Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाऊस पुन्हा ‘कामावर’

$
0
0
दोन दिवसांची सुटी संपवून सांगली, सातारा परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. सांगली, मिरजेत पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. तर साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

राज्यात येत्या सोमवारी शाळा प्रवेशोत्सव होणार

$
0
0
शाळाबाह्य विद्यार्थी संख्या वाढवून विद्यार्थी आणि पालकांमध्ये शाळांविषयी सकारात्मक दृष्टिकोन पसरविण्यासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून येत्या सोमवारी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.

अजय कांडर, सुरेश सावंत यांना ‘दमसा’ सभेचा रत्नाकर काव्य पुरस्कार

$
0
0
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा रत्नाकर काव्य पुरस्कार अजय कांडर (कणकवली) यांच्या ‘हत्ती इलो’ आणि सुरेश सावंत (नांदेड) यांच्या ‘धुनी’ या काव्यसंग्रहांसाठी विभागून देण्यात येणार आहे.

कास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ

$
0
0
सातारा शहराच्या अर्ध्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी गेल्या चार दिवसांपासून झालेल्या संततधार पावसाने वाढली.

सांगली पालिकेसाठी उदंड इच्छुक

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षासाठी ती एक डोकेदुखी होऊन बसली आहे.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा

$
0
0
सासरच्या लोकांनी अमानुष छळ करून सौ.रोहीणी शेटके यांचा बळी घेतल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर गुरूवारी शिवसेनेने मुरगूड पोलिस ठाण्यावरच मोर्चा काढला.

छाननीतच सरपंचपदाची ‘लॉटरी’

$
0
0
शिरोळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीतच महिला उमेदवाराला सरपंचपदाची ‘लॉटरी’ लागली. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरल्यामुळे सौ.सुवर्णा प्रकाश कोळी यांचा सरपंचपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

पेन्शनच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

$
0
0
पेन्शन देतो अशी बतावणी करुन रांगोळी(ता.हातकणंगले) येथील वृध्देचे सुमारे २० हजार रुपये किंमतीचे पाऊण तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले. राजवाडा परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

नागरी सुविधांसाठी शिवसेनेचा इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

$
0
0
शहरातील रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता याबरोबरच अत्यावश्यक नागरी सुविधांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

राधानगरी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाची गरज

$
0
0
मागील सहा महिन्यांपासून राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयाला नव्या इमारती, आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व विविध तांत्रिक सुविधांसह अद्ययावत आरोग्य सेवा पुरविण्यात सुरवात केली आहे.

सातवेत सापडले मगरीचे पिल्लू

$
0
0
सातवे (ता. पन्हाळा) येथे मंगळवारी सायंकाळी शिवाजी उर्फ आण्णा विश्वास निकम यांच्या शेताशेजारील पाणंदीत मगरीचे पिल्लू आढळून आले. शेतातून घरी येत असताना त्यांना हे मगरीचे पिल्लू दिसले.

फुले देऊन होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

$
0
0
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात येणार आहे. आरटीई नुसार ही अंमलबजावणी होत असून स्वागतासाठी ‘प्रवेशोत्सव कार्यक्रम’ आयोजित केला आहे.

नागरी सुविधांसाठी शिवसेनेचा इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

$
0
0
शहरातील रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता याबरोबरच अत्यावश्यक नागरी सुविधांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

शेतीची कामे अडली

$
0
0
बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे तळी, विहिरी यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे; पण पाऊस सतत सुरू असल्यामुळे भातपेरण्या खोळंबल्या आहेत.

कॉसमॉस को-ऑप बँकेची इचलकरंजीत शाखा सुरू

$
0
0
भारतातील सर्वात वेगवान प्रगती करणारी सहकारी बँक अशी ओळख असणाऱ्या दि कॉसमॉस को-ऑप. मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक इचलकरंजीकरांच्या सेवेस दाखल झाली आहे. या शाखेचे उद्घाटन उद्योगपती अरुणकुमार गोयंका यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

सुरूपलीतील शेतकऱ्यांची पाणी उपशाबाबत तक्रार

$
0
0
बेनिक्रे (ता.कागल) येथील शेतीसाठी वेदगंगा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी पाटबंधारे विभागाने परवानगी दिली आहे.

चला, जाणून घेऊ प्रयोगातून पर्यावरण

$
0
0
अरण्यानंद प्रतिष्ठानच्यावतीने ‘चला जाणून घेऊ प्रयोगांमधून पर्यावरण’ या दोन दिवशीय कार्यशाळेतून एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनो, पारंपरिक बियाणांचेही जतन करा

$
0
0
बाजारात येणाऱ्या नवीन वाणांचा शेतकरी वापर करू लागल्यामुळे पारंपरिक वाणे नष्ट होऊ लागली आहेत. अनेक जुन्या वाणांच्या जाती नष्ट होत आहेत. सध्या भात, सोयाबीन, भुईमूग पेरणीचा हंगाम आहे.

मजूर संघाच्या अध्यक्षपदी जोशी

$
0
0
दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा मजूर संस्था संघाच्या चेअरमनपदी उदय जोशी यांची गुरुवारी निवड करण्यात आली. मुकुंद पोवार गटाला अविश्वास ठरावाद्वारे हादरा देऊन १२ संचालकांनी ही निवड केल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला.

पोलंड कॉलिंग कोल्हापूर

$
0
0
युरोपमधील राजकीय-आर्थिक स्थैर्य असलेल्या व आर्थिक मंदीतही आर्थिक वाढ नोंदवलेल्या पोलंडने कोल्हापुरातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी गुरुवारी निमंत्रण दिले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images