावाच्या शिवारात दाखल झाला आहे. टस्करने केलेल्या नुकसानीत आरळगुंडी येथील पांडुरंग मारुती पाटील यांच्या ऊस पिकाचे व दत्तात्रय शेटके यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. हा टस्कर दिवसभर आरळगुंडी नजीकच्या जंगलातच थांबला असण्याची शक्यता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षी टस्करया परिसरात आला होता. पण या मार्गाने तो सरळ पुढे गेला होता. आता हा टस्कर जर चिकोत्रा धरणाच्या दिशेने पुढे गेला तर त्याला पिण्यासाठी पुरेसा पाणी साठा मिळणार आहे. त्यामुळे त्याचा या परिसरात मुक्काम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने त्याला या परिसरातून बाहेर काढणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीचा खर्च वाचवून साठ हजारांची मदत

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

दिवाळी म्हणजे नवीन ड्रेस हे समीकरण जरी वर्षानुवर्षे जुळलं असलं तरी समाजातील अनेक मुलांना दिवाळीची नवलाई अनुभवता येत नाही. त्यातही अशी मुले एचआयव्हीबाधित आणि निराधार असतील तर नातेवाईकांसह समाजाकडूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येते. अशा मुलांच्या चेहऱ्यावर लोरीमा ग्रुपच्या युवा सदस्यांनी पुढे केलेल्या मदतीने निरागस हास्य फुलवले. केआयटी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप असलेल्या लोरीमा ग्रुपच्या या मुलांनी दिवाळीचा खर्च वाचवून जमवलेले ६० हजार रूपये शिये येथील करूणालय या निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासोबत काही मुलांच्या शालेय फीची व्यवस्था केली आहे.

दिवाळीसाठी ब्रँडेड कपडे, नव्या स्टाइलचे ड्रेस, शूजसह इतर खरेदीवर तरूणाईचा किमान पाच ते दहा हजारांचा खर्च होतो. हा खर्च वाचवून ते पैसे जमवून गरजू मुलांना देण्याबाबत ग्रुपमध्ये चर्चा करण्यात आली. ग्रुपमधील निलोत्पल गद्रे, सौरभ दानी, हर्षद दानी, श्रीधर गुरव, मनीष पवार, अमृता केसरकर आणि सु​जित चव्हाण यांनी ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी तीन वर्षापूर्वी प्रयत्न सुरू केले. यावर्षी लोरीमा ग्रुपच्या सदस्यांकडे साठ हजार रूपये जमा झाले. त्यातून संस्थेच्या आवारात मुलांच्या सुरक्षेसाठी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. तसेच संस्थेतील काही मुलांची शालेय फी भरण्यात येणार आहे. दिवाळीतील भाऊबीजेदिवशी ही आपुलकीचे भेट या मुलांना देण्यात आली.

पुढील वर्षी मुलांच्या औषधांचा खर्च

ही मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याबरोबरच औषधोपचारही करावे लागतात. त्यासाठी संस्थेला आर्थिक लढाई लढावी लागते. ही गरज ओळखून लोरीमा ग्रुपतर्फे पुढील वर्षी या उपक्रमातून या मुलांच्या औषधोपचाराचा खर्च उचलण्यात येणार आहे, अशी माहिती निलोत्पल गद्रे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळाची आजपासून संयुक्त पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमानतळाच्या अंतिम पाहणीसाठी नागरी हवाई वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) संयुक्त पथक मंगळवारी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. हे पथक दोन दिवस विमानतळाची पाहणी करुन अंतिम अहवाल देणार आहे. समितीच अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याने विमानोड्डाण ऑपरेटिंग परवाना आणि वेळेच्या स्लॉटचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गेली सहा वर्षे बंद असलेली विमानसेवा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत येत्या आठवडाभरात विमानसेवेचा परवाना मिळणार असल्याचे जाहीर केले होते.

लोकसभेत हवाई नागरी उड्डयणमंत्री अशोक गजपती राजू यांनी कोल्हापूरची विमानसेवा १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यादरम्यान विमानसेवा सुरू न झाल्याने गजपतींविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वीच भारतीय विमानतळ प्राधिकरण समितीने विमानतळावरील उपलब्ध सुविधांची पाहणी केली आणि अहवाल डीजीसीएला दिला होता. त्याबाबत अंतिम निर्णय देण्यासाठी संयुक्त समिती दाखल झाली आहे. या समितीत डीजीसीएचे ऑपरेशनचे उपसंचालक सुर्विता सक्सेना, सहायक संचालक मुकेश वर्मा, एएआयचे ऑपरेशनचे सरव्यवस्थापक एस. एस. बालन, विभागीय सरव्यवस्थापक कृष्णा कुमार, अधिकारी दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, कोल्हापूर एअरपोर्ट संचालक पूजा के. मूल, सिव्हीलचे राजेश अय्यर यांचा समावेश आहे.

एअर इंडिया आणि स्पाइस जेट कंपनीने विमानसेवा सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘उडान’ योजनेतून सेवा दिल्यास कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील विमानसेवेसाठी ५० टक्के आसनांसाठी प्रत्येकी २५०० हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. पहिल्या नऊ प्रवाशांना अडीच हजार आणि उर्वरित प्रवाशांना सात हजार रुपये भाडे असेल. राज्य सरकारकडून भाड्यात सवलत दिली जाणार आहे. एक तासांचा हा विमानप्रवास असेल. कोल्हापूरहून जाणाऱ्या विमानाला दर बुधवारी आणि शुक्रवारचा स्लॉट मिळाला आहे. त्यामुळे विमानोड्डाणाचा परवाना मिळाल्यास विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार असून स्लॉटची वेळ निश्चित करावी लागणार आहे.

००

विमानोड्डाणाचा परवाना आणि वेळेच्या स्लॉटचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजता समिती भेट घेणार आहे. समितीने केलेली पाहणीनंतर पुढील दिशा निश्चित होणार आहे.

खासदार धनंजय महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती सभापतिपदी कृष्णात पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृष्णात पाटील (रा. कसबा सांगाव, ता. कागल) यांची अपेक्षेप्रमाणे मंगळवारी निवड झाली. समितीच्या सभागृहात दुपारी तीन वाजता निवडीची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा कुंभार अध्यक्षस्थानी होत्या. एकमेव अर्ज आल्यामुळे पाटील यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. पाटील कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक आहेत. निवडीनंतर पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला.

सभापती, उपसभापतिपदावर एक वर्षानंतर रोटेशनने दुसऱ्या गटाच्या संचालकास संधी देण्याचा फॉर्म्युला सुरुवातीला निश्चित केला. त्यानुसार दुसऱ्या वर्षी संधी मिळालेले राष्ट्रवादीचे सर्जेराव पाटील यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला. त्या जागेवर कृष्णात पाटील या आपल्या पुतण्यालाच संधी मिळावी, यासाठी आमदार मुश्रीफ गटाचे ‌कार्यकर्ते व शेतकरी संघाचे सभापती युवराज पाटील यांनी फिल्डिंग लावली. म्हणून दोन दिवसांपुर्वी झालेल्या नेत्यांच्या बैठकीत पाटील यांच्या नावावर एकमत झाले. त्यानुसार निवडीवेळी सभापतिपदासाठी कृष्णात पाटील यांनी अर्ज दाखल केले. त्यास परशराम खुडे यांनी सूचक विलास साठे यांनी अनुमोदन दिले. एकच अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध झाली.

निवडीनंतर नूतन सभापती पाटील म्हणाले, माझे वडील बाजार समितीवर १९७२ ते १९८७ दरम्यान संचालक होते. त्याच्यानंतर मी संचालक झालो. आता सभापती होण्याचा मान मिळाला. संचालक असताना शेतकऱ्यांचे प्रश्न, सुविधांसाठी आक्रमकपणे भूमिका मांडली. यापुढील काळात सभापती म्हणून शेतकऱ्यांसह बाजार समित्याच्या सर्व घटकांचा विचार केला जाईल. समितीच्या आवारातील कोल्ड स्टोअरेज ‘बांधा वापरा, हस्तातंर करा’ या तत्त्वावर बांधण्यात येणार आहे. त्याची प्र‌क्रिया अंतिम टप्यात आहे. समितीचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी संचालक भगवान काटे, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, बाबा लाड, अॅड. किरण पाटील, विलास साठे, नाथाजी पाटील, अमित कांबळे, ए. डी. पाटील यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी लाभार्थी यादी ऑनलाइन पोर्टलवरून गायब

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या कर्जमाफी योजनेतील पहिल्या टप्यातील गावनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून अचानकपणे गायब झाली आहे. या पोर्टलवील ‘लाभार्थ्यांची यादी’ यावर क्लीक केल्यानंतर ही लिंकच ओपन होत नाही. यादीत काही निवडक शेतकऱ्यांची नावे असल्याने अपात्र शेतकऱ्यांत सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. सर्वच शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीका सुरू झाली. परिणामी पोर्टलवरील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी गायब केली आहे.

दिवाळीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. दिवाळीआधी प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला. जिल्हयातील संबंधित शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कर्जमाफीचे तोंडभरून कौतुक केले. त्यानंतर जिल्हयातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेचे वेध लागले. त्यांची उत्सूकता ताणली. ते आपले सरकार पोर्टलवर जाऊन पाहू लागले. त्यामध्ये गावातील काही निवडकच नावे दिसू लागली. अर्ज केलेले उर्वरित मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांत नाराजी पसरली. यादीत नाव नसलेले शेतकरी गाव पातळीवर असलेल्या सेवा संस्था प्रशासनाकडे चौकशी करीत आहेत. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅक, सहकार विभागाकडे चौकशी करीत आहेत. मात्र या यंत्रणेकडूनही ठोस उत्तर मिळाले नाही. तर दुसरीकडे पोर्टलवरून यादीच गायब झाली.

जिल्ह्यातील २७ जणांनाच लाभ

प्रमाणपत्र दिलेल्या जिल्हयातील २७ शेतकऱ्यांच्याच खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांत प्रतीक्षाच आहे. कधीपासून रक्कम जमा होईल, त्याचे ठोस उत्तर सहकार विभागाच्या प्रशासनाकडे नाही. परिणामी शेतकऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ दिवसात १८ नाटकांची पर्वणी

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग होतील. २३ नोव्हेंबरपर्यंत १३ दिवसांत १८ नाट्यप्रयोग पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. यशोधरा पंचशील थिएटर अॅकॅडमीचे कलाकार पु. ल. देशपांडे लिखित ‘वटवट वटवट’ या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार आहेत.

गेल्यावर्षी सीमाभागातील काही संस्था सहभागी झाल्या होत्या. यंदाही बेळगाव येथील दोन संस्थांचा स्पर्धेतील सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची बेळगाव शाखा आणि सरस्वती वाचनालय यांचा समावेश आहे. कोल्हापुरातील हौशी नाट्यपरंपरा जपणाऱ्या अभिरुची नाट्यसंस्था आणि गायन समाज देवलक्लबही स्पर्धेत सहभागी होत आहेत. हिमांशी स्मार्त, विद्यासागर अध्यापक या कोल्हापुरातील लेखकांच्या नाट्यकृती यंदा सादर होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातूनही यावर्षी नाट्यसंस्थांचा सहभाग उल्लेखनीय आहे.

दिनांक संस्था नाटकाचे नाव

७ नोव्हेंबर सुगुण नाट्यकला संस्था, कोल्हापूर अग्निपंख

८ नोव्हेंबर तुकाराम माळी तालीम मंडळ, कोल्हापूर वाटले होते काही मैल

९ नोव्हेंबर सरस्वती वाचनालय, बेळगाव पेलटियर

१० नोव्हेंबर साई नाट्यधारा मंडळ, हतकर्णी के ५

११ नोव्हेंबर शिवम नाट्यसंस्था, कोल्हापूर प्रश्न मनाच्या पटलावर

१२ नोव्हेंबर शाहीरी पोवाडा कलामंच, कोल्हापूर सूर्यास्त

१३ नोव्हेंबर संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था, जयसिंगपूर इथे ओशाळला मृत्यू

१४ नोव्हेंबर रूद्रांश अॅकॅडमी, कोल्हापूर बिलिव्ह इन

१५ नोव्हेंबर रंगयात्रा नाट्यसंस्था, इचलकरंजी द कॉन्शन्स

१६ नोव्हेंबर प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर दलदल

१७ नोव्हेंबर ​फिनिक्स क्रिएशन, कोल्हापूर शांतता कोर्ट चालू आहे

१८ नोव्हेंबर पदन्यास कला अकादमी, इचलकरंजी इथॉस

१९ नोव्हेंबर निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी नथिंग टू से

२० नोव्हेंबर गायन समाज देवल क्लब कोल्हापूर दर्द ए डिस्को

२१ नोव्हेंबर भालजी पेंढारकर कलादालन, कोल्हापूर हयवदन

२२ नोव्हेंबर मराठी नाट्यपरिषद, बेळगाव शाखा एक शून्य सीमारेषा

२३ नोव्हेंबर अभिरूची नाट्यसंस्था, कोल्हापूर यकृत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तावडेची सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी (ता. २५) जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. अटकेतील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी पानसरे यांच्याशी संबंधित संस्थांमधील आर्थिक व्यवहारांचे तपशील मागितले होते. याबाबत युक्त‌िवाद होण्याची शक्यता आहे.

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे सध्या पुणे येथे सीबीआयच्या कोठडीत आहे. जिल्हा सत्र न्यायालयातील मागील सुनावणीदरम्यान तावडे याचे वकील समीर पटवर्धन यांनी कॉम्रेड पानसरे यांच्याशी संबंधित संस्थांचे आर्थिक तपशील मिळावेत, या मागणीचा अर्ज दिला होता. बुधवारी होणाऱ्या सुनावणीत या अर्जावर युक्त‌िवाद होण्याची शक्यता आहे. पानसरे यांची हत्या आर्थिक वादातून झाल्याची शक्यता तावडे याच्या वकिलांनी वारंवार केली आहे. याबाबत दोन्ही बाजूने कोर्टात युक्त‌िवाद होण्याची शक्यता आहे. वीरेंद्रसिंह तावडे पुण्यातील येरवडा जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीमध्ये सहभाग घेणार आहे. दरम्यान, समीर गायकवाड याच्या जामिनाला पानसरे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला असून, याबाबत हायकोर्टात अपिल दाखल केले आहे. यावर सोमवारी (ता. ३०) सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कन्नडसक्ती’ची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटक सरकारने शाळांमधून कन्नड भाषा सक्तीची करणाऱ्या परिपत्रकाचा शिवसेनेच्यावतीने निषेध करुन मिरजकर तिकटी येथे परिपत्रकाची होळी केली. तसेच दहा दिवसात जिल्ह्यातील कन्नड भाषेतील फलक प्रशासनाने उतरुन न घेतल्यास शिवसेना स्टाइलने फलक हटवण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

कर्नाटक सरकारने कन्नड भाषेतूनच सक्तीचे शालेय शिक्षण घेण्याच्या निर्णयाचे परिपत्रक काढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भाषा निवडीच्या दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करुन सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे, अशा भावना शिवसेनेच्यावतीने व्यक्त करण्यात आल्या. या परिपत्रकामुळे कर्नाटकातील दिल्ली बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने कन्नड भाषेतून शिक्षण घेण्याची सक्ती रद्द करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला द्यावेत. तसेच कन्नड भाषा सक्तीचा घाट अंमलात येऊ देऊ नये अशीही मागणीही यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

याबाबत जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिरजकर तिकटी येथे परिपत्रकाची होळी करण्यात आली.

आगामी दहा दिवसांत शहर तसेच जिल्ह्यातील कन्नड भाषेतील फलक संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी काढून घेतले नाहीत तर शिवसैनिक आपल्या स्टाइलने ते उतरतील. त्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर असेल, असा इशाराही देण्यात आला.

आंदोलनात सुजीत चव्हाण, रवी चौगुले, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, शशिकांत बिडकर, प्रा. शिवाजीराव पाटील, रणजीत आयरेकर, राजेंद्र पाटील, दिलीप जाधव, दिलीप देसाई, राजू यादव, विनोद खोत, शुभांगी पोवार, दीपाली शिंदे, सुनिका निकम, मेघा पेडणेकर, अमित कांबळे सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजोपाध्येनगरात दोन घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात पुन्हा चोरटे सक्रीय झाले असून, राजोपाध्येनगरात दोन घरफोड्या झाल्या आहेत. तुकाराम पांडुरंग गायकवाड (वय ४३, सध्या रा. राजोपाध्येनगर, प्लॉट न. ३, मूळ रा. सोनके, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि साजिद मुल्लाणी (रा. राजोपाध्येनगर) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान घडलेला प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम गायकवाड हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील आहेत. ते वाहन दुरुस्तीचे काम करतात. राजोपाध्येनगरात भाड्याच्या घरात ते पत्नी आणि मुलांसह राहतात. मुलांना दिवाळीची सुटी असल्याने ते रविवारी (ता. १५) पत्नी आणि मुलांना घेऊन गावाकडे गेले. दिवाळी संपल्यानंतर सोमवारी (ता. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास ते घरी परत आले. घरी पोहोचताच त्यांना घराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. आत जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कटले होते. कपाटातील रोख २० हजार रुपये आणि हॉलमधील टीव्ही नसल्याचे लक्षात आले. शेजारीच राहणारे साजिद मुल्लाणी यांचेही घर बंद होते. गायकवाड यांनी मुल्लाणी यांच्या घराची पाहणी केली. मुल्लाणी यांच्याही घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी मुल्लाणी यांच्या घरातील रोख ५५०० रुपये आणि ३ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दोन्ही घरातील रोख २५ हजार रुपयांसह ३५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.

तुकाराम गायकवाड यांनी जुना राजवाडा पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनी वस्तुंवरील ठसे घेतले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचाही प्रयत्न केला. आठवड्यापूर्वीच चोरीची घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. गायकवाड यांच्यासह मुल्लाणी यांचेही घर बंद असल्याने चोरट्यांनी या घरांमध्ये चोरी केली. याबाबत गायकवाड यांनी सोमवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, सहायक फौजदार दिलीप सुतार अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट पाइपलाइन’च्या अडथळ्यांत वाढच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

५३ किलोमीटरपैकी केवळ २८ किलोमीटर लांबीचे पाइपलाइनचे काम पुर्ण, जॅकवेलसाठी ४६ मीटरपैकी २५ मीटरची झालेली खोदाई, इरिगेशन व वन विभागाची अजून परवानगी नाही यामुळे शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या थेट पाइपलाइनचे काम लांबण्याचीच चिन्हे आहेत. सध्या अजूनही काही भागात पाऊस होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी लवकर कमी होणार नसल्याने जॅकवेलचे महत्त्वाचे काम बंदच राहणार आहे.

थेट पाइपलाइनच्या कामासाठी जॅकवेल बांधण्याबरोबरच विविध गावातून, विविध सरकारी विभागांच्या हद्दीतून टाकण्यात येणाऱ्या पाइपलाइनसाठी परवानगी घेण्यात बराच कालावधी गेला. तुरंबे, हळदी, सोळांकूर, कपिलेश्वर अशा गावांमधून जाणाऱ्या पाइपलाइनच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला. यातून काम लांबण्यास सुरुवात झाली. त्या सर्व अडथळ्यांवर मात करत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात असताना कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला गेल्याने आंदोलकांकडून काम बंद पाडण्यात आले. जॅकवेल तसेच पाइपलाइन ज्या भागातून टाकण्यात येणार आहे, तिथे पावसाचे प्रमाण मोठे असल्याने त्याचाही कायम अडथळा होत होता. यंदा पावसाचे आगमन लांबले. पण अजूनही काही भागात पाऊस पडत असल्याने काम सुरू करता येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ५३ किलोमीटरपैकी २८ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

योजनेमध्ये काळम्मावाडी धरणाच्या भागात जॅकवेल बांधण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्यासाठी मोठी खोदाई करावी लागत आहे. ४६ मीटर खोदाई करायची असून त्यापैकी २५ मीटरची खोदाई केली आहे. सध्या धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याची पातळी वाढली असून जॅकवेलसाठी बांधण्यात आलेल्या कॉपर डॅमपेक्षाही चार मीटर उंच पाणी आहे. त्यामुळे जॅकवेलच्या परिसरात पाणी असून जोपर्यंत किमान चार मीटर पाणी पातळी कमी होत नाही, तोपर्यंत जॅकवेलसाठी खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणातील पाणीही उपसता येणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष खोदाईचे काम सुरू करण्यास बराच कालावधी लागणार आहे. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याची गरज नाही. यामुळे धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. परिणामी धरणातील पाणी पातळी डिसेंबरपर्यंत कमी होण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम म्हणून जॅकवेलचे काम बंदच ठेवण्याशिवाय पर्याय नाही. सध्या इरिगेशन विभागाच्या हद्दीतून टाकण्यात येणाऱ्या १२ किलोमीटरच्या पाइपलाइनसाठी करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा करार झाल्यानंतर तिथे पाइपलाइन टाकता येणार नाही. सोळांकूर गावातून जाणाऱ्या पाइपलाइनबाबत निर्णय झालेला नाही. कपिलेश्वर गावातील कामही अजून सुरू झालेले नाही. यामुळे थेट पाइपलाइनच्या कामातील अडथळ्यांमध्ये वाढच होत आहे.

स्वतंत्र अधिकारीच नाही

थेट पाइपलाइनचे काम गतीने पुर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अनेकवेळा तर आदेश निघाला आहे इथपर्यंत चर्चा होती. पण आजतागायत अशा अधिकाऱ्याची नेमणूकच झालेली नाही. यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे की केवळ चर्चाच आहे याबाबत स्पष्टता होण्याची गरज आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिर समितीच्यादोन अध्यक्षपदाला वारकऱ्यांचा विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
वारकरी संप्रदायाचे आंदोलन मिटविण्यासाठी मंदिर समितीवर दोन अध्यक्ष पदे निर्माण करण्याचा निर्णय फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. मात्र, मुख्यमंत्र्‍यांच्या या तोडग्यामुळे वारकरी संप्रदाय संतप्त झाला आहे. पूर्वी केलेल्या मागण्यांवर आपण ठाम असल्याची भूमिका महाराज मंडळींनी व्यक्त केली.
मंदिर समिती बरखास्त करून संपूर्ण समिती वारकरी संप्रदायाची बनविण्यासाठी वारकरी संप्रदाय मागील तीन महिने आंदोलन करीत आहे. आषाढी यात्रेवेळी केलेले आंदोलन कार्तिकी यात्रेपूर्वी संपविण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीस सरकारने घाईत दोन अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यावर वारकरी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आषाढीला फडणवीस सरकारने वारकऱ्यांना विश्वासात न घेता राजकीय मंदिर समितीची घोषणा केली होती. त्यामुळे माऊलीचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये रोखून वारकरी संप्रदायाने आंदोलनास सुरुवात केली होती. आंदोलनात सातही मानाच्या पालखी सोहळ्यासह राज्यभरातील सर्व वारकरी नेते एकत्र आल्याने सरकार अडचणीत आले होते. समितीचे उपाध्यक्षपद किंवा कार्याध्यक्ष पद वारकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव सरकारने दिला होता. मात्र वारकरी संप्रदायाने ते फेटाळल्यावर अचानक सहअध्यक्षपद निर्माण करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, वारकरी संप्रदायाने सरकारला कार्तिक अष्टमीचा अल्टिमेटम दिला आहे. अष्टमीपूर्वी निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. एकाच समितीचे दोन अध्यक्ष कसे, असा सवाल वारकरी नेते विचारात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्ग संमलेनासाठी किल्ले सुंदरगडावर लगबगस्वागताध्यक्षपदी विक्रमसिंह पाटणकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
यंदा चौथे दुर्ग संमलेन पाटण (जि. सातारा) येथील सुंदरगडावर (घेरादात्तेगड) येथे येत्या ११ व १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची घोषणा निवड करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व महाराष्ट्रातील सुमारे तीस शिवभक्त संस्था-संघटनांच्या माध्यमांतून प्रतिवर्षी दुर्ग संमेलनाचे आयोजन केले जाते.
दुर्गप्रेमी कुलदीप देसाई, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे आदी इतिहासप्रेमी मंडळी या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती संमेलन संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पाटण येथील राम मंदिर येथे पार पडली. या वेळी टाळ्यांच्या गजरात व घोषणांच्या निनादात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना मानाची पगडी, तलवार, शेला व पुष्पहार प्रदान करून स्वागताध्यक्षपद बहाल करण्यात आले. या वेळी दुर्ग संमेलन समितीचे संस्थापक सुदाम गायकवाड, सत्यजितसिंह पाटणकर, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, शस्त्रसंग्राहक विक्रमसिंह पाटील, इतिहास अभ्यासक अजय जाधवराव, महेश पाटील, शेखर तोडकर, शरद पवार, धैर्यशील पाटणकर संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर आदी उपस्थित होते.
दुर्ग संमलेन हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष किल्ल्यांचा सहवास तसेच शिव व्याख्यानांसोबतच दुर्ग पर्यटनाचा साक्षात्कार होतो. राज्याच्या बहुतेक जिल्ह्यांचा सहभाग असणारे हे संमेलन देशाच्या अन्य कोणत्याही राज्यात झाल्याचे दिसून येत नाही. या संमेलनात स्वागताध्यक्ष हेच सर्वात महत्त्वाचे पद आहे. घराण्याची परंपरा व वैयक्तिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊनच त्यांना स्वागताध्यक्षपद बहाल करीत असल्याचे के. एन. देसाई यांनी सांगितले.
असे असतील कार्यक्रम
महाराष्ट्रभरातील शिव व्याख्याते तसेच दुर्गप्रेमी, दुर्ग पर्यटनाचे अभ्यासक सहभागी होणार आहेत. संमेलनात शिवभक्तीचा अखंड जागर होणार आहे. शोभायात्रा, दुर्ग-ध्वज पूजन, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, स्लाईड शो, दांडपट्टा शस्त्रांचे प्रशिक्षण, शाहिरी कार्यक्रम, मराठमोळ्या स्पर्धा, व्याख्यान, प्रात्यक्षिके, असा ३६ तासांचा कार्यक्रम होणार आहे.
सहभागासाठी नोंदणी आवश्यक
दुर्ग संमेलनात कोणत्याही शुल्काशिवाय सहभागी होता येते. इथे राहण्या-जेवणासह, चहा, नाष्ट्यासह टुथपेस्ट, ब्रश, तेल, पावडर, कंगव्यापासूनची सर्व सेवा विनामूल्य देण्यात येते. मात्र, संमेलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. दूरध्वनी अथवा व्हॉटस अॅपवरून ही नोंदणी निश्चित करून आपला नंबर घेणे गरजेचे आहे. नोंदणीचा प्रारंभ स्वागताध्यक्ष विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमांनुसार पारदर्शक कामांना प्राधान्यआयुक्त रवींद्र खेबूडकरांचे महापौरांना प्रत्युत्तर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘सांगलीला मी आणि माझी कार्यपद्धती नवी नाही. ३२ रस्त्यांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. परंतु, पावसामुळे ती थांबली होती. सध्या १२ रस्त्यांची कामे सुरू आहेत. नव्याने होत असलेल्या रस्त्यांच्या दर्जाबाबत तडजोड करणार नाही आणि हलगर्जी करणाऱ्यांना सोडणारही नाही. सांगली महापालिकेचा आयुक्त म्हणून काम करीत असताना आपल्या कार्यक्षमतेबाबत सरकार निर्णय घेईल. त्यामुळे कोणत्याही राजकीय वक्तव्याला महापालिकेचा प्रशासन प्रमुख म्हणून मी उत्तर देणार नाही,’ असे प्रत्युत्तर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी महापौरांच्या आरोपाला दिले.
मंगळवारी महापौर हारुण शिकलगार यांनी आयुक्तांवर अविश्वास ठराव दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागरिकांच्या प्रश्नाबाबत आपण संवेदनशील असून, ते प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही आयुक्त म्हणाले.
युक्त म्हणाले, ‘मी आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यापासून आजअखेर सुमारे १५० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. पैशांची उपलब्धता, मनुष्यबळ आणि पालिकेचा आवाका याची दखल घेऊन विकास कामांचे नियोजन करावे लागते. नागरिकांचे आरोग्य, पिण्याच्या पाणी, ड्रेनेज आणि रस्ते यांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ती सरकारी नियमावलीप्रमाणे होणे तितकेच आवश्यक आहे. सरकारच्या आदेशानुसार मिरज अमृत पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. महत्त्वाच्या ३२ रस्त्यांची कामे पावसामुळे थांबली होती. रस्त्यांच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे आता होणारे रस्ते तीन वर्षांपर्यंत खराब होणार नाहीत. महापालिकेसमोरचा रस्ता तब्बल २७ वर्षांनंतर होत आहे. ठेकेदारांची रिऑडीटची सुमारे २६ कोटी पैकी २३ कोटींची बीले दिली आहेत. नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते हवे आहेत. त्याचे नियोजन सुरू असून, २७ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर खड्डेमुक्त महापालिकेचा आराखडा सादर करणार आहोत.’
दबावाला बळी पडणार नाही
आजपर्यंतच्या माझ्या २४ वर्षांच्या सरकारी सेवेत कोणाचा गैरसमज होईल, असे काम केलेले नाही. सांगली आणि जिल्ह्याला आपली कार्यपद्धती माहित असल्याने ज्यांनी कोणी आपल्यावर आरोप केले ते जनतेला पटणारे नाहीत. याची मला खात्री आहे. स्थायी समितीचे सभापती आणि अनेक नगरसेवक येऊन आपल्याला भेटून गेले. त्यामुळे कोणाच्या दबावाखाली नाही तर नागरिकांचे प्रश्न, सरकारी नियम याची सांगड घालून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आपण काम करीत आहोत. आयुक्त पदाचे कोणत्याही परिस्थितीत अवमूल्यन होऊ देणार नाही, याची खबरदारी घेत आहे. कोणाच्याही आणि कसल्याही दबावाला थारा देणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा सोसायट्याहोणार ‘रोल मॉडेल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्यातील सेवा सोसायट्या सक्षम करण्यासाठी सांगलीचे रोल मॉडेल (पथदर्शक प्रकल्प) करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सेवा सोसायट्यांचे सर्व अध्यक्ष व सचिव यांचा मेळावा १७ नोव्हेंबर रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात घेण्यात येत असल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलिप पाटील यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
पाटील म्हणाले, सहकार पंढरी अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील, गुलाबाराव पाटील, राजारामबापू पाटील या नेत्यांनी जिल्ह्यात सहकाराचे भक्कम जाळे निर्माण करून राज्यात आदर्श निर्माण केला. गावागावांत असणाऱ्या सेवा सोसायट्यांना फार महत्व आहे. या सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकच आहेत. या सोसायट्या अधिक सक्षम केल्या तर शेतकऱ्यांची व गावाचीही प्रगती होणार आहे. सध्या या सोसायट्या केवळ पिककर्ज, दिर्घ व मध्यम मुदत कर्जे अशी जुजबी सेवा देतात. अपवादात्मक सोसायट्यांचे खतविक्री, रेशनिंग दुकान, पेट्रोल पंप, असे इतरही व्यवसाय आहेत. मात्र सर्वच सोसायट्यांचे अशा माध्यमातील उत्पन्न वाढले पाहिजे. सोसायट्यांनी सध्याच्या कर्जप्रकरणांसह गावातील तरुण उद्योजक, छोटे-मोठे व्यवसायिक यांना कर्ज देण्यास सुरवात केली पाहीजे. जेणेकरून गावच्या प्रगतीला, गावच्या तरूणांच्या प्रगतीला हातभार लागणार आहे. गावातील या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना इतर बँका कर्ज देत नाहीत, त्यांना कर्ज देऊन सक्षम करण्याचे काम सोसायट्या करू शकतात. यासह विविध उपक्रम सोसायट्यांच्या माध्यमातून राबवण्याचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images